
Public Program 1988-12-05
5 डिसेंबर 1988
Public Program
Nashik (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
या पूर्वी अनेकदा आम्ही ह्या पवित्र स्थानी आलेले आहोत . पण दुर्देवाची गोष्ट अशी आहे कि जे स्थान आपण फार पवित्र मानतो त्या ठिकाणी अध्यात्माची बैठक फार कमजोर असते . त्याला कारण अस आहे कि जी जागा फार पवित्र त्या ठिकाणी पौराणिक महत्वा मुळे अनेक मंडळी एकत्र येतील . आणि अशी भाविक साधीभोळी ईश्वर परायण मंडळी जेव्हा अशा पवित्र ठिकाणी येतात तेव्हा त्याच वेळी अनेक दुष्ट प्रवृत्या घेतलेले राक्षसी महत्वाकांक्षा असलेले असे उपदव्यापी लोक त्यांना लुबाडण्यासाठी सुद्धा हजर असतात . जस काही एक प्रकारे यांचा बाजारच ,मार्केटच उघडलं गेलं आहे . आणि त्या मुळे प्रत्येक आपल्या पवित्र ठिकाणी अशे अनेक उपटसुम्भ एकत्र होतात आणि लोकांना लुबाडतात .
हि कलाटणी धर्माला मिळाली कि सर्व गोष्टी परमेश्वराच्या मिळवायच्या असल्या कि त्याला पैसेच दयायला पाहिजेत हे कधी आणि कुठे हे सांगता येणार नाही . पण धर्मभोळे पणाची तरी मानवाची कमाल आहे . परमेश्वराला पैसे देऊन तुम्ही मिळवू शकता हि कल्पना माणसाच्या डोक्यात कशी अली ती सांगता येत नाही . परमेश्वराला पैसे समजत नाहीत हि एक साधी सरळ गोष्ट आहे . हे माणसाने केलेलं काहीतरी खूळ आहे . आणि त्याचा परमेश्वराशी काहीही संबंध नाही . उदाहरण तुम्हला हॉल भाड्याने घ्यायचा असला तर त्या साठी पैसे लागतात ,त्या साठी चार माणसांनी पैसे एकत्र केले तर ठीक आहे . पण तुम्ही परमेश्वराला पैसे दयायचे म्हंटले तर तुम्हाला परमेश्वर काय आहे हेच समजलेलं दिसत नाही असं वाटतंय . खेडेगावात गेलो आम्ही कुणी दहा पैसे पाच पैसे असे टाकत असतात . हि सगळी नवी नाणी मला समजत सुद्धा नाहीत . त्यांना म्हंटल माताजी पैसे घेत नाहीत तर म्हणतात पंचवीस पैसे तरी घ्या . या प्रमाणे आपल्या देशामध्ये अत्यंत धर्मभोळे निरागस लोक आहेत . त्यांच्या बद्दल सांगायचं असं कि इतकी परमेश्वरी भक्ती ,देवा बद्दल इतकी आसक्ती असून सुद्धा डोळस श्रद्धा नसल्या मुळे अनेक विचित्र प्रकार होत राहतात आणि ते किती विकोपाला गेले आहेत ते सुद्धा सांगता येत नाही . ह्या गोष्टी सर्व बघून जे लोक विचार करतात ते मग बुद्धिवादी होतात . आणि त्यांचं असं म्हणणं आहे कि हे धर्म ,देव ,परमेश्वर हे सगळं थोतांड आहे . नुसते पैसे कमवण्याचे धंदे आहेत . त्या पलीकडे हे काही नाही . हे सुद्धा त्याच्या कोत्या बुद्धीच दर्शन घडवतात . परमेश्वर हा आहेच आणि संतसाधु हे खरेच होते . त्यांनी जे सांगितलं ते काही खोट सांगितलं नाही . हे बुद्धीने चालणाऱ्या लोकांच्या डोक्यात काही येणार नाही .
आता आम्ही जे आपल्या समोर उभे आहोत किंवा आपल्याला आम्हाला सांगायचं आहे ते हे कि हा परमेश्वर सिद्ध करायलाच आज आम्ही इथे आलो आहोत . परमेश्वर आहे किंवा नाही याची सिद्धता देण्यासाठी आम्ही आज इथे आलो आहोत . आणि तो परमेश्वर तुमच्या हृदयामध्ये मध्ये आत्मा स्वरूप विरजतो असं सगळ्या साधुसंतांनी सांगितलेलं आहे . कोणताही शास्त्रज्ञ उठतो आणि म्हणतो कि देव हा नाही . पुष्कळशे लोक स्वतःला समाजवादी म्हणून म्हणून म्हणतात ,कॅनफुशस पासून समाजवाद हा आला . आणि कॅनफुशस नि स्पष्ट सांगितलं होत कि दारू पिणे हे समाजवादाच्या विरोधात आहे . पण ज्यांना दारू प्यायची आहे त्यांना काहीतरी बहाणा लागतो आणि ते सांगतात कि आमचा देवावर विश्वास नाही . पण एका शास्त्रज्ञाला असा प्रश्न विचारला पाहिजे कि कशावरून तुमचा देवावर विश्वास नाही . तुम्ही देवाला जाणण्याचा प्रयत्न केला का ? देवाला शोधून काढण्याचा प्रयत्न केला का ?कि असं मोघमच तुम्ही सांगता कि आमचा देवावर विश्वास नाही . हे सगळं कुभांड आहे किंवा काहीतरी मनाचे खेळ आहेत . देवाने तुम्हाला बुद्धी दिली ती असं लोकांना चाळवण्या साठी नाही . त्याना उलट मार्गाला लावण्यासाठी नाही . ती बुद्धी दिली आहे एव्हड्यासाठी लोकांना कि जाणावं त्यांनी कि परमेश्वर हा बुद्धीच्या पलीकडे आहे . तो जर ह्या बुद्धीला आकलन झाला असता तर मग तो परमेश्वरच राहिला नसता . आत्म्या पासून आपण परमेश्वराला ओळखू शकतो . जस डोळे नसताना मनुष्याला रंगसंगती दिसत नाही . तसच आत्मा जागृत झाल्या शिवाय परमेश्वराला ओळखता येणार नाही . म्हणून आत्मसाक्षात्कार पहिला घेतला पाहिजे असं बुद्धांनी सांगितलं आहे . आत्मसाक्षात्कारा शिवाय परमेश्वराच्या गोष्टी करूच नयेत असं त्यांनी ठरवून टाकलं म्हणून त्याला पुष्कळ लोक निरीक्षर वादी असं म्हणतात . तो समयाचार होता तेव्हा लोक नुसते देव देव म्हणून वाट्टेल तिकडे धावत होते . म्हणून त्यांनी हा निरीक्षर वाद सुरु केला . तसच महावीरांनी पण केलं . पण त्याचा उलट परिणाम म्हणून याला कलाटणी लागली . म्हणजे एक मोठे अवतरण जगात आले कोणाचेही तर त्या अवतरणाची कशी वाट लावायची हे मधे जे उपटसुम्भ बसलेले असतात ते करत असतात . तीच दशा सर्व धर्मांची झाली आहे . ख्रिश्चन धर्मा मध्ये तर अतिरेक झाला आहे . पण हे लोक त्यांचा मूर्खपणा बघून त्यांच्या शुध्द बुध्दी मुळे यांनी ओळखला हे ते धर्म सोडून बसले आहेत . तसेच इतर जे धर्म आहेत मुसलमान धर्म त्यांच्यात केव्हडी भांडण होतात . आपापसात माऱ्यामाऱ्या चाललेल्या आहेत . इथे सुध्दा प्रत्येक धर्मामध्ये किती भांडण आहेत . देवळासाठी भांडण देवासाठी भांडण म्हणजे याला काही परमेश्वर म्हणायचं का ?
कबीराचे जेव्हा शिष्य होते त्यांनी कुणालाच आत्मसाक्षात्कार दिलेला नव्हता . आत्मसाक्षात्काराच्या फक्त गोष्टी केल्या होत्या . आजची त्यांनी ओळख दिली होती . जेव्हा त्याचा मृतदेह पडला होता तेव्हा सगळे जण भांडायला लागले ,हिंदू म्हणाय लागले कि आम्ही याना जाळून टाकणार आणि मुसलमान म्हणाय लागले कि आम्ही याना गाडणार . मग त्यांनी म्हणे जशी चादर उचलली तेव्हा तिथे म्हणे देह नव्हता ,तो पार्थिव देह नव्हता तिथे फक्त फुले होती . तरीसुध्दा अर्धी फुल त्यांनी जाळली आणि अर्धी फुल त्यांनी थडग्यात घातली . अशा अति शहाण्यानं मुळे जो आपल्याला त्रास झालेला आहे तो धर्माच्या बाबतीत किंवा धर्म सोडून देणाऱ्यांच्या बाबतीत दोनीही फार त्रासदायक झाला . आणि त्या मुळे लोकांची दिशाभूल झाली . त्या दिशाभुलीतून माध्यमार्ग काय तो ओळखला पाहिजे .
सहाव्या अध्याया मध्ये ज्ञानेश्वरांनी कृपा करून कुंडलिनी बद्दल माहिती दिली आहे . पण तशी माहिती तेरा चौदा हजार वर्षांपूर्वी कुंडलिनीची माहिती तुमच्या ह्या मार्कंडेयांनी तुमच्या ह्या नाशका जवळ ,वनी येथे च प्रसिद्ध केली आहे . आणि काय ती माहिती आहे ती सुद्धा बघायला तयार आणि कुणी . आणि काय म्हणे सकाळ पासून आम्ही शिवलीलामृत वाचतो . किंवा आम्ही मार्कंडेयांचं वाचत बसतो देवी माहात्म्य . एक बोट ठेवायचं ते जिथे जाऊन थांबेल तिथे दुसऱ्यांनी जाऊन दुसरं बोट ठेवायचं आणि वाचायचं . हे तर असच झालं कि मृगजळा मध्ये अंघोळ करून म्हणायचं कि आम्ही गंगेत न्हालो . अशा ह्या विक्षिप्त प्रकारामुळे पुष्कळशा लोकांनी आता धर्म म्हणजे मूर्खपणा असे एक समीकरण काढले आहे . धर्म हा आतली शक्ती आहे . धारयाती साधर्मा . धारण करणे म्हणजे टिळा लावणे कोणचा तरी ,किंवा आपल्या अंगावर कोणाचा तरी वस्त्र घालणे किंवा स्वतःला काहीतरी संबोधन लावणे आम्ही अमके आम्ही तमके हि धारणा नव्हे . धारणा जी होते ती आपल्या नसानसातून झाली पाहिजे . जो पर्यंत ती धर्मधारण होत नाही तो पर्यंत माणूस सुधारू शकत नाही . आता आपण लक्ष द्यावं कि ह्या महाराष्ट्रात ,हा महाराष्ट्र आहे . सर्व राष्ट्रात उच्च असा तो महाराष्ट्र अनादी काळापासून त्याच नाव महाराष्ट्र आहे आणि किती साधू संतांनी इथे जन्म घेतला आणि केव्हढ इथे कार्य केलं . त्यांनी सगळ्यांना एकच दर्शन दिल आहे आणि सांगितलं आहे तुम्ही आत्म्याला मिळवा . नामदेवांनी किती वर्षांपूर्वी हा खेडोपाडी हा जोगवा म्हंटला कि आई मला हा योग दे . सगळे म्हणतात पण टाळ कुटत . आई समोर बसली असली तरी तो योग काय आहे हे समजून घ्यायला कोणी तयार नाही टाळ कुटत बसले सगळे . हे सगळं काही आपल्यासाठी संतसाधुनी केलेल आहे आणि त्यांची आपल्यावर फार कृपा आहे . आणि त्या कृपेतच महाराष्ट्रात सहजयोग फार झपाट्याने वाढत आहे . पण असं लक्षात घेतलं पाहिजे कि हे साधू संत कोणतेही चुकीचं काम करत नव्हते . ते दारू पीत नव्हते ,त्यांना व्यसन नव्हती ,त्यांना छंद नव्हते त्यांना काही नव्हतं . हे कसे झाले यांच्या मध्ये हे गुण आले कसे ?मानवा मध्ये ज्या चुका होतात किंवा मानवाला ज्या गोष्टींन बद्दल फार महत्व वाटत ,जे जेवणाचं महत्व ,खाण्याचं महत्व झोपण्याच महत्व ,याच महत्व हे सर्व त्यांच्यात का नव्हतं ?फक्त ब्रम्हानंदी टाळी लावून ते बसले हॊते . ते कोण होते आणि असं का करू शकले ,त्यांनी काय मिळवलं होत ,त्याच्यात काय झालं होत ते आता तुमच्या समोर बसले आहेत . हे पंधरा देशाचे लोक आहेत पंधरा देशाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत . आणि ह्या पंधरा देशाच्या प्रतिनिधींनी तुम्हाला दाखवून दिल कि सगळं काही सोडून असंगात उतरले आणि तुमची भाषा काय मारवाआणि श्री सारखे राग सुध्दा म्हणतात जे आपल्या सर्वसाधारण मराठी माणसाला समजत सुध्दा नाहीत . तुमच्यात सर्वतऱ्हेचे जे सांस्कृतिक जे जे प्रकार आहेत ते सर्व त्यांना माहित आहेत . तुमचेच नाहीत तर उत्तर हिंदुस्तानातले माहित आहेत ,बांगलातले माहित आहेत सगळ्यांचे माहित आहेत . त्यांनी झाडून सगळं काही माहित करून घेतलं आहे . त्यात महाराष्ट्राला वरण केलं आहे . आणि आता सगळे मराठी शिकत आहेत . तेव्हा हि जी मराठी भाषा आज इथे परकी झालेली आहे ती मी परक्या देशामध्ये घरची करणार आहे . पण आपल्या लोकांची काय स्तिती आहे ते मात्र बघण्या सारखं आहे .
