Public Program

Public Program 1990-12-13

Location
Talk duration
77'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

13 डिसेंबर 1990

Public Program

Sangamner (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

सत्याला शोधणाऱ्या सर्व साधकांना आमचा नमस्कार . सत्या बद्दल सांगायचं म्हणजे सत्य आहे तिथे आहे . ते आपण बदलू शकत नाही आणि त्याला आकार देऊ शकत नाही . जे लोक सत्याला न शोधता अनेक कार्य करतात त्या कार्यं मध्ये अनेक दोष असतात . सत्याला जाणण्या साठी मानव चेतना अपुरी आहे . आणि म्हणूनच ह्या मानव चेतनेच्या पलीकडे ह्या मानवी बुध्दीचे प्रांगण ओलांडून आपल्याला नव्या प्रांगणात उतरले पाहिजे . ते उतरल्या शिवाय आपल्या मध्ये नीरक्षीर विवेक येऊ शकत नाही . केवळ सत्य मिळू शकत नाही . आज काल नवीन नवीन गोष्टी लोकांनी सुरु केल्या आहेत . काहीतरी नवीन टुम काढायची आणि तरुण मुलांची दिशाभूल करून त्यांना आरडाओरडा करायला लावायचा ,त्यांच्या बुध्दीवर झापड घालायची असे अनेक प्रकार मी बघते आहे . आमच्या सहजयोगा मध्ये हि जी फॉरेन ची मंडळी अली आहेत हि फार विद्वान,शिकलेली ,फार उच्च शिक्षणानी अलंकृत अशी आहेत . आणि यांच्याही देशामध्ये पुष्कळशा अशा गोष्टी होत्या ज्यानी ते भांबावून गेले होते . आणि त्यांना समजत नव्हतं कि ह्या सर्व गोष्टी आपल्या देशामध्ये का होतात . सगळे सुशीक्षीत असताना इतकं तिथे विज्ञानाचं स्वरूप पसरलेलं असताना सुध्दा अत्यंत आश्चर्याची गोष्ट होती कि अमेरिके सारख्या देशामध्ये सुध्दा भूतविद्या आहेत ,अनेक विद्या आहेत ,आणि त्यांना स्वातंत्र्य असल्या मुळे वाट्टेल त्या प्रकारचे ते लोक कार्य करतात . तसच विज्ञान सुध्दा हा एकांगी विषय आहे . ज्या देशा मध्ये विज्ञान वाढलेल आहे ,आपल्याला माहित आहे कि मी सर्व देशां मध्ये फिरलेली आहे आणि बरीच वर्ष मी परदेशात घालवली आहेत .

आणि माझ्या एकंदर तिथल्या परीस्तीतीला बघून अशा कल्पना झाल्या आहेत कि नुसतं विज्ञान करून मनुष्याची सर्वांगीण उन्नती होऊ शकत नाही . आणि म्हणूनच हे लोक आता रसातळाला चालले आहेत . त्या देशांना तुम्ही बाहेरून बघता कुपमंडूका सारखं जस आपल्याला दुसऱ्या देशानं बद्दल काही माहिती नाही . आता परवा एक डॉक्टर माझ्याशी वाद घालायला आले . मला आश्चर्य वाटल कि हे डॉक्टर असून पण यांचं ज्ञान किती अपुरं आहे इथे हिंदुस्थानात . अजून किती प्रगल्भ झालाय हे ज्ञान ,कुंडलिनीच नाव सुध्दा आता आपल्या मेडिकल शास्त्रात येऊ लागल पण यांना त्याची जाणीवच नाही आणि माहितीच नाही ,ते माझ्याशी वाद घालायला आले होते . आणि मेडिकल मध्ये सुध्दा त्यांचं ज्ञान किती अपुरं आहे ,कोणत्याही विषयावर त्यानं च ज्ञान किती अपुरं आहे हे पाहून मला इतकं आश्चर्य वाटलं आणि त्यावर ते माझ्याशी वाद घालायला आल्यावर मी त्यांना नमस्कार केला म्हंटल आपली बुद्धी म्हणजे अजून थोडी प्रगल्भ व्हायला पाहिजे . तेव्हा अशा कोत्या वृत्तीने आजकाल बऱ्याचशा टुम निघालेल्या आहेत .

आता अंधश्रद्धे वरती मला असं म्हणायचं आहे कि जो पर्यंत तुम्हाला डोळस श्रद्धा येत नाही तो पर्यंत ती अंधश्रद्धा आहे हे जाणूच शकणार नाही ,समजूच शकणार नाही . त्यात मुलांची दिशाभूल करू नका . नुसता मुलांना आरडाओरडा करायला ,इतकच नव्हे तर दगड देतात मारायला त्यांच्या हातात . वाट्टेल तशा जुलमाच्या गोष्टी शिकवतात ,त्यातून संमोहना सारख्या गोष्टी हे लोक शिकवत आहेत . हि किती हानिकारक गोष्ट आहे याची जाणीव सुध्दा या लोकांना नाही . कारण आज हे सायन्स कुठल्या कुठे पोहोचलं आहे ,मानसशास्त्र कुठल्या कुठे पोहोचलं आहे ,आणि युंग सारख्या फार मोठया एका मानस शास्त्रातन्याने यावर केव्हडा आक्षेप घेतला आहे . काही वाचन नाही काही नाही,काही नाही कुणीतरी उठायचं टुम काढायची ,मंच काढायचं आणि लागले लोक त्याच्या मागे . आता आपल्या अंधश्रद्धेला मी आज मुद्दाम हुन त्याच्यावर बोलणार आहे . कारण महाराष्ट्रात एक विचित्र गोष्ट सुरु झाली आहे ,अंधश्रद्धा जी आहे ती आपण श्रद्धेचं विश्लेषण जर केलं तर असं म्हणू शकू कि तीन तऱ्हेच्या किंवा चार तऱ्हेच्या माझ्या मते श्रध्दा आहेत .

एक श्रध्दा जी आंधळी जी तामसिक ,जी भूताखेतांचा उपयोग करून लोकांना त्रास देण्याचा किंवा खोट सांगण्याचा एक विचार आणि त्यात साधेभोळे लोक फसतात . हिला आपण असं म्हणू शकतो कि एक धर्म भोळे पणा कुठे कोणीही बसायचं ,एक दगड ठेवायचा त्यावर शेंदूर फासायचा आणि म्हणायचं हा देव आहे . धर्मभोळे पणा म्हणजे आपल्याला लहान पणा पासून शिकवलेलं आहे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत नमस्कार करायचा , त्यामुळे प्रत्येक गोष्टीला मानतो आपण . पण संतांना हि डोळस श्रध्दा आहे . संतांनी हे कार्य हजारो वर्षा पासून केलं आहे . त्यांना हा अधिकार आहे .

दुसरी श्रध्दा आहे तिला म्हणूया कि राजस श्रध्दा . हि श्रध्दा लोकांना ,आता आपले राजकारणी लोक आहेत ते जातात तर एखाद्या तांत्रिकाला पैसे द्यायचे कि तू ह्याला पाड तू त्याला पाड कारण आपल्याकडे महाराष्ट्रात एक विशेष टुम आहे म्हणायचं काय कि आपल्याकडे शापच आहे भाऊबंदकीचा . तांत्रिका कडे जायचं तू त्याच्यावर काहीतरी कर मारण ,चाटण ,करणी वैगेरे अनेक प्रकार प्रेत विध्येचे ,स्म्शान विद्येचे आहेत . आणि त्याला पैसे द्यायचे . हि राजस विद्या झाली .

आणि तिसरी जी विद्या झाली ती सात्विक विद्या ,हि सात्विक जी श्रध्दा आहे ती कुठून माणसाला मिळते . आता आपला जसा एखाद्या लोकमान्य टिळकांवर आपला विश्वास आहे ,शिवाजी महाराजांवर आपला विश्वास आहे ,अकबरावर आपला विश्वास आहे ,तो का ?तो काही अंध नाही पण का विश्वास आहे . कारण त्यांचं चारित्र्य किती उच्च होत आणि त्यांनी किती मोठी कार्य केली . महात्मा गांधींनी किती मोठी कार्य केली ,लालबहाद्दुर शास्त्रींनी किती मोठी कार्य केली . त्यांच्या बद्दल जी आपल्याला श्रध्दा आहे ती सात्विक श्रध्दा आहे कारण त्यांनी मोठ कार्य केलं . हि श्रध्दा जगातून नष्ट झाली तर तुम्ही कोणतंही चांगल कार्य केल तरी त्याची मान्यता होणार नाही . आणि ह्या बाबतीत मी म्हणेन कि परदेशामध्ये पुष्कळ ज्ञान आहे . आता माझे यजमान एक हिंदुस्थानी आहेत आणि त्यांना परदेशामध्ये निवडून दिल १३४ देशांनी ,ते सेक्रेटरी जनरल होते इंटर नॅशनल मरिनटाईम ऑर्गनायझेशन चे ,निवडून दिल्यावर ३१ देशांनी त्यांना फार मोठ मोठयाल्या पदव्या दिल्या पण त्यात मुख्य म्हणजे लंडन च्या राणीने त्यांना सर्वोच्च अशी नाईट हूड ची पदवी दिली ,हि पदवी कोणत्याही हिंदुस्थानी माणसाला मिळालेली नाही आणि कोणत्याही लंडन मध्ये न राहणाऱ्या माणसाला मिळालेली नाही फक्त एक रेगन ला मिळाली आहे . अशी हि सर्वोच्च पदवी आमचे यजमान एक हिंदुस्थानी होते तरी त्यांना त्याच्या कामगिरी बद्दल मिळाली ,त्यांची मान्यता केली ,हि मान्यता हि सात्विक मान्यता आहे . कोणीही कामगिरी केली कि त्याची मान्यता करणे हि सात्विक श्रध्दा आहे . जर हि श्रध्दा जगातून उठली तर कोणीही जगात चागलं काम करणार नाही . संतांवर आपली श्रध्दा आहे ,का ?कारण त्यांनी फार मोठ कार्य केलं ,निस्वार्थ पणाने ,आजच्या या स्वार्थी जगात कुणाला हाही विश्वास वाटत नाही कि कुणी निस्वार्थ पणाने चांगल काम करेल . हा हि विश्वास वाटत नाही कारण इतके लोक स्वार्थी झाले आहेत . लोकांचा इतका उपयोग करून घेतात ,लहान लहान मुलांचा सुध्दा इतका उपयोग करून घेतात ,मुलांना इतकी भुरळ घालतात आणि त्यांना वाम मार्गाला लावतात तेव्हा अशा स्तिती मध्ये कोणताही मनुष्य निस्वार्थ काम करू शकतो असा विश्वासच वाटत नाही . हे कलियुगाचा वैशिष्ट्य आहे . पण तरी सुध्दा जर कोणी मोठ कार्य केलं आता महात्मा फुले होते त्यांनी एव्हडं मोठ सामाजिक कार्य केलं त्या कार्या बद्दल आपल्याला किती श्रध्दा आहे . जर हि श्रध्दा आपण बाळगली नाही तर कोणाचंही महान कार्य जगात होऊ शकत नाही . हि सात्विक श्रध्दा जी आपल्या देशात आहे ती आहे संतांच्या बद्दल कारण संतांनी फार मोठ कार्य केलं होत . कारण संतांच कार्य समजून घेतलं पाहिजे . ज्ञानेश्वरांना उठून वाट्टेल त्या उपटसुम्भाने वाट्टेल ते म्हणावं ,अहो त्यांच्या सारख्या दोन ओळी तरी तुम्ही लिहू शकता का . त्यांचं काय ते लिहिणं आहे . ते त्यांनीच जाणावं ,"जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे ". ज्यांना आत्मसाक्षात्काराच झाला नाही त्यांच्या डोक्यात अजून तो प्रकाशच आलेला नाही अशा माणसांना ज्ञानेश्वरांची किंमत कळणार नाही . अशा माणसांना तुकारामांचं महत्व कळणार नाही . ते जाणलं कुणी तर शिवाजी महाराजांनी कारण ते स्वतः आत्मसाक्षात्कारी होते .

