Talk to Sahaja Yogis

Talk to Sahaja Yogis 1976-05-25

Месцазнаходжанне
Працягласць лекцыі
47'
Катэгорыя
Публічная праграма
Мовы агучвання
Хіндзі, Маратхі
Аўдыя
Відэа

Бягучая мова: Маратхі. Лекцыі даступныя на: Маратхі

Лекцыя таксама даступная на: Англійская, Хіндзі

25 मे 1976

Public Program

Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

Talk Language: Hindi, Marathi | Transcript (Marathi) - Reviewed

सर्व सहजयोगी मंडळींना माझे प्रणाम. आज सकाळी सगळ्यांना येवढया तपस्वितेत बघून एकार्थी मला आईच्या दृष्टीने वाईटही वाटलं कि, तुम्हा लोकांना एवढा त्रास झाला, पण दुसरी गोष्टं लक्षात घेतली पाहिजे कि सहजयोग हा आता कोणच्या मार्गाला लागलेला आहे. पार होणं सहज झालेलं आहे हे सगळ्यांना माहित आहे, कोणाला विश्वासही वाटणार नाही इतक्या सहज रितीनी सर्व मंडळीं पार होतात, त्यापुढे वाढत वाढत आज सहजयोग अशा दशेला आला कि कुठे एक सहजयोगी असला तर तो कोणालाही पार करू शकतो, किती लोकांना सत्याचं दर्शन देऊ शकतो. त्याची शक्ती इतकी बलिष्ठ आहे, परत संबंध श्रीविद्या आणखीन शुद्ध विद्या त्याला माहिती .....(अस्पष्ट शब्द ).

अशी आपल्याला किती साधू संत मिळतील, हे फार मोठे असून सुद्धा त्यांना शुद्ध विद्या माहित नाही. तेव्हा सहजयोग हा फार मोठ्या स्थितीला आता पोहोचला आहे. पण जेव्हा कोणती गोष्टं फार फोफावते तेव्हा त्याला गहणता हि आलीच पाहिजे, जर त्याला गहनता नाही आली तर ती जे विस्तारात शक्ती पसरलेली आहे ती थोडीशी कमजोर, कमकुवत होते. म्हणूनच आजची सुरवातच म्हणा देवदिवाळी होती, तुम्हालाही खूप तपस्वीता करावी लागली, तपस्येतच होते सगळे जणं, म्हणा आनंदी, दिसत होता तुमच्या चेहऱ्यावर मी आल्यावर, सगळ्यांना त्रास झाला, मुलाबाळांना त्रास झाला, पण कष्टही सहावे लागतात, गहन उतरायचं म्हणजे कष्टही सहावे लागतात, आणि तेच आता सुरु होणार आहे थोडं बहुत, म्हणजे शारीरिक कष्ट तुम्हाला होणार नाहीत, मानसिक होणार नाही, ते संपलं सगळं काही. पण आता थोडीशी तपस्या करावी लागणार आहे. ताच्या शिवाय गहन उतरणं कठीण होणार आहे. वरपांगीपना करून चालणार नाही. सहजयोगाचे लाभ पुष्कळ झाले, अनेक लाभ आहे. आमचे वडील ठीक झाले, आई ठीक झाली, मुलंबाळं ठीक झाली, आमचं घराचं ठीक झालं , नौकऱ्या मिळाल्या, सगळं व्यवस्थित आहे, आम्ही उत्तम आहोत वगैरे वगैरे सगळं काही झालं आता. योगक्षेम झालं, तेवढ्या पर्यंत आलं, योगक्षेम आम्ही केला, आता पुढे काय करायचं? आता जमावं लागणार आहे. आणि त्याच्या साठी थोडीशी हि मेहनत तपस्याही पाहिजे, पण ती सुरवात झालेली आहे, ते सहजयोग्यानी जाणलं पाहिजे. येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, येऱ्या गबाळ्याचे काम नोहे. मेहनत पाहिजे, बैठक पाहिजे, मेहनत पाहिजे, आणि पूर्ण तयारी पाहिजे. त्याच्या शिवाय काही जमणार नाही आहे. त्याला म्हणतात कॉन्सॉलिडेशन झालं पाहिजे, आणि ते कॉन्सॉलिडेशन जर झालं नाही सहजयोग्यांचं, अर्धवट पणाने राहिले तर मात्रं पुढे प्रगती होणं कठीण जाईल, सगळं काही तात्पुरतं बघतो आपण, आज माझ्या वडलांची तब्येत नाही ठीक, ह्याची तब्येत नाही ठीक , ते झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. पण मी कुठवर ह्याच्यात उतरलो आहे?

आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कि लंडन सारख्या शहरा मध्ये ह्या गोष्टीला घेऊन मी जेंव्हा बोलले, तर सगळी मंडळी चार वाजता सकाळी उठतात, लंडन सारख्या शहरात, सगळे जण, सगळॆ सहजयोगी, सगळ्या आश्रमात, चार वाजता उठायचं, अंघोळी करून ध्यानाला बसायचं, पूजन वगेरे, चित्तं पहिल्यांदा ठीक केलं पाहिजे, चित्त सरळ आलं पाहिजे. चित्ता मधे कॉसंट्रेशन पाहिजे, ते बसवलं पाहिजे. मेहनत करतात दोन दोन तास, दोन दोन तास मेहनत करून स्वतःला स्वच्छ करायला सुरवात केली त्या लोकांनी, आता तुम्ही म्हणाल माताजी त्यांना गरज फार आहे, आम्ही भारत भूमीला राहिलेलो, आम्ही योगी जण, त्यात आम्ही, म्हणजे आपल्याला जरा त्या बद्दल गर्व आहे कि आम्ही म्हणजे हिंदुस्तानी लोकं, म्हणजे भारतीय, म्हणजे विशेष पुण्यं कमावलेले लोकं आहोत, जरी गाठोडं मोठं असलं तरी सुद्धा प्रगती किती आहे ते बघावं लागेल. त्या गाठोड्याच्या जमा वर चालणार नाही. मेहनत करायला पाहिजे, आणि सगळ्यांनी इंडिविज्युअली करायला पाहिजे. सुपरफिशिअली नाही राहायचं, आणि हि गोष्टं आज पासून सुरु झाली हे लक्षात आलं पाहिजे. म्हणजे तसा काही त्रास झाला नाही आपल्याला वगेरे , पण एक तऱ्हेनी आंतरिकता, ओढ, आणि त्या ओढी मधे जे काही आपल्याला लागणार आहे , जे काही आपल्याला होणार आहे, ते सगळं सहन करण्याची शक्ती असायला पाहिजे.

पुष्कळदा मी आपल्याला उदाहरण देते कि जेव्हां अंकुर फुटतो तेव्हां सर्वप्राथम त्याच्या मधे मुळापासून सुरवात होते, आणि मूळ जमत जातं, पण ते कसं जमतं ते पाहिलं पाहिजे, त्याला केवढी अक्कल असेल, त्या लहानशा एका टोकाला मुळाच्या एवढी अक्कल असते, कि कसं आपण आतमधे जायचं, आता जर समजा एखादा दगड लागला, तर दगडाच्या आसपासनं जाताना किवां त्याच्याशी भांडण न करतांना थोडंसं फिरून त्याला येध्या घालायला, आणि जकडून धरायचं त्याला, दगडाला, त्याला केवढी, एवढ्या लहानशा याला केवढी सुज्ञता, केवढी wisdomआहे. तसंच असायला पाहिजे. जर सहजयोग्यांच्या डोक्यात हि गोष्टं आली कि ता आम्हाला आमची पाळे मुळे आतमधे खोल घालायची आहे, तर हे कार्य फार चांगलं होऊ शकतं. तेंव्हा तुमच्या वर सगळं काही अवलंबून आहे आता, आणि ते करायला पाहिजे. तपस्येला सुरवात झाली पाहिजे. आता माताजी आल्या, सगळी गाऱ्हाणी ऐकली, झालं सगळं काही झालं. मुलंबाळं ठीक होऊ देत, सगळं काही तुमचं व्यवस्थित होऊ दे, आता पुढे काय ,हे सगळं कशासाठी करायचं? हि सगळी तयारी कशाला? हि तयारी पुढच्या प्रवासाची तयारी आहे, आणि तो प्रवास सुखकर व्हावा म्हणून त्यासाठी तुम्ही सर्वांनी तपस्येला लागलं पाहिजे. आपली तपस्वीता वाढवायला पाहिजे.