आरडाओरडा करू आपण हे असं शासन आहे . ह्या शासना पासून असा त्रास होतो आहे . मग दुसरा आरडा ओरडा सुरु होतो कि शेतकऱ्यांना मग खायला प्यायला मिळाले पाहिजे . त्यांना अमुक झाले पाहिजे . मग तिसरा ओरडा सुरु होतो कि कामगारांना हे पाहिजे . आणि मग गरिबी हटाओ आणि मग अमका तमका हे सगळं सुरु होत . सगळं म्हणजे आत्म्याची गरिबी आधी हटवली पाहिजे . आत्म्याची जेव्हा गरिबी जाते तेव्हा मनुष्य जसा बनतो ते यात पाहण्यात येते . आपल्याला माहित असेल आज इंग्लंड मध्ये सगळ्यात जास्त बेकार लोक आहेत . त्यांना तिथे धंदा नाही . धंद्या शिवाय नोकरी शिवाय असे अनेक लोक आहेत . आणि इतके लोक आहेत कि सगळ्या जगात इतक्या टक्क्यांनी लोक नसतील . पण ते सर्व लोक जरी कितीही असले तरी सुध्दा त्यातून जितके आमच्या कडे आले त्या सगळ्यांना नोकऱ्या मिळून त्यांचं सगळं व्यवस्थित झालं .
आता आपल्या मराठी माणसाला जो पर्यंत पैसे आणि नोकरी बद्दल काही बोललं नाही तर काही डोक्यात जात नाही . म्हणून आधी सांगावं लागत कि सहजयोगात आले तर तुमच्या लक्ष्मी तत्वाला पोषक असे जे आहे ते मिळत आणि त्या मुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारते . मग पुढे ,असं का ,मग आम्ही येतो सहजयोगात . तर पहिली गोष्ट लक्षात हि ठेवली पाहिजे कि आपल्या नाभी चक्रामध्ये लक्ष्मीचे स्थान आहे . जेव्हा हे नाभी चक्र खराब होत त्या वेळी आपल्याला लक्ष्मीचा त्रास होतो . तर आपल्या महाराष्ट्रात नाभीवर काय काय प्रकार आहेत ते सर्व पाहिलं पाहिजे . पहिल्यांदा नाभी चक्रावर डावीकडे जर तुम्हाला भूतबाधा झाली तर तुमच्या इथून लक्ष्मी तशीही पळून जाते . भूतबाधा होण्याचं कारण म्हणजे हे जेव्हडे उपटसुम्भ आहेत हे सगळे प्रेतविद्या ,स्मशानविद्या करत असतात . आणि स्वतः तुम्हाला मी याला मारून टाकीन ,त्याच वाईट करून टाकीन ,तुझ्या मनात असं आहे असले मन कवडे पणाचे धंदे करून तुम्हाला चमत्कारात घालतात . आणि तुम्ही पण ते सर्व मान्य करत असता . ह्या लोकांच्या मागे लागून तुम्ही जे गंडे दोरे बांधलेले आहे त त्याची भूतबाधा होते . त्यांनी अनेक तऱ्हेचे प्रकार होतात . अपघात होतात ,त्यांनी तुमच्या जवळ लक्ष्मी राहू शकत नाही . दुसरी गोष्ट म्हणजे दारू . ह्या दारातून बाटली अली कि तिकडन लक्ष्मी पळाली . तीन पहिली कि बाटली आणली ,रिकामी आणली तरी सुध्दा . रिकाम्या बाटलीतून तुम्ही नुसतं पाणी प्याले तरी ती तिकडून पळून जाणार . आता ते हि खूप बोकाळलेले आहेत कारण आता फॅशन झाली आहे . आता जे लोक खूप गमजा मारतात कि आम्ही खूप पैसे कमावले कसे ते ब्लॅक कि व्हाईट कशाचे . उद्या तुम्ही त्याला हातामध्ये झोळी घेऊन भीक मागताना पहाल . कारण त्याच्यात छिद्र पण पुष्कळ आहे . त्यातलं हे दारूचं व्यसन . आणि तिसरं म्हणजे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत शंभरदा खोट बोलल्या वाचून माणसाचं पोट भरत नाही . मग ते खोटच पोटात जात आणि सत्य बाहेर पडून त्या बरोबर लक्ष्मी हि बाहेर जाते . तर लक्ष्मी म्हणजे काही नुसता पैसा नव्हे . एक संतुलन आहे फार मोठ ते संतुलन तुम्ही आचारल्या शिवाय लक्ष्मी घरात रहात नाही . आपण पाहिलं आहे कि लक्ष्मी एका कमळावर उभी असते . म्हणजे तिला उभ रहायला काही लागतच नाही . ती कुणावरच आपलं वजन घालत नाही . नाहीतर आपल्याकडे कुणाजवळ चार पैसे झाले ,एखाद्या भामट्याने दहा पैसे एकत्र केले समजा गुरु बनून तर लगेच तो एक शाळा काढतो . आता हि मी तुमच्यासाठी शाळा काढल्या बरोबर लगेच लागले सगळे त्याच्या पायावर . अहो शाळा काढायला कुणी आत्मिक माणूस कशाला लागतो ?कुणीही शाळा काढू शकत . पण हा एक भुलवा देण्याचा प्रकार कि आम्ही एक शाळा काढली ,नाहीतर आम्ही एक मोठ कॉलेज काढलं आहे . आता त्या कॉलेज मधले किती पैसे तुम्ही मारले ते देवाला माहित . त्या कॉलेज च्या नावाने पैसे एकत्र करायचे अर्धे अधिक पैसे मारून घ्यायचे आणि त्या कॉलेज मध्ये जेव्हडे विद्यार्थी जातील त्यांचे कडून पण पैसे घ्यायचे . म्हणजे ते एक पैसे कमावण्याचे साधन तुमच्या डोक्यावर मांडलेलं आहे कारण त्यांनी आमच्या साठी शाळा काढून दिली . म्हणून जसे काही खैराती लोक असतात अगदी भिकाऱ्या सारखं त्यांच्यावर अगदी अनुरूक्त होऊन हे आमचे अगदी फार मोठे गुरु आहेत अशी मांडायची एक फार मोठी पद्धत आहे . आज काल नवीन नवीन प्रकार सगळे गुरु लोक करत आहेत . आम्ही तसला कसलाही प्रकार जाणत नाही . अर्थात उद्या जर गरज पडली तर आम्ही शाळा हि उघडू पण सहजयोगाची शाळा उघडू . ज्याच्या मध्ये मुलांना ती किमया मिळेल ज्यांनी त्याच्या मनामध्ये एक प्रकारची परमेश्वरी भक्ती आणि त्या नंतर कुंडलिनी जागृत होऊन त्यांच्यात मन्वंतर होईल .
जो पर्यन्त माणसामध्ये बदल होणार नाही तो पर्यंत आजची परिस्थिती ठीक होणार नाही . आता शेतकऱ्यांना पैसे मिळत नाहीत मग दारू कशी पितात ?जो माणूस दारू पितो त्याच्या जवळ जास्त पैसे आहेत अस माझ मत आहे . मग तो श्रीमंत असो कि गरीब असो . जर दारू प्यायला तुमच्या जवळ पैसे आहेत तर तुम्हाला पैशाची कमतरता कशी ?आणि ते असं आहे कि इकडे दारू प्याली कि लक्ष्मी नाही आणि लक्षमी नाही म्हणून दारू प्यायची म्हणजे अजून लक्ष्मी नाही मग शेवटी कुठेतरी जाऊन गटारात मारायचं . ती व्यवस्था पूर्णपणे घेऊन आपल्या नशिबात आपण घेऊन आहोत . ह्या सर्वातून जो पर्यंत आपल उत्थान होणार नाही ,जो पर्यंत आपण असा विचार करणार नाही कि आपल्यामध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे ,काहीतरी परिवर्तन व्हायला पाहिजे ,आपण समर्थ झालं पाहिजे आणि आपण समर्थ नाही आपल्या मध्ये कितीतरी कमतरता आहेत . काही दिसलं कि आपल तिकडे लक्ष जात त्याला कारण काय ?आपल्या मध्ये फार मोठी शक्ती आहे ती आपण ओळखलेली नाही . ती एकदा का जागृत झाली तर तुम्ही कुठल्या कुठे पोहोचाल . प्रत्येक बाबतीत त्या शक्तीला आपण मिळवलं पाहिजे . उद्या जर तुम्हाला आम्ही सांगितलं कि तुमचा एक खजिना गाडलेला आहे अशा ठिकाणी तर तुम्ही रात्र असो दिवस असो धावत पळत त्या ठिकाणी जाऊन ते उकरून काढाल . पण आज जो खजिना आम्ही सांगतोय तो तुमच्या सगळ्या मध्ये आहे ,तुज आहे तुज पाशी सांगितलेलं आहे . ज्ञानेश्वरांनी पसायदान देण्याची विनंती केली कि आम्ही द्यायला आलो आहोत तुम्हाला सगळ्यांना . पण घेणारे तर पाहिजेत . घेणारे तर पाठ फिरवून बसलेत मग करायचं काय ?तेव्हा ते पसायदान आज तुम्ही घ्यावं ,आपला आत्मसाक्षात्कार घ्यावा .