एव्हडे मोठे शिवाजी महाराज आणि अशा एका तुकारामाच्या घरी आले आणि त्यांना त्यांनी पैसे देऊ केले ,त्यांना त्यांनी दागिने वैगेरे दिले पण ते सगळं त्यांनी परत करून दिल . आणि त्यांच्या कविता त्यांचे जे अभंग आहेत ,ते किती सामाजिक होते त्याच्यात समाजाचा किती विचार होता हे लक्षात घ्यायला पाहिजे . त्यांच्या सारख्या कविता करणारा आजकाल कोणी नाही . कुसुमाग्रजांना मी मानते ,त्यांनी फार सुंदर कविता लिहिल्या आहेत ,त्यांनी सुध्दा समाजाकडे लक्ष दिलेलं आहे ,समाजाची दुरावस्था पाहिलेली आहे . त्याला उद्देशून लिहिलेलं आहे . तेव्हा एकनाथान सारखं आपण जर बघितलं तर त्यानी एका महाराच्या घरी जाऊन जेवले आणि महारवाडीत केव्हड कार्य केलं . त्यावेळेला ते एक ब्राम्हण असताना महाराच्या घरी जाऊन जेवले म्हणजे काय . जातपात ,अंधश्रद्धा यावर कसून त्यांनी टीका केली आणि त्यांना तो अधिकार होता . कारण त्यांची डोळस श्रध्दा आहे . आत्मसाक्षात्कारी माणसाची श्रध्दा हि डोळस श्रध्दा आहे . पण आश्चर्याची गोष्ट आहे जेव्हा आम्ही सहजयोग सुरु केला तेव्हा पुष्कळ असे अंधश्रध्दा वाले आमच्या कडे आले ,या गुरुची श्रध्दा ,त्या गुरुची श्रध्दा अशे तसे बरेच लोक आले ,पण हातात प्रकाश आल्या बरोबर ते पहिल्या बरोबरच त्यांच्या लक्षात आल कि हे सगळं खोट आहे . म्हणजे असं आहे कि तुम्ही जर एका हातात जर साप धरला आणि अंधार असला डोळे मिटलेले असले आणि तुम्ही विचार केला कि हा दोरखंड आहे साप नाही तर कोणीही तुम्हाला समजाऊ शकत नाही ,हट्टी माणसाला कोण समजावणार . जो डोळ्यावर पट्टी बांधून आंधळा झाला आहे त्याला कोण समजावणार . पण जर का त्याच्या समोर प्रकाश आला आणि प्रकाशात त्यांनी जर पाहिलं कि हा साप आहे तर तो लगेचच त्याला सोडून देणार . जबरदस्ती नको ,जुलूम नको .ओरडायला नको काही नको . आपोआप हे घटीत होत आणि असच आज झालेलं आहे . जिथे जिथे आज सहजयोगी आहेत तिथे मी पाहिलं आहे अंधश्रध्दा समूळ नष्ट झालेली आहे . काही त्यांना सांगावं लागत नाही . त्यांना स्वतः लाच माहित आहे तेच स्वतः चे गुरु झाल्या मुळे त्यांना माहित आहे कि चुकीचं काय आणि बरोबर काय ते . हे नुसते अशे समित्या काढून होणार नाही . त्याच्या साठी अध्यात्माचा पाठिंबा पाहिजे . अशा रितीनी काहीं न काहीतरी टुम काढून मंच काढून मला असं वाटत तरुण मुलांना तरी अशा मार्गाला लावु नये . अर्थात विज्ञानाची फार गरज आहे आणि विज्ञान हे माणसांनी जाणलं पाहिजे . त्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही . त्या बद्दल शंकाच नाही . पण नुसत विज्ञानाने माणसाची प्रगती होत नाही हे तुम्ही जर रशियाला जाऊन पाहिलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल . नुसते वादविवाद करून ,भांडण करून त्यांची प्रगती होऊ शकत नाही . तर प्रगती कशाने होते तर नवीन नवीन शोध लावून होते . तुम्हाला आश्चर्य वाटेल कि सहजयोगा मध्ये आलेल्या बऱ्याच लोकांनी नवीन नवीन शोध लावलेत .आता इथेच एक गृहस्थ बसलेले आहेत ,त्यांच्या जवळ फक्त पाच पाउंड होते लंडन ला त्यांना मी सांगितलं कि तुम्ही हा शोध लावा आणि आज तो फार श्रीमंत माणूस झालेला आहे . तसाच एक इंडिअन माणूस आहे तो म्हणजे ब्रिटिश तुन इंडिअन आहे ,तो आला त्याला मी सांगितलं कि तू स्पायरल याच्या मध्ये लक्ष घाल . आणि अँटीने बनव . आज तो केव्हडा मोठा साईन्टिस्ट झालेला आहे . कारण काय आहे कि थोडं मला पुढच दिसत .

पुढचं सांगितलं आणि तो जर तुम्ही शोध लावला तर पुष्कळ फायदा होऊ शकतो . तसच हिदुस्थाना मध्ये आपल्या दिल्लीला ,दिल्ली युनिव्हर्सिटीने आपल्या तीन डॉक्टारांना एम डी च्या पदव्या दिल्या . आता एम डी ची पदवी देणारे लोक कितीतरी उच्च प्रतीचे आहेत . आपल्या महाराष्ट्रात तरी कुणी डॉक्टर मला असे भेटलेच नाहीत . किती विद्वान असले पाहिजेत ते लोक .ज्यांनी त्यांना एम डी च्या पदव्या दिल्या . आणि त्यांनी मेडिकलच्याच परिमाणा वरून दिल्या . पण आपल्या कडे खोटारडे पणा इतका आहे संबंध मेडिकलची कॉन्फरन्स झाली त्यात सातशे डॉक्टर्स बसले होते त्यांनी तोंडात बोटे घाली कि इतकं खोट लिहिलं कि त्यांनी सांगितलं कि याच परिमाणंच नाही . त्यापेक्षा जरासा विचार करावा कि जर हे आपल्या साठी कल्याणाचे आहे ,त्यांनी जर आपल्याला फायदा होतो ,आपल्या मुलाबाळांना फायदा होतो तर हे का करू नये . याला पैसे लागत नाहीत ,काही लागत नाही ,पण हि ठेकेदारी जी घेतलेली आहे सध्याची त्या ठेकेदारी मध्ये काही सुध्दा गम्य नाही . लोकांची दिशाभूल करण ,त्यांना अशा रस्त्यावर घालण कि जिथून त्यांचा कल्याणाचा मार्ग थांबतो हे महापाप आहे . कुणाच्या कल्याणाच्या मार्गात उभ राहण हे महापाप आहे . जो पर्यंत तुम्ही बाहेरदेशी जात नाही आणि तुम्ही बघत नाही तो पर्यंत तुम्हाला समजणार नाही कि नुसत्या विज्ञानाने काय लोकांचे हाल झालेले आहेत ६५ टक्के लोक आज अमेरिके मध्ये फार वाईट स्तिथीत आहेत .

तरी मी आहेच तिथे ,त्या शिवाय ६५ टक्के लोक घाणेरड्या रोगांनी अडकलेले आहेत . कारण नैतिक मूल्ये हि सर्व संपुष्टात अली आहेत . अध्यत्माकातच फक्त नैतिक मूल्ये आहेत . सायन्स मध्ये नाहीत . सायन्स म्हणजे अगदी म्हणता येईल आपल्याला चिपाडा सारखं रसहीन आहे ,त्याच्या मध्ये कला नाही ,संगीत नाही ,त्याच्या मध्ये कोणताही प्रेमाचा भाव नाही . तेव्हा अध्यतमाचा जो फार मोठा भाग आहे कि तो आपल्याला नीतिमूल्ये शिकवतो . पण सहजयोगाचं अध्यात्म त्याच्या पुढे वाढलेलं आहे . त्याची प्रचिती अशी कि जेव्हा माणूस सहजयोगात येतो तेव्हा त्याची कुंडलिनी जागृत होते . कुंडलिनी जागृत झाल्यामुळे त्याच्या मधला जो धर्म आहे तो जागृत होतो . म्हणजे धर्मा मध्ये जो आपण मूर्ख पणा करतो तो सर्व जाऊन आपण खरोखरच धार्मिक होतो . आता आपण असा विचार केला पाहिजे कि आपण कुणालाही लीडर मानतो ,त्यांच्या गोष्टी ऐकतो त्यांचं चारित्र्य काय आहे म्हणजे ते दारू पितात का? पितात ,त्यांनी बायका ठेवल्यात का ?करतात ,भांडकुदळ आहेत का ?आहेत ,भाऊबंदकी आहे का ?करतात . आणखीन काही सगळे गुण आहेत , जुआ खेळतात सगळे धंदे करतात . मग अशा माणसाला आपण कशाला मान्यता द्यायची ,आपल्याला त्यांच्या सारखं व्हायचं आहे का ?. थोडा काळ ते राहतील त्यानंतर ते नष्ट पावणार . आपल्याला कुणाचं ऐकलं पाहिजे संतांच . ज्यांनी जीवनभर एक अत्यंत सातत्याने जे समाजकार्य केलं ते निस्वार्थ भावनेनी आणि इतक्या उच्च दशेला ते असताना सुध्दा ते त्यातून उतरून लोकांच्या आनंदा साठी ते झटले . त्यांनी एव्हडी मेहनत घेतली ,त्यांना लोकांनी छळल ,मारल ,हे झालं ते झालं . तेव्हा समजून घेतलं पाहिजे . आज सत्य तुमच्या समोर उभ राहणार आहे ,कुंडलिनीच्या जागरणाने तुम्हाला सत्य मिळत म्हणजे एक कि तुम्हाला आत्मसाक्षात्कार घटीत होतो आणि दुसर म्हणजे चरा चरा मध्ये पसरलेली हि शक्ती ,हिला आपण परम चैतन्य म्हणू ती शक्ती तुम्हाला मिळते . त्या शक्ती मुळे तुम्ही अनेक कार्य करू शकता . त्यांनी कृषी विभागाला फायदा होतो ,तुमच्या पशुपालना मध्ये फायदा होतो ,तुमच्या प्रकृतीत फरक पडतो ,आणि तुम्हाला मनस्वास्थ्य ,शांती आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अध्यात्मिक शक्ती मिळते .