आता मी कुठे असं ऐकलं कि हा सहजयोगी आहे माताजी तुमचा, पण तो आपल्या आईला फार इल्ट्रीट करतो, आणि फार ओरडतो, किवां ह्याचं बायकांच्या कडे लक्षं जास्तं आहे, तो पैशाच्या मागे धावतो, म्हणजे त्याच्यात काही मला मान्यता मिळत नाही, आणि तुम्हालाही मिळत नाही, आणि सहजयोगाला मिळत नाही, उलट तुम्हाला बघून जर लोकं असं म्हणतील कि या माणसाचं आयुष्यं बदलून गेलं, हा किती सोज्वळ झाला, किती प्रेमळ झाला, किती सहनशील आहे, कधी कुणाचं वाईट विचारून घेत नाही, किती पॉसिटीव्ह मनुष्य आहे, त्याच्या बोलण्या मधे किती सौंदर्य आहे, असं लोक सांगायला आले, म्हणजे मग म्हणायचं कि सहजयोगानी खरोखरंच काहीतरी, मला पाजळून काहीतरी विशेष ज्याला म्हणतात दिवा लावला तसा दिवा लावलेला आहे. नाहीतर तुमच्या मुळे लोकं आणखीन अंधारात पडायचे, कि हे काय हे सहजयोगी? मग नको रे बाबा आपल्याला सहजयोग! कि अशे कशे चालले, तेंव्हा तुमच्या मुळे लोकांनां किती प्रेम मिळत आहे, किती आनंदात तुम्ही लोकांना ठेवलेलं आहे, तुम्हांला बोलायची रीत आली कि नाही, तुमचं वागणं कसं काय आहे, सगळं काही लोक बघत आहे, हे लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्याची फारंच त्याला म्हणायचं कि अत्यन्त त्रिंक्षनं दृष्टींनी लोक बघत आहे, कि कशे वागत आहे सहजयोगी. ह्यांचं वागणं कसं आहे, अजूनही पैशातच गुंतलेले, पैशे मारायचे, म्हणजे हे आहे काय? ते तुम्हाला पचणारंच नाही, आधीच सांगितलं होतं मी, सहजयोगामध्ये आल्यावर काही पचणार नाही. तुम्ही कामातुन जाणार, तेव्हा सरळ मार्गाला का लागू नाही, परत त्याच्यात सगळ्यांचं भलंच होणार आहे. सगळ्यांचं त्याच्यात भलं होणार आहे, जाच्यांत हित होणार आहे, त्याच्यात सगळ्या संसाराचं तुम्ही भलं करणार आहे, तुमच्या हाती एवढी मोठी गोष्टं आहे, तेव्हा कशाला ह्या नसत्या गोष्टींच्या मागे लागून सगळ्यांचा संसार बिघडवायचा, त्यापेक्षा सगळ्यांचं भलं करायचं आहे, सगळ्या संसाराला एक विशेष रूप द्यायचं आहे. तेंव्हा तुमच्या ज्या वागण्या मधे किवां तुमच्या ज्या बोलण्या मधे जे सौंदर्य आहे ते दिसलं पाहिजे.

विशेषे करुन आपल्या महाराष्ट्रात, जरा भाषाही थोडीशी आपली जबरदस्त आहे, परत हातवारे करून आपल्याला बोलता येतं, शिकलेलो आहे आपण चांगलच, आणि जोपर्यन्तं आपण रोखडे पणाने आपण बोलू नाही आपल्याला वाटत नाही आपण महाराष्ट्रीयन, म्हणजे प्रत्येक मनुष्य भांडलाच पाहिजे. आणि थोडा वेळ भांडणं नाही झाले कि लोकांना वाटतं काहीतरी राहिलं, चुकल्या सारखं झालेलं दिसत आहे, दोनचार जो पर्यंत मारामारी नसेल तरी शिव्या काहीतरी चालल्याच पाहिजे, त्याच्या शिवाय आपल्याला वाटत नाही कि आपण बरोबर राहिलो. तर हे भांडकुदळ पणा, आणि भांडखोर पणा, रेबेलीअस नेचर, कशाशी नाहीतर गव्हर्नमेंट शी भांडायचं, गव्हर्नमेंट नसलं तर दुसरं काहीतरी शोधून, नसलं तर एका झाडाशीच भांडत बसायचं, सवय झालेली, भांडल्या शिवाय मजा वाटत नाही, मग माताजीच भेटल्या, माताजींशी भांडायचं, तुम्ही आमचं असं का नाही केलं? आम्ही मुद्दामून आलो होतो तुमच्या कडे, आणि तुम्ही आमचं असं का नाही केलं? म्हणजे जसं काही आम्ही ठेकेदारीच घेतली सगळ्यांची, विशेषे करून महाराष्ट्रीयन लोकांची, तेव्हां आधी आपल्या मधे काय दोष आहे तो बघितला पाहिजे, म्हणजे मुख्यं म्हणजे आपल्यात भांडकुदळ पणा आहे जन्मजात हे मानलं पाहिजे, कारण सगळेच भांडकुदळ होतो आपण सुरवाती पासूनच, तेंव्हा आपण आता किती भांडतो एक दुसऱ्यशी ते बघायला पाहिजे, कारण ज्या समाजा मधे जो दुर्गुण येतो तो दुर्गुण असा फोफावतो आणि तो सगळ्यांना इतका आत्मसात होतो कि कुणाशी चांगलं बोलणं म्हणजे हाजी हाजी करणं आहे अशी आपल्याला एक कल्पना आहे, आणि ह्याचे मला आता अनुभव बाहेर आले, त्यावरून मी तुम्हाला सांगते कि माणसांमधे एक तऱ्हेचं माधुर्य, सौंदर्य हे यायला पाहिजे. हे महाराष्ट्रात विशेष जर आलं तर तशी गुण पुष्कळ आहे आपल्याकडे, सववीस गुण आहे तशे पहिले तर, जर मोजायला बसले तर, सववीस तरी गुण असतात महाराष्ट्रीयन माणसांमधे, पण त्यातले हे जे दोन तीन गुण नसल्या मुळे सगळं झाकाळून जातं, जसा एवढा मोठा सूर्य सुद्धा आभाळामुळे झाकाळून जातो, तशे हे दोन तीन गुणांमुळे आपण झाकळून जातो.

मुख्यं म्हणजे मनुष्य अतंत्य निष्ठावान, दुसरं म्हणजे कर्मठ आहे. कर्माला लागणार जर म्हटलं कि पाण्यात उभे राहा आता, माताजींनी सांगितलं आहे तर उभे राहतील चोवीस तास, महाराष्ट्रीयन लोकं, त्याबद्दल मला शंका नाही, परत दुसरं म्हणजे लालची नाही आहे, कुणाचे पैशे घेणार नाही, इमानदार आहे, तिसरं म्हणजे जडवादी नाही त्याला एवढं समजत नहीं जडवादिता, जशे नॉर्थ ला पुष्कळ लोकांना मटेरिआलिसम आहे, इकडे नाही. अनेक गुण आहेत पण सर्व गुणांमध्ये एकच जो दोष आहे तो म्हणजे भांडकुदळ पणा, आणि तो भांडकुदळ पणा अगदी गेला पाहिजे. आपापसात बोलताना मार्दव पाहिजे. आता आपल्याला शिवाजी महाराजांचंच उदाहरण घेऊ या , त्यांनी तलवारी चालवल्या, सगळं जिंकून काढलं, पण त्यांच्या बोलण्याची पद्धत अजून कोणी रेकॉर्ड केलेली नाही, पण इतके मार्दव होते ते कि त्यांना लोक मानत होते. त्यांच्या मार्दवाला लोक मानत असत, आईशी बोलताना काय, कुणाशी बोलताना, 'आपण' शिवाय शब्दं कधी वापरलेला नाही, आणि त्या मार्दवतेमुळे इतके ते जगप्रसिद्ध झाले.

