Public Program

Public Program 1985-02-01

Location
Talk duration
62'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

1 फेब्रुवारी 1985

Public Program

Sadoli Khalsa (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

सांगलीचे चीफ इंजिनिअर श्री जगताप साहेब तसेच ह्या शाळेचे मुख्याधापक ,इथे राहणारे सर्व आबालवृध्द ,सत्याच्या शोधात आलेले सर्व साधक या सर्वाना आमचा प्राणिपाद असो . कुंडलिनीचा विषय थोड्या शब्दात किंवा थोड्या वेळात मांडणं हे सोपं काम नाही . पण तरी सुध्दा आपण असा विचार केला पाहिजे कि हि जी मानव आकृती तयार झाली ती का झाली . हा मानव निर्माण करताना इतका वेळ घालवला अनेक योनीतुन आपण संचार केला शेवटी ह्या मानव स्तीतीला आपण आलो . तेव्हा ह्या मानव स्तितीत येऊन पुढे काही आहे किंवा नाही हा एकदा विचार मनात जरूर डोकावतो . आणि जेव्हा हा प्रश्न डोक्यात उभा राहतो त्या वेळी साधक तयार होतात . आणि हे साधक परमेश्वराच्या शोधात, सत्याच्या शोधात ,निर्गुणाच्या शोधात कुठेना कुठे तरी भटकत असत . त्या साठी श्री कृष्णाने फार सुंदर विश्लेषण करून सांगितलं आहे . कि जगामध्ये तीनच जाती आहेत . तीनच तऱ्हेचे लोक आहेत म्हणजे एक तामसिक ,एक राजसिक आणि एक सात्विक .

तामसिक मंडळी म्हणजे ती कि जे चूक असेल त्याला सत्य मानायचं आणि त्याच्या मागे धावायचं . ज्याचं काही महत्व नसेल ते महत्वपूर्ण करायचं आणि त्यासाठी संबंध आपलं आयुष्य घालवायचं . त्या बद्दल विचार करायचा नाही ,त्या बद्दल कोणचंही संतुलन ठेवायचं नाही . नुसतं वेड्यासारखं त्याच्या मागे लागायचं . जी आज पाश्चिमात्य देशांची स्तिती आहे ते राजसिक लोक आहेत . राजसिक लोक ते ज्यांना बरोबर काय आणि चूक काय ते समजत नाही . शुध्द काय आणि अशुध्द काय ते समजत नाही . पवित्र काय आणि अपवित्र काय ते समजत नाही . दोन्हीही चांगलं असं ते आपल्या अहंकाराच्या दमावर म्हणतात . तर राजसिक माणसाचा अहंकार फार बळावलेला असतो . आणि त्यातून एक नवी टुम काढलेली असते त्याला काही शास्त्राचा आधार नाही .काही नाही . अशी एखादी गोष्ट सांगितली कि तो ती धरून बसतो . कारण त्याच्या अहंकाराला ती पोषक असते . त्याच्या उलट जे लोक तामसिक आहेत ते कशाला आपण विचार करायचा आपल्या साठी दुसरा विचार करतो आहे ना मग ठीक आहे . पण आपला हा देश अत्यंत साधुसंतांनी पुनीत केलेला देश आहे . पुष्कळ लोकांनी या देशाचं वर्णन अनेक देशातून केलेलं आहे . परवा मी एक चायनीज पुस्तक वाचत होते . त्याच्यात सुध्दा भारताला त्यांनी पवित्र भूमी म्हंटली आहे . आज माझं सर्व देशांमध्ये सगळीकडे प्रवासाचं कार्य चालू आहे . आणि सगळीकडे मी बघते कि सगळ्यांना आपल्या देशाबद्दल अत्यंत नितान्त श्रध्दा आहे . पण तो आत्मा कुठे ,त्या देशाचं पुण्य कुठे लोप पावलं ते कळत नाही . ते का दिसून येत नाही . लोकांची अशी दुर्दशा का ?लोक अशे हालाकीच्या स्तिथीत का ?इथे काही ठीक का होत नाही . कुणाला काही बोललं इथे तर म्हणतात कि माताजी तुम्ही काही बोलू नका इथे . राजकारणाचं बोलू नका ,बर मग कसलं बोलायचं . अर्थशास्त्राबद्दल बोलू नका . काही बोलूच नका तुम्ही . अशी सगळ्यांची परास्थ स्तिती म्हणतात तशी झाली आहे . लोकांना हे समजत नाही ,मला प्रश्न विचारतात काहो तुमची एव्हडी योगभूमी असून तुमच्या देशात हि स्तिती का ?

आपल्या देशात सात्विक लोक फार आहेत . त्या बद्दल शन्का नाही ,पुष्कळ लोक सात्विक आहेत . आणि सात्विकांची ओळख हि असते कि जे सत्य आहे ते त्यांच्या विवेकात बसत . त्यांना विवेक असतो . विवेकामुळे ते मानतात कि हे सत्य आहे . आणि त्या सत्याची जे कास धरतात ते खरे सात्विक . आणि फक्त हे सात्विकच परमेश्वराच्या दारात जाऊ शकतात .

ह्या आजच्या धकाधकीच्या काळामध्ये जो मार्ग आपण अवलंबितो त्यात पुष्कळ अडथळे दिसतात . वेळ मिळत नाही आणि जे लोक परमेश्वरा बद्दल बोलतात त्यांचही काही वर्तन विशेष दिसत नाही ,त्यांच्या तब्बेती ठीक नाहीत ,त्यांच्या घरामध्ये भाऊबंदकी चाललेली आहे . सगळ्या तऱ्हेचे त्रास कोर्ट कचेऱ्या सुरु आहेत . सगळ्यांच्या तब्बेती खराब ,चेहरे पहिले तर पाप्याचे पितर . मग असा देव नको म्हणून एक चौथी जात निघत आहे . आणि देव नको ,देव धर्म नको ,त्याच्यात काही राम नाही . हा काहीतरी मुर्खात काढण्याचा मार्ग आहे अशा रीतीची एक चौथी जात पण निघाली आहे . अशा प्रकारे आपल्या मध्ये चार प्रकारच्या प्रवृत्या आहेत . या मुळे अनेक त्रास झालेले आहेत पण आज ह्या कलियुगामध्ये मुख्य त्रास झालेला आहे तो असा आहे कि तामसिक लोकांचे कर्दनकाळ जन्माला आलेले आहेत . जे लोक तामसिक आहेत त्यांना कस भुलवायचं ,त्यांना कस चूक मार्गाला घालायचं त्यांच्या कडून कसे पैसे उकळायचे ,त्यांना कस लुटून घ्यायचं हा एक प्रकार . त्यांचे कर्दनकाळ जन्माला आलेले आहेत . आणि जे बौध्दिक लोक आहेत ,राजसिक लोक आहेत त्यांचेही कर्दनकाळ जन्माला आलेले आहेत . म्हणजे काहीतरी टुम काढायची . एक टुम काढली त्याला काही शास्त्राधार नाही काही नाही . हि टूम काढली कि त्याच्या मागे लागले लोक . त्याच्यात काहीतरी आम्हाला शक्ती मिळेल . कुणी म्हणाल कि आम्ही सहा हजार रुपये भरले कि अशी शक्ती येणार आहे आमच्यामध्ये कि ज्यांनी आम्ही आकाशात उडू . म्हंटल कशाला तुम्हाला काय पक्षी व्हायचं आहे का ?. नंतर दुसरं कुणी तरी येऊन म्हंटल असं केलं तर तस होईल ,असं होईल . रामदास स्वामींना एकदा विचारण्यात आलं होत कि हा आत्मसाक्षात्कार किती वेळात होतो ?त्यांनी सांगितलं तत्क्षण . जर हि गोष्ट तत्क्षण घडली नाही तर हि गोष्ट खरी नाही . हि अगदी खरी गोष्ट आहे कि तत्क्षण हि गोष्ट जो घडवेल तोच खरा गुरु . आणि बाकी सगळं आहे ते सर्व तुम्हाला इकडे तिकडे फिरवण्याचा गोष्टी आहेत . पण बुद्धिवादी माणसामध्ये हट्टीपणा असल्यामुळे आणि तामसिक माणसामध्ये चिवटपणा असल्यामुळे तो त्या मार्गाला सोडत नाही . आणि आपला तेच खर म्हणून तो तसाच बसून राहतो . त्या मुळे दोन्हीही आत्मसाक्षात्काराला मुकतात . पण त्यात जे सात्विक असतात ते चटकन त्या मार्गात उतरतात . मी बहुतेक खेडेगावातून काम करत असते कारण खेडेगावांमध्ये सात्विक मंडळी पुष्कळ विखुरली आहेत . भोळिभाळी अगदी साधी ,कोणत्याही चक्करात नाही काही नाही ,हि मंडळी फार लवकर आत्मसाक्षात्काराला प्राप्त होतात . परवा मी बैलगाडीतून चालले होते तर जे गृहस्थ बैलगाडी चालवत होते ते म्हणजे सर्वसाधारण कुणी माळी जातीचे होते ,आणि मी त्यांच्याशी बोलायला सुरवात केल्यावर मला वाटलं हा कबीर उभा राहिला कि काय . कबीर सारखं बोलून राहिले म्हंटल झालं . म्हणे माताजी मी अक्षरशून्य आहे पण हि सर्व सहजयोगाची कृपा आहे . असं का म्हंटल . मी ऐकतच बसले कबिरा सारखं कस बोलून राहिले म्हंटल . अहो रामदास सुध्दा कोणच्या विद्यापीठात गेले होते ?कोणतेही साधुसंत कोणत्याही विद्यापीठात गेले नव्हते . पण हे ज्ञान आलं कुठून ?सर्व ज्ञानाचं भंडार हे आहे कुठं ?हे सगळं जे ह्या आपल्या मेंदूमध्ये समजत ते म्हणजे एक हजार अंशाचे सुध्दा नाही . बाकीचं हे जे प्रगट होऊन राहील आहे ते कुठून आलं ?ते कस झालं . ?

