Public Program

Public Program 1987-01-15

Location
Talk duration
29'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

15 जानेवारी 1987

Public Program

Astagaon (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

आजचा दिवस फार मोठा शुभा शिशाचा आहे . कारण आज आपल्याला माहित असेलच कि शाकंबरी देवीच्या नवरात्राचा पौर्णिमेचा दिवस आहे . म्हणजे आज शेवटची रात्र आहे . शाकंबरी देवी हि शेतकरी लोकांची देवी आहे . आणि तिचा प्रादुर्भाव मेरठ जिल्ह्यात झाला होता . त्या वेळी आमचे साहेब तिथे कलेक्टर होते मेरठ जिल्ह्यात तेव्हा मी तिथे पुष्कळ शेतीच काम केलं होत . आणि त्या शेतीत पुष्कळ चमत्कार घडले . आणि लोकांना आश्चर्य वाटलं कि इतक्या तर तऱ्हेच्या भाज्या आणि पीक एव्हड्या मोठ्या प्रमाणात पण एव्हड्या लहानशा जागेत कस आलं . असो . आजचा दिवस विशेष आशिर्वादाचाच आहे . कारण आजच्या दिवशी शाकंभरीदेवीने सर्व जगाला आशीर्वाद दिला होता . आणि शेतकऱ्यांना आशीर्वाद दिला होता . कि त्यांच्या हातून अशी पीक आणि अशी धान्य तशीच उत्तम भाजी ,फळे सगळी ह्या सगळ्या संसारात शेतकऱ्यांच्या हाती ,त्यांच्या करवी ,त्यांच्या मेहनतीने सर्व जगाला मिळूदे . ह्या त्यांच्या आशीर्वादाचा उल्लेख करावासा वाटतो . त्यांच्याच आशीर्वादाने आपण लोक शेतकरी झालात . आणि जी काही सुजलाम सुफलाम आपली भूमी आहे तिचा फायदा यांनीच होतो .

