Public Program

Public Program 1985-01-27

Location
Talk duration
42'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

27 जानेवारी 1985

Public Program

Akluj (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

यशवंत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष आणि इतर संचालक वर्ग ह्या तालुक्यात राहणारी सर्व साधक मंडळी अबालवृद्ध सर्व भक्त मंडळांना तसेच अत्यंत सुंदर स्वरात भजन गाणाऱ्या ह्या सर्व भजन मंडळींना आमचा नमस्कार असो . सर्व प्रथम फार उशीर झाला आपल्याला वाट पाहावी लागली याच मला फार वाईट वाटत . त्या बद्दल मी क्षमा मागते सर्वांची . पण जे व्हायचं असत जी वेळ योगायोगाची असते त्या वेळेस ते कार्य घडत . असं मानून तुम्ही सर्वानी मला क्षमा करावी . ह्या कारखान्याचे दिग्दर्शन झाल्या पासून मला फार ह्या देशा बद्दल आशा वाटू लागली आहे . कारण आपल्या देशाची आर्थिक परिस्थिती खरोखरच फार हालाकीची आहे . आणि जरी थोड्या जागी हि परिस्थिती सुधारली आहे तरी सर्व देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात अजून पुष्कळ स्तिती सुधारायची आहे . पण तरी सुद्धा अशा संस्था निघाल्या मुळे आर्थिक परिस्थिती हि सुधारू शकते आणि त्यांनी सुधारून इथे नंदनवन उभं केलं आहे हे पाहून मला खरोखर फार आनंद झाला . पण हे लक्षात ठेवलं पाहिजे कि नुसती आर्थिक परिस्थिती सुधारून सगळं ठीक होत नाही . आम्ही परदेशात फिरत असतो आणि माझ्या बरोबर चौदा देशातले परदेशी पाहुणे इथे आलेले आहेत . अर्थात ते इथे नाहीत साताऱ्याला सरळ गेले ,पुढल्या वेळेस त्यांना इथे घेऊन येईन . त्या लोकांना पाहिल्यावर हि गोष्ट लक्षात येते कि आर्थिक परिस्थिती जरा ठीक झाली तर माणूस वाईट मार्गाला लागतो . त्याच लक्ष मग अशा मार्गावर जात कि जिथून त्याच पतन सुरु होत . ह्या देशांची स्तिथी जरी वरून चांगली दिसते कारण यांच्या जवळ चांगली घर आहेत ,मोटारी आहेत ,सगळी व्यवस्था आहे दळणवळणाची ,काही अशे हालअपेष्टा नाहीत. पण तरीसुद्धा यांच्या मनाच्या स्तितीला पाहिलं म्हणजे असं वाटत कि त्या हालअपेष्टा परवडल्या पण मनाची स्तिती अशी नको . आणि मुल आणि वडील आठ दहा वर्ष सुध्दा बरोबर राहू शकत नाहीत . सगळे ए

कमेकांना सोडून निघून जातात आणि शेवटी अनाथालयातच सगळं आपलं आयुष्य काढत असतात .

तिथल्या तरुण मुलांना पाहिलं तर ते आत्महत्येचाच विचार करत असतात . कि कशी आत्महत्या करायची . दुसरं तिथल्या लोकां मध्ये एक विशेषतः अमेरिकेत ,डेन्मार्क मध्ये अत्यंत क्रोधीपणा आलेला आहे . आणि त्या देशामध्ये लोक मारधाड करत आहेत ,खून करत आहेत . चोऱ्यामाऱ्या सुध्दा आता सुरु झालेल्या आहेत . काही देशां मध्ये तर इतकी परिस्थिती खराब आहे कि तुम्ही डोळे उघडून चालू शकत नाही . अत्यंत अश्लील ,घाणेरडे प्रकार ,अधर्मी प्रकार त्याच्यामध्ये आई बहिणीचा सुध्दा विचार नाही अशे प्रकार ते लोक करतात . ते पाहिल्यावर आपल्याला असं वाटत कि आपला देश अजून धर्मात बसलेला आहे . अजून आपल्याला देवाची आवड आहे ,देवाकडे आपलं लक्ष आहे आणि आपण अजून आपल्या जुन्या परंपरेला मानतो . हे सगळं बघण्यासाठी हि परदेशी पाहुणे इथे आलेत आणि त्यांना फार दुःख होत कि आम्ही सन्मार्गापासून किती चुत झालोत ,किती पडलो आणि कुठल्या कुठे पोहोचलो . तेव्हा आपल्याला जे वाटत कि नुसती आर्थिक परिस्थिती ठीक झाली म्हणजे आपलं भलं होईल हि गोष्ट खोटी आहे . त्यासाठी एक आत्मबल असायला पाहिजे ,ते च इथे बघून कि आपण शंकरपार्वतीच इतकं सुंदर देऊळ बांधलं . देवाकडे लोकांचं लक्ष असलं पाहिजे . कितीही ऐश्वर्य असलं तरी शंकरा कडे लक्ष असलं पाहिजे हे बघून मला फार आनंद झाला . शंकर म्हणजे साक्षात आपल्यामध्ये असलेला आत्मा आहे . तो आपल्या हृदयात असतो . हे परमेश्वरच ,सदाशिवाचं आपल्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब हा शंकर आपल्या हृदयात असतो . त्याला जागृत करायला कुंडलिनी पहिल्यांदा जागृत करायला पाहिजे . तो तसाच साक्षी रूपाने आपल्याला बघत असतो . आपण कोणच कार्य करतो वाईट करतो चांगलं करतो ,त्याच्या कडे त्याच लक्ष असत . जो पर्यंत आपल्याला आत्मबल मिळत नाही ,आत्म्याचा प्रकाश आपल्या चित्तात येत नाही तो पर्यंत चांगलं काय आणि वाईट काय हेही आपल्याला कळत नाही .

