Public Program

Public Program 1985-01-20

Location
Talk duration
70'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

20 जानेवारी 1985

Public Program

Sangamner (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

संगमनेरचे सहजयोगी तसेच संगमनेरचे रहिवासी आणि आसपास च्या गावातून आलेल्या अशा सर्व सत्यशोधकांना आमचा नमस्कार . मी आधीच म्हंटल आहे कि सत्यशोधक असायला पाहिजे . ज्यांना सत्य शोधायचं असत ते सत्य शोधल्या शिवाय चैन घेत नसतात . अनेक जन्म जन्मांतरातलं जे आपण पुण्य गाठलेल आहे ,सत्य शोधताना आपण ज्याज्या गोष्टी मान्य करत गेलात आज त्याच्याच पुण्य प्रतापाने आपला जन्म या आधुनिक काळा मध्ये या महान थोर योगभूमीत भारत भूमीत झालेला आहे . हि भारत माता योगभूमी आहे . योगभूमी म्हणजे इथे जन्मलेल्या मनुष्याला योग प्राप्त होऊ शकतो फार सहज . त्याला कारण या देशा मध्ये अनेक संतसाधु झाले . कित्येक अवतरण झाली . विशेष करून महाराष्ट्रात आपल्याला माहिती आहे स्वतः रामचंद्र सुध्दा अनवाणी आणि साक्षात सीता देवी हि सुध्दा इथे अनवाणी चाललेली आहे . अशा या पुण्य भूमीत आपला जन्म झालेला आहे . आता येताना मी कोमलवाडी म्हणून गाव आहे तिथे बघायला गेले होते . फार भयंकर दुष्काळ ग्रस्त असे ते गाव आहे . जवळ पासची बरीच खेडी तशाच स्तिथीत आहेत . ओसाड पडलेली . तिथे मला कळलं कि कानिफनाथांची समाधी आहे . त्या समाधीची स्तिती बघून मला इतकं आश्चर्य वाटलं कि एव्हडा महान आत्मा या ठिकाणी स्तीत आहे आणि त्याच्या कडे कोणाचंच लक्ष नाही . कुणीतरी प्रश्न विचारला कि माताजी एव्हडे मोठे महात्मा इथे झाले मग ह्या लोकांची स्तिती अशी खराब का . तर मी असं सांगितलं कि ह्या साधुसंताना आम्ही लोकांनी फार छळलेल आहे ,त्यांना मुसलमान म्हंटल ,त्यांना मारलं . इतकं लोक म्हणतात कि त्यांना मारून नाही टाकलं . त्यांना खायला प्यायला सुध्दा पाणी दिल नाही . पण तसाच एखादा भामटा आला जेल मधून सुटून ,आणि त्यांनी जर ढोंग केलं आणि तो जर भगवे वस्त्र घालून आला कि लागले आपण त्याच्या पाठीमागे . त्यांनी काहीतरी हात चलाखीच दाखवलं कि आपल्याला वाटत केव्हढे मोठे बाबाजी . कुणी बाबाजी आले कि लागले आपण पाठीमागे . जरी म्हंटल कि हि खेडूत मंडळी आहेत आणि याना एव्हडी समज नसली तरी देवाला ओळखण्याची शक्ती हि फक्त खेडेगावातल्या लोकांना जास्त असली पाहिजे असं मला वाटत . कारण ते साधे सरळ भोळे लोक आहेत . पण खुलेपणाला भोळेपण म्हणता येत नाही . आणि ह्या खुले पणा मध्ये आपण किती वाहवले गेलो आहोत ते आधी बघितलं पाहिजे . सहजयोग म्हणजे

तुमच्या मध्ये असलेला आत्मा त्याच दर्शन करणं .

कोणत्याही धर्मात विशेष करून हिंदू धर्मात ते आदिशंकराचार्य झाले ज्यांनी या धर्माचं पुनरुत्थान केलं आणि सांगितलं कि आत्मबोधा शिवाय मार्ग नाही . हा आपला गाभा आहे . बाकीचं जे काय करत राहतो आपण त्याला काही अर्थ राहणार नाही जर आपण आत्मबोध घेतला नाही तर . वेदामध्ये पहिल्यांदाच सांगितलं त्यांनी ,जो पहिला श्लोक आहे त्याच्यातच लिहिलं आहे कि जर हा वेद वाचून तुम्हाला विद झालं नाही ,विद म्हणजे काय कि आपल्याला जे वाटत कि आपल्या डोक्यात गेलं पाहिजे असा त्याचा अर्थ नाही . विद म्हणजे काय कि तुमच्या नसानसातून कळलं पाहिजे ,तुमच्या मज्जातंतू वर त्याच्या मध्ये तुम्हाला याची जाणीव अली पाहिजे तेव्हा याला आत्मबोध झाला म्हणतात ,त्याचा बोध झाला पाहिजे असं नाही कि पुस्तक वाचून वाचून आम्ही फार शहाणे झालो आणि आता आम्ही वेदसंपन्न झाल्या मुले आम्हाला आत्मबोध झाला असं होत नाही . आपल्या कडे तुकारामांनी कोणते वेद वाचले होते ?. कोणच्या शाळेत कोणत्या युनिव्हर्सिटीत गेले होते ?. नामदेवांनी काय केलं होत ?पण त्यांना सगळं विद होत . विद होत म्हणजे त्यांच्या संबंध नसानसात आत्म्याचं दर्शन होत . तस झाल्या शिवाय धर्माला किंवा कोणत्याही गोष्टीला काही अर्थ रहात नाही . असं म्हणजे सर्व शास्त्रातच लिहिलेलं आहे . आत्मबोध झालाच पाहिजे त्या शिवाय लोकांना कळणार नाही .