आता हे परदेशी लोक इथे आले आहेत . आणि यांना महाराष्ट्रा विषयी फार आस्था आणि भक्ती आहे . त्याला कारण असे आहे कि महाराष्ट्रामध्ये फार मोठे मोठे संतसाधु होऊन गेले . त्यांनी इथे आपलं रक्त ओतलं . आजच एका नवीन गुरूंची ओळख झाली त्यांचं नाव हैबती . खरोखरच ते आत्मसाक्षात्कारी असतील पण त्यांना दोनचार माणसंच जाणतात . पण ह्या लोकांची शुध्दबुध्दि आहे . त्यातून पैसे वैगेरे मिळवायचे याच त्याच्या मागे त्रांगड नाही आहे . सगळे श्रीमंतीत राहणारे लोक आहेत . त्यांना पैशाची कदर नाही आहे . परमेश्वराची कदर आहे . आणि ज्या महाराष्ट्रात एव्हडे मोठे साधुसंत झाले त्यांची पुस्तक सुध्दा इंग्रजी भाषेमध्ये भाषांतरित झाली आहेत . हि महाराष्ट्राची भूमी किती मोठी असेल ,त्याची महानता काय असेल ,ते किती पूजनीय आहे असं त्याना वाटत . त्यात माझा जन्म ह्या महाराष्ट्रात झालेला आहे . पण दुर्दैव असं आहे कि जिथे पिकत तिथे विकत नाही . सर्व ह्या संतांना आपण छळून काढलं आहे . त्यांच्या विरुद्ध गोष्टी काढून त्यांना आपण छळलेल आहे . इथेच साईनाथांचं जवळच स्थान आहे त्यांना किती लोकांनी छळलं आहे . पण आता ती वेळ गेली आहे . आता आपणच सांगितलं कि इथे अफवा उठवल्या आहेत त्यात काय आश्चर्याची गोष्ट नाही . कारण लोक देवाच्या नावावरती पैसे कमावतात ,पोट भरतात ,उपटसुम्भ पणा करतात . रोजच आपण बघतो इथे दोन पैसे घाल चार पैसे घाल . गाय दान दे . भोळेपणाने आपण आजपर्यंत ते करत आलो . आणि आम्ही म्हणतो कि देवाला पैसा समजत नाही . पैसा हा माणसाचं कार्य आहे . देवाला पैसा समजत नाही . म्हणजे ह्या लोकांना असं वाटत कि आम्ही मग पैसे कसे कमवायचे देवाच्या नावावर . जर देवाला पैसा समजत नाही तर अरे तू इतके पैसे दे मग आहि तुला देवाकडे पाठवतो . देवाकडे पाठवण्याची काही व्यवस्थाच नाही आहे मनिऑर्डर काही करता येत नाही देवाला . अशा भूलथापा देऊन असे दिशाभूल करणारे लोक नेहमी अशा गोष्टी तुम्हाला सांगतील ज्यांनी तुम्ही सत्या पासून दूर व्हाल . पण त्या साठी माणसाला शुध्द बुद्धी पाहिजे जी ह्या लोकं मध्ये आहे . हे सुद्धा कोणच्या न कोणच्या धर्मात होते . इथे मुसलमान लोक आलेले आहेत ,ख्रिश्चन लोक आलेले आहेत ,पारशी लोक आलेले आहेत . इतर कितीतरी धर्मातले लोक या मध्ये आहेत . पण यांनी जेव्हा पाहिलं कि धर्माच्या नावाखाली फक्त अघोरी पणा चालतो ,मारतात एकदुसऱ्याना ,नाहीतर पैसे मारतात . काहीतरी अश्लील असं काम करत असतात . आणि जे लोक धर्माच नाव घेतात त्यांच्या मध्ये देवच नाही आहे . तेव्हा बहुतेक ह्या लोकांनी देवाचं नावच टाकलं होत . देवच नाही असं सांगत होते . शेवटी जेव्हा सहजयोगात आले यांची कुंडलिनी जागृत झाली ,ती जागृत झाल्यावर जेव्हा त्याना कळलं कि सगळीकडे जाणीव त्याना झाली . जेच्या बद्दल ज्ञानेश्वरांनी सारखं म्हंटल आहे जाणीव ती व्हावी . ती जाणीव त्यांच्या हातावर झाली सगळीकडे चैतन्य पसरलेलं दिसलं तेव्हा त्यांनी मान्य केलं कि परमेश्वर हा आहे . जरी आम्ही आमच्या बुद्धीने असं ठरवलं होत कि हे सगळे धर्मभोन्दु लोक आहेत ,हे खोट बोलतात यांच्यात धर्म मुळीच नाही तरी देव हा आहेच हे जरी खोटे असले तरी . आणि हे सिध्द झाल्यावर त्यांनी देवाचे पाय धरले . हे सगळं यांच्या मध्ये आलं आणि त्यासाठी त्यांनी सुरवात केली कि ह्या महाराष्ट्राची काय विशेषतः आहे ?अष्टविनायक इथे का सगळे उदभवले ?तुम्हाला हेही माहित नाही कि अष्टविनायक इथे किती आहेत ते . तुम्हाला हेही माहित नाही कि विनायक म्हणजे काय ?गणेशाची नुसती स्तुती गायली म्हणजे झालं . याना विचारा गणेश म्हणजे काय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होतो ते . यांच्या मध्ये असे पाचसहा डॉक्टर लोक आज आले आहेत . यांनी पुष्कळांचे रोग बरे केले . गणेशच्या दमावर . इतकी यांची गणेशसिध्दि आहे . पण आपल्या कडे धर्मम्हणजे दोन पैसे इकडे घालरे दोन पैसे तिकडे घालरे . त्या पलीकडे धर्म काही नाही आणि वाट्टल तस वागायचं . कोणी जर सांगायला आला तर त्याला मुर्खात काढायचं नाहीतर छळून काढायचं . आणि हे जे पैसे खाणारे उपटसुम्भ आहेत ,दोन पैशाला देव मिळतो तर मग तो का घेऊ नये .

पण तुम्हला देव हवा कि नको हा पहिला प्रश्न . तुम्हाला देवाचा आशीर्वाद हवा कि नको . मग असल्या भलत्या गोष्टीन कडे ह्याची डोकी जातात ,विचारबुध्दी ज्यांना नसते ,सारासार ज्यांना समजत नाही अशा लोकांना परमेश्वर कशाला द्यायचा ?आणि त्यांना मिळणार पण नाही . पण ह्या आपल्या महाराष्ट्रातच अनन्य भावे देवाची सेवा करणारे अनेक लोक आहेत . अनेक लोकांना असं वाटत कि देव आपल्याला मिळाला पाहिजे . आणि त्या साठीच हा आम्ही हा सहजयोग उभा केला आहे . सहजयोग म्हणजे आधी कळस मग पाया . आधी तुमच्या मध्ये थोडातरी आत्म्याचा प्रकाश येउदे . तो प्रकाश थोडासा जरी आला ,आधी जर म्हंटल तुमच्या हातात साप आहे तर तुम्ही सोडायचेच नाहीत . तो प्रकाश आल्याबरोबरच लगेच लक्षात येत कि वा आम्ही काय करतोय . काय आमचं हीत मांडलेलं आहे . नरकाच्या रस्त्यावर चाललोय धावत . लक्षात आल्या बरोबर माणूस परत फिरतो . आणि सन्मार्गाला लागतो . नुसते टाळ कुटून ते होणार नाही . कोणत्या देवळात जाऊन डोकं घासून ते होणार नाही . आतून व्हायला पाहिजे आणि त्या साठीच सहावा अध्याय आपल्याला ज्ञानेश्वरांनी दिला आहे . पण ह्या उपटसुम्भानी तो सहावा अध्याय वाचायचाच नाही म्हणून सांगितलं . जर सहावा अध्याय वाचायचाच नाही तर लिहिला कशाला त्यांनी . हे तरी डोकं लावल पाहिजे . सहावा अध्याय वाचायचाच नाही कारण ह्याची पोट भरायची आहेत ना . ह्यांना तर सहाव्या अध्यायातल काहीच येत नाही . तर मग सहावा अध्याय वाचूच नका . सहावा अध्याय वाचायचाच नाही तो आपल्याला निषिध्द आहे का ?का निषीद्ध आहे ?कारण तुम्हाला त्यातलं काही गम्य नाही तुम्हाला काही अधिकार नाही म्हणून तो निषिध्द आहे . हे सगळे प्रकार अनंत झाले . जितकं बघावं तितकं थोडं आहे .