तेव्हा जे आपल्या पुढे गेलेले आहेत त्यांचं मार्दव आपण शिकलं पाहिजे. आता साधू - संतांना उल्लेखून असं म्हणता येईल कि साधू - संतांना एक मुभा आहे एक फ्रीडम आहे, कि तुम्ही जर कुणाला दोन चार शिव्या हासडल्या तरी तुम्ही साधू - संत आहात, जोडे हासडले तरी तुम्ही साधू - संत आहात, तुम्ही दगड मारले तरी तुम्ही साधू - संत आहात, किवां तुम्ही कुणाला वरून खाली ढकलून दिलं तरी तुम्ही साधू - संत आहेत, कोणी तुम्हाला काही म्हणणार नाही. साधू - संतांना मुभा आहे. केलं तर चालेल आज पर्यन्तं साधू - संत, आणि केलं तरी काही हरकत नाही. हाता मधे हंटर घेऊनही मारलं तेंव्हा ख्रिस्तच आहात, तेव्हा काही हरकत नाही, सहजयोगात मात्रं वेगळी गोष्टं आलेली आहे हे सांगायचं, सहजयोगाचे अनेक नवीन नवीन चमत्कार आहेत, त्यातला हा दुसरा एक प्रकार आहे, कि सहजयोगामात्र मधे हे चालणार नाही. इथे जरी तुम्ही साधू - संत आहात बॅ, कबूल, संत झालेत तुम्ही, मोठे झालेत. पण तरी सुद्धा कार्य करण्याची पद्धत वेगळी आहे, प्रत्येकाला आज सहजयोग हा वाढवायचा असल्यामुळे समजून उमजून प्रेमळ पनानी हे कार्य करावं लागेल, आणि जर हे कार्य प्रेमळ पणाने तुम्ही करू शकले नाही तर हे वाढणार नाही, त्याची कमी होते. जे पट्टीचे आहेत ते तर येणार. पण जे नाहीत त्यांना ओढण्यासाठी मेहनत पाहिजे, आणि ती मेहनत अत्यंत गोड आणि चांगली झाली पाहिजे.

तेंव्हा आज पहिल्याच दिवशी सांगायचं म्हणजे असं कि आजच्या दिवशी आपण व्रत घेतलं पाहिजे, पूर्वी काळी व्रत घ्यायचं काय, कि जेवायचं नाही, आणि दिवसभर सगळ्यांना जोडे मारले तरी चालतील, उपास झाला, आज हनुमान, म्हणे आज हनुमानाचं व्रत आहे, झाले, मग हनुमान आले घरात, मग विचारायला नको, लोकांनी विचारायचं मग आज आहे का मंगळवार मग आम्ही येत नाही तुमच्या घरी, म्हणे काय, नको रे बाबा ते, त्या दिवशी तुमच्याकडे हनुमान येतात, म्हणजे ज्यांनी व्रत घेतलं तो हनुमानच व्हायचा मुळी मग, कोणाच्या डोक्यावर बसेल ते देवाला ठाऊक, तेव्हां असलं व्रत आता चालत नाही. व्रत एक आहे, व्रत आम्हाला सहजयोग वाढवायचा आहे, येन केन प्रकारन तो व्रत, तो अश्या रीतीने झाला पाहिजे कि त्याच्या मधे आम्ही एक शुद्ध रूपांनी व्रती झालो पाहिजे, लोकांना कळलं पाहिजे कि ह्या माणसाला काहीतरी एक विशेष देणगी आहे, कि हा कोणाशी बोलताना, वागताना अत्यन्त सुबक आहे सगळं, आणि हे अनेकदा मी सांगितलं आहे पण आज विशेषे करून सांगते कि हे व्रत सकाळ पासून घ्यायला पाहिजे. सकाळ पासून किती लोकांशी मी चांगलं बोललो, कोणी कसाही असे ना का, मी म्हणते कि जरी तो सहजयोगी नसला तरी सुद्धा चांगलं बोलायला काय लागतं आपल्याला? बिघडलंच पाहिजे असं नाही. आणि त्याच्या साठी मला बिघाडावं लागलं म्हणजे बरं होईल, कारण आता पर्यन्त मी बिघडत नव्हते त्यामुळे कोणी असलं तरी दादा पूता करून बाबा, कारण कसं तरी करून रोखून ठेवायची गोष्टं होती, त्यात तू राहा, सहजयोगात तू राहा कसतरी, आता तुम्हाला हे करायला पाहिजे, तेव्हाच लोक टिकणार आहे, तुमचं एकंदर वागणं, तुमचे एकंदर पद्धत ते सगळं बघून घेणार आहे.

तेंव्हा कोणी सुद्धा आता असा विचार करू नये कि आम्ही कुणाला हासडून किवां कुणाचा आम्ही दुखं देऊन सहजयोगात टिकवू नाही. सर्व प्रथम स्वतः कडे लक्षं द्यायला पाहिजे, तसं बघितलं तर तुम्ही स्वतः आत्मा आहे, आणि तुम्हाला आपल्या आत्म्याचं दर्शन झालेलं आहे, आणि ज्या लोकांना आपल्या आत्म्याचं दर्शन झालेलं आहे ते आनंदमय असायला पाहिजे, कारण आनंदाचा स्रोत आहे आत्मा, दुसर्यांनाही तुमच्या सहवासात आनंद वाटला पाहिजे. आणि त्या आनंदमयी स्थिती मधे वेळच कुठे असतो काही वाईट दुशःब्द बोलायला, उलट सारखे स्फुरत असतात अशे शबद कि जानी सगळ्यांना आनंद वाटेल, तेव्हा हि आनंद दायिनी शक्ती आणि अल्हाददायीनी शक्ती जी राधेची होती, राधेला, तिचं विशेष म्हणजे कि अल्हाददायीनी शक्ती होती कृष्णाची, ती शक्ती तुमच्या वाणीतून, कारण विशुद्धी चक्रातून, वाणीतून, तुमच्या वागण्यातून आणि तुमच्या एकंदर व्यवहारातून दिसायला पाहिजे. सगळ्यांना आल्हाद वाटला पाहिजे, अहा, काय मंडळी आहेत, वा वा वा, काय लोकं आहेत, बघितलं कि कसा आनन्द वाटतो. आता माताजींकडे तर आहे सगळ्यांचं लक्षं, आणि माताजींवर प्रेमही आहे सगळ्यांचं, पण जी निष्ठा माझ्याबद्दल आहे ती जरा थोडीशी इतरांच्या बद्दल जर वाटायला सुरवात झाली तर सहजयोग फोफावून निघेल, थोडंसं झटायला पाहिजे.

15:54 थोडसं झटायला पाहिजे, आणि हि एक व्रत घ्यायला पाहिजे सकाळी लक्ष्य स्वतः कडे द्यायचं कि बुआ आज मी, मौन व्रत घेऊन, कोणाची काय मदत करणार ते बघणार आहे , कसं होतं ते? कसं होतं? तुम्ही माताजी साठी कसं करता? माताजी येऊन बसल्या बरोबर लगेच लक्ष्यात येतं माताजी ना हि गरज आहे, लक्षं असतं, माताजी कुठे बसतात? काय पाहिजे त्याना? म ते बरोबर आणून देतात। तसंच! मौनातच राहायचं आहे, मग दुसऱ्याची काय गरज आहे? हे पाहिजे का? घ्या। ते पाहिजे का? ते घ्या। अशा रीतीने जेव्हा तुमची वागणूक होईल, तुम्हाला आश्चर्य वाटेल, कि एक नवीन तऱ्हेची संस्था तयार होणार आहे, आणि त्या संस्थे मध्ये, बहरून येईल सगळे जणं, आता फक्त बाहेरच (राहिला आहे), पुष्कळ झाला सहजयोगा मध्ये, मला तरी वाटतं पुष्कळ मिळवलं तुम्ही, आता द्यायची वेळ आलेली आहे, आणि ते द्यायचा वेळेला, ते सौंदर्य, ते सौख्यं, तो आनंद, तो लुटवायचा आहे। आणि त्या साठी फक्त हृदय उघडायला पाहिजे, जर तुम्ही हृदय उघडलं, कि झालं, हृदय पाहिजे पुष्टी गोष्टीला। जर ह्रहृदय नसलं तर काहीही जमायचं नाही, सगळं काही वर पांगी वाटेल। हृदयात्न (हृदयातून) व्हायला पाहिजे कोणासाठी काय करायचं असलं तर, हृदयात्न (हृदयातून) चालेल। तेव्हा! माझ्या लक्षात आहेत मंडळी, कोणची चापट आहेत, कोणाला फार लोकं रागावतो, कोणी मौनआत राहून रागवतात, कोणी चीडचिडतात। सगळं काही मला माहित आहे, आणि कसे लोकं बदलत आहेत ते मी लक्षात घेती आहे। पण काही तरी आता नवीन करायचं असलं, तर आपण कसं विशेष विचार करतो, तसं विचार केला पाहिजे, आणि तो विशेष विचार करून, तुम्ही लोकं ध्यानात जाऊन, असं ठरवायचं कि आम्ही चार मंडळींना बोलवूया, त्येंच्याशी प्रेमानी, गोडी गुलाबीनी, डिप्लोमसी करून, त्यांना समजवून सांगायचं, कि सहजयोग हा, फार मोठा परमेश्वराचा आशीर्वाद आहे, तो सगळ्यांनी घ्यावा, आम्ही आशीर्वादित झालो, तसे तुम्ही आशीर्वादित व्हा। ते सगळं तुमच्या हाती आहे, तुम्ही इतके सबळ आहात, तुम्हाला किती मिळाले आहे त्याची तुम्हाला कल्पना नाही। एक माला गुरुजी भेटले, पार आहेत ते, तर त्यांना काही श्री विद्या माहित नाही आहे, शुद्ध विद्या माहित नाही, काही माहित नाही, कुंडलिनी जागरण माहीत नाही, (मी) म्हटलं हे काय माणसाला, पार असून तरी उपयोग काय, शुद्ध मनुष्य आहेस, (पण) उपयोग काय, सगळं भानवलं असून उपयोग काय त्याचं विनिमय माहिती नाही पण तुम्हाला सगळं माहिती आहे, आणि ते फार मोठं आहे, एवढं मोठं मिळालेल आहे, (ते सगळं मोठं), समजा एखादा हीरा मिळाला आणि तो आपण काई, दगडात मातीत बसवत नाही, सोन्यातच बसवला जातो। तसं सोन्यासारखं तुमचं आयुष्य असायला पाहिजे। सुंदर, (सुबक) त्यात ह्या हीरा बसवायचा, आपल्या आत्म्याचा, म्हणजे किती सुंदर ते।