श्रीकृष्णाने सांगितलं आहे कि तीन तऱ्हेचे लोक ह्या संसारात असतात . तीनच जाती त्यानं सांगितल्या ,तामसिक ,राजसिक आणि सात्विक . तामसिक म्हणजे जे कि चुकीच्या गोष्टींच्या भोवती फिरून आपलं आयुष्य व्यर्थ घालवतात . एखादी रूढी जी चुकीची असो तरीसुध्दा त्याच्या साठी आपलं संबंध आयुष्य व्यर्थ घालवायचं . हे तामसिक लक्षण आहे . जस एखाद्या बैलाला घाण्याला जुंपायच असेल तर आपण झापड घालतो तशीच ह्या लोकांची स्तिती असते . आणि ते हाही विचार करत नाहीत कि ती गोष्ट आपल्या साठी ठीक आहे कि नाही किंवा हि हितकारी आहे किंवा नाही किंवा याचा आपल्याला आत्मउन्नती साठी काही फायदा होईल कि नाही . अशा या रुढीगत काही गोष्टी आहेत त्या वाढत गेल्या म्हणजे त्याच्या मध्ये वैमनस्य ,भाऊबंदकी ,भांडाभांडी आणि असंतुष्टता यायला लागते . पण जर माणसाने लक्ष दिल कि ह्या रूढीने आपल्याला आज पर्यंत काही मिळालं नाही तेव्हा ह्या रूढी समजून घेतल्या पाहिजेत आणि ज्या खऱ्या रूढी आहेत ,ज्या खऱ्या परंपरा आहेत ज्यांनी आपली उन्नती होईल ,ज्यांनी आपली उत्क्रांती होईल ज्यांनी आम्ही आत्म्याला प्राप्त होऊ अशा वस्तूच आम्ही घेणार ,अशाच ज्या रूढी आहेत त्यांनाच आम्ही मानणार असा विचार केला तर पहिल्यांदा परत आपण त्याच्यावरच येऊ कि आपल्याला आत्म्याचं बळ मिळालं पाहिजे . तो शंकर जो आपल्या मध्ये बसला आहे त्याचा योग ह्या कुंडलिनीशी झाला पाहिजे . आणि हि कुंडलिनी जी आपल्यामध्ये साडेतीन वेटोळे घालून आपल्यामध्ये बसली आहे ती स्वतः आदिशक्तीचे प्रतिबिंब आहे . तेव्हा ह्या आदिशक्तीचे आणि सदाशिवाचं टाळूवर जेव्हा मिलन होत त्यालाच आपण योग असं म्हणतो . हा जेव्हा योग घडतो जेव्हा हि कुंडलिनी ह्या सदाशिवला जाऊन टाळूवर स्पर्श करते तेव्हाच आपल्या हृदयात असलेला आत्मा जागृत होतो आणि तो आपल्या नसानसातून व्हायला लागतो आणि अशा रीतीने चैतन्य वाहू लागत . हे चैतन्य मिळवलं पाहिजे असं सगळ्यांनी सांगितलं विशेष करून नाथपंथीयांनी यावर फार मेहनत घेतली आहे . तुकारामांनी सांगितलं आहे ,ज्ञानेशांनी तर फार स्पष्टपणे सांगितलं आहे . इतर कोणत्याही धर्मशास्त्रात हेच सांगितलं आहे कि आपल्याला हे विद झालं पाहिजे . आत्मज्ञान हे विद झालं पाहिजे . विद पासूनच वेद हा शब्द निघाला म्हणजे आपल्या नसानसांना हे ज्ञान झालं पाहिजे . असं नाही कि आम्ही आत्मसाक्षात्कारी आहोत असं म्हणून चालायचं नाही . हि एक घटना आहे . हि घटना जो पर्यंत आपल्यात घटीत होत नाही ,जो पर्यंत कुंडलिनीच जागरण होत नाही तो पर्यंत आत्म्याचा तुमच्या मध्ये प्रकाश येणार नाही . पण सहावा अध्याय वाचायचा नाही असं सांगितलं तर तो आपण वाचतच नाही . का वाचायचा नाही असा आपण प्रश्न केला पाहिजे . का तो सहावा अध्याय वाचायचा नाही कारण तो सगळ्यांना झेपत नाही ,कुणालाही कुंडलिनीच जागरण करता येत नाही म्हणून बाकीचं तुम्ही वाचत राहा आणि जे खर आहे ते वाचू नका . तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे कि आता आपल्याला आत्मबल मिळालं पाहिजे . त्याच्या साठी जो सुषुम्ना पथ आहे तो श्रीलक्ष्मी नारायणाचा पथ आहे . आणि सुषुम्ना पथ साठीच आपण विष्णूच भजन म्हणतो . किंवा इथे आपल्याकडे पांडुरंगाचं म्हणतो . पांडुरंग हाच त्याचा मार्ग आहे . हाच त्याचा सोपान आहे . आपण म्हणू कि इकडून तिकडे जाण्याचा जो काही अत्यंत सुंदर असा सुषुम्ना मार्ग आहे तो श्री पांडुरंगानी च बनवलेला आहे . म्हणून आपण पांडुरंगाला म्हणतो कि बाबा तू माझी मदत कर ,तू धावून ये . आणि त्यांनी अनेकदा ह्या जगामध्ये अवतार घेतला आणि लोकांना सांगितलं कि तुम्ही कशा रीतीने वागलं पाहिजे . कारण तो धर्म सांगतो त्यांनी सांगितलं हा धर्म नाही हा धर्म आहे तो सोडा . प्रत्येक वेळेला धर्म काय आहे ते सांगून त्यांनी शिकवण दिली कि ह्या धर्माने तुम्ही राहा .