जगामध्ये कृष्णाने सांगितलं आहे कि तीन प्रकारचे लोक असतात . रक्तर तामसिक ,दुसरे राजसिक ,आणि तिसरे सात्विक . तामसिक लोक ते असतात कि जे खोट्या गोष्टीन कडे ,चूक गोष्टीन कडे लक्ष देऊन त्याच महत्व करतात . आणि ते महत्व करताना संबंध आयुष्य त्याच्यात वेचून टाकतात . आज आपल्या समाज्याची हि स्तिती आहे . आपण खरोखर तामसिक लोक म्हंटले पाहिजेत कारण कोणत्या तरी चूक गोष्टीला मान्यता देऊन त्यासाठी आयुष्य आपलं बेकार करून टाकतो ,त्या बद्दल विचार करत नाही . दुसरे राजसिक लोक सांगितले आहेत कि जे विचार करतात पण त्यांना हे समजत नाही कि चूक आहे कि बरोबर आहे . कारण नुसते विचार करतात ते . विचार नुसता करून काय उपयोग कारण विचार कुठेही जाऊ शकतो . एखाद्या माणसाचा खून करावा आणि नंतर त्यानं असा विचार करावा कि करण भाग होत काय करणार . त्याला त्याचा खून केल्याशिवाय गत्यंतर नव्हतं . म्हणजे त्याच्यात चूक त्यांना काही दिसत नाही . अशे लोक राजसिक असतात . पाश्चिमात्य देशातले लोक हे राजसिक आहेत . पण सात्विक मंडळी ती असतात कि जे सत्य काय ते ओळखतात आणि सत्याकडे आपलं लक्ष देतात . त्यांचं लक्ष सगळं सत्य कस ओळखायचं याच्या कडे असत . अशी जी मंडळी असतात ती खरी सात्विक असतात आणि तीच परमेश्वराला प्राप्त होतात . म्हंटलेलंच आहे "येऱ्या गबाळ्याचे काम नोहे ". गबाळ्या लोकं साठी हे नाही आहे . गबाळ्या लोकांना लोक येऊन लुबाडतात ,काही काही खोट पसरवतात . आणि त्याच्याच कडे आपलं लक्ष असत . भक्तिमार्ग सांगितला तो एव्हड्या साठी कि भक्ती करावी ,देवाकडे लक्ष असावं . हृदया मध्ये देवाला बसवायचं नुसतं तोंडानी जपजाप करून काय होणार आहे . कबीरांनी सांगितलंय "करका मनका छाडीदे ,मनका मनका भेद ". पण हे सगळं पुस्तकात वाचायचं ते आपल्या डोक्यात काही जात नाही . म्हणायचं तेच आणि करायचं तेच . त्यात काही फरक रहात नाही . ह्याला कारण एकच कि अजून आत्म्याचा प्रकाश आलेला नाही . एक जर कुत्रा किंवा एखादा घोडा असला ,आणि जर त्याला आपण म्हंटल कि तू घाणीच्या रस्त्यातून जा . तो सरळ निघून जाईल त्याला काही त्रास होणार नाही पण एका माणसाला होतो . एखाद्या माणसाला जर सांगितलं असं तर तो म्हणेल हि शिक्षा कशाला मला . कारण त्याला त्याची घाण समजते . आणि जर मानवाला सांगितलं कि हे वाईट आहे ,पाप कर्म आहे तू ते करू नकोस तर तो ते मुद्दाम करतो . पापाची घाण त्याला येत नाही . ते जे काही लिहिलं कि "पापाची वासना नको दावू डोळा "ते फक्त ज्यांनी लिहिलं त्यांच्या साठी आणि ज्यांनी वाचल त्यांना नुसतं वाचण्या साठी . ती वासना आहे हे आपल्या लक्षात येत नाही . त्याच्या कडे आपलं चित्त असं जात जस एखाद्या मधमाशीला मधाकडे लक्ष जात . उलट चांगल्या मार्गाला जायला लोकांना त्रास पडतो . ह्याला कारण काय असावं ?कारण असं कि अजून ती आपली उन्नत्ती झालेली नाही जिथे आपल्याला जे काही अधर्म आहे तो अधर्म वाटतो ?,भांडावं लागत स्वतःशी अरे हा अधर्म आहे ,आईने सांगितलं ,बाबानी सांगितलं ,गुरूंनी सांगितलं हा अधर्म करायचा नाही . पण आता करायचं काय . आपापसात भांडण सुरु होतात . म्हणजे आपल्या डोक्यातच ,डोक्याचं हृदयाशी भांडण ,हृदयाचं शिकवणीशी भांडण . सुसंस्कृत माणसाला सुध्दा हा त्रास होतो पुष्कळदा . असं मन हे चंचल होऊन जात . इकडे तिकडे वहावत राहत . अशा प्रकारची हि राजसिक मंडळी झाली

