Sarvajanik Karyakram 1984-11-29
Current language: Marathi, list all talks in: Marathi
29 नोव्हेंबर 1984
Public Program
Mumbai (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
Sarvajanik Karyakram 29th November 1984 Date : Place Mumbai, Public Program
ORIGINAL TRANSCRIPT MARATHI TALK सत्याच्या शोधात असणाच्या सर्व मंडळींना आमचा नमस्कार! आजचा विषय आपल्याला ह्यांनी सांगितला आहे की, प्रपंच आणि सहजयोग यांचा काय संबंध आहे ? तो मी सांगितला पाहिजे. पहिल्यांदा शब्द 'प्रपंच' हा काय आहे तो आपण पाहिला पाहिजे. 'प्र' आणि 'पंच'. 'पंच' काय तर आपल्यामध्ये जी पंचमहाभूते आहेत त्यांनी निर्माण केलेली परिस्थिती. पण ती 'प्र' लावून त्याचा अर्थ दुसराच होतो. 'प्र' म्हणजे ह्या पंचमहाभूतांमध्ये ज्यांनी प्रकाश पडला आहे तो प्रपंच. 'अवघाची संसार सुखाचा करेन' असे जे म्हटले आहे ते सुख प्रपंचातच मिळायला पाहिजे. प्रपंच सांगून परमेश्वर मिळविता येत नाही. पुष्कळांची अशी कल्पना आहे की, योग म्हटला म्हणजे कुठे तरी हिमालयात बसायचे आणि गारठून मरायचे. हा योग नव्हे. हा हट्ट आहे. हट्टच नव्हे तर थोडासा मूर्खपणाच आहे. ही जी कल्पना लोकांनी धर्माबद्दल केली आहे ती अत्यंत चुकीची आहे. विशेषकरून महाराष्ट्रामध्ये जेवढे संत - होऊन गेले. त्या सगळ्यांनी प्रपंच केला फक्त रामदासस्वामींनी प्रपंच नाही केला. पण प्रत्येक दासबोधातून प्रपंच वाहतो आहे. 'प्रपंच काढून कोणी परमेश्वर मिळवू शकत नाही' हे त्यांचे वाक्य अनेकदा आले आहे . प्रपंचातून उठून आपण परमेश्वर मिळवायचा ही कल्पना बरेच वर्षापासून आपल्या देशात आलेली आहे. त्याला अनेक कारणे आहेत. कारण बुद्धाला उपरती झाली, तो संसार सोडून बाहेर गेला आणि त्याच्यानंतर त्याला आत्मसाक्षात्कार झाला. पण तो जेव्हा संसारात होता तेव्हाही त्याला उपरती झाली नसती अशी गोष्ट नाही. समजा आम्हाला दादरला जायचे आहे. तेव्हा आम्ही सरळ, धोपट मार्गाने तेथे पोहचू शकतो, पण जर आम्हाला इथून भिवंडीला जायचे आहे, मग तिकडून आणखी पुण्याला जायचे, आणखीन फिरून चार ठिकाणी मग परत आम्ही दादरला येऊ शकतो म्हणजे रस्ता एक सरळही असू शकतो आणि जो रस्ता आहे तो फिरून दुसरा खूप फिरून आला म्हणजे तो काही खरा मार्ग नव्हे. त्यावेळी त्याला सांगायला कोणी नव्हते. मार्ग सुगम करायला कोणी नव्हते म्हणून ते दुर्गम मार्गाने गेले. जे सुगम आहे ते दुर्गम करून घेतले. म्हणून आपण दुर्गम करून घ्यायचे काय? अत्यंत सुगम आहे ते सगळ्यांनी सांगितले आहे की, सहज आहे. 'सहज समाधी लागो' सगळ्या संत- साधूंनी सांगितले की, 'सहज समाधी लागो.' कबीरांनी लग्न केले होते. नानकांनी लग्न केले होते. जनकापासून आतापर्यंत परंपरागत जेवढे काही मोठे मोठे अवधूत झाले. सगळ्यांची लग्ने झाली होती आणि त्यानंतर बरेच असे होते ज्यांनी लग्न नाही केले परंतु 'लग्न संस्था ही चुकीची आहे किंवा ज्याला आपण प्रपंच म्हणतो ते चुकीचे आहे' असे कोणी म्हटलेले नाही. तेव्हा सर्वप्रथम आपण डोक्यातून ही कल्पना काढून टाकली पाहिजे की जर योग मार्गाला तुम्ही आले तर तुम्हाला प्रपंच सोडावा लागेल. उलट प्रपंच जर करायचा असेल तर सहजयोगात जरूर या. सुरुवातीला दादरला आम्ही जेव्हा सहजयोग सुरू केला तेव्हा प्रपंचाची गान्हाणी किंवा प्रपंचाच्या कटकटी ন
Original Transcript : Marathi घेऊन लोक माझ्याकडे येत होते. माझी सासू ठीक नाही, माझा नवरा ठीक नाही, माझी बायको ठीक नाही, माझी मुले ठीक नाहीत अशा रीतीने प्रपंचातील सगळे लहान लहान जे काही त्यांना प्रश्न होते त्यासाठी ते सहजयोगात येतात. सुरुवात अशीच होते. आपण देवळापर्यंतसुद्धा प्रपंचाच्या त्रासाला कंटाळून किंवा प्रपंचाच्या दुःखाला निवारण करण्यासाठी म्हणून जातो आणि परमेश्वराकडेसुद्धा हेच मागत असतो की, 'बाबा, माझे घर ठीक राहू दे. माझी मुले-बाळे ठीक राहू देत. आमच्या घरात सुखाचा संसार होऊ देत. सगळे आनंदाने नांदले म्हणजे झाले.' इथपर्यंत मनुष्याची कोती वृत्ती आहे. ती नसती तर पुढचे जमणार नाही. पहिल्या पायरीशिवाय दुसऱ्या पायरीवर तुम्ही येऊ शकत नाही. तर सगळ्यात मोठी सहजयोगातील पायरी म्हणजे प्रपंच हा पाहिजे. आम्ही संन्याशाला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही... देऊ शकत नाही. काय करणार ? पुष्कळदा करून पाहिले, पण जमतच नाही. मग त्याला सांगायचे की, 'बाबा, तू हे कपडे बदलून ये, मग तुला आम्ही आत्मसाक्षात्कार देऊ. ' जे जमतच नाही त्याच्याबद्दल उगीचच आपण मोठेपणा कशाला करायचा? त्याला कारण असे की, आपण जे कपडे घातलेले आहेत सन्याशाचे, हे बाह्यातले आहे सगळे. आतमध्ये तुम्ही संन्याशी झालात का? सन्यस्त हा एक भाव आहे. हा काही कपडे घालून दाखवायचा भाव नव्हे की आम्ही सन्यासी आहोत, आम्ही संन्यास घेतला, आम्ही घर सोडलं, आम्ही ते सोडलं, आम्ही हे सोडलं -हे सांगून जे लोक म्हणतात आम्ही योगमार्गाला येऊ ही स्वत:ची दिशाभूल करून घेतात. जर तुम्ही पलायनवादी आहात. जर तुमच्यात इस्केपिझम् (शीलरळी।) असले तर त्याला काही इलाज नाही. पण ज्या माणसामध्ये थोडीशी जरी सुबुद्धी असेल तर त्याने विचार करावा की ह्या इथे आम्ही प्रपंचात आहोत. इथून आम्ही निघून जर काही मिळवले तर त्याचा उपयोग काय? समजा एखाद्या जंगलात तुम्हाला घातलय आणि तिथे पाणी नाही आणि तिथे बसून तुम्ही म्हणालात की बघा, 'मी पाणी प्यायल्याशिवाय मेलो किंवा राहतो' तर काय विशेष आहे ? पाण्यात राहूनच तुमच्यावर अशी परिस्थिती आली तरीसुद्धा तुम्हाला पाण्याची गरज लागत नाही. तुम्ही पाण्यात राहूनच त्या पाण्यापासून अलिप्त आहात अशी जर स्थिती तुमची आली तर खरा प्रपंच झाला आणि त्याची आज आपल्याला फार गरज आहे अशा प्रपंचाची. आपल्याला जनकाबद्दल माहीतच असेल. नचिकेताला असं वाटलं हा जनक राजा नुसता आपल्या डोक्यावर ताज धारण करतोय. ह्याच्याजवळ सर्व दास-दासी आहेत, नृत्य, गायन होत राहते आणि हा जेव्हा आमच्या आश्रमात येतो तेव्हा आमचे गुरू त्याच्या