फार मोठं मोठाले कवी लंडन ला सुध्दा मी बघितलं आहे एक विल्यम ब्लेक म्हणून फार मोठाले कवी झाले . त्यांचं काहीही शिक्षण झालं नव्हतं . पण मार्कंडेयांसारखं द्रष्टा अगदी ,काय त्यांनी लिहून ठेवलं आहे ते वाचल कि आश्चर्य वाटत काय द्रष्टा माणूस . एकाहून एक द्रष्टे ह्या देशात झाले आणि त्यांना पाहिलं म्हणजे असं वाटत कि आता का अशी लोक होऊ नयेत . आताही होऊ शकतात . पण ह्या दोन प्रवृत्ती मुळे माणूस झाकाळला गेला . त्यातून तो निघू बघत नाही . आता खेड्यातल्या लोकांना जर सांगितलं कि बाबा हे चुकीचं आहे ,हे असं करू नये . परवा कुणी सांगितलं गणपतीला कोंडला आम्ही घरात ,कशाला तर आम्हाला मुलगा होत नाही म्हणून . म्हंटल असं करायचं नाही तो परमेश्वर आहे त्याला तुम्ही कशाला कोंडला ?तर एखादा बुध्दीजीवी असेल तर यात काय वाईट म्हणेल . त्याच काही शास्त्र माहिती नाही ,चैतन्य म्हणजे काय माहिती नाही . हि कुंडलिनी म्हणजे काय माहिती नाही . आतलं जे सूक्ष्म आहे ते माहिती नाही . आणि लागले बोलायला . काहीतरी कुणीतरी टुम काढायची काही म्हणायचं . आता रजनीश झाले हे झाले ते झाले अशे किती बाबाजी लोक झाले मला अगदी कंटाळा येऊन गेला . आणि बुध्दीजीवी म्हंटल म्हणजे नको रे बाबा ते आर्ग्युमेण्टस . परवा एक कुणीतरी गृहस्थ आले त्यांना पॅरालिसिस झालेला आहे ,ब्लडप्रेशर स्तिती खराब . तरुण होते काही विशेष म्हातारे नव्हते . आमच्या पेक्षा पुष्कळ लहान . पण आमच्या पेक्षा म्हातारे दिसत होते म्हणा . तर मी म्हंटल महाराज तुमची अशी स्तिती का ?ते म्हणाले आमचे जे गुरु आहेत ना त्यांनी असं सांगितलं ,तस सांगितलं . म्हंटल असं का ,हे बघा तुम्ही गुरु ठेवले आहेत ना मग त्यांच्या कडे जाऊन निदान तुमची तब्बेत ठीक करून घ्या . जर तुमचे गुरु तुमची तब्बेतही ठीक ठेऊ शकत नाहीत तर हे सगळं पांडित्य तुम्हाला सांगितलं आहे त्याचा उपयोग काय ?. तुमचं डोकं सुध्दा ठिकाणावर नाही . नाही म्हणे डोकं अगदी ठिकाणावर आहे म्हणे माझं . पण हे हातपाय माझे मोडलेत . मग मी म्हंटल हे तरी त्यांना नीट करू द्यात . अशा प्रकारे ह्या दोन प्रवृत्ती मध्ये माणूस इतका जखडला गेला आहे कि कधी कधी त्याला सहजयोग समजावयाचा कसा हे सुध्दा कठीण होऊन बसत आहे .

ज्ञानेशा ने म्हण्टलंय ,फार सुंदर म्हण्टलंय ,आता विश्वात्मके तोषावे . विश्वाच्या आत्म्यानी आता तोषाव माझं एव्हडं जेव्हडा मी वाग्यज्ञ केला आहे ,त्यांनी जी वाणी लिहून ठेवली त्यानी तोषूण घ्यावं मी तुमच्या स्तुतीपर एव्हडं लिहिलं आहे ,तोषूण द्यावे पसायदान हे . हे पसायदान काय आहे ते हेच चैतन्य . पण त्यांनी म्हंटल आहे खळांची व्यंकटी सांडो ,त्यांना माहित आहे कर्दनकाळ जन्माला आले आहेत . बुद्धिवाद्यांचे पण कर्दनकाळ जन्मले आहेत . आणि तामसिक लोकांचे सुध्दा कर्दनकाळ जन्मले आहेत . आणि ते स्वतःच्या बुध्दिच्या आहारी जाऊनच स्वतःचा सर्वनाश करून घेत आहेत . त्यांनी जे जे सांगितलं आहे ते आज व्हायची गोष्ट आलेली आहे . खरोखर म्हणजे त्यांना धन्य म्हंटल पाहिजे . कारण गीते मध्ये कृष्णाने कुंडलिनीचा उल्लेख केला नाही . त्याला कारण असं कि त्या वेळी ती स्तिती नव्हती . युध्दामध्ये अर्जुन आले त्याला जी स्तिती अली त्यावेळी कार्पण्य स्तिती त्यात कृष्ण फक्त एकदोन तास बोलले आणि केवल ज्ञान त्याला दिल . तेवढ्या वेळेत किती सांगणार अठरा अध्याय म्हणजे पुष्कळ झाले . आम्हाला तर दोन तासामध्ये एक अध्याय सांगायला सुध्दा पुरणार नाही . त्यात जेव्हड सांगायचं तेव्हड सांगितलं पण हे ज्ञानेशांचं वैशिष्ट्य बघा कि त्यांनी कुंडलिनी सहाव्या अध्यायात सांगितली . कारण त्यांना माहिती होत कि कुंडलिनी मुळेच होत तेव्हा सांगून टाकलेलं बर . तस म्हंटल तर आदिशंकराचार्यानी यावर पुस्तकांवर पुस्तक लिहिली आहेत . कोण वाचत ते ?आजकाल मॉडर्न गुरु पुष्कळ निघाल्या मुळे आदिशंकराचार्याना कुणी वाचत नाही . आणि आता बुध्दीजीवी लोकांनी हे आणखीन एक काढलं आहे कि हे पुस्तक त्यांनी लिहिलं नाही ते पुस्तक त्यांनी लिहिलं नाही म्हणून . एकूण काय सत्या पासून पलायनवाद . सत्याला मुकायचं . आणि सत्य हेच प्रेम आणि आनंदाच आगर आहे . सत्य हे जाणलं पाहिजे . आता सत्य जाणणं म्हणजे लोकांना वाटत आपण बुध्दिनि जाणलं पाहिजे . बुध्दिने तुम्ही सत्य जणू शकत नाही . हि बुध्दी सीमित आहे . सत्य जे आहे ते असीम आहे . असीम ला उतरायचं असेल तर हि सीमा तोडायला पाहिजे . बुध्दीने जे जाणलं जे आहे ते जाणलं तुम्ही . ह्या पृथ्वी मध्ये गुरुत्वाकर्षण आहे ते जाणलं तुम्ही पण हे कस आहे ते सांगा . ह्या जमिनीत बी पेरल तर त्याला रोप येतात हे तुम्ही जाणलं म्हणजे जे आहे ते जाणलं . पण ते कस ते सांगा . फुलांची फळ होतात हि जिवंत क्रिया कशी घडते ते सांगा . ते सायन्स ला उलगडलेलं नाही . कोणालाही उलगडलेलं नाही . कारण जिवंत क्रिया फक्त ऋतुंभरा प्रज्ञेने होते आणि ती परमेश्वराची शक्ती सगळीकडे पसरलेली आहे . त्या शक्तीला हात घातल्या शिवाय तुम्हाला हे समजायचं नाही . तर वेदामध्ये सुध्दा जो शब्द वेद वापरला आहे तो विद वरून आलेला आहे आणि विद म्हणजे बोध . आणि बोध म्हणजे बुध्दीचा बोध नसतो पण आपल्या नसानसात ,आपल्या मज्जासंस्थेवर आत्म्याचा बोध यायला पाहिजे . हे चैतन्य हाताशी लागलं पाहजे . तर ते खर . उगीचच आमची कुंडलिनी चढवली ,इकडे तिकडे फिरवली अशा खोट्या कल्पना करण्यात काही अर्थ नाही . किंवा या बाबतीत भ्रामकता ठेवणे हे काही कुंडलिनी जागरण नव्हे . मज्जासंस्थेवर सुध्दा पुषकळ लोक कुंडलिनीच जागरण करतात . पण ते कुंडलिनीच जागरण नसत तर तो गणेशाचा राग आहे . त्यांनी इतके त्रास होऊ लागलेत . तरतऱ्हेचे कुंडलिनी जागरणाचे प्रकार बघून मला आश्चर्य वाटत कि बुध्दीजीवी लोकांनी याला शास्त्राधार नसताना मान्यता कशी दिली आहे . अहो इतके लोक आहेत यांच्यात पडलेले आणि त्यांना किती प्रकारचे आजार ,त्रास सगळ झालं आहे . पण कुंडलिनी जागरणाने जेव्हा आत्म्याचं दर्शन घडत तेव्हा तुम्ही कारणांचा पलीकडे जाता . कारण आणि परिणाम सोडून तुम्ही पलीकडे गेले पाहिजे . कारणच उरल नाही पाहिजे तरच तुम्ही मिळवलं असं म्हणावं लागेल . जो पर्यंत तुम्ही कारण आणि परिणामाच्या घोटाळ्यात आहात तो पर्यंत तुम्ही अजून बुद्धीच्याच कचाट्यात आहात . त्याच्या पलीकडे गेलेले नाही . बुध्दिच्या पलीकडे जाण हि जी किमया आहे हि जशी काय आपल्याकडे ट्रिगरिंग म्हणतात तस झाल्याशिवाय होत नाही . म्हणजे हे कार्य हि क्रिया कुंडलिनी घडवून आणते . पण तुम्ही ह्या क्रियेत बसायला पाहिजे . कारण हि जिवंत क्रिया आहे . हि जीवन्त शक्ती आहे . आणि जिवंत कार्य सर्व अक्रियेत होत त्याला काहीही क्रिया करावी लागत नाही . आणि जर तुम्हाला क्रिया करावी लागली तर ती गोष्ट चुकीची आहे .

