Public Program 1986-01-11
11 जानेवारी 1986
Public Program
Shrirampur (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
Sarvajanik Karyakram 11th January 1986 Date: Place Shrirampur Public Program Type
श्रीरामपूरच्या सर्व परमेश्वराला शोधणाऱ्या साधकांना आमचा प्रणिपात असो. आपण सर्वांनी इतक्या प्रेमाने आम्हाला इथे बोलवलं आणि परमेश्वर प्राप्तीची उत्कंठा दर्शवली त्यातच आम्ही कृतार्थ झालो. तसंही जीवन आहे. आपण जे काही शिकत असतो, त्यामध्ये आपण आनंद शोधत असतो. काहीही आपण करतो ते आनंदासाठी करतो. कोणीही दु:खासाठी शोध करत नाही. दु:ख कुठे म्हणून शोधायला जात नाही. पण जिकडे आनंद आहे. तिकडे माणसाचं लक्ष वेधलेलं असतं. जीवनामध्ये आनंद काय आपल्याला समजत नाही. सुख आणि दुःख ह्या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. जो सुखाकडे म्हणून धावतो त्याला शेवटी दुःख होतं. ह्याला काय कारण असलं पाहिजे? जो निव्वळ आनंद, ज्याने सुख आणि दुःख दोन्ही संपून, जातात अशी कोणती स्थिती असली पाहिजे? असा विचार जेव्हा माणसाच्या मनात उद्भवतो त्यावेळी तो एकसांख्य होतो आणि तो परमेश्वराला शोधू लागतो. परमेश्वराच्या नावावर लोकांनी पुष्कळ दुकानं मांडलेली आहेत. दुकानात गेलं म्हणजे परमेश्वर मिळतो असा आपला पुष्कळांचा विचार आहे. सहजयोगात तुम्ही पैसे देऊ शकत नाहीत, असं म्हटल्याबरोबर अर्धे लोक उठून चालले जातात. पैशाने तुम्ही परमेश्वर विकत घेऊ शकत नाही. परमेश्वर घेताच येत नाही आपल्याला. विकाऊ वस्तू नाही आहे परमेश्वर . तर परमेश्वर काय आहे ? ज्याने ही सृष्टी रचली, ज्याने पृथ्वी आपल्याला दिली, ज्या पृथ्वीतलावर आपण जन्माला आलो, हे सगळं करणारा जो परमेश्वर आहे, तो आहे तरी काय? असा प्रश्न मनामध्ये उभा राहतो. पुष्कळसे लोक अशा भ्रामक कल्पनेत इकडे तिकडे भटकतात आणि भटकले आहेत. धर्माच्या नावावरतीसुद्धा पुष्कळांना भरकटवून टाकलेले आहे. ज्याला आपण धर्म म्हणतो, कधी कधी असं वाटतं, की हा धर्मच नसावा. जे धर्मावरती बोलतात त्यांचासुद्धा एवढा अधर्मीपणा! आपल्याला विश्वासच वाटत नाही, की हा काही धर्माचा मार्ग असेल. तेव्हा मनुष्य शेवटी सत्याला शोधू लागतो. परमेश्वराच्या ऐवजी त्याला वाटतं, की सत्य काय आहे ते पाहिलं पाहिजे. परमेश्वर मिळाला, आपल्याला आश्चर्य वाटेल, की सत्य आणि परमेश्वर एकच आहेत. आणि सत्य आणि प्रेमसुद्धा एकच आहेत. त्यात काही अंतर नाही. ज्या माणसावर आपलं प्रेम असेल, ज्या मुलीवर आपलं प्रेम असेल, ज्या मुलांवर आपलं प्रेम असेल, ज्या देशावर आपलं प्रेम असेल, त्याबद्दल आपल्याला सगळे माहीत असतं. आपण सगळं जाणतो. तसेच आहे हे. जेव्हा परमेश्वर तुम्ही जाणला, तेव्हा (अस्पष्ट) सगळीकडे आणि हे ही कळेल, की हे सत्य म्हणजे सबंध प्रेमाचा ठेवाच आहे. हे केवढं मोठ सत्य आहे, की परमेश्वराने आपल्याला इकडे, ह्या जगामध्ये आणलं आणखीन त्याची अत्यंत इच्छा आहे, की आपण त्याच्या साम्राज्यात जावं. त्याच्या राज्यात जावं आणि तिथे जाऊन आनंदात नांदावं. त्याचं नागरिक व्हावं आणि त्याने तुम्हाला एका ... (अस्पष्ट) प्रमाणे तुमचं जे काही आहे ते देऊन टाकावं. हे केवढं मोठं सत्य आहे ! आणि त्यात किती प्रेम ओथंबून भरलेले आहे ! तेव्हा हे सर्व असतांना आज ন
आपण तसं समाजात जगत नाही. तेव्हा असा प्रश्न उभा राहतो की हा परमेश्वर आहे तरी कोण? आहे किंवा नाही? खरोखर हा परमेश्वर असता तर लोकांना एवढा त्रास, ज्यांच्याजवळ पैसे नाहीत त्यांना पैशाचा त्रास, ज्यांच्याजवळ पैसे आहेत त्यांना घरचा त्रास, ज्यांच्याजवळ सत्य आहे त्यांना सत्तेचा त्रास! जे आहे त्यात त्रासच त्रास भरलेला आहे. मग माणसाला समाधान वाटत नाही. आजही असे लोक जगात मी पाहिले, की समजतात की, जे जसं आहे तसं मानून घेतलं पाहिजे हाच परमेश्वर आहे. ही गोष्ट खोटी आहे. तुम्ही जेव्हा आत्मसाक्षात्कारी होता, तेव्हा जे आहे