पण सात्विक मंडळी मात्र त्यांना घाण आवडत नाही . आता हे जे मोठमोठाले साधुसंत ह्या महाराष्ट्रात झाले त्यांना काही सांगावं लागायचं कि बाबारे तू असं करू नकोस . तस काही सांगावं लागायचं नाही . कारण ते संत झाले ते सात्विक झाले . ते काही घर दार सोडून सन्यास घेऊन बसले नव्हते ,त्यांना सगळ्यांना बायका मूल सगळी होती . तेव्हा सन्यास घेतला पाहिजे आणि सन्यास घेतला म्हणजे देव मिळेल असं लोकांनी तुम्हाला सांगितल्या बरोबर लगेच कपडे रंगवून बसल्यावर तुम्हाला वाटत कि वा झालं आता मी देवाच्या दारात येऊन बसलो . अशा पलायनवादी लोकांना देव कधीच मिळणार नाही . जे लोक अशा भाबड्या गोष्टीन कडे धावतात त्यांना देव कसा मिळावा बर . आता एक अली म्हणे पालखी ,ती पालखी काय अली पैसे कमवण्याचे धंदे तुम्हाला दिसत कसे नाहीत . पोटभरू लोक आहेत ,ते आपले पोट भरण्यासाठी इथे दोन पैसे ठेवले ,इथे चार पैसे ठेवले म्हणता . देवाला पैसे म्हणजे काय हे माहिती आहे का . ?त्याला याची अक्कल नसते . पैशाची अक्कल देवाला नाही ती तुम्ही बनवलेली आहे पैसे हि गोष्ट . त्याला काय माहिती पैसा काय आहे ते . तुम्ही काहीतरी माणसांनी बनवलं आणि त्याच्या बद्दल वादावादी करत आहात आणि त्याच महत्व करता आहात . देवाला काय ?त्यांनी सगळंच तुम्हाला फुकट दिलय ,हे आकाश बघा तुम्हाला फुकट दिलय . हि हवा ,तुम्ही पाणी पिता ते सर्व फुकट दिल आहे .जेव्हा माणूस हात घालतो तेव्हाच पैसे लागतात . जो पर्यंत माणसाचा हात नाही तो पर्यंत देवाने सगळं फुकटच दिलेलं आहे . आज तुम्हाला मानव केलं तेही फुकटच ना . किती पैसे मोजले होते त्याच्यासाठी तुम्ही ?ह्या जमिनीमध्ये बी पेरतो हिला किती पैसे देतो आपण .तिला समजत का पैसे काय आहेत ते ?पण बी कस उगवायच हे कळत कारण ती जिवंत क्रिया आहे . आणि देव हा जिवंत आहे मेलेला नाही आहे . नारळाच्या झाडाखाली माणूस झोपला आणि कितीही नारळाची झाड असली तरी त्याच्या डोक्यावर नारळ पडत नाही ,तो कसा ? जर एखाद जनावर पण झोपलेलं असेल तर त्याच्या वरती पण पडत नाही नारळ . हे कस घडत ?हे कोण घडवत ?ह्याला ऋतंभरा प्रज्ञा असं म्हणतात . हि शक्ती सगळी कडे पसरलेली आहे .जिवंत क्रिया ज्या काय जगातल्या आहेत त्या ती करत असते . आपण एका फुलातून एक फळ काढू शकत नाही आणि केव्हडा अहंकार आहे माणसाला मी हे केलं आणि मी ते केलं . तेव्हा जे मिळवायचं आहे ते जिवंत मिळवायचं आहे . जे आपल्या मध्ये खर आहे ते मिळवलं पाहिजे . अशा खऱ्या उमेदीने जे लोक आलेत त्यांनाच हा मार्ग साधण्या सारखा आहे . पण जे नसते थोतांड आणि खोटे गुरु करून बसले आहेत त्यांना हा मार्ग मिळणार नाही . मी आधीच स्पष्ट सांगितलं होत ,मी तुमची आई आहे मी तुम्हाला खोट सांगणार नाही . मला काही इलेक्शन लढायचं नाही किंवा कुठे नोकरी करायची नाही . मला फक्त तुम्हाला तुमचं आहे ते तुम्हाला द्यायचं आहे . हि माझी एक जबाबदारी आहे तुम्हाला समजावून सांगायची ,कळकळीने .प्रेमाने .अगदी हृदयाच्या आंतरिक इच्छेने हे सांगायचं आहे कि बाबारे तुझं आहे तुझं पाशी ते तुम्ही घ्या . आणि ते अगदी सोपं आहे . सहज आहे . सह म्हणजे तुमच्या बरोबर ज म्हणजे जन्मलेला ,हि कुंडलिनी तुमच्या बरोबर च जन्मलेली आहे . त्रिकोणाकार अस्थी मध्ये तुम्हाला दिसत असेल तर बघा ती कशी बसलेली आहे . आणि त्याच्या वरती हि सहा चक्र आहेत आणि खाली एक चक्र आहे .

खाली चक्र गणपतीचं आहे . कुंडलिनी हि गौरी माता आहे ,तीच लग्न झालेलं आहे पण अजून तिच्या पतीच तिला दर्शन झालेलं नाही म्हणून ती अजून कुमारी आहे . अशी हि गौरीमाता ह्या त्रिकोणाकार अस्थी मध्ये बसलेली आहे . आणि गणपती तीच रक्षण करतो आहे . गणपती म्हणजे काय ?तर पवित्रता ,शुध्द ता ,बाल्यावस्था ज्याला आपण अबाधित म्हणतो . इंग्लिश मध्ये इनोसन्स म्हणतो . ते आपल्या सर्वांच्या मध्ये आहे पण ते आपण मारून टाकलेलं आहे . चलाखी करायची ,फार हुशारी दाखवायची ,अधर्माने वागायचं ,आई बहिणी नाही ओळखायच्या म्हणजे तो गणपती झोपी जातो . इकडे घरात गणपती ठेवायचा आणि वागायचं मात्र राक्षसा सारखं . तर हा जो आपल्या मध्ये गणपती आहे हा आधी थोडा बहोत जागृत असला पाहिजे . म्हणजे जो मनुष्य फार चलाख आहे आता समजा जर हिटलर मला म्हणेल मला पार करा तर मला ते जमणार नाही . जी काही किमया घडायची आहे त्याच्या मध्ये थोड्या मोठ्या गोष्टी असायला पाहिजेत आणि त्या बहुतेक आपल्या भारतातल्या लोकांमध्ये फार आहेत . म्हणजे लोक तसे धार्मिक आहेत . पाश्चमात्य देशात मात्र लोक नरकात लोळत आहेत . त्यांच्या पासून काही शिकण्या सारखं नाही . नरकात पडलेले आहेत . तिथे जर ते उठून उभे राहिले तर आपण का उठू नये . पण आपण आता त्यांचं पूर्ण अनुकरण करायचं ठरवलं आहे . ते कोणच्या गर्तेत आहेत ते आपल्याला माहित नाही . कोणत्या परिस्तितीत आहेत ते आपल्याला माहिती नाही . नुसती आर्थिक परिस्थिती जर दुरुस्त झाली तर सगळं दुरुस्त होत हि जी कल्पना आहे ती चुकीची आहे . अगदी चुकीची आहे . कारण आर्थिक परिस्तिथिती त्याची अगदी चांगली आहे पण बाकी सगळं गडबड आहे . त्यांच्या कडे एकच उदाहरण द्यायचं म्हंटल तर लंडन शहरामध्ये एका आठवड्यामध्ये दोन मुल आईवडील मारून टाकतात ,चांगली मुल ,का ?तर झेपत नाही म्हणून . कारण इतकी दारू पितात ,गांजा पितात कि त्या बेशुद्ध अवस्थेत त्यांना काही सुचत नाही . आपल्या मुलांना मारून टाकतात . त्यांच्या जवळ पैसे कमी पडतात कारण इतकं जर प्यायचं झालं तर कुठून आणणार पैसे . तेव्हा ज्याला आपण म्हणतो कि आर्थिक परिस्तिथी दुरुस्त झाली तरी तुम्ही धार्मिक व्हाल किंवा फार शांतीत रहाल असं होत नाही . उलट त्या देशानं मध्ये जेव्हडी अशांती आहे तेव्हडी ह्या देशात नाही . तेव्हा गरिबी चांगली असं माझं म्हणणं नाही पण गरिबी सुध्दा झेपायला हवी योग घडला पाहिजे .