समजा आपल्याला एक बी पेरायच असलं ,एक सर्वसाधारण माणसाने कुशाग्र असायला पाहजे . कुशाग्रता पाहजे .जर कुशाग्रता नसली तर सगळं आमचं सांगणं व्यर्थ जाणार च पण कार्यपण होणार नाही . म्हणून नीट ऐकून घ्या . जर आपण एक बी पेरायला घेतलं ते पेरताना ह्या आईच्या कृपेने तिला अंकुर फुटतात ,काही क्रिया करावी लागते का ? आपण जर त्याच्यातला अंकुर ओढायला सुरवात केली तर त्याच झाड होईल का ?कोणतीही जिवंत क्रिया आपण करू शकत आंही . आणि जर आपण ती करायचा प्रयत्न केला तर हमखास आपल्याला त्याच्यात त्रास होतो . पुष्कळांनी क्रियेचे अनेक प्रकार सांगितले ,मला फार आश्चर्य वाटलं . म्हणे बंध केले पाहिजेत ,पोटाचे बंध . अहो बंध करून का कुंडलिनी जागरण होणार आहे . यावरती कबीरांनी केव्ह्ड लिहून ठेवलं आहे पण कुणी कबिरला वाचत नाही ,नानकाला वाचत नाही . आजकाल हे मॉडर्न गुरु आलेत कुणी कुणाला वाचतच नाही . कबीरांनी इतकं त्याच्यावर लिहून ठेवलं आहे ,खेचरी बीचरी वरती हे करायचं नाही . कारण एखादी मोटर आहे ,लक्षात घ्या ,मोटर काही जिवंत नसली तरी मोटारीचं उदाहरण घेता येईल . कि आता मोटारीला जर चाक आहेत आणि इंजिन आहे त्याच्यामध्ये त्याच ,ते इंजिन स्टार्ट होऊन त्याची चाक फिरायला लागली कि ते सहज झालं म्हणायचं . पण तुम्ही नुसतं चाक घेऊन फिरवलं तर मोटर चालणार आहे का ?. कुंडलिनीच जागृत झाली नाही तर तुम्ही बंध कसले घालता . विचार केला पाहिजे . चुकलं कुठे नाही चुकलं हे आहे कि हे आपण ज्यांना वाचायला पाहिजे त्यांना आपण वाचल नाही . रामदास स्वामींनी स्पष्ट सांगितलं आहे कि जर रामदासच वाचला दासबोध तर किती त्याच्यात होणार ?इतका मूर्खपणा आहे मी तुम्हाला सांगू नाही शकत . मी विचारलं कि तुम्ही रामदासांवर का लिहीत नाही ?त्यांनी सांगितलं ते ब्राम्हण होते म्हणून लिहीत नाही . असं का ,आणि तुम्ही अमक्याच का लिहिता ?तर ते मराठे होते म्हणून . ब्राम्हणांना विचारलं तुम्ही त्यांचं का लिहीत नाही कारण ते मराठे आहेत म्हणून . पण ह्या पोचलेल्या लोकांना काही जातीपाती नसतात . कारण गुणा पलीकडे गेलेले ,गुणातीत झालेले ,कालातीत झालेले लोक त्यांना कसल्या जाती पाती आणि कसलं काय . हे सगळं माणसांनी बनवलेले आहे . मार्कंडेयस्वामिनी चौदा हजार वर्षांपूर्वी लिहिलेलं आहे ," या देवी सर्व भुतेषु जाती रूपेण संस्थिता "आमची जात त्यांनी तेव्हाच बनवली कि जी देवीची जात आहे ती आमची जात आहे . महाकाली ,महालक्ष्मी ,महासरस्वती ह्या तीनच जाती आहेत माणसांमध्ये . मग त्याचा तुम्ही काहीही विपर्यास करा . अशा ह्या घोटाळ्यामुळे ह्या एव्हड्या पुण्यात्म्यांच कार्य दिसत नाही .

कृष्णांनी म्हंटलेले आहे योगक्षेम वाहामयं . हे लक्षात ठेवलं पाहिजे योग झाल्याशिवाय क्षेम होणार नाही आपलं . योग घडला का ?नाही घडला आहे हे मान्य केलं पाहिजे . अजून घडला नाही ,नम्रतेने मेनी केलं पाहजे . आणि तो घडला पाहिजे . हि इच्छा झाली पाहिजे . तेव्हाच विद जे होत ते आपल्या मज्जासंस्थेवर दिसलं पाहिजे जे आपल्या उत्क्रांतीचा एक लक्षण आहे . कि आपल्या नसा नसा मधून ते जाणवलं पाहिजे . हे त्याच जे लक्षण आहे ते सिध्द झालं पाहिजे . उगीचच हे असं झालं म्हणजे तस होत ,तस झालं म्हणजे असं होत अशा वैचारिक गोष्टीं मध्ये राहून माणूस गमावू लागला आहे . आणि दुसरे लोक जे असे जे आता भक्तिमार्ग आहे ,कबूल संतसाधुनी सांगितलं भक्तीचा मार्ग घ्यावा . भक्तीचा मार्ग घेतला म्हणजे परमेश्वराकडे लक्ष असत . नामदेवांची फार सुंदर कविता आहे ,आणि ती आपल्याला आश्चर्य वाटेल नाणकसाहेबानी आपल्या ग्रंथसाहेब मध्ये मराठी भाषेत लिहिली आहे . संबंध मराठीत लिहिली आहे केव्हड नामदेवांचं महत्व आहे बघा . तर ती इतकी सुंदर कविता आहे . नामदेव म्हणतात एक लहान मुलगा पतंग उडवतो आहे . आणि पतंग उडवताना तो इतरांशी बोलतोय ,खेळतोय ,धावतोय सगळं काही करतोय पण लक्ष त्याच त्या पतंगावर आहे तसच तुमचं पण लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे . म्हणून त्यांनी सांगितलं सगळ्यांनी भक्तिमार्गाकडे वळा . पण ध्येय गाठू नका म्हणून सांगितलं नाही . अहो जर मार्गाला ध्येय नसेल तर त्या मार्गाला काही अर्थ राहणार आहे . फक्त टाळ कुटत बसायचं का सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत . वारकरी पंथातले काही लोक भेटले मला त्यांना बघून रडायला आलं मला . किती भयंकर स्तिती त्यांची ,तोंडा मध्ये तंबाकू त्याच्या ,ती कृष्णाच्या विरोधात आहे अगदी . तुम्हाला मी सिध्द करून देते अगदी नंतर . ती तोंडात ठेऊन टाळ कुटत कुटत वारकरी सगळे पोहोचले . आता हे तामसिक लक्षण आहे . डोकी फोडून घेतली परत आले ,हे झालं ते झालं ,त्यांची स्तिती बघितली तर अगदी भिकाऱ्या सारखी . अहो तो धन्वंतरी ,लक्ष्मीपती ,नारायण तो त्याला तुम्ही भजता तर काय हि स्तिती तुमची बघवत नाही . आणि तो धन्वंतरी मग तुम्हाला एवढे रोग कसले ?कॅन्सर झालेला कुणाला काही कुणाला काही ,अंगावर लक्तर घालून हि कसली परमेश्वराची सेवा चाललेली आहे . अस नाव घेतात का परमेश्वरच . असं वेड्या सारखं पिसाटल्या सारखं एखाद्याच्या माग लागतात का ?कुणी असं केलय का ?तुकारामांचं असं होत का ?आपल्या समोर एव्हडी माणस झाली असून ,एव्हडे आपल्या समोर मोठी मोठी अवतरण झालेली असताना आपल्या लक्षात कस येत नाही कि कस वागायला पाहिजे . परत गुरूंकडे जाऊन पैसे देणं . म्हणजे मी म्हंटल आम्ही पैसे घेत नाही तर म्हणायचं पाच नाहीतर दहा पैसे तरी घ्या . लोकांच्या हे डोक्यातच येत नाही कि जिवंत कार्याला पैसे लागत नाहीत . पण गुरु कडे पैसे दिले पाहिजेत हि प्रथा . मग काही लोकांनी सांगितलं पोप पण पैसे घेतो चांगलं करतो का . ते जर मूर्ख असले तर आपण पण मूर्खपणा करायचा . तुकारामांचच उदाहरण बघा शिवाजी महाराजांनी एव्हडे दागिने पाठवले त्यांच्या बायकोसाठी तर तुकाराम अतिशय नम्र पणाने म्हणाले आम्हाला जमायचं नाही ते महाराज ,आम्हाला जमायचं नाही ते घ्यायला .

