Public Program

Public Program 1986-12-29

Location
Talk duration
23'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

29 डिसेंबर 1986

Public Program

Satara (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

Public Program

Until the Time 11.50 mins - Flowers offering at the Lotus Feet of Shri Mataji by various local centre representatives from Satara district of Maharashtra

15.30 mins - Shri Mataji's speech starts

सातारा जिल्ह्यातील सहजयोगींचे कार्य बघून आत्य आनंद होतोय. तुम्ही गुलाल उडवत मिरवणूकित आपला आनंद प्रदर्शित केला, हा आनंद सातारा जिल्ह्यात पसरून 15 सेंटर उभी केली गेली हे फार मोठं काम आहे. श्री रामदासांची भूमी ही, स्वतः ते हनुमानांचे अवतरण होते. त्यांच्या कार्याची सुरुवात कधीच झाली होती, पण त्याची फल स्तुती मात्र आज दिसते की सातारा जिल्ह्यामध्ये 15 केंद्र उघडण्यात आली. आपल्या महाराष्ट्रात अनेक संत साधू होऊन गेले आणि त्यांनी ज्या ज्या गोष्टी सांगितल्या, त्या सर्व आपण सहज योगात बघू शकतो.

सर्वप्रथम त्यांनी असं सांगितलं, की सद्गुरु तो जो तुम्हाला परमेश्वराशी ओळख करून देतो, ब्रह्मनिष्ठ बनवतो. जो तुमच्याकडून पैसे घेतो तुमची दिशाभूल करतो, तुम्हाला चूक मार्गात घालतो तो गुरु नव्हे. एकच लक्ष मानवाकडे असलं पाहिजे आणि ते म्हणजे आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय, आम्ही तुम्हाला काहीही सांगू शकत नाही, त्यापेक्षा मुकच राहिलेलं बरं.असं सुद्धा ज्ञानेश्वरांनी शेवटी म्हटलं. कारण आत्मसाक्षात्कार झाला नाही डोळे बंद आहेत आणि डोळे बंद असताना जी तुमची श्रद्धा आहे ती अंधश्रद्धा आहे. त्या अंधश्रद्धेला काही अर्थ नाही. आज मी असं ऐकलं आहे की इथे एक अंधश्रद्धा निर्मूलन संस्था काढली आहे, हे बरं झालं म्हणा, हे आम्ही बरेच वर्षापासून म्हणत होतो. पण जे लोक अंधश्रद्धा काढतात त्यांची अंधता गेली आहे का नाही हे आधी बघायला पाहिजे. अंधश्रद्धा कोणात आहे आणि कुणात नाही हे जाणण्यासाठी डोळस व्हायला पाहिजे. जी मंडळी डोळस झालेली नाही, ती दुसऱ्यांना आंधळे झाले आहात हे कसं सांगू शकतील? हा डोळसपणा म्हणजेच आत्म्याचा साक्षात्कार आहे. आत्म्याचा साक्षात्कार झालाच पाहिजे, आपल्याला हे प्राप्त झालंच पाहिजे आणि ते मिळण अगदी सोपं सरळ आहे, हे सुद्धा या लोकांनी सांगितलं आहे. त्यावर मग लोकांचा म्हणणं आहे की, सोपं आहे तर मग आम्हाला मिळत का नाही?