सगळ्यांचा माझ्यावर एवढा लोभ आहे तसंच माझा तुमच्यावर। आप आपसात सगळं काही ठीक आहे, पण इतरांच्या कडे आपलं लक्ष कसं असावं, इतरांशी आपण कसं वागावं, तिकडे लक्ष द्यायला पाहिजे। सगळ्यानी जबाबदारी घ्यायला पाहिजे। एक लहानशी जबाबदारी आहे पण ती फार मोठी होते, म्हणजे असं कि आम्ही किती लोकांना सहजयोगात आणू शकतो, त्यांना कसं पकडून देऊ शकतो। सगळ्यात मुख्य म्हणजे तुमच्या स्वभावावर अवलंबून आहे। तुमच्या एका वागण्यावर अवलंबून आहे आणि ते तुम्ही करावं, त्या साठी सबंध जे काही लागेल ते करायला मी तयार आहे, माझी तपस्विता चालूच आहे सारखी हे तुम्हाला माहित आहे। किती प्रवास माझे होतात, ते जर तुम्ही बघितले, तुम्हाला अगदी आश्चर्य वाटेल कि तुम्ही जशे रिले रेस मध्ये थोडा वेढ धावता, मी मात्र मॅराथॉन, म्हणजे सबंध माझी धावपळ चाल्लेली आहे सारखी, आणि जवळ जवळ आता सहा (६) महिने झाले आता पण प्रवास चालू आहे। तेव्हा तुम्ही थोडा सा स्वतःच्या आत मध्ये अंतरा मध्ये प्रवास करावा, आणि तिथले काय प्रश्न आहेत ते बघावे, आपला मार्ग सुधारावा।

तेव्हा आज आजपासून, एक व्रत घ्याल पाहिज, के म्हणजे असं, कि आम्ही ध्यान करून, स्वतःला स्वच्छ करून, स्वतःचा कंदील स्वच्छ करू। सहजयोग म्हणजे काही नाही, सहजयोग एक साधी गोष्ट मी शोधून काढली आहे। ते म्हणजे अशी, की आधी दिवा लावा, आधी दिवा लावून द्यायचा मग तुम्ही कंदील तुम्ही स्वच्छ केला पाहिजे। दिवा लावल्या शिवाय काय कंदिला मध्ये घाण आहे ते दिसत नाही उगीचा उगीचच वरून स्वच्छ करा आणि, हि मेहनत करा, आणि तप करा, आणि जप करा आणि हितं काय नको, पाहिलं दिवा लावून टाका, कसा असेल तर घ्या। दारू पितो ना? काही हरकत नाही दिवा लावा, वाईट मनुष्य आहे? दिवा लावा, हा हलकट मनुष्य आहे ह्याला दिवा लावून टाका। मग तो त्या दिव्या मध्ये बघतो कि मी किती हलकट आहे, मग तो असा स्वच्छ होईल, त्याला काही सांगायला नको काही नको। हा असा सहजयोगाचा सरळ मार्ग मी शोधून काढला, आणि त्या सह, ह्याचा मध्ये आता जो काही तुम्हाला दिसत आहे ते स्वतः कडे बघायचा आणि स्वच्छ करून द्यायचं, कि मी कसा असा करतो, मी आत्मा आहे मला हे काय शोभतं का? आणि माझा प्रकाश जाणार कसा? माझ्या मध्ये, हे कंदिला मध्ये हे घाण भरलेली आहे हे स्वछ केली पाहिजे । तर हे तुमचं करणं आहे, माझं जे करणं आहे ते मी केलेलं आहे। परत हा दिवा स्वच्छ कसा करायचा वगेरे सगळं काही समजवुन सांगितलं आहे।

मराठी में तो सब समझा दिया महाराष्ट्रियन लोगों को, अभी हिंदी में थोड़ा सा आपसे बात-चीत करेंगे, क्योंकि थोड़े से लोग ऐसे भी (हैं) जो मराठी भाषा नहीं समझते | पर यहाँ महारष्ट्र में मराठी भाषा सीख लीजिये, नहीं तो आपका ठिकाना नहीं रहेगा, क्योंकि हिंदी वालों की भाषा तो सभी सीखतें है इसीलिए हिंदी वाले मराठी नहीं सीखतें हैं | देखिये मराठी भाषा बहुत ऊंची भाषा है, और खासकर कुण्डलिनी के बारे में जितना महाराष्ट्र में लिखा गया है, किसी भी भाषा में नहीं है, की-सी-भी भाषा में नहीं है, आश्चर्य की बात है, क्योंकि संत साधू यहाँ बहुत हो गए | ऐसे तो नानक साहब ने भी लिखा है, और कबीर दास जी ने भी लिखा है, लेकिन उनके जीवन में, जैसा उन्होंने कुछ लिख दिया, इन्होंने लिख दिया, लेकिन यहाँ तो हर एक साधू संतो ने कुण्डलिनी पढ़ी, अनेक लोगों ने, और तरह तरह की चीज़े लिख रखी हैं | रामदास स्वामी से लेकर के आगे, और यहाँ पे उससे भी पहले यहाँ पर इतने अवधूत लोग हो गए मछिन्द्र नाथ आदि, ऐसे पहुंचे हुए लोग हो गए इन् सब ने बहुत कुछ लिख डाला, और इसके वजह से इसका ज्ञान मराठी भाषा में बहुत है, इसीलिए मराठी आप लोग सीखने की कोशिश करें | हमने भी हिंदी सीखी है, और आप लोग भी मराठी सीख लीजिये | कोशिश करें की मराठी सीखें |

आप लोगों से भी, इनलोगों को बहुत कुछ सीखने मिला है | जैसे की हिंदी वाले लोगों में, बातचीत में, मुसलमानो के वजह से शायद असर हो, की बातचीत करने का ढंग बड़ा सुन्दर होता है | हालांकि गाली गलोज हिंदी भाषा में है, मराठी में है नहीं गाली गलोज | आपको आश्चर्य होगा की मराठी वाले जो हैं, हिंदी की गाली देते हैं, उनकी अगर ज़बान चलती है जब, जब उनको गाली देना होता है तोह हिंदी से गाली देते हैं | उनको मराठी में दो-चार गालियां होएंगी मेरे ख़याल से, एक तोह मूरख वूरख ऐसे कुछ कहते हैं | पर ख़ास गालियां जो देनी हो, तो वो उनको उधर से सीखना पड़ता है , ख़ासकर के भैया लोगों से सीखते हैं, गाली, लेकिन लड़ाई झगड़ा करने में बड़े होशियार लोग हैं | मतलब ये की झगड़ा करने का इंतेज़ाम जल्दी होजाता है, और उधर के लोग जो हैं, वो सोचते है की भई लड़ाई करेंगे, तो अगली बात सोचते रहते हैं की, लड़ाई करेंगे तो फिर आफत मोल लेनी पड़ेगी तो क्यों करें लड़ाई, हटाओ, अगले दिन देखा जायेगा |

