Public Program

Public Program 1985-12-20

Location
Talk duration
70'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

20 डिसेंबर 1985

Public Program

Sangamner (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

परमेश्वराला शोधणाऱ्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात असो . ह्या भारत भूमीत ह्या योगभूमीत महाराष्ट हे एक विशेष प्रकारचं राष्ट्र आहे . आणि अनादी काळापासून याला महाराष्ट्र असं म्हंटल आहे . महाराष्ट्र का म्हंटल असं कुणाला विचारलं तर लोकांना ते सांगता येत नाही . आणि केव्हा पासून म्हंटल ते सुध्दा त्यांना सांगता येत नाही . असे अनादी नाव कोणत्याही देशाला आजपर्यंत महाराष्ट्र असं दिलेलं नाही . तेव्हा ह्या महाराष्ट्रात आपला जन्म झाला तेव्हा काहीतरी विशेष असलं पाहिजे असं आपण आधी लक्षात घेतलं पाहिजे . म्हणजे एव्हड्या मोठ्या राष्ट्रात जर जन्म झालेला आहे ,हे राष्ट्र संबंध पृथ्वी तलावावर महान मानलं जात तेव्हा याच जे आपण मोठं नाव ठेवलेलं आहे किंवा नाव आहे त्याला साजेस काहीतरी आपल्यामध्ये असलं पाहजे . राजवाड्यात जे राहतात त्याना रजवाडे म्हणतात . तसच ह्या महाराष्ट्रात जे राहतात त्यांना महाराष्ट्रीयन म्हणतात . किंवा महाराष्ट्र वासी म्हणतात . पण त्यातलं ब्रीद काय आहे ते ओळखून घेतलं पाहिजे . त्याच्या शिवाय स्वतःला महाराष्ट्रीयन म्हणवून घ्यायचं नाही . कारण सत्य हे आहे कि हा देश अत्यंत महान आहे . आणि आधी मी आपल्याला सांगितलं आहे कि सर्व विश्वाची कुंडलिनी ह्या महाराष्ट्रा च्या पठारामध्ये जशी त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपल्यात ती बसलेली आहे तशीच हि कुंडलिनी आपल्या ह्या महाराष्ट्रात बसलेली आहे . हि महान आदी कुंडलिनी ह्या महाराष्ट्रात आहे . तिची तीन पीठ आपल्याला माहीतच आहे .

महाकालीच ,महासरस्वतीच आणखीन महालक्ष्मीचं . पण जे मुख्य आहे ते सप्तशृंगीचं अर्धमात्रा , ती आदिशक्ती आहे . ती नाशकाच्या जवळ आपल्याला माहित आहे . अशी साडेतीन पीठ ह्या भूमातेच्या पाठीच्या कणावर महाराष्ट्रात आहेत . म्हणजे इथे चैतन्याच्या नुसत्या लहरी वहात आहेत . चैतन्य नुसतं उफाळून आलेलं आहे . पण अजून जसा समुद्रा मध्ये पक्षी एखादा तहानलेला रहावा तशी आपली स्तिती झालेली आहे . आपल्यात जे मुख्य तत्व आहे जे ब्रीद आहे ते न ओळखल्या मुळे हि स्तिती झालेली आहे . आणि मुख्य तत्व हे आहे कि आपल्या मध्ये आदी कुंडलिनीच विशेष रूपाने प्रतिबिंब आहे . म्हणजे काय तर हि जी कुंडलिनी आपल्या मध्ये आहे ती कोणती शक्ती आहे ते जाणलं पाहिजे . ती शक्ती म्हणजे शुध्द इच्छा . हि शक्ती हि कुंडलिनीची शक्ती आहे . आता आपली कोणती शक्ती असायला पाहिजे शुध्द इच्छा म्हणजे हे जाणलं पाहिजे . शुध्द इच्छा म्हणून आपली जी इच्छा आहे तिची ओळख अशी कि जर आमची शुध्द इच्छा असेल तर ती पूर्ण झाल्यावर आम्हाला कोणतीही इच्छा राहिली नाही पाहिजे . पण तस काही दिसत नाही . आज आपण इच्छा केली समजा कि जर आमच्या जवळ काही जमीन असली पाहिजे तर उद्या दुसरी इच्छा होती कि त्यावर घर बांधलं पाहिजे . घर बांधल्यावर तिसरी इच्छा अशी होते कि या घरात सगळं व्यवस्थित झालं पाहिजे . ते झाल्यावर मग अशी इच्छा होते कि आता एक मोटार घेतली पाहिजे . अशा नंतर एका नंतर एक अनेक इच्छा येऊन सुध्दा समाधान काही रहात नाही . काही लोकांना इच्छा होते कि आम्ही राजे व्हावं ,कुणाला असं वाटत कि आम्ही मिनिस्टर व्हावं ,कुणाला वाटत कि आम्ही पार्लमेंट चे मेम्बर व्हावं . ते हि झालं तरी प तोंडावर समाधानाचं स्मित काही दिसत नाही . सगळे असमाधानी इथून तिथपर्यंत . कोणालाही कशाचं समाधान झालेलं नाही म्हणजे तुमच्या ज्या इच्छा होत्या त्या शुध्द नव्हत्या त्या अशुध्द होत्या . जर शुध्द असत्या त्या तर तुमचं समाधान झालं असत . विचार करून बघितला पाहिजे . काय आपल्या सर्व इच्छा पूर्ण झाल्या आहेत का ?ज्यांनी सर्व इच्छा पूर्ण होतील अशी ती शुध्द इच्छा हि शक्ती आपल्यामध्ये असताना सुध्दा आपण अजून त्याला प्राप्त का झालो नाही . त्याला कारण असं कि आपल्यामध्ये हि शक्ती आहे हे सुध्दा आपण विसरून गेलो जरी सगळ्यांनी सांगितलं तरी सुध्दा .

मार्कंडेय स्वामी म्हणजे चौदा हजार वर्षा पूर्वी त्यांनी इथे तपश्चर्या केली तुमच्या नाशकाच्या जवळ . इथे एव्हडे ऋषीमुनी होऊन गेले तिथे जाऊन आता अशे लोक बसले आहेत जे देवाच्या नावावर पैसे एकत्र करत आहेत . भलत्या मार्गावर लोकांना घालतात . भुरळ घालतात . काहीतरी खोटंनाटं सांगतात . प्रत्येक ठिकाणी दोन पैसे मिळवण्यासाठी बाबाजी तयार आहेत . प्रत्येक गावात एक बाबाजी बसलेला . कुठेही गेलं कि कसलातरी एक अगुरु बसलेला आहे तिथे . तो दारू पिऊंदे ,नाहीतर काहीही करुदे पण तो गुरु आहे ना ,अहो पण कशावरून ?गुरुची लक्षण सांगितलेली आहेत ना . रामदास स्वामींनी एव्हडं लिहून ठेवलं आहे ते सगळं बेकार गेलं . तर त्यांना म्हणायच कि ते ब्राम्हण होते . तर त्यांचं कशाला ऐकायचं . अहो पण गोरा कुंभार ,तुकाराम यांनी तेच सांगितलं आहे आणि नामदेवांनी पण तेच सांगितलं आहे . पण अहो ते झालं ते गेलं पुराणातील वांगी पुराणात . पण तुम्हाला समाधान आहे का हा प्रश्न एक सांगा मला . नाही मग का नाही . कारण तुम्ही जातीचे महाराष्ट्रीयन आहात काही म्हंटल तरी . ते काही सुटायचं नाही ते तुमच्या कच्छपी लागलेलं आहे . ते सुटण्यासारख नाही . तेव्हा तसही तुम्हाला समाधान वाटणारच नाही कोणत्याही गोष्टीत . मग परमेश्वराच्या नावावर तुम्ही वाट्टेल ते केलत तरी तुम्हाला समाधान वाटणार नाही . कारण तुमचा अजून परमेश्वराशी अजून संबंधच झालेला नाही . जो पर्यंत परमेश्वराशी संबंध नाही झाला तो पर्यंत उगीचच त्याच्या नावाचं जप करून देव मिळणार आहे का . ?तेव्हा आपलं चुकलं असं आहे कि आपल्या मध्ये शुध्द इच्छा कोणती आहे ते आधी जाणून घेतलं पाहिजे . आणि ती म्हणजे तुमच्यामध्ये सतत वास करणारी अशी तुमची आई अंबा हि कुंडलिनी आहे . आपण महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणतो उदे ग अंबे उदे .