पाया कशाला पडतात? हा कसला थोर? तेव्हा गुरूनी सांगितले, 'बरं बाबा, तू जा आणि बघ हा का थोर आहे ?' तेव्हा नचिकेत एकदम त्याच्यासमोर उभा राहिला आणि म्हणाला, 'तुम्ही मला आत्मसाक्षात्कार द्या. माझ्या गुरुंनी सांगितले की, 'तुम्ही आत्मसाक्षात्कार देता. मला द्या.' तेव्हा त्यांनी सांगितले, 'हे बघ, सर्व जगातले ब्रह्मांड मागितले तरी मी देईन, परंतु मी तुला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. त्याला कारण असे की त्यातले ज्याला तत्त्वच समजले नाही त्याला आत्मसाक्षात्कार देऊ शकत नाही. जो मनुष्य तत्त्व समजून घेईल त्यालाच खरं तत्त्वात उतरवता येते.' प्रपंचाचे तत्त्वच जर 'प्र' आहे आणि प्र म्हणजे प्रकाश आहे. जोपर्यंत तो आपल्यामध्ये जागृत होत नाही तोपर्यंत आपण पंचात आहोत, प्रपंचात उतरलेलो नाही. नचिकेतनी जेव्हा असा सवाल टाकला तेव्हा त्यांनी सांगितले, 'तू आता माझ्याबरोबर रहा' आणि 3
Original Transcript : Marathi आपल्याला त्यांची कहाणी माहीतच आहे. मला परत सांगायला नको. शेवटी त्या नचिकेतच्या असे लक्षात आले की हा मनुष्य, ह्या मनुष्याला कोणत्याच प्रकारची ओढ किंवा फिकीर नाही किंवा त्याच्याबद्दल आत्मीयता नाही. ज्याला आपण संसार म्हणतो आणि हा एक अवधूतासारखा राहणारा मनुष्य आणि फक्त वाटलं तर डोक्यावरील मुकुट काढतो नाही तर आरामात जमिनीवर झोपतो. बादशहा म्हणे! त्याला काही आराम नको. वाटलं तर जमिनीवर झोपेल गाद्या-गिरद्यांवर लोळेल, नाहीतर जमिनीवर म्हटलं तर जमिनीवर राहील असा हा बादशहा आहे. त्याला कशाचीच फिकीर नाही. त्याला काहीच धरलेले नाही. तर मनुष्य प्रपंची आहे. त्या माणसाला आराम किंवा कोणत्याही गोष्टींची, गुलामीची सवय होत नाही. त्याला तुम्ही म्हटले तर तो धोंड्याला अवश्य डोक्याखाली घेऊन झोपेल. धोंडा खाऊन राहील आणि मेजवानी दिली तर मेजवानी खाऊन राहील. त्याला जर विचारले की, 'अरे, आश्रम बनवायचा आहे. तेव्हा काय करायचे ?' तो सर्व काही सांगू शकेल. अगदी सिमेंटच्या दरापासून सर्व काही सांगेल. हे कुठे मिळेल. ते कुठे मिळेल. सगळं सांगेल पण आतून त्याबद्दल कोणतीही त्याला पकड़ नाही. ही तत्त्वाची गोष्ट आपण आधी लक्षात घ्यायला हवी. नामदेवांनी एक कविता लिहिलेली आहे आणि ती गुरुग्रंथसाहेबमध्ये नानकसाहेबांनी शिरसावंद्य मानून लिहिली आहे. अत्यंत सुंदर आहे. त्याचे मी नुसते वर्णन सांगते. त्या कवितेत असे म्हटले आहे की, 'आकाशात भरारी मारत पतंग उडत आहे आणि एक मुलगा तो पतंग हातात धरून उभा आहे. इकडे-तिकडे धावतो पण त्याचे लक्ष सारे त्या पतंगावर आहे. दुसरे त्यांनी असे सांगितले आहे की, पुष्कळशा बायका पाणी भरून चालल्या आहेत आणि रस्त्यावरून जातांना आपापसात हसत आहेत. काहीतरी थट्टा करीत आहेत, मस्करी करीत आहेत. घरच्या गोष्टी बोलत आहेत. परंतु लक्ष सर्व डोक्यावर असलेल्या हंड्यावर आहे की त्यातील पाणी सांडू नये. नंतर आईवर वर्णन आहे की, आई मुलाला कडेवर घेऊन सर्व काम करते, चूल पेटविते, स्वयंपाक करते. सगळ्या तऱ्हेची कामे करते आणि त्या कामामध्ये कधी वाकते , कधी धावते. काही जमेल ते करावे लागते तिला, पण लक्ष सर्व कडेवरील मुलाकडे असते की मूल पडू नये. तसेच साधु-संतांचे आहे. सर्व करायचे. ज्यांना ज्ञान असते ते सर्व कार्य करीत असतात आणि ते करीत असतांना चित्त त्यांचे आत्म्यावर असते आणि म्हणून जरी ही मंडळी अगदी आपल्यासारखी घर-गृहस्थीची, त्यांना मुले-बाळे असतात. सगळे असतांनासुद्धा त्यांच्यातील जे वैचित्र्य आहे. आपण त्त्वावर ओळखले पाहिजे त्यांचे वैचित्र्य काय आहे ? आणि तोच म्हणजे सहजयोग आहे. ते वैचित्र्य आपल्यामध्ये आल्यावर आपल्यालाही त्याने काय लाभ होतो ते आपण पहिल्यांदा बघतो. किती लाभ किती तोटा. सुरुवातीला सांगायचे म्हणजे असे की परमेश्वर हा सर्वांच्या पलीकडे आहे असे म्हणतात. पुष्कळांना ह्याचा अर्थ लागलेला नाही आणि परमेश्वराच्या गोष्टी आजकालच्या जमान्यात करणे म्हणजे लोकांना असे वाटते की, ह्या बाईला आधुनिक शिक्षण वगैरे काही मिळालेले नाही आणि ह्या काहीतरी जुन्या आजीबाईच्या गोष्टी सांगत बसल्या आहेत, पण परमेश्वर आहे. तो राहणार आहे. तो अनंतात आहे. पण परमेश्वर आपल्याबरोबर प्रपंचात कसा कार्यान्वित होतो हे पाहिले पाहिजे. सर्वप्रथम म्हणजे कोणताही प्रश्न घ्या आता एखाद्याने येऊन मला सांगितले की समजा माताजी, माझ्या घरी हा त्रास आहे. मला नोकरी नाही किंवा काहीतरी अशा गोष्टी ज्याला म्हणू ज्या अत्यंत क्षुद्र वस्तू आहेत, जड वस्तू 4
Original Transcript : Marathi आहेत, त्या गोष्टींबद्दल मला येऊन सांगितले , 'माताजी, हे असे आहे, तसे आहे' आणि थोड्या दिवसांनी तो येतो. सांगतो, 'माताजी, तिकडे ठीक झाले सगळे काही.' पण हे होते कसे काय? हे पाहिले पाहिजे. हे जमते कसे? ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. परवा आमची एक शिष्या आहे फारेनर, मी शिष्य वगैरे म्हणत नाही. मुलंच म्हणते. दोन्ही मुली आहेत. त्या जर्मनीला एका मोटारीत जात होत्या. जर्मनीत 'ऑटोबान' म्हणून मोठे रस्ते असतात आणि जोरजोराने गाड्या इकडून तिकडे जात असतात. तिने मला पत्र लिहिले की, 'दोन्हीकडून मोठमोठाल्या लॉऱ्या, मोठमोठाल्या बसेस, मोठमोठाल्या त्याचे ते कारचे डबल लोडर्स असतात ते घेऊन सर्व जात होत्या आणि मध्ये आमची मोटर. माझा ब्रेक फेल झाला आणि माझी गाडीही वॉबलिंग करायला लागली तर मला असे वाटले आता मी गेले. वाचू शकणारच नाही. काही असले तरी एका परिस्थितीत वाचू शकले असते जर ब्रेक तरी बरा असता, तर ते ही जमले नाही.' तेव्हा त्या एकंदर परिस्थितीमध्ये जी तिच्यामध्ये प्रवृत्ती निर्माण झाली, ज्याला आपण इमरजन्सी प्रवृत्ती म्हणतो, त्यावेळी जे तिच्यामध्ये एक विशेष म्हणजे आता सगळं सुटलं आता काही राहिले नाही. शेवटी विनाशाला आलो. तेव्हा शरणागत होऊन तिने म्हटले, 'माताजी, तुम्हीच काय करायचे ते करा. आता मी डोळे मिटते' आणि तिने डोळे मिटले. तिच्या पत्रात असे होते की, थोड्या वेळात