तिसरे धर्माचे पोषक म्हणजे गुरु लोक . पण सदगुरू आणि अगुरु असे दोन प्रकार तुकारामांनी फारच स्पष्ट रूपाने मांडल्या आहेत . पण सगळ्यात जास्त म्हणजे आपले रामदास स्वामी नि सांगितलेलं आहे . ते म्हणतात ,"महिषा मर्दिला चंदने "एका महिषाला घेतलं आणि त्याला चंदनाने मळवून टाकलं आणि म्हणे हा झाला गुरु . अशी आपली जी परिस्थिती जी झाली आहे त्याच्यावर सगळ्या संतसाधुनी अत्यंत काळजीपूर्वक लिहिलेलं आहे ,अशा अगुरु कडे जाऊ नये . अशा अगुरु वरती कितीतरी त्यांची व्याख्याने आहेत ,प्रवचने आहेत . सगळंकाही असताना सुध्दा आपल्याला अजून अ गुरु आणि सदगुरू अजून ओळखता येत नाही .

पहिली ओळख सदगुरूंची हि आहे कि तो तुमच्या कडून एकही पैसा घेणार नाही . तुम्ही त्याला विकत घेऊ शकणार नाही . त्याला तुम्ही जर विकत घेऊ शकले तर तो तुमचा गुलाम होईल . तुम्ही भाजी ,कपडे विकत घेऊ शकता पण तुम्ही गुरूला विकत घेऊ शकत नाही . आणि त्या गुरूच जर पैशाकडे जर इतकं लक्ष आहे तर तो मुळीच अध्यात्मिक गुरु नाही . त्याच लक्ष फक्त तुमच्या आत्म्याकडे असलं पाहिजे . आणि सारखा हा विचार असला पाहिजे कि ह्याला परमेश्वरी साक्षात्कार कसा देऊ . दुसरा कोणताही विचार करणार नाही तो खरा गुरु होय . हि पहिली ओळख तुम्ही गुरु बद्दल बांधून ठेवा . आणि हि गोष्ट अगदी खरी आहे कि हि क्रिया जिवंत क्रिया आहे . आणि कोणत्याही जिवंत कार्याला आपल्याला पैसे द्यावे लागत नाही . म्हणजे जफ तुम्हाला जर एक बी रोपायच असल तर तुम्ही काय या जमिनीला पैसे देता . तिला समजत का पैसे वैगेरे काय ते ?. तसच त्या परमेश्वराला तुमचे माणसाचे पैसे काही समजत नाहीत . पण आपल्या खेडेगावात या बाबतीत इतकं अज्ञान आहे कि आता मी कुठे खेडेगावात गेले कि ते निदान पाच पैसे मला देतात . अरे माताजी पैसे घेत नाहीत ,मग दहा पैसे घ्या नाहीतर पंचवीस पैसे घ्या . त्यांना हे समजतच नाही कि कोणत्याही साधुसंताना किंवा परमेश्वराला पैसे समजत नाहीत . पहिली गोष्ट हि लक्षात ठेवली पाहिजे कि संत तो कि जो पैशाला हात लावत नाही . तुकाराम महाराजांचच उदाहरण घ्या ,शिवाजी महाराजांनी त्यांच्या बायकोला एव्हडे दागिने पाठवले पण तिच्या अंगावरती एकसुद्धा दागिना नाही . शिवाजी महाराज स्वतः आत्मसाक्षात्कारी होते ,त्यांनी पाठवले एव्हडे दागिने मग घ्यायला काय हरकत आहे ?पण त्यानी ते सगळे परत करून दिले . काय करायचं आपल्याला दुसऱ्याचं घ्यायचं ,राहूंदेत ते . पण दुसऱ्यांवर उपकार करण्यासाठी मात्र नेहमी हपापलेले असत . तेव्हा हि गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे कि आपल्या साधुसंतांनी जी एव्हडी मेहनत केली , जी आपल्या साठी एव्हडी भजन लिहून ठेवली त्यांचा आपण विचार केला पाहिजे .