त्या ज्ञानेश्वरांच्या पायात वहाणा नव्हत्या . त्या उन्हात तो कसा चालत असेल बर ?आणि त्याची सगळी भावंडं सुध्दा आणि आता त्याच्या पालख्या काढायच्या . अहो पालखी तर सोडाच त्याच्या पायात वहाणा सुध्दा नव्हत्या . त्याला पालखी काय काढता अशी . त्याच्या फोटोला पालखी आणि त्याच्या पायात वहाणा सुध्दा नाहीत . पैसे कमवायचे धंदे फुकटखोरी . चालल्या पालख्या इथे राहा ,तिकडे खायला घाल ,तिकडे खायला घाल आणि मग वाटणार वा रे वा केव्हडी आपण सेवा केली . जेव्हा सातसाधु आले कि त्यांच्या जीवाला लागायचं ,त्यांना त्रास दयायचा आणि ते गेल्यावर त्याच्या नावांन पैसे कमवत फिरायचं . एकाच प्रकारची लोक आहेत हि . जेव्हा संतसाधु राहतात तेव्हा त्यांना छळायचे ते गेल्या नंतर बसून मग पैसे कमवतात त्यांच्याच नावावर लोक . तेव्हा अशा लोकांपासून सावध रहायला पाहिजे . कारण देव प्रत्येकाच्या हृदयामध्ये बसलेला असतो . त्याच स्थान ह्या हृदयात आहे . आपल्या जवळच आहे . तुझं आहे तुजपाशी सांगितलेलंच आहे तुकारामांनी . तर तुकारामांना काय कमी त्रास दिला ,त्यांच्या सगळ्या गाथा काय इंद्रायणीत बुडवल्या . एकाहून एक अति शहाणे आपल्या जगात झालेले आहेत . त्यामुळे एव्हडे साधुसंत इथे झाले पण जस चिखला मध्ये कमळ यावं पण त्यातले किडे हे किडेच रहातात तसे आपल्याकडे अजूनही लोक त्यातले आहेत . तेव्हा यांच्या पासून सावध राहील पाहिजे . आणि स्वतःला बचावून यांच्यापासून तुम्ही सगळेजण आत्मसाक्षात्कार घेऊन यांच्या तोंडाला तोंड द्या . याना पूर्णपणे नेस्तनाबूत केलं पाहिजे . उद्या संत कुणी उभे राहिले तर त्यांच्या मागे कुणी लागणार नाही . हे लोक संत आहेत . हे लोक संत आहेत परमेश्वराची सेवा करणारे इतके हे लोक श्रीमंत असून ,यांच्या जवळ इतके पैसे असून तुमच्या गावात इतके खेडोपाडी फिरतात . तुम्हाला कुणी सांगितलं तर तुम्ही कराल का . धूळ खात तुमच्या बरोबर माझा जयजयकार करत ते आले त्याला काहीतरी कारण असलं पाहिजे . ते काय मूर्ख आहेत . इथे हे लावण्या साठी तुमच्या इथे आहे काय ?कोणत्या गोष्टी साठी ते येणार आहेत या राहुरीत ,अस्ते गावात काय आहे काय तुमच्या कडे . काय दारुगोळा आहे काय ?स्वतःच्या बद्दल स्वतःच कल्पना करून घेणे आणि त्या गव्हर्मेंट ला कळत नाही का ?तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आपली गव्हर्मेंट सहजयोगाला इतकी मानते कि फक्त सहजयोग्यानी जर बिल्ला लावलेला असेल तर त्याला इथे येण्या साठी एक दिवसात तो येऊ शकतो . आणि कस्टम मधून सुद्धा त्याला सगळे नमस्कार करून काढतात . पण ह्या खेडेगावात साध्या भोळ्या लोकांना फसवून पैसे उकळणारे लोक अशा अफवा उठवणारच . गव्हर्मेंट ला काही अक्कल नाही आहे का कि ह्या सगळ्यांना परवानगी देती . इतकच नाही तर मुभा आहे . त्यांनी मान्य जरी केलं तरी आम्ही अति शहाणे त्याचे बैल रिकामे .