आता इकडे नेहमी ऐकते मी आईचा जोगवा ,आई मला तू योग दे . आम्हाला योग पाहिजे मग बोधाची मी परडी भरीन असं एकनाथांनी सांगितलेलं आहे . तर बोध म्हणजे काय ?आपलं गाण म्हणायचं रात्री बसून थोडी तंबाकू तोंडात भरायची आणि गाण सुरु . पण त्याला अर्थ काय तो विचारच आपण करत नाही हि काय आहे बोधाची परडी सांगितलेली आहे एकनाथांनी . किंवा गोरा कुंभार सांगून गेले निर्गुणा बद्दल ते काय आहे . काहीही विचार करायचा नाही ,नुसता मनोरंजना साठी त्याचा वापर करायचा . अशा उथळ पणाने सगळं केल्यामुळे आज आपली महाराष्ट्रात हि दशा झाली आहे . जरी आपण महाराष्ट्रीयन असलो तरी जगासमोर काही आपलं महान तत्व दिसत नाही . जग त्याला मानायला तयार नाही . भांडणात नंबर एक . भिकारीपणा करण्यात नंबर एक . अशा अशा आपल्याला पदव्या सुध्दा मिळाल्या आहेत . आश्चर्याची गोष्ट आहे महाराष्ट्रात बसलेले लोक त्यांच्या बद्दल असं बोलतात म्हणजे मला आश्चर्य वाटत . पण ह्या तुमच्या कुंडलिनीला आतून जागृत करायला तुम्हाला काहीही करायचं नाही हे दुसरं मी तुम्हाला सांगते . फक्त ती शुध्द इच्छा काय आहे ते तुम्ही जाणून घ्या . शुध्द इच्छा अशी कि परमेश्वराशी माझं एकत्रीकरण झालं पाहिजे . मला परमात्मा भेटला पाहिजे . त्याच्या सानिध्यात मी आलं पाहिजे . जीवाशी आणि शिवाची गाठ पडली पाहिजे हि शुध्द इच्छा ती मिळाल्या शिवाय तुम्हाला कोणत्याही गोष्टींनी समाधान वाटणार नाही . हि गोष्ट मान्य केली पाहिजे . पण आता ते मिळवण्या साठी सुध्दा लोक अनेक साधन करतात . जस मी तुम्हाला सांगोतलं .

उपोषण करायची . उपास करून परमेश्वर मिळाला असता तर आपल्याकडे उपासमार तशीही चाललेलीच आहे . त्याला उपास कशाला करायला पाहिजे . आणि तोही नेमका प्रत्येकाच्या च्या जन्माच्या दिवशीच करायचा .हे पण एखाद्या भटजींनी सांगितलेलं दिसतंय . गणपतीचा जन्म झाला त्यादिवशी सुतक पाळायचं म्हणजे गणपती च रागवायचा . विचार करून बघितला पाहिजे ,देवाने डोकं आपल्याला दिल आहे . त्यांनी विचार करून बघायचा कि हे उपासाचं सोंग काढलेलं आहे त्याची काही गरज नाही आहे . परमेश्वराला कशाला साकडं घालायचं . हि कुंडलिनी तुमच्या मध्ये व्यवस्थित रूपाने त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे . आणि तीच उत्थापन अगदी सहज घडत . जस एखाद्या बी ला तुम्ही पेरायच म्हंटल कि ह्या नुसत्या मातेच्या उदरी घातल कि ते आपोआपच अंकुरते त्या प्रमाणे हे घडत . पण जर ती व्यवस्था तुम्ही केली नाही तर उद्याचा दिवस तुम्ही बघावा आणि त्यात तुमची मुल तुमची वाट लावतील . तुमच्या मुली तुमची वाट लावतील . कारण तुम्ही वेड्या सारखे काहीतरी धर्मवेडेपणा करता आणि देव नाहीच आहे असं सिध्द करून दुसऱ्या रस्त्याला लागायचं . परमेश्वर हा आहे ,त्याच चैतन्य स्वरूप कार्य सगळीकडे सुरु आहे . अर्थात हि फुल कुठून येतात . काय आम्ही एक तरी फुल तयार करू शकतो का . हि फळ कुठून लागतात ?तुम्ही शेतकरी वर्ग आहात . हे सगळं जिवंत कार्य कोण करत ?आमच्या हृदया मध्ये स्पंदन कुठून होतंय ?हे करणारा कोण ?त्याची शक्ती हि आहेच . सर्व विश्वात पसरलेली त्याची हि चैतन्यमय शक्ती आहे तिला आपण जाणलेल नाही . आणि नुसता धर्मवेडेपणा घेऊन बसलो तर उद्या आपली मुल म्हणतील कि हे काहीतरी वेडेपणा आमच्या आईवडिलानी केलेला आहे आता आम्हाला करायचा नाही . झालं आम्ही काही मानत नाही . त्यांच्या समोर तुम्ही प्रत्यक्ष काय देणार ?तेव्हा सर्व काही सोडून पहिल्यांदा परमेश्वराला मिळवून घ्यायचं . आणि ते अगदी सोपं काम आहे मी आपल्याला आधीच सांगितलं आहे . कारण एकतर आपण महाराष्ट्रातले राहणारे हे विशेष आहे काहीतरी . त्यातून हि कुंडलिनी आपल्यामध्ये अंकुर रूपाने आहे च तेव्हा तिला जागृत करायचं हे काही कठीण काम नाही . आणि ती जागृत झाल्यावर जस एखाद रोप आपण कस सांभाळून लावतो ,भाताची शेती कशी करतो तशी निगा आपल्याला ठेवली पाहिजे . ती जर निगा आपण ठेवली व्यवस्थित तर त्या लहानशा अंकुराचंच रोप होणार आणि त्या रोपा पासूनच वृक्ष होणार आहेत आणि त्या वृक्षाची फळ सर्व जगाला पहायला मिळतील . एव्हडी ह्या महाराष्ट्राची पुण्याई आहे कि आज आपल्याला माहित आहे कि चौदा देशातून निवडक लोक ह्या भूमीला नमस्कार करायला आले पण आपल्याला काही समजत नाही . आपल्याला काही माहीत नाही . असं आहे ना सोन्याच्या खाणीत बसायचं आणि हातात कथिल घालून फिरायचं . तशी आपली स्तिती आहे तेव्हा एव्हडं मोठं आपल्या जवळ असून एव्हडी धनसंपदा आपल्याजवळ वारसा म्हणून आहे ,वारसा ,हक्क म्हणूनही . ते असून सुध्दा हि आपली दशा झालेली आहे . कारण नुसत्या भांडाभांडी ,काहीतरी भलत्या लोकांची मदत करणे .नको ते करणं अशा मार्गाने गेल्या मुळे आज आपल्याला भांबावून गेल्या सारखं झालं आहे . आपल्याला हे समजतच नाही परमेश्वर आहे किंवा नाही . मुल आपल्याला हसतात ,त्यांना कस सांभाळायचं ?या तरुण लोकांना कस समजावून सांगायचं . शाळेत शिकतात . शाळेत काय परमेश्वर आहे म्हणून कुणी सांगत नाही . म्हणजे आहे तरी काय ,इकडे गौडबंगाल तिकडे ते गौडबंगाल . तेव्हा परमेश्वर आहे किंवा नाही हे सिध्द झालं पाहिजे आणि ते सिध्द करणार तुम्ही . मी सिध्द करून उपयोग काय तुम्ही सिध्द केलं पाहिजे . ते तुमच्यात परिवर्तन झाल्या शिवाय ते सिध्द होऊ शकत नाही . आणि हे परिवर्तन आत्मसाक्षात्कारानेच होत .