मी बघते, माझी गाडी किनाऱ्याला आलेली आहे आणि ब्रेक ठीक झाला. आता माताजींनी काही केलेले नाही. हे तुम्ही बघा. पण होते कसे ? की तुमचा जो परिणाम झालेला आहे तो कोणत्या तरी कारणाने झालेला असतो. कारण आणि मिमांसा ( कॉज अँड इफेक्ट ). तुमच्या घरामध्ये भांडणे आहेत. समजा त्याला कारण तुमची बायको किंवा तुमची आई किंवा तुमचे वडील. कुणी एक 'अ' असला मनुष्य. त्याचा परिणाम असा की, घरात अशांती आहे. परिणामस्वरूप जे आहे ती म्हणजे अशांती आहे. मनुष्य सर्वसाधारण बुद्धीचा त्या परिणामांशी भांडत असतो. आता मला ह्याच्याशी भांडायचे आहे. मग दूसरे भांडण निघते मग तिसरे भांडण निघते. आता त्याचे जे कारण आहे त्यावर कोण विचार करतो. सूक्ष्म बुद्धीत ह्याचे हे कारण आहे त्या कारणाशी भांडण सुरू झाले की ते कारणच त्याच्याशी भांडायला लागते आणि कारण आणि परिणाम याच्या चक्करात ते असतात आणि दोन्हीही प्रश्न जसेच्या तसे राहन जातात. त्याच्या पलीकडे काही जाऊ शकत नाही आणि प्रपंच खूप कठीण असे सर्व म्हणतात. ह्यावर उपाय काय? ह्याच्यावर उपाय हा आहे की ह्याचे जे कारण आहे त्याच्या पलीकडे गेले पाहिजे. त्याचे जे कारण होते; तिचा ब्रेक तुटला होता. त्या ब्रेकशी ती झुंजत होती. तिच्या गाडीला वॉबलिंग आले होते. त्याच्याशी ती झुंजत होती, पण त्याच्या पलीकडे काही तरी आहे असं जर तिला वाटले असेल तर अशी काही शक्ती आहे आणि त्याला ती शरणागत गेली , त्या शक्तीला तर ती कारणाच्या पलीकडे गेली आणि कारण नष्ट झाले आणि त्याचे परिणाम ही नष्ट झाले असे होते. तुम्ही अविश्वास करा किंवा विश्वास करा. ती गोष्ट होते, पण अंधविश्वासाने होत नाही. पुष्कळसे लोक माझ्याकडे येऊन म्हणतात, "आम्ही एवढे देवाचे ध्यान करतो पण आम्हाला कॅन्सर झाला. आम्ही एवढे देवळात जातो, सिद्धीविनायकाला रोज जाऊन उभे राहतो. तासन् तास. मंगळवारी तर विशेष करून जातो. तरीसुद्धा आमचे काही भले झाले नाही. ह्या देवाने आमचे भले केले नाही. अशा देवाला आम्ही कसे भजायचे?" कबूल आहे, अहो, अशा देवाला बोलवता ? त्याचा आणि तुमचा काही संबंध झाला आहे का ? 5
Original Transcript : Marathi काही कनेक्शन घडले आहे का? जोपर्यंत तुमचे काही कनेक्शनच नाही तेव्हा तुमचे भले काय होणार? तुमचे टेलिफोनचे कनेक्शन तर जायला पाहिजे! इथे बसून रात्रंदिवस पूजा करता परमेश्वराची! त्या परमेश्वराला ऐकायला आले का तुम्ही काय बोलता ते! वाट्टेल ते धंदे करा. वाट्टेल तसे वागले, वागल्यानंतर 'हे परमेश्वरा, देतोस की नाही' म्हणून ठिय्या मारून बसले म्हणून परमेश्वराने तुम्हाला कसे द्यायचे ? बरं तुमचे काही असले तर तू तुम्ही जाऊन इथल्या भारतीय गव्हर्नमेंटला जाऊन काहीतरी मागून घ्या. तुम्ही त्यांचे नागरिक आहात. तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्याचे नागरिक नाहीत. त्याच्या साम्राज्याचे आधी नागरिक व्हा. मग बघा. त्याच्या आधीच परमेश्वर करतो की नाही. आता समजा इथे बसल्या बसल्या तुम्ही जर इंग्लंडच्या राणीला म्हटले, 'आमच्यासाठी हे नाही करत, ते नाही करत.' तिने कशाला करायचे? पण हा तर परमेश्वर आहे. ह्या परमेश्वराने तुमच्यासाठी का करायचे? तुम्ही त्याच्या साम्राज्यात अजून आलेला नाहीत. फक्त त्याच्यावर नुसती दडपशाही, तानाशाही जसे काही खिशातच बसलेला आहे. नंतर हा ही आपल्याला विचार असेल की आता आम्ही नुसता परमेश्वराचे स्मरण करायचे. सुस्मरण म्हटलेले आहे. स्मरण काही म्हटलेले नाही. सुस्मरण करतांनासुद्धा 'सु' आहे की नाही हे पहायला पाहिजे ना! 'सु' म्हणजे काय? जसा 'प्र' शब्द आहे तसाच 'सु' शब्द आहे. 'सु' म्हणजे जिथे मनुष्याचा संबंध होऊन तुमच्यामध्ये मांगल्याचा आशीर्वाद झालेला आहे. तेव्हाच कुठे सुस्मरण होणार. नाहीतर बसले आहेत पोपटपंची करीत. त्याचा परिणाम तरुण पिढीवर होतो. तरुण पिढी म्हणते ह्या परमेश्वराला अर्थ काय आहे? इकडे दोन बुवा आले, पैसे घेऊन गेले आईकडून. तिकडे कोणी गंडा बांधून गेले. चार पैसे घेऊन गेले. अशा परमेश्वराला काय? म्हणून ती बाजू बरोबर वाटते. त्याच्यात जास्त लोक जाणू लागतात. परमेश्वर हा नाही. पण सर्वप्रथम जे चुकलेले आहेत की आमचा परमेश्वराशी काही संबंध आहे का? आमचा त्याच्यावर अधिकार आहे का ? आम्ही त्याच्यासाठी काय केले हे नको. पण संबंध करून घ्या. आता संबंध म्हणजे संबंध करणे. 'सहज' सह म्हणजे तुमच्या बरोबर, 'ज' म्हणजे जन्मलेला. असा तुमच्यामध्ये जो योगाचा, योगसिद्धीचा जो तुमच्यामध्ये हक्काचा भाग आहे तो म्हणजे सहजयोग आहे. तुमच्यामध्ये परमेश्वराने कुंडलिनी म्हणून शक्ती ठेवलेली आहे. तुम्ही तिच्यावर विश्वास करा अथवा करू नका. पण ढोबळ डोळ्याला काही सांगायचे म्हणजे प्रश्नच असतो. विशेषत: आपल्याकडचे जे साहित्यिक आणि वैचारिक लोक आहेत म्हणजे विचारांनी चालणार आणि विचार म्हणजे कोणाकडे धावतील सैरावैरा ते काही सांगता येणार नाही. कोणाचा पायपोस कोणाच्या पायातच नाही, वैचारिक लोकांचा. म्हणून एवढी भांडणे. तेव्हा विचारांच्या पलीकडे जी शक्ती आहे, जिच्याबद्दल आपल्या देशात तर परंपरागत अनादिकाळापासून सांगितलेले आहे तिकडे थोडे तरी लक्ष द्यायला पाहिजे. पण अहंकार इतका आहे वैचारिक लोकांमध्ये की, तिकडे लक्षच द्यायला तयार नाहीत. कदाचित त्यांच्या पोटावर पाय येत असेल पण सहजयोगात आल्यावर पोटावर आशीर्वाद येतो. परमेश्वराशी संबंधित झाल्यावर तुमचे प्रश्न असे सुटतात का? तुम्हाला स्वत:लाच आश्चर्य वाटतं की असे आम्ही केले तरी काय? एवढं परमेश्वराने आम्हाला दिलं तरी कसे ? एवढी व्यवस्था झाली तरी कशी? असा प्रश्न विचारून तुम्ही स्वत: स्तंभित होता. ज्ञानदेवांचे तर आपण ऐकलेले आहे. त्यांनी जे वर्णन केलेले आहे ते सद्य स्थितीचे. 'जो जे वांछिल तो ते लाहो' ते सगळं होणार आहे. पण ते करण्यासाठी फक्त कुंडलिनी जागृत आधी