सुदामाला सुध्दा कृष्णाला भेटावं लागलं तेव्हा त्याच्या घरात सोन्याची द्वारिका झाली हे तुम्हाला माहित आहे . तेव्हा तुमचा जेव्हा योग घडेल तेव्हा तुम्हला क्षेम मिळेल असं कृष्णाने सांगितलं आहे . "योग क्षेम वाहामयं "क्षेम आधी नाही म्हंटल योग घेतल्यावर मग क्षेम तुमचं मी करिन असं म्हण्टलेलं आहे . म्हणजे आधी योग घ्या मग तुम्ही म्हणा कि देवाने तुमचं काय केलं . म्हणजे माझ्याकडे लोक येऊन सांगतात माताजी बघा आम्ही एव्हडी गुरु भक्ती केली ,इतकी पारायण केली . सगळं आजारपणच आहे मी कॅन्सर नि आता आजारी आहे . इतके आम्ही पाय तोडले इतक्या आम्ही वारी केल्या आणि आमची हि स्तिती . काय झालं तुम्हाला तर मला क्षयाचा आजार आहे . अहो तुम्हाला कुणी सांगितलं होत एक महिना तिथं तडफडत जायचं आणि ती तंबाकू खायची . कुणी सांगितलं तुम्हाला देवांनी सांगितलं ज्ञानेश्वरांनी सांगितलं . त्यांनी काय तुम्हाला सांगितलं होत का कि तुम्ही दिंड्या घाला म्हणून . तुम्ही कशाला गेले . आणि त्या वारकरी लोकांच्या संप्रदायात मला बोलावलं मला रडायला आलं ,म्हंटल हे काय करायचं या लोकांना ,अगदी पाप्याचं पितर सगळे . अगदी अशे झालेले हो ,सगळे आजारी इथून तिथवर . आता कृष्ण म्हणजे साक्षात धन्वंतरी असून त्याचंच नाव तुम्ही कशाला खराब करता . तो साक्षात धन्वंतरींचा अवतार त्याच्या नावानी नुसतं कुटत कुटत तिथे गेले आणि हे आजार घेऊन आले हे कस काय ?. म्हणजे हा देव आहे किंवा नाही असा मग तुमचे तरुण लोक प्रश्न करतात माताजी हे कस काय . आम्ही एव्हडी मेहनत केली ,वाऱ्या केल्या . कुणी सांगितलं तुम्हाला . हे कुणी सांगितलं पोटभरू लोकांनी ,पैसे खाणाऱ्या लोकांनी ज्याला पैसे खायचे त्यांनी टुम काढायची आणि तुम्ही त्यांच्या मागे धावायचं . अशा तऱ्हेचे अनेक प्रकार आपल्या धर्मात आहेत .

मग जातपात हि फार मोठी घाणेरडी प्रथा चाललेली आहे ,आणि तिला काहीही आधार शास्त्रात नाही . आता जर तुम्ही म्हंटल कि वेदात लिहिलं आहे तर खोटी गोष्ट आहे . कारण गीतेचा जो लेखक व्यास आहे तो एका कोळीणीचा मुलगा तो हि असातसाच झालेला . तो कसा असं लिहिलं कि जन्मानेच जात ठरते म्हणून . जन्माने तो कोण ?त्याला जात न पात . वाल्मिकी कोण होते अहो ते एव्हडे मोठे संत कसे झाले . मग जन्मानेच तुम्ही उच्च होता असा विचार तुम्ही करून बसले आहात ह्याच्यात सुध्दा पोटभरू लोकांचं काहीतरी यंत्रणा दिसती आहे . या शिवाय असं होऊ शकत नाही . जन्मापासूनच कुणी असा कसा होऊ शकतो . ?म्हणून तुकाराम नाही ठीक कारण ते जन्मा पासून असे आहेत . साईनाथ हे मुसलमान म्हणून त्यांना छळायच , तो अमका ,तो तसा ,शिवाजी महाराज ना राज्य द्यायचं नाही कारण ते कुणबी म्हणे . आणि आता काय कुणबी ,महार ,वाट्टेल ते राज्य करत आहेत ,नंतर आता ब्राम्हण तुमचे पंतप्रतिनिधी झाले . मग का बोलत नाही तुम्ही आता . ?तिथे बसवा एखादा राजपूत नाहीतर क्षत्रिय नेऊन . त्यावेळी काय होत तुम्हाला बोलायला . आता उलट ब्राम्हणाच्या वरती सुध्दा टीकास्त्र आहे . म्हणजे मी म्हंटल रामदास स्वामींचं तुम्ही का नाही छापत त्यांनी किती सुंदर सगळं सहजयोग सांगितला . अहो ते साक्षात हनुमानाचे अवतरण तर त्यानच्या बद्दल सांगतात कि ते ब्राम्हण होते म्हणून आम्ही त्यांचं छापत नाही . म्हणजे दोन्हीकडे चालायचं . सारक्याला वारके हे ह्याला म्हणतात ते त्याला म्हणतात . आणि ह्या जातींचा त्रास किती आहे तो बघा तुम्ही . आता एखाद्या तेलीच्या घरात मुलगी जन्माला आली तर तीच लग्न त्या तेल्याच्या तेल्याच्या तेल्यात करायचं . त्याच्यासाठी त्यांनी सांगितलंय एव्हडा हुंडा पाहिजे . म्हणजे एखाद्या तेल्याला तेव्हडा मिळाला असेल . तेव्हडा हुंडा तुम्ही नाही दिला तर तुम्ही आमचा मान नाही केला . मग तो अगदी सर्रास घ्यायचा . त्याच्याबद्दल काही लाजा नाही . हा एव्हडा हुंडा आम्हाला द्या . दिला बुवा हुंडा . तरी पण मुलीला मारून मारून घरी पाठवून द्यायचं . मग तो तेली समाज गेला कुठे सांगायला कि तुम्ही एव्हडा हुंडा घेतला तर मग आता मुलीला का छळता . हा समाज गेला कुठे त्यांना विचारायला पाहिजे .