आता तुकारामबुवा घ्या . त्यांनी काही संसार त्याग केला नव्हता . गोरा कुंभार ने काही संसारत्याग केला नव्हता . कुणीही संसारत्याग केला नव्हता . काही सोडलं नव्हतं . धरलं च नव्हतं काही तर सोडायचं काय . संसारात राहूनच राजा जनकाने राज्य सांभाळूनच परमेश्वर मिळवला होता . तेव्हा तुम्हाला काहीही सोडायचं नाही पहिली गोष्ट . दुसरं सहजच होत आहे ,झालच पाहिजे सहज . जर परमेश्वर जिवंत आहे तर जिवंत कार्य सहजच होत आहे . जिवंत कार्यासाठी काही डोक्यावर उभं रहावं लागत नाही . काही मंत्र म्हणावे लागत नाहीत सगळं सहजच घडल पाहिजे ते . जर हे इतकं सहज होत तर हे करून काय उपयोग आहे माताजी असं म्हणतात लोक . म्हणजे इतका विक्षिप्त पणा आहे मला समजत नाही लोकांना कस सांगायचं याला मूल्य नाही ,तुम्ही अमूल्य गोष्टीला कसे पैसे मोजणार . जे अमूल्य आहे ते कस तुम्ही पैशामध्ये तोलू शकणार आहात . त्याला तोलच नाही कारण ते अतुलनीय आहे त्याला तुलनाच नाही आहे . तेव्हा तो जर ब्रम्हानंद मिळवायचा असेल तर त्या साठी काहीही करायला नको सहजच मिळेल . पण एकदा तुम्ही बी ला मातीच्या उदरात घातलं आणि तिला जर अंकुर फुटले त्याच्या नंतर मात्र तुम्हाला निगा ठेवली पाहिजे . जर त्याच्या नंतर तुम्ही निगा ठेवली नाही ते व्यर्थ जाणार आहे . आणि ते जर व्यर्थ गेलं तर ते नेहमी साठी व्यर्थ जाणार आहे . म्हणून हेजे अंकुरलेलं बीज आहे त्याच्या मध्ये तुम्ही लक्ष घालायला पाहिजे .

हि गोष्ट एक मी आपल्या महाराष्ट्रात पाहिलेली आहे कि आज सिनेमाचं तिकीट नाही मिळाल तर चला माताजी आले तर माताजींच्या भाषणाला बसले . तर मग दुसरे कुणी बाबाजी आले त्यांच्या भाषणाला गेले . स्वतःला स्वतःचा गुरु करून समजून घेतलं पाहिजे . जर तुम्ही दहा ठिकाणी विहिरी खणल्या तर काही वेळा हाताला लागणार आहे ,पण ज्या ठिकाणी एके ठिकाणी खणून तुम्ही पाणी लागलं तिथे खणत गेले तर विहीर बांधता येते . तर माणसाला डोकं असायला पाहिजे ,जे आपल्याला प्रत्यक्ष मिळत ते आपण घ्यायला पाहिजे उगीचच कोणावरती विश्वास ठेवायचा ,त्याला चार पैसे दयायचे आणि त्याला पाळत पोसत बसायचं . त्याला काही अर्थ नाही . इथे शेजारी साईनाथ आपले येऊन गेले . त्यांनी एव्हडे चमत्कार करून दाखवले लोकांना ,इतकं त्यांनी भलं केलं आणि एव्हडे मोठे झाले . त्याच्यावर पुष्कळ उपट सुम्भ तिथे बसलेले आहेत . हि दुसरी गोष्ट . प्रत्येक ठिकाणी तुम्ही बघा जिथे जिथे क्षेत्रस्थळ आहेत तिथे उपट सुम्भ येऊन बसणार पैसे कमवायला . हि पद्धत आहे . आणि भाविक लोक जाऊन त्यांच्याच पायावरती पडून त्याना चार पैसे द्यायचे . हा प्रकार सगळीकडे आपल्या देशात चालू आहे पण विशेष करून महाराष्ट्रात चाललेला आहे . कोणत्याही देवळात जा तिथे चार उपट सुम्भ बसलेले आहेत आणि त्यांनी सांगितलं कि इथे चार पैसे टाका मग तुमचं आम्ही डोकं फोडतो देवाच्या पायावर . तयार पैसे देऊन डोकं फोडून घेतील . म्हणजे आपण डोकं म्हणून वापरतच नाही परमेश्वराच्या बाबतीत . कोणत्याही माणसावर विश्वास ठेवतो आणि अशा मार्गाला जातो . हि झाली एक पद्धत आणि दुसरी पध्दत अशी कि परमेश्वर नाहीच मुळी ,कुठून असणार परमेश्वर ,चुकीच्या रस्त्यावर जायचं नाहीतर स्वतःला फार शिष्ट समजून देवच नाही ,सायन्स म्हणजेच सगळं सायन्स मधेच सगळं मिळणार आहे आम्हाला . मग ज्या देशांनी एव्हडी प्रगती केली आहे आम्ही ज्या देशांना एव्हडं पाहून आलो तिथे असंतोष इथल्या पेक्षा जास्त आहे . समाधान तर मुळीच नाही . सगळे जे श्रीमंत देश आहेत त्या देशानं मध्ये चुरस लागली आहे कि सगळ्यात जास्त आत्महत्या कुठे होतात . अगदी तरुण तरुण मुल आणि मुली माझ्याकडे आले आणि मी विचारलं अरे तुमचे कडे बघून असे वाटते आहे कि काही चैतन्यच नाही आहे ,तुम्ही तर मरायला निघाले . झालं काय तुम्हाला प्रेता सारख्या लहरी तुमच्यातून का येतात . ते म्हणे आम्ही रात्रंदिवस हाच विचार करतो आहे कि आत्महत्या कशी करायची . पैसे अडका सगळं असून आत्महत्याचे डोहाळे लागलेले . त्याला कारण असं कि पैशाने जर आनंद मिळाला असता तर यांची अशी दशा झाली नसती . दुसरे मुल त्यांची बहकलेली .

आता महाराष्ट्रात सुबत्ता झाली ,थोडं लक्ष्मीचं राज्य आल्याबरोबर इथेपण बहकण सुरु झालेलं आहे . हे लोक वाम मार्गाला लागलेले आहेत . आता याना ठीक कस करायचं हा प्रश्न पडलेला आहे . परवा मी एका साखर कारखान्यात गेले होते तिथे फारच एक चांगले गृहस्थ आहेत त्यांनी संबंध तो साखर कारखाना बांधून काढला आणि लोकांना खूप सुबत्ता दिली ,सगळं व्यवस्थित चाललेलं आहे . पण ते रडत होते माझ्याकडे येऊन माताजी तुम्ही तरी या लोकांना काहीतरी समजावून सांगा ,मला असं लाजिरवाणं झालं कुठून हे मी काम केलं असं झालं आहे आता तुम्ही आई आहात तुम्हीच वाचवा आता . तुम्हीच सांभाळून घ्या . मला तर असं वाटत कि सगळं सोडून निघून जावं . म्हंटल झालं काय एव्हडं रडायला काय झालं तुम्हाला . तर ते म्हणाले असं आहे त्याच ह्यांना सुबत्ता अली चार पैसे आले ,ह्यांना झेपत नाही हो म्हणे पैसे ,चार पैसे आल्याबरोबर लागले दारू प्यायला बायकांना हाणायला . मुली रस्त्यावरती पडल्या ,सगळी घाण सुरु झाली आमच्या इथे . या मध्ये अशा घाणेरड्या बायका येऊन राहिल्या आहेत कि त्यांना बघू नये . आता पोर तिकडे जातात सांगलीसगळ्या पोरी खराब झाल्या . सगळी खराबी येऊन आमच्यात बसली आता काहीतरी करा . अहो म्हंटल कायद्यानी काढा त्या बायकांना . कायद्यांनी काढता येत नाही म्हणे . मग काय करायचं ?तर राजकारण करतात म्हणे इथे . असं का ,मग शेवटी राजकारणावर आले वाटत . पण राजकारणाने सुध्दा हे सगळे धंदे ,छंद सुटणार आहेत का ?हे सगळ्या स्वतंत्र देशामध्ये झालेलं आहे .