आता हे लोक गणपतीचा ग जाणत नव्हते . अहो एक मराठीचा एक शब्द शिकणं यांना कठीण ,यांची जीभच वळत नसे पण हे लोक किती सुंदर गाण म्हणतात ते पाहिलं आपण ,किती समजून म्हणतात ,हिंदी ,मराठी तसच त्यांना उर्दू मध्ये हे कव्वाली वैगेरे म्हणतात . हे कस शक्य आहे आणि किती थोड्या काळात . काही लोक तर वर्ष भरा पूर्वीच सहजयोगात आलेले आहेत . हे कस झाल ?एकदम उन्नती कशी झाली ?आणि आपलीही तशी उन्नती का करून घेऊ नये . म्हणजे हा निव्वळ मूर्खपणा आहे . कि आपण आपली उन्नती करायची नाही ,कुना एका गुरूला चिकटायचं ,कोणच्या समितीत तरी जायचं ,कुठे तरी कायतरी धंदा करायचा आणि असा आपला वेळ फालतू घालवायचा . आमचे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव होते . आणि शास्त्रीजी मला मजा सांगत असत कि आज काल इतक्या टूम निघाल्या आहेत कि इतके व्यवहार निघाले आहेत ,कि आजकाल म्हणे असं आहे कि दिल्ली शहरा मध्ये अशा बऱ्याच संस्था आहेत कि जिथे तुम्हाला जितके वाटतील तितके लोक ते सभा उधळायला आणू शकतात . त्यांना काही ज्ञान नसत लहान लहान मुल असतील कॉलेजची बिलेजची धरायची . आणि ती मुल येतात . तर म्हणे एकदा मी, ते आमच्या चौकात येऊन उभे राहायचे ,म्हणजे सगळा नुसता मूर्खपणा आहे , त्यांचाशी काही बोलण्यात अर्थ नाही, पण तरी मी गेलो . ते आले उभे राहिले आणि त्यांनी खूप जोरजोराने अगदी ओरडायला सुरवात केली . तर मी म्हंटल अरे तुम्ही कोणाच्या टोप्या घातल्या आहेत ते तरी बघा ,आणि तुम्ही कोणचे कार्ड्स धरलेत ते तरी बघा . हे तर अपोजिट पार्टीचे आहेत . अरेरे चुकल आमचं आणि परत गेले आणि बदलून आले संध्याकाळी . मग त्याला काही अर्थ आहे ,कोरे लोक आहेत ,काही अक्कल आहे का त्यांना . आज यांच्या बरोबर उभे राहिले ,उद्या त्यांच्या बरोबर उभे राहिले .पैसे कमवण्याचे धंदे सगळे आणि प्रसिध्दी कमावण्याचे धंदे असले . त्याला पहिल्यांदा अध्ययन पाहिजे व्यासंग पाहिजे समजल पाहिजे . ह्या देशामध्ये संतांनी जे कार्य केलय ते सगळ्यात मुख्य म्हणजे अस आहे कि बुध्दीला फार प्रगल्भ केलेलं आहे .

जो माणूस संतांच्या मार्गाने गेला मी बघते तो इतका प्रगल्भ होतो . परवा मी बैलगाडीत बसले होते हे लोक कुठे घेऊन चालले होते मला खेडेगावात . आणि त्या बैलगाडी चालवणाऱ्या माणसाशी मी बोलू लागले तर मला एव्हडं आश्चर्य वाटल कि त्याला अध्यात्म इतका कसा माहित ,अरे म्हंटल बाबा तू इतकं कुठ शिकलास ?काही नाही म्हणे माझ्या आईने शिकवल सगळं . असं का ,अरे तू कबीरदासा सारखा बोलतोयस . हो म्हणे मी ह्या सगळ्या कविता करतो आई . आश्चर्य चकित झाले कि एक बैलगाडी चालवणारा माणूस त्याची एव्हडी प्रगल्भता कशी . पण म्हंटल तू कविता कशी करू लागला ?सहजयोगात आल्या पासून मी ह्या कविता करू लागलो . हे ज्ञान आलं कुठून ? समजत नाही कुठून येत . आईने मला सांगितलेलं आहेच पण त्यावर हे विशेष मला आलं आहे ते सहजयोगा मुळे . तसच सहजयोगा मुळे मोठमोठाले आर्टिस्ट जे आज फिरत आहेत त्यांनी सुध्दा सहजयोग केला ,पुष्कळशा मुसलमान आर्टिस्ट नि पण सहजयोग घेतला आहे . आपल्याला माहित नाही यांनी मनुष्य किती प्रगल्भ होतो .

आता एक आमचे नात्यातले गृहस्थ आहेत ते सी ए होते . त्यांना म्हणजे मराठी भाषा नीट येत नसे इंग्लिश चांगलं यायचं पण मराठी भाषेचं काही ज्ञान नव्हतं . आणि आता ते ज्यांना मराठी येत नव्हतं ते आता कविता करू लागलेत . इतकाच नाही तर हिंदीत ,उर्दूत . काय कविता लिहायला लागलेत . आता ह्यच्यातल्या काही कविता या लोकांनी बनवल्या आहेत स्वतः . आपण इंग्लिश च एकही गाण म्हणू शकत नाही . तर हि प्रगल्भता कुठून अली ? . यांनी सहजयोगा मध्ये जी मजल गाठली आहे त्याला कारण म्हणजे सत्य मिळालं ना कि ते पकडायचं ,त्याच्यात उतरायचं ,त्यात मेहनत करायची ,वाचन करायचं आर्ग्युमेंट करत बसले नाही . गहनात उतरायचं म्हणून याना हि शक्ती मिळाली आहे . आज इथे ५६ देशातले लोक तुमच्या समोर बसलेले आहेत निवडक लोक आम्ही बोलावतो . आणि ह्या निवडक लोकांना जर तुम्ही पाहिलत ,यांचं ज्ञान जर तुम्ही पाहिलत तर आश्चर्य वाटेल . ह्यात पुष्कळसे राजदूत पण आहेत ,डॉक्टर्स ,आणि फार शिकलेले विद्वान लोक आहेत . पण ह्यांच्यात आणि आपल्यात हा फरक आहे कि सत्य मिळाल्या वरती सत्याची कास आपण धरत नाही . म्हणजे अंधश्रद्धा असली तर ती पकडून चालू . एखाद्या कोणच्या तरी अशा राजकारणी प्रकारात फसलो असू तर त्याच्यात आपण चालू ,काहींना काहीतरी असे प्रकार असतात . परवा काहीतरी मुल अली होती ,तर म्हणे कि आम्ही अमुक अमुक आहोत ,असं का म्हंटल ,तुमचं धोरण काय ,आता त्यांना प्रश्न पडला ,म्हंटल अहो धोरण काय ? तुम्ही तरुण मुल तुम्हाला यांनी एकत्र गोळा केले आहेत तर तुमचं धोरण काय ?आता म्हणे हे वडील लोक ,मोठे लोक जे सांगतात तेच आम्ही करतो . हे जे मोठे लोक आहेत त्यांचं चारित्र्य काय आहे . आणि तुम्हाला ते सांगतात ते तुम्ही का करता ? . हि अंध श्रद्धा आहे ,हि मुख्य अंधश्रध्दा आहे . जे तुम्हाला सांगतात ते तुम्ही डोळे मिटून का करता ?तेव्हा त्यांचे डोळे उघडले . मी म्हंटल कि तुम्ही या वयात राजकारणात पडू नये ,आणि अशा धंद्यात पडू नये . आपला अभ्यास करा ,नेटाने अभ्यास करा आणि त्याच्यात तुम्ही प्राविण्य मिळवा . तसच तुम्ही जर सहजयोगात आला तर तुमचं अभ्यासात चांगल होईल . तुमची बुध्दी प्रगल्भ होईल . तुम्हाला पुष्कळ लाभेल . सगळेच्या सगळे सहजयोगात आले . आले आणि आज त्या मुलांच काय सांगावं ,मला आश्चर्य वाटत कि हि मुल मुंबईला नुसती बेकार होती . आज ती कुठल्या कुठे पोहोचली आहेत . एकेकाला बघितलं म्हणजे मला आश्चर्य वाटत ,दहा वर्षा मध्ये हि गोष्ट झाली . कि ती मुल आज कुठल्याकुठल्या मोठ्या पदावर आज बसलेली आहेत . तेव्हा आपल्या जीवाचं कल्याण करून घ्यायचं .आपल्या जीवनाला सार्थकी लावलं पाहिजे . कारण हे जीवन देवाने बेकारची काम करण्यासाठी आणि बेकार लोकांच्या पाठीमागे धावण्यासाठी दिलेलं नाही . लागले आपले ओरडायला काय फायदा आहे त्यांनी ?. आज आपल्या देशामध्ये कमकुवत पणा आलाय त्याला कारण असं कि प्राविण्य कशातच नाही . कोणत्याच गोष्टीत प्राविण्य नाही .