इस तरह से, आपस में एक आदान प्रदान होना चाहिए | आदान प्रदान ऐसा होना चाहिए, के, जो लोग, सहजयोग में आगये हैं, उन्होंने बहुत पाया, बहुत पाया, मुझे स्वयं आश्चर्य होता है | एक इंसान से जब मैंने शुरू किया है, इतने छोटे से, समय में बहुत कुछ पाया, और उसको पाने के बाद, उन्नति भी बहुत कर ली | क्योंकि, इसका तरीका ऐसा बनाया गया, की पहले सबके अंदर दीप जला दिया गया | पहले दीप जल गया, फिर वो खुद ही देख लेंगे, की उनमें क्या खराबियां हैं उनको बताने की जरुरत नहीं, वोही देखलेंगे की उनकी जो कोठरी है, उसमें कहाँ-कहाँ काजल लगा हुआ है, नहीं तो सब दो उनको अंधेरे में कुछ दिखाई नहीं देता है | ये एक छोटा सा तरीका मैंने बनालिया, इसीलिए आपलोग पार होगये | पार हुए बगैर आप समझ नहीं सकते, यह सब कह गये हैं, इसीलिए पार करा दिया | पार कराने के बाद जो भी शुद्ध विद्या है, वो भी सीखा दी | अब, जो है, एक नया पहलू उभर आया है, एक कहना चाहिए, की एक, नयी मंज़िल पे उतरना पड़ेगा, मंज़िलें तय करनी पड़ेगी, उसमे से यह मंज़िल जो है, इसमें तपस्या की जरुरत है |

तपस्या में महाराष्ट्र के लोग, जबरदस्त हैं, इसमें कोई शक नहीं | वो (वह) गिरते हैं जब लड़ाई-झगडे पे आते हैं, मतलब ये (यह) की दो महाराष्ट्रियन बैठ के तप नहीं कर सकते, एक बैठा तो अच्छा है | अगर दो बैठ गए, तो उसमे से एक बच जायेगा, दूसरा खतम | भाईचारा, और, बाकी लोग जो हैं, उनमे भाईचारा ज्यादा होगा, बैठेंगे, लेकिन गाली गलौज में बैठ जायेंगे, बात चीत में बैठ जायेंगे, ऊपरी बातों में, ऊपरी बातों में बैठ जायेंगे | तो दोनों को सोचना चाहिए, की ऊपरी बात भी जो है, वो (वह) भी जरुरी है की, दूसरों से बात-चीत कैसी करनी है, दूसरों से सम्बन्ध कैसे रखने है, आदान प्रदान कैसा है | अभी किसी महारष्ट्रीयन के यहाँ जाईये तो चाय मिल जाएगी आपको बस, चाय मिल जाये तो बहुत अच्छा है, चीनी-विनि मिल जाएगी | लेकिन और इससे ज्यादा मिलना जरा मुश्किल हो जाता है | लेकिन वहीं अगर आप और जगह जाईये, किसी धोबी के भी घर जाईये, तो वो (वह) भी आपको जो भी घर में होगा निकाल के, खाना-पीना दे देगा, की भाई लेलो, जो भी है | और बात-चीत अच्छी करेगा, अच्छे से बात-चीत करेगा |

तो, वहीं बात सहजयोगियों को बहुत जरुरी है, क्योंकि अब हमलोग एक नई मंज़िल पे आरहें हैं, अब उस नई मंज़िल में जब तक हम अब तपस्या से अपनेको सफाई नहीं कर लेते, जबतक हम मेहनत से अपनेको ठीक नहीं कर लेते, तब तक दूसरे लोग आपको मानने वाले नहीं | कि जब आप दूसरों को करते हैं, तो आपको ये भी देखना चाहिए कि आप अपने को क्या कर रहें हैं | जैसे अपने माँ बहन को आप सता रहें हैं, अपने बाल बच्चो को आप नहीं देख रहें हैं और दुनिया भर कि आप चापलूसी कर रहें हैं तो उसमे भी कोई, लोगों पे असर नहीं पढ़ने वाला | और अगर आप अपने को भी देख रहें हैं, अपने घर वालों को भी देख रहें हैं, और दूसरों को भी आप देख रहें हैं, तब दुनिया कहेगी, कि हाँ भई, ये आदमी कुछ कायदे का है, इसमें कोई विशेषता है, ये कोई, चमत्कार है इस आदमी में | ये कैसे ऐसी ज़िन्दगी, कैसे, इतनी बढ़िया है | आले दर्जे का आदमी, ऐसा लोगों को कहना चाहिए कि ये तो आले दर्जे का आदमी है, पहले चाहे जैसा भी रहा हो, अब इसका, कुछ समझ में नहीं आता इसका क्या से क्या हो गया |

इस तरह कि जब चीज होएगी, इसी दर्शन से ही लोग और सहजयोग में आएंगे और बढ़ेंगे, नहीं तो जहाँ के तहाँ हमलोग बस चार बढ़ गए, फिर चार घट गए, आठ बढ़ गए, दस निकल गए, जो कहानियां आप सुनते होएंगे कि, एक आदमी काम पे आया आधा किया भाग गया, फिर आया, इत्ता किया भाग गया, वही होता रहेगा सहजयोग में | इस लिए भगेडू लोग यहाँ चल नहीं सकते | इंसान को बैठना पड़ेगा, जम्मना पड़ेगा, बैठक लगानी पड़ेगी तब गहरे उतरेंगे | और कितना बड़ा (धन) है, कितनी बड़ी शक्ति है, इस शक्ति को बढ़ाना चाहिए, और उसका कितना बड़ा आनंद है, सारी दुनिया कि शक्तियों में जो आनंद नहीं मिल सकता, सारे दुनिया के धन से जो आनंद नहीं मिल सकता है, वो अपने आत्मा के धन और शक्ति से मिला, उसकी संपदा से पा लिया |

और जभी अपने अंदर इतना गहरा है तो क्यों व्यर्थ में हम इन चीजों में लगे हैं | किसी से सुनते हैं, कि वो सहजयोगी औरतों के पीछे भागता है, अरे औरतों के पीछे भागने से कोई भी किसी को भी सुख मिला है क्या?, सुख तो छोड़ो, आदर तक नहीं मिलता है आज तक आपने कहीं देखा है कि किसी का स्टैचु बना है क्योंकि यह आदमी औरतों के पीछे भागता था, या उसको किसी ने हार पहनाया कि ये औरतों के पीछे में भागता था | इस तरह की, बहुत ही, ओछी छोटी चीजों में फसना यह सहजयोगिओं का काम, वो तो एक ऊंची बुलंद चीज है, उस बुलंदी पे उसे उठना ही पड़ेगा, अगर वो नहीं उठेगा तो सहजयोग नहीं उठ सकता, मेरी वजह से क्या होने वाला है, लोग कहेंगे की आप होंगे तो होंगे, आप एक हैं तो? ऐसे बहुत होगये आपके जैसे, और हो भी गए, लेकिन आपने क्या बनाया है? कोई बुलंद चीज बनाई हो, तो उसे देख कर के हम भी बदलेंगे |

और इसीलिए बार बार आपसे ये कहते हैं, कि अपने को उस बुलंदी पे लाओ | छोटी-छोटी ओछी चीजों में मत रहिये, पैसा, कौड़ी, ये, वो सब चीज बेकार है, इससे कुछ मिलने नहीं वाला, इससे कोई आनंद नहीं मिलता अभी जिस देश से आ रहीं हूँ, रियाद से, वहां इतना पैसा है, इतना सोना है, कि आप बाजार में जाइये तो जैसे वो हार बेचते हैं न अपने यहाँ, और हार-वार वैसे वहाँ पे सोने का सब लटका पड़ा रहता है | और इतना भय है कि चुराता भी नहीं, सब लटका हुआ हैं, सारे, जसं आपल्या कडे हे असतं ना, हार फुलांचे तसे, माईल्स-च्या-माईल्स, और कोई चुराता नहीं | इतनी रहीसी है पर अगर मुंह पे देखिये तो ऐसा लगता है कि इनके कोई-न-कोई मर गया इनके घर में | सारा सोना, सारी चमक सोने ही में है, चेहरे पर जरा भी चमक नहीं, ये हालत है, तो इतनी लक्ष्मी होकर के भी लगता है कि, सरस्वती तो है ही नहीं, बुद्धि भी बिलकुल, बेअक्कल लोग हैं, गधे के जैसे | और दूसरी बात ये कि कोई सौष्टम नहीं, कोई सौंदर्य नहीं, कुछ मुंह पर रौनक नहीं, अजीब से घबराये हुए आतंक में फले | इसीलिए सहजयोगी के अंदर जो एक शान्ति, जो प्रेम, शांति और प्रेम, इसको पाना चाहिए इसको बिठाना चाहिए, जमाना चाहिए, अंदर में बहना चाहिए, इसका गौरव बढ़ना चाहिए |