अमेरिकेला तुम्ही जर गेले कानातलं हातातलं सगळं काढून जावं लागत .आता आमच्या घराण्या प्रमाणे आम्हाला काहीतरी घालावं लागत पण साहेबानी सांगितलं असलं तरी काही घालू नको बाई . तिथे रस्त्यावर बंदूक लावून पैसे काढून घेती तुझे . अशे बंडखोर लोक आहेत ,तुमच्या अंगावर एक वस्तू सोडणार नाहीत ,सगळं ओरबाडून घेतील . मोठ्या अमेरिकेचे बोलतात हे सगळे प्रेसिडेंट . याना म्हणावं कि दोन मिनिट तिथे रस्त्यावर चालून दाखवा . ओरबटून टाकतील सगळ्यांना . आमच्या इंग्लंड ला बघितलं तर आणखीनच दुसरा मूर्खपणा चाललेला आहे . आजकाल असं निघालेलं आहे कि डोक्याला असा काहीतरी गोंद लावायचा आणि केस वर पिंजारून ओढायचे . चांगले व्यवस्थित सगळे लोक त्याला काही हरकत नाही कुणाला . आणि अशी पॅन्टला भोक करायची ,रंग लावायचा सगळं तोंडाला आणि फिरायचं विदूषका सारखं . आणि कुठले तुम्ही म्हणे तर केम्ब्रिज ला एम ए झालो म्हणे . . असं का ,चांगले दिवे लावले तुम्ही केम्ब्रिज च्या नावावर . आणि ऑक्सफर्ड ला आम्ही शिकलो म्हणे . आणि आता हे काढलं . म्हणजे असं आहे कि आमचं व्यक्तित्व दिसलं पाहिजे ना लोकांना . म्हणून विदूषक बनून आम्ही फिरतो आहे . एक नाही दोन नाही हजारोनी अशे आहेत . आणि त्यांना म्हंटल हे करता कशाला तर म्हणे यांच्यात चुकलं काय आमचं ?म्हंटल चुकलं काही नाही तुमचं मला मात्र हसू येत आहे दुसरं काही नाही . अशी हि परिस्थिती या लोकांच्या देशाची झाली आहे . म्हणजे एव्हडं सगळं करून शेवटी गाढवाच्या मार्गाला लागले आहेत . गाढवाच्या पंगतीला बसलेले आहे त . आता तुम्हाला पण त्यांच्या रस्त्यानी जायचं असेल तर जा मला काही म्हणायचं नाही . पण मी आई आहे आणि ह्या महाराष्ट्राची मुलगी आहे मी म्हणून सांगायचं असं कि अगदी करायचं नाही . डोळे मिटून ते जस वागतात तस वागायचं नाही . त्यांचं इतकं चुकलेले आहे कि तुम्हाला त्याची कल्पना सुध्दा येणार नाही . कशाची हि त्यांना अक्कल नाही . अशा ह्या मूर्ख लोकांच्या मागे लागून तुम्ही आपला नाश करून घेणार . तुम्ही नाही लागलात तर तुमची मुल लागणार . कारण तुमच्यात काय आहे ते मोठं ,महान ,हे तुम्ही महाराष्ट्रातले हे जो पर्यंत तुम्ही याना दाखवणार नाही तो पर्यंत त्यांना काहीच फायदा होणार नाही . आणि म्हणून माझी अशी विनन्ती आहे संगमनेर च्या लोकांना कि तुम्ही सहजयोग घ्या ,योग घेणे हा तुमचा जन्मसिध्द हक्क आहे .

शिवाजी महाराजांनी सांगितलं होत कि स्व चा धर्म बाळगावा . तो ओळखावा कुठे आहे ते . बघा ते शिवाजी महाराज ते पार गृहस्थ होते . आत्मसाक्षात्कारी होते . पण तेव्हा आपला देश गुलामीत जखडलेला होता म्हणून त्यांनी सांगितलं कि नाही आधी गुलामी काढली पाहिजे . ते जर आज असते तर काम दुसरं झालं असत . स्व चा धर्म म्हणजे आपल्या आत्म्याचा धर्म ओळखायचा . त्या वेळेला नामदेव इथून गेले तर कुठे पंजाबात . नामदेव इथले त्यांना शिंपी शिंपी म्हणून देवळात सुध्दा जाऊ द्यायचं नाही . शिम्पी म्हणजे काहीतरी च ,जसे सगळे बाकीचे शहानेच किनई . तर ते गेले तिकडे तिथे गुरुनानकांनी त्यांचं पाचारण केलं . तेही साधुसंत हे हि साधुसंत पोचलेले त्यामुळे आपापसात ओळखलं आपली एकच जात आहे . विश्वधर्माला मानणारे हे लोक त्यांनी मिठ्या मारल्या त्यांना आलेत आता मोठे लोक म्हणून . मग नामदेवांना ठेऊन घेतलं त्यांच्या कविता ग्रंथसाहेबात घातल्या ,एव्हडं त्यांचं माहात्म्य केलं पण ह्या महाराष्ट्रात कोणी विचारलं नाही त्यांना . हे आपलं डोकं आहे . आज ग्रंथसाहेबमधे त्याचे कितीतरी उतारे आहेत आणि फार सुंदर कविता आहेत . गोरा कुंभाराला भेटायला गेले नामदेव तेव्हा काय विचारायला नको त्यांच्या गाठीभेटी कशा झाल्या . कारण ते एकजीव झाले होते ,ती समग्रता येण्यासाठी माणसाला आत्म्याचा साक्षात्कार झाला पाहिजे . कारण हे जे आत्म्याचं जे तत्व आहे ,याचा जो प्रकाश आहे हा सामूहिक आहे . तेव्हा मग आपल्याला कळत कि दुसरा कोण आणि आपण कोण . एकच आहोत . त्याच्यात काही अंतर नाही . हे आपल्याला कळत म्हणजे काही बुध्दीने कळत नाही बोध होतो म्हणजे तुमच्या नसांवर ,तुमच्या बोटांवर कळत . कि चक्र कोणची धरली ,कुठे धरलंय ,काय आहे ते . त्याला काही शीक्षण लागत नाही . तुकारामांचं कोणत्या युनिव्हर्सिटीत शिक्षण झालं होत . आणि गोराकुंभार कुठे गेले होते शिकायला . तो सज्जन कसाही होता ,तो सुध्दा परमेश्वराच्या साम्राज्यात सिहांसनावर जाऊन बसलेला आहे . मग तुम्ही इथे उगीचच गमज्या मारून स्वतःला मोठं समजून बसले त्याचा काय फायदा होणार आहे . उद्या देवाच्या साम्राज्यात जायचं आहे कि नरकात जायचं आहे त्याचा निवडा करून घेतला पाहिजे . ती निवाड्याची वेळ आज आलेली आहे . हि वेळ आलेली आहे असं ख्रिस्तानी सांगितलं ,सगळ्यांनी सांगितलं . पण मी ख्रिस्ताच नाव घेतल्या बरोबर काही लोक उभे राहतात माझ्या डोक्यावर ,माताजी तुम्ही ख्रिस्ती धर्म पसरवता हे इकडे सांगतात आणि तिकडे गेले कि म्हणतात हिंदू धर्म पसरवता . पण यांचे जे मुख्य आहेत बाळ ठाकरे ते माझ्या पायावरच येतात . ते शहाणे आहेत म्हणून . मूर्ख नाहीत . त्याना समजत कि हे काय आहे ते . तेव्हा असल्या काहीतरी गोष्टी काढून फाटे फोडणे त्यांनी आमचा काय तोटा होणार आहे तुम्हालाच तोटा होणार आहे . जे आहे ते तुमच्या जवळ ते गमवायचा आहे तुम्हालाच . जे आहे तुज पाशी तेच देण्या साठी आम्ही आलो आहोत . ते घेण्या ऐवजी नसते फाटे कशाला पाडता . आणि आपलं वाईट का करून घेता . माझं आईच हृदय आहे ,मला हे समजत नाही कि अशा चुकीच्या मार्गाला कशाला जायचं . आणि आपला सर्वनाश कशाला करून घ्यायचा . जे आपल्या जवळ एव्हडं धन आहे आणि ह्या पृथ्वी तत्वा तल्या विशेष तत्वावर तुम्ही बसलेले असताना का ते मिळवू नये आणि त्याच्या वरती तुम्ही का गुरुत्व साधू नये . ते द्यायलाच आम्ही आलेलो आहोत . ते कृपा करून सर्वानी तुम्ही घ्यावं हि अत्यंत हात जोडून माझी सगळ्या मुलांना माझी विनन्ती आहे .