जर तुमची इलेक्ट्रिसिटी असली तरी ती अशी बेकार ,जर तुमचं दुसरं काही काम असलं तर ते बेकार . यांत्रिकी ह्याच्यात काही प्राविण्य नाही . कले मध्ये आहे . पण ती कलाही आता मरते आहे . कले कडे लक्षच नाही या लोकांचं . मग आता राहणार काय आपल्यामध्ये ,एक अध्यात्म पण त्याच्यावरही तोडगा लोकांनी काढला आहे ,अध्यात्माला समजलं पाहिजे . अध्यात्म दोन प्रकारचं असत . एक अध्यात्म जो खरा आणि एक अध्यात्म जो खोटा . आणि संतांनी सांगितलेला अध्यात्म हा खरा आहे आणि सगळ्यांनी एकजात सांगितलेलं आहे कि सगळ्यांनी आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे . कुंडलिनी हि आहे हे आपल्या वेदांपासून आपल्या शास्त्रात लिहिलेलं आहे . इतकंच नव्हे तर कुराणात सुध्दा कुंडलिनीच वर्णन असच म्हणून आहे . इतकंच नाही तर महंमद साहेबांनी तर इथपर्यंत सांगितलं कि जेव्हा तुमची उत्क्रांती होईल त्यावेळी तुमचे हात बोलतील . ते तुमच्या विरुद्ध सांगतील ,तुम्हाला सगळं सांगतील . तसच बुध्दानी सांगितलं आहे ,महावीरांनी सांगितलं आहे . पण हे काही वाचायचं नाही ,हे काही जाणायच नाही . काहीतरी आपली टुम काढायची आणि त्यात आपलं आयुष्य घालवायच . म्हणजे तुम्हाला आपली कदर नाही आणि आपला तुम्हाला विचार नाही हे स्पष्ट होत . जर तुम्हाला स्वतः ची जरा जरी कदर असती तर तुम्ही म्हणाला असता माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या . आणि आम्हाला बघुद्या आम्ही कोण आहोत ते . कारण त्या शिवाय तुम्ही सत्य जाणू शकत नाही . हि पायरी ओलांडायला पाहिजे . बुध्दिच्या दमावर तुम्ही जर सत्य जाणलं असत तर संतांनी का सांगितलं असत कि तू स्वतःला ओळखून घे . स्वतःला जाणून घे . मेडिकल मधेच असे पुष्कळसे प्रश्न आहेत कि त्याला काहीही उत्तर नाही . पण सहजयोगानी ते उत्तर शोधून काढल . आता एक साधी गोष्ट कि गणपती आहे किंवा नाही . कस सांगणार मी तुम्हाला . जो पर्यंत तुम्हाला आत्मसाक्षात्कार मिळत नाही ,जो पर्यंत तुम्हाला चैतन्याच सत्य मिळत नाही तो पर्यंत तुमचा कॉप्युटर च सुरु होत नाही . पण एकदा हे झालं कि तुमचं कॉम्प्युटर सारखं सुरु होत आणि कोणाचाही प्रश्न विचारला कि उत्तर तुमच्या हातावर येत जस महंमद साहेबांनी सांगितलं आहे . त्याची जाणीव होते . म्हणजे आजचा आपला जो काळ आलेला आहे हा कलियुगाचा घोर कलियुगाचा ,अज्ञानाचा भयंकर असा काळ आहे . पण जर आपण तिकडे लक्ष दिल नाही ,अध्यात्माकडे लक्ष दिल नाही तर आपली मुल ,हि जी मुल अध्यत्माशिवाय चूक रस्त्यावर गेली होती तशी आपली स्तिती होईल . म्हणजे काय काय होणार आहे ,पहिली गोष्ट म्हणजे मुल आपली दारू पितील ,ड्रग्ज घेतील ,हिप्पी होतील ,रस्त्यावर पडतील . आज हजारो लोकांची अशी आयुष्याची नासाडी झालेली आम्ही पाहिलेली आहे . ते आपल्या देशात झालं जर अध्यात्माचा आपण पाया बसवला नाही तर हे सर्व आपल्या देशात होईल एकानंतर एक . आणि तुमच्या लक्षात हि येणार नाही . कारण विज्ञाना मध्ये कोणत्याही प्रकारचा असा मार्गच नाही आहे कि माणूस आपल्या नीतिमत्तेला उतरेल . पण जे लोक आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यांनी जेव्हा शोध लावले तेव्हा ते नेहमी देवाच्या गोष्टी करत असत . न्यूटन सारख्या माणसाने सांगितलं कि मला देवाकडून सगळं मिळालं आहे ,आईन्स्टाईन सारख्या माणसाने सांगितलं कि कुठून तरी अशा अज्ञात स्थानातून मला थेरी ऑफ रिलेटिव्हिटी मिळाली आहे . पण ज्या लोकांना काहीही विशेष ज्ञान नाही ,एक गृहस्थ माझ्या कडे आले त्यांना अध्यात्म माहित नाही ,सायन्स माहित नाही अगदी तुटपुंज ज्ञान सगळ्या गोष्टींचं ,म्हंटल ह्या माणसाशी बोलायचं तरी काय ?. आणि २५ माणस एकत्र करून घेतली . त्याला मी सांगितलं कि बाबा तुझं किनई डोक थोड कमी आहे, असं कर माझं डोकं खाऊ नकोस .कृपा करून हे टेप घरी घेऊन जा . त्याला मी संबंध माझे टेप ,हवं तर टेपरेकॉर्डर पण घेऊन जा म्हणून सांगितलं आणि घरी जाऊन तू हे सगळं वाच ,ऐक आणि शिक कि हे काय आहे ,कि पॅरासिम्पाथेटीक नर्वस सिस्टम चा कंट्रोल कुंडलिनीनी येतो हे जर डॉक्टरांना माहित नसत तर ६० डॉक्टर लंडनचे यावर प्रयोग करतील का . प्रयोग करत नाहीत याच नुसत संकलन करत आहेत आणि ४०० डॉक्टर रशियाला हा मार्ग अवलंबतील का ?. पण ते प्रश्न विचारात नाहीत त्यांना कळत कि अजून आमचं ज्ञान अपूर्ण आहे . ते प्रश्न न विचारता त्यात उतरून शिकतात कारण त्यांना आपल्या आयुष्या बद्दल ,जीवना बद्दल कदर आहे . आता त्यांनी हिप्पीजम सुरु केलं त्यात वाहवून गेले ,ड्रग्ज सुरु केलं त्यात वाहवून गेले . त्यामुळे आता त्यांना अक्कल अली आहे . कि असं काहीतरी टुम निघालीकी त्याच्या पाठीमागे धावायचं नाही . जे काही महत्वाच मौल्यवान आहे तिकडे बघितलं पाहिजे . आणि २०० सायंटिस्ट आज मला तिथे म्हणतात कि माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या .

तुम्हाला आश्चर्य वाटेल कि ह्या देशात ह्या महाराष्ट्रात इथे अध्यात्म एव्हडं आहे इथेच असले काही काही उपटसुम्ब निघालेत ,दुसरीकडे कुठंही नाही . दिल्लीला नाही कुठंही नाही ,तिथे लोकां मध्ये आतंक आहे मारामाऱ्या आहेत ,जास्त म्हणजे भांडण आहेत सगळं काही आहे . पण असला प्रकार कुठेही नाही . हा प्रकार इथेच . काहीतरी नवीन टुम काढायची आणि लागायचं मागे . तेव्हा आपण यातला फरक समजून घ्यावा . बुद्धीने जिथं पर्यंत जाता येत ते हे कि आम्ही श्रध्दा ,विश्वास संतांच्या वाणीवर ठेवणार . हे बुद्धीनं जाणलं पाहिजे . बाकी कोणी उपटसुम्भ आला ,जेल मधून सुटला आणि त्याने भगवे वस्त्र घातले तर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे बरोबर नाही .

जात पात हे सगळं कुठून आलं मला माहित नाही . हा आपल्यावरचा शाप आहे . बर आपल्या महाराष्ट्राचा शाप विशेष करून एक आहे तो म्हणजे भाऊबंदकी . तो सुध्दा सहजयोगाने जातो पण जरा उशिराने कारण हा जरा चिकटच आहे . विशेषतः नगर जिल्ह्यात तर आम्हाला फारच जास्त जाणवतो . कि भाऊबंदकी ,एकदुसऱ्याला ओढत रहायचं . त्यामुळे सहजयोग मात्र दुखावतो . तो वाढत नाही . नगर जिल्ह्यामध्ये हा रोग कुठून आला आहे समजत नाही कारण मी सुद्धा नगर जिल्यातलीच आहे जुनी . शालिवाहनांचेच आम्ही वंशज आहोत आणि शालिवाहन इथे होते . बरेच वर्ष ते राहिले आणि मी अस पाहिलेलं आहे कि इथल्या लोकां न मध्ये जी भाऊबंदकी आहे ती इतकी बाणलेली आहे कि एकाच तोंड इकडे तर एकाच तोंड तिकडे . म्हणजे सहजयोगात येऊन दारू सुटेल ,तंबाकू सुटेल ,सगळी व्यसन सुटतील सगळं होईल पण तरी हे शेपूट लागलेलंच असत पाठीमागे . हे शेपूट कस कापायचं मलाच सुचत नाही . ते दुसरीकडे कुठे नाही आता त्याच्या वरती मलाच काहीतरी तोडगा काढला पाहिजे . हि भाऊबंदकी नको कारण आपण एका विराटाचे अंगप्रत्यंग आहोत ,समजा हा हात या हाताशी भांडायला लागला तर ह्या शरीराने काय करायचं ?. पण नगर जिल्ह्याचं एक वैशीष्ट मी पाहिलं आहे कि इथे भाऊबंदकी अगदी पेरल्या सारखी आहे . ती अशी सूक्ष्म तेने कार्य करते कि मला कधी कधी समजत नाही कि कितीही मेहनत केली तरी हि भाऊबंदकी का निघत नाही ?. अहो कॅन्सर आम्ही ठीक केला आहे त्या बद्दल शंका नाही ,अनेक कॅन्सर ठीक केले आहेत . तुम्हाला जितके पाहिजे तितके आम्ही नमुने दाखवतो . अशे अशे रोग ठीक केलेत कि जे कोणी ठीक करू शकत नाही ,म्हणजे आम्ही काही केलं नाही ते तुमच्या कुंडलिनीने केलं ,जर तुमची कुंडलिनी जागृत झाली तर आम्ही तुम्हाला करू शकतो . पण हा रोग एक असा चिकट आहे कि तो काय निघतच नाही . आणि तो निघाला पाहिजे . नगर जिल्ह्यातला हा रोग फार वाईट आहे . एकदुसऱ्याला खेचाखेची करायची . पण हे काहीतरी आधुनिक आहे मी तुम्हाला सांगते कारण आमचे आईवडील सांगत असत कि नगर जिल्हा म्हणजे अत्यंत सोज्वळ लोक कुणाची भांडण नाहीत ,सगळ्यांची आपापसात मैत्री ,पण बाकी सर्व जिल्ह्यामध्ये असायचं पण नगर जिल्हा म्हणजे अगदी विशेष असं सांगायचे . आणि त्यांची एव्हडी श्रद्धा होती नगर जिल्हयावर . आता मला समजत नाही कि त्या नगर जिल्यामध्ये हि कीड कुठून लागली ? .