आजचा दिवस फार शुभ आहे आणि ह्या दिवशी सगळ्यांनी निश्चय केला पाहिजे कि माताजी आम्ही परमेश्वर मिळवून राहणार . फार झालं आता अंत पाहू नये देवाने . आता आम्हाला आशीर्वादित करावं . परमेश्वर आहे आणि त्याचा आशीर्वाद तुम्हाला अगदी सहज मिळू शकतो . तो तुम्ही मिळवून घ्यायचा . आताच ह्यांनी म्हणजे हैबती होते त्यांचे ते म्हणजे गुरु त्यांनी सुध्दा कुंडलिनी वर केव्हड लिहिलं आहे . कि कुंडलिनीच जागरण झालं पाहिजे . चक्र स्वच्छ झाली पाहिजेत . सगळं काही ते लिहून गेले बिचारे त्यांनाही सोडलं नसणार त्यांनाही छळलं असणार . पण आता ह्या लोकांना मात्र तुम्ही छळू शकत नाही . आणि यातले जेव्हडे सहजयोगी आहेत त्यांनाही तुम्ही छळू शकत नाही . खबरदार कोणीही काहीही अशा गोष्टी जर केल्या तर सर्व परमेश्वराचा राग त्या माणसावर आधी येणार आहे तुम्हाला सांगून ठेवते . मग मला बोलू नका . फार झालं . आता जे लोक साधेसुधे आहेत ज्यांना परमेश्वर पाहिजे ,जे परमेश्वर चरणावर आहेत त्यांना परमेश्वर घेऊ द्या . ऊपटसुम्भा ना म्हणावं कि ती दुकान उचलून तुम्ही दुसरीकडे घेऊन जा . देवाचं दुकान मांडून ठेवलं आहे . ह्या भिकारड्या लोकांना कसला भगवंत आहे . तुम्ही लोकांनी सुध्दा हि गोष्ट लक्षात घेतली पाहिजे . प्रत्येक गोष्टीला इतकं सुंदर विधान सगळं करून इतके मोठे साधुसंत ह्या तुमच्या महाराष्ट्रात होऊन गेले ,एव्हडी मेहनत केली . कितीतरी वर्षांपासून नाथ महाराजान पासून इतकी मेहनत ह्या लोकांनी केली आहे ती अशी वाया जाऊ देऊ नये . हि जमीन तुमची एव्हडी सुपीक आहे आणि तुम्ही काहीतरी फार मोठं सुकृत केलं म्हणून च ह्या महाराष्ट्रात जन्माला आलात . हे लोक म्हणतात कि आम्ही काही सुकृत केलं असत तर आमचा महाराष्ट्रात जन्म झाला असता . पण जन्मल्या नंतर आजकालच्या वातावरणात आपली डोकी खराब करून घेऊ नका . फार आणीबाणीची वेळ आहे . ह्या वेळेला सगळ्यांनी साक्षात्कार घेऊन स्वतःच्या शक्तीला जाणलंच पाहिजे . त्या शक्तीत उभच राहील पाहिज