अत्यंत नम्र पणे ,प्रेमळपणाने ते घेतलं पाहिजे . हि परमेश्वराची प्रेमाची शक्ती सगळ्या चरा चरा त विचरण करत असते ती तुमच्या हाताला लागली कि ती तुमच्यातून वाहू लागेल ,ती वाहू लागली कि तुम्ही ज्याला हात लावाल तो बरा होणार . ज्याच्याकडे नुसतं लक्ष जरी दिल तरी तो बरा होणार . इतकाच नाही पण त्याची कुंडलिनी जी आपण महालक्ष्मीच्या देवळात उधो उधो अंबे म्हणतो ती कुंडलिनी त्याच्यात जागृत होऊन तो माणूस सरळ मार्गाला लागेल . त्याच उत्थान होईल . पण हे सर्व करत असताना योगक्षेम वाहामयं कृष्णांनी म्हंटलेले आहे म्हणजे कि एकदा योग घडला कि तुझं मी क्षेम बघेन याचे अनेक चमत्कार लोकांनी पाहिलेले आहेत .म्हणजे लक्ष्मीचा सुध्दा तुमच्यावरती हात येतो . लक्ष्मीचा अर्थ असा नव्हे कि भलतच एकदम श्रीमंतीत जाऊन आणि मग गमज्या मारायच्या . जे लक्ष्मीचं तत्व आहे जी अगदी कमळावरती कशी अलगद उभी आहे तशा तत्वावर तुम्ही बसले म्हणजे त्याला एक सौष्ठव आहे ,त्याला लोक म्हणतात बाबा होते एक श्रीमंत लोक . श्रीमंत तुम्ही होता , उगीचच काहीतरी पैसेवाले होत नाही कि आज पैसे आले आणि उद्या जेलमध्ये हातकड्या . त्याला काही अर्थ आहे ?बेइज्जतीचे पैसे तुम्ही कमवत नाही तर इज्जतदार पैसे तुमच्याकडे येतात . लक्ष्मीचं तत्व येत स्वास्थ्य येत तुमच्यामध्ये . मना मध्ये शांती येते आनंद वाहतो . मुलबाळ ठीक होऊन सगळं व्यवस्थित चालत . मग ते का नको . ते ह्या महाराष्ट्रात होणार आहे . सगळं विश्वाचं कार्य ह्या महाराष्ट्रात होणार आहे इथे आदिमाया आणि मूळमाया बसलेली आहे .

इथेच ते कार्य करायचं आहे म्हणून मी ह्या महाराष्ट्रात वारंवार येते आणि तुम्ही लोकांनी माझी थोडीशी जरी साथ दिलीत तर साऱ्या विश्वाचे लोक येऊन तुमच्या पायावर पडतील . तुम्ही सगळे वंदनीय आहात पण तुम्हाला स्वतः बद्दल काही कल्पना नाही . असं म्हणतात ना कि एखाद्या भिकाऱ्याच्या पोराला सिहासनावर बसवलं तरी तो सिहासनावर बसून सारखा आपला पदरच पसरत असतो दुसऱ्याच्या समोर तशी आपली स्तिती आहे केविलवाणी . तेव्हा आता जागृत व्हा तुम्ही स्वतः महाराष्ट्रातले लोक आहात ,हि आणीबाणीची वेळ आहे . या वेळेला जागृत होऊन हे मिळवलं पाहिजे स्व च तंत्र ,जाणलं पाहिजे आणि त्यातच तुम्ही गुरुत्व मिळवून साऱ्या जगामध्ये विश्वविजयी झालं पाहिजे . अशी माझी सर्वाना अत्यन्त कळकळीची विनंती आहे आणि माझा तुम्हा सर्वाना अनंत आशीर्वाद .

प्रश्न -कुंडलिनीची गती काय आहे ?

त्रिकोणाकार अस्थी मध्ये आपली कुंडलिनी आहे . आणि तिची गती काय तर सध्या आपण असं म्हणतो कि सर्पाचे पिल्लू म्हणजे सर्प नव्हे पण कोणाचीही शक्ती सर्पा सारखी चालते . म्हणजे त्याला वेव्ज म्हणतात ना तशी चालते . म्हणून तिला सर्पाचे पिल्लू म्हण्टलेलं आहे . आणि ती सुप्तअवस्थेत आहे म्हणजे अजून विरंगुळलेली आहे . जागृत नाही झालेली . तर जेव्हा ती जागृत होते तेव्हा ती सहा चक्राच भेदन करत वर इथे टाळूतून भेदन करते . आणि जेव्हा ती भेदन करते तेव्हा टाळूतून थंड थंड लहरी डोक्यातून येऊ लागतात . सुरवातीला काही गर्मी असेल तर ती फेकून टाकते आणि त्याच्या नंतर मग थंड थंड लहरी अशा येऊ लागतात . ते एकदा सुरु झालं मग हाताच्या बोटांवर सुध्दा ,सगळी कडे तीच चैतन्यमय शक्ती वाहू लागते ,थंड लहरी अशा येऊ लागतात . आता कुंडलिनी वरती पुष्कळ लोकांनी विपर्यास केलेला आहे . तो हि जाणून घेतला पाहिजे . परवा एक गृहस्थ आले म्हणाले तुम्हाला काय तरणोपाय ,घरणोपाय काय काय सांगायला लागले . म्हंटल काहो कोणच्या शास्त्रात लिहिलं आहे ते सांगा . नाही म्हणे आमचे गुरुजी म्हणाले . तुमचे गुरुजी म्हणजे उपटसुम्भा सारखे कुठून तरी आलेले दिसतात . पण हे सांगा कोणच्या शास्त्रात हे लिहिलेलं आहे . मग म्हणे कुंडलिनी उठली म्हणजे त्रास होतो ,एक गृहस्थ म्हणाले आमच्या गुरुजींनी सांगितलं कुंडलिनी उठली म्हणजे आम्ही बेडका सारखे उडतो ,म्हंटल तुम्ही बेडूक होणार आहात का ?तर कुंडलिनीचा जी गती आहे ती आजच्या ह्या वर्तमान काळामध्ये एकदम ज्याला जेट कुंडलिनी म्हणतात तशी सटकन वर येते . पण महाराष्ट्रात फक्त दुसरीकडे कुठे नाही . सटकन वर येते त्याला काही वेळ लागत नाही . क्षणात हे विशेष आहे . पूर्वी म्हणजे गुरु लोक मेहनत करायचे ते प्रत्येक चक्र ,ती सहा चक्र ती स्वच्छ करा रे ,ती मेहनत करा रे ,त्यांना व्यायाम करायला लावा रे ,ते सगळं झालं तुमचं पूर्व जन्मात . आणि आता सटकन वर येते . हजारों नि माणस ,जितकी अजून खेडेगावात जा त्याहून जास्त माणस पार होतात . शहरात डोकं खराब असत नाही का . त्याला वेळच लागत नाही तत्क्षण असा शब्द रामदास स्वामींनी वापरला आहे . त्यांना विचारलं कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो त्यांनी सांगितलं तत्क्षण . पण ते कुणासाठी ज्यांच्या मध्ये काही बाधा नाहीत बौध्दिक ,शारीरिक ,मानसिक अशा काही बाधा असतील कुणामध्ये तर कुंडलिनी मग थांबते ती दाखवते तिथे .