शांति और प्रेम, अंदर की शांति और बहिये में वही शांति प्रेम में | अपने जबान में शांतता होनी चाहिए, और अपने व्यवहार में प्रेम होना चाहिए, और प्रेम में किसी तरह का लालसा हो, तो वो प्रेम ही नहीं हो सकता, वो तो कोई गन्दी चीज है | किसी लालसा के, किसी लालच के जो प्रेम होता है वही सब शुद्ध प्रेम होता है, और वही असल चीज होती है, बाकी तो सब नकल है, और बेकार चीज है | जैसे कोई चीज सड़ जाए उसे हम नहीं कहते, उसी प्रकार सड़ी हुई गली हुई ये चीजों के पीछे में, हमलोगों को लगना नहीं क्योंकि हमलोग सहजयोगी हैं | और ऐसे सहजयोग के महत कार्य में आपलोग लगे हुऐं हैं, परमात्मा आप सबको आशीर्वाद दें, और इस तपस्विता मे आप लगें, और इस तपस्या में आप बहिये | मेरा पूर्ण आशीर्वाद है आपको, मैं स्वयं इस तपस्या में लगीं हूँ की यह चीज आपको दर्शन है इसका और आप इसे देखें, इसे आप आज़माइये, कितने आनंद की चीज है की अपने ही, सद्गुणों पर और गुणों पर आप मुग्ध हैं, अपने ही गुणों का आप मजा उठा रहें हैं | (साब में) मजा आरहा हैं, किसी को चीज दे रहे हैं तो मज़ा आरहा है, किसी से अच्छे से बात-चीत हो रही तो मजा आरहा है, एक तो वार्तालापी का मजा आ रहा है, इतनी बढ़िया चीज है इसको आप पाइये, और इसमें आप उतरिये, आज से ये चीज शुरू होनी चाहिए, सब लोगों के बीच में, एक तरह का आदान-प्रदान प्रेम होना चाहिए, आपस में भी और दूसरों के साथ भी | परमात्मा आप सबको सुखी रखें |

आज मुख्य म्हणजे जी मंडळी बाहेरून आलेली आहे आणि त्यांना जर काही प्रश्न असले तर त्यांनी मला येवून भेटावे अशी माझी इच्छा आहे. आज पार करायचा काही वेळ नाही कारणकी सर्व जण पार झालेलेच दिसत आहे मला इथे आणि इतकी पार मंडळी बसल्या वरती मला कशाला पार करायला पाहिजे? सर्व पारच झाले. तेव्हा त्याच्या पुढच्या पायऱ्या काय गाठायचा वैगरे तिकडे सगळ्यांनी वयक्तिक लक्ष्य द्यायला पाहिजे, इंडिविज्युअल अटेंशन द्यायला पाहिजे. त्याला काही जनरल अटेंशन आसू शकत नाही आणि ते एकदा सुरु करा तुम्ही, उद्या पासून सुरु करायचे. पहिल्यांदा जिभेला मात्र थोडसं वळण द्यायला पाहिजे. पण जीभ तरी कशी वळते जस मन असेल तस, त्या मनालाच वळण द्यायला पाहिजे. आता अशी जर ईथे मंडळी असली ज्यांना मला काही सांगायचे असेल वैगरे त्यांनी वरती यावे ईकडे. जे बाहेरून ओर्गनाझर्स आले असतील त्यांच्याशी बोलायचे आहे. अत्त्यंत चमत्कारपूर्ण गोष्टी घडलेल्या आहेत बाहेर आणि इथेही घडलेल्या आहे. तेव्हा तुम्हाला दिसतच आहे सहजयोगाला साक्षात नको साक्षात झाला आहे सर्वाना फक्त आता उतरा त्याच्यात आणि त्याचा प्रकाशा मध्ये तुमची वाढ लोकांना दिसूद्या. काय कोणाला प्रश्न असतील तर विचारा आणि नंतर एखादी अशी मंडळी असेल तर मला येऊन भेटली तर चालेल.

कारण आता आपल्याला वेळ फार कमी आहे आज एकंदर या सर्वह्या गोष्टीला मी आजच आली आहे आपल्याकडे आणि परत १२ तारखेला जाणार आहे मी बाहेर. तर आपला प्रोग्रॅम इकडे कोणकोणत्या तारखेपर्यंत आहे ? ११ ला पूजन आहे तिथे आपण सर्व मंडळी जाऊया तिथे भेटूया, बरं पुढे? १० जानेवारी पासून प्रोग्रॅम आहे। पण मध्ये एकदा सर्वांकरिता शिबीर होणार आहे कधी ? १० फेब्रुवारीला आपले शिबीर होणार आहे बोर्डीला. तेव्हा त्याच्या साठी ज्यांना यायचे असेल किंवा काही असेल त्यांनी ईथे निरोप करावा आणी नंतर

ज्या मंडळींना त्याच्या मध्ये काम करायचे, मदत करायची असेल त्यांनी सुद्धा निरोप करायला पाहिजे. काय होत जी मंडळी काम करता आहेत ती १२ वर्षा पासून करून राहिली. १० ते १६ शिबीर, जो लोग दस साल से काम कर राहे है उनको १० साल १२ साल से उन्हीको देख रेही हूं. सबको सामने आना चाहिये की माँ हमको भी काम दो. हम भी मदत करेंगे हमसे भी मदत लिजिए. ये परमात्मा का काम है, परमात्मा का काम है. इस काम में सबको सजग रहना चाहिये, क्या जरुरत है ? किसको किस चीज कि झरूरत है ? हम क्या काम कर सकते है ? यह नही होना चाहीयेकी एक ही आदमी काम कर रहा है, ये गालत चीज है. तो उसमेभी आपको सहकार्य देना चाहीये. अब हमारे प्रोग्रॅम इतने जादा नही है, अब देखा जाये तो आप बम्बई वालो पर तो बहुत ही कम प्रेशर है ईसवक्त. सिर्फ प्रोग्रॅम जो है १० जानेवारी ते १६ जानेवारी (३४:००) म्हणजे फक्त ७ दिवस झाले, बरं पुढे १७ पासन महाराष्ट्राचा दौरा सुरु. आता महाराष्ट्राच्या दौऱ्या बद्दल, सगळी मंडळी अशीच चढून जातात मी पाहिलेले आहे तसं करायचे नाही. या वेळेला ज्या मंडळींना जायचे असेल त्यांनी मला कळवाव, त्यातील एक किंवा दोन मंडळी आम्हाला पाहिजे ह्या लोकांच्या बरोबर दौरावरन जायला आणि ज्या लोकांना सरळ जायचे असेल त्या लोकांनी सरळ त्या ठिकाणी पोचावं स्वतःची व्यवस्था करावी पण याच व्यवस्थेत किंवा याच लोकांच्या पैश्यात असे करू नये, असे मागच्या वेळेस झाले, त्याचा आधी झालं, त्याचा आधी झालं, तसं करू नये.

सगळयांना आपला आत्मसन्मान असायला पाहिजे सेल्फ रिस्पेक्ट हा सर्वाना पाहिजे फुकटचे जाऊन आपले फुकट निघाले. असे नाही उलट हातभार लावला पाहिजे सहजयोगा मध्ये ही गोष्ट फार कॉमन होते आणि नवीन मंडळी आली की त्यांचे विशेष मी पाहिलेले आहे की आपले चढले याच्यामध्ये. आता ५० माणसांची बस असेल त्याच्यात सात माणसं आणखीन चढले आणी विचारले की का हो तुम्ही ? नाही आम्ही माताजींच्या सेवेला आलो. कसली सेवा ? बसला कशाला सेवा पाहिजे ? तुम्ही आपल्या बसने या की सेवा करायची असली तर नाही आम्ही तुमच्या सेवाला येतॊ ना. सेवा अशी होते की रस्त्यामध्ये बस थांबवतात ते (ST इंस्पेक्टर्स) आणी उतरवतात की ईतकी मंडळी चाललेली आहे, मग त्यांच्या खायचे पैसे द्या, माझीच सेवा चाललेली असते त्यांची. त्या मुळे या वेळेला असली सेवा काही करू नका तुम्ही. व्यवस्तीत सेवा ज्याला म्हणतात ती म्हणजे असे की स्वतः पोचायचे दोन पैसे घेऊन. फुकटखोरी करायची नाही, सहजयोगाला शोभत नाही फुकटखोरी. उलट दोन पैसे लागले तर माताजी आम्ही आहोत तुम्ही काही काळजी करू नका. मला नको तुमचे पैसे पण तरी सुद्धा. आणी माग काय त्याच्या नंतर, टूर नंतर आम्ही परत येवू ईकडे बोर्डीला कोणत्या तारखेला मोदी?