श्री छत्रपती शिवाजी महाराज हे आत्मसाक्षात्कारी होते . ते नेहमी म्हणत असत कि स्वधर्म ओळखावा . स्व चा धर्म घ्या . स्व चा धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म आहे . तो तुम्ही स्वीकारावा असं ते सांगत असत . नेहमी म्हणायचे हि श्रीं ची इच्छा . आणि त्यांनाही काही छळलं नाही असं नाही त्यांचा राज्याभिषेक सुध्दा करायला तयार नव्हते हे उपटसुम्भ . तेव्हा तुम्ही हे लक्षात घेतलं पाहिजे कि आज तुमच्या साठी माताजी इतक्या लांबून ,मी लंडन ला असते तुम्हाला माहित आहे . तिथून मी आले आहे तुम्हाला तुमचं जे काही आहे ते देण्या साठी . ते तुमच्यात निहित आहे . कुंडलिनी नावाची शक्ती तुमच्या मध्ये आहे . ती जागृत होऊ शकते आणि अस्त गावाला इथे इतकं सुंदर केंद्र आहे . त्या केंद्रावर येऊन तुम्ही शिकून घ्या . तुमची कुंडलिनी तुम्ही स्थिरावर करून घ्या आणि मग बघा तुम्ही मला स्वतः पत्र लिहाल माताजी आम्ही आनंदाच्या सागरात पोहत आहोत . इतका तुमच्या मध्ये शक्तीचा प्राधुरभाव होईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल जी मुल शिक्षणात अत्यंत कच्ची होती ती पहिल्या नंबरात येऊ लागली . ज्या लोकांना खायला नव्हतं ते व्यवस्थित झाले . ज्यांच्या तब्बेती खराब होत्या त्यांच्या तब्बेती ठीक झाल्या . हे तर काहीच नाही पण परमेश्वराचा जो आनंद आहे ज्याचं वर्णन करता येत नाही ते अहोरात्र वहात आहे . तेव्हा अशा आणीबाणीच्या वेळी आज परमेश्वरचिंच तुमच्या वरती कृपा झाली आहे ,त्याचीच इच्छा आहे कि हे वाटायचं आहे त्या वेळी दिरंगाई करू नये आणि जे मिळतंय ते घेऊन घ्यावं . हि जर वेळ चुकली तर चुकली . याच्या पुढे मात्र हि वेळ येणार नाही तेव्हा कृपा करून सर्व मंडळींनी आज इथे आत्मसाक्षात्कार घ्यावा आणि ह्या आत्मसाक्षात्काराचं पूर्ण चीज करून घ्यावं . त्याचा मान ठेवला पाहिजे . नाहीतर तुम्हाला सांगतील लोक तुम्ही काही कामाचे नाहीत ,तुम्ही बेकार आहात ,तुम्ही पाप केलं ,तुम्ही अमुक केलं . काहीही तुम्ही केलेलं नाही . त्याच लोकांनी पाप केलं आहे जे तुम्हाला सांगतात . त्यांचं काही ऐकू नका . तुम्ही ह्या महाराष्ट्राच्या भूमीवर जन्माला आलात आणि आज इथे तुम्ही आलात त्याचा अर्थ असा कि तुम्ही पात्र आहात . तेव्हा कृपा करून आत्मसाक्षात्कार घ्यावा आणि त्याच पूर्णपणे चीज करून घ्यावं . एक आईच्या द्रीष्टीने मी तुम्हाला सांगते आणि ते एक शुध्द बुध्दीने तुम्ही समजून घेतलं पाहजे . नसत्या उठाठेवी करून आपल्या आयुष्याचं खोबर करून घेतलं आहे तुम्ही . ते करू नये आणि ह्या फालतूच्या लोकां कडे मुळीच लक्ष देऊ नये . यांचा उद्देश फक तुमच्या कडून पैसे उकळण्याचा आहे . म्हणून ते अशा अफवा आणि कंड्या उठवत असतात . त्या शिवाय आणखीन काय करणार . काही कुंडलिनी तर उठवू शकत नाही . मग असच करत रहायचं . तेव्हा तुम्ही सर्वानी शांतपणाने माझं भाषण ऐकून घेतलं अस्त गावातला हा शेवटचा दिवस आहे . उद्या हि मंडळी जाणार तरी याना वाईट वाटत आहे कि आम्ही आईला सोडून जात आहोत . आता हे चौदा देशांमध्ये जात आहेत त्याच त्यांना खूप दुःख वाटत आहे . हा महाराष्ट्र सोडून जात आहेत ,त्यांना आज निरोप दयायची वेळ आलेली आहे मला आणि माझं हृदय भरून आलेलं आहे . आणि ह्या वेळेला तुमच्या अस्त गावाला तुम्ही प्रेमाने ,आस्थेने तुम्ही विचारणा केली ,तुम्ही मला बोलावलं आणि सगळ्यांचं एव्हडं स्वागत केलं त्या बद्दल मी तुमच्या सगळ्यांची आभारी आहे . इथल्या व्यवस्थापकांची आणि सर्व सहजयोगी सेंटरच्या लोकांची मी फार आभारी आहे . असच प्रेम एकमेकात राहूद्या . ते तुमच्या बरोबर उठतात ,तुमच्या बरोबर फिरतात तुमच्या बरोबर सगळं काही करत आहेत तेव्हा किती आनंदाने ,प्रेमाने ,सौख्याने राहायला पाहिजे तर नसत्या भांडणाची मूळ काढण्यात काही उपयोगाचं नाही . ते दिवस विसरून जायचे . तुम्हाला कधी वाटत का कि इंग्लिश माणस इथे येऊन ह्या खेडेगावात तुमच्या बरोबर राहिले असते ?वाटत का कधी ?आज तुमचे कपडे घालून तुमच्या बरोबर फिरत आहे त ते दिसत नाही का तुम्हाला . तुम्हला डोळे नाहीत का बघायला . आहेत ना मग बघा . जे शहाणे असतील ते शहाण्या सारखे वागतील आणि जे नाहीत ते नेहमी मूर्खच असतात त्यांना सोडून द्यावं . पण जे शहाणे आहेत त्यांनी शहाणपणाने घ्यावं आणखीन आजचा मोठा प्रसाद आहे ते समजून आजच जे कुंडलिनीच जागरण आहे ते सगळ्यांनी घेतलं पाहिजे . एक दहा मिनिटात ते कार्य होणार आहे . आता जर सगळे बसू शकले तर बरे होईल .