त्याच्यात समाधान मानू शकता, पण जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी नाही, तेव्हा जे आहे त्याच्यात तुम्ही समाधान मानलं , तर तुम्ही पडले, गेले कामातून! अजून आम्ही मिळवलेलेच नाही. जे खरं मिळवायचे आहे ते आम्ही अजून मिळवलेले नाही आणि अशा रीतीने जे लोक तुम्हाला सांगतात, की जर तुम्ही गरीब असले, तर गरिबीत रहा, श्रीमंत असले तर श्रीमंतीत रहा. आणखीन जर तुम्हाला दुःख असेल, तर दुःख सहन करा, असं परमेश्वराने सांगितलं आहे, ही गोष्ट खोटी आहे. परमेश्वराने हे सांगितलेले आहे, की तुम्हाला माझ्या साम्राज्यात यायला पाहिजे. ‘योगक्षेमं वहाम्यहम्’. आधी योग घ्या, म्हणजे परमेश्वराच्या साम्राज्यात जा. तुमचा संबंध परमेश्वराशी होऊ द्या आणि त्याच्यानंतर, मग काहीही कुठेही असलं तरी काही वाटत नाही. कारण तुम्हाला बादशाही आली, की कशाची फिकीर नसते. तुम्ही राजे झालात. राजे लोकांना काय मागायचं असतं! त्यांना काय जरूरत असते? कसलीच नाही. गरज संपली त्यांची. अशा स्थितीला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे आणि ती स्थिती सहज आहे . सहज, सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा हा योगाचा जन्मसिद्ध हक्क तुम्ही सर्वांनी मिळवून घेतला पाहिजे. ह्यांनी असं सांगितलंय, आमचे गुरूजी असं म्हणाले, ते असं म्हणाले , त्याच्यात असं दिलंय, ह्या सर्व गोष्टी लक्षात ठेवू नये. झालं गेलं ते विसरून जावं. आता स्वत:ला जाणण्याची वेळ आलेली आहे. स्वत:ला जाणीव झाली पाहिजे, परमेश्वर कारय आहे? आणि ती जाणीव अगदी सहजच होणार आहे. तर ही एक जीवंत क्रिया आहे. परमेश्वर हा जीवंत आहे आणि क्रियासुद्धा जीवंत आहे. इतकेच नव्हे, तर त्याचं साम्राज्य चोहीकडे पसरलेले आहे. त्याची ही शक्ती अणू- रेणूमध्ये भरलेली आहे. प्रत्येक ठिकाणी कार्यान्वित आहे. फक्त तिचा उपभोग आम्हाला एवढ्यासाठी मिळत तेव्हा नाही कारण आम्ही त्याच्या साम्राज्यात अजून गेलेलो नाही. जेव्हा आम्ही त्याच्या साम्राज्यात जाऊ, तुम्हाला आश्चर्य वाटेल, काय चमत्कारपूर्ण त्या परमेश्वराचा आशीर्वाद असतो. तो अजून आम्ही मिळवलेला नाही. हा योग सांगितलेला गाठलेला नाही. म्हणूनच आज ही दशा आहे. पण जरी ही दशा असेल तरीसुद्धा एक हे मानलं पाहिजे, की आपल्या देशाला विशेष करून परमेश्वराने घेरलेले आहे. आणि इथे इतकी अवतरणं झाली, मोठमोठाले साधु-संत झाले. आणि ही जी भूमी, जो अहमदनगर जिल्हा आहे, इथे तर हजारो वर्षापूर्वी मोठे मोठे तपस्वी झाले. मच्छिंद्रनाथ झाले, गोरक्षनाथ झाले. म्हणजे किती मोठे लोक झाले. अशा या पवित्र स्थानी आपला जन्म झाला. इथे आपलं वास्तव्य आहे. तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे. आणि हे कार्य अगदी सहजच घडलं पाहिजे. अशी मला पूर्ण पूर्ण खात्री आहे. (अस्पष्ट) मध्ये ही शक्ती निहीत आहे. झोपलेली आहे. ही शक्ती म्हणजे शुद्ध इच्छा आहे. जी परमेश्वराची इच्छा आहे. तीच इच्छा आपल्या त्रिकोणाकार
अस्थीमध्ये कुंडलिनी म्हणून स्थित आहे. हे काही फार कठीण काम नाहीये. लोकांनी सांगितलं की सहावा (अस्पष्ट) आहे. ही उगीचच तुम्हाला परावृत्त करण्याची एक अध्याय वाचायचा नाही. कुंडलिनीबद्दल .... प्रथा आहे. प्रत्येक चांगल्या गोष्टीपासून जसं माणसाला परावृत्त करण्यासाठी काहीतरी गौडबंगाल करून ठेवायचं, त्यातला हा प्रकार आहे. अगदी सोपी गोष्ट आहे, की आपल्या ह्या त्रिकोणाकार अस्थीमध्ये कुंडलिनी शक्ती आहे. आता ही कुंडलिनी शक्ती, जसं एखाद्या बी मधून अंकुर येतो, तसं आपोआपच प्लावित होते. आपोआप. तिला आपण पृथ्वीमातेच्या एका अंकुराच्या रूपात बाहेर पडते. त्याच्यामध्ये आहे आणि ती शक्ती आपोआपच, सहजच , सहा चक्रांना भेदून, सात चक्र आहेत तशी. तशी अनेक चक्र आहेत, त्यातल्या सात चक्रांपैकी सहा चक्रांमधून ह्या मेंदूच्या वरच्या (अस्पष्ट) पाहिलं की एका बी मधून त्याची उर्जा शक्ती