सहजयोग काय आहे ते जाणून घ्या आणि आत्म-साक्षात्काराचा अनुभव घ्या!
सहज योग ही एक अशी पद्धत आहे ज्याद्वारे तुम्हाला तुमचा आत्म-साक्षात्कार मिळतो तसेच, तुमचे आत्मज्ञान तुमच्या आत सहजपणे घटित होते. त्रिकोकोणाकार अस्थीमध्ये, ज्याला 'सॅक्रम' म्हणतात, ज्याचा अर्थ 'पवित्र' असा आहे, त्यात अशी एक शक्ति (कुंडलिनी शक्ति) आहे, जी जागृत होऊन तुमच्या टाळूला छेदते, जी टाळू बालपणी केवळ एक कोमल त्वचा असते, आणि त्यामुळे नंतर तुमच्या मध्यवर्ती मज्जासंस्थेवर तुम्ही सामूहिक चेतना अनुभवू शकता. एका नवीन आयामाची अनुभूती प्राप्त होते. – श्रीमाताजी, लंडन, ३० जुलै १९८९
या वेबसाइटवर उपलब्ध असलेली सर्व माहिती आत्म-साक्षात्काराच्या अनुभवानंतरच योग्यरित्या समजू शकते, जसे खालील व्हिडिओमध्ये दाखवले आहे. ही विद्या तुम्ही आतापर्यंत शिकलेल्या इतर कोणत्याही विद्द्येप्रमाणे बुद्धीच्या जोरावर शिकण्यासाठी, किंवा विश्लेषण करण्यासाठी नाही, तर नवीन जाणिवेच्या ठोस अनुभवाद्वारे सिद्ध करण्यासाठी आहे.
एकदा तुम्ही बौद्धिक विचारांच्या पलीकडे गेलात आणि निर्विचारितेत उतरलात की हे ज्ञान तुमच्या चेतनेचा हिस्सा बनते. कुंडलिनीच्या जागृतीमुळे हे शक्य होते कारण ती तुम्हाला सृष्टिकर्त्याशी आणि तुमच्या आत्म्याशी जोडते जे तुमच्या अस्तित्वाचे सार आहे.
मग सहजयोग ध्यान-साधनेद्वारे, तुम्ही हळूहळू आणि निश्चलतेने स्वतःला संतुलित करू शकाल, आंतरिक शांती प्रस्थापित करू शकाल. तसेच ही नवीन जाणिव, आणि 'स्व' बद्दलचे ज्ञान ह्याचा कसा उपयोग करता येईल हे समजेल. मग तुमच्यात साक्षात्कारी व्यक्तीचे गुण अधिकाधिक व्यक्त होतील आणि तुमच्या हातांवर आणि तुमच्या मज्जासंस्थेवर सर्वव्यापी परमेश्वरी शक्तिचा अनुभव येईल.
हे ज्ञान सूक्ष्म प्रणालीशी संबंधित आहे (होम पेजवरील व्हिडिओ पहा), प्राचीन काळापासून ज्ञात आहे परंतु सहजयोगाच्या पूर्वी सामूहिक जाणिवेसाठी सहजपणे उपलब्ध नव्हते.