Original Transcript : Marathi करून घ्या. त्याच्याशिवाय मात्र कोणतीही वचने आम्ही देणार नाही. आश्वासने देणार नाही मिनीस्टर लोकांसारखी. जे आहे ते आपल्याच भाषेत, आपल्याच तऱ्हेचे बोलते. काही साहित्यिक बोलत नाही. जसे आई घरगुती बोलते तसे मी तुम्हाला समजावून सांगत आहे. आपल्यामध्ये ही शक्ती, ही संपदा आहे. ती मिळवून घेतली पाहिजे. तुम्ही प्रपंचात गुरफटला असे म्हणता. गुरफटले म्हणजे काय? हाच आपण विचार केला, 'अहो, आता मी खूप गुरफटलो आहे.' गुरफटले म्हणजे कसले गुरफटले तर हे की नसत्या गोष्टींचे मला जास्त महत्त्व झालेले आहे. आता म्हणजे माझे महत्त्व आहे. मला नोकरी मिळालीच पाहिजे. नोकरी का मिळत नाही कारण बेकारी जास्त आहे. बेकारी का जास्त आहे तर फार बेकार वाढले म्हणून. ते वाढतच जाणार. ह्या कारणापलीकडे जायचे कसे? त्याला इलाज हा आहे की, ही जी शक्ती सगळीकडे वास करते त्या शक्तीचे आव्हान किंवा अवलंबन केले पाहिजे. सर्वात प्रथम ही शक्ती आपल्या मूलाधार चक्रावर आहे. मूलाधार चक्रामध्ये ही शक्ती येते. ती प्रपंचामध्ये कार्यान्वित असते. ती बघा. आपले लक्ष तिकडे असायला पाहिजे आणि विचार हा केला पाहिजे. सर्वप्रथम मूलाधारामध्ये असलेली ही कुंडलिनी शक्ती गणेश कृपेने तेथे बसलेली आहे. आता ह्या महाराष्ट्राला फार मोठे वरदान आहे म्हटले पाहिजे. श्री गणेश येथे. येथे अष्टविनायक बसलेले आहेत. हा तुमच्यासाठी फार मोठा परमेश्वराने उपकार दिला आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रात फार मोठा सहजयोग जमतो मला. गणेशाची जी खोली आणि सखोल त्याचे तुमच्यावर आवरण आहे. ह्या आवरणाने खरोखरच मला खूप मदत झाली आहे. तर श्री गणेशच तुमच्या मूलाधार चक्रावर बसला आहे. आता एखादा डॉक्टर असला तर आपल्या घरी एक फोटो लावून ठेवेल गणेशाचा वाटले तर एक देऊळ ही करेल. तिथे जाऊन नमस्कारही करेल . पण त्या गणेशाचा आणि डॉक्टरीचा काही संबंध आहे का ? तो म्हणजे त्याच्या लक्षात कधी येणार आहे आणि तो ते मान्य ही करणार नाही. पण गणेशाशिवाय डॉक्टरसुद्धा काही नाही. आता ही गणेश शक्ती तुमच्यामध्ये वास करते. त्या गणेश शक्तीमुळे आपल्यामध्ये जी मुलेबाळे होतात ती सर्वथः गणेश शक्तीमुळे होतात. आता हा विचार करा की एक आई आणि एक वडील यांचे चेहरेमोहरे जसे आहे तसाच त्यांचा मुलगा जन्माला येतो. हजारो लोक करोडो लोक ह्या देशात तसेच इतर देशातसुद्धा, पण प्रत्येकाचा मुलगा आणि मुलगी एकतर आई-वडिलांवर किंवा त्यांच्या आजी-आजोबांवर कुणावर तरी, कुटुंबातील कोणाच्या तरी चेहऱ्यामोहऱ्यावर जातो. तर ह्याचे जे चलन आहे ते कोण करते ? तर आपल्या घरामध्ये जर गणपती असला तर हे आपले एक कर्तव्य आहे की त्याचे जे इनोसन्स आहे त्याची जी अबोधिता आहे ती आपण स्वीकार करायला पाहिजे. ती अबोधिता आपल्यामध्ये आली. घरामध्ये लहान मुले असतात. लहान मुले म्हणजे किती अबोध. त्यांच्यासमोर आपण शिव्या देतो, वाईट शब्द वापरतो अशा वातावरणात त्यांना वाढवितो. जिथे सगळं अमंगल आहे. त्यांना वाटेल ते करून देतो किंवा त्यांच्याकडे लक्षच देत नाही. ते घरातले गणपती! त्यांच्या संवर्धनात, त्यांच्या संगोपनात आपले लक्ष नाही. आजकाल इंग्लंडमध्ये मी बघते की ८० वर्षाच्या बायकासुद्धा लग्न करतात. तेव्हा आता काय बोलावे? ते समजत नाही आणि तिथले इथे आणू नका. म्हणजे मिळवले. ती घाण तिथेच राह द्या. जे सडत आहे ते तिथेच सड़ू दे. तुम्ही इकडे घेऊन येऊ नका. 'अति शहाणे त्याचे बैल रिकामे' आहेत. तेव्हा त्यांची अवकृपा आपल्यावर 7
Original Transcript : Marathi झाली नाही पाहिजे. आधी हा निश्चय केला पाहिजे. जर तुम्हाला आपले प्रपंच टिकवायचे, हे सगळं मला सुशिक्षित लोकांना सांगायचे आहे बरं का! शिक्षित नव्हे. तर हाच श्री गणेश आपल्यामध्ये बसून आपल्या मुलांचे संगोपन करतो. पहिल्यांदा जनन, नंतर संगोपन आणि ते जे मुळात गणेश आहेत ते सगळ्या घराला, घरातल्या लोकांना आनंद देतात. एक घरात मूल जन्मले तर किती आनंद होतो आपल्याला आणि त्या मुलापासून किती तरी आनंदाच्या लहरी आपल्या घरात पसरत असतात पण एखाद्या घरात मूल नसले की कसं ओकं ओकं वाटतं. त्याच्यामध्ये असे वाटते की ह्या घरात येऊच नये. कारण तिथे किलबिल नाही मुलांची, त्यांचे हसणे नाही, ते खिदळणे नाही, त्या खोड्या नाहीत. त्याला काही माधुर्य राहत नाही त्या घरात. कारण आजकाल जमाना दुसरा झालेला दिसतो आहे. कारण जितके देश श्रीमंत आपण म्हणतोय ते काय त्या देशामध्ये मुलंच नाही. मायनस ! त्यांची लोकसंख्या घटत चालली आहे आणि आपल्या भारतवर्षाला लोकसंख्या वाढत आहे. म्हणून 'वाईट आहे तुमचा भारत.' तुमच्या देशाची लोकसंख्या वाढली नाही पाहिजे. कबूल, पण सांगायचे असे की, मुलं आज जन्माला येतात, त्यांनाही डोके असते. ते त्या देशात जन्माला येणार नाहीत, जिथे रोगट नवरा-बायको डिवोर्स देतात आणि मुलांना मारूनही टाकतात. ते आमच्या नशिबीच आहे कारण ह्यांच्या आई-वडिलांना मुलांच्याबद्दल जी आस्था, जे प्रेम आणि जी सुबुद्धी आहे ती ह्या लोकांमध्ये मुळीच नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल की, ह्या लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये दोन मुले आई-वडील मारून टाकतात. ऐकावे तेवढे थोडेच. मला तर शॉकच लागत असे. अहंकारात इतके डुबलेले आहेत लोक की त्यांना ह्याचे काहीच वाटत नाही. तिथे गेल्यावर कळले की इथला माणूस किती चांगला आहे. इथले टेलिफोन ठीक नाही. कबूल. माईक ठीक नाही, ठीक नाही, कबूल. पण माणसे ठीक आहेत. पण ते जे ठीक आहे त्या ठीकपणामध्ये जे गहनातले गहन आहे ते गणेश तत्त्व आहे. आणि ज्या घरामध्ये गणेश त्त्व ठीक नसेल तर तिथे सर्वच चुकलेले आहे. जिथे मुलं वाईट हे कबूल, मार्गाला लागलेली आहेत त्याचा दोष मी आई-वडिलांपेक्षा समाजाला देते. आजकाल आई नोकरी करते, वडील नोकरी करतात, तरीसुद्धा जितका वेळ तुम्ही आपल्या मुलांबरोबर घालविता ते किती गहन आहे हे पाहिलं पाहिजे. आता ह्या सहजयोगात आल्यावर काय होते ते पाहिले पाहिजे. सहजयोगात गणेशशक्ती जागृत होते ती कुंडलिनीमुळे. तेव्हा सर्वप्रथम मनुष्यामध्ये सुबुद्धी येते. आपण त्याला विनायक म्हणतो. तो सगळ्यांना देणारा