प्रत्येक गोष्टीला वेळ यावी लागते. ती वेळ आली की मग हे कार्य आपोआप घटित होतं. ही जिवंत प्रक्रिया आहे, हे काय कृत्रिम कार्य नव्हे, तुम्हाला चार प्लास्टिकची फुले तयार करायची आणि ती होऊ शकतात. जर तुम्हाला परमेश्वरी तत्त्वावर ही जिवंत फुल बघायची असतील तर वेळोवेळी बघावी लागतात, त्यांच्याच वेळी ती येतात. तसंच आज सहज योगाची ही वेळ आलेली आहे, या वेळामध्ये, हजारो करोडो लोकांना पार झाली पाहिजे, नाहीतर आपल्या कल्याणाचा काहीच मार्ग राहत नाही. यात आल्यामुळे आपली सामाजिक संपत्ती सर्व परिस्थिती दुरुस्त होते, पण सगळ्यात मुख्य म्हणजे, आपला मनामध्ये शांती समाधान सौख्य नांदू लागतं. स्वभाव बदलून मनुष्य अगदी प्रेमळ बनून जातो, आणि आपल्या मध्ये एवढ्या शक्त्या आहेत हे जाणून गर्विष्ठ व्हायच्या विजी तो नम्र होऊन तो लोकांच्या सेवेला लागतो. हेच राम राज्य आहे, याचीच आपण इच्छा केली होती. पसायदान सांगितलं होतं ते हेच, जे काय वर्णन केलेला आहे आज पर्यंत की हे होणार ते होणार - ते हेच आहे. आणि ते तुम्ही मिळवलात, तुम्ही सहज योगी आहात, इथे भरपूर सहजयोगी की बसलेत मला जाणवते, आणि त्यांनी एवढी मजल गाठली आहे, तेव्हा पुढेही सातारा जिल्ह्यात आणखीन आपण प्रगती करूया. पुष्कळ लोकांना याच्यात घेऊन येऊ. त्यामध्ये अडथळे आणणारे पुष्कळ लोक आहेत, मुख्य म्हणजे ज्यांना व्यसन आहेत. जे व्यसनाधीन लोक आहेत त्यांच्यावर राग नाही केला पाहिजे, जे व्यसनामध्ये फसले आहेत ते गुलामगिरी मध्ये फसले आहेत. त्यांना रागावला नाही पाहिजे, त्यांना समजून द्यायला पाहिजे की 'बाबा तुझ्या मध्ये शक्ती नाही आहे, तू निशक्त आहेस, म्हणून तू या सवयी सोडू शकत नाहीस. तुला माहित आहे की हे चुकीचं आहे, पण तू सोडू शकत नाहीस. सकाळी तो म्हणे मी सोडतो आणि संध्याकाळी तो सोडू शकत नाही. म्हणून त्याला शक्ती देण्यासाठी त्याला आत्म्याचा बळ पाहिजे. आणि तुला त्या आत्म्याचं बळ तुझ्या मध्ये आहे, तुझा आत्मा तुझ्या मध्ये स्थित आहे. तू जागृती करून घे म्हणजे तुझं सर्व काही सुटेल'. असं समजून सांगायला पाहिजे, रागावून किंवा त्याला काही आद्वा तत्व बोलून चालत नाही.

दुसरे अडथळे येतात, म्हणजे जे देवाच्या नावावर पैसे कमवतात. त्यांना समजतच नाही की पैसे घेतल्याशिवाय माताजी कुंडलिनी कसे जागृत करू शकतात? पण जिवंत कार्याला पैसे समजत नाही, तुम्ही किती पैसे देऊन फुलं उमलता? किती पैसे देऊन झाड उगवता? तुम्ही किती पैसे देऊन पेरणी करता? जसा या जमिनीला पैसे समजत नाही तसं मलाही पैसा बैशाचं काय समजत नाही. सगळच एक कप पदार्थ आहे, सगळं मातीसारखं आहे. कुंडलिनीलाही पैसे समजत नाहीत, तुम्ही जर तिला पैसे दाखवले तर ती काय वर येणार आहे? तिचा उथान होणार आहे का? तुम्ही 'उदय आंबे म्हणता', ती काय पैसे दाखवून वर येणार आहे का? पण ही दिशाभूल आपल्याला आत्तापर्यंत झालेली आहे. प्रत्येक देवीच्या देवळात सुद्धा लोक असं पैसे उकळत असतात. हे फार वाईट आहे आणि त्यांना याचं फार मोठं पाप लागेल. देवळामध्ये सुद्धा आता भूत पिशाच बोलवून बायकांना बोलवून त्यांना अंगात घालून नाचायला सांगतात. आपण एवढे भोळे भाबडे असतो आपल्याला समजत नाही, आपल्याला वाटतं त्यांच्या देवी आली आहे. त्यांना मुळीच हात लावायचं नाही ते भुतं असतात. ती जर बाई आपल्या घरात आली तर लक्ष्मी दुसऱ्या पायरीने निघून जाणार, लक्ष्मी थांबणार नाही त्या घरात. म्हणून अशा ठिकाणी जिथे भूत नाचवली जातात देवीच्या नावाने - म्हणजे केवढ मोठा पाप आहे. नवरात्रात देवीच्या नावानं देवळात असं नाचवणं केवढा मोठा बाप आहे. यांच्या सात पिढ्या या पापाचं निवारण करण्यात लागेल. तरीसुद्धा हे भरणार नाही अस भयंकर पाहत आहे हे. आणि लोक हे करत आहेत, प्रत्येक देवळात हे सुरू आहे मी बघत आहे. आणि त्याचा त्रास इतर सर्व लोकांनाही उचलावा लागतो.