हि एक जिवंत क्रिया आहे . हि सायन्स च्या पलीकडे ,बुद्धीच्या पलीकडे ,मानवाच्या पलीकडची आहे पण त्याच्यात माणूस अति मानव बनून जातो . आणि त्यात हे अस सहजच अगदी सहज मन्वंतर घडत . आणि त्या एकंदर नव्या प्रकृतीत त्या एकंदर नव्या व्यक्तिमत्वात माणूस चमकून उठतो . आता याची अनेक उदाहरण आम्ही तुम्हाला देऊ शकतो पण त्यातली जी फार तुम्हाला रुचकर वाटतील त्यातलं हे एक कि ढ मूल असतील तर फर्स्ट क्लास मध्ये पास होतील . जर तो संगीतकार असेल तर तो संगीतामध्ये फार वाढतो . सहजयोगात आल्या मुळे फार मोठे संगीतकार अमजद अली आहेत ते सहजयोगात आल्या मुळे फार मोठे संगीतकार झाले . असे अनेक संगीतकार झाले . त्या नंतर कसल्याही तऱ्हेचे रोग रहात नाहीत . सर्व प्रकारचे रोग सहजयोगाने ठीक होऊ शकतात . पण पहिल्यांदा तुम्ही सहजयोगी असायला पाहिजे . जो माणूस सहजयोगी नाही आणि तो म्हणेल मला ठीक करा तर मी मुळीच ठीक करणार नाही . कारण तुम्ही अजून परमेश्वराच्या साम्राज्यात आलेले नाही आहात . उद्या जर तुम्ही इंग्लंड ला जाऊन म्हणाल कि आम्हाला इंग्लंड च्या राजाने तिथे आहे तशी सर्वांची व्यवस्था करावी तर ते होणार नाही . तुमचं हेच सरकार बरे असं म्हणतील . तेव्हा हे सरकार सोडून तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात उतरत नाही तो पर्यंत परमेश्वराने तरी तुमची दखल का घ्यावी ?नुसत तुम्ही जर शिवलीलामृत वाचून वाचून म्हणत असाल कि परमेश्वर तुमच्या दारात उभा राहील तर तस शक्य नाही . आधी तुम्हला परमेश्वर मिळवला पाहिजे त्याच्या साम्राज्यात उतरल पाहिजे हा योग घडला पाहिजे ज्या बद्दल अनेक साधुसंतांनी सांगितलेलं आहे ते घटीत झालं पाहिजे . त्याला काही मोठी परीक्षा करायला नको किंवा फार मोठे आपण बॅरिस्टर नकोत किंवा काही विद्वत्ता नको . खेडेगावात जास्त बर असत . कारण हे जे अर्ध विकसित झालेले डोकं आहे ते सहजयोगाला घातक आहे . ना धर इकडे ना धर तिकडे . त्या पेक्षा हे लोक बरे ज्यांनी संबंध सायन्स चा अंत पाहिलेला आहे आणि त्या नंतर तिथे काही मिळत नाही असा विचार करून ,त्यात काही शांती मिळत नाही असा विचार करून आज सहजयोगाला धावून आले आहेत .
पण आपल्या देशात ना इकडे ना धड तिकडे असे मधोमध लोम्बकळणारे लोक आहेत ते सहजयोगाच्या कामाचे नाहीत . जे इकडून तिकडे तिकडून इकडे पेन्डूलम सारखे फिरत आहेत . तेव्हा तुम्ही काय आहात ते ओळखलं पाहिजे . तुम्ही आत्मा आहात . आत्म्याची शक्ती वर्णावी तेव्हडी थोडी आहे . वर्णावी तेव्हडी थोडी आहे आणि इतकी ती आनंदमयी ,सुखदायिनी आहे . इतकच नव्हे पण शक्तीदायिनी आहे . कि तुम्ही जसकाही एखादा दिवा पेटवावा . तो दिसायला काही दिसत नाही पण पेटवल्यावर सगळा अंधार नष्ट होतो तशीच तुमच्या व्यक्तित्वाला एक नवीनच धार येते . नुसतं लेक्चर देऊन ,आश्वासन देऊन ,मूर्खपणा करून जर समजा कोणी फार मोठा दिसला आणि गळ्यात हार घालत असले त्याच्या सगळे तरी पाठीमागे सगळे जण म्हणतील कि हा भामटा आहे असा . पाठीमागे त्याची स्तुती करणारे कोणी नाही . तेव्हा ह्या सर्व गोष्टीन कडे लक्ष देऊन पहिल्यांदा तुम्ही आत्मसाक्षात्काराला प्राप्त व्हा .
आता हि शक्ती आहे किंवा नाही या बद्दल उहापोह करण्याच्या ऐवजी तुम्ही आहे हे माझ ऐकून घ्या आणि त्याला प्राप्त करून घ्या . जस काही एखाद बी तुम्ही त्या मातेच्या उदरात पेरता आणि ते आपोआप उगवत आणि ते अनुभवाने सिध्द होत . तुम्ही आपल्या आईवडिलांचे ऐकलं असेल पाहिल असेल तसच आज पहा तुमच्या समोर कस झालं आहे ते . हे अनुभव सिध्द आहे . आता भारतातल्या लोकांना येऊन मला सांगावं लागत हे या पेक्षा दुर्दैवी गोष्ट काय आहे ?त्यांना ह्या कुंडलिनीतला कु सुद्धा माहित नव्हता ते त्यांनी एव्हडं पार करून घेतल . आणि आपण सगळे एव्हड्या मोठमोठ्याल्या संतसाधूंचं करत बसतो तर आपल्याला काही माहित नाही . काही सुध्दा तिकडे लक्ष नाही ,आत्म्या कडे लक्ष नाही . आता पुण्याहून निघताना रस्त्यानी रांगावररांगा . कुठे निघाले सगळे पायी तर म्हणे आळंदीला . डोक्यावर एव्हड्या मोठयला घागरी त्यांचं डोकं नुसत दाबून राहील होत बिचाऱ्यांचं . त्यावर मोठ्मोठ्याला डोक्यावर तुळशी घेऊन आळंदीला निघाले म्हणे . अरे तिथे काही गरज नाही म्हणावं त्यांना . ते कोणचे आळंदीला गेले होते त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या . तेविसाव्या वर्षी सगळ्या जगात मोठा कवी झाला ह्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वर . पण पालथ्या घागरीवर पाणी . आणि त्यांनी जस आयुष्य काढलं ,कधी कुणाकडे भीक मागायला गेले नाहीत आणि इथे त्यांची पालखी काढतात . कसली पालखी आणि कसलं काय . ज्या माणसाने आपले पाय भाजत पोळत हा सगळा महाराष्ट्र आपल्या पाया खाली घातला त्याच्या आता पालख्या काढतात . मी खर तेच सांगणार कारण मी तुमची आई आहे . आणि ते पालख्या काढून , त्याच्यात ते वहाणा घालून भीक मागत जायचं रस्त्यानी देवाच्या नावावर . अरे तो देव म्हणजे कुबेर आहे .
एकदा अकबरला प्रश्न केला कुणीतरी मग त्यांनी बिरबलाला विचारलं का रे ह्या जगात सगळ्यात अधमात अधम कोण ?त्यांनी सांगितलं देवाच्या दारात बसून जे भीक मागतात ते सगळ्यात अधम . अधमात अधम . आणि देवाच्या नावावर जे पैसे खातात त्याहून अधम कोणी नाही . नाशकाला असे पुष्कळ आहेत . तुम्ही मोजून घ्या . नंतर पुढे आलो तर जैनांचा थवा च्या थवा जसकाही त्याना दाखवण्या साठी समांतर दिशेने चालले आहेत . इकडून हे आणि तिकडून ते . आणि त्यात ते दोन प्रकारचे जैनी . एकानी तर ते तोंडाला बांधून बिंधुन काय चालले होते . किडे माकुडे वाचवत . आता त्या किड्या माकुड्याना का मी आत्मसाक्षात्कार देणार आहे का कोंबड्याना देणार आहे . देवीला तर सारखी कोंबडी आणि बोकडचं पाहिजे . हे तर माहित आहे तुम्हाला . कोंबडी आणि बोकडाला वाचवून करायचं काय आहे . ते तर सोडाच ते मच्छर आणि ढेकूण सुध्दा वाचवतात . म्हणजे हा मूर्खपणा कुठवर गेला आहे ते पहा . आणि त्यात पुढे चालले नागडे उघडे . म्हणजे बायकांनी डोळे मिटून जायचं का ?हा प्रकार काय आहे . त्याच्या पुढे आम्ही आलो भिवंडीला म्हणजे सगळ्यांचं दर्शन एकाच वेळेला व्हायचं होत ते झालं. भिवंडीला सगळे मुसलमान त्याच वेळेला नमाज पडून बाहेर सगळे आले घाणेरड्या त्या लुंग्या घालून खाजवत खाजवत मारत एकदुसऱ्याला . भांडण करत . कशाला गेले तुम्ही नमाज पडायला . हा सगळा प्रकार पाहून कोणीही बुध्दिवादी म्हणेल हा धर्म असला तर नको रे बाबा . पण हा धर्म नव्हे .
धर्म म्हणजे परमेश्वरच पूर्ण ज्ञान असणं त्याचे कायदे कानून माहित असणं ,त्याच्या साम्राज्यात उतरण आणि स्वतःला समर्थ करून घेणं . हा खरा धर्म आहे . आणि बाकीचं हे जे थोतांड आहे ते पैसे कमावण्या साठी बनवलेलं आहे . हे जर तुमच्या डोक्यात येत नसलं तर तिकडे हे अंधश्रद्धा खुळ आणि इकडे ते बुध्दीजीवी लोकांचा शहाणपणा याच्या मध्ये कोंडमारा होणार आहे तुमचा . हि बुद्धीने समजणारी गोष्ट नाही . परमेश्वरनी हि सृष्टी बनवली ती तुम्हाला त्याचा साम्राज्यात येण्या साठी . त्याच्या सौख्याला आणि आनंदला पारावार राहणार नाही जेव्हा तो बघेल कि ह्या नाशका मध्ये खरोखरच एक नवीन जागृती झाली आहे . ह्या नवीन जागृतीची गरज आहे . आणि ती तुमच्यातच आहे . त्याच्यासाठी आम्हाला काही करावं लागत नाही . आणि उगीचच लोक मला धन्यवाद देतात .
अहो तुमचंच आहे ते आम्ही तुम्हाला फक्त दिल समजा तुमच्या घराची किल्ली जर तुम्हाला कोणी दिली तर त्याला कितीदा धन्यवाद द्यायचे . आणि आमचं काही विशेष नाहीच . कारण आमचं जे आहे ते अनादी आहे . जे आमच्या आहे ती शक्ती ती अनादी आहे आम्ही काही मिळवलं नाही . काही आम्ही मेहनत केली नाही काही नाही आमच्या जवळ आहे ते सहजच आहे . पण तुम्ही मिळवलं ते त्यात तुमचं वैशिष्ट्य आहे . आणि त्या वैशिष्टया साठीच म्हणून मी गावोगाव फिरते आणि लोकांना सांगते कि आता मिळवून घ्या . वेळ फार कमी आहे . मिळवलं हे पाहिजेच आणि हे तुमच्यात सगळं आहे हे कुंडलिनीच काय ज्ञान आहे ते अगदी लहान मुलाला पण कळत . एव्हड्या लहान लहान मुलांना पण कळत त्यांना सुध्दा सांगावं लागत नाही . ते सुध्दा समजतात कुंडलिनी कुठे आहे ?कुठे अडकली आहे . ?तेव्हा तुम्ही सुध्दा शहाणपणा धरून आत्मसाक्षात्कार घयावा .