म्हणजे आजकालचे जे आम्ही ऐकतोय राजकारणाचे प्रकार ,धर्माचे प्रकार एकच दिसतोय सगळा प्रकार . पैशाच्या मागे लागण हे संतसाधूच काम नाही . त्यांना पैशाचं काय महत्व आहे . पैसा कशाशी खातात ते सुद्धा त्यांना माहित नाही . आणि नंतर तुम्ही आपल्या शरीराचे हाल करून घ्या . उपास करायचा . उपास करायचा कोणत्या शास्त्रात सांगितलं आहे . सोवळं करायचं कोणत्या शास्त्रात सांगितलं आहे . मला कोणत्याच शास्त्रात दिसलं नाही तेव्हा मला दाखवा . संबंध आठवडा भर उपास करायचा . मग ज्याची तुम्हाला हौस आहे तेच देव देतोय घ्या उपासमारी घ्या . उपासच करायचा आहे ना तुम्हाला मग घ्या उपासमारी . जुज नि म्हंटल आम्ही सफर केलं पाहिजे ,सहन केलं पाहिजे ,आम्हाला दुःख झालं पाहजे तरच आम्ही फार मोठे होणार . कुठून त्यांच्या डोक्यात हि कल्पना आली हे माहित नाही . तर मग घ्या हिटलर . आणि उपास सुद्धा नेमके चुकीचे करायचे . ज्या दिवशी गणपती जन्माला आले त्या दिवशी उपास करायचा . श्री गणेश जन्माला आले केव्हडा मोठा जीव तो ,ओंकार त्या दिवशी उपास करायचा . हि काय पध्दत आपण काय सुतक पाळणार आहोत का . अहो डोकं लावा डोकं कुठं गेलं . श्रीराम जन्माला आले उपास करायचा ,जन्माष्टमी च्या दिवशी उपास करायचा . नेमकं ज्या दिवशी उपास नाही करायला पाहिजे त्या दिवशी उपास करायचा . आणि नारकचतुर्थी ला उपवास केला पाहिजे कारण त्या दिवशी नरकाचे दार उघडले जाते .त्या दिवशी खूप झोपायचं ,पण लोक सकाळी लवकर उठून त्यादिवशी अंघोळ करतात आणि सगळी भूत अंगात घालून घेतात . शास्त्र म्हणजे कुठून आलं ,कस आलं ,कुणी सांगितलं हेच मला समजत नाही . आणि डोकं का लावत नाही तुम्ही . हे कुंडलिनी शास्त्र सिध्द करायला पाहिजे ,मी जे म्हणते ते सगळं सिध्द झालं पाहिजे . परमेश्वर आहे कि नाही ते सिध्द करावं लागेल पहिल्यांदा . ह्या कम्युनिस्ट लोकांसाठी . नंतर ह्या लोकांसाठी समजावं लागेल कि हे करून काय होत .

आता कुंडलिनी हि आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये साडेतीन वेटोळे घातलेली अशी शुध्द इच्छा आहे . इकॉनॉमिक्स चे लॉज आहेत आपल्याला माहित आहे अर्थशास्त्रा मध्ये कि कोणतीही एक इच्छा पूर्ण होते ,पण सर्व साऱ्या इच्छा पूर्ण होत नाहीत . त्याला कारण असं आहे कि इच्छा आपल्या शुध्द नाहीत . आज असं वाटत कि आपण एक घर घ्यावं मग मोटर घ्यावी या नंतर हे घ्यावं ,ते घ्यावं ,ते करावं . कधीच इच्छा पूर्ण होत नाहीत . माणूस संतोषात नसतो . त्याला कारण असं आहे कि शुध्द इच्छा अजून जागृत झालेली नाही . आणि शुध्द इच्छेची जी शक्ती आहे आपल्यामध्ये ती कुंडलिनी जी साडेतीन वेटोळे घालून आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये ज्याला सेक्रम असं म्हणतात ,सेक्रम म्हणजे ग्रीक भाषेमध्ये पवित्र ,आणि ग्रीस ला जाऊन मी विचारलं त्यांना कि याला सेक्रम नाव का दिल ?मला आश्चर्य वाटलं कि त्यांना केव्हडी माहिती आहे त्याची . त्यांनी सांगितलं कि आमच्याकडे जी अथीना देवी आहे हि कुंडलिनी शक्ती आहे . आणि तिच्या हातामध्ये असं साप दाखवले आहेत . ज्याच्यात चक्र आहेत आणितीच जे मंदिर बांधलेलं आहे त्याला साडेतीन पायऱ्या आहेत . आणि म्हणे याच जर वलय तुम्ही पूर्ण केलं तुम्ही या पायऱ्यांचे तर संबंध पृथ्वीला वेढा होतो . आणि त्याच्या समोर गणपती बसवलेला आहे . हि आदिशक्तीची कल्पना म्हंटल तुम्हाला अली कुठून ?म्हणे आम्ही पूर्वी एकाच आईला मानत होतो . त्यांनी सांगितलं एक आई आहे आणि मग तिने तीन शक्त्या केल्या . मला आश्चर्य वाटलं ,हे कधी तुम्हाला माहित झालं ?हे अलेक्झांडर नि सांगितलं का तुम्हाला . ?नाही म्हणे अलेक्झांडर च्या आधीच म्हणे आमचा रेकॉर्ड होता . परशुरामाच्या वेळच्या गोष्टी आहेत . आणि ते लोक आता मात्र उठणार आहेत कारण ते कुशाग्र आहेत . त्यांनी पैसे पाहून घेतले ,जग पाहून घेतलं ,सगळं पाहून घेतलं आता बास झालं आता याच्या पलीकडचं काय आहे ते बघूदेत . ते हजारोनी उठणार आहेत मला माहित आहे . पण आपल्या देशाचं काय होणार आहे . आपण ह्या चक्रातून कधी निघणार .

कुंडलिनीच जागरण हे तत्क्षण सहज झालं पाहिजे . सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर ज म्हणजे जन्मलेली . तुमच्या बरोबर जन्मलेली हि कुंडलिनी आहे . अगदी व्यवस्थित साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे . विशेष करून भारतातील त्यातल्या त्यात महाराष्ट्रातील मंडळी विशेष पुण्यवान आहेत . त्यांना अजून त्यांच्या पुण्याईची कल्पना नाही . हि भूमी काय ते माहित नाही . साडेतीन वेटोळे यातच आहेत आणि काय तुमच्या कोल्हापूरला महालक्ष्मी बसलेलीच आहे . साडेतीन वेटोळे इथे आहेत आणि अष्टविनायक तुम्हाला वेढा घालून बसलेले आहेत . हि सगळी कुंडलिनी ह्या त्रिकोणाकार पठारात वेटोळे घालून बसलेली हि भूमी केव्हडी पवित्र आहे . रामाला आणि सीतेला सुध्दा पायातल्या वहाणा काढून चालाव्या लागल्या . ती हि भूमी आहे . त्या दंडकारण्यात तुम्ही जन्माला आले आणि स्तिती काय आमची . संबंध समुद्र असावा आणि पक्षाने तहानलेले असावे अशी आपली स्तिती आहे . पण हे काम अत्यंत सोपं आहे ,फार सोपं आहे . कुंडलिनीच जागरण कठीण नाही . पण भूमी ठीक पाहिजे . काही काही ठिकाणी आता मी अंगापूरला गेले होते बघा तिथे सहा हजार माणस होती ती सगळीच्या सगळी एका क्षणात पार झाली बघा . कमालच आहे लोकांची . अंगापूरची महती आहे . श्रीरामाच्या तिथे देवाच्या मूर्ती मिळाल्या होत्या तिथे रामदासस्वामींना . माझं अंगापूरला जाण म्हणजे ,तुम्ही एकदा जाऊन बघा किती खाचखळगे आहेत तिथे ,कस जावं लागत तिथे बैलगाड्यां नि . अशी स्तिती आहे . पण एकदा तिथे पोहोचल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल लोक मात्र तिथे फुला सारखे . सहा हजार मानस पार झाली . कारण त्या भूमीतच महत्व आहे . बीज कितीही कडक असलं तरी ते भूमीच एक वरदान असत . त्यात जर बीज उत्तम असलं तर बघायलाच नको . आणि हि किमया प्रत्येका मध्ये होऊ शकते . म्हणजे काही विशेष नाही . म्हणजे ह्या कुंडलिनीच जागरण प्रत्येका मध्ये होऊ शकत . ते झाल्याबरोबर सर्वप्रथम अनुभूती अशी येते कि जेव्हा कुंडलिनी विशुद्धी चक्रावर येते ,हे इथे विशुध्दी चक्र आहे . आज ते आणलेले नाही त्यांनी . कारण पुष्कळदा असं होत कि विवेचन कराया लागलं कि लोकांचं लक्ष त्या विवेचनातच जात . आणि म्हणून ती पुस्तक सुध्दा हि लोक आधी देत नाहीत . म्हणजे असं आहे कि जर दिवा पेटवायचा असला कि नुसतं असं बटन दाबलं कि तुम्ही दिवा पेटवू शकता त्याला काही करायला नको त्याच्या मागे पुष्कळ पूर्वपीठिका असली तरी नुसतं असं बटन लावायचं . पण लोकांना पुष्कळांना अशी हौस असते कि आधी सांगा ती वीज कुठून अली कशी अली . मग आम्ही अंधार घालवायचा . त्याच्या आधी बटन नाही लावणार . म्हणून हे लोक आधी पुस्तक देत नाहीत . पण तरी जेव्हा विशुध्दी चक्राला कुंडलिनी भेदून जाते त्यावेळी आपल्या हातामध्ये अशा चैतन्याच्या लहरी हळू हळू यायला लागतात . असं वर्णन केलेलं आहे सुंदर आदिशंकराचार्यानी सलीलामसलीलाम . आता त्यांची कृपा म्हणजे अशी कि दक्षिणेत गेलं म्हणजे खटकन लोक पार होतात . आदिशंकराचार्यांची कृपा आहे हि . त्यांच्या कृपे मुळे लोक पटकन पार होतात . थंडथंङ असं हातात यायला लागत . हि सगळी कडे जी ऋतुंभरा प्रज्ञा आहे ती सर्वप्रथम हाताला लागायला लागते . मग कुंडलिनी जेव्हा आज्ञाचक्रावर येते तेव्हा निर्विचारिता स्थापित होते . माणूस निर्विचार होतो . आणि जेव्हा ब्रम्हरंध्राला भेदते त्यावेळी तिथून पण थंडथंङ लहरी यायला लागतात . म्हणजे मायनस २७३ डिग्री जे टेम्परेचर आहे ते कुंडलिनीच आहे . ती इतकी थंड आहे . आणि डोक्यातून अगदी गारगार असा वारा येऊ लागतो . पण हि शक्ती आल्या बरोबर आपली सगळी चक्र सुध्दा जागृत होतात . आणि ती चक्र जागृत झाल्यामुळे सर्वप्रथम आपली तंदुरुस्ती ज्याला म्हणतात तब्बेत हि उत्तम होत .