आणि खरोखर सुबुद्धी! मी अशी मुले पाहिलेली आहेत ज्यांना माझ्याकडे लोक घेऊन आलेली आहेत. वर्गात 'ढ' आहे, नुसता शहाणपणा करतो, मास्तरांना बोलतो. मी त्याला विचारले, "अरे बाबा, असे का करतोस ?" "मला काही येत नाही. मास्तर मला सारखे बोलत असतात. मग मी काय करणार?" तो 'ढ' मुलगा फर्स्ट क्लासमध्ये पास होतो. असे कसे झाले? तो गणेश आपल्यामध्ये जागृत झाल्यावरच, ती शक्ती आपल्यामध्ये वाहू लागल्यावरच आणि मनुष्यामध्ये तर एक नवीन तऱ्हेचा आयाम एक डायमेन्शन येते. त्या डायमेन्शनला आम्ही 'सामूहिक चेतना' म्हणतो. त्या नवीन चेतनेमध्ये ज्या गोष्टी आपल्याला साधारणत: दिसत नाही, उमजत, समजत नाही आणि वळत नाही. त्या सहज होऊन जातात. हा नवा आयाम ज्याला म्हणतात किवा ही एक जी नवीन चेतनाशक्ती आपल्यामध्ये येते त्या शक्तीच्या दमावर मनुष्य खरा समर्थ होतो. जी मुले ज्यांना आपण म्हणतो बेकार गेली आहेत, काही कामाची नाही आहेत, दारू पितात. आजकाल आपल्याला माहीत आहे ड्रग्ज फार सुरु झालेले आहे. कधी आम्ही जन्मात चरस म्हणजे काय पाहिले नव्हते. असे कळले आहे की शाळेतच चरस ০
Original Transcript : Marathi विकतात. ह्या सर्व मूर्खपणाच्या कल्पना सुबुद्धी नसल्यामुळे येतात. ती सुबुद्धी जागृत झाल्याबरोबर जो चरस पितो तो इंग्लंड किंवा अमेरिकेमध्ये, तो सोडून शहाणे झाले. ही सहजयोगाची शक्ती आहे. मुलांमध्ये अदब आहे. अत्यंत अदब आहे. प्रत्येक घरामध्ये मी बघते आजकाल अदब नाही कारण आई- वडील आपापसात भांडतात, फाडफाड बोलतात. मुलांचा मान ठेवत नाही. मुलांना वाटेल तसे वागवायचे मग मुले ही तशीच. मग मुले ही तशी प्रतिकृती जी आई-वडिलांची. तेसुद्धा त्यांना फाडफाड बोलतात. सहजयोगात आल्यावर आई-वडिलांची कुंडलिनी जर जागृत झाली, जर मुलांची जागृत झाली तर मुले अत्यंत निमूटपणे आदराने वागतात. पहिल्यांदा अदब जागृत होते. कोणाला म्हटले की, अदब जागृत होणार नाही, पण सहजयोगाच्या ह्या कुंडलिनी जागृतीने पहिल्यांदा मनुष्यामध्ये आदर येतो. हळूहळू आपल्या देशामधून आदर फक्त एखाद्या सत्ताधिशाचा करायचा अशी प्रथा पडत चाललेली आहे. पण खरी सत्ता ही गणेशाची आहे. त्याची सत्ता ज्याच्याजवळ असेल त्याच्याच पायावर गेले पाहिजे. त्यांनी गणेशालाच आपल्यामध्ये जागृत केले पाहिजे. फार फरक आहे. ते म्हणजे असे की, आजकाल पुरुषांची दृष्टी फार फिरायला लागली आहे. चंचल होते, आज्ञाचक्र धरले जाते. वेड्यापिशाच्यासारखे बघत राहायचे इकडे तिकडे. तसे बघा, आजकाल बघ्यांची रेलचेल आहे. महाराष्ट्रातसुद्धा सुरू झाले आहे. आमच्यावेळी आम्ही जेव्हा छोटे होतो तेव्हा शाळा, कॉलेजमध्ये शिकत होतो तेव्हा आम्ही असे बघे बघितले नव्हते. आता नवीन एक आधुनिक लोक आहेत. बघे जे आपले डोळे नुसते फिरवित असतात. त्याने किती आपली आतली शक्ती नष्ट होत आहे आणि त्याच्यामध्ये कोणताही आनंद नाही. जॉयलेस परसुट म्हटले पाहिजे. ज्याच्यामध्ये आपले डोके घालायचे आणि डोळे फिरवीत राहायचे सारखे. इकडे बघ, तिकडे बघ, तिकडे बघ. म्हणजे जाहिराती बघायच्या. एखादी जाहिरात राहिली की त्यांना असे वाटते की, आपले काही चुकले की काय? पाप केले. मग परत डोळे फिरवून ती जाहिरात वाचायची. प्रत्येक गोष्ट पाहिलीच पाहिजे. हे सर्व नाहीसे होऊन, सहजयोगाने एकाग्र दृष्टी येते. अशी दृष्टी वाढत गेली की गणेश शक्ती जास्त जागृत होते. त्याला 'कटाक्ष निरीक्षण' म्हटलेले आहे. उगीच कटाक्ष कुठे पडला तर कुंडलिनी जागृत होणार. कोणाकडे तुम्ही बघितले तर त्याच्यामध्ये नुसते पावित्र्य आलेच पाहिजे. इतके पावित्र्य डोळ्यामध्ये येऊन जाते की केवळ हे गणेशाचेच काम आहे आणि हाच गणेश आपल्या घरात नांदत आहे. आपण आपल्यातला गणेश पुरता ओळखला नाही. जर ओळखला असता तर आपण पावित्र्याला धरून जे पवित्र आहे ते आपण केले असते. पण आपण आपल्या गणेशाची पूजा केली तर काय हरकत आहे ? आपल्या घरात मुले आलेली आहेत. त्या गणेशाला बघा. त्यांना पूजनीय करा आणि तुमच्यातला गणेश तुम्ही जागृत करा. पण सहजयोगाचे वैशिष्ट्य असे आहे ते सहजच होते. त्याला काहीही करावे लागत नाही. कुंडलिनी शक्ती जागृत झाली म्हणजे सहजच ती गणेश शक्ती आपल्यामध्ये जागृत होऊन मनुष्यामध्ये सुबुद्धी येऊन त्याचे सगळे काही कारण एक विशेष होऊन जाते. आता साहित्यिक लोक जर असतील तर ते कदाचित असे म्हणतील, 'माताजी, काही भ्रामक गोष्टी सांगतात.' तुम्हाला आश्चर्य वाटेल की अहमदनगर जिल्ह्यामध्ये दहा हजार लोकांनी दारू सोडलेली आहे. दहा हजार लोकांनी! मी काही 'दारुबंदी करा' असे म्हणत नाही. मी काहीच म्हणत नाही. तुम्ही काही असले तरी या आधी. आधी तुम्ही या कसे तरी! आल्यावर तुमचा दिवा पेटवून
Original Transcript : Marathi घ्या! दिवा पेटला की त्यात काय दोष आहे ते तुम्हाला दिसणार. जोपर्यंत दिवा पेटणार नाही तोपर्यंत साडीला काय लागले ते तुम्हाला दिसणार नाही. जर दिवा पेटला तर तुमच्या नजरेस येईल की आपले काय चुकलेले आहे आणि तुम्हीच तुमचे गुरू होऊन जाल आणि स्वत:ला बरे करून घ्याल. स्वत:ला पवित्र करून घ्याल आणि जे लोक पवित्र असतात त्यांच्या आनंदाला पारावार राहत नाही. त्यांनी सांगितले, 'मस्त हुए तो क्या बोले' मस्तीत आलोय आम्ही. त्या मस्तीत आम्ही बोलायचे तरी काय? अशी स्थिती होऊन जाते. पवित्रता आनंददायी आणि आनंददायीच नाही तर संबंध व्यक्तित्वाला एक त्याचा सुगंध येतो आणि असा मनुष्य कोठेही उभा राहिला तर लोक म्हणतील 'आहे बुवा, काही विशेष आहे या गृहस्थामध्ये. त्याच्या चेहऱ्यावरून दिसतंय. त्याच्या एकंदरीत वागण्यावरून दिसतंय. त्याच्या बोलण्यावरून दिसतयं की हा मनुय काही विशेष आहे. ज्यांना विशेष नाही व्हायचे त्यांच्यासाठी सहजयोग नाही. ज्यांना विशेष व्हायचे आहे त्यांच्यासाठी आहे कारण तुम्ही आहातच विशेष.तुमच्यात हे सगळं काही विविध आहे, ते तुम्हाला मिळवायचे आहे. ज्यांना विशेष व्हायचे आहे त्यासाठी त्या प्रपंची लोकांसाठी प्रपंचात राहणाऱ्या लोकांसाठी सहजयोग आहे. ज्यांना काही व्हायचे नाही, आम्ही अत्यंत ठीक आहोत. 