Public Program 1987-12-13
13 डिसेंबर 1987
Public Program
Rahuri (India)
Talk Language: English, Marathi | Transcript (Marathi) - Draft
आजच वातावरण बघून गहिवरून आलं मला . आणि असं वाटलं कि आज पर्यंत संताना कधीही अशी सलामी मिळाली नसेल . आम्ही एक संत आहोत .आमच्या जवळ द्यायला काही नाही . प्रेमा शिवाय तेही परमेश्वरी प्रेमा शिवाय द्यायला काही नाही . पण हे परमेश्वरी प्रेम म्हणजेच सगळं आहे . आता आपण सुशीक्षीत होणार . शिक्षण आपल्याला मिळालं आहे . त्यावर त्या शिक्षणाने जागृत होऊन चारीकडे आपण बघाल कि देव देव म्हणणारे लोक किती चुकीचं काम करत असतात . जे स्वताला फार देव भक्त म्हणवतात आणखीन नेहमी देवाच्या नावाने टाहो फोडत असतात तेच स्वतः स्वतःच्या आयुष्यामध्ये तस वागत नाहीत . त्यांचं चरित्र तस नसत . त्यांच्या वागण्या मध्ये धर्म दिसून येत नाही . उलट ते अधर्मी असतात . आता चाणाक्ष बुद्धीमुळे तुम्ही हे बघाल आणि तुम्हाला असं वाटेल कि देव आहे किंवा नाही . ह्या लोकांची वागणूक बघून असं वाटत नाही देवळात गेलं कि लोक तिथे पैसे लुबाडतात . कुठेही गेलं तरी देवाच्या नावावर वाट्टेल तसे अत्याचार लोक करत आहेत . त्या मुले असा प्रश्न उभा राहतो कि देवच नाही . तेव्हा ह्या सर्व साधुसंतांनी आपल्याला जे इतक्या गोड वाणीने निक्षून सांगितलेलं आहे ते सत्य होत कि नव्हतं . असाही प्रश्न तुमच्या समोर उद्या उभा राहील .आणि हे आपल्या तरुण पिढीचं आज होत आहे . त्या बद्दल मी त्यांना मुळीच दोष देणार नाही . कारण जे समोर दिसत ते त्यांना दिसत आहे . आणि ते बघतात . पण देवाच्या नावावर कुणी वाईटपणा काढला त्यात देव वाईट होत नाही किंवा देव नाही हे सिद्ध होत नाही . आधीच जर आपण असं ठाम मत करून घेतलं कि देव नाही तर हि चुकीची गोष्ट आहे . कारण तुम्ही अजून जाणलं नाही . जर कुणी म्हंटल इ नायट्रोजन म्हणून काही गॅसच नाही आहे ,तुम्ही अजून ते जाणलच नाही ,पहिलाच नाही तर अस कस म्हणाल कि नाही म्हणून . जर तुम्ही म्हणालात कि इंग्लंड म्हणून कुणी देशच नाही आहे आणि असं ठाम मत करून ठेवलं तर असं आपण म्हणू कि बघा आधी आहे कि नाही ते . त्या प्रमाणेच देव आहे कि नाही ते हे आधी जाणलं पाहिजे . आणि त्याची जीवनाला अत्यंत आवश्यकता आहे . कारण आपल्या मध्ये जेव्हढ्या शक्त्या आहेत ,आपण जे काही आज आहोत ते परमेश्वरामुळे . देवाने आपल्याला अमिबा पासून मानव केलेलं आहे मग मानवाला त्याने मुभा दिली ,त्याला स्वातंत्र्य दिल कि तुला जस वागायचं आहे तस वाग .