कॅन्सर सारखे रोग सुध्दा यांनी बरे होतात . याचा अर्थ असा नाही कि उद्या सगळे कॅन्सर चे पेशंट तुम्ही माझ्याकडे घेऊन यायचे नाहीत . तुम्हाला मला डॉक्टर करायचं आहे . तुम्ही सगळे डॉक्टर झाला पाहिजे . आता हे मोदी बोलले त्यांनी निदान काहीतरी शंभर तरी कॅन्सर चे पेशंट ठीक केले असतील . पण वाटत का तस ?तुमच्या सारखेच दिसतात . अनेक तऱ्हेचे रोग यांनी ठीक होतात . फक्त काही मेलेलच असेल तर नाही होत बहुतेक . अशा रीतीने कुंडलिनीच जागरण झालं म्हणजे पहिला प्रसाद आपल्याला आपल्या स्वास्थ्याचा मिळतो . कारण हि जी सगळी चक्र आहेत हि सगळी पंचमहाभूत तत्वांनी बनवली आहेत . आणि ते जेव्हा एकदा तत्व जागृत झालं म्हणजे त्या तत्वामुळे आपल्या तब्बेती ज्या आहेत ,स्वास्थ्य जे आहे ते ठीक व्हायला लागत . मानसिक दोष जातात . वेडे लोक ,पछाडलेले लोक ,बाधित लोक ,काहीतरी अजून जादूटोणा ने बाधले ले लोक ठीक होतात . त्यातून ज्यांचं गुरुतत्व बिघडलेलं आहे अशे लोक ,इथे बरीच मंडळी अशी दिसतात कारण माझ्या पोटात खूप दुखू लागलं आहे . अशे लोक ज्याचं गुरुतत्व चुकलेलं आहे त्यांचं गुरुतत्व ठीक होऊन जात . आणि आपल्याला आश्चर्य वाटेल कि ज्यांचं गुरुतत्व चुकलेलं असल तर सगळ्यात मोठं डेंजर म्हणजे त्यांना कॅन्सर सारखा रोग होतो . कॅन्सर हा रोग हमखास होतो ज्यांचं गुरुतत्व चुकलेलं असत . कारण इथे आमच्या पोटात दहा तत्व आहेत गुरुतत्वाची आणि ती डोक्यामध्ये गेली म्हणजे एकादशरुद्र होतात . आणि एकादशरुद्र एकदा जर बिघडलं तर त्याच प्रतिनिधित्व इकडे डोक्यावर होत . आणि हे जर अकरा तुमचे बिघडले तर कॅन्सर ला सुरवात होते . जी काही आपली सात चक्र आहे त ती सगळी आपल्या मेंदूच्या वर ज्याला लिम्बिक एरिया म्हणतात त्याच्या वरती अशी साती चक्र आहेत . तर त्याच निदान ह्या सहस्रारावर लागत . आणि हे जर एकादशरुद्र एकदा बिघडले कि कॅन्सर ला सुरवात झाली असं समजायचं .

आता थोडे दिवसा पूर्वी मी लंडनला एक फार सुंदर शो म्हणा bbc वर दाखवला डॉक्टर लोकांनी ,आणि त्यांनी असं दाखवलं कि कँसर होण्याची परिस्थिती एखादया माणसात जर स्थापित झाली तर त्याला कारण असं आहे कि जर तुमच्यात ओव्हर ऍक्टिवेटी कोणच्याही स्थानाला अली सिम्फथॅटिक नर्व्हस सिस्टम ची तर तयारी होते .साध्या भाषेत सांगायचं म्हणजे आपली डावी आणि उजवी अशा तामसिक आणि राजसिक अशा दोन साईड आहेत . आणि ह्या दोन्ही साईड अशा मध्ये आल्या म्हणजे अशी सुषुम्ना नाडी झाली आणि इकडे जी ती इडा आणि हि पिंगला नाडी झाली . तर आपण जर डावी कडे जास्त गेलो किंवा उजवीकडे जास्त गेलो तर तर हे मधल चक्र मोडत ,आणि हे चक्र मोडल्या मुळे आपली परिस्थिती अशी होते कि त्या चक्रावर कोणाचाही आपल्याला आजार होऊ शकतो . त्या चक्राच्या स्तितीवर अवलंबून आहे . तर अशी परिस्थिती समजा जर कॅन्सर मध्ये असली म्हणजे एखाद्या माणसाचं हे मोडलं गेलेलं आहे म्हणजे मधला भाग आणि त्याची खूप ऍक्टिव्हिटी असली म्हणजे त्याचा संबंध जो एक मधला दंड आहे त्याच्याशी रहात नाही . आणि तो न राहिल्या मुळे माणूस एकाकी होतो . आणि एकाकी राहिल्यामुळे त्याचा एकच सेल वाढू लागतो आणि तोच सेल सगळ्याला खात सुटतो . अशी परिस्थिती जेव्हा सुरवात झाली तेव्हा त्यांचं असं म्हणणं आहे कि हि सुरवात व्हायच्या वेळेला आपल्या मध्ये अशी कोणती तरी अशी जागा बांधलेली आहे ज्याला ते म्हणतात कि विच इज बिल्ट फ्रॉम अवर क्रिएशन . आम्ही त्याला सामूहिक सुप्त चेतना असं म्हणतो ,कलेक्टिव्ह सब कॉन्शस . तिथून कोणी तरी आघात करत . आणि ह्याला ते ५८ प्रोटीन असं म्हणतात . आम्ही त्याला साधं मराठी भाषेत भूत म्हणतो . कारण जे काही झालं ते भूत च आहेत . आणि त्याच्या ऍटॅक शिवाय हे होत नाही . आणि ह्या गुरूंनी हाच प्रकार केलेला आहे . त्याच्या मुळे जर एखादा माणूस अशा स्तीतीला आला त्याला जर गुरूच असलं असेल तर त्याला हे होण्याचा जास्त संभव असतो . हे त्यांनी अगदी स्पष्ट सांगितलं आहे . त्याच्या वरून दिसत कि आम्ही जे दहा बारा वर्षांपासून ओरडतो आहे कि कॅन्सर जर बरा करायचा असेल तर सहजयोगात या . हार्ट जर बर करून घ्यायचं असेल तर सहजयोगात या . तुमच्या डायबिटीज ला ठीक करायचं असेल तर सहजयोग घ्या. तुमच्यात संतुलन नाही म्हणून हे सगळं होत आहे . लोकांना वेड लागत आजारी पडतात हे सगळं निघायला पाहिजे . पण कुणी लक्षात घेत नाही . आणि लक्षात न घेतल्या मुळे आज इतके त्रास आपल्या देशात आहेत . सहजयोगानी इतक्या लोकांना आम्ही बर केलेलं आहे ,म्हंटल तर गरीब लोकांना त्यांच्या जवळ पैसे नव्हते अशा लोकांना ,मध्यमस्तितीच्या लोकांना ,श्रीमंतांना सगळ्या लोकांना सहजयोगाचा फायदा झालेला आहे . पण तरी सुध्दा सहजयोगा मध्ये जमल पाहिजे अशी परिस्तिथी नसते . जर एखाद्या माणसाला आम्ही बर केलं तर तो आणखीन दहा आजारी माणसांना घेऊन येतो . अरे बाबा तू का डॉक्टर होत नाहीस ,तुला मी सांगते कस करायचं ,ते सोपं काम आहे . ते तू कर ना . मला काही आजार ठीक करायचे नाहीत . मला लोकं डॉक्टर करायचं आहे . लोकांना पार करायचं आहे . ते माझं काम आहे . तर तो दहा आणखीन घेऊन येईल . त्या नंतर आणखीन पंचवीस घेऊन येईल . मग म्हंटल नको ,तर माताजी आमचं ऐकतच नाहीत . मग रागवायचं ,पेपरात माझ्या विरुध्द द्यायचं . हा असला प्रकार . म्हणजे सत्यापासून पळण्याचे किती मार्ग आहेत ते बघा . आपल्या देशाला काहीही झालेलं नाही अजून . आपण अजून धर्मात आहोत ,चोऱ्यामाऱ्या करतो कबूल . सरकारच्याच करतो ना देवाच्या तरी अजून एव्हड्या करत नाही अजून . सरकारच्या करतो चोऱ्यामाऱ्या त्याला काही हरकत नाही म्हणा विशेष . पण तेही बरोबर नाही आहे कारण त्यांनी मनशांती रहात नाही . आपण दुसऱ्यांची दुर्दशा करतो त्याने . हे काही चांगल नाही . त्यांनी समाजतल्या किती लोकांना त्रास होतो . लोक जे पैशे बिशे खातात त्यांनी लोकांना किती त्रास होतो . हे काही पुण्यकर्म नव्हे . पण देवाची आपण चोरी करत नाही . म्हणजे देवाचे दागिने असतील तर आपण ते चोरत नाहीत . म्हणजे थोडी भीती आहे देवाची . थोडा बहोत धर्म आहे . धार्मिक आहोत अजून ,अजून आईवडील समजतात . पुष्कळ गोष्टी अजून आपल्या मध्ये अजून आहेत . आपली सामाजिक स्तिती चांगली आहे . इतर लोकांसारखी नाही .