आता समजा तुम्हाला लिव्हर चा त्रास आहे तर कुंडलिनी जाऊन तिथे धक्के मारते हे डोळ्यांनी तुम्ही पाहू शकता . इतकाच नव्हे तर तुमचं खालचं चक्र स्वाधिष्ठान धरलेलं असलं पाहिलं चक्र तर मात्र कुंडलिनी तुम्हाला त्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये स्पंदन व्हावं तस दिसेल अगदी स्पष्ट डोळ्यांनी . हे डोळ्यांनी बघून बघूनच परदेशातील जे डॉक्टर लोक आहेत ते सहजयोगाकडे वळले . कारण त्यांनी डोळ्यांनी पाहिलं . तेव्हा त्याची गती प्रत्येक व्यक्तीवर अवलंबून असते पण तरी सुध्दा बहुतेक महाराष्ट्रात चटकन कुंडलिनी वर जाते म्हणजे मुंबई सारखा प्रदेश आपल्याला माहित आहे ,ती मुंबाची आई ती मुंबई हे म्हणाल तर मग पुष्कळ च काम करावी लागणार . नाहीतर परत तेच नाव सोनुबाई आणि हाती कथलाचा वाळा . पण तुम्हाला आश्चर्य वाटेल एकूणएक लोकांनी हात वर केला . जवळ जवळ सहा हजार माणस होती त्या दिवशी माझ्या भाषणाला . मलाच आश्चर्य वाटलं मुंबईला झालं काय ,नाव बदललं म्हणून कि काय . मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे . पण असं होत मात्र आणि होत आहे . त्या गतीला तत्क्षण गती मिळते ,बहुतेकांना मिळते आणि मिळाली पाहिजे . आता एका लहानशा भाषणात सगळं काही मी सांगू शकत नाही . त्याच्यावर आमच्या जवळ पुस्तक आहेत ,मराठीत पुस्तक आहेत ती बघा . पण आधी पुस्तक बिस्तक वाचू नका . आधी कुंडलिनी मिळवून घ्या नाहीतर ते पुस्तकातच जाणार सगळं . त्याच्यात वाचण्याचं काय आहे ?अहो जर तुम्ही एका बी ला रोपाल तर ते येणारच त्यात वाचन करून येणार आहे का ते . हे जिवंत कार्य आहे ना .

अगदी तुम्हला मला यांच्यात निष्णात करायचं आहे निष्णात . आणि जेव्हढ्या माझ्या शक्त्या माझ्या आहेत त्या तुम्हाला द्यायच्या आहेत ,संबंध याची जी कला आहे ती तुम्हला शिकवायची आहे तुम्हाला . आईला काय पाहिजे ?तिला जरी शंभर असलं तरी काय कामाचं जर ते मुलात नाही आलं तर . सगळं मुलांनाच द्यायचं आहे ना .

प्रश्न -कुंडलिनी जागृत झाल्यावर तेजाच दर्शन होत का ?

होऊ शकत पण झालं नाही पाहिजे . दर्शन झालं म्हणजे तुम्ही तेज झाले नाहीत . तुम्हाला जर दिवा दिसला म्हणजे तुम्ही दिवे झाले नाहीत . जेव्हा तुम्ही ते स्वतः होता तेव्हा तुम्हाला ते काही दिसत नाही . दिसलं नाही पाहिजे पण दिसू शकत कधी कधी . रस्त्यानी जाताना पुष्कळ गोष्टी दिसतात . दिसलं तर काही हरकत नाही पण दिसलं नाही पाहिजे . काहीच दिसलं नाही पाहिजे झालं पाहिजे . सहजयोगामध्ये व्हावं लागत ,घडावं लागत . आम्ही बी घडलो तुम्ही बी घडा . तुमच्यात परिवर्तन यावं लागत ,तुमच्यात जो एक बोधाचा एक नवीन आयाम आहे तो यायला पाहजे . तेव्हा काही दिसत असलं तर ते बरोबर नाही पण दिसलं तरी काही हरकत नाही .

प्रश्न - कुंभक केल्यावर किती वेळ राहू शकत ?

कुंभक वैगेरे काही करायचं नसत सहजयोगात . हे सहज आहे . आता कुंभक म्हणजे काय ते सांगते तुम्हाला . कारण हे पुष्कळ असं तस छापलेले आहे लोकांनी . तर काय होत कि जेव्हा कुंडलिनी आपली जागृत होते म्हणजे वाटत जिवंतपणे त्यावेळी आपोआप आतमध्ये कुंभक घडत . कुंभक म्हणजे काय रोक . पोटामध्ये असा रोक येतो . कारण कुंडलिनी वर चढली तर उलट्या दिशेला चढते आहे तर तिला काहीतरी बंध असल्याशिवाय ती कशी राहणार जरी दिसायला हि सगळी क्रिया अत्यंत सहज असली त्याच जे यंत्रशास्त्र आहे ते मात्र कठीण आहे ,आणि हे यंत्र आधीच आपल्यामध्ये बांधलेलं आहे . तेव्हा जेव्हा कुंडलिनी वर चढू लागली तेव्हा त्याला रोक घालायचा म्हणून आपल्या मध्ये आपोआप होत त्याला कुंभक म्हणतात . वर गेली कि तिला खेचरी म्हणतात . कारण खेचरी मध्ये काय होत कि आपली जीभ थोडी आत ओढली जाते . पण सहजयोगामध्ये तुम्हाला इतकं ते सटकन होत कि काही तुमच्या लक्षात पण येत नाही . तेव्हा आपोआप सगळं घडत याला एक उधाहरण देते मी समजा तुम्हाला आपली मोटर चालवायची असली तर तुम्ही आधी जर त्याची चाक फिरवली तर ती मोटर चालेल का ?नाही चालणार . मोटर सुरु केली कि आपोआप चाक चालतात . तस आपोआप आपल्या आतमध्ये घडत . ते आपण करून काही कामाचं नाही .

प्रश्न -कुंडलिनी जागृत करायची म्हणजे नेमकं काय करायचं ?

तर काही करायचं नाही म्हणून सांगितलं पण आता ते कार्य मी करणार आहे जागृतीच ते अगदी दोन मिनिटात आपण करूयात . फार चांगला प्रश्न आहे म्हणजे कुणीतरी उत्सुक आहे .

प्रश्न - हजारो लोकांची कुंडलिनी जागृत होणार असं कोणाच्याच शास्त्रात लिहिलेलं नाही . ?

असं शास्त्रात लिहिलेलं आहे . असं भाकीत केलेलं आहे असं होईल म्हणून . आपल्याला नाडीग्रंथ म्हणून एक ग्रन्थ लिहिलेला आहे हजारो वर्षा पूर्वी भृगुमुनींनी त्याच्यात त्यांनी वर्णन केलेलं आहे कि ह्या कलियुगामध्ये परब्रम्ह साक्षात ह्या संसारात येईल आणि हजारो लोकांची कुंडलिनी जागृत होईल . आणि त्याला आधार शास्त्रात अनेक ठिकाणी आहे . पण आपण जर कधी आलात तर मी एकेक शास्त्र समजावून सांगीन . मुख्य असं आहे कि जे होत ते पहावं . आणि शास्त्राचा आधार हा आहे कि तुमची कुंडलिनी जागृत होते . पण समजा एखाद्या च्या नि अशी हजारोंची होते समजा असं जर असलं ,असं धरूया कि जर हजारो लोकांची कुंडलीनी जागृत होत असेल तर तो व्यक्ती काहीतरी विशेष आहे असं धरलं पाहजे कि नाही ,लॉजिक असत कि नाही असं ?त्याप्रमाणे आधीच आपण जर असा विचार केला कि होते तर काहीतरी आहे कि नाही विशेष . ?