'आम्हाला काहीच नको माताजी.' बरं , नमस्कार! तुमच्यावर आम्ही जबरदस्ती करू शकत नाही. अहो, तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य मिळवायचे असेल तर तुमची स्वतंत्रता आम्हाला बघायची आहे. जर तुम्हाला नरकात जायचे असेल तर जा व्यवस्थित आणि जर सहजात यायचे असेल तर या. बाकी आम्ही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही. तेव्हा सर्वात पहिल्यांदा आपल्या प्रपंचामध्ये सुखाचे निधान म्हणजे मूल, हे ठीक. इथपासून त्या मुलाच्या जन्मापासून गरोदर बाईच्या त्रासापासून सगळ्यापासून सुटका होऊन एक उत्तम मुलगा जन्माला येतो आणि आजकाल मी पाहिले आहे जी मंडळी पार झालेली आहेत, त्यांच्यापासून जी मुले जन्माला येतात, ती जन्मल्यापासूनच पार असतात. म्हणजे केवढे मोठे आत्मपिंड जन्माला यायचे आहेत. सगळे मी बघते इथे कोण असा माई का लाल आहे जो आमच्या आत्म्याला धरून ठेवतो आहे. अहो, अशा तशा माणसाच्या घरी साधु- संत जन्माला येत नाहीत. असे मोठे मोठे आत्मपिंड आज जन्माला येणार आहेत आणि त्यासाठी अशा लोकांची गरज आहे. त्यांचे प्रपंच हे खरोखर प्रकाशित आणि असे प्रकाशित प्रपंच करण्यासाठी तुम्ही सहजयोग घेऊन आपली कुंडलिनी जागृत करून घ्या. ते झाल्यानंतर दुसर्या चक्रावर ज्याला आम्ही स्वाधिष्ठान चक्र म्हणतो, प्रपंचामध्ये फार लाभते. स्वाधिष्ठान चक्राचे पहिले कार्य हे आहे की, तुमची गुरुशक्ती वाढते. घरामध्ये मी पाहिलेले आहे की, वडील म्हणजे काहीच नाही. आई म्हणजे काहीच नाही. लहान लहान मुले जी ५-६ वर्षाची ती विशेष आहेत. आजकाल मी बघते बाजारात गेलो तर आमच्या म्हाताऱ्या बाईंना साडी घ्यायचा प्रश्नच आहे. सर्व साड्या तरुण मुलींसाठी. म्हातार्या लोकांसाठी काही साड्या-बिड्या बनवायची पद्धतच राहिली नाही. पूर्वीच्या काळी म्हाताऱ्या लोकांजवळ पैसे असायचे त्यांच्यासाठी सर्व काही असायचे सगळे ! आता म्हाताऱ्या लोकांना कोणी विचारतच नाही. त्यांच्यासाठी एखादी साडीदेखील घ्यायची व्यवस्थित लग्नासाठी ती मिळणे कठीण. तर ते काय आहे ती गुरुशक्ती आपल्यामध्ये येते तेव्हा हे म्हातारपण, वयोवृद्ध आपण झालेलो आहोत, त्याच्यातील जी तेजस्विता 10
Original Transcript : Marathi आहे ती जागृत होते. त्याने एक मोठा मनुष्य बघतो की आपले वडील मूर्खासारखे वागतात. आपली आई मूर्खासारखी वागते. तिला काय करायचे त्याचे ताळतंत्र नाही. अशिक्षित आहे. भ्रमरासारखी वागते. बाहेरून लोक आले की त्यांच्यासमोर कसे बसायचे ते तिला येत नाही. सारखी ओरडत असते. सारखे लक्ष आपले तिच्या किल्ल्यांकडे नाही तर जात-पात घेऊन त्याच्यावर भांडणे. कोकणस्थचे लग्न कोकणास्थाशीच होणार, देशस्थाचे लग्न देशस्थाशीच झाले पाहिजे. त्यातल्या त्यात पोट जातीतल्या पोट जातीतच झाले पाहिजे नाही झाले तर सासू ओरडते. हे जे सर्व प्रकार आहेत म्हातारपणाचे ते जाऊन त्या म्हातारपणाची एक तेजस्विता आहे. झिंदाबाद आपल्या गौरवात असा मनुष्य उभा राहिला म्हणजे तुम्हाला वाटते आमच्या वडिलांना झाले काय ? पूर्वी दादाजी कोंडदेव वगैरे पद्धतीचे लोक होते तेच लोक येऊन उभे राहिले का? असे वाटायला लागते आणि त्यांच्यासमोर आपल्या माना झुकतात. मग तरुण मंडळींमध्ये आज जी विशेष खळबळ चाललेली आहे. उठल्यासुटल्या घटस्फोट, बायकोशी पटत नाही, आईशी पटत नाही, वडिलांशी पटत नाही. घरात राहतात परत घर सोडून बाहेर जायचे. लहान-सहान गोष्टीवरून भांडण-तंट्टे ह्या असल्या गोष्टी चालतात. नोकऱ्या नाहीत, पैसे नाहीत. व्यसने लागलेली. सर्व तऱ्हेने आजची तरुण पिढी एका मोठ्या संक्रमण कालामध्ये पदार्पण करीत आहे. त्यांची पार्र्वभूमी फार मोठी आहे. मी सांगते, महाराष्ट्राची पाश्श्वभूमी तर फारच मोठी आहे पण ते सगळे विसरून हे वाचायचे नाही. ऐकायचे नाही. आता संगीताचेच केवढे मोठे ज्ञान आहे महाराष्ट्रात. संतांचे केवढे ज्ञान आहे. आपल्या महाराष्ट्रात. पण पुस्तके कोण वाचतो? काहीतरी घाणेरडी पुस्तके रस्त्यावरून घ्यायची. ती वाचायची. काहीतरी अत्यंत कृत्रिम आणि सुपरफिशल अशा रीतीने आजची तरुण पिढी चालली आहे. त्या तरुण पिढीला असे ठेवले तर वाऱ्यावर भिरवून टाकली जाईल. काही कामाची राहणार नाही. मला विचारा तुम्ही. मी अमेरिकेला गेले होते. तर ६५% पुरुष बेकार गेलेले आहेत. तिथले जे लोक आहेत आता त्यांना ही भीती बसलेली आहे. तिथे एड्स म्हणून आजार झालेला आहे. त्या सर्व तरुण लोकांना प्रश्न खात सुटला आहे आणि त्यांना समजत नाही की ह्या आजारातून निघायचे कसे? त्याला कारण असे की, ह्याच्यात काय वाईट आहे ? हे केले तर काय वाईट आहे? हो असतील. रामदास स्वामी पुराणातील वांगी पुराणात ठेवा. आम्हाला काय करायचे? आम्ही आता मॉडर्न झालो.. निघालो मोठे मॉडर्न व्हायला. पण ते मॉडर्न होऊन कुठे गेले ते जाऊन बघायला पाहिजे ना? त्या देशात जाऊन बघा त्या तरुणांची काय स्थिती आहे ती. जर तुम्ही नॉर्वे, स्वीडन देशात जाऊन बघितले, आपले इथले साहित्यिक तिथे जाऊन खर्डेघाशी करताहेत. तिथे जाऊन बघायला पाहिजे. तिथले तरुण लोक रात्रंदिवस हाच विचार करीत असतात की आम्ही कशाप्रकारे आत्महत्या करावी? एकच विचार आहे त्यांच्या डोक्यामध्ये की आत्महत्या हाच आम्हाला एक मार्ग आहे, पण वाऱ्यावर विरून जाणारे लोक आहेत. तसले मॉडर्न व्हायचे असेल तर आमचा नमस्कार! पण जर तुम्हाला आतल्या शक्तीवर उभे राहायचे असेल त्याच्यावर जी इमारत बांधायची आहे कारण तुम्ही विशेष आहात. तर मात्र तुमचे जरासे वागणे चाललेले आहे ते थोडे थांबवायला लागेल. थोडे शांत होऊन विचार केला पाहिजे. हे जे वेड्यासारखे धावत सुटले आहेत ती जी रॅट-रेस आहे. त्याच्यात मी धावतो आहे का ? एक मिनिट शांत उभे विचार केला पाहिजे की आमचा वारसा काय आहे ? अहो, बापाचे जर एक एवढेसे राहून चिरपुट जरी राहिले तर मुले जातील कोर्टात भांडायला, पण ह्या देशाची आपल्या देशाची किती मोठी परंपरा आहे. 11