पण आत्मसाक्षात्कार झाल्यावर ,आता माताजी आल्यावर काहीतरी विशेष असत पुष्कळ अगदी हॉल भरून लोक येतात . कुठेही गेलं तरी . परवा मी मोघोट्याला गेले होते साहेबानं बरोबर . पण ह्या वेळेला आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्यांना काहीही माझ्या बद्दल माहिती नाही काही नाही . नुसते माझे फोटो लावले होते . तर या हि पेक्षा डबल तो हॉल त्याच्याही डबल तिकडे बाहेर अंगण होत . त्या सर्व अंगणा मध्ये ते सर्व लोक भरलेले आणि मला आतमध्ये जाण्याची सोय नाही . कसेतरी रस्ता करत करत आत मध्ये पोहोचले मी . इतकी गर्दी . पण मग मी गेल्यावर जसकाही एखादा समुद्र ओसरावा आणि तो जाऊन दोनतीन मैलावर पोचावा तशेच हे सगळे आत्मसाक्षात्कार प्राप्त होऊन लोक तशेच जातात . जस काही मी एकदम खडकाळ जमिनीवर मी पाणी ओतलं आहे . बी जरी अंकुरल असल त्याला वृक्ष व्हावं लागत नाहीतर त्याला काहीही अर्थ रहात नाही . आणि ते वृक्ष व्हायची शक्ती असताना ते का होऊ नये ?ते का मिळवू नये ?आणि तुम्हाला कसलाही त्याग करायला नको . आम्ही समर्पणाच्या गोष्टी केल्या तर लोक अर्धे उठून जातील . कसलेही समर्पण करायला नको . पहिली गोष्ट . तुम्ही दारू पिता काही हरकत नाही ,सिगरेट पिता काही हरकत नाही . आधी आमच्या गल्लीत या मग बघू . सुषुम्नेत आल्यावर तुमचं आपोआप सुटणार मला सांगायलाच नको . आणि जर का ती एकदा जागृत झाली कि तुम्ही आपोआप सुटून मोकळे होणार . यातले पुष्कळ लोक एका रात्रीत सगळं सोडून मुक्त झाले आहेत . मी कोणालाही म्हंटल नाही कि तू असं करू नकोस तस करू नकोस म्हणून . कारण तुमचाच आत्मा जेव्हा प्रकाश देईल तेव्हा हातात धरलेला हा साप हा आहे हे समजून तुम्हीच सोडून टाकाल . मला सांगायला नको . तेच तुम्हीच तुमचे गुरु होता आणि तुम्हीच स्वतःला ठीक करता . मला काही हि सांगायला नको . फक्त समर्पण असल पाहिजे अहंकारच . अहंकार नको . कारण अजून मी जाणलेलं नाही अजून मी मिळवलेलं नाही हा एक विचार मनात पाहिजे . तस तुम्ही मला देणार तरी काय ?ते तर तुमच्यात आहे ,फक्त एक प्रेम शिवाय . आणि प्रेम नाही दिल तरी आमचं प्रेम वहात च राहणार आणि रात्रंदिवस त्या वाहण्या साठी आम्ही प्रयत्न करतच राहणार . इतक्या वर्षांपासून मी नाशकाला आलेली आहे निदान ह्या वेळेला तरी काही लोकांनी आत्मसाक्षात्कार घेऊन गंभीर पणाने विचार केला पाहिजे कि आमच्या मुलांसाठी आम्ही काय ठेवलं ?मुलांना आम्ही काय देणार आहे काळे पैसे देणार आहोत कि काळे लोक देणार आहोत . अशी उज्वल लोक आपल्या आहाराष्ट्रात नको ?असे योगिजन तुम्हाला महाराष्ट्रात नको . तस संसार सोडायला नको ,घर सोडायला नको . उलट जो संन्यासी असेल त्याला आम्ही आत येऊ देतो . त्याला म्हणतो तू कपडे बदलून इकडे ये . हि सगळी सोंग करायला नको . आतून माणूस आपोआप सन्यस्त होऊन एका सुंदर वातावरणात रममाण होतो . आणि जी शांती आहे ,शांती ची पै शांती ती जी शांती आहे शांतीचा जो आधार ती शांती तुम्हाला मिळते . त्या शांती मध्ये माणूस अत्यंत सुंदर अत्यंत आकर्षक आणि अत्यंत प्रभावशाली होतो . त्याच संबंध आयुष्याचं बदलून जात . आणि त्याला एक तऱ्हेचा स्वतः बद्दल आदर ,मान्यता येऊन त्याला समजत कि हे माझ आयुष्य वाया घालवण्या साठी नाही आहे . जगाला प्रकाश देण्यासाठी आहे .
तरी आज सगळ्यांना हात जोडून विनंती आहे कि जरी मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार देईन एक वाचन मनाने तुम्ही मला द्यायला पाहिजे कि आत्मसाक्षात्कार घेतल्यावर तो तुम्ही वाढवा . आणि त्याच्या वृक्षा मध्ये तुम्ही उभे राहा . नुसत आत्मसाक्षात्कार घेऊन थोडं बरे वाटेल ,तुम्हाला फायदा होईल ,तुम्हाला वाटेल वा वा झालो आता आम्ही अगदी अवधूत झालो . तस होत नाही . अजून तुमचा वृक्ष एका रोपाच्या स्तितीत आहे . हे रोप फार जपून ,हळू वापरल पाहिजे .
त्या तिथे इतके मोठे डॉक्टर सांगवी आहेत नाशकाला . सहजयोगात रममाण झालेले त्यांच्या घरातले सगळे कुटुंबीय आहेत आणि तुमच्या साठी इतकी व्यवस्था असून सुध्दा जर तुम्ही सहजयोग केला नाही तर उद्या परमेशवर काय म्हणेल तुम्हाला . हि सगळी व्यवस्था असून सुध्दा तुम्ही हा मार्ग का स्वीकारला नाही ?जो यशाचा ,क्षेमाचा आणि मोक्षाचा आहे . आता मागच्या वेळेला तर लोकांनी शंभर प्रश्न विचारले होते . त्या मुळे सगळ्यांनी येऊन सांगितलं माताजी नुसते चिकिसक लोक आहेत . इतके तर पुण्याचे सुध्दा नाहीत . आणि हाती चार सुध्दा लोक लागत नाहीत . तेव्हा चिकीसा करून होणार नाही हे तुमच्या हितासाठी आणि भल्यासाठी आहे . मला तुमच्या पासून काहीही घ्यायचं नाही . तुम्हाला जर तुमचं हित साधायचं असेल तर तुम्ही आत्मसाक्षात्कार घ्यावा हि विनंती . पण त्या वरही काही जर सुसंबंधित प्रश्न असले तर ते विचारा . ते मी उत्तर द्यायला तयार आहे . पण उगीचच भरकटला सारखे प्रश्न विचारू नका . किंवा असं कि त्या गुरु बद्दल तुमचं काय मत आहे . ?फलाना गुरु बद्दल तुमचं काय मत आहे ?अहो तुम्ही जो पर्यंत प्रकाशित होणार नाही तो पर्यंत तुम्हाला कस कळणार कि खरा गुरु कोण आणि खोटा गुरु कोण . जो मिलनात बसला आहे त्याची ऐटच वेगळी असते . शान च वेगळी असते . ते तुम्हाला कळत नाही . जो तुमच्या समोर हात पसरतो आणि जो तुमच्या पैशावर जगतो तो माणूस कसला गुरु आणि कसलं काय ,काय त्याच्यात अध्यात्म असणार . कोणी तुम्ही अध्यात्मिक माणसाला विकत घेऊ शकत नाही . हि काही भाजी नाही बाजारातली . आईच्या द्रीष्टीने जे सांगायचं ते मी तुम्हाला सांगितलं आहे . आणि आईच्या द्रीष्टीने जे काही कार्य करायचं ते हि मी करणार आहे . अत्यन्त प्रेमाने आणि सर्व तऱ्हेने सांभाळून पण तुम्ही सुध्दा त्याला सज्ज असायला पाहिजे . त्याला पाहिजे जातीचे जी गोष्ट म्हटली आहे ते लक्षात ठेवलं पाहिजे . आणि जो शिवाजी महाराजांनी स्वधर्म जागवावा असं म्हंटल आहे ते कार्य आम्ही करत आहोत तुमच्यातला स्वधर्म जागवत आहे . बाहेरचे धर्म सोडा . नुसते नावापुरते आहेत .
आता हिंदू धर्म हिंदू धर्म काढलेला आहे . हा हिंदू हा शब्द आला कधी ?हा अलेक्झांडर आला इथे तेव्हा . आणि पण भारतीय संस्कृती किती जुनी आहे तुम्हाला माहित आहे इंग्लंड ला सुध्दा सर्व भारतीय संस्कृती आहे .मला आश्चर्य वाटत . तिथे सुध्दा आपले भारतीय बरेच वर्षांपूर्वी राज्य करत होते . ते मी तिथे जाऊन सिध्द करू शकते . बघा त्यांच्याकडे डिसेम्बर हा शब्द आहे . आता शंबर म्हणजे दहावा महिना . आपला आता शालिवाहन शतका मध्ये डिसेम्बर चा महिना म्हणजे दहावा महिना पडतो . आणि दिसतंय सप्टेंबर ,ऑकटोबर ,नोव्हेम्बर म्हणजे त्यांनी सांगितलं कि नऊ . पण यांच्या मध्ये नऊ नाही तो अकरावा पडतो कारण अंग्रेजी आल्यामुळे त्यांनी गडबड केली . इतकं आहे . एम ,पीएम सगळं काही तेच आहे . m म्हणजे मार्तंड अभ्युदय झाला तो मार्तंड आणि पतनात पडला तो मार्तंड असं एम आणि पिएम आहे . अशा अनेक वस्तू आहेत त्यांनी मी सांगू शकते तुम्हाला कि तिथे आपल्या भारतीय लोकांचं साम्राज होत इतकच नव्हे तर कुंडलिनीच सुध्दा कार्य होत होत . तिथे स्टोन एज म्हणून जागा आहे आणि तिथे कुंडलिनीच कार्य होत होत . कारण तो तसाच प्रकार आहे तो . तिथे स्वयंभू दगड आहेत . पण आता भारतीय लोकांना सांगितलं तर उगीचच ऐट करणार कि आम्ही मोठे हे आहोत . पण इंग्लिश लोकां पेक्षा तुम्ही पुष्कळ बरे आहात हे लक्षात घ्या . फक्त अध्यात्माला कच्चे आहात . तशी माणस चांगली आहेत पण अध्यात्माला फार कच्चे आहात तुम्ही . अध्यत्माची बैठक पाहिजे . बैठकी शिवाय काय होत ,आणि एकदा का नेट लावला ,थोडं सुरवातीला जड जात पण जर का तुम्ही थोडासा नेट लावला तर घसरलेच आनंदाच्या सागरात . मग बाहेर निघायची काही सोय नाही .हो मग आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत अशीच पत्र येतात मला . तेव्हा सगळ्यांना हा अलभ्य लाभ लाभावा म्हणून च आम्ही आपल्या दारी आलो आहोत . आता गंगा जर दारी अली तर तिचा स्वीकार हा केला पाहिजे आणि ते मान्य केल पाहजे .