पण नुसती भजन म्हणत गेले म्हणजे परमेश्वर मिळणार नाही . नुसतं रामराम म्हंटल तर राम मिळणार नाही . कारण काय आहे कि रामाला मिळवण्या साठी तुमच्या मध्ये काय स्तिती असायला पाहिजे ते पाहिलं पाहिजे . सर्वप्रथम जो पर्यंत कुंडलिनीच जागरण झालं नाही तुमचा देवाशी संबंधच झाला नाही . मग राम कसा मिळणार ?. आता समजा हा माईक आहे हीच जर संबंध विजेशी झाला नाही तर मी यावर बोलते आहे ते तुम्हाला ऐकू येईल का ?नाही येणार . किंवा आपण टेलिफोन करतो त्याच्यात जर कनेक्शन नसेल तर बोलता येईल का ?तर आधी अनन्य भक्ती साधली पाहिजे ,अनन्य म्हणजे दुसरा कोणी राहिला नाही . देवाशी तुम्ही एकाकार झाले ,त्या एककारितेत जे तुम्ही गाल ते मान्य . पण असं होत कधी कधी कि साक्षात परमेश्वर येऊन उभा राहिला तरी तुम्हाला त्याची ओळख पटायची नाही . तुलसीदासां सारखं "चित्रकूट के घाट पर भै संतन कि भीड ,तुलसीदास चंदन घीसे ,तिलक करत रघुवीर ",आणि त्या रघुवीर ला हि तिलक लावल ,तुला लावतो तुला लावतो जा पुढे ,राम हि गेले पुढे तिलक लावून . अशी परिस्तिथी येऊन जाते . म्हणून ओळख पटण्यासाठी पहिल्यांदा आत्म्याचे डोळे उघडले पाहिजेत . मग हे काही माझं असं नाही आहे . तुझं आहे तुझं पाशी ते तुम्हाला द्यायचं आहे . हे सगळं तुमचं स्वतःच आहे ,कुंडलिनी तुमच्यात आहे ,आत्मा तुमच्यात आहे . कुंडलिनीच्या जागरणाला मला काही करावं लागत नाही . काही मेहनत मी करत नाही . एक पेटलेला दिवा दुसऱ्या दिव्याला पेटवायचा फक्त सहजच त्यात काही मेहनत नाही . हि पृथ्वी आहे तिला तुम्ही देता का काही देत नाही . नुसतं असं बी पेरल म्हणजे असं सहजच उगवत ,अशी हि जिवंत क्रिया आहे . आता माणूस अशा स्टिस्टीला आलेला आहे कि अनेक हजारो लोकांना आत्मबल मिळाले पाहिजे . ,आत्म्याचं ज्ञान मिळालं पाहिजे ,आत्मबोध झाला पाहिजे ,आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे . अशी हि वेळ आलेली आहे . विशेष वेळ आहे हि . जस बघा झाडाला दोनचार फुल येतात अजून एखाद फुल येईल मग हळू हळू बहर आला म्हणजे मग बघा मग हजारो फुल आणि फळ येतात . तेव्हा कठीण असं काहीच नाही . वेळ यायला पाहिजे ती वेळ अली कि मग हे कार्य होईल . तुमच्यातच कुंडलिनी आहे तुमच्यातच आत्मा आहे आणि मी नुसतं निमित्त मात्र आहे सध्या नंतर तुम्ही निमित्त व्हाल . एक दिवा पेटवला कि दुसरा दिवा पेटतो पण तो दिवा सुद्धा दुसऱ्याला पेटवू शकतो .

पण कुंडलिनीच्या जागरणाने काय होत ?तर कुंडलिनीच्या जागरणाने आत्म्याचं तत्व आपल्यात येत आणि सर्वप्रथम हि जी सर्व सृष्टीला व्यापणारी परमेश्वराची प्रेमशक्ती आहे त्याला आपण ऋतुंभरा असं म्हणतो किंवा जिला अनेक नावानी लोक ओळखतात . तिला आपण ब्राम्हशक्ती असं पण म्हणतो ती शक्ती आपल्या हातातून पहिल्यांदा वाहायला लागते . त्याच्या आधी ती आहे हि माहित नाही ,आपण रोज बघतो हि झाडाची पान मग ती वाढतात मग त्याची फुल येतात मग त्याला फळ येतात हे रोज बघतो . पण हे कस होत हे आपल्याला माहित नाही . सायन्स सुध्दा सांगू शकणार नाही कि तुम्ही जरी बी रोवलं तर त्याला अंकुर कसे येतात ते . हे कस घडत ?हे कोणी सांगू शकत नाही . कारण हि जिवंत क्रिया आहे . कोणतीही जिवंत क्रिया माणसाला समजत नाही . त्या साठी त्याला आत्म्याचे डोळे पाहिजेत आणि जेव्हा त्याला आत्म्याचा साक्षात्कार मिळतो तेव्हा तुम्हाला आश्चर्य वाटेल कि तो एकदमच दुसऱ्या परीस्तीतीला जाऊन पोहोचतो . त्याचा एक नवा मानव तयार होतो . त्या माणसाला असं सांगावं लागत नाही कि तुम्ही धर्म करा . कारण तुमच्यात सर्वप्रथम धर्मच जागृत होतो . जस संतसाधुना सांगावं लागायचं नाही कि तुम्ही धर्म करा . ते धर्मातच जागृत असायचे . तसा आपोआपच धर्म तुमच्यात येतो . आणि त्या धर्मात तुम्ही गौरवाने उभे राहता . तुमच्या मध्ये जे गुण आहेत त्या सदगुणांना प्रकाश मिळून त्या गौरवात तुम्ही उभे राहता . पण सर्वप्रथम तुमची तब्बेत ठीक होते . कँसर यांनी ठीक होतो ,अनेक रोग यांनी ठीक होतात . पण याचा अर्थ असा नाही कि सर्व गावचे कँसर तुम्ही घेऊन या किंवा सर्व गावचे रोग तुम्ही घेऊन या . सर्व गावचे आजार घेऊन या . तुम्ही स्वतः डॉक्टर होऊ शकता . त्याला काही डॉक्टर कडे जायला नको काही नको . तुमच्या हातात एकदा हि शक्ती आली कि तुम्ही कुणाला हात लावला कि ते ठीक होऊन जातील . तुम्ही ऐकलं असेल साईनाथांनी कितीतरी लोकांना बर केलं . ते काही डॉक्टरी पास केले होते . ती त्यांच्या मध्ये शक्ती होती . हि शक्ती तुमच्या मध्ये आल्यानंतर तुम्ही अनेक लोकांना ठीक करू शकता . पण सर्वप्रथम तुम्ही स्वतः ठीक होता . मानसिक स्तिती ठीक होते पूर्णपणे . सांपत्तिक स्तिती ठीक होते . कारण लक्ष्मी तत्व जागृत झालं म्हणजे सांपत्तिक स्तिती सुध्दा ठीक होते . आपण नुसते पैसे याला कधीही लक्ष्मी समजलं नाही पाहिजे . लक्ष्मी च स्वरूप इतकं सुंदर बनवलेलं आहे ज्यांनी हे स्वरूप बनवलेलं आहे ते द्रष्टे होते . ती नुसती कमळावर उभी आहे . म्हणजे काय कि तिला काहीही जागा मिळाली तिथे ती उठून उभी राहिली . आणि सुरभीत आहे ,त्या कमळावर उभी आणि सुरभीत आहे . तिच्यात सौष्ठव आहे . आणि तिच्या हातात दोन कमळ आहेत . जो माणूस लक्ष्मी पती असेल त्याच कस राहणं वागणं कमळा सारखं सुंदर असायला पाहिजे . इतकाच नव्हे पण त्या कमळामध्ये एखादा भुंगा आला ,त्याला काटे असले तरी तो त्यात येऊन व्यवस्तिथ झोपला तरी कमळ त्याला व्यवस्तीत आपल्यामध्ये घेते . तशेच प्रेमळ व्यक्ती असेल त्यालाच लक्ष्मीपती म्हणता येईल . ज्याच्या मध्ये हा प्रेमाचा गाभा नसेल ,कसाही माणूस आपल्या दाराशी आला तरी त्याला आत मध्ये घेता येईल तोच लक्ष्मीपती असतो . दुसरं आपण बघितलं कि तिचा एक हात आशीर्वाद देत असतो तर दुसरा दान देत असतो . म्हणजे लक्ष्मीपती माणसाला दान देण्याची सवय असली पाहिजे . जर त्याला दान देता आलं नाही तर तो लक्ष्मीपती नाही होत . जर तो फक्त आपल्या कुटुंबियांसाठीच पैसे गोळा करतो तर तो लक्ष्मीपती नाही . जर त्याच्या हातातून दुसऱ्यांसाठी पैसे वहात असले तर तो लक्ष्मीपती . आता आपण बघितलेल आहे कि लोकांची दान करण्याची पद्धत सुध्दा अशी आहे कि दान दिल ,म्हणजे आम्ही दान दिल म्हणून त्याला गर्व होतो . पण जो खरा दानी असतो त्याला पर्वाच नसते कि काय दान दिल आणि काय नाही त्याची . आम्ही अशे लोक पाहिलेले आहेत कि जेव्हा ते दान देतात तेव्हा त्यांच्या लक्षात सुध्दा येत नाही कि काय दान दिल आणि काय नाही ते . पण आता तुमच्या हि भागात अशे लोक यावेत त्यांनी असच दान कुणी आला देऊन टाकावं . झालं ,माझं कसलं होत ,जे त्याच होत ते देऊन टाकलं त्याला झालं . संपलं . तसच आत्मबल आल्यानंतर होत .