१० फेब्रुवारी ते १६ फेब्रुवारी, पण तरीसुद्धा दोन दिवस तुम्ही ठेवणार आहातना फॉरेनर्सला १४, १५ आणि १६ जानेवारीला ईथे फॉरेनर्स येऊन राहणार आहेत. तेव्हा एक व्रत घायचे की आम्ही त्यांच्यात जेवायला बसणार नाही. हे मला सांगायला नको मी आई आहे म्हणून सांगते. हे ही पहिले मी की त्यांच्या पेक्षा जास्त मंडळीच जेवायला बसतात. नाही तर ईथे पैसे कोण देणार ? माताजींना द्यावे लागतात खिशातनं, आता मला काही खिशातनं देण्याची काही सोय नाही दिलेत पुष्कळ. तेव्हा कृपा करून त्यांच्यात जेवायला बसायचे नाही. पैसे दिल्याशिवाय जेवायचे नाही. आता सांगायला नको पण होतना करू काय मी ? आणी या लोकांना त्रास होतो मग. तेव्हा सगळं ववस्तीत करायचा, वागणं कस ववस्तीत पाहिजे, राजेशाही, सगळं राजेशाही . तुमच्या आईच कस वागणं आहे दहादा म्हणाल तेव्हा कोणत्या गोष्टीला आपण मान्य करतो, बरं बुवा, साठ वर्षाचे झालो बरं कबुल, साठ वर्षासाठी काय करायचा ते करा आता याचा पुढे नाही. खादीची साडी, तसं राजेशाही असायला पाहिजे माणसाने. द्यायच्या वेळेला बरोबर आहे पण घायच्या वेळी राजेशाही असायला पाहिजे. त्या मुळे यावेळेला असे घोटाळे करायचे नाही, तसे जर कोणी केले तर बरोबर समोर आणायचे. सहयोगात वाढायचे आहेना तुम्हाला ? यानी काय मिळणार आहे? एकवेळेला जेवायला मिळालेनाही तर काय फायदा आहे? आश्या लहान लहान गोष्टी मध्ये मला घालायचे नाही. मोट्ठी माणसं दिसली पाहिजे सगळीकडे. सगळयांचा मान करायचा, येणारे सहजयोगी त्यांना कोठे यायचे असेल फिरवायचे असेल ते सर्व करायचे. पण फुकटखोरी करायची नाही. हे केव्हा ११,१४, १५, १६? १४, १५, १६ ला ये लोग सब बहारसे आरहेहै, मेहमान नावाझी करिये येनाहीकी आपही मेहमान बन जायीये उसका सब बोझा मुझपरही पडता है. इसलीयए उनकी मेहमान नावाझी करिये चार जागह घुमइये माझा आयेगा आपको संत साधू आरहे है बाहर से आपके देशमे उनका थोडासा करनेमें क्या है? ये तो हम लोगो को खास देनेकी, हम लोग बहोत हॉस्पिटेबल लोग है, माझा आता है हमको, सबका कारनेमें अच्छा आनंद आता है वो करना चाहिये, एक माजेकी चीझ है. जिस दिन संत साधू आपके घर आते है वोही दिवाली है उनके लिये कुछ बनाके ले आए। लेडिझको चाहिये आज हम माँ कुछ बनाके लाये उनको खिलायेंगे, उनका भी मन लागेग। बजाय इसके सब खानदान फॅमिली सब लोग ऊसदिन स्पेशल बस करके आयेंगे के भाई अब तो आगये है, अब माँ के यहाँ खाना खायेंगे। दो तरह के लोग होते है मैने देखा है, बडा प्रॉब्लेम हो जाता है।

ऐसेभी लोग मैने देखे है की फल की टोकरी ले आए माँ आप देखो तुम यहाँ आये हो तुम तो खाते नाही फल, पर ये लोग आये है, ईन को कहा से फिर तुम्हीको खर्चा करेगा, माँ हम फल लाये। उसको कुछ लागता नाही है लेकिन दिखता कितना सुंदर है कि उनके यहाँ से ये चीझ बन के आई है। आता एवढ्या करंज्या-बिरंज्या तुम्ही करता घेऊन या, काय मजा येईल. संत साधूंसाठी करंज्या करून आणायच्या. काय? काय करायचे ते आताच ठरवून घ्या. प्रत्येक दिवशी एकएकनि काही तरी करून आणायच. काय माणसं आहेत ? शंभर माणस आहेत त्यांना जरी एकएक जरी करंजी घातली तरी पुष्कळ झाल. आपण कसे दिवाळीला करतो सकाळी काहीतरी फराळाला, तसे काही तरी फराळाचं करून आणायच. बाजाराचं आणून त्यांना काय घालायचे ? तुम्ही ईथे इतके असताना त्यांना बाजारातून आणून काय घालायचे ? त्याच्या उलट ती मंडळी, तिथे गेले की रोजचा काहीतरी

प्रोग्रॅम आहे. आज हे करून आणेल कोणी काय करून आणेल कोणी केक आणेल कोणी काय करून आणेल. तेव्हा मन असायला पाहिजे, फक्त मन असलं की तुम्ही बायकांना सगळं येतं. काही काही नवीन नवीन प्रकार असे त्यांच्या करता आणले पाहिजे. काही त्यांचं काही जाणार नाहीये त्यांनी पैसे दिलेले आहे खाणपिण्याचे काहीच प्रॉब्लेम नाही, त्याचा प्रॉब्लेम नाही. काही उपाशी काही मारणार नाही. पण तुमचे प्रेम तुम्ही दाखवणार कसे? तर बायकांनी ही आपल्यावर जवाबदारी घ्यायची की आले तर आम्ही काही गोड-थोडं करून आणू नाही तर दोनच बायका राबत असतील सकाळ पासन संध्याकाळ पर्यन्त तसं नको प्रत्येकीने सांगायचे की मी आज हे करून आणेन हं माताजी। झाल चारपाच जणी मिळून केले तरी काय लागतं ? कधी एकाने गोडधोड केल, वाटून घायचे, चार किंवा पाच, किती तीन दिवस? तुमच्या मुंबईला फक्त तीन दिवस ही मंडळी राहणार आहे । तीन दिवसाचा पाहुणचार आपण चांगला केला पाहिजे की नाही? काय काय प्रोग्रॅम करायचे कसे काय ? चांगले धडकून प्रोग्रॅम करायचे, तीन दिवस चांगली दिवाळी करून टाकायची आपली, जीवाची दिवाळी. मग काही जड वाटत नाही.

काय कस अरेंज करायचं काय करायचं, आता मला असं वाटतं या वेळेला बायकांना करूद्या त्या चांगलं करतील तुमच्या पेक्षा. काय हो सढळ हातानी थोडसं करायला पाहिजे त्याला काही पैसे लागत नाही मन पाहिजे. मग पुढे १४ तारखेपर्यंत तीन दिवस राहणार ती मंडळी मग पुढे कोठे जाणार ? वैतारणाला. मग वैतरणाला सुद्धा ज्या मंडळींना यायचे त्यांनी यावं पण स्वतःची व्यवस्था करावी. तुमचा खाण्या-पिण्याचा बोजा त्या लोकांवर नको, कळलंका? पुढे वैतरणाच्या पुढे ? नाशिक, नाशकाला ज्यांना यायचे असेल त्यांनी यावे पण स्वतःची व्यवस्था करून सगळ्यांनी यावं. सगळ्या समागामात महिनाभरात आपण सर्व ट्रिप करू शकतो सहल करू शकतो पण व्यवस्था स्वतःची पाहिजे. दहा मंडळींना यायचे आले तर स्वतःची आपली बस करा, टेम्पो करा काय करायचे ते करा त्याचानी तुम्ही निघा. काय हरकत आहे ? तुम्ही करू शकता. माताजीं बरोबर आम्ही निघालो आहे आम्ही एक महिन्या करता आम्ही जाणार. तुम्ही आपली व्यवस्था करायची, राहण्याची व्यवस्था तुम्ही करायची, त्याचा बोजा माझ्यावर चालायचा नाही. एवढं जर तुम्ही केलं तर किती बरं दिसेल बरं, असं कोल्हापूरला मागच्या वेळेला केलं होतं लोकांनी आणि वावस्था अगदी उत्तम होती मला अगदी त्रास झाला नाही तसं करायला पाहिजे. पुढे नाशकाच्या पुढे कोठे? मग धुळ्याला जाणार आहे. असं तुम्ही सगळं तुम्ही सर्व ते हे काढूनघ्या आणि काय तुम्हाला करायचे नाही ते ठरवून घ्या. आता प्रत्येक ठिकाणी व्यवस्थापक कोण आहे ते मोदी तुम्ही लिहून द्या सगळयांना. तुम्ही त्यांना पत्र लिहा आम्ही येतो पण आमची व्यवस्था करू नका. नाही तर ते तुमच्याच व्यवस्थेला लागणार.