तर सहजयोग हा समाजविन्मुख आहे ,समाजाकडे लक्ष आहे त्याच . समाज जर ठीक झाला नाही तरझालो काही फायदा नाही पण याच उलट असं होत कि सहजयोगात आल्यावर समाज ठीक होऊन जातो . अशा रीतीने आपल्या जातीपाती हे ते इतक्या आपल्यावर शाप आहेत . आणि या सगळ्या शापातून मुक्त व्हायचं असेल तर तुम्ही आत्मस्वरूप व्हा . आत्मा हे काय आहे ?ज्या लोकांचा एकदा आत्मा जागृत झाला त्यांना संबंध जग हे त्यांचंच कुटुंब वाटतंय . आणि तस कुटुंब झालं कि विश्वधर्म स्थापन झाला पाहिजे .हिंदू धर्माला कोणच्या हेनी स्वरूप येणार असेल ते म्हणजे विश्वधर्म झाल्या शिवाय येणार नाही . ह्याला विश्वधर्म झाला पाहिजे . सर्व विश्वात तो व्यापला पाहिजे . पण त्याची अशी संकुचित वृत्ती ,आणि त्याचे असे झालेले दुष्परिणाम बघितले म्हणजे कोण येणार त्याच्या मध्ये ?असे अनेक प्रकार आपल्या देशात चाललेले आहेत . आपण वाचल असेल कि दिल्लीला पुष्कळशा मुलींना जाळून टाकलं कारण त्यांनी हुंडा आणला नाही . जर कुणी बायकोला मारत असला तर एक पुरुष पुढं येऊन म्हणायचा नाही कि बाबा तू माझ्या जातीचा ,तू असं करू नकोस आपल्या जातीचं नाव जात . त्यात त्यांना काही वाटत नाही ,काही त्यांचं जात नाही . कितीही लोक दारू प्याले ,वाईट वागले ,वाट्टेल ते धंदे केले ,खोट बोलले ,पैसे मारले काही केलं तरी चालेल पण जातीचा आहे ना मग राहूदे . अहो पण त्या जातील काही अर्थ आहे का ,जर त्याचा काहीच परिणाम कोणावर होणार नाही तर असली जातपात आपल्या मध्ये घालून आपण सर्वांचा नाश करून घेतो . गळ्याला स्वतःच फास लावून आपण मरायचं ठरवलं आहे . हि फाशी कशाला लावून घ्यायची आणि हि खोटी गोष्ट आहे कि जन्मा प्रमाणे तुमची जात होते . जात म्हणजे ज्यांनी तुम्ही जन्मले ,अशी तुमची जी प्रवृत्ती ,तुम्ही राजसिक आहात कि तामसिक आहात कि सात्विक आहात . हि तुमची जात . जे सात्विक आहेत ते ब्रम्ह पदाला गेले तरच ब्राम्हण . किती तुम्हाला ब्राम्हण भेटले जे ब्रम्हपदाला गेले आहेत ?. खरे ब्राह्मण ते कि ज्यांनी आत्मसाक्षात्कार मिळवला . मग ते कोणच्याही जातीचे असेनात का ,कोणच्याही राष्ट्राचे असेनात का ,कुठेही असेनात का ,जे साधुसंत झाले ते खरे ब्राम्हण बाकी सगळे अब्राह्मण . तरी संतांनी म्हंटल ",तरी बरा झालो महार झालो असतो तर बर झालं असत ". हे सगळं इतकं सांगून गेले संत ,आपण रोज त्यांची गाणी म्हणतो पण आपल्यात काही उतरत का ?. स्वतः च्या व्यवहारात जेव्हा आलो तर परत तेच . म्हणजे जसे एखाद्या बैलाला घाणीला जुंपायच असेल तर कशी आपण झापड घालतो तशीच आपल्या समाजानी झापड घातलेली आहे आणि गोल गोल गोल फिरून राहिलेलो आहे . ते मोडायला आपण तयार नाही . ते मोडण्यासाठी त्यातून स्वतंत्रता मिळवण्यासाठी आधी आत्म्याचा बोध घ्या कारण आत्मा हा शुध्द आहे . इतकच नव्हे पण जे आत्मा सांगतो ते सत्य आहे . त्याच्या पलीकडे सगळं असत्य आहे . तो एकाकी ,अब्सुलूट आहे . त्याला काही दुसरा पर्याय नाही असा तो अपर्याही असा तो आत्मा आपल्यामध्ये आहे . तुम्ही कोणाचाही प्रश्न जर आत्म्याला विचारला आणि त्याच जर उत्तर चैतन्यानी आल तर ते अगदी खरं आहे . कानिफनाथांची जिथे आज आम्ही पहायला गेलो ,उदाहरण सांगायचं म्हणजे आम्ही सगळ्यांना ध्यानाला बसवलं, मी म्हंटल तुम्ही ध्यान करा मी तुमची कुंडलिनी जागृत करते . मी त्यांना म्हंटल येतंय का हातात गार ,म्हणे नाही येत . म्हंटल बर आता कानिफनाथांचं नाव घ्या . आणि म्हणा कि कानिफनाथ आम्हाला क्षमा करा आणि आम्हाला आत्मसाक्षात्कार द्या . लगेच त्यांच्या हातात थंड थंड गार येऊ लागलं . हि त्यांची महिमा . आणि आपण केलं काय त्यांचं ,ज्ञानेश्वरांना छळलं ,त्यांना छळलं कोणाला छळलं नाही ते सांगा . कुणाकुणाची नाव घ्यावी आणि कायकाय सांगावं . काहिनाकाहीतरी बहाणा करून लोकांचा छळच आम्ही केला आहे .