कुणी म्हणतात माताजी तुम्ही आम्हाला बर केलत ,हे झालं ,ते झालं. मला मोठं आश्चर्य वाटत . मी तर काही केलं नाही ,मी तर चुपचाप बसलेली आहे . तुम्ही बरे झाले मग मी काय करू . मी काही दिल नाही आणि घेतलं नाही . मग तुम्ही कशाला त्याचे उपकार मला सांगता . दुसरा कोण आहे ,अहो माझंच बोट दुखायला लागली आणि मी जर असं चोळून काढलं तर काय मी माझ्या बोटांवर उपकार करते आहे का ?. किंवा बोटाला असं वाटेल का कि यांनी माझ्यावर उपकार केले . दुसरा कोणीच नाही तर उपकार कुणावर करणार . तेव्हा हा जो विचार आहे हा फक्त जेव्हा तुमच्यात आत्म्याचा प्रकाश येईल तेव्हाच कळेल . त्यावेळी तुमच्या मध्ये सामूहिक चेतना जागृत होईल . कुणी दुसरा आहे असं वाटतच नाही . तो आपल्याच शरीरात आहे असं वाटत . ह्या प्रेमाच्या भागाला अजून आपण हात घातलेला नाही . आतापर्यंत जे काही आपण बांधलेलं आहे ,काहीही बांधतात ते नुसतं द्वेषाने . मुसलमान वाईट म्हणून हिंदूंची संघटना करायची ,हिंदू वाईट म्हणून मुसलमानांची संघटना करायची . म्हणजे काय सगळा द्वेष . अहो परमेश्वराने फक्त एकच सृष्टी रचली ,हे आपण भांडण कादंगली आहेत . भांडणाचं काहीच कारण नाही ,आपण सगळेजण त्या परमेश्वराच्या शरीरात अंगप्रत्यंग आहोत . आता ह्या बोटानी ह्या बोटाशी भांडण करावं असं दिसतंय . आमच्या सारख्या माणसाला हे समजत नाही कि ह्यात भांडणाला कारण काय ?. तत्त्वता सर्व धर्म एक आहेत . तत्वतः सगळे जे मोठमोठाले अवतार झाले ते सर्व एक आहेत . सगळ्यांचं आपापसात नातं आहे . फक्त आपणच इकडे वेड्यासारखे भांडत आहोत . त्याला कारण असं आहे कि एका झाडावर खरी फुल आली ,आणि जी जिवंत फुल आहेत ती आपण उपटली आणि म्हंटल हे माझं आहे हे माझं आहे . ती मेलेली फुल त्या साठी आपण भांडतो आहोत . भांडण्या सारखं काही नाही तत्वतः सगळी आपण एकच आहोत . लहान मुलगा असला तर तो हसतोय तसाच रडतोय तसाच . म्हातारा झाला तरी तसाच . तुम्ही कधी पाहिलं आहे कुणी हसल्या सारखा रडतो आणि रडल्या सारखा हसतो . जगात तुम्ही कुठेही फिरून बघा तीच पद्धत आहे ,सार शरीर तसच आहे . आपल्या शरीरातले नसा सर्व काही तसच आहे . फक्त कुणी टोपी घालतो तर कुणी फेटा बांधतो तर कुणी मंगळसूत्र घालत कुणी काही मणी घालतात . म्हणून काय झालं हे सगळं बाह्यतः आहे . त्यांनी तुमच्यात काही फरक होत नाही . आपण अशे कप्पे करून करून आपापसात भांडतो आहोत . असं कुणी जनावर सुध्दा भांडत नाहीत इतके आपण भांडतो . हे बघून मला मोठं आश्चर्य वाटत कि सगळ्यांना ज्या परमेश्वराने बनवलं त्याला काय वाटत असेल ?हि मुल इतकी का भांडतात ?नसती भांडण घेऊन काहीतरी कारण घेऊन भांडायचं हे बरोबर नाही . पण हे सांगून होणार नाही . मी म्हंटल तर मुळीच होणार नाही . पण जेव्हा तुमच्यात आत्म्याचं बळ येईल ,जेव्हा तुमच्यात आत्मा जागृत होईल तेव्हा आश्चर्य वाटेल तुम्हाला कि सगळ्या मध्ये एकच आत्मा असताना आपण एकदुसऱ्याशी का भांडत आहोत . हि परिस्तिथी एकदा अली कि तुमच्या मध्ये समाधान येईल . नंतर लक्ष्मीचा जो चौथा हात आहे त्याला आश्रय आहे . आश्रय म्हणजे असं कि कुणी माणूस तुमच्याकडे आला आश्रयाला आला तर त्याला आसरा द्या . तोच लक्ष्मीपती आहे अशी उदाहरण दिलेली आहेत .