जी आहे, आपोआपच भागामध्ये ज्याला आपण (अस्पष्ट) म्हणतो त्याला छेदून ब्रह्मरंध्रातून बाहेर पडते. आता आपण बाहेरच्या लोकांपर्यंत, बाह्य देशामध्ये चाललो आहोत. आणि आम्हाला वाटतं हे लोक किती सुखी आहेत ! कोणी सुखी नाही. मी आता तिकडेच राहिलेली आहे. दादांच्या नोकरीमुळे मी तिकडे राहिलेली आहे. तिकडे किती दु:खी लोक आहेत ! तुम्ही त्यांच्या मानाने फार सुखी आहात. हे लोक त्या त्या देशांमध्ये अत्यंत समृद्ध आहेत. ते नुसतं आत्महत्येचं विचारत असतात, की आम्ही आत्महत्या कशी करावी? हे लोक सुखी कसे ? ते मुळीच सुखी नाही. ह्यांचं काहीतरी चुकलेलं आहे आणि ते असं चुकलेलं आहे, की जे खरं मिळवायचं ते मिळवलेलं नाही. श्रीकृष्णाने असं म्हटलेलं आहे, की चैतन्य जे झाड आहे, ते उलटं आहे. डोक्यामध्ये त्याची पाळंमुळे आहेत आणि खाली अधोमुखाकडे त्याची झाडं आहेत आणि हे त्या अधोगतीला लागलेले लोक आहेत. त्या अधोगतीला उतरणारे आहेत. त्या पाळंमुळांचा काही संबंध राहिलेला नाही. तेव्हा बाहेरचं जे सायन्स आहे, त्यांना वाटतं झाडाचं सायन्स आहे. जे मुळाचं सायन्स आहे ते ह्या देशात आहे. आपल्याजवळ आहे. हे सायन्स जर तुम्ही शिकून घेतलंत तर तुम्ही त्यांच्यावर मात करणार. कारण त्या सायन्सला प्लावित करणारं, त्या सर्व शास्त्राचा स्रोत असा ज्ञानाचा विशाल सागर जो आहे, तो आपल्या या मेंदूमध्ये आहे. त्यात जेव्हा तुम्ही जागृत होता, तेव्हा हे सगळं सायन्स म्हणजे अगदी डाव्या हाताचा खेळ वाटतो आपल्याला. ‘काय आहे ह्या सायन्समध्ये!’ आपण जे जे बोलू ती पूर्व दिशा. हे तेव्हा ह्या सायन्सच्या कह्यात जे लोग गेले, ते अधोगतीला म्हणूनच गेले. त्यांनी अॅटमबॉम्ब बनवला, बनवलं, ते बनवलं. अराजकता पसरवली. सर्व तऱ्हेचा त्यांना त्रास झाला. तर जे ह्या नव्या स्थितीला येतील, ज्यांना ह्याचं सायन्स कळेल, परमेश्वराचं सायन्स, ज्याने सर्व ... (अस्पष्ट) चालतात. नानकसाहेबांनी हात लावून दगडातून पाणी काढलं. ही गोष्ट खरी आहे, काही खोटी नाही. असे अनेक आपल्या इथे चमत्कार घडले. हे सर्व खरं आहे! फक्त अजून तुम्ही अधिकारी होत नाही. जोपर्यंत त्याच्यामध्ये परमेश्वराचं साम्राज्य येत नाही, तोपर्यंत आपण अधिकारी होऊ शकत नाही. तर मुख्य म्हणजे सगळ्यांनी सांगितलं फार कठीण आहे. सगळ्यांनी असं सांगितलं की ह्याच्याहून कठीण काहीच नाही. काही लोक तर कुंडलिनी जागृत झाली म्हणजे आम्ही काही तरी बेडकासारखे उड़ू लागतो, वगैरे सांगतात. म्हटलं, हे कशावरून ? म्हणे एका पुस्तकात लिहिलं आहे. पुस्तकातही लिहून टाकलं. तुम्ही ते घेऊच नये. कुंडलिनी ही तुमची स्वत:ची आई आहे. तुम्ही जेव्हा जन्मला
तेव्हा तुमच्या आईने सगळा त्रास उचलला. सगळं तिने सहन केलं होतं, तुम्ही काही सहन केलं नाही. तशीच ही तुमची आई इथे बसलेली आहे. अशी काही संधी आली की ज्यावेळेला तिची जागृती होईल, तेव्हा ती आपल्या मुलाला परत घडवणार आणि तो पुनर्जन्म हा साधला पाहिजे. आपल्याकडे ज्याचा दोनदा जन्म झाला तो द्विज . म्हणजे ज्याने ब्रह्माला जाणलं तो ब्राह्मण. पण आता असे ब्राह्मण आहेत कुठे ? .....(अस्पष्ट) ज्याने ब्रह्माला जाणलं नाही तो ब्राह्मण नाही, ज्याने तुम्हाला जाणलं तेच खरे ब्राह्मण. ह्याला शास्त्राधार आहे. व्यास मुनी स्वत: एका कोळीणीचा मुलगा होते. त्याच्या वडिलांचा पत्ता नव्हता. वाल्मिकी हा एक साधा कोळी होता. आज त्याचं रामायण साऱ्या जगामध्ये वंदनीय आहे. अशी अनेक उदाहरणं आपल्यामध्ये आहेत. शबरीची बोर, उष्टी बोरं, श्रीरामाने इतक्या प्रेमाने खाल्ली. श्रीकृष्णाने विदुराच्या घरी जाऊन भाजी खाल्ली, अशी अनेक सगळी उदाहरणं असतांनासुद्धा आपण अजूनही ही जातीयता, हे जे जुने पांघरलेले घोंगडे आहे, त्याच्या खालीच भिजत पडलो आहोत आणि कुजत पडलो आहोत. ही व्यवस्था बुडायला मोठमोठे लेक्चर्स देऊन होणार नाही. सांगून किंवा तुम्ही एक आहात, एकाच परमेश्वराचे अंग