आता काही प्रश्न असतील तर विचारा . त्यांना म्हणावं हे खोट आहे . असं काही च नाही संन्यासी होण्याची काहीच गरज नाही . संन्यासी काय व्हायचं ,देहात उतरल्यावर सन्यास घ्यायची काय गरज आहे . उलट हि जी लग्न झाली आहेत त्याच्यात भांडण होत नाहीत ती मोडत नाहीत . आणि त्यांना जी मुल होतात ती सगळी साक्षात्कारी मूल होतात . आणि फार उच्च प्रतीची मुल होतात . पण आता बघा आपण असा विचार करावा कि साधुसंत आहेत त्यांना सुध्दा ह्या वेळेला जन्म घ्यायला हवा . पण जर त्यांचे आईवडील आत्मसाक्षत्कारी नसतील तर त्यांनी कोणाच्या घरी जन्म घ्यावा . ते सुध्दा वाट बघून राहिले . कि जर एखादा आत्मसाक्षात्कारी भेटला तर आम्ही त्यान च्या दारी येणार . आणि म्हणूनच अशा लोकांचं आयुष्य इतक सुंदर होत . आता तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आमची लग्न आम्ही देशाला सोडून परदेशात केली . कुठेही कोणतीही जाती धर्म बाह्यतल्या गोष्टी सगळ्या काढूनच टाकल्या . कारण त्याचे अनेक प्रकार तुम्ही बघता . आता आम्ही मराठा आणि ते हि शहानूऊ कुळी . म्हणजे त्या शहानूऊ कुळीतच लग्न झालं पाहिजे . बरका आणि त्यातल्या त्यात आत्याच्या घरी झालं तर बर . म्हणजे तिथल्या तिथे प्रॉपर्टी राहील . मग ती मुल कशी का होईनात का . बर मग ते शहानूऊ कुळीत झालं समजा आणि उद्या जर मुलीला नवऱ्याने झोडपलं तर ,झोडपतातच . तर त्या कुळीतला एकही मराठा येऊन उभा रहायचा नाही . कि बाबा तू कशाला असं केलस . पण सहजयोगात तस नाही खबरदार . सहजयोगात जर लग्न झालं तर व्यवस्थित रहावं लागत . आणि जर त्रासच दिला कुणी तर सोडता येत . काही तुम्हाला बंधन नाही कुना बाईला कि तू मार खात बस कुणी जर मारल किंवा हात उगारला तर ते गेले . पण इतकी शांत प्रवृत्ती होऊन जाते ,आणि लग्ना मध्ये जे एक आपापसातलं सख्य पाहिजे ते इतक बळावत कि सर्वच प्रश्न आपोआप मिटतात . पण आपल्याला सांगायचं म्हणजे यांच्यात एक असं करायला पाहिजे कि हि जी आपण आज मंडळी पाहिली तशीच संबंध भारतात सुध्दा आहेत . आणि हि सामूहिकता साधली पाहिजे . आणि सामूहिकता साधायची म्हणजे हे कार्य सामूहिक आहे . हे एकेका च वेगळ नाही . म्हणजे आता मी माताजी घरी तुमची पूजा करतो ,सगळ काही करतो अस लोक सांगतात . पण तरी सुध्दा मला असा रोग झाला . असं कुणी सांगितल तर मी त्यांना सांगते बघा तुम्ही सामूहिकतेत या . एकदा माणूस सामूहिकतेत उतरला म्हणजे मग त्याला हा त्रास होत नाही .
कालच मला एका परदेशातल्या मुलाने जो इथे ठेवला आहे शिकायला म्युझीक . तो सांगत होता कि माताजी महाराष्ट्रातले लोक जे आहेत याना कुटुंब म्हणजे फार वाटत . माझा मुलगा माझी मुलगी माझ घर हे असं तस फार आहे . इतके चिकटलेले आहेत ते कुटुंबाला कि ते घर सोडून सामूहिकतेत येऊच शकत नाहीत . कठीण काम आहे त्यांचं . परत प्रत्येक नवऱ्याला त्याचे नखरे असतात . कुणाला कारलं आवडत तर कुणाला वांगीच आवडतात . म्हणे त्याला हेच आवडत बाकी कुणी चांगलं करत नाही . त्याची बायकोच चांगलं करते . घरी येऊन बायको वरती तू हे कर तू ते कर हे चालत . आणि ह्या सर्व गोष्टीत इतका त्यांचा जीव अडकला असतो कि ते त्याच्यातून बाहेर निघू शकत नाहीत . पण नशिबाने आमची फॅमिली त्याच्यातून सुटल्या मुळे आम्ही सगळे सामूहिकतेत आलोत आता तुम्हीच आमची आई आणि तुम्हीच आमचे बाप आणि आम्ही सगळे यांच्यात . आता त्यांची लग्न होऊन आता त्यांची मुल असे आम्ही संबंध असे एक विश्व कुटुंबाची व्यवस्था केलेली आहे . आणि ते सगळं विश्व कुटुंब एकत्र झालं म्हणजे एक कौटुंबिक मजा किती येते ते तुम्ही आता पाहिलेलं आहे . तस आपलं एक विश्व कुटुंब निर्माण होत . आणि त्या विश्व कुटुंबात आपण त्यातले एक आहोत ,तेव्हा हे आपलं लहानसे कुटुंब सोडून मोठ्या कुटुंबात आपण उतरतो आणि त्यात संन्यासी वैगेरे मुळीच नाही . उद्या तुमच्या बायकोला काही त्रास झाला तर सतरा बायका तुमच्या धावून येतील आणि तुमची मदत करतील . उद्या जर तुम्हाला काही त्रास झाला तर सतरा मित्र तुमचे धावून येतील आणि तुम्हला मदत करतील . इथे उलट आहे माझ . बाकीच्या जगात काय असत कुणा माणसाला त्रास झाला तर सगळे त्याला अजून दहा दांडके मारतील आणि म्हणतील तू अजून मेला का नाहीस . कुणीही धावून येणार नाही कोणीही मदत करणार नाही फक्त उखाळ्या पाखाळ्या काढत राहतील . परत आपल्या महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा शाप भाऊबंदकी . तो भाऊबंदकीचा शाप सहजयोगात मुळीच नाही उलट भाऊ बंधन जबरदस्त आहे . आता इथून कुणी गृहस्थ आला समजा इंग्लंडला गेला . ह्या लोकांना कळलं कि तो आलाय तर धावले सगळे त्याला आणायला . आपल्या डोक्यावर घेऊन नाचतात . कुठेही तुम्ही जगात जा ,आले का सहजयोगी . मग झालं . एक जरी आला तरी एव्हडा मौल्यवान . मग त्याला काही विचारू नका . हातोहात घेतील कुठेही जगाच्या पाठीवर गेलं तरी . जीव तोडून . त्याला जे काही पाहिजे ते . त्याला जर गावात फिरायला जायचं झालं तर त्याच्या साठी सुट्या घेतील . फिरतील . एव्हडं प्रेमाने सगळं काही करतात . ते बघून माझ सुध्दा हृदय भरून येत . अहो आता तो म्हणत होता ना अंग्रेजी माणूस आहे . हे लोक पूर्वीच्या काळी आपल्या देशावर राज्य करत होते . आमचे वडील पण काँग्रेस चे जुने कार्यकर्ते आणि आम्हीही पुष्कळ सहन केलेलं आहे . तेच लोक आता येऊन तुमच्या खेडेगावात शेतकऱ्यांच्या गळ्यात गेले घालून रडतात . त्यांना खूप मिठ्या मारतात . तुम्ही खूप बघण्या सारखं आहे हे . हे प्रेम आलं कुठून . हि माया अली कुठून ?त्या आत्म्याच्या दर्शनाने . आत्मा म्हणजे कणखर गोष्ट नाही आहे . तेव्हा सांगायचं असं कि सामूहिकतेत उतरलं पाहिजे आपण . ह्या लोकांशी भेटलं पाहिजे . म्हणजे शक्ती वाढणार . आणि हेच आपले ,तेचि सगेसोयरे होती . सांगून ठेवलं आहे संबंध पसायदान मध्ये सहजयोग आहे . तुम्हाला जर सहजयोग जाणायचा असला तर थोडक्यात पसायदान जाणून घ्या . तेचि सगेसोयरे ,काय द्रिष्टआ होता तो . काय त्यांनी वर्णन करून ठेवलं आहे . मी स्वतः चक्क पडले काय वर्णन आहे . रवींद्र बाबूंनी पण आमचं वर्णन करून ठेवलं आहे कि भारताच्या शोअर वरती सगळे लोक येतील ,आम्ही गणपतीपुळ्याला प्रोग्राम करत असतो त्याच इतकं सुंदर वर्णन करून ठेवलं आहे . इतकच काय पण इंग्लॅन्ड ला एक कवी होऊन गेला लुईस म्हणून त्यांनी तर संबंध आमच्या मिरवणुकीचं वर्णांकरून ठेवलं आहे . अगदी साक्षात जस काही समोर उभा राहून बोलत आहे . विल्यम ब्लेक म्हणून माणसाने जे आम्ही घर बांधणार आहे ,ज्या घरात आम्ही सगळी सोया केलेली आहे याची ते सगळं इतंभूत पत्त्यासह लिहून दिलेलं आहे . अशे अनेक आहेत ज्यांनी हे वर्णन केलेलं आहे आणि सांगितलेलं आहे . पण आता हि जी कलाटणी दिलेली आहे त्यांच्यातन आता परत जस आता गाडीला टिरेन्टमेन्ट झाली कि तिला वर नेऊन ठेवायचं किती कठीण असत आज आपल्या भारताच्या लोकांचं झालं आहे . तेव्हा कृपा करून जर नुसता विचार केला कि आत्ता पर्यंत चे जे कुसंस्कार आहेत मला सोडायचे आहेत आणि आपल्याला मिळवायचं आहे . हि जर तुम्ही शुध्द इच्छा ठेवली तर हि जी कुंडलिनीची शक्ती हि नुसती शुध्द इच्छेची शक्ती आहे आणि बाकी सर्व इच्छा कितीही पूर्ण झाल्या तरी त्या संपत नाहीत म्हणून हि कुंडलिनीची शक्ती आहे तिला तुम्ही जागृत करून घ्या .
प्रश्न -सहजयोग हा सहज मिळणारा योग आहे परंतु तो मिळवण्या साठी आपल्याला काहीतरी प्रयत्न करावे लागतीलच ना . ?