सातारा जिल्ह्यामध्ये दुष्काळ आहे असं ऐकलं होतं मी, परवा पूजेनंतर लगेचच पाऊस पडला आणि भरपूर पाऊस पडू दे. पावसाला काय एवढे भरपूर सहजगी असताना तर तो भरपूर पडेल. पण एवढेच आहे की गावामध्ये लोकांनी अत्यंत बेकारीची गोष्ट म्हणजे तंबाखू खाणे आणि तंबाखू उगवणे, दारू पिणे, इत्यादी इत्यादी असे घाणेरडी व्यसन घेतले आहेत. त्याहून काही लोक परमेश्वरच नाही असं म्हणतात. त्यामुळे इथं दुष्काळ पडणं हे साहजिक आहे. तुम्ही जर म्हटलं परमेश्वर नाही, तर मग परमेश्वर म्हणेल ' मी नाही न, मग राहावा तुम्ही अस'.

असेही म्हणणारे पुष्कळ संभावित लोक मी पाहिलेत. आपल्या महाराष्ट्रात विशेष करून हे बोकाळलेलं आहे की परमेश्वरच नाही. जर तुम्हाला परमेश्वर आतापर्यंत मिळाला नाही तर याचा अर्थ असं नाही की परमेश्वर नाही, आणि सहज योगाने तुम्ही सिद्ध करून दाखवू शकता की परमेश्वर आहे. आजच एक मुसलमान गृहस्थ म्हणाले, कि श्री माताजी माझ्या डाव्या हातात येते नाही आणि उजव्या हातात येतं. मी म्हटलं 'विचारा तुम्ही किशोर माताजी साक्षात तुम्ही मोहम्मद पैगंबर आहात का?' असा विचारला विचारला त्यांच्या डाव्या हातातून पण चैतन्य लहरी येऊ लागल्या. मग, कोणी मुसलमान कोणी हिंदू कोणी सिख हे संपवून आपण मानव जात तेही योगीजन योगीजन झाल्यावरती तुम्ही अतीत, हा अतिथ शब्द खूप छान काढलाय तुम्ही, म्हणजे तुम्ही कोणातीत धर्मातील, याच्या पलीकडे तुम्ही जाता आणि तो धर्मातीत जाण्याचा जो मार्ग आहे तो कुंडलिनीचा योग आहे. त्यासाठी पैसे द्यावे लागतात, महिन्यात करावी लागते किंवा त्यामुळे काय त्रास होतो या ब्राहमक कल्पना सोडून टाकल्या पाहिजे आणि हे तुम्हाला माहित नाही असं नाही आहे. हे लोकांना समजून पाठवून द्यायला पाहिजे. एक सरळ तुम्ही तुकारामांचे उदाहरण घेतलं, तुकाराम आणि कितीतरी प्रकार ह्याचे निरूपण लिहलेलं आहे. ज्ञानेश्वरांनी पण किती सुंदर लिहिलेला आहे, अमृतअनुभव हे पुस्तक वाचत होते, त्यात किती सुंदर निरूपण केला आहे, प्रत्येक गोष्टीच. किंवा तुम्ही नामदेवांचे जरी श्लोक वाचले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्यांनी किती सोप्या शब्दात मोठ्या गोष्टी सांगितल्यात म्हणजे गोरा कुंभाऱ्याला भेटायला गेले - आता जसे एक सहज योगी जेव्हा दुसऱ्या सहजोगीला भेटतात, कोणत्याही देशातले किंवा कोणत्याही जातीचे, कुठूनही आल्या असू दे, पण जो आनंद होतो त्यांनी किती सुंदर वर्णन केला आहे. त्यांना भेटायला गेले, नामदेवांना एकदम भरून आलं, गोरा कुंभाराला बघून म्हणतात 'निर्गुणाच्या भेटी आलो सगुनाशी - निर्गुणाला भेटायला आलो होतो चैतन्याला भेटायला आलो होतो तू सगुनात गोऱ्या कुंभाराच्या रूपात भेटलास!' हे त्यांनी एवढं आनंदाचं वर्णन लिहिलेला आहे. असं अनेक आपल्या साधुसंतांनी धाम्बिक लोकांच्या विरुद्ध, दिशाभूल करणाऱ्या गुरूंच्या बद्दल नंतर पैसे खाणाऱ्या लोकांच्या बद्दल अनेक टीका करून त्यांना शिव्या गाळ देऊन त्यांनी सांगितलं आहे की काय आहे हे काय?