तसच सरस्वतीचं सुध्दा अत्यंत सुंदर त्यांनी वर्णन केलेलं आहे कि जो सरस्वतीचा भक्त असेल त्याला गाण हे आलं पाहिजे . म्हणजे वीणेवर बसलं पाहिजे . आता बहुतेक जेव्हडे मोठमोठे शिकलेले जेव्हडे म्हणून इन्टलेक्चुअल्स आहेत त्यांना संगीत किंवा गाणं कशाशी खातात हे माहित नाही . मला आश्चर्य वाटत कि हि सगळी शिकून शिकून इतकी निरस होऊन जातात कि ते रंगुचं शकत नाहीत . काहीही तुम्ही म्हणा भजन म्हणा नाहीतर अजून काही सगळं त्यांच्या डोक्यावरून जात . ते कंटाळून जातात . ते पुस्तकी ज्ञानात इतके फसलेले असतात कि ते कविता म्हणून वाचतील पण तेच इतर कुणी सुरात म्हंटल तर त्याना नको असत . म्हणजे काय कि माणूस निरस होऊन जातो . जो एक सरस्वतीचा भक्त आहे त्याला नाद ताल यायलाच पाहिजेत . जर त्याला यातलं काही येत नसेल तर तो सरस्वतीचा भक्त नव्हे . तसेच त्याच्या एका हातात पुस्तक असलं पाहिजे . म्हणजे जे पुस्तक त्याच्या हातात आहे त्या पुस्तकाचं त्याला ज्ञान असलं पाहिजे . उगीचच खोटा दांभिकपणा नाही असला पाहिजे . आणि हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलेलं नाही दुसऱ्यांनी लिहिलेलं आहे याची जाणीव असायला पाहिजे . पुष्कळशे लोक गीतेवर बोलायला लागले कि त्यांना वाटत कि ते स्वतः च व्यासमुनी झाले . तर असं नाही व्हायला पाहिजे . आणि एका हातात माळ असते . कारण असा माणूस विरक्त असला पाहिजे . त्याच लक्ष परमेश्वराकडे असलं पाहिजे . नामदेवांनी एक अत्यंत सुंदर अशी कविता लिहिलेली आहे ,ती कविता नानक साहेबानी आपल्या ग्रंथसाहेब मध्ये घेतली . मराठी भाषेतच आहे . ती अशी कि ते म्हणाले एक मुलगा आहे आणि त्यांनी भरारी मारून एक पतंग आकाशात सोडली आहे . तो सगळ्यांशी बोलतो ,हसतो ,खेळतो सगळं काही चाललं आहे पण त्याच सार लक्ष त्या पतंगा कडे आहे . तसच आपलं लक्ष सगळं शंकरा कडे असलं पाहिजे . आमच्या लहानपणी आईवडील नेहमी म्हणत असत कि लक्ष कुठे आहे तुझं ?लक्ष म्हणजे लाखाची जी गोष्ट ती लक्ष कुठे आहे . आजकाल असं कोणी बोलत नाही पण पूर्वीच्या काळी जरा फार बाळबोध घराणी असायची . आजकाल तस नाही . आम्ही तर तंबाकू ठेवताना ,तोंडात ठेवताना पहिली नाही कधी ,तंबाकू काय वस्तू असते ती आम्हाला माहित नाही . तंबाकू खाणे वैगेरे तर फार दूरची गोष्ट झाली . तंबाकू डोळ्यांनी सुध्दा आम्हाला माहित नव्हती . आम्हाला दारूचे रंग सुध्दा माहित नव्हते . पण आजकाल बघितलं तर जमानाच रंगीन आहे . आम्ही म्हणजे म्हातारी माणस त्यावेळची गोष्ट मी सांगते . आता ह्या वेळेला अशी स्तिती झालेली आहे कि काय चुकलं काय नाही चुकलं म्हणजे आपण सगळे आता राजसिक माणस झालोत . तामसिक माणस चूकच गोष्टीन कडे जातात आणि राजसिक माणसांना चूक आणि बरोबर यातलं काही समजत नाही .