नाही ,सांगायची गोष्ट अशी आहे कि विवेकानंदानी कुणाचीही कुंडलिनी जागृत केली नाही पहिली गोष्ट . दुसरी गोष्ट अशी कि आज ते इथे नाहीत . तेव्हा माझ्याशी जे काय आहे ते माझ्याशी आहे . कळल ,मी तुमच्या समोर बसलेली आहे आज . बर . तिसरी गोष्ट अशी आहे कि हि अनाधिकार चेष्टा कुणी करू शकत नाही . अधिकारीच करू शकतात . समजा पृथ्वी तत्व मध्ये तुम्ही बी घातलं तर ते उगवेल पण तुम्ही रेतीत घातल ते उगवेल का ?पण मला स्वतःबद्दल सांगायचं नाही . तुम्ही त्याची प्रचिती घ्या आणि मला ओळखा . स्वतः तुम्ही त्याची प्रचिती घ्यावी आणि ओळखावं कि आम्ही कोण आहे आणि का असं घडतंय ते . असं कस घडलं . पण घडत आहे म्हणजे आम्ही काहीतरी आहोत . कबूल . तेव्हा कोणी काही म्हंटल असेल लिहिलं असेल त्यांनी आज पर्यंत हे कार्य केलेलं नाही आणि माताजी करत आहेत तर वाहत्या गंगेत हात का धुवून घेऊ नयेत . बरोबर आणि तुम्ही जे म्हंटला ते बरोबर आहे . अशी सगळ्यांच्या मध्ये झाली इच्छा तर फार उत्तम . काहीही करून कुंडलिनी जागृत होणार नाही याच मी एक उदाहरण देते तुम्हाला . एखदाच्या दीप पेटलेला नसला तर तो म्हणेल कि मी प्रयत्न करून आपल्या मध्ये जागृती आणेल . तर होऊ शकत नाही . एक पेटलेला दिवाच त्याच्या जवळ जायला पाहिजे . तेव्हा तो पेटतो आणि सहजच . दुसरी गोष्ट अशी आहे कि लोकांनी त्याच्यासाठी हे करायला पाहिजे ते करायला पाहिजे ,हे असं पाहिजे ते तस पाहिजे अनेक गोष्टी केल्या . पण ज्याला ह्याची किमया साधते आहे तो हे सहजच करणार . ज्याला हे माहित आहे तो हे सहजच करणार .
आता समजा एक सुनबाई अली घरात तिने कधी जन्मात स्वैपाक केलेला नाही आणि तिला तुम्ही साधं म्हंटल कि भात कर . तर ती चुलीतच भात घालणार . तितकं नसलं तर भांड्यात घालणार . भांड्यात घातलं तर तो करपेल . पण ते च जर एखाद तुम्ही आईला सांगितलं तर ती दोन मिनिटात करून देणार . याची कारिगरी जर आम्हाला येत असली तर आम्ही करू शकतो सरळ गोष्ट आहे . पण त्यात माझ काही माहात्म्य नाही ,सांगायचं असं कि मी कुणाकडे शिकलेली वैगेरे नाही . मी शिकूनच आलेली आहे . म्हणून म्हणते ते आता तुम्ही शिकून घ्या . तुम्हालाच मी करते ना गुरु . कशाला विवेकानंद आणि कशाला कोण पाहिजे . अहो तुम्हीच होऊन घ्या मोठे मोठे लोक . त्यांनी ज्या गोष्टी केल्या नाहीत त्या तुम्ही करणार . आता डॉक्टर सांगव्यांनी किती लोकांची जागृती केली ते विचारा . ह्या सर्व लोकांनी किती लोकांची जागृती केली ते विचारा . आता मला कुठे वेळ आहे प्रत्येकाची जागृती करायला . हेच लोक सगळे दिवा हुन दिवा पेटतो . तस आहे . आधी तुमचा दिवा पेटवून घ्यायचा . तेवून घ्यायचा ,व्यवस्थित बसवून घ्यायचा त्याच बरोबर सगळं काही संतुलन आल पाहिजे . मग मग तुम्ही कुंडलिनी जागृत करणार . तुमच्या हातून पण अचाट काम होणार आहेत . तुम्हाला आश्चर्य वाटेल ,लोकांना विश्वास वाटत नाही कि आमच्या हातून असं कार्य कस होतय .
एकदा मी नावेवरून चालले होते . आमचे साहेब चेअरमन होते . जहाजा वरून चालले होते तिथल्या कॅप्टन ला मी जागृती दिली . तेव्हड्यात खाली अगदी तळमजल्यावर एका माणसाला निमोनिया झाला . तो म्हणाला माताजी निमोनिया झाला तर हेलिकॉप्टर नि डॉक्टर बोलावतो . म्हंटल कशाला तुम्हीच डॉक्टर आहात . मी कसा झालो ?तुम्हाला जागृती दिली ना मी . म्हंटल मी खाली जाते नाहीतर . नाही नाही कस करायचं ते सांगा . म्हंटल नुसता हात ठेव तिथे आणि डोळे मिटून ध्यान कर . लगेचच त्याचा निमोनिया ठीक झाला तो येऊन म्हणाला माताजी हे झाल कस ?अरे पण तुझ कनेक्शन लागलं ना . योग म्हणजे काय ?कि तुम्हीच सगळे एखाद्या काम्पुटर सारखे टेलिव्हिजन सारखे यंत्र आहेत . पण यांत्रिक शुष्कता नाही तुमच्यात गोडवा आहे . तो फक्त सांधला म्हणजे योग घटित झाला . सर्व परमेश्वराची हि जी सर्व व्यापी शक्ती आहे त्या शक्तीशी एकाकारिता अली म्हणजे तुमच्यातून ती शक्ती वाहू लागल्या बरोबर तुम्ही दुसरेच झाला . पण त्या शक्तीमुळे टेलिव्हिजन किंवा कॉम्पुटर वर अमेरिका येत नाही पण ह्या शक्तीचा पहिल्यांदा तुमच्यावरच परिणाम येतो आणि तुम्हालाच ठीक करते . तुमचं जे काही यंत्र आहे ते ठीक करून टाकते . आणि त्याच्या नंतर मग इतरांचं पण ठीक करत बसते .
सामूहिक चेतनेत उतरल्या बरोबर तुमच्या हातावर थंड थंड अशा लहरी येतात . आणि ह्या ज्या थंड थंड लहरी येतात त्याच वर्णन केलेलं आहे सौन्दर्यलहरी म्हणून आदी शंकराचार्य नि . सौन्दर्यलहरी म्हणून वर्णन केलेलं आहे आणि सलीलां सलीलां . ख्रिस्तानी त्याला कूल ब्रीझ ऑफ द होली घोस्ट असं म्हंटल आहे . अगदी हाताला अशा फार शीतल थंड थंड अशा लहरी येतात . आणि ह्या लहरींनी आपली इथे दाखवलेलं आहे आपला डावा हात उजवा हात ,कोणची चक्र कुठे आहेत . आणि बरोबर ती चक्र कळतात . आणि त्या चक्राने तुम्ही जाणता कि तुमच्यात काय दोष आहे ,दुसऱ्यात काय दोष आहे . आणि तुम्हीच मोठे गुरु होऊन जाता . त्याला काही टिळे लावून किंवा झंडे घेऊन फिरायला नको . तुमच्या डोळ्यातच दिसेल . पटल ना .
प्रश्न -मनावरचा आजार सहजयोगाने कसा दूर करता येईल ?
आता तुम्ही जर सहजयोगात आलात तर सगळं तुम्ही सुध्दा हे करू शकाल . पण आता सांगायचं म्हणजे असं कि आपल्या इथे दोन शक्त्या दाखवलेल्या आहेत बघा . डावीकडे एक आणि उजवीकडे एक . त्यापैकी डावीकडची जी शक्ती आहे तिला आम्ही महाकालीची शक्ती म्हणतो . आणि त्याच्यात मनशक्ती असते . आणि उजवी कडची जी शक्ती आहे ती क्रिया शक्ती आहे आणि ती महासरस्वतीची शक्ती आहे . आणि जी मधली आहे ती महालक्ष्मीची शक्ती आहे . आणि ती मग सहस्रारात जाऊन सप्तश्रुंगीला जी बसलेली आहे ती ती शक्ती आहे . कळलं का ?इथे शेजारीच आहे डोक्यावर तरी काही डोक्यावर आपल्या येत नाही काही . आता बघा हि जी डावीकडची जी शक्ती आहे ह्या शक्तीच उल्लंघन केलं तिचा अनादर केला किंवा कुणी तुमच्यावर तसा परिणाम घातला किंवा एखादा तुम्हला शॉक बसला तर त्याने हि शक्ती हलते . आणि त्या शक्तीमध्ये त्रास होतो . आता ह्या शक्तीला तुम्ही परत जागृत करू शकला आणि तिला प्लावीत करू शकला ,तिच्या मध्ये एक कुंडलिनीची शक्ती जर भरू शकला तर मनाचा रोग ठीक होऊन जातो . थोडक्यात सांगितलं . पण तुम्हाला बर केलेले मी दाखवीन . आमच्या कडे आहेत पुष्कळ ,तुमच्या नाशकालच झालेले आहेत मनाचे रोग ठीक . त्यांना सॅकॅस्ट्रीक कडे जायला नको कुठेही जायला नको . एका दिव्यांनी सुध्दा होऊ शकत . छोटीशी कँडल जरी तुम्ही घेतली आणि आमच्या फोटोला जर वापरलं तुम्ही तर मनाचे रोग ठीक होतात .
प्रश्न -ध्यानाला बसल्यावर विकल्प येतात काय करायचं . ?
तुम्ही काय सहजयोगात आहात ?विकल्प येतात म्हणजे आज्ञा चक्र तुमचं धरलेलं आहे . जेव्हा तुमचं आज्ञा चक्र धरलं जात तेव्हा म्हणायचं मी सगळ्यांना क्षमा केली . स्वतःला पहिल्यांदा क्षमा करायची आणि हा मंत्र आहे आज्ञा चक्र उघडण्याचा . मी सगळ्यांना क्षमा केली असं म्हंटल्यावर निर्विचारिता येते . करून बघा . कळलं का ?
प्रश्न -एखाद्या माणसाला सिध्दी मिळालेली आहे .ती आपण तात्पुरती वापरली तर ती सहस्रारा पर्यंत नेऊ शकू का ?
नाही , क्षुद्र सीध्यान स्थान नाही . क्षुद्र सिध्दी नसली पाहिजे . सिध्दी म्हणजे काय ?हातात काहीतरी यायचं ,हे द्यायचं हि भूत लक्षण आहेत . ते अगदी सोडायला पाहिजे .
हि शुध्द शक्ती आहे बेटा . सिद्धी नाही . हि अशुध्द कार्य करतच नाही . यातून शुध्द कार्य आपोआपच घडत . माझ्या हातून काही होतच नाही अशीच भावना येते . आता समजा कोणी कुंडलिनी जागृत केली . का बुवा झाली का कुंडलिनी जागृत ?तर ते काय म्हणतात माताजी होत नाही . वर येत नाही . तृतीय पुरुषात बोलतात . कळलं का . मी करतोय असं होतच नाही . ती भावनाच वेगळी होऊन जाते . सगळं आपल्यात साक्षी रूपाने होत . आणि मी असं करतो किंवा मी हा शब्दच जातो . हे होत नाही ,हे घडत नाही जस काही दुसरच काहीतरी होतंय . हि एक स्तिती आहे ती आल्या शिवाय आपल्याला समजायचं नाही . कारण माणूस साधारण मानवी स्तिथीत मी हे केलं मी ते केलं असं केलं तस केलं म्हणतो . पण एका त्या स्तिथीत आल्यावर तृतीय पुरुषात म्हणजे हे असं झालं ,त्यांच असं झालं . म्हणजे मी केलं असं कुणी म्हणणारच नाही . मीच निघून जातो ना . कळलं का ?त्यात कबीरांनी असं म्हंटल आहे कि कुंडलिनीच जागरण झालं कि माणसाचं मी पण जे आहे ते कस मरत ,बकरी जेव्हा जिवंत असते तेव्हा मैय मैय करत फिरते आणि मेल्यावर तिच्या आतडयांना काढून त्याची जेव्हा तुनकी करतात तेव्हा ते तुही तुही तुही असं होत . तस माणसाचं होत . म्हणजे अगदी तसच होत अक्षरशहा . ते होणं म्हणजेच परिवर्तन . जर मी पण राहील तर कसलं परिवर्तन आहे .