ह्या सर्व गोष्टी प्रकाशात आल्यावर हळू हळू सर्व स्वच्छ होत . पण त्यालोकांना गहनता आहे ,रशियाच्या लोकांना मी म्हणते जगात सगळ्यात जास्त गहनता आहे . रशिया झालं ,बल्गेरिया झालं ,झेकोस्लाव्हाकिया झालं ,आता आलेत एक गृहस्थ झेकोस्लाव्हाकिया तुन . आता १००माणस येणार आहेत . ह्या देशांमध्ये इतकी गहनता आलेली आहे कारण त्यांचं जे साम्राज्य होत त्याच्या मध्ये दडपशाही होती . त्या मुळे ह्या लोकांना राजकारणात काही शिरकाव नव्हता नशिबाने . हे असे काही ते धंदे करू शकत नव्हते कि समिती काढली ,ओरडायला लावल मुलांना हे असे काही धंदे करू शकत नव्हते . तर लक्ष त्यानंच सगळ होत त्याच्याकडे कि आता आमच्या जीवनाला अर्थ काय ? म्हणून ती गहनता . रशियन लोकांचे जर तुम्ही लेखक वाचले ,सुरवाती पासून टॉल्स्टॉय वैगेरे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल त्यांच्या मध्ये अंतर्मन जाणण्याची फार ,कोणतीही गोष्ट असली तरी मी अस का करतो असा विचार फार असे . आणि मी जे सुरवातीला माझ्या यजमानाच्या बरोबर रशियाला गेले होते तेव्हा मी साहेबाना सांगितलं होत कि जर रशियाला सहजयोग सुरु झाला तर इकडे अगदी पेट घेणार . आणि तसच झाल म्हणजे सोळा सोळा हजार माणस स्टेडियम मध्ये ,आणि त्यातही बाहेर लोक ,म्हणजे तिथे धर्मा सारखा सहजयोग पसरलेला आहे . त्या मध्ये कुणाला देव माहित नव्हता ,धर्म माहित नव्हता कारण त्यांच्या मध्ये ह्या अंधश्रद्धा नाहीत . आणि मला एकदा फार आनंद वाटला कि लोक अंधश्रध्दा काढत आहेत . हि गोष्ट फार चांगली आहे . पण त्यांना अक्कल नाही आहे त्याची ,अक्कल असायला पाहिजे ,लायकी शिवाय तुम्ही कोणतंही कार्य करू शकत नाही . त्यात प्राविण्य मिळवल पाहिजे . आणि सहजयोगाने तुम्हाला ते प्राविण्य मिळू शकत . आणि तुम्ही लोकांना सांगू शकता कि काय चूक आहे आणि काय चूक नाही ते . म्हणजे असं आहे कि हे जे परामचैतन्य आहे हे आत्मसाक्षात्कारा नंतर तुमच्या हाताला लागत ,जाणीव येते ,यालाच बोध म्हणतात ,यालाच विद म्हणतात . त्याच्या नंतर कुणी जर चुकीचं काम करत असेल तर लगेचच तुमच्या हातात कळत कि हा माणूस चुकीचा आहे . एखादा माणूस समजा जेल मधून सुटून आला आहे आणि त्याने भगवे वस्त्र घातले आहे ,तुम्ही ओळखणार कसे ,ओळखू शकत नाही . पण जर तुम्ही सहजयोगी असाल तर लगेच तुमच्या लक्षात येईल कि हा खोटारडा आहे . परत अशा लोकांची कुंडलिनी कधी उठणारच नाही ज्यांचं हृदय स्वच्छ नाही ,उठणारच नाही तुम्ही कितीही प्रयन्त करा . कुणी म्हणेल हिटलर ला द्या आत्मसाक्षात्कार ,मी म्हणेन बर पुढल्या जन्मी बघूया ह्या जन्मी नको . ह्या वेळेला होणार नाही . कारण होणारच नाही . कारण त्याला एक माणसाची काहीतरी तयारी पाहिजे ,ते मागायला पाहिजे ,जबरदस्तीनं होऊ शकत नाही . जर ती नम्रता असली तर ते तुम्हाला मिळू शकत ,आणि ते तुम्ही मिळवून कुठल्या कुठे जाऊ शकता . याच काही सांगताच येत नाही म्हणजे इतके लोक कुठल्या कुठे पोहोचले आहेत . एक गृहस्थ आहेत तबला वाजवणारे एकदा माझ्या समोर सहजच वाजवायला बसले होते ,सर्वसाधारण असे वाजवत होते ,वाजवता वाजवता त्यांची कुंडलिनी चढली आणि हात चालू लागला त्यांचा तर त्यांना काही समजलच नाही ,ते म्हणाले ,"मा ये कहासे सब आया ". मी म्हंटल चलने दो बेटे . त्याच्या नंतर एक दिवस असच आम्ही पुण्याला गाण ऐकायला गेलो होतो तिथे म्हंटल तबला वाजवतो हा आहे कोण ?. तोच आहे कि काय ,सगळे जण म्हणाले तो फार सर्वसाधारण होता . ,तुम्ही बघा तर खरं जाऊन ,जाऊन बघतात तर तोच होता ,धावत आला माझ्या पायावर ,म्हणाला माताजी अपने मुझे पहचाना नही ,मी तर ओळखलं पण हे म्हणत होते कि तू तो नाही ,आणि आज तो जगप्रसिध्द तबला प्लेयर आहे .

अमजद अली च पण असच तो पहिल्यांदा तितका चांगला वाजवत नसे बस एकदाच त्याच मी वाजवण ऐकल त्या दिवसा पासून अमजद अली साऱ्या जगाला माहित झाले . अशी अनेक लोकांची मी नाव तुम्हाला सांगू शकते कि ज्यांनी आत्मसाक्षात्कारानि आपली किती प्रगती करून घेतली . तसच अशे लोक होते कि जे व्यसनाधीन झाले होते ,व्यसना मुळे त्यांची कला संपली पण सहजयोगा मुळे त्यांची व्यसन ठीक झाली ,सहजयोगात आल्यामुळे त्यांची व्यसन सगळी सुटली . ते ठीक झाले ,आज परत त्यांची नाव येत आहेत . पुष्कळशे लोक ,माणिकवर्मा हि आजारी असायची ,फारच आजारी असायची ,तिला काहीतरी झालं होत ती सहजयोगात अली आणि बरी झाली आज ती परत गाण म्हणते आहे . आणि ती म्हणायची कि मी आता माताजी झाले ,ती आता इतकं सुंदर गाणं म्हणते आहे . अशी अनेक लोकांची उदाहरण मी तुम्हाला सांगू शकते . कि ज्यांना सहजयोगा मुळे सर्व प्रांगणा मध्ये फरक आलेला आहे .

आता तुमच्या कल्याणा साठी कितीही मी सांगितलं पण जर तुम्हाला स्वतःच कल्याण नको असेल ,आणि माजच ते खर असं म्हणून तुम्ही स्वतः चा सर्वनाश करण्यासाठी तयार झाला असाल तर,आणि आपल्याला अति शहाणे समजत असाल तर तुमच्याशी मी काही वाद घालण्यात ,आणि काही सांगण्यात काही अर्थ नाही . ज्यांना आपलं कल्याण करून घ्यायचं आहे त्यांनी हे करावं .

शिवाजी महाराजांनी सांगितलं आहे कि स्व धर्म जागवावा ,स्व चा धर्म जागवला पाहिजे . स्व म्हणजे आत्मा त्याचा धर्म जागवला पाहिजे . आणि तो जर धर्म जागवला तर त्यानी जी जी किमया होते ती अगदी पहाण्या सारखी असते . मला स्वतःलाच आश्चर्य वाटत कि हजारो लोक कसे पार होतात ,विशेषतः रशिया मध्ये यांना कशी काय मी जागृती देणार ,कस काय होणार सोळा सोळा हजार माणस बसलेली चारी कडून ,काय होणार यांचं ,अहो एकसारे सगळे पार झाले . एकसाथ ,आश्चर्य चकित झाले ,कमालीची लोक आहेत ,ती गहनता आपल्यात का येऊ नये . आपण या अध्यात्माच्या दारात बसलेलो आहोत . एव्हडं संत साधूंनी कार्य केलेलं आहे ते आपण वाया घालवणार का ? . ते सगळं सोडून देणार का ? काहीतरी त्यांचा विचार ठेवावा . आणि त्यांनी जेव्हडं कार्य केलय त्यावरच आम्ही सहजयोग उभारला आहे . जे पसायदान ज्ञानेश्वरांनी वर्णित केलं आहे तोच सहजयोग आहे . ते सगळं जे त्यांनी सांगितलं होत कि आता द्यावे पसायदान ,म्हणजे पसायदान आहे हे . आणि ते पसायदान सगळ्यांनी घ्यावं विमुख होऊ नये आणि आपल आयुष्य बेकार गोष्टीत घालवू नये . ह्यांनी लोकांचे लाभ जर झाले नसते तर आज हजारो देशातून लोक आज इथे आले नसते . ह्या रजनीश सारख्या माणसांनी अशे घाणेरडे लोक इथे आणले कि त्यालोकांना इथे आणल्या बरोबर लोकांना एड्स चे रोग झाले . आणि परवा आम्ही ,आश्चर्याची गोष्ट आहे गुजरात वरून एक माणूस आला ,गुजरात समाचार च्या माणसाने एक पत्रक आणलं होत त्याच्या त असं लिहिलं होत कि ,रजनीश नि अंधश्रध्दा निर्मूलनाच्या समिती तर्फे माताजींना एक फटका दिलेला आहे आणि आता आम्ही दुसरा फटका देणार आहोत . आणि त्या दुसऱ्या फटक्याच्या अगोदरच ते रजनीश फटकले . असली घाणेरडी काम जर करायची असली कि लोकांवर दगड मारणे हे म्हणजे गुन्हे आहेत ,क्रिमिनल गुन्हे आहेत हे . हि असली काम शिकण्या साठी जर तुम्ही समित्या तयार केल्या तर आधी आपले डोळे स्वच्छ करून घ्यावेत . आणि अशा लोकांच्या कोणत्याही गोष्टीत आपण पडू नका .