तुला वाटलं तर तू स्वर्गात जाऊ शकतोस आणि तुला वाटलं तर तू नरकात जाऊ शकतोस . तुला जर वाईट गोष्टी घ्यायच्या असतील तर वाईट गोष्टी घे किंवा जर चांगल्या गोष्टी घ्यायच्या असतील तर चांगल्या गोष्टी घे . तर त्या वेळेला असा प्रश्न विचारतील कि माताजी असं देवाने का केलं . चांगल्याच मार्गात का घातलं नाही सगळ्यांना . त्याला कारण असं आहे कि जेव्हा तुम्ही लहान शाळेत होता तेव्हा तुम्हाला शिकवलं जात असे दोन आणि दोन चार . मोठं झाल्यावर तुम्हाला ते गणित दिल जात असे कि ते गणित तुम्ही सोडवून घ्या . कारण ती स्वतंत्रता दिल्या शिवाय तुम्ही कॉलेज मध्ये जाऊ शकत नाही . तसच परमेश्वराने तुम्हाला हि स्वतंत्रता दिली आहे ती तुम्ही वापरून बघा कारण जर तुम्हाला शेवटची जी ती मोठी परम स्वतंत्रता पाहिजे त्यासाठी आधी हि स्वतंत्रता वापरता अली पाहिजे . आता जर आम्ही तुम्हाला मुभा दिली आणि म्हंटल हे बघा आता हि तुम्हाला मुभा आहे . जे शहाणे असतील ते ठीक मार्गावर जाणार . आणि जे मूर्ख असतील ते मूर्ख मार्गावर जाणार . म्हणून स्वतःचा निवडा करण्याची हि मुभा देवाने तुम्हाला दिली . आता ह्या उपरांत असं आहे कि जर समजा कि एखादी गोष्ट भरकटत गेली तर त्याला संभाळायला कोणची अशी शक्ती आहे ज्यांनी त्याची दिशाभूल झाली नाही किंवा तो वाईट मार्गावर गेला नाही किंवा त्यानं काही चुका केल्या नाहीत असं लक्षात येईल . अशी एखादी काही शक्ती असायला पाहिजे कि त्या पासून आपल्याला कळलं पाहजे कि हे हे फक्त सत्य आहे ,केवळ सत्य आहे . त्याला तोड नाही हे केलं तरी ठीक ते केलं तरी ठीक असं नाही तर हेच ठीक आहे . हि जाणण्याची शक्ती आपल्या मध्ये आहे का . ती सद्या नाही. जरी आपल्याला स्वतंत्रता आहे तरी हि शक्ती आपल्या मध्ये नाही . म्हणून देवाने आपल्यामध्ये आणखीन एक शक्ती दिली आहे तिला आपण कुंडलिनी शक्ती म्हणतो . ती शक्ती जागृत झाल्यामुळे आपल्या चित्ता मध्ये आपल्या आत्म्याचा प्रकाश येतो . आणि सगळी कडे आपल्याला चैतन्य वाटू लागत . आणि ह्या चैतन्या पासून आपण जणू शकतो कि आपण चांगल्या मार्गावर आहोत कि वाईट मार्गावर आहोत . इतकेच नव्हे पण जर आपण वाईट मार्गावर असलो तर त्या मार्गावरून पीछेहाट करण्याची आपल्यामध्ये शक्ती येते . म्हणजे आपण समर्थ होतो . आता इथे जी पुष्कळ बाहेरची लोक आली आहेत जी तुमच्या पेक्षा वयाने पुष्कळ मोठी आहेत . आणि ह्यांनी ह्या स्वतंत्रतेत बरेचशे चुकीचे मार्ग घेतले होते . ते सगळे सोडून एका रात्रीत ते बदलले . एका रात्रीत यांचं आयुष्य बदललं . त्याला मी काही सांगितलं नाही त्यांना कि तुम्ही असं करू नका तस करू नका म्हणून . असं काहीच मी सांगत नाही . तुमचाच दिवा तुमच्यात पेटवून दिला कि मग स्वतःच्याच दिव्यात तुम्ही बघता कि चांगलं काय आणि वाईट काय ते . मला काही सांगायला नको . तुम्ही च स्वतःचे गुरु होऊन घ्या . आणि हि किमया ह्या सहजयोगामध्ये साध्य झालेली आहे . आणि त्याचे अनेक परिणाम आहेत . अर्थातच परमेश्वरी साम्राज्यात गेल्या बरोबर परमेश्वराच जे काही आहे ते सर्व आपल्याला लाभतच . त्याचे आशीर्वाद येतातच . आता पुष्कळशी मुल मला माहित आहेत जी आमच्या कडे अली ,त्यांचे आईवडील घेऊन आले म्हणाले हि वर्गात अगदी ढ आहेत . काही शिकत नाहीत . आता ती मुल फर्स्ट क्लास फर्स्ट अली . आणि आता त्याला स्कॉलरशिप मिळते . खूप लोक ज्यांना खायला अन्न नाही त्यांची व्यवस्था होते . हे कस काय घडत . त्याला कारण परमेश्वरी आशीर्वाद आहेत .