कुंडलिनी हि शक्ती आहे . शक्तीला स्वरूप नसत पण कार्य दिसत . आता समजा तुमच्या इलेक्ट्रिसिटी वरून बघा त्याला काही रूप नाही पण तीच कार्य दिसत ना . तशीच ती एक शक्ती आहे जेव्हा ती आपल्या मध्ये उठते तेव्हा तुम्हाला ती डोळ्यांनी दिसते . पुष्कळ लोकांमध्ये दिसते . जर तुमचं नाभिचक्र धरलेलं असेल तर अगदी ते जे त्रिकोणी हाड आहे ते अगदी हृदया सारखं धक धक होत . आता थोडं आरामात बसा . परमेश्वराला हि थोडी तितिक्षा लागते . म्हणजे वाट बघावी लागते . मुहूर्त बघावा लागतो . कुंडलिनीच्या जागरणाला सुध्दा मुहूर्त असतो . तेव्हा तितिक्षा पाहिजे . तितिक्षा म्हणजे परमेश्वराची जी इच्छा आहे त्यास समर्पित होऊन थोडा वेळ रममाण होणे . तेव्हाच कुंडलिनीच जागरण होत . आता जर आपल्याला नाटकाला गेलो उशीर झाला तरी बसले दारात कारण चार पैशे देऊन जातो . आणि ते पैसे कसेतरी उकळलेच पाहिजे त ना . तस सहजयोगाचं नाही . प्रेमात बसावं लागत .
जे वेड्या सारखं करतात त्यांच्या सगळ्यांच्या अंगात भूतच असत . आणि दुसरे जितके सायकोसोमॅटीक डिसीजेस म्हणतात ना म्हणजे कॅन्सर वैगेरे सुध्दा ते सुध्दा लेफ्ट साईड च्या अटॅक नीच होतात . पुष्कळसे पार्किन्सन्स वैगेरे लेफ्ट सैद मुळे होतात . त्याला सायकोसोमॅटीक म्हणतात . आता आमच्या कडे पुष्कळशे डॉक्टर इथे आलेले आहेत . तेव्हा ते ह्या विषया वरती काम करत आहेत . आणि एका डॉक्टरला आता एम डी मिळालं दिल्ली मध्ये . त्यांनी सहजयोगा वरती सायकोसोमॅटीक डिसीजेस वरती काम केलेलं आहे . तेव्हा हा प्रकार खरा आहे . पण त्याला डॉक्टर लोक प्रोटीन नंबर ५३ आणि प्रोटीन नंबर ५८ म्हणतात . त्याला ते भूतबाधा म्हणत नाहीत . आम्ही स्पष्ट ते सांगतो .
अंगात येन हा दैवी प्रकार नाही . हे सगळं साफ खोत आहे . असं अंगात यायला देवीला काय फुरसत आहे का . ?कुलकर्णींनीच्या अंगात पहिल्यांदा येणार . आणि सांगतात काय घोड्याचे नंबर . देवीला काय घोडयाचे नंबर माहित असतात का . आणि स्वतः त्यांचं आयुष्य पाहिलं कि इतकं खराब आयुष्य असत . भलते प्रकार आहेत . हे अगदी बंद झालं पाहिजे . देवीच्या देवळातून हे देवी उठवणार . आणि पुजाऱ्यांना कळत कि हे वाईट आहे तरी पैसे कमावण्यासाठी मग देवीला बोलावतील आणि म्हणतील कि चला आता तुम्ही नाव सांगा . घोड्यांची नाव सांगा . आणि मटक्याचे नंबर सांगा . याचा धर्माशी काय संबंध असेल कि देवी चा . देवी हे पावित्र्याचं अधिष्ठान आहे असं काय करता . समजलं पाहिजे . किती आपण अपमान करतो आहे देवाचा बघा . सहन तरी किती करायचं . किती अपमान हे . हे झिंगण बिंगण ,दोन थोबाडात द्याम्हणजे ती देवी अशी पळेल कि बघा . माझी मुभा आहे दोन थोबाडात दिले कि पळेल .
मला आता मनातून वाचन द्या कि माताजी तुम्ही आमची कुंडलिनी जागृत केल्यावर आम्ही आमचा वृक्ष वाढवू आणि सामूहिकतेत . भांडण करणार नाही . सुरवातीला पुष्कळ लोक येऊन भांडण च करतात . हे असं का आणि हे तस का . शांतपणाने आम्ही आमचा वृक्ष वाढवू . आणि पुढल्या वर्षी तुम्ही याला तर आम्ही आमच्या कडून अनेक लोकांना जागृती मिळालेली आम्ही तुम्हाला दाखवू . बाकीच्यांना पण सगळ्यांना सांगितलं पाहिजे ना . आईच ऐकलं पाहिजे .
कुंडलिनी म्हणजे कुंडला मध्ये अशी साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे . त्याला कुंडल असं म्हणतात म्हणून ती कुंडलिनी . आणि ती आपल्यातली चौथी शक्ती आहे . त्या शक्तींनी आपण जागृत होतो आणि आत्म्याशी संबंध होतो . जस आता हे माइकच कनेक्शन कस तुम्ही जोडलं तसच आहे . हे समजलं ना तुम्हाला . कनेक्शन शिवाय होऊ शकत नाही . तसच तुमचं कनेक्शन ह्या सर्व विश्वव्यापी शक्तीशी कस करायचं ,ती सूक्ष्म शक्ती आहे त्याला जोडणारी शक्ती म्हणजे कुंडलिनी असं सध्या पुरत समजा . तस आहे पुष्कळ मोठं ते . पण सध्या एव्हडं समजलं तरी तुम्हाला कळेल .
आता आई समोर कोणी टोप्या घालून बसत नाही तेव्हा टोप्या काढून ठेवा हि विनन्ती तुम्हाला . आता अगदी सोपं काम आहे. सगळ्यांनी डोळे मिटून घ्या . पायात चपला असतील तर त्या काढून ठेवा जर काही करदोडे वैगेरे असतील तर ते पण काढून ठेवा . गळ्यामध्ये काही भारी असेल तtheते पण काढून ठेवा . गळ्यात काळ असेल तर काढून ठेवा . गंडे दोरे काही असेल तर कृपा करून काढून ठेवा . नाहीतर तिथे कुंडलिनी थांबते . तावीज काढून ठेवा . माळा बिळया सगळ्या काढून ठेवा . रुद्राक्ष वैगेरे सगळं काढून ठेवायचं . काही नको . आता शान्त आणि प्रसन्नचित्त असलं पाहिजे . आपण परमेश्वराच्या दरबारात चाललो आहोत . तिसरी गोष्ट म्हणजे सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत हे लोक आपल्याला बाळकडू देत असतात कि तुम्ही महापापी आहात . तुम्ही हे पाप केलं तुम्ही ते पाप केलं . तर मी स्पष्ट सांगते कि तुम्ही कोणताही पाप केलेलं नाही . आणि स्वतःला दोष लावून घ्यायचा नाही . तुम्ही मानव झालात हीच किती मोठी गोष्ट आहे . तेव्हा मी हे पाप केलं याला हात लावला आणि ते झालं . हे जे काही एक खुळ डोक्यात आहे ते काढून टाकायचं . मी मुळीच दोषी नाही . कृपा करून मनातून हि गोष्ट आधीच काढून टाकायची कि मी कोणताही गुन्हा केलेला नाही . आणि मी पापी नाही आहे . मी शुद्ध आत्मा स्वरूप आहे . याचा विश्वास ठेवला पाहिजे .
आता दोन्ही हात फक्त माझ्या कडे असे करायचे . कारण ह्या बोटांवर सगळी चक्र आहेत . आणि ह्या चक्रातूनच पहिल्यांदा चैतन्य जाणवून कुंडलिनीला आवाहन करायचं . त्या नंतर सगळ्यांनी डोळे मिटून घ्यायचे . आणि मी सांगितल्या शिवाय डोळे उघडू नका . ज्यांनी चष्मे घातलेत त्यांनी काढून ठेवले तर बरे . कारण याने द्रीष्टी चांगली होते . आता पुष्कळ लोकांना आधीच हलकं हलकं थंड वाटत असेल . पण तरी सुध्दा त्याला पूर्ण पणे नीट व्यवस्थित चक्रांमधून जमून येण्या साठी एकदा डोळे उघडून परत तुम्ही बघा . मी सांगते कशारितीने आपल्या चक्राला आपणच शक्ती दिली पाहिजे . आणि कशारितीने आपणच आपली कुंडलिनी उचलली पाहजे . तेव्हा परत तुम्ही डोळे उघडा आणि डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात आपल्या असा हृदयावर ठेवायचा . हृदयामध्ये आत्म्याचं स्थान आहे . तर पाहिलं स्थान आत्म्याला दिल पाहिजे . त्याच्या नंतर उजवा हात आपल्या पोटाच्या वरच्या बाजूला हे गुरूच स्थान आहे . कारण गुरूंनी इथे व्यवस्था केलेली आहे कि तुम्ही स्वतःचे गुरु होऊ शकता . तेव्हा उजवा हात हा पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे ठेवायचा . सगळं कार्य आपण डावीकडे करणार आहोत . जर चुकीचे गुरु असले किंवा तुम्ही जर चुकीचं वाचन केलं असेल किंवा चुकीच्या गोष्टीं मध्ये तुमचा विश्वास असेल तर तो ह्या चक्राच्या शुध्दीने स्वच्छ होऊन जातो . त्या नंतर परत तोच हात पोटाच्या ओटीपोटाच्या खालच्या बाजूला डावीकडे ठेवायचा . आता हे जे चक्र आहे ह्यांनी पण सर्व परमेश्वराच्या कायदेकानून प्रमाणे त्यांच्या व्यवस्थे प्रमाणे कार्य करत असते . म्हणजे हे शुध्द विद्देचे स्थान आहे . हि जी अशुध्द विद्या आपल्यावर कोणी केली असेल ,कोणी शिकवली असेल जसे मी आता भोंदू लोक सांगितले त्यांनी केलेले प्रकार ,कोणच्याही प्रकारची अनाधिकार चेष्टा आपण केली असेल ती ह्या चक्राने स्वच्छ होते . मग परत हे चक्र स्वच्छ झाल्यावर परत हा हात वरती डावी कडे परत गुरु चक्रावर ठेवायचा . त्याच्या नंतर हा हात आपल्या हृदयावर ठेवायचा . त्या नंतर ह्या श्रीकृष्णाच्या विशुध्दी चक्रावर डावीकडे ,श्रीकृष्णाने सांगितलय हि सगळी लीला आहे तेव्हा त्याच्या मध्ये आपल्याला काही दोष झालेला आहे ,दोषी आहोत आपण ,पाप केलेलं आहे तेव्हा मान अशी उजवी कडे करून इथे जोरात दाबून धरायचं डावीकडे . म्हणजे हे चक्र सुटेल . ह्या चक्राची शुध्दता झाली . मग तुम्ही कपाळावर हात ठेवायचा . हे आज्ञा चक्र आहे . ह्या आज्ञा चक्रामुळे आपण लोकांना क्षमा करत नाही आणि अत्यन्त विचार करतो त्यात त्रासून ,गांजून जातो . म्हणून निर्विचारते साठी हा हात इथे ठेवल्यावर ,हे क्षमेच स्थान आहे . त्याच्या नंतर मग शेवटी जरी डोक्यात विचार असतातच कि आम्ही काहीतरी चूक केली आहे त्या साठी परत हा हात डोक्याच्या मागच्या बाजूला दाबून ,हे आज्ञा चक्राचं दुसर अंग आहे ते व्हा डोकं असं मागे करून ह्या ठिकाणी मी सर्वाना क्षमा केली असं जे म्हण्टलेल होत त्या ठिकाणी परमेश्वरा तूच मला क्षमा कर माझ काही चुकल असेल तर .पण मी दोषी आहे अस समजायचं नाही . त्या नंतर शेवटी आता सहस्रार चक्रावरती ,टाळूवरती आपला तळहाता चा मध्यभाग जो सहस्राराचं स्थान आहे तो असा ठेऊन डोकं असं थोडं खाली घेऊन तो हात दाबून टाळूवरती फिरवायचा सातवेळा . असं अगदी सोपं सरळ आहे .