आता आत्मबोधाने सगळे सुसंस्कृत होऊन घ्या . त्यांनी तुम्ही सगळे नाहून घ्या . स्वच्छ होऊन घ्या . हि काय मोठी तुमच्या धर्माची ,तुमच्या देशाची आणि या महाराष्ट्राच्या पुण्यभूमीची जी काही महती आहे ती तुम्ही उचलून धरलं पाहिजे . उलट आपण ज्या मार्गाने चाललो आहे तो अगदी चुकीचा मार्ग आहे . म्हणजे धर्माच्या बाबतीत आंधळेपणा आणि दुसऱ्यांच्या अनुकरण करण्याच्या बाबतीत सुध्दा आपण आंधळे आहोत . जे काही परदेशात होत ते फार चांगल अशी चुकीची कल्पना करून घेऊन आपण त्यांचे अनुकरण करत आहोत . म्हणजे दोन्ही कडून एखाद्या बैलाचे डोळे बांधावेत किंवा एखाद्या घोड्याला झापड लावावी तशा झापडी घालून आपण चालत आहोत . ह्याला एकच म्हणजे आपल्या मध्ये आत्म्याचा दीप पाजळला पाहिजे . तस काहीही वाईट झालेलं नाही . तुम्ही देवाचे मंदिर आहात . आणि त्याच्यात फक्त हा दिवा पाजळायचा आहे . हे तुमचं तुमच्या जवळ सगळं धन आहे . हि संपत्ती तुमच्या जवळ आहे . तुमच्या मुलाबाळान मध्ये ,तुमच्या कुटुंबा मध्ये सगळ्यान मध्ये हि संपत्ती आहे . ती फक्त जर वर अली आणि त्याचा जर तुम्हाला लाभ झाला तर क्षेम मात्र देवाला बघू द्या . असच आपण देवाच्या साम्राज्यात जायचं आहे . हे आपल्याला करायचं आहे . एव्हडं लक्षात ठेवलं पाहिजे कि आत्मबोध हा घ्यायचा आणि आत्मबोध झाल्या नंतर हळूहळू त्यात आपण वाढलं पाहिजे . बी जरी अंकुरल तरी त्याच झाड व्हायला वेळ लागतो . मेहनत झाड व्हायला करावी लागते ,बी अंकुरायला मेहनत लागत नाही . जो पर्यंत आईच्या उदरात आहे तो पर्यंत आई काम करते . पण एकदा जरका झाड वर आलं त्याच्यावर मेहनत मात्र आपल्याला करावी लागते . सहजयोगात सुध्दा तसच आहे आज जरी तुम्ही पार झालात ,मला पूर्ण आशा आहे सगळेच्या सगळे तुम्ही पार होणार . काही आश्चर्याची गोष्ट नाही . पण परत त्याचा वृक्ष कारण हि मेहनत आपल्याच्यानं होत नाही आणि मग येतात माताजी मला हा रोग झाला आणि तो रोग झाला म्हणत . होणारच ,नाही म्हंटल तरी तुम्ही त्याची जोपासना नाही केली . ह्या शरीराला जर तुम्ही सांभाळलं नाही त्याच्या कडे तुम्ही जर बरोबर लक्ष दिल नाही ,त्याच्या मध्ये तुम्ही प्रेमाचं जर सतत पाणी दिल नाही तर हा वृक्ष वाढणार कसा ?. आणि त्या वृक्षाला वाढविण्या साठी इथे फार मोठमोठे सहजयोगी आहेत ,म्हणजे आश्चर्याची गोष्ट अशी आहे कि संगमनेर ला एव्हडे मोठे मोठे सहजयोगी आहेत कि मला असं वाटतंय संगमनरचे तुम्ही सर्व लोक पार होऊन तुम्हाला त्याचा लाभ झाला पाहिजे . आणि होणार .

पहिला लाभ असा कि तुमची प्रकुर्ती बारी होते . कँसर बरा होतो ,ह्यांनी बरेच रोग आम्ही बरे केलेत . फार मोठ्या मोठ्या लोकांचे रोग बरे केलेले आहेत . त्या लोकांनी आम्हाला पत्र लिहिलेली आहेत . ते सगळं काही आमच्या जवळ आहे . पण ते झाल्यावर माताजी मला कँसर झाला मला बर करा . म्हणजे जस काही आम्ही यांचे ठेकेदारच आहोत . जस काही आमच्यावरती हक्क आहे ,आता मला ठीक करा . बाकी सगळ्यांना पार करा अथवा नाही . इथे आम्ही कुणाला बर करणार नाही . तुम्हाला आम्ही तुमची कुंडलिनी जागृत करून देतो . त्यामुळे तुम्ही बरे व्हाल . मग त्याच्या नंतर तुम्ही हे शिका आणि आपल्या नातलगांना ठीक करा . पण आम्ही काही इथे हॉस्पिटल उघडायला आलेलो नाही . उलट तुम्हालाच आम्ही डॉक्टर करायला आलो आहोत . तुम्ही एकदा डॉक्टर झाले म्हणजे तुम्हीच डॉक्टर आणि तुम्हीच हॉस्पिटल . तुमचे जेव्हडे नातलग पेशंट आहेत त्यांना तुम्ही ठीक करायचं . ते शिकायचं आहे आणि ते फार सोपं ,सरळ आणि विनामूल्य आहे . असं सांगितल्या वरती पुष्कळ लोकांना असा प्रश्न पडतो कि माताजी कसा एव्हडा प्रवास करतात वैगेरे . देव कृपेने श्रीमंत घरात आहे मी . पती पण श्रीमंत आहेत आणि सासर माहेर दोन्ही श्रीमंत असल्या मुळे त्यालोकांनी मला हे करायला फार मदत केली आहे . पण आता तुमचं जेव्हा भलं होऊन जाईल त्यानंतर मग तुम्ही मला थोडी बहोत फुलबील दिली तर चालतील . काय हरकत आहे . बाकी आता तुम्ही काही खर्च करू नये . कोणाच्याच प्रकारचा सहजयोग्यानी खर्च करू नये असा माझा असा माझा फार अट्टाहास असतो . किती असलं तरी तुमच्या जवळ सद्या स्तिती नाही आहे . आईच्या कौतकासाठी काही म्हंटल तर मी आता बर करते पण तुम्ही सुध्दा हे लक्षात ठेवलं पाहिजे कि माझं सगळ्यात मोठं कौतुक तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही सगळे सहजयोगी व्हा . सहजयोगी होऊन आनंदाच्या सागरात नुसते पोहत राहा . ते मला बघायचं आहे . आणि ते अगदी सहज आहे ,अगदी जवळ आहे . रामदास स्वामींना कुणी विचारलं कि हा बोध घ्यायला किती वेळ लागतो त्यांनी सांगितलं कि तत्क्षण . त्या क्षणी होतो . पण तत्क्षणाला तयारी पाहिजे . आज मी तसही म्हणत नाही काही तयारी नको ,काही नको काही नको . तुमचा दिवा पेटवून देते . पण त्या धुकधुकणाऱ्या दिव्याला सांभाळावं लागत . जेव्हा तो दिवा पेटवला जातो तेव्हा स्वतःलाच त्याच्यातलं काय ते गम्य समजू लागत . कारण दिव्या शिवाय दिसत नाही आधी . तुम्ही स्वतःचे गुरु होता . तुम्हाला गुरु नको काही नको ,गंडा बांधायला नको ,कोणच वचन द्यायला नको . स्वतःच तुमचे गुरु होऊन तुम्ही बघता . आता समजा जर माझ्या साडीवर जर एखाद काही पडलं असलं तर मला तस दिसत नाही ,पण आता जर प्रकाश आल्यावर मी स्वतःच बघीन . पण त्याच्या आधीच सांगितलं कि तू असं करू नकोस तर मुद्दामहून करणार . पण एकदा जर काही हि जागृती झाली कि मनुष्याला स्वतःलाच कळू लागत कि आपण कस वागायचं .