परमेश्वर हा आहे आणि तो सहजयोगाने आपण सिद्ध करू शकतो . नामदेवांनी म्हंटले आहे कि आकाशामध्ये उंच भरारी मारणारी पतंग आहे . आणि एक मुलगा हातात त्याची डोर सांभाळून आहे . जरी तो सगळ्यांशी बोलतो हसतो खेळतो तरी लक्ष त्याच त्या पतंगावर आहे . त्यामुळे ती पतंग इकडून तिकडे जाऊ शकत नाही . तसच सहजयोगात आल्यानंतर तुमचं लक्ष फक्त आत्म्यावर असत . आणि त्यामुळे तुम्ही इकडे तिकडे भरकटू शकत नाही . चुकीच्या मार्गावर जाऊ शकत नाही . चुकीच्या मार्गाला जाऊन परत येता आणि आपला जो मार्ग उन्नतीचा आहे तो तुम्ही गाठता . अर्थात सहजयोगानी सगळ्यांच्या प्रकुर्त्या ठीक होतातच . सगळ्यांचा स्वभाव चांगला होतोच . सगळ्यांची परिस्थिती ठोक होतेच . पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्म्याचा आनंद ज्याचं वर्णन करता येत नाही तो आनंद निरंतर आपल्या मध्ये वाहत असतो . आणि मनुष्य अत्यंत समाधानी आणि यशस्वी बनतो . कोणच्याही कार्याला तुम्ही हात घालायचा म्हंटला तर ते परमेश्वराच्या सहाय्या शिवाय ते यशस्वी होऊ शकत नाही आणि तस झालं तर तुमचं डोक खराब होईल . तुमच्या मध्ये अहंकार येईल . पण एकदा का जर तुम्ही आत्मसाक्षात्कारी झालात तर तुमच्यात अहंकार येणार नाही .
आम्हाला फार आनंद झाला कि शिवाजी महाराजांच्या नावावर हि शीक्षण संस्था आहे . आणि श्री छत्रपती शिवाजी महाराज हे स्वतः आत्मसाक्षात्कारी होते . आणि ते नेहमी म्हणत असत कि स्वधर्म ओळखावा . स्वधर्म म्हणजे स्वतःचा म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म ओळखावा . त्यांनी अशा बेकारच्या धर्मा बद्दल कधीच असा उहापोह केला नाही . दुसरं काही झालं तरी ते म्हणायचे हि श्रींची इच्छा . म्हणजे आदिशक्तीची इच्छा . हि श्रींची इच्छा आहे म्हणजे परमेश्वराच्या इच्छेमध्ये स्वतःची इच्छा पूर्णपणे सामावून घेतली पाहिजे . म्हणून असे चारित्र्यवान आणि उज्वल आपल्याला महाराज लाभले . आता शिवाजी सारखे लोक उभे करायचे म्हणजे पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . ते जन्मतः च आत्मसाक्षात्कारी होते . पण आता तुम्हाला आत्मसाक्षात्कार लाभला तर तुमच्यातही ती तेजस्विता आणि ते गांभीर्य येईल आणि ह्या देशाचा उध्दार होईल . विशेष करून मुलांमध्ये त्याच सृजन झालं पाहिजे . कारण आजच्या काळामध्ये इतक्या वाईट गोष्टी आपल्या मध्ये आलेल्या आहेत कि त्या समजण्या साठी मुलांना आत्मसाक्षात्कार झालाच पाहिजे त्यांच्यात ती शक्ती अली पाहिजे आणि त्यांनी ती तेजस्विता स्वतःमध्ये सांभाळली पाहिजे . आणि शाळेतून हे कार्यक्रम झाले म्हणजे आमचं काम झालं असं मला वाटेल . आज