प्रश्न - ऑपरेशन केल्यावर चक्रांचे दर्शन होत का ?

नाही ऑपरेशन केल्यावर नाहीं दीसणार काही . ती शक्ती आहे तेव्हा जर तुम्ही याच ऑपरेशन केलं तर ते संपूनच जाणार कस दिसेल ?ते जडतत्व होईल . त्याच्यात ला जो जिवंतपणा आहे तो असला तर आपल्याला लाईट दिसतो पण उद्या ह्या लाईटला जर ऑपरेशन केलं तर काहीच दिसणार नाही . तेव्हा ऑपरेशन करून दिसणार नाही पण चक्रांचे जर दर्शन झालं तरी चक्रांपासून अजून तुम्ही दूरच आहात . म्हणून दर्शन होतंय . चक्रांच्या मधून निघावं लागत ,हि ब्रम्ह नाडी चक्रांच्या मधून अशी जाते . तेव्हा चक्रांच्या मधून अशी ती कुंडलिनी जाते . ते आता असं आहे कि त्याचा साक्षात घ्यावा आणि ते जाणावं . कारण तुमचं काय जाणार आहे तुम्हाला पैसे द्यायचे नाहीत कि काही करायचं नाही . फक्त आपलं परिवर्तन करून घ्यायचं . पण हे नाही सांगू शकत कि सगळ्यांची च होईल संगमनेर ला . झाली तर झाली . तुमचं नशीब .पण नाही झाली तर मेहनत करावी लागणार . आता सगळेच बी रोपले तर त्याच्यातून अंकुर निघत नाही ,काही त्रास असला तुम्हाला शारीरिक ,मानसिक तर त्याच देणंघेणं लागत थोडस . काय करणार .

प्रश्न - कुंडलिनी म्हणजे काय ?

कुंडलिनी म्हणजे शुध्द इच्छा . आपल्या मध्ये चार शक्त्या मी सांगितल्या . त्यातली पहिली शक्ती आहे ती इच्छाशक्ती ती आपल्या डावीकडे वाहते . दुसरी शक्ती जी आहे ती कार्यशक्ती ती उजवीकडे वाहते . तिसरी शक्ती जी आहे ती धर्म शक्ती तिच्याच दमावर आज माणूस अमिबा पासून माणूस झाला . चौथी जी शक्ती सुप्त अवस्थेत आहे आपल्यामध्ये ती कुंडलिनी शक्ती . आणि ती शक्ती आहे आपली शुध्द इच्छा . आणि आता या सगळ्याच प्रात्यक्षिक करूयात .

सगळेजण शांतपणे मांडी घालून जमिनीवर बसा . ह्या महाराष्ट्राच्या शुध्द भूमीवर बसला आहात हे आणखीन विशेष आहे . पायातले जोडे काढा . एकच शुध्द इच्छा ठेवायची कि परमेश्वर शी योग्य घडला पाहिजे . आता दुसरं म्हणजे आई समोर काही टोप्या घालायला नको . आकाशाकडे उघड पाहिजे ना . कबीराने म्हंटल आहे शून्य शिखर पर अनहद बाजे . इकडे टाळूवर अनहद वाजू लागतो . डोळे मिटून घ्या उघडू नका . कारण कुंडलिनी ह्या पसरलेल्या चित्ताला रेटत रेटत वरती घेऊन जाते आणि मग इथे टाळूवर भेदन होत . भेदन झाल्यावर त्या संबंध चित्तामध्ये तिचा प्रकाश पसरतो . म्हणून आपले डोळे आतमध्ये असतील तर बर . म्हणूनडोळे मिटून घ्या . म्हणजे चित्त आत मध्ये ओढलं जाईल . आता दोन्ही हात माझ्याकडे अशे समोर करायचे . कारण हि आपली पाच बोट आणि तळहात हि आपली सगळी चक्र आहेत . जेव्हा त्या सात चक्राना चैतन्य मिळत तेव्हा आव्हाहन जात कुंडलिनीला आणि ती उठते . आता सर्वप्रथम मी हे पाप केलं हि चूक केली अशा रीतीचे कमीपणाचे विचार आहेत ते आधी आपण सोडले पाहिजेत . कारण परमेश्वर हा प्रेमाचा सागर आहे तसा क्षमेचा पण सागर आहे . म्हणजे आपण काही चूक केली तर त्याला माहित आहे कि आपण मानव आहोत चूक करणारच . तो त्या साठी का तुम्हाला वेठीला धरणार आहे का . तेव्हा स्वतःला कमी लेखायचं नाही . तुम्ही माणूस झालात हेच फार मोठं आहे . ह्या स्तीतीला आल्यावर कशाला स्वतःला अपराधी समजायचं नाही . स्वतः एक प्रसन्न चित्त असल पाहिजे .

आता उजवा हात हि क्रियाशक्ती आणि डावाहात इच्छाशक्ती म्हणून हा डावाहात सतत माझ्याकडे ठेवायचा . आणि उजवा हात आधी हृदयावर ठेवायचा कारण आत्म्याचं तिथे स्थान आहे . त्याच्या खाली गुरुतत्व आपल्या डावीकडे आहे तिथे दाबून धरायचं आहे . नंतर त्याच्या खाली संबंध विद्येचं तत्व आहे . त्याला स्वादिष्ठान चक्र म्हणतात . मग परत पोटावर वरच्या बाजूला . मग परत हृदयावर यायचं . मग विशुद्धी चक्रावर डावीकडे मानेवर यायचं . हे एक सारखं धरत . एकत्र तंबाकू आणि दुसरं आमचं हे चुकलं ते चुकलं अशी भावना ठेवल्यामुळे . सगळं विसरा . नंतर कपाळावर आडवा असा हात धरायचा . आणि डोक्याच्या मागच्या बाजूला पण तोच हात ठेवायचा . मी सांगीन तेव्हा तस करायचं . मग हा च तळ हात असा वरती टाळूवर दाबून धरायचा आणि घड्याळाच्या दिशेने सातवेळा फिरवायचा .