म्हणजे आपला ,स्वतःचा धर्म ठीक होतो . कुणाला काही सांगावं लागत नाही ,कुणाला काही बोलावं लागत नाही आणि आपले धर्म ठीक होतात . अशा रीतीने हे जे आपलं नाभी चक्र आहे त्याच्या आसपास संबंध आपला धर्म आहे . तो ठीक होतो . हा धर्म ,दहा धर्म आहेत ,आणि दहाचे दहा धर्म ठीक झाल्यावर आपली लक्ष्मी ठीक होते ,लक्ष्मी ठीक झाली कि मधोमध जे चक्र आहे त्याला आम्ही नाभी चक्र म्हणतो ते लक्ष्मीचं चक्र आहे . . म्हणजे त्यांनी क्षेम मिळत . पुष्कळ लोकांना याचे लाभ झालेले आहेत . आता लंडन मध्ये तुम्ही ऐकलं असेल कितीतरी लाखो लोक नोकरी शिवाय आहेत पण आमच्या सहजयोगात आल्यावर त्याला नोकरी मिळते . म्हणजे एकही मनुष्य औषधा साठी सुध्दा नोकरी शिवाय रहात नाही तिथे . हि परिस्तिथी आलेली आहे . तेव्हा यांनी माणसाला केव्हडा लाभ होतो ते पाहिलं पाहिजे .

दुसरं स्वाधिष्ठान चक्र आहे ,जेव्हा हे चक्र ठीक होत तेव्हा हे ब्रम्ह देवाचं चक्र आहे हे ठीक झाल्या बरोबर मनुष्यामध्ये तल्लख पणा येतो ,बुद्धीमध्ये हुशारी येते . आणि खरखोट ते समजू लागत . ह्याच्या मुले मनुष्य अनेक कार्य करू शकतो . अनेक कार्य करताना सुध्दा तो थकत नाही . आणि त्याला बरोबर नीट समजत ,नेमकं समजत कि काय द्यायचं ते . नाहीतर आपलं उलटच आहे नेमकं जे आहे ते घ्यायचं नाही आणि जे नाही घ्यायचं ते घ्यायचं . उलट हे चक्र जागृत झाल्यावर मनुष्य मोठा आर्टिस्ट होऊ शकतो ,संगीताचे त्याच्यात गुण येऊ शकतात . पुष्कळशे असे गुण येऊ शकतात . जे आपल्याला फार दुर्लभ वाटतात .

त्याच्या वरती चक्र आहे त्याला आम्ही अनाहत किंवा हृदय चक्र म्हणतो . ह्या चक्राच्या खराबी मुळे माणसाला अनेक रोग होतात . पहिला रोग त्याला होतो तो म्हणजे फुफुसाचा . फुफुसाचे जेव्हडे त्रास आहेत ते सर्व ह्या चक्राच्या खराबी मुळे होतात . पुष्कळशा बायकांना जे छातीचे रोग होतात ते सुध्दा ह्या चक्राच्या खराबी मुळे होतात . माणसाला जी भीती वाटते ,एखादा माणूस भित्रट वगैरे होतो तो सर्व ह्या चक्राने दडपला जातो . हे चक्र जगदंबेच आहे ,आईच चक्र आहे . आणि जगदंबेचं चक्र आहे ,जेव्हा तुमची जगदंबा जागृत होते तेव्हा तुम्हाला जगात कुणाची भीतीच वाटत नाही . तुम्ही अगदी निर्भय होऊन जाता . साप ,विंचू ,वाघ किंवा कोणताही माणूस असो ,किंवा कशाही प्रकारची काही स्तिती असो तुमचं जे मन आहे ते असं निर्भय होऊन जात कि कशाचीच भीती रहात नाही . आणि देव तुम्हाला सुरक्षित ठेवतो . हि तुमची जगदंबा ती तुम्हाला सुरक्षित ठेवते . आणि अशा परिस्तिथी मध्ये तुम्ही कुठेही जायचं असलं काही करायचं असल तरी काही अपघात घडत नाही ,काही त्रास होत नाही . जर अपघात घडले तर ते नुकसान करत नाहीत . एक जरी सहजयोगी गाडीत असला तर सगळे च्या सगळे बचावतात . हि ह्याची विशेषता आहे . आणि याचे अनेक अनुभव आलेले आहेत पेपरात पण आलेलं आहे . लंडनला सुध्दा लोकांनी छापलेलं आहे . त्याच्या बद्दल आलेली प्रचिती इतर लोकांनी पण सांगितलेली आहे आणि ती नमूद केलेली आहे .

त्याच्या वरच जे चक्र ते विशुध्दी चक्र आहे . हे फार जरुरी आहे . हे चक्र आपल्याला देवाने जे दिलेलं आहे ते श्री कृष्णाचं चक्र आहे . इथे श्री कृष्णाचं स्थान आहे . श्री कृष्ण हा आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे साक्षी स्वरुपत्व देतो . सगळं हे जे जगामध्ये आपल्याला दिसत ,ज्याला आपण घाबरतो हि एक लीला आहे . हि लीलामय ,ह्या लिलेत आपण राहायचं ,आता म्हणजे एक नाटक आहे ते नाटक आपण बघतो आहे ,आणि ते नाटक बघता बघता आपल्याला असं वाटायला लागत कि आपणच शिवाजी महाराज आहोत . पण एकदा जर का ते नाटक संपलं तर आपल्याला असं वाटू लागत कि अरे हे तर नाटक होत . ह्या नाटकात मी कसा रमलो . तर हे साक्षी स्वरुपत्व येत .