आपल्याला माहित नाही कि दुसऱ्या देशांमध्ये मुलांची काय स्तिती आहे . देवाचा हात सोडल्या मुळे लोकांना त्या मुलांचं आता काय करावं हेच त्यांना समजेना झालाय . रसातळाला जाऊन पोहोचतील कि काय त्यांचा सर्वनाश होईल काय अशा आशंकेने सर्व लोक बसलेले आहेत . आणि कुणालाही त्यात हात घालता येत नाही . चला एक तर कारण हे आहे कि देवावरचा विश्वास कमी आहे . आणि दुसरं कारण असं कि तिथे युद्ध झाली . युद्धा मुळे लोकांच्या सर्व स्थिरता गेल्या आणि त्यांची मूल्ये गेली . पण आपल्या देशाला अशी काही आच येऊ शकली नाही . परमेश्वरी कृपेने आता आपण मात्र आत्मसाक्षात्कारात यावे , स्वतःला जाणावे , तुझं आहे तुजपाशी त्या शक्त्या जाणाव्यात आणि अत्यंत शक्तिशाली तुम्ही होणार आहात . नुसतं विद्यार्जन आणि त्यातच पारंगत नाही पण प्रत्येक गोष्टीत तुम्ही पारंगत व्हाल आणि तुमच्यातून मोठमोठाले पुढारी निघून ह्या देशाचं कल्याण करतील अशी मला पूर्ण अशा आहे . परमेश्वर तुम्हा सर्वाना सुबुद्धी देऊ दे हाच माझा तुम्हाला आशीर्वाद आहे .
आता जे भाषण आपण ऐकलं ते सत्य करण्याची वेळ आलेली आहे . ते सगळ्यांना लाभान्वित होणार आहे . ते तुम्ही आपल्या आयुष्यात बघा कस घडत ते . सगळ्यांनी फक्त डावा हात माझ्याकडे असा करायचा . आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा . बोलायचं नाही कुणी. लक्ष स्वतःकडे असायला पाहिजे . आपण दुसऱ्यांकडे नेहमी लक्ष दिलेलं आहे . आता वेळ अशी आलेली आहे कि लक्ष स्वतःकडे दिल पाहिजे . आता आपण काय करतो कि डाव्या हातामध्ये आपली इच्छाशक्ती आहे . तर आपण इच्छा प्रदर्शित करत आहोत प्रतीक रूपाने कि माताजी आम्हाला आपण आत्मसाक्षात्कार द्यवा . आणि उजवा हात जमिनीवर कारण जमिनीवर श्री गणेशाचं स्वरूप आहे . म्हणून त्याला स्मरण करून आपण जमिनीवर हात ठेऊन आपण ह्या पृथ्वीमातेला ,महाराष्ट्राच्या ह्या पुण्यभूमीला नमस्कार करून हात ठेवला आहे कि आमच्यात जे काही जडत्त्व असेल ते आमच्यातून ओढून घे . हि इच्छा आपण प्रदर्शित केली आहे . आता याच्या नंतर उजवा हात माझ्याकडे आणि डावा हात असा आकाशाकडे करायचा . आता उजवा हात म्हणजे क्रियाशक्ती . आपण पुष्कळ कार्य करतो . आणि त्या क्रियेमध्ये आपल्या हातून चुका घडतात . अहंकार येतो आणि आपण अति कार्य केल्यामुळे कधी कधी अनेक रोग सुद्धा आपल्याला जडतात . जसा मधुमेह आहे . हार्टचा आहे . हे रोग सगळे आपल्याला अति कर्मा मुळे होतात . त्या साठी उजवा हात माझ्याकडे आणि डावाहात असा वर करायचा . अति अभ्यास केला समजा वेड्या सारखा आणि देवाचा त्याबरोबर संबंध नसला तरीसुध्दा हा दोष येऊ शकतो .