रामदासांनी म्हंटल आहे ' महिषामर्दिनी चंदना त्याला पूजती ' महिषा म्हणजे म्हैस, रेड्याला चंदनानी रगडलं आणि मग त्याला पूजत बसले. इतकं स्पष्टपणे त्यांनी सांगितलं आहे हे आपल्या देशात किती अंधश्रद्धा आहे आणि आपण त्याला किती बळी पडतो. एकाने केलं की दुसरा तयार - सहज योगाशिवाय तुमच्या लक्षातच येणार नाही की कोणता माणूस खरा आहे किंवा खोटा. तसंच स्पष्ट दिसतं की परमेश्वराला तुम्हाला पैसा देता येता येतो का? त्याला विकत घेता येतं का? तुमची सत्ता त्याच्यावर चालू शकते का? त्याची तुमच्यावर सत्ता आहे. आणि तुमची सत्ता तुमच्यावर आणण्यासाठी परमेश्वराने तुम्हाला दिल आहे, तुमच्या सत्तेत तुम्हाला उभा करण्याच्या मागे आहे तो. तुम्ही दुसऱ्याच्या सत्तेत गेलेलं चालत नाही, तुम्ही तुमच्या सत्तेत उभारलं पाहिजे. तुमच्या आत्मबळांनी तुम्ही स्वतःला जाणलं पाहिजे, एवढेच नव्हे तर त्यावर निर्भर होऊन तुम्ही समर्थ व्हायला पाहिजे. समर्थ! ही परमेश्वराची इच्छा आहे, त्याच्या साम्राज्यात येऊन आनंदाच्या सागरात पोहाव. त्याची मुभा आहे, तसं यावं आणि विराजमान व्हावा आपल्या जागी अशी त्याची इच्छा आहे. कारण तो परमेश्वर अत्यंत दयाळू कृपाळू आणि सगळ्यात मोठा बाप आहे तो. त्यामुळे आपल्या मुलांना काय देऊ आणि काय नाही असं त्याला झालंय. पण शेवटी एक अडचण आहे, जिथे आपण आत्मसाक्षात्काराला प्राप्त झालो नाही. हे सगळ्यांनी जे सांगितलं आहे ते आम्ही सोप्या सरळ शब्दात तुम्हाला सांगत आहोत. हजारो वर्षापासून आपल्या महाराष्ट्रात काय पण सबंध हिंदुस्थानात याबद्दल बरच वर्णन करून ठेवलं आहे. कबीरांनी आणि केला आहे नानकांनी केला आहे, हे सिक लोक वेड्यासारखे वागतात काय हिंदू लोक वेड्यासारखे वागतात काय, तसं मुसलमान वागतात. सगळ्यांचा वेडेपणा बघून लोकांना वाटतं की परमेश्वर नाही आहे आणि ही गोष्ट खोटी आहे. परमेश्वराचा काय दोष तुम्हीच परमेश्वराला समजून घेत नाही. ज्याच्या मध्ये परमेश्वर जागा झाला त्याला सगळे धर्म एकच वाटतात. आत्मसाक्षात्कारी व्हावा हे शिवाजी महाराजांनी पण सांगितला आहे, स्वधर्म ओळखावा. स्व चा धर्म आत्म्याचा धर्म ओळखावा. त्यांनी सुद्धा सांगितलं, कारण ते स्वतः आत्मसाक्षात्कारी होते. असे राजे आपल्याला लाभले, जे स्वयं आत्मसाक्षात्कारी होते, हे आम्हा महाराष्ट्रीयन लोकांचे खूप मोठे भाग्य आहे. ( Shri Mataji coughing ) बोलून बोलून सुद्धा पुष्कळ दिवस झाले आणि रोजच बोलत असते. तासन्तास बोलत राहते त्यांनी कधी कधी घसा बसून जातो नाही का?