खाली बसलेलं चांगलं कारण ह्या पृथ्वीचं महत्व किती आहे ते मी आधीच सांगितलं आहे . जमिनीवर बसल्यावर एक फायदा आहे . हि आपली जी भूमी आहे महाराष्ट्राची हि अत्यंत पवित्र आहे . आणि तिच्या पवित्रतेचा आपल्याला फायदा उचलायचा आहे . म्हणून आपण जमिनीवर बसलो आहे . ह्या लोकांना जमिनीवर बसणं माहित नव्हतं . कधी हे जमिनीवर बसले नाहीत . पण ह्यांनी सगळे प्रयास करून जमिनीवरच बसायचं ठरवलं आहे . जो पर्यंत महाराष्ट्रत आहे तो पर्यंत जमिनीवरच झोपू ,जमिनीवरच राहू आणि भूमीवर लोळू असं त्यांनी एक ठरवलं होत .

आता डावाहात तुम्ही सगळे माझ्याकडे करा . यात आपली इच्छाशक्ती आहे . आणि गणेशाचं स्मरण करून उजवा हात जमिनीवर ठेवायचा . ह्या पृथ्वी मातेला अशी प्रार्थना करायची मनातल्यामनात कि माझ्या इच्छेत जे काही जड आहे ते तू काढून घे .माझ्यातलं जडत्व तू काढून घे अशी इच्छा करायची . आता उजवाहात माझ्याकडे करायचा . यात आपली क्रियाशक्ती आहे . आणि डावाहात आकाशाकडे मागे असा उभा धरायचा . आणि प्रार्थना कार्याची कि जे काही माझ्या कार्यात अहंकार आला असेल किंवा माझ्या शारीरिक कार्यामध्ये मला कोणचे तरी रोग लागेलेले असतील ते सर्व ह्या आकाशतत्वात जाऊदे . हे षड्रिपू तू ओढून घे . मनापासून प्रार्थना करायची . आता डोळे मिटून घ्या . परत डावाहात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर ठेवायचा . आणि लक्ष टाळूकडे डोक्यावर . टाळू हे ब्रम्हरंध्र आहे . आता उजवाहात माझ्याकडे आणि डावाहात माझ्याकडे . आता हळू हळू डोळे उघडा . डावाहात माझ्याकडे करून उजवा हात वरती मान खाली करा आणि टाळूवर धरा . आता बघा काही गारगार येतंय का ?गारगार वारा सुटला आहे . तुकारामांनी याच वर्णन करून ठेवलं आहे थंड शीतल वर आला . तुमच्या टाळूतून थंड आलं पाहिजे . आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डाव्या हाताने टाळूवर बघा काही थंड जाणवतंय का . आपल्या कडे लक्ष ठेवा , दुसऱ्यांकडे नको . फार आणीबाणीची वेळ आहे ,अनंत जीवनातलं जे शोधत होतो ते आज मिळणार आहे . सगळं सुकृताचं फळ आज मिळणार आहे . आता दोन्ही हात आकाशाकडे असे वर करायचे आणि मान मागे करून प्रश्न विचारा कि हि परमेश्वराची ब्राम्हशक्ती आहे का ?हीच चैतन्यशक्ती आहे का ? तीनदा विचारा . हीच प्रेमशक्ती आहे का ?आता हात खाली करा . आता बघा हातात थंड थंड येतंय का . ज्यांच्या हातातून आणि टाळूतून थंड आलंय त्यांनी दोन्ही हात वर करावेत . संबंध अस्त गाव पार झालं बघा . आता याच्या नंतर इतका आनंद वाटतो माणसाला .