आता डोळे मिटून घ्या परत . आणि डावाहात परत माझ्याकडे आणि उजवा हात परत जमिनीवर ठेवा . आपल्याला परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे . तेव्हा प्रसन्नचित्त असलं पाहिजे . आनंदात असलं पाहिजे . माझं हे चुकलं माझं ते चुकलं किंवा मी पापी आहे असे जे स्वतःला कमीपणा देणारे विचार जे आहेत ते काही करायचे नाहीत . यावेळी आम्ही देवाच्या साम्राज्यात निघालो आहे . तेव्हा स्वतःबद्दल आपण प्रेम दाखवलं पाहिजे . आदर दाखवला पाहिजे . स्वतःची किंमत केली पाहिजे . आता परत उजवा हात आमच्याकडे आणि डावाहात आकाशाकडे करायचा . डोळे मिटून घ्या . कार्य करताना आपल्या मध्ये जे काही दोष आहेत शारीरिक किंवा बुध्दीने केलेले जे दोष आहेत ते आकाशतत्वात सर्व जाऊन मिळतील . आता एकदा परत डावाहात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा . आणि हळूहळू डोळे उघडायचे . आणि आता माझ्याकडे निर्विचारतेत बघायचं . विचार न करता माझ्याकडे बघायचं . मान थोडीशी खाली घालून जिथे डोक्यावर आपला टाळू भाग आहे तिथे तिथे आपला तळहात वरती धरायचा . आणि बघायचं आपल्या डोक्यातून थंड थंड काही येतंय का . काहींच्या वर पर्यंत येत काहींच्या जवळ येत . हात खालीवर करून बघा . आता उजवा हात माझ्याकडे करून डाव्याहाताने बघा . येतंय का काही ? आता दोन्ही हात असे आकाशाकडे करायचे ,मान थोडी मागे टाकायची आणि असा प्रश्न विचारायचा कि हि ब्राम्हशक्ती आहे का ?,श्री माताजी हि परमेश्वराची चैतन्यशक्ती आहे का ?हि परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का ?असा प्रश्न मनामध्ये विचारायचा . तीनदा प्रश्न विचारायचा . आता खाली हात करून बघा . तळ हातात काही गारगार लागतंय का ?डोक्यातही गारगार झालय . हे जे हातामध्ये गारगार लागतंय त्यालाच आदिशंकराचार्यानी सलीलां सलीलां ,थंड थंड असं वाऱ्यासारखं दिसत . त्या नंतर तुम्हाला द्रीष्टीला पण दिसेल असं चकचक चमकताना . हे चैतन्य आहे .