तुम्हाला आश्चर्य वाटेल त्या लंडन शहरामध्ये एका दिवसाला दोन मूल आईबाप ठार मारतात . आणि ती चांगली मूल असतात . नुसतं तिरस्कार ,मला त्याचा द्वेष वाटला . आमच्या लहानपणी मला आठवत असा शब्द जरी तोंडातून निघाला तर आमची आई फाडकन तोंडात द्यायची . द्वेष करण हे पाप आहे . तर अजून आपण संतांच्या कृपेमुळे खूप उच्च दशेला आहोत . या बद्दल शन्का नाही . हे मान्य केलं पाहिजे . पण ह्या दोन स्तितींतून निघून आम्ही स्वतः आत्मा आहोत हि स्तिती स्थापन झाली पाहिजे . मग तुम्हीच तुमचे गुरु होता . आता सहजयोग काही आजची गोष्ट नाही आहे . आपल्याला आठवत असेल जनकाने पण नचिकेतला आत्मसाक्षात्कार दिला होता हजारो वर्षांपूर्वी . इंद्राला सुध्दा दक्षिणेला गेला तेव्हा आत्मसाक्षात्कार घ्यावा लागला होता . अशे आपल्याकडे उल्लेख आहेत . हजारो वर्षांपासून हे आत्मसाक्षात्काराचं कार्य सुरु आहे . पण विशेषतः महाराष्ट्रात नाथपंथीयांनी उत्तमपणाने फार कार्य केलं आहे . पण त्यांची आपण काय दुर्दशा केली हे बघण्या सारखं आहे . परवा मी गेले होते कानिफनाथांच्या समाधीवर आणि ती जागा अशी ते म्हणाले मला कि पाच पाच वर्षाचा इथे दुष्काळ होतो . कस होत हे . म्हंटल तुम्ही त्यांना किती छळलं . मी असं ऐकलं आहे ली तुम्ही त्याना मुसलमान मुसलमान म्हणून शेवटी मारलं आणि इथे शेवटी गाडून टाकलं हे खर आहे ना . हो म्हणाले खर आहे . मग देवाने तुमच्यावरती आणखीन काही फुलांचा वर्षाव करावा असं वाटतंय का तुम्हाला . ज्ञानेशाना छळले ले कोण ,तुकारामांना छळणारे कोण ?,हे आपल्याला पुण्य जुळलेले आहे . या पुण्याची भरपाई कशी करणार . त्या साठी देवाच्या एका गोष्टीवर विश्वास ठेवला पाहिजे कि तो क्षमेचा सागर आहे . काही केलं तरी तो क्षमेचा सागर आहे ,प्रेमाचा तर आहेच पण मुख्य म्हणजे तो क्षमेचा सागर आहे . काहीही पूर्वजन्मात केलेलं असलं तरी तो क्षमा करून तुमची कुंडलिनी जागृत करून देईल . मग आत्मा झालं पाहिजे . आमच्या सहजयोगात आणि त्या सहजयोगात थोडासा फरक आहे . म्हणजे काय म्हणतात त्याला सुधारून वाढवलेली आवृत्ती ती अशी आहे कि मी असा विचार केला जगामध्ये प्रश्न का आहेत लोक असे का वागतात ? पहिल्यांदा हे पाहिलं पाहिजे कि हा प्रकार काय आहे . मग त्याच्या नंतर मी म्हंटल कि सामूहिक चेतना सुरु करायची . आणि याना सामूहिक चेतनेत जर आपण आणलं तर जमल पाहिजे . त्या साठी सुध्दा लोकांमध्ये काय काय प्रश्न आहेत ते पहिले पाहिजेत . चक्रांवरती ध्यान वैगेरे देऊन ,बऱ्याच लोकांच्या भेटीगाठी घेऊन ,आतमध्ये सगळं सूक्ष्मात कळत . तर त्याच्या मध्ये माझ्या लक्षात एक गोष्ट अली कि जर माणसाला म्हंटल तू असं करू नकोस कि झालं ,तो तसच हमखास करणार . त्याला म्हंटल तू दारू पिऊ नकोस कि तो पिणारच . त्याला म्हंटल तस नाही करायचं तर तो ते करणारच . हा माणसाचा स्वभाव आहे . असं जनावरांचा नाही माणसाचाच आहे . मग म्हंटल याला इलाज काय ?जर त्याला काही सांगितलं कि बाबा तू धर्मात ये धर्माचरण कर ,शुद्धता घे तर झालं तो उलटच करणार काहीतरी . असलं काहीतरी त्याला म्हणतात ना लूपहोल असं काढायचं त्यातलं आणि त्यालाच धरून बसायचं . मग त्याला कस करायचं ठीक ?आईच्या द्रीष्टीने विचार करा . आईला नेहमी वाटत कस ठीक करायचं मुलाला ?तर मी असा विचार केला कि यात मुख्य असं तत्व आहे कि माणसाला दुसऱ्याचं ऐकता येत नाही . दुसर्यांनी काही सांगितलेलं ऐकून घेत नाही माणूस . तर त्याच्या मध्ये जर कुंडलिनीच जागरण झालं समजा तर ,कबूल कंदील कितीही घाणेरडा असला तरी त्याच्या मध्ये थोडासा जरी दिवा लागला त्या टिमटिमत्या दिव्याच्या प्रकाशात काहीतरी दिसेलच त्याला . ते दिसल्या बरोबर हे माझ्यात अशी घाण आहे हे कळल्या बरोबर तो सोडेल त्याला . हातात साप दिसल्यावर तो सोडणारच ना . म्हणून ह्या सहजयोगा मध्ये फक्त तुमची आधी जागृती करून घ्यायची मग तुम्ही तुमचं बघा मला सांगायच नाही काही . तुमचं तुम्ही ठीक करायचं ,तुमचं तुमच्या जवळ आहे ते तुम्हाला दिल आता तुम्ही बघा . तुमचे तुम्ही गुरु झाले म्हणजे आमची सुट्टी झाली .

अशी हि पद्धत आम्ही ह्या सहजयोगात काढली आहे . आधी सगळ्यांना पार करून टाकायचं . मग थोडा तरी आनंदाचा अनुभव येतोच . आणि निदान काहीतरी हातात थंड वैगेरे आलं कि आहे काहीतरी असं डोक्यात येत . तेव्हडा डोक्यात एकदा घुसलं म्हणजे माणूस विचार करतो कि होत तरी काय हे . बघावं पुढे . आणि मग त्याला हळू हळू कारण तो सामूहिक चेतनेत जागृत होतो . सामूहिक चेतना त्याला लाभते म्हणजे आपल्यात काय चूक आहे ते कळत . एक गृहस्थ ते पार झाल्यावर म्हणाले माताजी माझं इकडे जळू लागलं आहे . म्हंटल तुम्हाला हार्टट्रबल आहे का . म्हणाले हो . म्हंटल ते च जळतंय बघा . तो आश्चर्यचकित झाला . मी म्हंटल आता हे नीट कस करायचं ते सांगते तुम्हाला चाळून . तुमचा हार्ट ठीक होणार त्यांनी . म्हणजे मी काय आहे माझी चक्र काय आहेत ते दिसलं . म्हणजे तुम्ही आपल्यापासून अलगच होता . तुम्हाला आपलीच चक्र दिसू लागल्याबरोबर तुम्ही ती चक्र नीट करू शकता . स्वतः तुम्ही समर्थ होता . तुम्ही समर्थ झाल्यावर कळत कि माझ्यात हा दोष आलेला आहे . तो दोष तुम्ही ठीक केल्यावर तुम्हाला दुसऱ्याचं समजत मग तुम्ही असं नाही बोलत कि तुझ्यात अहंकार आहे . तर म्हणता कि तुमचं आज्ञा धारलंय . म्हणजे सहजयोगीच मला म्हणतात कि आमचं आज्ञा धरलंय काढा आमचं . म्हणजे मला अहंकार झालाय काढा आमचं . असं कुणी म्हणेल का ?कारण आज्ञा दुखते इथं दुखायला लागत . अहंकार दुखतो मग . नकोरे बाबा तो असं होत .

अशा रीतीने आत्मबोध घडल्या नंतर जे एक व्यष्ठीला मिळत ते समष्ठीला कळत . समष्ठी ज्ञान आपल्यामध्ये येऊन जात . ज्ञान म्हणजे बुद्धीच नाही पण आपल्या नसांमध्ये ते ज्ञान येत . हे कुंडलिनी जागृतीच लक्षण आहे . असे अनेक तऱ्हेचे प्रकार तुम्ही ऐकले असतील पण एकच याला प्रकार आहे म्हणजे कुंडलिनी जागरण दुसरं काहीही नाही . बाकी कुणी काहीही म्हंटल तरी त्याला शास्त्राधार नाही त्याचा काही उपयोग नाही आहे . ते काही जमत नाही ,होण्या सारखं नाही . कधी कधी अशे लोक जे अशा मार्गाला गेले मला त्रास होतो त्यांचा . पण मग मी सांगते त्यांना हात जोडून मला तुम्ही माफ करा आणि तुमचा जो मार्ग तुम्ही अवलंबलेला आहे त्याच मार्गाने जा . पुढल्या जन्मी बघूया . अशी स्तिती असते . कारण ते सोडायला तयार नसतात . चिकटून असतात मग करायचं कस काय . पण ज्यांना अजून सुबुध्दी राहिलेली आहे ज्यांच्यात विवेक आहे त्यांना समजलं पाहिजे कि आम्हाला तुमच्या कडून काहीही घ्यायचं नाही . तुमचे पैसे नकोत काही नको . फक्त तुमचं जे तुमच्या जवळ आहे ,तुमची किल्ली आम्ही द्यायला आलो आहोत . ते नम्र पणे घ्या . त्यात उद्दामपणा केलातर जमायचं नाही . उद्दामपणाला कुंडलिनी उठायची नाही . नम्रपणा पाहिजे तिला . तुमच्या कुंडलिनीला इतकं समजत कि ती तुमची आई आहे साक्षात . तीच तुमची खरी आई . कारण तीच तुम्हाला पुनर्जन्म देते . आणि ती सारखी तुमच्या बरोबर असते . प्रत्येक वेळेला तुम्ही जन्माला आला कि ती तुमच्या बरोबर येते . आणि तुमचं सगळं टेंपरेकॉर्डिंग आहे तिच्या जवळ . काही काही लोकांच्या मात्र कुंडलिन्या पहिल्या कि मात्र बघवत नाही . जस काही मारून टाकलं असेल कुणाला ,जशे अगदी गर्भगळीत . उठता येत नाही तिला अशी जळालेली अशी सुध्दा कुंडलिनी असते . ते बघितलं कि वाटत कि ह्या माणसाला आता कस सांगायचं . उलट तो वाद घालतो माझ्याशी . पण मी वाद घालून पण मला ती कुंडलिनी दिसते मग वाटत तो वाद का घालतो माझ्याशी . एखादा कॅन्सर चा पेशंट यावा आणि डॉक्टर शी वादावादी घालावी तशातली स्तिती .