सहजयोग हा ईश्वर ,परमात्मा आणि हि परमशक्ती सिध्द करण्याला पूर्णपणे तयार आहे . आणि सिध्द करून दाखवलेलं आहे . पण जर तुमची जागृती झाली नाही तर आम्ही आंधळ्याला हे शिकवू शकत नाही . जो आंधळा आहे त्याच्याशी रंगाबद्दल बोलण्यात काय अर्थ आहे . म्हणून त्यांना आम्ही शिकवू शकत नाही . तुम्ही आपली श्रध्दा दृढ ठेवा परमेश्वर आहे ,त्याची शक्ती हि आहे आणि त्या शक्तीला तुम्ही प्राप्त होऊ शकता . जेजे संतांनी सांगितलं ते खर आहे आणि ते आम्ही सिध्द करायला आलो आहोत . ख्रिस्तानी भूत काढली असं म्हणतात ती खोटी गोष्ट नाही . भूत म्हणजे काय अशी उभी नसतात . भूत म्हणजे एक सूक्ष्म वस्तू आहे त्याला मेडिकल मध्ये आता त्यांनी नाव दिल आहे ,प्रोटीन ५८ आणि प्रोटीन ५३ . आता या लोकांना आता ह्या लोकांना ते काही माहित नसत ,कुठं गेलेलं आहे सायन्स काय झालेलं आहे काही माहित नसत . आले माझ्याशी वाद घालायला . अहो म्हंटल कस तुमच्याशी बोलायचं ?. काही अक्कल पाहिजे तुम्हाला ,त्याच शिक्षण पाहिजे तुम्हाला न ,मी सुध्दा मेडिकल केलं आहे . पण मेडिकल इतक्या खालच्या दर्जाचं झालं आहे आजकाल इन्दुस्तानात ,तस सगळंच शिक्षण झालं आहे ,कि त्यांच्याशी बोलायची सुध्दा सोय नाही . आज कुठल्या कुठे देश गेलेले आहेत ,ते कुठल्या कुठे पोहोचलेले आहेत . तर हि भूत म्हणजे काय ,भूत असं नसत पण एक त्यांचं प्रोटीन हे त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं आहे कि जेव्हा पासून आपण निर्माण झालेलो आहोत तेव्हा पासून जी एक कलेक्टिव्ह सबकॉन्शस एरिया आहे त्याच्या मध्ये हि प्रोटिन्स असतात . म्हणजे त्याला आपण सुप्त चेतन असं म्हणूयात . जी सुप्त अवस्थेत म्हणजे भूतकाळ ,जे भूतकाळात झालेलं आहे ते त्याच्यामध्ये असतात आणि ते येऊन आपल्याला त्रास देतात . व्हयरसेस पण तेच . आता व्हयरस कुठल्या कुठे पोहोचले जेनेटिक्स कुठल्याकुठे पोहोचले ,तिकडे लक्ष देण्याच्या ऐवजी हे फालतू चे धंदे या लोकांनी काढले आहेत . त्याच्या मध्ये काहीही विचार नाही . आमचे जेनेटिक्स मध्ये कितीतरी लोक कुठल्या कुठे पोहोचले आहेत अमेरिकेत . ते अमेरिकन्स नाहीत इंडियन्स आहेत . तर अशाने आपली प्रगती होणार नाही . प्रगती होणार आहे ती आपले डोळे उघडे ठेऊन हे लक्षात घेऊन कि आपण काय करू शकतो . आपली काय किमया आहे . आपल्या मध्ये कितीतरी शक्त्या आहेत त्या सुप्तावस्थेत आहेत त्या जागृत करून घेतल्या पाहिजेत . आणि त्यात उतरलं पाहिजे .

तेव्हा आपल्याला मला सांगायचं आहे कि असल्या टूम जरी निघाल्या तरी लक्ष देऊ नये . आज निघेल ,उद्या ती . जस काही कावळ्याच्या छत्र्या निघतात तस . पण मला वाईट या गोष्टीच वाटत कि मुलांना मात्र त्यांनी यात सामील करू नये . अंगापूरच्या पाच दहा वर्षाच्या मुलांच्या हातात दगड दिले या लोकांनी आणि ते मारायला सांगितले . आणि आता पोलीस आले तर म्हंटल मुलांना हात लावू नका . तुम्ही मुलांना हात लावायचं नाही . म्हणजे सी बी आय तिथं येऊन पोहोचलेले ,मुलांना हे असले धंदे खुनशी पणाचे जे मुलांना शिकवतात . काय अर्थ ठेवला आहे अशा लोकं मध्ये . उद्या जेल मध्ये सगळे जातील किंवा सर्वनाश होईल ,या मुलांना सन्मार्गाला लावलं पाहिजे . सहजयोगानी मुलांना सन्मार्गाला लावलं आहे . आज जी मुल फार व्रात्य फार ढ वैगेरे अशी समजली जातात आज त्यांनाच स्कॉलरशिप मिळत आहे . तुमच्या राहुरीतच . तुमच्या राहुरीच्या शाळेच्या मास्तरांना जाऊन विचारा . ते सांगतील तुम्हाला .जे मुल ढ म्हणून ते माझ्याकडे घेऊन आले होते त्यांना स्कॉलरशिप मिळत आहेत . तेव्हा ह्या मुलांचं आयुष्य खराब करू नये . आणि तुम्ही सुध्दा लक्ष ठेवलं पाहिजे कि अशा तशा फालतू समितीत जाणाऱ्या मुलांना एकदम दाबून ठेवल पाहिजे . त्यांना मुळीच तिकडे जाऊ दिल नाही पाहिजे . कारण हे लोक फक्त आपला एक मंच बनवण्या साठी अशी दिशाभूल करत आहेत . हि अभ्यासाची वेळ आहे आणि अभ्यास केला पाहिजे ,प्राविण्य मिळवलं पाहिजे . आणि आयुष्यात काहीतरी केल पाहिजे नाहीतर भिकेचे डोहाळे लागतील त्यांना . जर अभ्यासाचं करायचा नाही आणि या धंद्यांना मुलांना मुळीच लावायचं नाही हि संबंध एक समजण्याची गोष्ट आहे कि आज एव्हडी मोठी गोष्ट आपल्या देशात होत आहे ,हि संपदा आपली आहे ,अध्यात्म हि आपली संपदा आहे . आपण साऱ्या जगाची मदत करू शकतो . साऱ्या जगाला हि संपदा देऊ शकतो . पण खोटे पणाची नाही ,नुसतं प्रवचन करायच हरी विठ्ठल ,विठ्ठल करत बसायचं . त्यांनी काय होणार आहे गळा खराब होतो नुसता . पण सहजयोगाचं जे अध्यात्म मिळवून तुम्ही लोकांना काही सांगितल तर ती केव्हडी मोठी संपदा लोकांना देऊ शकता . त्याचा तुम्ही लोकांना किती फायदा करू शकता . याची तुम्हाला जाणीवच नाही आहे . आज हे लोक महाराष्ट्रात इतके फिरतात ,मी याना तुकारामांच्या समाधीवर पाठवलं होत . तर लोक सांगाय लागले कि माताजी हे लोक जमिनीवर लोळत होते . मी त्यांना विचारलं तुम्ही जमिनीवर का लोळत होते ?म्हणे जमिनीतून व्हयब्रेशन निघत होते . म्हंटल अस ,बर ,ठीक आहे . आणि त्यांचं म्हणणं असं कि संबंध जगात नाही एव्हडं महाराष्ट्रात चैतन्य पसरलेलं आहे . आणि आपण हे शहाणपणाचे दिवे लावत बसलेलो आहोत . गंमत आहे ,एव्हडी मोठी संपदा असताना भिकेचे डोहाळे लागले असच म्हणावे लागेल . तेव्हा जे आहे ते मिळवून घ्या . आणि हि संपदा आपण साऱ्या जगाला देऊ शकतो . साऱ्या जगामध्ये आपल्या महाराष्ट्रीयन लोकांचा मान होऊ शकतो . पण एव्हडं मात्र खर कि भाऊबंदकी मात्र नष्ट झाली पाहिजे . हि अशी कीड आहे कि राजकारनातं हि घाण ठीक आहे कारण त्याला काही अर्थच नाही राहिलेला . पण सहजयोगात मात्र हि घाण आणायची नाही . हि माझी सर्वाना हात जोडून विनंती आहे . कृपा करून हि भाऊबंदकीची घाण सहजयोगात अनु नका . आणि त्या प्रकाशात तुम्हाला दिसेल कि हि भाऊबंदकी आपण करतोय ते एकच ,महान विराटाचे आपण अंगप्रत्यंग आहोत ,आणि या कार्यासाठी सामूहिक चेतना पूर्ण पणे जागृत झाल्यावर हे सगळं आपण विसरून जातो . आता हे लोक खेडेगावात जातात तर हे सगळे सहजयोगी आहेत ,आम्ही सहजयोगी जाऊन त्यांच्या झोपडीत त्यांना भेटणार ,त्यांच्या गळ्यात गळे घालणार ,आता परवा मी गेल्यावर तिकडे त्यांनी मिरवणूक लगेचच काढली . म्हंटल कशाला मिरवणूक ,नाही नाही माताजी म्हणे पुष्कळ लोक आलेत ,म्हंटल बर . तर हे लोक बोलत बोलत त्यांच्या बरोबर आता त्यांना भाषा येत नाही त्यांची काहींनाही तरी पण काय बोलत होते काही माहित नाही ,आणि ते दत्त मंदिराच्या पलीकडे जे निघून गेले ,अरे म्हंटल तुम्हाला परत जायचं आहे,तर तुम्ही गेलात ,म्हणे आम्ही त्यांचे व्हयब्रेशन्स बघत होतो माताजी . फार छान व्हयब्रेशन्स महाराष्ट्रीयन लोकांना आहेत . असं का ,त्यांना तरी जाणीव आहे कि नाही त्याची . तेव्हा आपल्या जवळ पुष्कळ काही आहे आणि पुष्कळ काही द्यायच आहे ,जे आपल्या जवळ आहे ते दिल पाहिजे दुसऱ्याचं घेऊन काय करणार ?. मग हि माझी सगळ्यांना अत्यंत कळकळीची विनंती आहे कि तुम्ही सर्वानी सहजयोगात उतरलं पाहिजे . असं नाही आज आम्ही जरी तुमची जागृती केली ,म्हणजे जरी सहजयोग म्हणजे एका क्षणात जरी झाला त्याचा अनुभव तरी सुध्दा तो वाढवला पाहिजे . वृक्षा सारखा तो वाढला पाहिजे ,कारण हि जिवंत क्रिया आहे . आणि जिवंत क्रिया म्हणजे जस एखाद बी जमिनीत पेरावं आपण आणि जमिनीची शक्ती जशी तिला अंकुर फोडते तसच तुमची सुध्दा कुंडलिनी शक्ती तुमचं ब्रम्हरंध्र फोडून बाहेर अली तरी सुद्धा तुम्हाला त्याच्या पुढे गेल पाहिजे आणि आपल्याला वृक्षा सारखं उभ राहील पाहिजे . पण पहिल्यांदा भाऊबंदकीचे जिथं कार्य सुरु असेल तिथं कान बंद करून घेतले पाहिजेत . हे लक्षात ठेवा . आणि त्या साठी काय कराव हे जर तुम्ही मला कळवलं तर मी तिकडे लक्ष घालीन . कारण मला हे समजतच नाही कि भाऊबंदकी का ?का असली पाहिजे ?आणि ह्या देशाचं माहात्म्य सांगावं तेव्हड थोडं ,हा महाराष्ट्र आहे ,महा राष्ट्र म्हण्टलेलं आहे तसाच हा महाराष्ट्राचं आहे . पण जी आपली विशेष शक्ती आहे ,आपल्या मध्ये जे विशेष आहे ते समोर न आल्या मुळे आपण असे झाले आहोत . ह्यांनी दरिद्रता जाते . शेती ठीक होते ,आणि माणूस कुठल्या कुठे पोहोचून जातो ,त्याला नवीन नवीन कल्पना येतात . आणि तो सन्मार्गाला लागतो . मुख्य म्हणजे सन्मार्ग हा मिळवला पाहिजे . एकदा तो हरवला तर हा सन्मार्ग मिळणार नाही .