आता हे कस वापरायचं याचा उपयोग कसा करायचा हे नंतर शिकायला पाहिजे . पण आपल्या आता हाताला लागलं आहे . आता ज्या लोकांना हे चैतन्य जाणवलं त्या लोकांनी हात वर करा दोन्ही . खोट सांगायचं नाही खरं खरं सांगायचं . ज्यांना आलं त्यांना आलं ज्यांना नाही आलं त्याना नाही काही हरकत नाही . छान छान सगळ्या शाळेतल्या बहुतेक लोकांना आलेलं आहे . काही लोकांना आलं नाही त्याना बघितलं पाहिजे . त्यांना इथले सहजयोगी करून देतील ठीक . एकदुसऱ्याच्या डोक्यावर हात ठेऊन पण तुम्ही बघू शकता आलं कि नाही ते . आणि दुसरी गोष्ट अशी आहे कि काही लोकांना येणार नाही त्याला कारण त्यांच्यात दोष आहे . किंवा त्यांना काहीतरी त्रास आहे . बघा परत एकदा डोक्यावर येतंय ना गार . आता पुढे काय करायचं त्याच्यासाठी इथे सेंटर आहे . सेंटर वर यायचं किंवा जसे मास्तर करतील त्या प्रमाणे आपण करूयात . तेव्हा ती व्यवस्था आपण पुढे करू ,मुलांची व्यवस्था आपण करू . मुलांसाठी बॅचेस आणि फोटो पाठवून दिले आहेत ते त्यांना वाटून टाका . तुम्हाला योग्य वाटेल त्या मुलांना द्या . आता ह्या पुस्तकामध्ये अर्थात आपण जस सांगितलं कि इथल्या मोठ्या मोठ्या साधुसंतांचे आमच्यावर फार उपकार आहेत . आणि त्यांनी जे काही इथे रक्त ओतलय ह्या जमिनीत त्याच्या दमवरच आम्ही सहजयोग करत आहोत . आणि त्यांचीच आम्ही फलश्रुती उपभोगत आहोत . पण हे परदेशातल्या लोकांचं आहे . सहजयोगाबद्दल जे वर्णन केलेलं आहे आणि ते हजारो वर्षांपासून कस करत आले आणि शेवटी आता परवा प्रोसेशन झालं त्याच वर्णन इतकं सुंदर केलाय ते आता थोडं वाचून दाखवतील . तसच गणपती पुळ्याला आम्ही भरवलं होत ते सुध्दा अगदी मुलांनी ऐकण्या सारखं आहे .
वर्णन - जे काही मी आत्ता वाचल हे एक माझ्या कल्पनेनं माताजींच्या थोर पणाबद्दल आहे . कारण हे परदेशी सहजयोगी त्यांनी जेव्हा माताजींना पाहिलं तर त्याना एक वेगळा अनुभव आला . आणि तो वेगळा अनुभव आल्या नंतर भावी पिढीबाबत एक व्हिजन त्यांना दिसलं . म्हणजे एक द्रिश्य त्याना दिसलेलं आहे . त्याना दर्शन जे झालेलं आहे त्या मध्ये ते असं कि हे विचारतात कि बुवा हे लहान लहान मुलंमुली ह्या नाच करत आहेत . ते नाच करत असताना एक मिरवणूक निघालेली आहे ,ती मिरवणूक हि माताजींची आहे . आणि मग त्यांनी अनेक प्रश्न विचारलेले आहेत . कि ह्या मुलांना आईवडील हे असताना सुध्दा इतके आनंदी ,प्रभावी असे जे ते झालेलं आहेत हा कुठला आनंद लुटत आहेत . तर त्या मध्ये त्याना असं व्हिजन दिसत कि हा जो आनंद आहे हा खरा आनंद परमेश्वराचा आनंद कि त्याना काहीतरी अत्यंत चांगलं सतत फुला फळातून निर्माण होत असं भव्य दिव्य ,सुंदर साक्षात्कार झालेला आहे आणि त्यामुळेच हा इतका हि जी मिरवणूक आहे हि दैदिप्यमान दिसत आहे . आणि याच प्रकारे याचे प्रगती होत राहील आणि एके दिवशी आपला भारत देश च काय संपूर्ण जगामध्ये हे आनंदच चैतन्य राहील .
माताजी -आता यांच्यामध्ये लहिलेलं आहे ते रवींद्रनाथ टागोरांनी लिहिलेलं आहे . गणपतीपुळ्याचा जे संमेलन झालं मी हे वाचून दाखवते . आता हे पुस्तक मी इथे लायब्ररीत ठेवणार आहे तेव्हा सगळ्यांना वाचता येईल . म्हणजे आपल्याकडे आपल्याला माहित आहे रवींद्रनाथ टागोर म्हणून फार मोठे कवी झाले . आणि त्यांनी सुध्दा हे जे काही दर्शन पाहिलं आहे हे गणपती पुळ्यामधे आम्ही दरवर्षी मेळावा करत असतो तिथे जगाच्या प्रत्येक देशातून लोक येत असतात आणि त्याच त्यांनी वर्णन जवळ जवळ साठ वर्षांपूर्वी करून ठेवलं आहे ते अगदी पाहण्यासारखं आहे कि हे द्रष्टे किती बरोबर वर्णन करत असत . आता मीच वाचून दाखवते म्हणजे बघू .