आता सगळयांनी डोळे मिटून घ्यायचे . डोळे मिटल्यावर उघडायचे नाहीत . डोळे मिटल्यावर डावाहात माझ्याकडे . आणि उजवा हात हृदयावर ठेवायचा . आणि आता मनामध्ये शुध्द इच्छा आणायची . कि माझी कुंडलिनी जागृत झाली पाहिजे . दुसरी काही मला इच्छा नको . अशी इच्छा घेऊन हृद्यावर हात ठेऊन तीनदा एक प्रश्न विचारायचा मला . श्री माताजी मी आत्मा आहे का ?असा प्रश्न मनामध्ये विचारायचा . कारण तुम्ही आहात पण मनामध्ये प्रश्न विचारला म्हणजेच त्याच उत्तर येणार आहे . आता जर तुम्ही आत्मा आहात तर स्वतःचे गुरु सुध्दा आहात . म्हणून आता उजवा हात पोटावरती डावीकडे ठेवायचा . ह्या गुरु तत्वावरती प्रश्न करायचा श्री माताजी मीच माझा गुरु आहे का ?असा प्रश्न तीनदा विचारायचा . हे दोन प्रश्न विचारले पाहिजेत . हे खरे प्रश्न आहेत . त्यानंतर उजवा हात पोटाच्या ओटीपोटाकडे डावी कडे ठेवायचा . दाबायचा थोडा हात . आता तुम्ही हे माझ्या कडे मागितल्या शिवाय जबरदस्ती करता येत नाही कारण तुम्ही स्वतंत्र आहात . आणि तुमच्या स्वतंत्रतेचा मी मान करते . म्हणून तुम्ही म्हणायला पाहिजे नम्र पणे श्री माताजी कृपा करून आम्हाला शुध्द विद्या दयावी . असं सहा दा म्हणा . कारण ह्या चक्राला सहा पाकळ्या आहेत . त्या नंतर उजवा हात परत पोटाच्या वरच्या बाजूला गुरुतत्वावर दाबून धरायचा . आता ह्या ठिकाणी पूर्ण आत्मविश्वासाने असं म्हंटल पाहिजे कि श्री माताजी मी च माझा गुरु आहे . असं दहादा म्हणा . इथे दहा गुरु आहेत त्यामुळे दहादा म्हंटल पाहिजे . आता पूर्ण आत्मविश्वासाने उजवा हात हृदयावर ठेऊन जे महान सत्य आहे ते म्हंटल पाहिजे कि श्री माताजी मी आत्मा आहे . हे बारा वेळा म्हणा . हि सहजच मी जागृत करू शकले असते पण असं तुम्हाला सांगितल्यावर तुम्ही सुध्दा स्वतःची जागृती पूर्णपणे करू शकाल . म्हणून श्री माताजी मी आत्मा आहे असं म्हणायचं . त्याच्या नंतर उजवा हात ,आता हे लक्षात घेतलं पाहिजे कि परमेश्वर हा दयेचा ,आनंदाचा सागर आहे . पण त्याहून हि अधिक तो क्षमेचा सागर आहे . तेव्हा आपण कोणतीही अशी चूक करू शकत नाही जी त्याला शरणागत झाल्यावर तो क्षमा करणार नाही . म्हणून माझ हे चुकलं माझं ते चुकलं असं म्हणत बसले तर आपण त्या सागराचा अपमान करत आहोत . तेव्हा हा उजवा हात तुम्ही मानेला डावीकडे असा धरायचा आणि उजवीकडे आपली मान फिरवून पूर्ण निश्चयाने आणि आत्मविश्वासाने असं म्हणायचं कि श्री माताजी मी दोषी नाही . हे सोळा वेळा म्हणायचं . कारण कृष्णाच्या सोळा पाकळ्या आहेत . त्यानंतर उजवा हात आपल्या कपाळावर आडवा ठेवायचा . आणि ह्या ठिकाणी श्री माताजी मी सर्वाना क्षमा केली असं हृदया पासून म्हणायचं . हे चक्र मोडलं गेलं पाहिजे . आता पुष्कळांना असं वाटत कि क्षमा करणं फार कठीण आहे . पण तुम्ही क्षमा करता किंवा नाही करत ,तुम्ही काहीच करत नाही . पण जर तुम्ही कुणाला क्षमा केली नाही तर ते मात्र तुमच्या डोक्यावर बसतात . ज्यांनी तुम्हाला त्रास दिलेला आहे . म्हणून नुसत म्हणायच कि माताजी मी सगळ्यांना एकसाथ क्षमा करून टाकली आहे . आता मोजत बसायचं नाही कुणाला क्षमा केली किंवा नाही ते . सगळ्यांना एकसाथ क्षमा करून टाकली . आता ते संपल . त्याचा माझा काहीही संबंध नाही . त्याच्याशी संबंध तुटल्या बरोबर तुम्ही कुणाच्या हातात खेळणारच नाही . आता आपल्या स्वतःच्या समाधाना साठी म्हणून उजवा हात डोक्याच्या मागच्या बाजूला घालून त्याच्यावर अशी मान पेलून घ्यायची आणि वर डोकं करून असं म्हणायचं हे परमेश्वरा जर माझ्या हातून काही चुकलं असेल जाणता अजाणता तर ते तू क्षमा कर . पण हे करताना मी दोषी आहे हा विचार मनात आणायचा नाही . आता उजवा हात ताणून धरून त्याचा मधला भाग आपल्या टाळूवर दाबून टाळूची कातडी सातवेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने फिरवायची . डोकं खाली जरा वाकवायचं . हे सहस्राराच स्थान आहे . आता हा हात खाली घ्या . हळू हळू डोळे उघडायचे . आता डावाहात माझ्या कडे आणि उजवा हात टाळूवर वरती धरून असा खालीवर फिरवून बघायचं . गार गार वर येतोय का बघा . जेव्हडी शुध्द शक्ती जास्त तेव्हडा जास्त वर येतो . मन थोडी खाली वाकवून घ्या . आता उजवा हात माझ्या कडे आणि डाव्याहाताने टाळूभाग बघा . येतंय का गार गार . आता दोन्ही हात असे आकशाकडे वर करायचे आणि प्रश्न विचारायचा मनामध्ये कि श्री माताजी हि परमेश्वराची प्रेमशक्ती आहे का ?हेच ब्रम्हचैतन्य आहे का ?हीच ती सूक्ष्मातील वर्णन केलेली शक्ती आहे का ?असं तीनदा विचारा . चरा चरा त पसरलेली परमेश्वराची शक्ती ती हीच आहे का ?आता हात खाली घ्या . आता हातात बघा गार गार वाटतंय का . हे जे गार वाटतंय तेच चैतन्य आहे . आता तुमच्या हातून ते वाहू लागलय . पण पुढे कस वापरायचं ते काय आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला सामूहिकतेत आलं पाहिजे . काही लोकांच्या हाता खालून येत असेल ते हातानी वरती तळहातावर घ्याच . आता हि शक्ती कशी वापरायची त्याचा उपयोग कसा करायचा . माझ्या कडे विचार ना करता बघा . एक क्षण सुध्दा माणूस विचारा शिवाय राहू शकत नाही .
किती लोकांचा हातामध्ये किंवा डोक्यात थंड वाटलं . त्या सगळ्यांनी हात वर करा . वा सगळं नाशिकचं पार झालं आहे जवळ जवळ . तर अशा सगळ्या संतसाधुना आमचा नमस्कार . शांत वाटलं ना आतून सगळयांना . आता हि स्थिरावली पाहिजे . अभ्यास झाला पाहिजे आणि बरोबर सेंटर कुठे आहे ते शोधून काढले पाहिजे . तिथे जाऊन हे सगळं शिकलं पाहिजे . त्याच्या मध्ये जी काही शक्ती आहे ती कशी वापरायची ते पाहिलं पाहिजे . आणि ते जे सांगतील ते ऐकलं पाहिजे . त्या बद्दल राग नाही केला पाहिजे . वाईट नाही वाटलं पाहिजे . कारण जे हिताचं आहे तेच सांगतात . कारण काही देणंघेणं लागत च नाही . तेव्हा ते ऐकलं पाहिजे . हीच माझी विनंती आहे . पुढल्या वर्षी जर तुम्ही लोक पुष्कळ झाले इथे तर मी दोन दिवसाचा प्रोग्रॅम करेन . पण आणखीन लोक पाहिजेत ना . सहजयोगामध्ये मी आले तर लोक येतात आणि नंतर येत नाहीत . मग चार पाच लोकांसाठी कशाला यायचं . मी तर येणार सुध्दा नव्हते . मागल्या वर्षी मी आले सुध्दा नाही नाशकाला . कारण इथे लोकच येत नाहीत . सहजयोगामध्ये लोक यायला पाहिजेत . त्यांनी सेंटर वर जायला पाहिजे ,प्रगती करून घेतली पाहिजे ,सामूहिकतेत उतरलं पाहिजे . एक नवा विश्व धर्म आपण स्थापन केला पाहिजे . हा नवीन युग धर्म आहे तो धर्म आपल्या मध्ये आत मध्ये स्तीत आहे . अशी विश्वव्यापकता आपल्या मध्ये अली पाहिजे . तेव्हाच ह्या देशाचं आणि साऱ्या जगाच तुम्ही कल्याण करणार . सगळं जग तुमच्या पायावर येणार आहे उद्या . अहो हा आपलाच वारसा आहे . हा विशेष करून महाराष्ट्राचा वारसा आहे . सगळ्या नाथानी इथेच रक्त ओतलं आहे . आपण आहोत कुठे . नसत्या बेकार नष्ट होणाऱ्या गोष्टींच्या पाठीमागे लागलो आहोत . ते सगळं नाशवंत आहे . जे तुम्हाला द्यायला आलो आहोत ते घ्यावं . आणि त्यात वाढ करावी . आणि स्वतःची प्रतिष्ठा बघावी . काय आहात तुम्ही . अजून काही कळलेलंच नाही महाराष्ट्रीयन लोकांना . आम्ही महाराष्ट्रीयन म्हणवतो पण आमच्यात जे काही महान आहेत ते काढलेच पाहिजेत . फार महान आहेत . काय आपली संस्कृती ,काय आपल्या मध्ये धर्मधारणा आहे . ते सगळं एकेक खाणीतून काढलं पाहिजे . तर माझा अनंत आशीर्वाद आहे कि नाशकातले सगळे हिरे अशेच चमकतील . आणि मग मी इथे परत येईन सगळ्या माझ्या मुलांना भेटायला .
आता एक आणखीन सांगायचं म्हणजे यांनी संगीताचा प्रोग्रॅम केलेला आहे . ज्यांना बसायचं त्यांनी बसावं ज्यांना जायचं त्यांनी जावं . हे विशेषतः परदेशी लोकांसाठी आहे .