आता बघा इतक्या गोष्टी ह्या लोकांनी तुम्हाला सांगून ठेवल्या आहेत . ज्या दिवशी गणपतीचा जन्म झाला त्या दिवशी उपास करायचा . तुमच्या घरी जर उद्या मुलगा जन्माला आला तर तुम्ही सुतक पाळाल का गोडधोड करून जेवाल . साधं आपण डोकं लावल पाहिजे . पण ह्यांनी सांगितलं आपण उपास करू . त्यांनी किती त्रास होतात तुम्हाला आश्चर्य वाटेल आमचे एक शिष्य होते राजवाडे म्हणून ते अग्निहोत्र करायचे . आणि ते फार अगदी आजारी स्तितीत माझ्याकडे आले . आणि मग नीट झाले मग सहजयोगी झाले . त्यांना त्रास सुरु झाला आणि ते माझ्याकडे आले आणि म्हणाले माताजी मला प्रोस्टेड ग्लॅन्ड चा त्रास आहे . म्हंटल शक्य नाही तुम्ही गणपतीभक्त आहात आणि प्रोस्टेड ग्लॅन्ड ला गणपती सांभाळतात . पण होतो म्हणे माताजी डॉक्टर म्हणतात ऑपरेशन करा . मी म्हंटल मला तर तस काही वाटत नाही . तर आमचा प्रसाद असतो च ना त्यांना म्हंटल हे घ्या प्रसाद घ्या . ते काकू करायला लागले म्हंटल का काय झालं ?आज संकष्टी आहे म्हणून आज मला उपास आहे . म्हंटल हेच तर कारण आहे घ्या आधी प्रसाद घ्या म्हंटल . प्रसाद खाल्ला त्यांनी परत गेले पुण्याला तर डॉक्टर नि सांगितलं कि तुमचं प्रोस्टेड ठीक झालं आहे . म्हणजे उपसा मुळे गणपती नाराज होतात . गणपती रुसले होते . तुम्हाला आश्चर्य वाटेल ह्या देवतांना खुश करून आपण कँसर सारखे रोग दूर करू शकतो . पण त्यांना नाराज करण्याचेच धंदे शिकवलेत ह्या लोकांनी . प्रत्येक देवताला कस नाराज करायचं हे शिकवून ठेवलं आहे . त्यांनी देव कसे प्रसन्न होणार ?आता समजा जे लोक दत्तात्रयांना मानतात . किंवा साईनाथांना मानतात . त्यांचं पोट नेहमी खराब असत . का?विचार करा . जे दत्तात्रय आपल्या पोटात आहेत त्यांच्या आशीर्वादाने आपलं पोट उत्तम व्हयला पाहिजे . मग पोट खराब का होत ? कारण गुरुवारचा उपास . गुरुवारी ज्यांचा जन्म झालेला आहे आणि तो गुरूचा दिवस आहे त्याचा आनंद करायचा सोडून उपास करायचा हे कोणी सांगितलं आहे . तुम्हाला करायचा तर करा उपास तसे उपाशी आहोतच आपण . तुम्हाला शोक आहे उपासाचा तर देव म्हणतो राहा उपाशी . पण ज्या दिवशी त्यांचा जन्म झालेला त्याच दिवशी उपास करायचा बरोबर नेमका . आणि तुम्ही बघा कुणी दत्तात्रयांचा शिष्य असेल तर त्याच पोट दुखणारच . तस शिवाचं . शिवाचं स्थान हृदयात आहे . जे सदाशिवाला मानतात त्यांनी हमखास सोमवारी उपास करायचा . आणि तो उपास असा असतो कि हार्टअटॅक आलाच पाहिजे . मग म्हणायचं आम्ही एव्हडं शिवाला मानून आम्हाला हार्टअटॅक कसा आला . अहो ज्या देवाचा जो दिवस आहे त्या दिवशी तुम्ही उत्साह दाखवायचा आनंद दाखवायचा . परमेश्वर दुःख देण्यासाठी नाही आहे . देव सौख्य देण्यासाठी आहे . संपूर्ण जगाची तुम्ही संपत्ती वापरा सगळा आनंद उचला . तो एव्हडा मोठा देव हा आपला बाप आहे . एक सर्वसाधारण बाप काय विचार करेल माझ्या मुलाला मी काय करू नि काय नको . मग तो देव आहे मग तो आपल्याला दुःख कस देईल . दुःख देण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या मधल्या लोकांनी दिशाभूल करण्यासाठी सांगितल्या आहेत . म्हणून सहजयोगा मध्ये आम्ही उपासाचं करायचा नाही म्हणून आम्ही सांगितलं आहे . करायचा असेल तर आपल्या मनानी कधीही करा पण देवा साठी करू नका . देवाच्या नावावरती उपास करायचा नाही . त्याच कशाला नाव खराब करता . अहो तुमच्या बापाला जर कळलं कि तुम्ही त्याचा नावाने उपास करता आहेत तर बाप समुद्रात उडी मारेल माझा पोरगा माझ्या नावाने उपास करतो म्हणून . समजत कि नाही तुम्हाला . अहो तो तुमचा तो बाप आहे दुश्मन नाही कि त्याच्या साठी तुम्ही उपास करायला .