परदेशातल्या लोकांना सांगितलं बाबा की हे चुकीचं आहे ,तर म्हणे कशावरून ,यात काय वाईट आहे ?,तोंडात अशा पिना घालतात आणि केस अशे रंगवून रस्त्याने चालतात . म्हंटल हे सगळं कशाला करता तुम्ही ?. फाटके कपडे घालून चालायचं म्हंटल कशाला करता तर म्हणे यात वाईट काय ते आधी सांगा . सिद्ध करा . पिना जर तोंडात घातल्या तर वाईट काय ते सांगा . आता काय सांगायचं . असं वाटलं तुम्ही आता मागून खाल . असच म्हणावं लागेल . पण यांच्यात काय वाईट आहे ते सांगा आधी . आम्ही सरळ चाललो तर ठीक आहे पण आम्ही मागच्या बाजूला चाललो तर काय वाईट आहे ,अहो वाईट काही नाही पण तिकडून गाडी अली तर तुमच्या अंगावर येईल ना . पण त्याच्यात काही वाईट नाही ना ,झालं तर झालं मग आम्हाला जस चालायचं तस चालूदे . म्हणजे असा अडेलतट्टू पणा येतो . आणि इतकच नव्हे तर आमचं काही चुकत नाही असा अहंकार आल्यामुळे त्याना काही सांगण्याची सोयच नाही . त्यांना एकाच इलाज आहे तो म्हणजे आत्म्याची जागृती . आत्मा जागृत केल्या बरोबर दिसत कि अरे बापरे असं वागलं आणि हातातल्या चैतन्यच्या लहरी गेल्या म्हणजे हे चुकीचं आहे . आणि चैतन्याच्या लहरी असल्या म्हणजे ठीक आहे . म्हजे जी प्रामाणिक जी गोष्ट आहे ती आपल्या हातात येते आणि त्याने माणसाच्या लक्षात येत कि आपलं कुठे चुकलं आणि कुठे नाही . पण सात्विक मंडळी नेहमी चांगल्याच गोष्टींकडे लक्ष ठेवतात आणि चांगल्याच मार्गाने चालतात . त्यांना चांगलं आणि वाईट नेहमी समजत अशा सन्मार्गाला लागतात . आपल्या देशात अत्यंत सात्विक लोक आहेत . हि एक योगभूमी आहे त्या बद्दल शंका नाही . आणि त्यातल्या त्यात हा महाराष्ट्र म्हणजे एक पुण्यभूमी आहे . अत्यंत पुण्यभूमी आहे ,याला दंडकारण्य म्हणत असत पूर्वी . आणि इथे जेव्हा श्रीराम आले ,सीता अली तेव्हा त्यांनी आपल्या पायातल्या खडावा काढल्या आणि अनवाणी या देशात चाललेले आहेत . त्यांनी सुध्दा या तुमच्या पुण्यभूमीला मानलं आहे . पण आपल्याला याची जाणीव नाही कि आपण एव्हड्या पुण्यभूमीत जन्माला आलो आहोत . हि खूप आश्चर्याची गोष्ट आहे . केव्हडी हि पुण्यभूमी ह्या पुण्यभूमी मध्ये कार्य सगळ्यात उत्तम होतंय ,मी असं पाहिलं आहे कि महाराष्ट्रात जितकं छान कार्य होतंय तेव्हड कोणच्याही देशात कोणच्याही भूमीत होत नाही . मद्रास लासुध्दा नाही ,नॉर्थ इंडिया त नाही ,किंवा बाकीचे सगळे देश रशिया पासून इथपर्यंत ,तिथपर्यंत सगळे देश मी पाहून टाकलेले आहेत . कुठेही अशी पुण्यभूमी नाही . एव्हड्या मोठ्या पुण्यभूमीवर तुम्ही बसले असताना तुमचं आत्मबल सुटावं म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे . तुम्ही आपलं आत्मबल मिळवून घ्यावं ,आपला आत्मसाक्षात्कार मिळवून घ्यावा . म्हणूनच मी आज आले . यासाठी तुम्हाला विनंती आहे कृपा करून नम्रतेने ,व्रतनिश्चये हे तुम्ही घेतलं पाहिजे . तुम्हाला जर का प्रश्न असले तर विचारून घ्यावे आणि एव्हड्या कमी वेळात मी पुष्कळ बोलू शकत नाही . आणि मग आपण याचा प्रयोग करू . त्यांनी तुम्हाला आत्म्याचं ज्ञान मिळेल .

आता याला सहजयोग म्हणतात ,सह म्हणजे तुमच्या बरोबर ज म्हणजे जन्मलेला . तुमच्या बरोबर हा योग प्राप्त करण्याचा हक्क जन्मलेला आहे . तो तुमचा जन्मसिध्द हक्क आहे . आणि योग ला दोन अर्थ आहेत एक म्हणजे परमेश्वराशी एकाकार होणे हा एक आणि दुसरा अर्थ युक्ती . युक्ती म्हणजे हि परमेश्वरी शक्ती जी आहे ती कशी वापरायची त्याची युक्ती नंतर शिकली पाहिजे . आणि त्या साठी जवळ जवळ एक महिना तरी तुम्ही याच्यावर लक्ष दिल तर मोठे गुरु व्हाल . अगदी मोठे मोठे वृक्ष व्हाल . पण आधी जे अंकुरलेलं आहे ते नाजूक आहे त्याला सांभाळावं लागेल . ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे . हे काही मला सांगायला नको . पण आता जे आम्ही मिळवलं ते कस आम्ही वाढवायचं ,पुढे कस जायचं त्यासाठी इथे सेंटर आहे त्या सेंटर वर तुम्ही जाऊन आपली पूर्ण पणे वाढ करून घ्यायची .