तरी सांगायचं आहे की, तुम्ही सहज योगी झालात तर त्याच्यामध्ये एक प्रकारची सूक्ष्मता यायला पाहिजे, प्रेम यायला पाहिजे, सर्व चरित्र बदलायला पाहिजे, काहीतरी विशेषता यायला पाहिजे आणि ध्यान धारणा ही केलीच पाहिजे. ध्यान केल्याशिवाय तुमची चंचलता जाणार नाही, एका ठिकाणी स्थिरावणार नाही. आणि परमेश्वराचे जे काही देणं आहे ते तुम्हाला मिळू शकणार नाही. म्हणजे जसं ह्यांचं कलेक्शन तुटलं अर्धवट तुटत राहिलं, तुम्हाला आभास मात्र येत राहील पण माझं भाषण ऐकू येणार नाही. त्याचप्रमाणे आपली जी परमेश्वराला ओढ लागली आहे ती सतत बांधून ठेवली पाहिजे. आणि आपले त्याच्याशी जे योग संबंध झालेले आहेत, ते पूर्णपणे स्थावर झाले पाहिजे. त्यासाठी आपण थोडीशी मेहनत केली पाहिजे, ही सहज योगानंतर ची मेहनत आहे, प्राप्त झाल्यानंतरची मेहनत आहे. हे सर्व तुम्हाला प्राप्त झालेला आहे आणि तुम्ही त्याच्यात रमत आहात त्याच्या आनंदात आहात, हे बघून एका आईला काय वाटतं की आमच्या जेवढा शक्त्या आहे आहेत ते तुम्हाला मिळाव्यात. पण त्या शब्दा मिळवण्यासाठी थोडी तरी तपस्या करावी लागेल. आणि त्या तपसेत तुम्हाला काय पैसे द्यायचे नाही आहेत, किंवा त्या तपसेत तुम्हाला काही उचलून द्यायचं नाही आहे. जे तुमच्यातला आहे तेच परत परत जागृत करून घ्यायचं, ते परत परत ठिकाण्यावर बसवायचं आणि श्रद्धेनी स्वतःकडे प्रेमाने बघून ती गोष्ट तुम्ही अशी करून घ्यायची की जी तुमच्यामध्ये आत्मीयता सबंध आत्मीयता आली पाहिजे. तुम्हाला असं नाही वाटलं पाहिजे, की सहज योग एक दुसरी गोष्ट आहे. तुम्ही सहज आहात आणि सहज योग तुम्ही आहात, आणि याची सगळी जबाबदारी तुमची आहे असं जर मान्य केलंत तर परमेश्वर तुम्हाला अत्यंत शक्ती देईल. तेव्हा एका आईच्या नात्याने, आज मी जात आहे सातारा जिल्हा सोडून, परत येणारच त्याबद्दल शंका नाही. पण तरीसुद्धा काही मुलांना सोडून जायचं, तिकडे काही मुलं वाट बघत बसत आहेत, सोडताना जो एक हृदयात धरणारा विषय आहे की विरहाची एक भावना मनात येते आणि गळा ही दाटून येतो. मुलांना आता सोडून चाललोय ही मुलं स्थिर स्थावर होतील का नाही ठिकाण्यावर बसतील का नाही? आणि हेही करून पुढे सहज योगाचे कार्य वाढवतील का नाही? सगळे तुमची चिंता तुमची कल्याणाची चिंता समोर येऊन उभी राहते. सहज योगा हा हिताचा मार्ग आहे, यांनी आपलं हित होतं हे अनेक लोक तुम्हाला सांगतील आणि हे तुम्हीही करून घ्यावं असं मी सगळ्यांना विनंती करते.