तेव्हा सगळ्यांनी सुज्ञ पणा धरावा . आणि सुज्ञ पणे हे घ्यावं . जे तुमचं आहे ते तुमच्याजवळ तुम्ही घ्यावं . ह्या ज्ञानाला काही अंत नाही . माझी आता इंग्लिश भाषेतच जवळ जवळ दोन हजार भाषण झाली असतील . मराठी भाषेत चार एक हजार भाषण झाली असतील . हिंदी भाषेत पाच हजार भाषण झाली असतील . तर ह्या सर्व भाषणांच सार एव्हढच आहे कि तुम्हाला समजावून सांगावं लागत . नुसती कुंडलिनी जागरण करून होणार नाही . मुलांना आता मोठी झाली त्यांना आता समजवावं लागत . कि बाबारे हे तुझं आहे ते तुझ्याजवळ घेऊन घे . त्यात आता हयगय करू नकोस . पण त्यात अति शहाणे त्यांचे बैल रिकामे . काहीतरी पेपर मध्ये छापायचं माझ्या विरुद्ध . अहो मी त्यांचं काय वाईट केलय माझ्या विरुध्द काय छापण्या सारखं आहे . पण हे कलियुग आहे ना इथं काहीही होऊ शकत . त्यांना रकाने भरायला काही नसल म्हणजे माझ्या विरुध्द लिहीत असतील . त्यामुळे मी त्यांना क्षमा करते . पण तुम्ही अशा अर्धवट लोकांच्या गोष्टीत येऊ नये . पार झाल्यानंतर त्याच्यावरती उहापोह होऊ शकत नाही . कारण हे काही विचारांनी झालेले नाही . त्याच्या बद्दल काही चर्चा होऊ शकत नाही . त्याच्यावर काहीही होऊ शकत नाही फक्त आपली प्रगती कशी करून घ्यायची ते बघायचं . म्हणजे सुषुम्ना नाडीत असण्या साठी माणसाला वर्तमान काळात असायला पाहिजे . आणि वर्तमान काळात राहण्यासाठी पहिल्यांदा निर्विचारेत यावं लागत . आणि निरविचारेत येण्यासाठी निदान कुंडलिनी आज्ञा चक्रावर असायला लागते . जर त्याला वाद घातलात तर कुंडलिनी कशी राहणार ?जर तुम्ही वाद घातलात तर तुमचं बी रोपल जाईल का ?वादानी कधी बी रोपलेल कुणी पाहिलं आहे का . हि जिवंत क्रिया आहे . परत लक्षात घ्या हि जिवंत क्रिया आहे . हि घटना घडली पाहिजे . आणि ती घडल्या नंतर जस आपण एखाद बी रोपल्या नंतर अंकुरत आणि हळुवार पणे त्याला आपण सांभाळतो तसच आपण त्याला सांभाळावं लागत . आणि हळू हळू त्याला सांभाळता सांभाळता सर्व आपल्याला ज्ञान होऊन जात कि हे काय आहे ,हे कस करायचं ?यावर मेहनत कशी घ्यायची . आणि माणूस सूक्ष्मात वाढत जातो . त्याची खरी संपदा तेव्हा दिसते .

आज सर्व जगाला अत्यंत अनर्थकारी असं काही घडेल अशी भीती आहे . फार अनर्थ घडणार आहे . जर माणूस आज जागृत नाही झाला तर ह्या सर्व जगाचा नाश होणार अशी स्तिती आलेली आहे . आणि लोक शॉक स्तितीत बसलेले आहेत . जरी तुम्ही म्हंटल कि काही होणार नाही तरी ते आहे ते आहे . तेव्हा माणसाला जागृत हे झालच पाहिजे . आपल्या उत्क्रांतिच्या पदावर आज तुम्ही एक मानव स्तीतीला आला आहे ,एका अमिबा पासून मानव झाला आहे ,आता ह्या उत्क्रांतीची पुढची स्तिति गाठलीच पाहिजे . जे हे गाठतील त्यांनाच लाभ होणार . आणि जे गाठणार नाहीत त्यांच्या बद्दल देवाला काळजी नाही . तेव्हा हे गाठून घ्यावं कारण आपण स्वतः देवाच्या साम्राज्यात शिरल्या शिवाय त्याच्या अनुभूतीची किंवा त्याच्या कडून मिळणाऱ्या सौरक्षणाची आपण कशी हमी देऊ शकतो . त्याच्या साम्राज्यात यायला पाहिजे मग बघा . त्याच्या साम्राज्यात आल्यावर मग मला पत्र येतात आम्ही माताजी आनंदाच्या सागरात पोहोत आहोत . आमचे सगळे रोग बरे झाले . आम्हाला काही दुखणी नाहीत . आता आणखीन सहजयोग वाढावा आणि अनेक लोकांना असच हे सुख मिळावं हि एकमेव इच्छा . आता त्यांच्या इच्छेला बघून मी सगळीकडे फिरत असते . आणि पुष्कळ मेहनत करत असते . आता सारखा प्रवास ,भाषण चाललेली आहेत . आपल्या सांगलीला सुध्दा मला असं वाटलं कि कोल्हापूर पेक्षा सांगलीला बर राहील . महालक्ष्मीचं स्थान आहे सगळं बरोबर आहे पण भामट्यांचं राज्य बसलेलं आहे . भामटे बसलेत चारीकडे त्या महालश्मीला . जिथं जाल तिथं तीर्थक्षेत्री सगळे भामटेच बसलेत . नाशकाला गेलं तिथे भामटे ,इथं आलं इथे भामटे . कुठेही जा तीर्थक्षेत्र म्हंटल कि भामटे आलेच . म्हणजे हे अगदी काय आहे ते मला समजत नाही . तिथे भूत बायकांच्या अंगात येतात म्हणे देवी अली आहे . आता हि भूत आहेत हे कस सांगावं . अहो देवी अशी कोणाच्याही अंगात यायला तिला काय वेड लागलय कि काय . अहो देवी म्हणजे काय माहित आहे काय . ?देवी म्हणजे शक्ती आहे जी ने सर्व सृष्टी निर्माण केली . ती अशा काय मूर्ख बायकांच्या अंगात येणार आहे का ?संचार करणार आहे का ?हे कस तुमच्या लक्षात येत नाही . हि तामसिक वृत्ती , मग तिच्या पायावर जायचं ,त्या देवी तिथे खेळवायच्या ,त्या घागरी फुंकायच्या काय वेडेपणा आहे हा देवाच्या नावावरती . तिथे देवी सुध्दा जास्त दिवस बसणार नाही त असं कराय लागलात तर . साक्षात पृथ्वीतत्वानी देवी तिथे महालक्ष्मी बसली आहे ,महालक्ष्मी तत्व म्हणजे तुम्हाला काय वाटलं ,महालश्मी म्हणजे सुषुम्ना नाडी आहे संबंध . आणि तिथे जाऊन तुम्ही म्हणता उदो उदो आंबे ,जिला उदो उदो आंबे म्हणता तीच कुंडलिनी आहे . आता तुम्ही महालक्ष्मीच्या देवळात आंबेच नाव का घेता . कारण महालक्ष्मीच्या क्षेत्रातून त्या म्हणजेच सुषुम्ना नाडीतूनच कुंडलिनी अशी वर निघते . म्हणून म्हणायचं उदो उदो आंबे . महालक्ष्मीच्या देवळात जाऊन म्हणायचं कारण ती महालक्षीमीच्या परिसरातूनच निघणार आहे . तिची केव्हडी कृपा तुमच्यावरती आहे . चारीकडे बघितलं म्हणजे असं वाटत कि इथे महालक्ष्मीचं राज्य पसरलेलं आहे . पण अजून ते डोक्यात आलेलं दिसत नाही .