आणि प्रत्यंग आहात, हे सांगून समजणार नाही. तेव्हा बोलाचाच भात, बोलाचीच कढी. हे अंगप्रत्यंग जे आहे ते नेहमी वेगळें दिसणार! कारण त्याची समग्रता आज आपण जाणलेली नाही. ह्याची जाणीव व्हायला हा जो आत्मा आपल्या हृदयामध्ये आहे, हा सामूहिक चेतनेने प्लावित आहे. ह्याच्यामध्ये सामूहिक चेतना नाही आणि त्याला जाणल्याशिवाय आपण सगळे एकाच परमेश्वराचे अंगप्रत्यंग आहोत, हे आपण जाणू शकत नाही. म्हणजे हे बोट आणि हे दसरे बोट जाणतात, की आम्ही एकाच शरीराची दोन बोटं आहोत. ते काही असं म्हणत नाही की आमची जात वेगळी, तुमची जात वेगळी, काही नाही. एकाच कार्यासाठी जेव्हा त्यांना सज्ज व्हावं लागतं तेव्हा ते बरोबर एकजुटीने कामं करतात. काही भांडणं होत नाही, काही वादविवाद होत नाही. काही नाही. एकसाथ लागले. कारण त्याच्यासाठीच ते आलेले आहेत. त्याच्यासाठीच ते राहतात. त्याच्यासाठीच ते कार्यशील आहेत. लोकांना जर सांगितलं की तुम्ही एक आहात तर ते दोन मिनिटंसुद्धा टिकणार नाही. त्याची जाण यायला पाहिजे आणि तीच आपल्या (अस्पष्ट) कारण जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडतो, त्यावेळेला तुमच्या हातामधून, तुमच्या बोटामधून तुम्हाला ह्या चैतन्याच्या लहरी जाणवतात. ज्याच्याबद्दल आदि शंकराचार्यांनी कितीतरी लिहिलेलं आहे. ‘सलिलं, सलिलं,’ थंड थंड अशा लहरी येतात. हिंदू धर्माचं तुम्ही जेव्हा पुनरूत्थान केलं, तेव्हा त्यांनी ह्या सर्व गोष्टी लिहून ठेवलेल्या आहेत. शेवटी त्यांनी आईचेच वर्णन लिहिले. ज्याला सौंदर्य लहरी म्हणून आपण ओळखतो. पण आता जे ‘अती शहाणे त्यांचे बैल रिकामे आहेत’ , ते लोक असं म्हणतात की आदि शंकराचार्यांनी लिहिलं नाही, कारण त्यांनी ‘विवेक चुडामणि’ वरगैरे फार असे मोठाले तत्त्वज्ञान, तत्त्ववेत्त्यांनी वाचावा असा ग्रंथ लिहिल्यानंतर सौंदर्य लहरी सारखं, विशेषतः आईचं वर्णनच लिहिलं आहे, असं कसं! तर स्वत: ते असं म्हणाले, ह्याच्याशिवाय मार्ग नाही. विचार विचार करून तरी आम्ही कुठवर करणार! कारण ही बुद्धी सीमित आहे. जर असीमला उतरायचं आहे. तर काहीतरी घटित झालं पाहिजे आणि ती घटना म्हणजे कुंडलिनीचं जागरण. ह्याला पैसे काय देणार तुम्ही? मेहनत काय करणार तुम्ही? ते तुमच्यामध्ये स्थित आहे, एका क्षणात.
एका गावाला गेले होते जवळपासच्या, गणोरी. तेव्हा मला आश्चर्य वाटलं, दोन मिनिटात सगळ्यांच्या कुंडलिनी जागृत झाल्या. त्या लंडन शहरात चार वर्षे लागली मला सात माणसांच्यासाठी. माझे हात तोडून टाकले त्या लोकांनी! काय लोक आहेत ? गणोरीचा एक एक माणूस लंडनच्या हजारो लोकांच्या बरोबरीचा होता. नेऊन त्यांच्या पायावर घालावे. ही ह्यांची परिस्थिती आहे. काय तुम्ही बघता ? सायन्स मिळालंय का काय मिळालंय? काय कामाचे लोक आहात तुम्ही? तुमच्या पायाच्या धुळीच्या बरोबर नाही हे लक्षात ठेवा. आज सगळ्यांनी काय, ‘माताजी, तुम्ही खेडेगावात काय फिरता ! तुम्ही रंजले-गांजले त्यांना बघता !’ मग काय ह्या काळा बाजाराच्या लोकांना जाऊन बोलू मी! अहो, तिथेच आहे सगळं माझं. त्याच ठिकाणी हे घडतंय आणि आश्चर्याची गोष्ट की ते स्वत: चकित झाले की माताजी, इतक्या लोकांना तुम्ही दोन मिनिटात कसं पार केलंत? तिथे अंबादेवीचं देऊळ आहे. मग काय होणार नाही का ? आपण देवीला नमस्कार करतो. देवी स्थानं आहेत आपल्याकडे माहिती आहे आपल्याला. साडेतीन शक्तीची स्थानं ह्या महाराष्ट्रात आहेत. त्या महाराष्ट्रात, त्या पठारात, त्या त्रिकोणाकार अस्थी विश्वात जी आहेत, त्याच्यात बसलेल्या आहेत ह्या महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती. आणि आदिशक्ती जी आहे ती इथेच तुमच्याजवळ नासिकला आहे. आपल्याला माहीत असेल. तिला सप्तश्रृंगी म्हणतात. जिथे सातही चक्र आहेत. तर हे खरं की खोटं? हे जे शास्त्र लिहिले आहे त्याबद्दल कोणाला माहिती का नसावी? कारण ती माहिती दाबूनच ठेवलेली आहे. ज्या