Original Transcript : Marathi तिकडे मात्र कोणाचेच लक्ष नाही की ती वाहत चालली आहे. तिथे आम्ही काय फायदा करून घेतलेला आहे. त्याची जाणीव सहजयोगात आल्यावर तरुण मुलांना होते आणि सर्वप्रथम त्यांना कळते की आम्ही आहोत त्याच्यापेक्षा काही तरी विशेष आहोत. मी लहान असतांना माझ्या वडिलांनी मला सांगितले होते. सर्वात पहिल्यांदा त्यांची जागृती झाली पाहिजे कारण जे डाव्या मजल्यावर लोक राहतात कारण सर्व साधु-संत डाव्या मजल्यावर. त्यांना हे माहीत नाही की आम्ही अजून एक मजला पार केला नाही. बाकीच्यांनी, कोणाला हे सांगितले तर हे डोक्यात तरी जाते का? आपली भजनं म्हणायची. टाळ कुटून कुटून म्हणायचे. त्याच्यातले डोक्यात येते की नाही हा विचार नसतो तर ह्या लोकांना कमीत कमी एक मजला चढवला तर त्यांना समजेल की ह्याच्या पलीकडे काहीतरी आहे. तेव्हा ह्या मानवीय चेतनेच्या पलीकडे एक फार मोठी महान चेतना आहे. जिला ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. जी तुम्हाला सहजच सुलभच मिळते. ती मिळो. तुम्ही काय आहात. त्या तिकडे तुमचे आधी दर्शन व्हायला पाहिजे. तुम्ही किती महान आहात ! तुम्ही किती मोठे आहात आणि तुम्ही आयुष्याचा जो खेळखंडोबा मांडला आहे तो तुम्हाला शोभतो ? किती तुमच्याकडे संपत्ती आहे. तुम्ही काय आपली इज्जत केली. तुम्हाला आपल्याबद्दल काही कल्पनाच नाही. हा विचार थोडासा आपण लक्षात घ्यावा आणि सहजयोगात येऊन आपली जागृती करून घ्यावी. त्याप्रमाणे आजची तरुण पिढी आहे. तीसुद्धा परमेश्वराच्या साम्राज्यात फार सहज उतरू शकते. तरुण लोकांना पार करणे खूप सोपे आहे. खरे पाहिले तर सगळे भोळेपणाने करतात. त्याचे काय आहे भोळेपणाच-एक मुलगा सिगरेट पितो म्हणून मी पितो. चला, त्याने काही विशेष प्रकारचे कपडे घातले तर मी घालतो. त्याच्या पलीकडे काही नाही. निव्वळ भोळेपणा. परंतु कधी-कधी ह्या भोळेपणामुळेसुद्धा अनर्थ होऊ शकतो. हीच युवा पिढी आज कुठपर्यंत पोहचू शकते! आज आपल्या देशात कोणत्या गोष्टींची कमतरता आहे ? कोणी म्हणेल खाण्याची. परंतु मला तसं काहीच आढळत नाही. मला वाटते आपण काही जास्तच खातो आहे आणि दूसर्यांनापण देत आहोत. मी जेव्हा इकडे येते तेव्हा सर्वांना हाथ जोडून सांगत राहते 'आता जेवण बस करा. मला आता नको आहे' प्रत्येक मनुष्य तिकडे म्हणतो, 'हिंदुस्थानात खाण्याची काही कमी दिसत नाही कारण इतके खायला घालतात. अगदी आग्रह करून करून. असे वाटते खाऊच नये.' तेव्हा आपल्या इथे कोणत्या गोष्टीची कमी आहे? बऱ्याच वेळा आपण लोक वाद-विवाद चर्चा करण्यात नंबर एक आहोत. ते जर इथे उभे राहिले तर माझ्यापेक्षाही जबरदस्त भाषण देतील. सगळ्याच बाबतीत. पुष्कळ हशार लोक आहोत आपण. काही जास्तच प्रमाणात हुशार आहोत आपण. सगळे काही आहे आपल्याकडे! सोने, चांदी सर्व काही. कोणत्या गोष्टीची कमी आहे? एकच कमी आहे ती अजूनपर्यंत ज्ञान नाही. ज्या क्षणी हे घटित होईल तेव्हा पूर्ण शरीर पुलकित होईल आणि तुमच्या शरीरात प्रेम तसेच म्हणजे आपल्याला हे ज्ञान नाही की आपण कोण आहोत ? मी कोण आहे ? ह्याचे चैतन्याच्या लहरी वाह शकतील. केवळ ही घटना तुमच्यात घटीत व्हायला हवी. ह्याची कोणी गॅरंटी देऊ शकत नाही. झाले तर होऊन जाईल नाही तर नाही. पण आज नाही तर उद्या ही गोष्ट घटीत होईलच. ह्या प्रपंचात हे तुमचे आर्थिक प्रश्न आहेत महाराष्ट्रात. बघितले तर श्री माताजी, गरीबांना तुमच्यामुळे काय लाभ आहे? अहो, तुम्ही गरीब आहात की श्रीमंत ? हा मध्यमार्ग आहे. श्रीमंत असा किंवा अती श्रीमंत किंवा 12
Original Transcript : Marathi गरीब असा, कोणालाही समाधान नाही. एक रेडियो आला नंतर व्ही.डी. ओ . यायला पाहिजे. व्हीडीओ आला तर त्याच्यानंतर ए.सी. यायला हवा, मग त्याच्यानंतर एरोप्लेन यायला हवे. पुढे काय तर देवाला ठाऊक. मग एक इकॉनॉमिक्सचे शास्त्र आहे की सर्वसाधारणपणे वाँटस् कधीच पूर्ण होत नाही. एक इच्छा झाली ती पूर्ण होईल. पण विशिष्ट, सर्वसाधारण एक झाली की दुसरी, दुसरी झाली की तिसरी म्हणजे एक गोष्ट स्पष्ट आहे की जी आम्ही इच्छा केली ती शुद्ध इच्छा नव्हती. ती जर शुद्ध इच्छा असती तर आमची जी इच्छा पूर्ण झाली त्यानंतर आम्हाला पूर्ण समाधान झाले असते. पण झाले नाही ना ? झालं का? आता तुम्हाला पुढे काही नको. पाहिजे ना! म्हणजे तुमची शुद्ध इच्छा नव्हती. अशुद्ध इच्छेत राहिलात म्हणून एक गेली तर दुसरी, दूसरी गेली तर तिसरी. तिसरी गेली तर चौथी. ह्या चक्करमध्ये तुम्ही राहिलात. आता शुद्ध इच्छा ही की, साक्षात कुंडलिनी आहे कारण ती परमेश्वरी इच्छा आहे. ती जागृत झाल्याबरोबर जी इच्छा तुम्ही कराल 'जो जे वांछिल तो ते लाहो' म्हणजे इतकेच नव्हे तर तुम्हाला असे वाटते की झाले बुवा, आता आपल्याला काही नको. पण तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण होतात. पण त्या इच्छा अशा जड वस्तूंच्या नसतात. अशा मोठ्या प्रगल्भ होऊन जातात. आणि तुमचे जे काही आहे लहान सहान ते कृष्णाने सांगितले आहे की 'योगक्षेमं वहाम्यहम्' जेव्हा तुमचा योग होईल तेव्हा तुमचे क्षेम हे होणारच. मग योग आधी सांगितला. क्षेम योग नाही सांगितला कृष्णानेसुद्धा. 'योगक्षेमं वहाम्यहम्' योग आधी झाला पाहिजे. सुदाम्याला आधी कृष्णाला भेटावे लागले तेव्हाच त्याची द्वारिका सोन्याची झाली. तुमचे म्हणणे असे आहे की आम्ही इथेच बसणार, आम्हाला सर्व हातात यायला पाहिजे . का म्हणून? तुम्ही एवढा अधिकार लावता परमेश्वरावर. ते एवढ्याचसाठी की चार पैशाची फुले आणून परमेश्वराला देऊन आले म्हणून? उलट फार चूकच आहे त्याच्यामध्ये. पुष्कळ लोकांना मी पाहिलेले आहे, जे शिवभक्त आहेत. शिव, शिव करतात. त्यांना हार्टचा अॅटॅक येतो आणि शिव तुमच्या हृदयात बसलेले आहेत. मग असे कसे ? त्यांना हार्टचा अॅटॅक कसा आला ? कारण शिवच नाराज झाले. तुम्ही कोणालाही असे बोलवत राहिलात, सारखे तर त्या माणसाला हे वाटायचे की हा मला कशाला एवढा त्रास देतोय ! अहो, तुम्ही जर ह्या राजीव गांधींसमोर राजीव, राजीव म्हटले तर तुम्हाला अरेस्ट करतील लोक. तसेच झालेले आहे. त्याच्यामुळे आपल्याला ना