एक प्रश्न असेल कि भक्ती मार्गाबद्दल माताजी तुमचं काय मत आहे ?

तर भक्तिमार्ग अशासाठी सांगितला होता कि माणसाची वृत्ती चलबिचल नाही झाली पाहिजे . परमेश्वराकडे लक्ष असलं पाहजे . पण आपण अतिशयाला गेलो ,हा फक्त मार्ग आहे हे ध्येय नाही आहे .मार्ग आता आम्हाला देवळात जायचं आहे तर रस्त्यातच फिरत बसलो तर देवळात कस जाणार . आता आतमध्ये येण्याची वेळ अली तेव्हा या ,ज्या मार्गाने तुम्ही येत होतात ,जी भक्ती तुम्ही परमेश्वराची केली त्या भक्तीच आता ध्येय मिळवलं पाहिजे . आणि आता अनन्य भक्तीत रमल पाहिजे . सगळे हे मार्ग शेवटी एके ठिकाणीच पोहोचले पाहिजेत ना ,शेवटी मंदिरातच पोहोचले पाहिजेत ना . जर मंदिरात आला नाही तर फायदा काय झाला त्याचा . कोणत्याही मार्गाने आलात तरी मंदिरात यायचा एकच मार्ग आहे . म्हणजे कुंडलिनीच जागरण ,आत्म्याचं ज्ञान .

आता आपण जागृतीच कार्य करूयात . तर हि कुंडलिनी आपल्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे त्याच्या खाली गणेशाचं चक्र आहे . आणि वरती सहा चक्र आहेत . तर हि कुंडलिनी ह्या सहा चक्रा ना भेदून शेवटी हे जे ब्रम्हरंध्र आहे ,टाळूभाग ज्याला म्हणतात ते भेदून वर येते आणि आपल्या हाताला गारगार असं वाटायला लागत आणि टाळूतून वरती फवाऱ्या सारखं आल्यासारखं वाटत . पण त्याच्या साठी एक विनन्ती आहे आपण टोप्या उतरून ठेवाव्यात . कारण आईकडे काही टोपी घालायची नाही . मी तुमची आई आहे . आणि हे ब्रम्हरंध्राच छेदन आहे . दुसरं चष्मे उतरून ठेवा . डोळ्याला सुध्दा यांनी फार फायदा होतो . आता करायचं काही नाही . अक्रियेत बसायचं आहे . काही मंत्र म्हणायचं नाही काही नाही ,सगळं आता सोडून द्यायचं . सर्वप्रथम हा विचार करायचा नाही कि मी हे पाप केलं ,ते पाप केलं ,ते माझं चुकलं असं काही म्हणायचं नाही . तुम्ही देवाचे मंदिर आहात आणि आज तुम्ही योग्यवेळी इथे आलात ,हा योग तुम्हाला साधला म्हणजे मागच्या जन्मीचे काहीतरी सुकृत आहे . तेव्हा स्वतः बद्दल न्यूनता ठेवायची नाही . वर्तमान काळात राहून भूतकाळातील सगळं विसरून जायचं . कारण रामदास स्वामींना विचारलं कि कुंडलिनी जागृतीला किती वेळ लागतो ?तर त्यांनी सांगितलं तत्क्षण ,ताबडतोप हे घडत म्हणजे काय कि तो मागचा क्षण विसरायचा आणि पुढचा क्षण विसरायचा ,काय होईल ते होईल काय झालं ते झालं यावेळी आम्हाला जागृती पाहिजे . अशा विचाराने बसले तर होणार आहे हे . आणि अशी पूर्ण पणे इच्छा करायची कि माताजी मला आत्मसाक्षात्कार मिळाला पाहिजे . आता डावाहात हि इच्छाशक्ती आहे तो हात माझ्याकडे करायचा . सहज मांडी घालून बसा . आणि उजवा हात गणेशाला नमन करून जमिनीवर ठेवायचा . हि पृथ्वी जी आहे हि आपली आई ,हि महाराष्ट्राची पुण्यभूमी हिच्यावर असा हात ठेवायचा . डावाहात म्हणजे तुमची इच्छाशक्ती आणि उजवा हात म्हणजे क्रियाशक्ती . तर आता कृपा करून आता सर्वानी डोळे मिटायचे . आणि टाळूकडे कडे लक्ष ठेवायचं . आता बघायचं गार येतंय का हातात . डावाहात बघा वाटतंय का गार . सूक्ष्म असेल ते . आता आमच्या कुलस्वामिनीची च हि शक्ती आहे का असा प्रश्न विचारा . येतंय का गार बघा . आता उजवा हात माझ्याकडे करा आणि डावाहात आकाशाकडे मागे उभा करा . आता येतंय का उजव्या हातात गार बघा . आता डावाहात खाली करा . आणि दोन्ही हात एकेक करून टाळूवर धरून बघा गार येतंय का . आता दोन्ही हात आकाशाकडे वरती करून विचारा हीच परमेश्वराची शक्ती आहे का . बघा दोन्ही हातातून गार येतंय का . आता तुमच्यासाठी आम्ही फोटो आणले आहेत . त्या फोटोतून सुध्दा चैतन्य येतंय . आता कुंडलिनी म्हणजे काय ते शिकून घेतलं पाहिजे . सगळ्यांना आमचा नमस्कार .

Akluj (India)

Loading map...