विश्वाच्या कुंडलिनीवर तुम्ही (अस्पष्ट) असता, आम्हाला काय सोपेच जाणार आहे ते काम! आणि हे विशेष सुरू होतं. म्हणूनच ह्या भारतात, विशेषत: ह्या योगभूमीत आणि ह्या महाराष्ट्रात तुमच्याजवळ. ह्या महाराष्ट्रातच परमेश्वराचं सामर्थ्य प्रगट होणार आहे. आणि म्हणून ह्याला महाराष्ट्र म्हणतात. सबंध विश्वामध्ये सुद्धा असं राष्ट्र नाहीये. असे लोक आहेत. ते घ्यायला हवे. फक्त ह्या लोकांच्या बरोबर जाऊ नका. ह्याचा अर्थ असा नाही की ह्या वाहून मानून लोकांना वाचवायचं नाही. वाचवायचं, पण फार कठीण काम आहे ! अगदी कंटाळा आला आहे. बारा वर्षे साहेबांची नोकरी झाली. परत त्यांना चार वर्षे दिली. म्हणजे सोळा वर्षे झाली. म्हटलं, हे कसलं काय? चौदा वर्षाचा वनवास रामाने घेतला तर आम्हाला सोळा वर्षाचा आहे. आणि तुम्ही इतके धार्मिक आणि इतके उच्च स्थितीचे लोक आहात. हे सगळं विसरून ह्या लोकांच्या मागे लागला. त्याला कारण असं, आपल्याकडे दोन तऱ्हेचे लोक धर्मउपदेषी. एक तर लोक असे, टाळ कुटत बसा. सकाळपासून संध्याकाळपर्यंत. भक्तीमार्ग आहे. कृष्णाने सांगितलं की, ‘पत्रं, पुष्पं, फलं, तोयं, काही पण कृष्ण म्हणजे मुत्सद्दी मनुष्य. त्यांनी सांगितलं , ‘ते घ्यायच्या वेळी घेतो, पण तुम्ही काय करायचं, तुम्ही काय (अस्पष्ट) असेल तर घेतो मी.’ द्यायचं? अनन्य भक्ती !’ आता या अनन्य शब्दावर खोळंबून ठेवलंय तुम्हाला. अनन्य म्हणजे ज्याला दूसरा कोणी नाही. तेव्हा नसतं दुसरं कोणी, जेव्हा तुमचा परमेश्वराशी योग घडतो. ह्या अनन्य शब्दावर सगळ्यांना खिळवून ठेवलेलं आहे. आणि आपण म्हणतो वा! मी तर परमेश्वरामध्ये सतत तल्लीन होऊन त्याचेच नाव घेतो. अहो, पण एक साधी गोष्ट आहे, जेव्हा तुमचं टेलिफोनशी कनेक्शनच नाही लागलेलं तर तुम्ही टेलिफोन कोणाला करता ? एक साधी गोष्ट आहे. योगाशिवाय भक्तीला काहीच अर्थ नाही. त्याच्यानंतर खरी म्हटलेली आहे. अनन्य भक्तीमध्ये अर्थ साधा असा आहे, की त्या परमेश्वराशी योग साधा. अनन्य भक्ती जी .....
ज्या मोठमोठ्या साधु-संतांनी आपल्याला सांगितलं की तुम्ही भक्ती मार्ग करा, पण ते स्वत: एक आत्मसाक्षात्कारी होते. त्यांच्या भाषा बघा कशा ! गोरा कुंभाराला भेटायला नामदेव गेले. आपण नामदेवांना ओळखलं नाही. आपल्यासाठी ते एक शिंपी. गोरा कुंभार, तो कुंभार. त्याला भेटायला गेले. त्यांनी काय लिहिलं, ‘निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी,’ आता ही भाषा कोणाला समजणार आहे ? संतांच्या शिवाय कोणाला समजणार आहे का ! निर्गुण काय आणि सगुण काय? निर्गुण म्हणजे चैतन्य! त्याला भेटायला म्हणून आलो, तुझ्या चैतन्याला, पण तू सगळ्यात बसलेला आहेस. सगुणच होऊन बसलेला आहेस. हे नामदेवांनी म्हणायचं, जो एक शिंपी आणि तो गोरा कुंभार, जो कि मातीशी खेळतो नुसता, त्याने ते समजायचं. त्यांनीच बोलायचं आणि त्यांनीच समजायचं. अशी ती भाषा होती, पण आज ही वेळ आलेली आहे ! आपण सगळेच संत होऊ शकतो. सगळेच होऊ शकतो. सगळ्यांनी संत झालं पाहिजे. त्यासाठी काही सोडायचं, वगैरे हा मूर्खपणा करण्याची काहीही गरज नाही. काहीही सोडायला नको. सोडायचं काय? जे धरलेच नाही ते सोडणार काय तुम्ही? काहीही सोडायचं नाही. जिथे आहे तिथे रमलं पाहिजे. ते मिळाल्यानंतर अनेक लाभ होतात. साधं दर्शन का असेना! आता आईचं असं आहे, कोणत्याही घरी जायचं असलं तरी ती चॉकलेट घालून देते. तेव्हा लाभ सांगावे लागतात. ‘माताजी, तुम्ही लाभ सांगा मग लोक जागृती होईल.’ हिंदुस्थानात तसं नाही. परदेशात मात्र ह्यांना सांगावं लागतं, उलटीकडून घास द्यावा लागतो. सरळ नाही घेणार. म्हणून सायन्समध्ये पॅरासिंपरथॅटिक (अस्पष्ट) म्हणून ह्यांच्याशी बोलायला सगळं, सायन्स शिकले, त्यांना शिकवण्यासाठी आणि मग हे सांगितल्यानंतर त्यांच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला. पण बुद्धीने परमेश्वराला जाणता येत नाही. सिस्टीम आणि ... कुंडलिनी जागरणानेच परमेश्वराला जाणा. दूसरा कोणताच त्याला अन्य मार्ग नाही. तर प्रत्येक माणसाने (अस्पष्ट) लिहन ठेवलेलं आहे. तर हे ह्या शंभर वर्षातच हा प्रकार झालेला आहे. त्याच्या आधी कोणी असं लिहिलं नाही. कधी तुम्ही ज्ञानेश्वरांच वाचून बघा. त्यांनी असं काही लिहिलं नाही. त्यांनीही कुंडलिनीच्या विरूद्ध लिहिलं नाही. पण ह्या शंभर वर्षामध्ये हे दीड शहाणे कोण जन्माला आले ! समजत नाही. तेव्हा ही कुंडलिनी शक्ती तुमच्यामध्ये आहे, ती जागृत होते, त्याने तुम्हाला आत्मसाक्षात्कार होतो. ही गोष्ट अगदी निर्विवाद आहे आणि ती आपण सिद्ध करून दाखवू. आपण जर एखाद्या कॉलेजला गेलो, स्कूलला गेलो, तर आपण बघतो काय होतं ते! आधीच जर आपण गेलो तर काही डोक्यात जाणार आहे ? तेव्हा नम्रतेने (अस्पष्ट) अस म्हणून आपल्या डोक्याने ... सहजयोग लाभेल. लोकांना फार आश्चर्य वाटतं, की आम्ही एवढे शिकलेले. आम्ही एवढे विद्वान. आम्ही सगळी गाथा वाचली. आम्हाला सगळे पाठ आहे. आणि हे सगळं सांगणारे लोक म्हणतात, की माताजी आम्ही तुमचे पाय धरलेत. आम्ही काहीच नाही. आम्ही कुचकामाचे? अहो, असं कसं होऊ शकतं ? त्यांनी कोणतीच दिशा नाही घेतलेली. मधोमध आहे. तिशयचे जो मनुष्य असतो तो कोणत्याही अतिशयतेला जातो, त्यात संतुलन जातं आणि ते एकदा संतुलन गेलं म्हणजे फार कठीण काम आहे आणि त्याला मग जागृती देणं त्याहूनही कठीण. तर ते संतुलन पहिल्यांदा असावं लागतं. मग जागृती द्यावी लागते. जागृती झाल्यावर आत्मसाक्षात्काराचा अनुभव येतो. पण ही पहिली गोष्ट म्हणजे आपल्या तब्येती सुधारतात. डॉक्टरांची बिलं
वाचतात. भृगु मुनींनी, जे इथेच तुमच्या जवळपासच राहिलेले आहेत, त्यांनी दोन पुस्तकं लिहिली, एक तर भृगु संहिता आणि दूसरं म्हणजे नाडी ग्रंथ. नाडी ग्रंथ फार कमी लोकात आहे आणि वाचतात. त्या नाडी ग्रंथात त्यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे, की अशी वेळ येणार आहे, की ज्यावेळेला सहजच अशी कुंडलिनी जागृत करणारे असे कोणी येणार आहेत आणि ते झाल्यानंतर मग जगातले हॉस्पिटल्स वगैरे पुष्कळच कमी होतील, असं लिहिलेलं आहे. आधीच लिहन ठेवलं होतं. तेवढेच होणार आहे, ह्या जगाला सबंध दुसरेच रूप येणार आहे. एक प्रेमाचं, आनंदाचं, सौख्याचं! आता गणपतीपुळ्याला आमचा फार मोठा कार्यक्रम झाला. त्याच्यात ४८ लग्नं झाली. अहो, एक लग्न म्हणजे किती त्रेधा असते. पण ४८ लग्न, इतकी व्यवस्थित, इतक्या आनंदाने, इतक्या आरामात, इतक्या शिस्तीत झाली, की स्वर्गच खाली उतरला असं वाटायला लागलं. हा स्वर्ग हा संसारात आणायचा आहे. ‘अवघाची संसार सुखाचा करीन,’ असं जे त्यांनी (संत तुकाराम) म्हटलं होतं, ते कसं करणार ? त्यावेळी ते बोलले नाही. जे बोलले त्यातच काही लोकांनी अर्थाचा अनर्थ केला. अजूनही पुष्कळसे लोक श्री संत तुकारामांना तुक्या म्हणतात. ह्या अशा परिस्थितीत जेव्हा की आम्हाला त्या नवीन प्रगती मार्गावर सहजच स्वातंत्र्यामुळे जावे लागत आहे, तेव्हा आपण एकदा वळून पाहिलं पाहिजे, की जे लोक ह्या मार्गावर गेले, ज्यांनी आपली प्रगती केली, त्यांनी आपली काय स्थिती करून घेतली आहे ? हे असं कसं झालं? ते जर खड्ड्यात गेले तर आम्ही त्यांच्याबरोबर खड्ड्यात जाणार आहोत का? त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि जे त्यांचं असं काहीतरी झालेलं आहे, त्याला कारण काय आहे ? हे आपण शोधून काढलं पाहिजे. एकच कारण आहे, की हातातली पतंगाची दोर तुटलेली आहे. आणि ती दोर ज्या हातात आहे, ती म्हणजे ती जागा, ते स्थान आत्म्याचं आहे. आत्म्याला मिळवल्यानंतरच तुम्हाला आनंद मिळेल. तुम्हाला कळेल आनंद काय आहे. तुम्हाला कळेल समाधान काय आहे. तुम्हाला बोटांच्या अग्रावर कळेल लोकांमध्ये काय दोष आहेत ? तुमच्यामध्ये काय दोष आहेत ? आणि ह्यांना ठीक करण्याची जराशी कला हस्तगत झाली , म्हणजे तुम्ही कुठल्याकुठे पोहचून जाणार. ही