आपल्या भारताची महती सांगितलेली आहे सगळी कवितेत ह्या .
आपला भारत देश आहे त्याच्या किनाऱ्यावर ,जिथे सर्व जातीची माणसे एकत्र अली आहेत ,
हे माझे मन इथे हात पसरून उभा आहे मी ,मानवतेच्या देवाला नमस्कार करतो आणि मोठ्या आनंदाने त्यांची स्तुती गातो ,
ध्यानाच्या खोलीत हरवलेली झाडे ,माला सारख्या नद्यांनी सजवलेली शेत ,
भारताच्या किनाऱ्यावर मी रोज पवित्र भूमी पाहतो . जिथे सर्व जातीचे पुरुष एकत्र आले आहेत .
ज्याच्या आमंत्रणावरून कुणास ठाऊक . माणसाचे तरंगते प्रवाह आले आणि
आर्यांच्या समुद्रात विलीन झाले . द्रविड ,हुन ,पठाण आणि मुघल ,
ते सर्व एकाच शरीरात विलीन झाले आहेत .
आज पाश्चिमात्यांनी आपली दारे उघडली आहेत . जिथून भेटवस्तू येतात . देणे आणि घेणे .
भारताच्या किनाऱ्यावर सर्वांचे स्वागत होईल . जिथे सर्व जातीचे पुरुष एकत्र आले आहेत .
वेड्या जल्लोषात विजयाची गाणी गात ते आले आहेत का ?वाळवंट आणि डोंगर ओलांडणे ,
ते सर्व माझ्यात आणि माझ्यात राहतात . रक्त त्यांच्या विदेशी सुरांचा प्रतिध्वनी करते .
हे रुद्रवीणा तुझ्या संगीतावर वाजवा , ज्यांना आपण तिरस्काराने वेगळे ठेवले ते
सुध्दा तुमच्या भोवती जमतील .
भारताचा किनारा जिथे सर्व जातीचे लोक एकत्र आले आहेत .
इथे एके दिवशी माणसाच्या हृदयात ओम चा गंभीर नाद
अखंडपणे गजबजत होता . तपाच्या अग्नीत सर्व मतभेद विसरले गेले .
आणि अनेकजण एक झाले त्या यज्ञ वेदीवर .
आपण सर्वानी मान झुकवून भारताच्या किनाऱ्यावर एकत्र यायला पाहिजे .
जिथे सर्व जातीचे पुरुष एकत्र आले आहेत .
त्या यज्ञात दुःखाची रक्तलाल जोतं प्रज्वलित असते .
हे माझ्या मना हे दुःख सहन करा आणि परमेश्वराची हाक ऐका .
सर्व लाज भीतीवर विजय मिळवा आणि सर्व अपमान नाहीसे होऊद्या .
असह्य दुःखांच्या दिवसाच्या शेवटी किती समृद्ध जीवन उदयास येईल .
रात्र संपते आणि महामाया जागृत होते . चला हे आर्य आणि हे अआर्य ,
हिंदू आणि मुस्लिम ,हे इंग्रज ,ख्रिश्चन चला ,हे ब्राम्हणा आपले मन शुद्ध करा
आणि सर्वांचे हात जोडा . हे शोषितांनो चला आणि तुमच्या अपमानाचे जोखड
नाहीसे होऊ दे . तुम्ही सर्वजण आईचा अभिषेक करायला या .भारताच्या किनाऱ्यावरील
सर्वांच्या स्पर्शाने पवित्र झालेल्या पाण्याने शुभपात्र अजून भरलेले नाही . ,जिथे सर्व जातीचे
पुरुष एकत्र आले आहेत .
सगळ्यांना अनंत आशीर्वाद .