आता डोळे मिटून घ्या . काय म्हणायचं ते सांगते ,हे मंत्र आहेत ,तुमच्या रोजच्या भाषेतले हे मन्त्र आहेत . प्रसन्नचित्त बसा . आपलं स्वतःवर प्रेम नाही आहे मग परमेश्वर कशाला तुमच्यावर प्रेम करेल . आता डावाहात माझ्याकडे आणि उजवाहात हृदयावर ठेवायचा . इथे आत्म्याचं स्थान आहे आणि इथे प्रश्न विचारायचा श्री माताजी मी आत्मा आहे का ?तीनदा विचारा . निर्भय होऊन . जर तुम्ही आत्मा आहात तर तुम्ही तुमचे गुरु हि होता . आता हा उजवा हात पोटाच्या डाव्या बाजूला दाबून धरायचा . आता हे गुरुतत्व आहे हे सद् गुरूंनी बनवलेलं हे तत्व आहे . इथे प्रश्न विचारा माताजी मीच माझा स्वयं चा गुरु आहे का ?तीनदा विचारा मनात . पूर्ण विश्वासाने विचारा . आता कुंडलिनीच्या जागृतीला सर्वप्रथम हात घालायचा म्हणजे स्वाधिष्ठान चक्र डावीकडे पोटाच्या खालच्या बाजूला दाबून धरायचं असं हातानी . तर हि शुध्द विद्या आहे . परमेश्वरी शक्ती कशी वापरून घ्यायची हि शुध्दविद्या आहे . पण मी काही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही त्या मुळे तुम्हाला स्वातंत्र्य आहे . जर तुमची इच्छा असेल तरच हे कार्य होऊ शकत म्हणून या ठिकाणी तुम्ही असं सहावेळा म्हणायचं श्रीमाताजी मला आपण शुध्दविद्या द्या . कृपा करून मला शुध्दविद्या हवी . आता कुंडलिनी हलायला सुरवात होते असं म्हंटल कि . मग आता हा डावाहात परत पोटाच्या वरच्या बाजूला डावीकडे दाबून धरायचा . आता ह्या ठिकाणी म्हणायचं कि माताजी मीच माझा गुरु आहे . आत्मविश्वासाने म्हणा . हे दहावेळा म्हणा . हे सर्व सदगुरु च आपल्यावर वरदान आहे . सगळ्या संतांचं आपल्याला वरदान आहे विशेषतः महाराष्ट्रात कि आपण सगळे गुरु होऊ शकतो स्वतः च . हा गुरु केला तो गुरु केला तस काही नको ,कोण खरा आणि कोण खोटा तेही माहित नाही . आता हा उजवाहात हृदयावर परत ठेवायचा आणि ह्या ठिकाणी पूर्ण विश्वासाने असं म्हणायचं कि श्री माताजी मी आत्मा आहे . असं बारा वेळा म्हणा . खर तर हे सगळं हृदयाचं काम आहे . आता हा उजवाहात डाव्याबाजूला मानेच्या आणि खांद्याच्या मध्ये असा धरायचा . जोरात दाबून धरा . हे विशुध्दी चक्र श्रीकृष्णाचं आहे . आपण मना मध्ये असं सारखं म्हणत असतो कि माझं हे चुकलं ते चुकलं माझा हा दोष तो दोष तेव्हा हे चक्र धरत . काही तुम्ही केलं नसल तरी आता माझ्या समोर असं म्हणायचं कि श्री माताजी मी दोषी नाही . असं सोळा वेळा म्हणा . पूर्ण विश्वासाने . कारण परमेश्वर हा क्षमेचा सागर आहे . क्षमेच्या शक्तीवर पण विश्वास ठेवला पाहिजे . जे ज्ञानेशांनी पसायदान मध्ये सांगितलं आहे कि ,"दुरितांचे तिमिर जावो "ती वेळ आज आहे . तेव्हा उगीचच माझं हे चुकलं ते चुकलं म्हणायचं नाही . ह्या कलियुगातच हे कार्य होणार होत . सोळा वेळा म्हणा आणि अजून तुम्हाला वाटत असेल कि मी जास्त पापी आहे तर एकशेआठ वेळा म्हणा . स्वतःबद्दल अशी कल्पना करून घ्यायची नाही तुम्हाला परमेश्वराने माणूस का केलाय ?शेवटी ह्या दशेला येऊन रडत बसायचं नाही . आता हा उजवाहात आपल्या कपाळावर ठेवा . दाबून धरायचा . आता इथे सगळ्यांना आपण क्षमा केली पाहिजे तरच कुंडलिनी वर जाणार नाहीतर जाणार नाही . पुष्कळ लोक म्हणतात कि आमच्यानी होत नाही पण क्षमा करा अथवा नका करू तुम्ही काहीच करत नाही . फक्त नाही केली म्हणजे डोकेदुखी होते म्हणून म्हणायचं कि माताजी मी सर्वाना क्षमा केली . आता कितीदा म्हणायचं हे मुख्य नाही तर हृदया पासून क्षमा कारण महत्वाचं आहे . मी सुध्दा स्वतःला क्षमा केलेल आहे . आता हा उजवाहात मागच्या बाजूला डोक्याच्या असा ठेवायचा . आता स्वतःच्या समाधाना साठी म्हणून म्हणायचं कि जर माझं कधी काही चुकलं असेल तर हे देवा तू मला क्षमा कर . समजा तुम्ही एखाद्या संताला वाईट बोलला असेल किंवा तुमचा उध्दट पणा झाला असेल ,देवाला काही बोलला असाल किंवा देवाच्या विरोधात गेला असाल ते आठवत बसायचं नाही फक्त माझं काही चुकलं असेल तर तू क्षमा तर म्हणावं . स्वतःला काही दोष लावून घ्यायचा नाही नुसतं म्हंटल कि झालं . तुम्ही दोषी नाही हे मी सांगते तुम्हाला . एव्हडा तरी माझ्यावर विश्वास ठेवा . लहानपणा पासून डोक्यात हेच भरलेलं असत ना कि तुम्ही पापीजन . कसलं पाप आणि कसलं काय . आता हाच हात डोक्यावर मध्यभागी टाळूवर बरोबर ठेवा आणि दाबून धरायचा आणि सातवेळा घड्याळाच्या दिशेने फिरवून म्हणायचं कि माताजी मला कृपा करून आत्मसाक्षात्कार द्या . तुम्ही मागितल्या शिवाय तर मिळणार नाही ना . आता उजवा हात हळूच खाली ठेवायचा आणि डोळे उघडायचे . आता माझ्याकडे विचार न करता बघा . बहुतेकांना निर्विचार समाधी आलेली आहे . आता डावाहात डोक्यावर धरा जरा उंच वरती ,उजवा हात माझ्याकडे . थोडी मान खाली घ्या . थंड लहरी येतात का बघा . तुमच्या डोक्यातूनच गारगार आलं पाहिजे . आता दावाहात खाली घ्या आता उजवा हात वर धरा डोक्यावर आणि बघा गार येतंय का . आता दोन्ही हात वर आकाशाकडे करा आणि एक प्रश्न विचारायचा कि श्रीमाताजी हि चैतन्यशक्ती ब्राम्हशक्ती आहे का ?हि परमेश्वाची प्रेमशक्ती आहे का ?तीनदा विचारा . मान वर करून . आता हात खाली करा . बघा विचार करायचा नाही . निर्विचारतेत आलाय तुम्ही आता . आज्ञा चक्रावर कुंडलिनी एकदा गेली कि विचार येत नाहीत डोक्यात . विचारांच्या पलीकडे निर्विचार समाधी . आणि याच्या पुढची निर्विकल्प साधायची असते . कुठलेही विकल्प राहायला नाही पाहिजेत .

ज्या ज्या लोकांच्या हातामध्ये किंवा डोक्यात थंड थंड आलेलं असेल याला सलीलां सलीलां असं वर्णन आहे आदी शंकराचार्यांचे या लहरींना . हाताच्या खालून वाटत असेल तर असं खालून वर घ्यावं . म्हणजे वर येईल . असं जर वाटत असेल अशा लोकांनी दोन्ही हात वर करावेत .सगळे पार झाले बघा आता . जे झाले नाहीत ते शन्का कुशंका काढत बसले असतील . काही हरकत नाही त्यांना बघून घेऊ . छान परत एकदा हात वर करा . आता तुम्हाला सेंटर चा पत्ता कळेल. आणि त्याच्यात तुम्ही समजून हे घ्यायचं कि सेंटरवर पैसे वैगेरे काही लागत नाहीत . पण आता तुम्हला जी काही जाणीव झालेली आहे त्यांनी तुम्हाला फार आनंद होईल . पण हि जी तुम्हाला संपत्ती मिळालेली आहे ती कशी वापरायची हे शिकल्याशिवाय सर्व व्यर्थ आहे . समजा तुम्हाला आम्ही लंडन चे पैसे आणून दिले पण तुम्हाला काय कळणार कस वापरायचं ते . ते शिकण्यासाठी म्हणून तिथे सेंटर वर जायचं . पैसे नकोत पण थोडासा वेळ द्या . आणि त्याच्यामध्ये गुरु होऊन बसायचं सगळ्यांनी .

Sangamner (India)

Loading map...