अश्या रितीनी ग्रुपने जरी म्हटले तर जाऊ शकता, फॅमिली वाइस जाऊ शकता नसलं तर इंडिविडूअली सुद्धा जाऊ शकता. पण सगळ्यांनी मिळून काहीतरी ठरवुन घ्या व्यवस्थित आणि एक महिन्याची चांगली मजा आहे, पुढल्या महिन्यात सुद्धा पुन्हा आम्ही जाणार. ज्यांना या महिन्यात जमेल त्यांनी या महिन्यात यावं, ज्यांना पुढल्या महिन्यात जमेल त्यांनी पुढल्या महिन्यात याव. एकंदर अनुभव फार जबरदस्त असतो त्यामुळे इतक्या लांबून ही मंडळी खर्च करून येतात. तेव्हा तुम्ही ईथे गावात राहूनही जायचे नाही म्हणजे बरोबर नाही. तेव्हा ज्यांना जी सुट्टी मिळेल ज्यांना जे जाता येईल त्यांनी जावं पण स्वतःची व्यवस्था स्वतः करून घावी एव्हढच फक्त आहे. आणि काय मुश्किल आहे महाराष्ट्रीयन लोकांना तरी सगळीकडे व्यवस्था असते कोणीतरी नातलग असतात, नसलं तर निदान कोठे तरी राहता येत त्यांना. पण नातलग असले तर बरं तेवढंच मंडळी आणखीन तुम्ही सहजयोगात आणणार. तुमचे नातेवाईक कोणी असले तिथे जाऊन राहिले तर आम्ही माताजींकरता आलेलो आहोत. चला त्यांनाही घेऊन या ती मंडळी सुद्धा सहजयोगात येणार, एक कारण होऊन जातं. बरं पुढे ? मग आता काय करायचं ? सगळा प्रोग्रॅम चॉकआऊट झाला आहे तो काही बदलता येत नाही. तरी कोणी मध्ये मध्ये आम्हाला हे सूट नाही होत वैगैरे वैगैरेअश्या गोष्टी बोलायच्या नाही. सूट करून घ्यायचं, जर तुमची इच्छा असेल तर सर्व काही होईल व्यवस्तीत. आम्हाला हे जमत नाही या वेळेला हे करू शकत नाही आणि हा हॉल बदलू शकत नाही वैगैरे वैगैरे काही करायचे नाही व्यवस्तीत सगळयांनी अगदी पूर्ण मनानी, पूर्ण आनंदानी सगळी व्यवस्था केली पाहिजे. हे आम्हाला जमत नाही वैगैरे वैगैरे म्हणायचे नाही. तुम्ही जे म्हणेल ते मी सर्व करायला तयार आहे. तुम्ही म्हणाले की एकवीसला हा हॉल घेतला मी तयार आहे, अमुक झाले ते तयार आहे. पण तुम्ही पण थोडसं दाखवलं पाहिजे, प्रत्येक ठिकाणी हे सुरु झालं तर मोठा त्रास होतो. आता काय पॉईंट्स आहे? बरं प्रोग्रॅम्स चॉकआऊट झालेले आहेत। त्याच्या कॉपीज घ्या आणि लक्ष ठेवायचे माताजी कोठे गेल्या आज कोठे सगळ्यांनी ठेवायला पाहिजे कॉपी आणि आज माताजी ईथे आहे, ध्यान लावायचे त्या ठिकाणी. बघा, सगळ्यांनी प्रोग्रॅमच्या कॉपीज घ्यायच्या. आता आपल्याला पुष्कळ जागा मिळणार आहे, जमिनी मिळणार आहे सर्व काही होणार आहे.

पण आपल्या कडे सामूहिकता कमी आहे, हिच्या मूळे काम नाही होत. जिनोवा ला आपल्याला मोठ्ठा पॅलेस आपल्याला मिळाला आश्रमाला. अगदी मोठ्ठा पॅलेस आहे तिच्यात सगळं फ्रर्निचर पॅलेसच सगळं काही मिळाले. सगळीकडे मिळतं आपल्याकडे का मिळत नाही ? लक्ष एव्हढच आहे की सामूहिकता नाही. इनमीन चार माणसांनी सगळी मेहनत करायची बाकीं आपण काही करायचे नाही. आपण फक्त माझं हे दुखलं, मला हार्ट एटॅक आला, ते ठीक कर, ते ठीक कर पण मदत करायच्या वेळेला झीरो. मदत करायच्या वेळेला आम्ही एकदा दिलं आता नाही असे नाही करायचं. सगळ्यांनी आपले सगळं पूर्ण लक्ष्य सहजयोगा कडे द्यायला पाहिजे की आम्ही याच्या साठी काय करू शकतो ? कशी मदत करू शकतो ? तुम्हाला काही कोणी म्हणत नाही की पैसे पाहिजे किंवा काही, पण मन पाहिजे. मन हे पाहिजे, मना शिवाय नाही होणार. आता ज्या लोकांना आता याच्या मध्ये कार्य कराचे आहे त्यांनी नाव द्यावेत मोदींच्या कडे. ती मंडळी जीन लोगोको थोडे दिन के लिये जो तीन दिन के लिए आने वाले है उनको अपना अपना समय दे दे, अपना टाइम दे दे और जो कुछ काम होगा बता दिजीए हम कर देंगे। कुछ नही है बाजार से कुछ लाना है कुछ करना है सब लोग अपनी तरफ से पुरी तैयारी करेंगे । अब जैसे की आपने देश में, जैसे की अपना घर हि है भारत भूमी, अपने घरमें मेहमान आने वाले है और अपने बहुत हि प्यारे अपने बहुत हि निजके अपनेही कोई भाईबंद दुनिया भर से आरहे है। फिर उनके प्रति एक ऐसे विचार होना चाहिये बहोत ख़ुशी है । बाकी तो सब आते है, किसी ना किसी मतलब से आते है, ये तो परमात्मा के मतलब से आरआहे है और हम परमात्मा के आदमी है तो कितनि बडी बात है । ऐसे विचार से सबकी और देखे, बडा आनंद आयेगा । चला आता सगळ्यांना व्यवस्थित? आणि आता काही भांडाभांडी करायची नाही कोणत्या गोष्टीसाठी नाही तर तुम्ही माझ्या भावाला दिलं, माझ्या बायकोला नाही दिलं असे प्रकार नको ऐकायला. जस लग्नात होतना तशा रुसवा-रुसवी वैगरे प्रकार मला बघायचे नाही. ते शोभतही नाही पण हे कॉमन आहे. बरं आता कोण तुमचे व्यवस्थापक लोक आहे वेगळ्या वेगळ्या हेच्यातले त्यांनी मला येऊन भेटावं, प्रत्येक सेंटर चे तुम्ही बोलवून घ्या ईकडे. नाशकातले कोणी असतील तर, धुळ्याचे या, राहुरीचे, पुण्याचे, कोल्हापूरचे, आणि ते हे आपले पाटील, राजा पाटील, आपले पंढरपूरला, सोलापूरला ,दामले असतील कोण आणखीन या ईकडे या मंडळी आणि त्या ह्याला बोलवा मेहतांनीला एक मिनिट त्याला बोलवा या या या। Hello when did you come Warren? Very good nice to see you May God Bless You. या या, कारण ही मंडळी जाणार आहे, तेव्हा यांच्याशी बोलुन घ्या। काय असेल नसेल, काय प्रश्न असतील तुमचे तर सांगा, सगळ्यांना वाटून द्या।

Bharatiya Vidya Bhavan, Mumbai (India)

Loading map...