कुंडलिनीची कला, (अस्पष्ट) गोष्ट आहे, ती आज आधुनिक काळामध्ये व्हावी, ह्याचं लोकांना आश्चर्य वाटतं. तर हे सगळं भाकित आधीच करून ठेवलेलं आहे. इतकेच नव्हे तर शंभर वर्षापूर्वी विलियम ब्लेक म्हणून, मी तर त्याला भैरवनाथाचाच अवतार म्हणते, इंग्लंडमध्ये जन्माला आला होता, आणि त्याने सबंध भाकीत करून ठेवलं अहे, सहजयोग कसा असणार ? ह्याच्यात काय काय होणार आहे? अगदी बारीकसारीक त्यांनी वर्णन करून ठेवलेलं आहे. त्याचं भाकीत अनेक लोकांनी केलेलं आहे. हे भाकीत काही खोटं नाही. साधुसंतांनी सांगितलं ते खोटं नाही. ज्ञानेश्वरांनी जे पसायदानाचं वर्णन केलं आहे, ‘जो जे वांछील, तो ते लाहो,’ ते करण्याची वेळ आलेली आहे. तेव्हा सर्वांनी ह्याला सज्ज असावे आणि स्वीकारावे. अशी मी नम्र विनंती करते. आता आपल्याला काही प्रश्न असतील तर अवश्य विचारा, नंतर मग वेळेवर सांगण्यात काही अर्थ नाही. बेकारचे प्रश्न विचारू नका. कारण आम्ही काही इलेक्शन लढवत नाही किंवा आम्हाला दसरं काही नको. जे तुज आहे तुजपाशी, ते आम्ही द्यायला आलो आहे. तेव्हा तुम्हाला काही व्यवस्थित प्रश्न असतील तर विचारा. ০
प्रश्न – (अस्पष्ट) उत्तर – ती नागिणीसारखी धावत नाही. असं आहे, ती एक शक्ती आहे, ऊर्जा आहे. नागिणीसारखं तिचं असा असा वेग असतो. म्हणून तिला नागीण म्हटलं आहे. आता जर काव्यामध्ये वर्णन करायचं असलं तर आपल्याला माहिती आहे, की तुलनात्मक असतं. त्यात जर त्यांनी असं लिहिलं तर एवढं घाबरायला काय झालं? प्रश्न – (अस्पष्ट) उत्तर – ( प्रश्नकत्त्याला ) तुम्ही पार झालेले आहात, तुम्ही सहजयोगी आहात ? तुम्ही आमचा केलेला आहे सहजयोग? मग ते होणारच. बसा. अनाधिकार चेष्टा आहे. अनाधिकार चेष्टा केल्यामुळे होतं असं. ध्यानाला बसायचं म्हणजे सद्गुरूच्या आसनाखाली बसलं पाहिजे. सद्गुरू कोण? नानक साहेबांनी सांगितलं, ‘वही जो.... ‘, जो परमेश्वराशी एकाकार करतो तोच सद्गुरू आहे. समजा अनाधिकार चेष्टा आहे, कोणी सांगितलं, बरं तुम्ही असं करत बसा. आपण करत बसलो. तर त्रास होणारच. त्याला हशार माणसं पाहिजे. कारण ज्यांना हे अधिकार आहेत तेच हे कार्य करू शकतात. हे कोणाचेही, ‘येऱ्यागबाळ्याचे काम नोहे, त्याला पाहिजे जातीचे.’ म्हणून शक्य नाही. आता एखादा जर हुशार इंजिनियर असला तर त्याला सगळे समजतं आणि तो बरोबर करून घेतो. पण ज्याला इंजिनिअरिंग येत नाही तो सगळ उलटं करून जाईल. तर आपण म्हणू की हे तर काय बुवा, म्हणजे तो इंजिनियर .(अस्पष्ट) कोणीतरी भामटा होता. आपल्याकडे पायलीचे पन्नास गुरू निघालेत. खरे गुरू म्हणजे चार-पाचच आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. तेव्हा प्रत्येक दारोदारी गुरू बसलेले आहेत. तुम्ही अमुक करा, तुम्ही तमुक करा. असं सांगतात तुम्हाला. मी तुला मंत्र देतो. मंत्रून घ्यायला कशाला गुरू पाहिजे ! स्वत: होईल, कुंडलिनीचं जागरण करा म्हणावं. जर कुंडलिनीचं जागरण झालं तर मग करू. कोणत्या गोष्टी अडकल्यावर कोणता मंत्र म्हणायचा, हे शास्त्र आहे. कोणीही सांगितलं, की आपण एकून घेतो त्याला. काही हरकत नाही, नवीन माणसं आहेत ती. काळजी करू नका. सगळ्यांचं ठीक होणार आहे. सगळ्यांची कुंडलिनी जागृत होणार आहे. सगळ्यांचं भलं होणार आहे. पण एकच गोष्ट आहे, हे झाल्यानंतर त्याची कदर केली पाहिजे. तुम्ही स्वत:ची कदर केली पाहिजे. स्वत:ची इज्जत केली पाहिजे. त्या आत्मसाक्षात्काराला पुढे वाढवलं पाहिजे. नाहीतर एखादं बी रूजवावं आणि ते वाया जावं, असं झालं म्हणजे मला फार दुःख होईल. आई आमच्या दारापर्यंत आली. तिने आम्हाला हे फार मोठं धन दिलं. आम्ही ते मिळवलं आणि पुढे फेकून दिलं, असं झालं नाही पाहिजे. तसं नाही झालं म्हणजे आमची कामगिरी साधली. फक्त एवढच मला म्हणायचंय की त्याचा आदर करा. स्वत:चा आदर करा. तुम्ही परमेश्वराचे (अस्पष्ट) आहात आणि त्याच्यामध्ये हा दिवा लावा. आणखीन काही प्रश्न आहेत ? प्रश्न – (अस्पष्ट, उत्तर – सहजयोगामध्ये आल्यानंतर आपल्या लक्षात येतं की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत! त्यापैकी