थोडासा सहज योगाचा प्रयोग आपण करून बघूया. बहुतेक लोक सहज योगी आहेत पण तरीसुद्धा आपण परत एकदा तो प्रयत्न करून बघू.

( Shri mataji giving en masse realization )

सगळ्यांनी डावा हात माझ्याकडे करायचा आणि या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीला नमस्कार करून गणेशाला नमस्कार करून उजवा हात जमिनीवर ठेवायचा. टोप्या काढून घ्या, कारण ब्रह्मरन्द्र छेदायचय म्हणून तोप्या काढून घ्या. टोप्या काढून बसायचं, आईकडे आपण टोप्या घालून जात नाही! डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर. लक्ष इथे असायला पाहिजे या ठिकाणी - याला ब्रह्मरंद्र असं म्हणतात, टाळू म्हणतात. विचार करायचा नाही माझ्याकडे बघा. शंका कुशंका काढू नये, आमचं कसं होईल? आम्ही एवढे वाईट, स्वतःबद्दल काही न्यून विचार ठेवला नाही पाहिजे. काहीही तसं नाही आहे, तुम्ही मानवात हीच मोठी गोष्ट आहे. आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा वर करायचा. उस्मा हात माझ्याकडे आणि विचार करायचा नाही. चित्त इथे टाळूवर ठेवलं पाहिजे. आता परत डावा हात माझ्याकडे करून, उजव्या हाताने बघा गार गार येतय का डोक्यातून? काहीतरी थंड येतंय का डोक्यात? या ब्रह्मरंध्रातून? मान खाली वाकून बघा थोडंसं. कुणाकुणाच फार पुढे येतं. आता उजवा हात माझ्याकडे करून डाव्या हाताने बघायचे. आता दोन्ही हात आकाशाकडे असे करायचे, आणि प्रश्न करायचा की 'श्री माताजी ही ब्रह्म शक्ती आहे का? ही परमेश्वरी शक्ती आहे का?' असा प्रश्न करायचा तीनदा. इथं लिहिलंय 'तमसो मा ज्योतिर्गमय - अंधात्कारापासून प्रकाशाकडे घेऊन जा' असं म्हटलं आहे , ते हेच. आता हात खाली करा आणि बघा की हातात गार येते का? ज्या लोकांच्या हातात आणि डोक्यात गार आलं आहे त्यांनी दोन्ही हात वर करायचे. सगळेजण तुम्ही पार झाले! किती सहज घडलं हे. त्याला कारण तुमची जन्मभूमी, महाराष्ट्राची पुण्यभूमी आणि तुम्ही. तुमचं पूर्वीचे सुखरूत फार होतं, त्याची फळं आहेत.

आता आम्हाला सांगलीला जायचं सगळ्यांना, तरी तुमचा आम्ही निरोप घेतो, आणि सगळ्या साताऱ्या जिल्ह्यामध्ये सहज योग पसरला पाहिजे असा सगळ्यांना आमचा आशीर्वाद आहे.

गर्दी करू नाही, दर्शनाशिवाय तुम्हाला बरं नाही वाटत, तसं आमच्याकडे सामूहिकच असतं. पण तरीसुद्धा, तुमच्या इच्छेप्रमाणे इथे हार ठेवले आहेत ते माझ्या गळ्यामध्ये पडलेले आहेत. त्यांच्यामध्ये चैतन्य आहे, तर लोकांनी... तीन-चार लोक एकत्र येऊ शकतात, गर्दी करू नये. तुम्ही पार झालेला आहात, त्या आनंदात गर्दी करायची गरज नाही. आरामात सगळ्यांनी हळूहळू उठून ओळीने दर्शनाला यावे.

( Seekers coming on stage to bow down to Shri Mataji)

Satara (India)

Loading map...