पुष्कळ असे अनेक प्रकार आहेत ,त्याच्या बद्दल बोलायचं म्हणजे अर्धे लोक उठून जातील इथून कदाचित . म्हणून समजावून सांगितलं . आईला काय जे सत्य आहे ते सांगणार . वाईट वाटून नाही घ्यायचं . तुमच्या हितासाठी हे सांगितलं आहे . जे सत्य ते सांगितलं . शेवटी हितप्रिय करुना . जरी थोडस वाईट वाटलं तरी हरकत नाही पण शेवटी ते प्रिय वाटेल . परवा अशाच एक बाई आल्या होत्या . मला काही माहित नाही त्या आपल्या सुनांना त्रास देतात . तर मी त्यांना म्हंटल कि आता मुलींनी मुळीच हिंदुस्तानात लग्न करू नयेत अशी स्तिती झाली आहे . कारण मुली घरात आल्या कि त्यांना आपण छळायला सुरवात करतो . मला काय माहित ह्या सुनांना छळतात म्हणून . त्यांचे यजमान दोन मिनिटांनी उठून उभे राहिले म्हणाले हे कटुसत्य आहे पण आहे सत्य . आम्ही जातो आता . मग कळलं कि यांच्या घरात असा त्रास आहे . पण त्या नंतर ह्या बाईंनी छळायचं सोडलं . हे कबूल . तेव्हा जे म्हंटल ते शेवटी प्रिय होत . आणि मला त्यांनी मग सांगितलं कि माताजी बर झालं तुम्ही माझे कान उघडले . कारण मी पाप करत होते . आणि तुमच्या सांगण्याने माझं भलं झालं . तर जे आज तुम्हाला करायचं आहे ते जरी थोडस कटू जरी वाटलं तरी ते आईने सांगितलं आहे प्रेमानी सांगितलं आहे आणि भल्यासाठी सांगितलं आहे असं समजून थोडस सूक्ष्म लक्ष दिल पाहिजे त्याच्या कडे तुम्ही अत्यंत जड तऱ्हेने पाहिलं तर तुमच्या लक्षात येणार आहे कि अत्यंत सूक्ष्म स्तिती आहे . आणि सूक्ष्म स्तीतीला उतरलं पाहिजे . आता आम्ही काही संसार सोडलेला नाही आमचे पती तुम्हाला माहित आहे कि फार मोठ्या जागेवर लंडनला नोकरीवर आहेत . त्यांना फार मोठा पगार आहे . श्रीमंत आणि राजघराण्यातले आम्ही आहोत . आम्ही काही संसार सोडून कुठे गेलेलो नाही . पण एव्हढच सांगायचं मला कि त्यांची सर्व बाबतीत मला मदत आहे . त्यांच्या शिवाय मी हे कार्य करू शकले नसते . माझ्या घरच्या ,माहेरच्या सासरच्या सर्व लोकांची मला खूप मदत आहे . आणि त्यांच्या मदती मुळे हे कार्य होतंय . काही संसार सोडायला नको काही वणवण फिरायला नको ,सन्याशाचे ड्रेस घालायला नको काही नको . गृहस्तात राहूनच उलट सहजयोग मिळतो . उलट संन्याशाला आम्ही मुळीच जागृती देत नाही . हे पलायनवाद कशाला . किंवा नुसतं आपलं सर्टिफिकेट द्यायचं कि आम्ही संन्याशी आहे आणि सोवळं करत बसायचं . संन्याशाला कशाला सोवळं लागत . म्हणून हे लक्षात ठेवलं पाहिजे कि जी गोष्ट घटीत होते ती अंतर योगात होते बाह्यतः होत नाही . आणि जी गोष्ट अंतर योगात होते त्याला कुठलाही बाह्य उपकरण लागत नाही . नसती ढोंगबाजी करायची काही गरज नाही . कि कपडे बदलून त्याला दोन रुपयाचा रंग लावून फिरायचं आणि म्हणायचं आम्ही मोठे संन्यासी बाबा झालो .

हा अंतर योग आहे .आणि अंतर योग हा आतमध्ये चालतो . ते आतमध्ये घटीत होत ,सन्याशाचे भाव आहेत ते आटले आहेत ,बाहेरचे नाहीत . जो माणूस संन्याशी असतो तो आतून असतो बाहेरून नाही . आपल्या कडच्या तरुण मुलां कडे सुध्दा आपण लक्ष दिल पाहिजे . आपलं लक्ष नाही ,आजकाल च्या तरुण मुलांना आपण बरोबर व्यवस्थित सांगितलं नाही तर ते परमेश्वराला विसरतील . देवाची सिध्दता त्यांना द्यायला पाहिजे . जर आपण त्यांना देवाची सिध्दता दिली नाही तर ते फार वाईट वागतील . मी पाहिलेलं आहे कि एके ठिकाणी मी गेले होते ह्या तुमच्या सांगलीच्या जवळ इचलकरंजीला तर तिथे एक ग्रुप आलेला ,दारू पिऊन सगळेजण ,पंधरा वीस तरुण मुल अली आणि त्यांनी आमच्याबरोबर जी फॉरेनर्स होती त्यांना मारल . मग अर्थातच पोलिसात त्यांनी वर्दी दिल्यावर पोलिसांनी त्यांना मारलं असेल . पण मी तरी पोलीस कमीशनरला सांगितलं होत काही करू नका .पण हि काय पध्दत झाली . अहो नुसती सोळा सतरा वर्षाची मूल दारू पिऊन तिथे अली आणि मुर्खा सारखे वागले . शोभत का हे ?इचलकरंजीची गोष्ट आहे हि . मग अर्थात पोलीस कमिशनर स्वतः त्यांनी दखल घेतली ,क्षमा मागितली ,पत्र लिहीलं मग पण त्याला काही अर्थ नाही मग . पण दारू अजून पितातच . इचलकरंजीला पैसा आल्याबरोबर दारू सुरु झाली . पैसा हि झेपत नाही ,स्वातंत्र्य हि झेपत नाही काहीच झेपत नाही . सतरा अठरा वर्षाची मुल दारू पिऊन झिंगून असा उत्पात केला त्यांनी . कोण कंट्रोल करणार त्यांना . आणि फॉरेनर्स नि जाऊन काय सांगायचं बाहेर ,अहो हे हि लोक दारू पितात ते म्हणाले आमच्याकडे पण दारू पितात पण असा उत्पात करत नाहीत . हि आज आपल्या मुलांची आज स्तिती आहे . तेव्हा तुम्हाला जर ह्या मुलांना सांभाळायचं असलं त्यांचं आयुष्य काही बर करायचं असेल तर असं करा ,वारणेच्या आपले कोरे साहेब मला म्हणाले माताजी मी यांचं एव्हडं भलं केलं पण हे सगळे वाईट मार्गाला लागले . काय फायदा याना एव्हडी संपत्ती देऊन तरी काय मिळालं मला . मी दुःखात होते म्हणाले तुम्ही संत तुम्ही तरी काही सांगा . आम्ही सांगितल्यावर त्यांनी खुसपट काढायला सुरवात केली . तेव्हा आता आपल्या पुढच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे . इतकच नव्हे तर आपल्या मुलाबाळांच्या प्रगतीचा विचार केला पाहिजे . आपल्या देशाचा विचार केला पाहिजे . विश्वाचा विचार केला पाहिजे . आणि त्या सर्व विचारांमध्ये हे तत्व आपण मिळवलं पाहजे . कारण जो प्रकाश त्या मध्ये देणारे आहात ते तुम्हीच आहात . तुम्हीच दिवाळी करणार आहात . तुम्हीच त्याचे पूज्य आहात . म्हणून सगळ्यांना अत्यंत नम्र विनन्ती आहे कि सगळ्यांनी शांत पानाने आधी आत्मसाक्षात्कार घ्यावा . तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर ते तुम्ही लिहून कळवा ,त्याची उत्तर तुम्हाला पाठवून देऊ . पण आता त्याच्यात आपण वेळ घालवणार नाही . मी बरच लांबलचक लेक्चर दिलय कारण एकंदर परिस्थिती बघून असं वाटलं कि एव्हडं बोलावं लागेल ह्या ठिकाणी . नाहीतर काही जमायचं नाही .

आता ह्याच्यात काहीही क्रिया नाही ,कोणाचेही मंत्र नाहीत ,अक्रियेत बसायचं आहे . ज्यांना कसलाही त्रास असेल किंवा असं वाटत असेल कि आमचं हे चुकलं ,मी फारच पतित आहे असं काही विचार आणायचा नाही मनात . तुम्ही देवाचे मंदिर आहात हे सांगितलं मी आधीच सांगितलं . आणि त्यात तुमचा दिवा फक्त लावायचा आहे एव्हढच . तेव्हा आपल्यातली कमीपणाची भावना काढून टाका . दुसरं म्हणजे सगळ्यांनी टोप्या काढून ठेवा . कारण ब्रम्हरंध्र छेदायच आहे . बायकांनी पदर घेतलतर हरकत नाही . आणि आई समोर काहीच औपचारिकता नसते ना .

सायनस चा त्रास आहे काही काही लोकांना ,काही काही लोकांचं गुरुतत्व बिघडलेलं आहे . काही असलं तरी प्रयत्न केला पाहिजे . आता डावाहात माझ्याकडे असा करा . आता हि महाकालीची इच्छाशक्ती आहे हे मी तुम्हाला सांगितलं आहे . आणि उजवा हात गणपतीला स्मरण करून हा असा जमिनीवर स्पर्श करून ठेवायचा आहे . आता मना मध्ये फक्त इच्छा करायची कि आई मला आत्मसाक्षात्कार हवा . आता सगळे जण डोळे मिटून घ्या . डोळे अजिबात नाही उघडायचे . जर डोळे उघडले तर कुंडलिनी चढणार नाही . कारण हा अंतर योग आहे . आता डाव्या हातात गारगार वाटायला लागल्या नंतर मग उजवाहात माझ्याकडे करायचा आणि डावाहात असा मागच्या बाजूने आकाशाकडे करायचा . नंतर मी सांगेन तेव्हा . त्याच्या नंतर डोक्यावर ,टाळूवर असा हात फिरवायचा तर तुमच्या लक्षात येईल कि इथून असं गारगार येत आहे . झालं ,हि सुरवात आहे . म्हणायचं कि कुंडलिनी जागृत झाली अंकुरली . पण ती एक सूक्ष्म आहे अत्यंत एखादा लहानसा केसा सारखा भाग तिचा वर आलेला आहे . आणि त्याच हि सुरवात आहे . त्याच्यात पुढे साधना करून वाढ करावी लागते .

Sadoli Khalsa (India)

Loading map...