आता एक दहा मिनिट आपण आत्मसाक्षात्कार ची अनुभूती घेण्यात वेळ घालवूया . आणि त्यानंतर आपण जागृत होऊन जाल . जागृत झाल्यावर आता लगेच तुम्ही काही अवधूत होणार नाही आहे . अवधूत होण्या साठी थोडीतरी त्याची किंमत समजली पाहिजे . आत्मसाक्षात्काराला तुम्ही जरी आलात तरी अजून पूर्ण त्याचा विकास झालेला नाही आहे . हे समजून त्यावर मेहनत करायला पाहिजे . मग आम्हला तुम्ही लिहा ,मग तुम्हाला समजेल हे काय आहे . माझा सगळ्यांना आनंत आशीर्वाद आहे .

फक्त तुमच्या मध्ये शुध्द इच्छा असली पाहिजे कि आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . जर तुमच्या मध्ये शुध्द इच्छा नसली तर आत्मसाक्षात्कार होणार नाही . कारण कुंडलिनी हि शुध्द इच्छा शक्ती आहे . पवित्र ,शुध्द इच्छा शक्ती . आपल्याला जेव्हढ्या इच्छा आहेत ,आज आपण म्हणू कि आम्हाला एक घर पाहिजे . त्यासाठी धावपळ करू ,मेहनत करू ,घर मिळ्याल्यावर त्याचा संतोष न मानता मग आम्हाला एक शेत पाहिजे ,शेत झाल्यावर मग एक ट्रॅक्टर पाहिजे . ते झालं कि मग त्याच्या नंतर मग एक मोटर पाहिजे . म्हणजे एका इच्छे वरून दुसऱ्या इच्छेवर जात असतो आपण . पण जी एक इच्छा पूर्ती झाली तीच आपल्या लक्षात येत नाही . त्याला इकॉनॉमिक्स नीच म्हंटल आहे एकसाथ सगळ्या इच्छा आपल्या पूर्ण होत नाहीत . तेव्हा हि अशी कोणची इच्छा आहे जी पूर्ण झाल्यावर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या सारख्या वाटतात ? . ती इच्छा म्हणजे ह्या परमेश्वरी शक्तीशी एकाकारिता साधने . हि इच्छा खरी . म्हणूनच आपण पाहिलं आहे कि सर्व संत लोक समाधानी आहेत . इतकच नाही तर अत्यंत शक्तिशाली आहेत . आता मलाच बघा मी ६८ वर्षाची आहे ,आणि प्रत्येक दुसऱ्या दिवशी माझा प्रवास चालू आहे ,आणि फार लांब लांब ,कधी गेले तर मेक्सिकोला गेले तर तिथून जपान ला इतका माझा प्रवास चालू आहे . पण मला काही होतच नाही विशेष . त्याला कारण काय ,कि मी काही करते आहे अशी मला कल्पनाच होत नाही . होतंय सगळं ,आपोआप होतंय . अशी भावना आल्यावर ,अशी भावना पेक्षा अशी स्तिती आल्यावर ,हा विचार किंवा भावना नाही हि ,हि एक स्तिती आहे माणसाची ,आपल्याला वाटतच नाही कि आपण काही करतोय ,काही मेहनत करतोय ,प्रवास करतोय काही वाटत नाही . आणि त्या एकंदर स्तिती मध्ये इतकं समाधान ,इतका आनंद ,इतकं प्रेम आहे . खरोखर म्हणजे लोक म्हणतात कि माताजी तुम्हाला कशाचीच गरज नाही . काहीच नाही . कारण श्रीमंत घरातून आम्ही आणि पुष्कळ पैसे साहेबानी दिले ह्या कार्या साठी ,आणि सर्व तऱ्हेने समृध्द असून मी अशी जंगलात इकडे तिकडे फिरते त्याला कारण असं कि हा आनंद देण्याचं कार्य माझ आहे ,हे मला दिल पाहिजे . त्यासाठीच माझा जन्म आहे . आणि ते मी कार्य करत आहे . त्याच्यात मला काहीही तुम्ही देऊ शकत नाही . जे आहे ते घ्यावं आणि मनसोक्त लुटाव अशीच नेहमी आईची इच्छा असते . जर तुम्हाला आपली आई माहित असेल तर तसाच हा प्रकार आहे तेव्हा सगळ्यांनी प्रेमानी याचा स्वीकार करावा ,आणि त्यात वाढवून घ्यावं स्वतःला ,मुलांनी सगळ्यांनी प्रेमानी नांदावं आणि सौख्यात राहावं हेच एक आईला पाहिजे आहे दुसरं तिला काही नको .

आता हि कुंडलिनी वैगेरे काय आहे हे तुम्ही जेव्हा आमच्या सेंटरला जाल तेव्हा कळेल . पण जर तुम्ही सेंटर वर नाही गेलात ,जर तुम्ही सामूहिकतेत नाही आलात तर मात्र काही मदत होणार नाही . पुष्कळशे लोक आहेत आम्ही माताजी घरीच करतो असं म्हणतात . सहजयोग घरी करता येत नाही . जरी तुम्ही घरी केलात तरी तुम्ही सामूहिकतेत आल पाहिजे . म्हणजेच हे कार्य होईल . म्हणजे समजा ,एखाद्या तुमच्या बोटातल नख पडलं ,किंवा तुम्ही काढून टाकल तर त्याची काहीच वाढ होत नाही . तशीच तुमचीही काही वाढ होणार नाही . म्हणून सामूहिकतेत आल पाहिजे आणि त्या सामूहिकतेत आल्यावर सगळं शिकून घेतलं पाहिजे . मग त्याच्यात तुम्हाला कळेल कि श्रीकृष्ण कोण ,राम कोण ,ख्रिस्त कोण ,त्याचे काय संबंध ,महंमद साहेब कोण आणि ह्या सगळ्यांचे आपापसात काय संबंध होते . सगळं अगदी सत्य म्हणून तुमच्या समोर येईल . म्हणजे आता समजा जर मी म्हंटल कि ख्रिस्ताच एक स्थान आहे तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि जेव्हा कुंडलिनी चढेल तेव्हा ती त्या स्थानावर जाऊन ती थांबेल . तुम्हाला ख्रिस्ताचंच नाव घ्यावं लागेल त्याशिवाय ती चढणार नाही . पण त्याला सहजयोगी पाहिजे ,कारण तुमचं कनेक्शन पाहिजे देवाशी त्याशिवाय तुम्ही कोणाचाही मंत्र देऊ शकत नाही त्यांना काही सांगू शकत नाही किंवा तुम्ही म्हंटल कि आम्ही तुमची कुंडलिनी जागरूक करतो तर ते होऊ शकत नाही . कारण तुमचं आधी कनेक्शन त्याच्याशी झालं पाहिजे . जस ह्या माईक च कनेक्शन मेन शी होत नाही तो पर्यंत ह्याला अर्थ नाही . तसच तुमचं जे काही आहे देवाबद्दल त्याला सुध्दा अर्थ रहात नाही म्हणून आधी कनेक्शन करून घ्यायचं . ते कनेक्शन झाल्यावर मग तुम्हाला कळेल कि कुठं चुकलं आहे . कारण पुष्कळशे लोक असे म्हणतात कि माताजी आम्ही एव्हडं देवाचं करतो तरी आम्हाला त्रास का होतो . त्याला त्रास असा आहे कि अजून तुमचं कनेक्शन झालेलं नाही ,कनेक्शन झालं कि मग काय लगेचच तुम्हाला जे काय पाहिजे ते घडू शकत . आणि बरोबर काय चूक काय यातही नीरक्षीर विवेक येतो . असो . आता ज्यांना जागृती घ्यायची त्यांनी इथे बसाव आणि ज्यांना घ्यायची नाही त्यांनी बाहेर जावं . नको ती काम करण्यासाठी आपलं आयुष्य नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे . आपल्या आयुष्याची किंमत केली पाहिजे . ज्यांना नको ती काम करायची आहेत ते एक दिवशी जेल मध्ये जाणार . ती प्रवृत्तीच वाईट आहे . आधी जागृती घेतल्यावर सहजयोगी सुध्दा जिथे जिथे जातात तिथे इतकं सामाजिक कार्य करत आहेत ते मी आपल्याला सांगू नाही शकत . ह्या तुमच्या राहुरी गावातच एक आम्ही स्त्रियांसाठी ह्या लोकांनीच किती मोठी संस्था काढली आहे त्यासाठी कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया या देशांनी पैसे पाठवले आहेत . आमच्या सरकारनी सांगितलं कि नाही पैसे आम्हाला मिळाले पाहिजेत पण त्यांनी सांगितलं कि आम्ही तुम्हाला देणार नाही आम्ही माताजींना देऊ . मग मेनी करावं लागल . बायकांच्या उन्नती साठी तिथे एक संस्था आम्ही काढलेली आहे . अनेक शाळा काढलेल्या आहेत ,अनेक ठिकाणी कार्य होतय . काहीतरी भरीव काम केलं पाहिजे . पण त्यात जर अध्यात्म असला तर तुम्हाला एकतऱ्हेचा प्रामाणिक पणा येतो . नाहीतर इथे आजकाल काय ,मी पुण्याला आले विचारलं ,अरे बाबा तो का येत नाही ,तो पैसे खातो ,हा पैसे खातो . अरे म्हंटल पैसेच खातो का जेवतो बिवतो का नाही . सगळे पैसेच खात बसले . एव्हडा भ्रष्टाचार ह्या महाराष्ट्रात आहे तेव्हडा कुठे दुनियेत नाही . एव्हडा भ्रष्टाचार . आणि आपण इतके सहनशील आहे कि एव्हडा भ्रष्टाचार आपण सहन का करतो . माहित असत हा भ्रष्टाचार आहे ,सांगतात अगदी कि हा पक्का भामटा आहे . अरे पण त्याला तुम्ही का नाही त्याला हलवत . त्याच्या साठी कुणी नाही मंच करणार ,भ्रष्टाचाराच्या मागे लागा, तस नाही कुणी करणार . इतकच नव्हे कि लोक इतकं खोट बोलतात , सर्रास , कि न्यूज पेपर वाले पण इतकं खोत बोलतात कि मला आश्यर्य वाटत . केसरी सारखा पेपर मला आश्चर्य वाटलं लोकमान्य टिळकांचा पेपर ,ज्यात लहानपणी संबंध गीतारहस्य त्यात वाचलं ,त्यात काय वाट्टेल ते खोटंनाटं लिहितात . अस कस मला समजत नाही ,काय झालय आपल्याला . सगळी मूल्य आपली संपून गेली कि काय ?,सपशेल खोट लिहायचं कोणत्या बाबतीत ,काही लिहिलं तरी चालेल . याला काही अर्थ आहे एव्हडा भ्रष्टाचार प्रत्येक प्रांगणा मध्ये ,आश्चर्याची गोष्ट आहे . आणि तिकडे आपलं लक्ष नाही ,फालतू गोष्टीन कडे लक्ष . हि सहनशीलता सुध्दा फार जास्त आहे . आपण भ्रष्टाचार का चालवून घ्यायचा ?