धड परमेश्वर मिळत ना प्रपंच मिळत आहे. तर मध्यमार्गात यायला हवे. आणि मध्यमार्ग ज्याला सुषुम्ना नाडीचा मार्ग म्हणतात तिथून जेव्हा कुंडलिनी जागरण होते तेव्हा मनुष्य मधोमध येऊन संतोषात येतो. सांगायचे म्हणजे जरा पर्यायाने सांगते की आजकाल हे संतोषी देवीचे व्रत निघाले आहे. अहो, संतोषी म्हणून कोणी देवीच नाही. सिनेमावाल्यांनी काही खूळ काढले की लागले त्याचे व्रत करायला. जे सगळे संतोषाचे स्रोत आहे ती कशी संतोषी होणार? आणि अशा रीतीने काही तरी भलते काढायचे, उपास करायचे. आज काय तर आंबट नाही खायचे, अमुक करायचे, तमुक करायचे. कसले तरी धटींग करत बसायची आणि मग परमेश्वराला दोष लावायचा की आम्ही एवढं केलं तरी आम्ही गेलो. त्याचा सारासार विचार केला पाहिजे आणि परमेश्वराचे जे हे नियम आहेत त्याचे जे सायन्स आहे ते तरी शिका तुम्ही आधी. ते शिकल्याशिवाय भलते सलते करता आणि त्याचे काही वाईट झाले तर त्या परमेश्वराला कशाला दोष देता. परमेश्वर आहे की नाही तेच सिद्ध करायला आम्ही आलेलो आहोत. अगदी सिद्ध करायला. तुमच्या हातातून वाहणार आहे. तुमच्या हातावरच्या बोटांवर 13
Original Transcript : Marathi परमेश्वर तुम्हाला मिळणार आहे. मग तयारी आहे का ? का डोकंच आधी जास्त चालणार? माताजी, काय बोलतात हे? थोडं डोकं थंड करा म्हणजे हे होईल कारण तुमचे प्रश्न तुमच्या डोक्याने जर सुटले असते तर आम्हाला एवढी मेहनत करायला नको होती आणि ते तुमच्या डोक्याने सुटण्यासारखे नाहीतच. तुमचे राजकीय प्रश्न सुटणार नाहीत. तुमचे सामाजिक प्रश्न सुटणार नाहीत आणि तुमच्या प्रपंचातले तर प्रश्न तर मुळीच सुटणार नाहीत. कारण राजकीय प्रश्न तरी काय? तर आम्ही कॅपिटलिस्ट आहोत तर त्यासाठी भांडत बसले आहेत. काय सुखी आहेत लोक तिथे ? स्वतंत्रता झेपत नाही त्यांना. दुसरे म्हणे आम्ही कम्युनिस्ट आहोत. अहो, आम्ही खरे . दिल्याशिवाय राहत नाही. कॅपिटलिस्ट कारण आमच्याजवळ शक्त्या आहेत. आणि आम्ही काही... आम्ही खरे आहोत आणि ह्या ज्या वरवरच्या गोष्टींमध्ये तुम्ही रमू नका. तुम्ही परमेश्वराचे साम्राज्य मिळवा आपल्यामध्ये आणि त्याचे नागरिक व्हा. मग बघा काय होतं. त्यासाठी प्रपंच सोडायला नको. पैसे द्यायला नको. त्याला कसले द्यायचे ? ही तुमच्यामध्ये जिवंत शक्ती आहे. जिवंत प्रक्रिया आहे. तुम्ही एखाद्या झाडाला पैसे दिले तर तो फूल देईल का? त्याला समजतं का पैसे वैसे काही. तसेच परमेश्वराचे आहे. त्याला समजत नाही पैसे वैसे. एखादी बुवाबाजी आणायची. बुवाला बसवायचे आणि म्हणायचे तू पैसे दे. खेडेगावात म्हटले अरे, माताजी पैसे घेत नाही. तर म्हणतात, 'दहा पैसे नाही तर २५ पैसे घ्या माताजी.' पण कशाचे ? सारे काही झालेले आहे. ते प्रेम मिळाले पाहिजे. प्रपंचामध्ये जे नाही ते म्हणजे प्रेम. प्रेम जे आहे ते सुकलेले प्रेम. एखाद्या झाडामध्ये तुम्ही पाहिले असेल त्याच्यातला रस वर येतो आणि प्रत्येक ठिकाणी जसे ज्याला लागेल तसे देत परत आपल्या ठिकाणी येतो. तो काही एखाद्या फुलावर अडकत नाही. एखाद्या पानावर अडकत नाही. अडकले तर झालेच, ती झाडे ही मरायची आणि पाने ही मरायची आणि फुले ही मरायची. तसेच आपले होते. आपले प्रेम म्हणजे माझा मुलगा तो जगातला नबाबशहा झाला पाहिजे. माझी मुलगी ते अमकं झालं. माझं, माझं जे चालतं ते आहे. ते तुमचे आहे काय? माझे म्हणजे तुम्ही नाही ते. पण हे बोलून होणार नाही. सांगून होणार नाही. मी कितीही म्हटले की 'सोडा हे.' माझं, माझं सुटणार नाही. त्याला सोडवायला तुमची कुंडलिनीच उठवायला पाहिजे. ती उठल्यानंतर आणि तुम्ही पार झाल्यावर, मग तुझे, तुझे सुरू होते. कबीरांनी म्हटलेले आहे की जेव्हा शेळीला आपण जिवंतपणी बघतो तेव्हा ती सारखी मीऽमीऽमी करत असते मॅऽमॅऽमॅं करत असते. मग ती मेल्यावर तिची जेव्हा आतडी काढून जेव्हा तार बांधून तिची धुंदकी फिरतात तेव्हा तुही-तुही. तसेच माणसाचे आहे. एकदा जर तुमची कुंडलिनी जागृत झाली की आता सगळे तुझेच आहे. 'अकर्मात' मनुष्य जन्माला येतो. मग ही मुले काय? बाळे काय? सगळी तुझीच! आणि आश्चर्य वाटतं लोकांना हे बघून कसं होतंय कसं ? घडतय कसे, बनतय कसे? इतकी कौटुंबिक स्थिती त्या लोकांची ठीक झालेली आहे. ह्या मुंबई शहरात किती तुम्हालाच आश्चर्य वाटेल पण आम्ही बघतच नाही. आम्हाला विश्वासच नाही. नका करू. तुमचा तुमच्यावर तरी विश्वास आहे की नाही देवाला ठाऊक! पण आता या नसत्या वर्तमानपत्रवादीपणाला सोडून काहीतरी खरोखर जे वर्तमानात होतं ते बघितले पाहिजे. आता कृष्ण झाले हे काहीतरी एक संपदा घेऊन एक परंपराच घेऊन आले. त्यांनी एक विशिष्ट कार्य केले. जगामध्ये एक बी पेरलेले आहे आणि आज ती संपदा तुम्हाला त्या स्थितीमध्ये आणते की तुम्ही जसे काही फुलातून फळे होणार 14
Original Transcript : Marathi आहात. ती तुम्ही मिळवून घ्यायला पाहिजे. ह्यावेळेला तुम्ही चुकलात की नेहमीसाठी चुकाल आणि अशा रीतीने प्रपंचातील सगळे प्रश्न सुटून तुम्ही परमेश्वराच्या प्रपंचात येता. त्याच्या प्रपंचात आल्याशिवाय सुखाचा धागा- दोरासुद्धा तुम्हाला मिळणार नाही. सगळे जगातले क्लेश परमेश्वराच्याच चरणी जातात असं म्हणतात. पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही जाऊन विठ्ठलाच्या चरणांवर डोकं आपटायला हवे. विठ्ठल आपल्यामध्ये जागवायला हवा. आणि तो कसा जागवायचा त्याला काहीही करावे लागत नाही. तो साक्षात् तुमच्यात आहे फक्त कुंडलिनीचे जागरण झाले म्हणजे जसा दिवा पेटविला तसा तो पेटतो. ज्या घरामध्ये परमेश्वराचा दिवा तेवत राहील. तिथे कसलं दुःख कसली गरिबी आणि कसले आपण. असा हा सुखाचा संसार झाला पाहिजे. त्यासाठी आम्ही खेडोपाडी सगळीकडे फिरत असतो. आपणाला नम्रपणे माझी ही विनंती आहे की कोणत्याही गोष्टीचा आक्षेप न घेता स्वत:कडे लक्ष देऊन आणि विचार करून ही जी आपल्यामध्ये शक्ती आहे ती जागृत करून घ्यावी आणि स्वत:च्या प्रपंचाचा आणि सर्व संसाराच्या प्रपंचाचा उद्धार करावा अशी मी तुम्हाला हात जोड़ून विनंती करते. 15