गांधीजींनी उपास केला होता इंग्रजांच्या विरुद्ध कारण ते त्यांचे दुश्मन होते . तुम्ही कशाला देवाच्या विरुद्ध काढलाय उपास . डोकं लावा . देवाने डोकं दिलय ते गहाण ठेवायचं . ह्यांचं म्हणणं तुम्ही करा उपास आणि पैसे द्या आम्हाला . हे आपल्याला समजत नाही इतकं अंगवळणी पडलय . कि पैसे दिले पाहिजेत . कुणाला म्हंटल माताजी पैसे घेत नाहीत तर बर पंचवीस पैसे घेतील का मग ?असं आहे . पैसे देवाला समजत नाहीत हे लक्षात ठेवा ,लिहून ठेवा . ब्रम्हवाक्य . ज्ञानेश्वर झाले तुकाराम झाले त्यांनी किती पैसे घेतले तुमच्याकडून . अहो शिवाजी महाराज एव्हडी सगळी संपत्ती घेऊन आले तुकारामांसाठी त्यांनी सांगितलं बाबा मला काही नको घेऊन जा परत सगळं . मला याची काही गरज नाही तुम्ही राजे आहात तुम्ही सगळं ठेवा ते . आम्ही शेतकरी आहोत आम्हाला जे आहे ते पुष्कळ झालं . त्या लोकांच्या आयुष्याकडे बघायचं सोडून ह्या भामट्यांकडे कशाला बघायचं . आता हे सगळं सोडून व्यवस्थित विश्वधर्मात यायचं . आणि विश्वधर्मामध्ये सर्व धर्माचा सार आहे ,मान आहे पण धर्म असायला पाहिजे अधर्म नाही . अधर्म जो आहे तो टाकून दिला पाहिजे . धर्म घेतला पाहजे .

दुसरं सांगते तुम्हाला त्या गोष्टीच लोकांना फार वाईट वाटत . एका गोष्टीच . कि कपाळाला बुक्का लावायचा हि आपली पद्धत . आता मी तुमच्यातलीच आहे मी काही वेगळी नाही ना . मी मराठीच आहे . मी सांगते . कपाळाला बुक्का लावायला सांगतात . जिथे बुक्का लावतात ते तुम्हाला आश्चर्य वाटेल हे सूर्याचे स्थान आहे . सूर्याला काळ फासायचं . मग काहो हे जे बडवे आहेत ते लावतात का काळ ते लाल लावतात . तुम्हाला सांगतात काळ लावा आणि स्वतः लाल लावतात . कधी तुम्ही पाहिलत का कुणाला काळ लावताना . तुम्हाला मुर्खात काढत आहेत आणि तुम्ही मात्र चांगलं काळ फासून घेत आहात . आता परवा एक फोटो काढला तुम्हाला आश्चर्य वाटेल त्रिमूर्तींचा एक फोटो होता . एक साधा फोटो होता . पण दहा मिनिटांनी त्याचा फोटो काढल्यावर कपाळावर एखादा बल्ब लावतात तसा आज्ञा चक्रावर फोटो आला . तो सहजयोगी होता ज्यांनी फोटो घेतला तो . आता त्रिमूर्ती काय आहे .गणेशाची मूर्ती काय आहे ,साईनाथांची मूर्ती काय आहे . ते कोण होते . ते नुसतं बाह्यातून बघायचं नसत . ते किती मोठे होते . पण त्यांच्याच वेळेला पुष्कळशे भामटे लोक हि जगात आले . आणि लोकांची दिशाभूल केली . एक साईनाथांचं चरित्र आहे ते वेगळच आहे . ते समजलं पाहिजे . जो माणूस परमेश्वराच्या गोष्टी करतो तोच खरा बाकी सर्व खोटे . आज पाच पैसे द्या ,दहा पैसे द्या ,हे करा .ते करा हे कस काय चाललं आहे . देवाचा याच्याशी काय संबंध आहे . तेव्हा समजून घेतलं पाहिजे . हे सगळं भोळ्या भाबड्या लोकांना फसवून त्यांच्याकडून पैसे काढण्याचे धंदे आहेत . हे सगळं आता बंद झालं पाहिजे . सोडून टाकायचं सगळं . सगळ्यांना मी सांगणार सगळा मार्ग खुला करून खर काय ते मी सांगणार . मला कुणाची भीती नाही . मला काय करतील हे लोक ?जे काही खर आहे ते च मी उघड करून सांगणार आहे . आणि ते तुम्ही ऐकून घ्यावं आणि समजून घ्यावं . तुमच्या बुध्दीला पटेल . पण आधी सुबुध्दी पाहिजे डोक्यात ना . कळलं का ?सगळ्यांना नमस्कार .

Astagaon (India)

Loading map...