काही लोकांच्या असं लक्षात येतं, की आमच्यामध्ये व्हायब्रेशन्स कमी येतात. जसं हे गृहस्थ म्हणतात, की आमचे व्हायब्रेशन्स कमी येतात, त्याला कारण काहीही असू शकतं. ते चक्रांवर बघावं लागतं. तेव्हा जे (अस्पष्ट) बहुतेक व्हायब्रेशन्स कमी होण्याचं कारण म्हणजे शुद्ध इच्छा, जी आपण जागृत केलेली नाही. शुद्ध इच्छा म्हणजे मला दुसरं काही नकोय. फक्त मला परमेश्वर पाहिजे. त्या परमेश्वराला (अस्पष्ट) सगळे मिळणार आहे. परमेश्वरच पाहिजे, दुसरे कोणीही नको, अशी शुद्ध इच्छा. कारण ही केलं, तर कुंडलिनी शक्ती, ही शुद्ध इच्छा! आलं कां ? आलं नां! शुद्ध इच्छा, त्या शुद्ध इच्छेला तुम्ही जागृत एकदम व्हायब्रेशन्स येणार. आता आम्ही इथेच बसलो आहे बघा. इकडे तिकडे बघू नका. तुम्ही सगळे माझ्याकडे बघा! सगळे भाषणपटू आहेत. त्यांनी खरोखर राजकारण जॉइन केलं असतं तर बरं झालं असतं. धरम्माच्या बाबतीत आहेत. सांगितलं, की ह्या देशातला, ह्या भागातला प्रत्येक माणूस हा परमेश्वराचा भाग आहे. प्रश्न – उत्तर – त्यावर असं उत्तर दिलं, हे बघा, तुम्ही समजून नाही घेतलं. दोन्ही बाजू फार स्पष्ट आहेत. जरा लक्षात घ्या. त्यांनी सांगितलं , ‘येऱ्यागबाळ्याचं काम नोहे’ म्हणजे कुंडलिनीचं जागरण करणं हे येऱ्यागबाळ्याचं काम नव्हे. कारण कुंडलिनीचं तुमच्यामध्ये जागरण करणं, हे आम्हाला जमतं. म्हणून आम्ही ‘येरेगबाळे’ नाही. हा प्रश्न आहे. आणि तुम्ही खरोखर तसे आाहात. तुम्हाला मिळणारच आहे. आणि मिळवाल ह्याची आम्ही हमी देतो. पण नाही मिळालं तर आमचा दोष नाही त्याच्यात. तो तुमचा दोष आहे. हे आधी सांगितलं मी. ‘येऱ्यागबाळ्याचं काम नोहे’ ते म्हणजे कुंडलिनीची जागरण. कळलं कां? प्रत्येक मनुष्य नाही करू शकत . ज्याची ...... (अस्पष्ट) खराब असते त्याला भक्तीमार्ग आहे. तर याप्रमाणे दोन तऱ्हेचे आपल्या शरीरामध्ये व्यापार होतात. एक तर प्राणशक्ती आणि मन:शक्ती. मन:शक्ती आणि प्राणशक्ती ह्यांचं जेव्हा संतुलन घटित होतं, तेव्हाच कुंडलिनी जागृत होऊ शकते असं लोक म्हणतात. पण आपण ते संतुलन घडवू शकतो. काही कठीण काम नाही. ते झालं म्हणजेच कुंडलिनी मधुर होते. म्हणजे प्राणशक्तीमुळे, कधी कधी प्राणशक्ती जास्त वापरल्यामुळे आपल्यात अहंकाराची बाधा जास्त होते आणि मन:शक्ती जास्त असल्यामुळे इंग्लिशमध्ये त्याला सुपर इंगो म्हणतात, पण आपण म्हणू की मन. त्याची बाधा जास्त असते. कोणतीही जास्त झाली म्हणजे संतुलन नसल्यामुळे मधली जागा अशी एकावर एक येऊन जाते. त्यामुळे कुंडलिनी वर जाऊ शकत नाही. ती इकडच्या बाजूला सरकून जाते. दोन्ही शक्ती ज्या आहेत, प्राणशक्ती जी आहे आणि मनः शक्ती आहे त्यांची सांगड घालून कुंडलिनीला उचलता आलं पाहिजे. (अस्पष्ट) योगामुळे ही कुंडलिनी जागृत होईल! पण ती तशीच जागृत राहील का प्रश्न आता ह्या ..... पुन्हा सुप्त होईल ? .(अस्पष्ट) तुम्ही दुसऱ्यांची जागृत करा. ही शक्ती देण्यासाठी आहे. तुम्हाला गुरू करणार उत्तर – आहे. तुम्ही दुसर्यांना जागृत करणार आहात?
आता इतकं सांगितल्यावर तुम्ही काय विचारता? तुमच्यामध्ये सुप्तावस्थेमध्ये एक शक्ती आहे. तिला आपण असं म्हणू शुद्ध इच्छा आहे ती. शुद्ध इच्छा म्हणजे परमेश्वराशी एकाकार. ही शुद्ध इच्छा जेव्हा जागृत होते, तेव्हा ती आपल्या ह्या सहा चक्रातून उठून ब्रह्मरंध्र छेदन करते . हे केल्यानंतर सर्वप्रथम आपल्याला असं ज्ञात होतं की आपल्या डोक्यातून असं गार गार वाटत होतं आणि चोहीकडे गार गार अशा चैतन्याच्या लहरी जाणवतात. ही जी नवीन शक्ती मिळाली, ती सूक्ष्म शक्ती आहे. ती सगळीकडे आहे. पण आपल्याला, आतून आपण सूक्ष्म झालो (अस्पष्ट) आहे, म्हणून आपल्याला ती जाणीव झालेली नाही. त्याची एकदा जाण झाल्यावर ती कशी ...... करते.