आता आम्ही तिथे होतो आरेगावला तिथे एक मनुष्य भयंकर दुष्ट होता . त्याने पुष्कळ लोकांना छळलं होत . त्या लोकांनी मला सांगितलं या माणसाने आम्हाला इतकं छळल आहे कि काही विचारू नका . आणि याला कुणी काही बोलू शकत नाही आणि हा सगळ्यांना मारतो आणि फार त्रास दिलेला आहे . म्हंटल पोलीस कम्प्लेंट का करत नाही ,म्हणे कि आम्हाला भीती वाटते तो आम्हाला मारून टाकेल . ठीक आहे म्हंटल तुम्ही पोलीस ला बोलवा मग बघा ,ते म्हणे आमच्या कडे कुणी कंप्लेटच केली नाही . म्हंटल जो कोणी तक्रार करायला जातो त्यांना मारायला जातो ना हा . सगळ्यांच्या कडून पैसे उपटतो . म्हणजे आहे काय हे ?अहो अराजकतेला सुध्दा काही मर्यादा असायला पाहिजे . आणि हे थोड्या वर्षातच वाटोळं झालं तुमच्या देशाचं . आमचे साहेब १९५० साली कलेक्टर होते . अहो काडी ऐकलंसुध्दा नाही आम्ही कि कलेक्टर आणि कमिशनर हे लोक पैसे खातात . शक्य नाही ,काय झालय आपल्याला ,कुठे गेलोत आपण . तर तुम्ही सहजयोगात या म्हणजे प्रामाणिक पणा मध्ये जी निर्भयता आहे ती तुमच्यात येईल . त्या साठी तुम्ही उभे राहू शकता . आणि तुम्हाला कळेल कि तुम्ही प्रामाणिक राहून सुध्दा जीवना मध्ये अद्वितीय कार्य करू शकता . त्याची मुळीच गरज नाही तुम्ही असे पैसे खाऊ पणा करायचा . आणि साऱ्या जगाच वाटोळं करायचं . माझा अनंत आशीर्वाद आहे सगळ्यांना आणि तुम्हाला परमेश्वर सुबुध्दी देवो आणि तुम्ही सर्व सहजयोगात उतरून आपल अमुलाग्र परिवर्तन करून घ्यावे . आणि अत्यंत प्रेमाने आपापसात राहावं . हि सगळी भ्रष्टाचाराची भूत इथून घालवली पाहिजेत ,नाहीतर याचा इलाज तर काही समजत नाही . पण सहजयोगी कधी चोरी करत नाही ,खोट बोलत नाही हिदुस्तानातले सुध्दा . कधी चोरी करणार नाहीत खोटहि बोलणार नाहीत ,पैसे खात नाहीत ,सरकारी नोकर आहेत मोठ्या मोठ्या पोजीशनवर आहेत . आता आपले जे चीफ कॅबिनेट सेक्रेटरी आहेत ते सहजयोगी आहेत . फायनान्स मिनिस्टर सहजयोगी आहेत . एक पैसा ते लोक कधी खाणार नाहीत . अशे लोक आहेत आपल्याकडे सहजयोगी . आपल्याकडे वल्ड हायकोर्ट होत त्याचे जे चेअरमन होते डोक्टर नागेंद्रसिंग ते सहजयोगी होते . ह्या लोकांनी एक कवडी छदाम कधी उचलला नाही . असे लोक आपल्याला नकोत का ?असा विचार करायला पाहिजे . एव्हडं प्रचंड मनुष्याच्या शक्तीला पूर्ण पणे प्लावीत करणारे ,त्याला वाढवणारे असे जे सारे गुण ह्या सहजयोगाने मिळतात तर मी असं म्हणेन कि अशा युग धर्माला तुम्ही मनाने गेल पाहिजे . कारण आम्ही आता विश्वधर्मी झालो सगळे . अमेरिकेत विश्वनिर्माला धर्म हा रजिस्टर झाला आहे . त्यांनी मान्य केलं आहे . कॅनडाला मान्य केलं आहे . इटलीला मान्य केल आहे . पण आपल्या भारतात मात्र नाही . कारण इथे "अति शहाणे त्यांचे बैल रिकामे "हि परिस्थिती आहे . आज शेवटचा दिवस माझा नगर जिल्ह्याचा कार्यक्रम संपवून मी आता जात आहे परत आणि त्यामुळे म्हंटल सगळ्याच गोष्टीन कडे जरा लक्ष दिल पाहिजे आणि सांगितलं पाहिजे . तेव्हा कृपा करून पुढल्या वर्षी मी येईन तेव्हा इथे अनेक सहजयोग्यांना भेटींन आणि त्याच्या महानतेला बघून मला फार आनंद होईल अशी मला अशा आहे .

आता सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर आणि ज म्हणजे जन्मलेला . तुम्हाला काही करायचं नाही . ,काही विशेष करावं लागत नाही . तत्क्षणी कुंडलिनी जागृत होते . हे कार्य कबूल आहे मला कि अजून कुणी केलेलं नाही आणि आम्ही करतो . पण त्यात वाईट काय झालं ?ज्ञानेश्वरांच्या आधी कुणीही कुंडलिनी बद्दल उघडून सांगितलं नव्हतं ,ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरूंची परवानगी घेऊन सहाव्या अध्यायात कुंडलिनीच वर्णन केलं ,वळत काय झालं ?पण तो निषिध्द म्हणून काढून टाकण्यात आला, धर्ममार्तंडांनी . पूर्वी धरमार्तंड होते आता हे अर्धवट विज्ञान मार्तंड आलेत . आणि ते जर आज आपल्या हाती लागलय जर त्यानी सामूहिक चेतना जागी होते तर त्यात काय वाईट आहे ?. काय चुकलेलं आहे ?. यात काही कुणी पैसे घेत नाही ,काही असं वैगुण्य नाही ,लोक सन्मार्गाला लागतात ,त्यांचे सगळे प्रश्न सुटतात इतकच नव्हे तर त्यांची सगळी व्यसन सुटतात ,ते आपल्या महानतेला प्राप्त होतात त्यात वाईट काय आहे ?असो ,आता आपण सुबुध्दीने ह्या गोष्टीला स्वीकारुया . दोन्ही हात माझ्याकडे करा . प्रत्येकाने बसून घ्यावं बसल्या शिवाय नाही होणार ,जमिनीवर बसल पाहिजे ,हि पृथ्वी जी आहे त्यातलं विशेष म्हणजे महाराष्ट्र आणि हे महाराष्ट्र म्हणजे आपल्याला माहित नाही साऱ्या विश्वाची कुंडलिनी इथं आहे . इतकी पवित्र हि पृथ्वी आहे . हीच तुम्ही जर उपयोग करून नाही घेतला तर कोण करून घेणार ?लक्षात घ्या आणि शुद्ध मनाने बसा , आम्हाला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे असा विचार करून बसा . शंका कुशंका करू नका आता . आपल्या बुध्दीला जास्त ताण देऊ नका . कारण विचारांच्या पलीकडे आपल्याला जायचं आहे . विचारांचा उंबरठा ओलांडून तिकडे पलीकडे निर्विचारतेत उतरायचं आहे म्हणून शंका सोडून तुम्ही व्यवस्तीत जमिनीवर बसा .

आता दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे ,आता हे हात ह्याच्या मध्ये आपल्या सिम्फथॅटिक नर्वस सिस्टीम चे एन्ड आहेत इथपर्यंत डॉक्टर पोहोचलेत ,ते हि या लोकांना माहित नाही . ते आहेत . आता सिम्पथाटीक नर्वस सिस्टम म्हणजे काय ,आणि स्वयंचलित संस्था म्हणजे काय हे सगळं सांगायची काही गरज नाही कारण समजा हा दिवा आहे ,हा दिवा किंवा इतके दिवे आहेत ,इथं तुम्ही आलात जर तुम्हाला म्हंटल एक बटन आहे ते दाबलं म्हणजे सगळे दिवे लागतील . आता एखादा खेडूत माणूस म्हणेल असं कस शक्य आहे ,होऊ शकत नाही . करून दाखवलं तरी तो म्हणेल नाही शक्य . पण समजा असं होत असलं तर ते का घेऊ नये . ?त्यात काय शहाणपण आहे ?. बर मग हे सगळं जे होत आहे ते तुम्हाला जर मी म्हंटल कि तुम्ही दिवा पेटवून घ्या ,ते सोप आहे , कि संबंध इलेक्ट्रिसिटी कशी आली ,कुणी शोधून काढला ,इथे कशी आली हे सगळ सांगत बसले तर तुम्हाला पटणार आहे ?. ते होत राहील त्या साठी माझ्या अनेक टेप्स आहेत त्या हळू हळू तुमच्या हाती लागतील ,तुम्ही ते बघायचं ,पण त्यात काही राहील नाही ,तुम्ही फक्त आधी स्वतः हा प्रकाश मिळवून घ्या . असच प्रेमाचं सांगणं आहे .

आता दोन्ही हात माझ्याकडे करून डोळे मिटायचे . आता यांच्यात एक अट आहे ती लक्षात ठेवायची . आता तुम्हाला जर कोणी सांगितलं तुम्ही पापी आहेत ,तुमचे पूर्व जन्म खराब होते वैगेरे सगळं विसरून जायचं . माणसे चुका करतात परमेश्वर करू शकत नाही त्या मुळे मी हि चूक केली ती चूक केली असं म्हणायचं नाही . माझ्या लेक्चर मध्ये पण असं काही आलं असेल तरी ते विसरायचं . तुम्ही काही चूक केली नाही कारण तुमच्या गौरवला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे . तुमचा गौरव तुम्हाला मिळाला पाहिजे . तुम्ही किती महान आहेत हे तुमचं कनेक्शन झाल्या शिवाय तुम्हाला कळणार नाही . म्हणून स्वतः ला पूर्ण पणे क्षमा करायची आणि मी मुळीच दोषी नाही असं समजायचं . सगळा भूतकाळ विसरायचा या क्षणी . दुसरी गोष्ट अशी कि सगळ्यांना एकसाथ क्षमा करा ,कुणी त्रास दिला असेल ,कुणी दिशाभूल केली असेल ,सगळ्यांना क्षमा करून टाका . किती हलकं वाटेल तुम्हाला बघा . पण जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुम्ही अशा लोकांच्या हातात खेळता जे लोक तुम्हाला त्रास देऊ इच्छितात . म्हणून सगळ्यांना क्षमा करा . आणि तिसरी गोष्ट म्हणजे पूर्ण आत्मविश्वास ठेवा . मला आत्मसाक्षात्कार हा होणारच असा विश्वास ठेवा . चष्मे काढा ,टोप्या काढा . आणि डोळे मिटून बसा . सरळ भावानी बसा. सगळ्यांना अनंत आशीर्वाद . पुढल्या वर्षी मी येणार आहे आणि बघणार आहे सहजयोग इथे कसा जमतो तो .

Sangamner (India)

Loading map...