आणि नंतर आज्ञा चक्रावर आल्यावर तुम्ही निर्विचारीटेट येता . आता निर्विचार समाधीला हे करावं लागत ,ते करावं लागत आणि त्राटक करा वैगेरे काही हि करायचं नाही ,कोणाचेच उपाय करायचे नाहीत . आपोआप कुंडलिनी तुमचं आज्ञाचक्र जागृत करून देते . आज्ञाचक्र जागृत झाल्या बरोबर आज्ञाचक्राच्या दोन्ही कडे आपल्या मध्ये अहंकार आणि मन अशा दोन संस्था आहेत ह्या दोन्हीच्या दोन्ही एकदम आत मध्ये ओढून घ्याव्यात किंवा शोषून घ्याव्यात अशा होतात . त्याच्या मुळे आपण केलेली पाप कर्म ,आपण केलेलं जून जे आहे ते सर्व काही ,त्याशिवाय आपल्या मनामध्ये असलेले दुष्ट भाव वैगेरे सर्व काही आतमध्ये ओढून घेण्यात येत . तसाच आपल्यातला अहंकार सुध्दा आत ओढून घेण्यात येतो . ते ओढल्या मुळे ह्या ठिकाणी जागा होते . हि टाळू परत उघडते आणि त्या तुन कुंडलिनी वर निघाली म्हणजे ब्रम्हरंध्रातून कुंडलिनी निघाली . म्हणजे आपण सूक्ष्मात येतो . सूक्ष्मात उतरले म्हणजे तुमच्या मध्ये सामूहिकता जागृत होते . सामूहिकतेचा अर्थ असा कि तुमच्या हाता मध्ये ,ह्या बोटांमध्ये हि पाचसहा चक्र आहेत . ह्या सहा चक्रां मध्ये तुमाला लगेच कळत कि दुसऱ्या माणसाला काय त्रास आहे . म्हणजे दुसरा कोणी नाही आहे ,उपकार कोणावर करायचे ,ते आपल्यातच आहे हे लक्षात येत . हातावर कळत ह्या माणसाचं कोणतं चक्र धरलं आहे ,आपलं कोणच चक्र धरलं आहे आणि ते नीट कस करायचं ते,हे एकदा तुम्हाला सांगितलं कि झालं . त्याला काही औषध दयायला नको काही नको . आपोआप चक्र कस स्वच्छ करायचं हे एकदा कळलं ,कोणच नाव घ्यायचं ,कोणच्या नावावरती उतरत ,कोणचा मंत्र घ्यायचा हे अगदी सोपं काम आहे . ते एकदा समजलं म्हणजे झालं .

पण त्याला एक जागृतच मनुष्य करू शकतो . कुणी काही मंत्र दिला लागले आपले वेड्यासारखे मंत्र मंत्र म्हणायला . अरे पण त्याला काही अर्थ आहे कि नाही . त्याला काहीतरी शास्त्र असायला पाहिजे कि नाही . कि वाट्टेल ते औषध वाट्टेल त्यांनी घ्यायचं अशी पद्धत असू शकते का . अशी असू शकत नाही . आपण लक्षात ठेवल पाहिजे कि कोणच्याही ह्याला शास्त्र असत . तसच मंत्रांना फार मोठं शास्त्र आहे . पण त्याची योजना करणारा मात्र दुर्लभ असतो . हे आपण शिकले तर तुम्ही हजारो लोकांचा उद्धार करू शकता . आणि स्वतःचाही उद्धार करू शकता . पण ह्या सर्व क्रिये मध्ये एव्हडं लक्षात ठेवलं पाहिजे कि हि क्रिया जरी आज आमच्या प्रेमामुळे घडते आहे पण तिची जी पुनर्रचना आणि पूर्णव्यवस्था करायची असते . आणि ती पूर्णत्वाला पोचवायचा जो आत्मबोध असतो तो उभा करायचा असतो . तो मात्र तुम्ही करावा लागतो . त्याच्यासाठी तुम्ही किती मोठे असला ,किती मोठ्या नोकरीवर असलात किंवा गरीब असलात तरी काही असलं तरी काही फरक पडत नाही .

सगळ्यांनी ध्यान केलं पाहिजे . ध्यान कस करायचं ते सगळं तुम्हाला इथल्या सेंटर वर लोक सांगतील . इथे सेंटर आहे चांगलं राहुरी ला खूप काम झालेलं आहे . तुमच्या नगर जिल्ह्यात फार काम झालेलं आहे . आणि मी नगर जिल्ह्याचीच आहे आपल्याला सगळं माहिती आहे माझ्या बद्दल . मी इथलीच आहे आणि हे माझं माहेरघरच आहे तेव्हा माझ्या माहेरघरीच सगळ्यात जास्त काम झालं याच मला फार आश्चर्य वाटतंय . कि सगळ्यांनी एव्हडं कस मला मान्य करून घेतलं . कि माहेरच्या लोकांचं एव्हडं भलं कस झालं . सासर माझं लखनौ ला आहे .व तिकडे काही काम होण्या सारखं दिसत नाही ,तिकडे लोक विक्षिप्त च आहेत . हे माझ्या माहेरघरी एव्हडं कार्य झाल ,इतक्या लोकांनी मान्य करून घेतलं ,तशे सगळेच तुम्ही माझे नातीगोती आहात आणो देवकृपेने सगळ्यांना हा आशीर्वाद मिळावा अशी माझी पूर्ण इच्छा आहे . आणि देवकृपेने हे होईल असं मला वाटत तेव्हा सर्वानी आता ह्या योगाचा लाभ घ्यावा .

एखादा प्रश्न असेल तर विचारा ,पण फार विचारू नका कारण इतकी मंडळी आहेत उगीच प्रश्न विचारायचा म्हणून विचारू नका . परवा एक गृहस्थ आले म्हणे एका पुस्तकात लिहिलंय अरुणोदय आणि अमका उदय तमका उपाय .म्हंटल हे कुणी लिहिलं आहे ? म्हणे विष्णुतीर्थ म्हणून आहेत त्यानी लिहिलं आहे . कोण हे ?,कुठे शास्त्राला आधार आहे का ?नाही ,मग कशाला हे ?हे सगळं खोट आहे म्हंटल . ते अगदी गारच पडले . म्हंटल तुम्ही कशाला आलात ,मला कँसर झाला ,म्हंटल होणारच . तुम्ही खोट्याच्या मागे लागला तर तुम्हाला कँसर होणारच . आता हे पुस्तक जरा जाऊन तुम्ही समुद्रात टाकून या . त्या विष्णुतीर्थना विचारा मला कँसर कसा झाला ते . अहो तुम्ही देवाच्या राज्यात चालले तर तुम्हाला काय रोग झाले पाहिजेत का . तुम्ही गुरु कशाला ठेवला मग त्याच लोणचं घालायचं आहे . तुंहाला कँसर झाला मग तुम्ही गुरु कशाला ठेवलेला आहे . फक्त पैसे घेतो म्हणे ,असं का . मग द्या पैसे त्याला आणि कँसर करून घ्या . अशा तऱ्हेचे नानाविध प्रकार आहेत ,आणि म्हंटल कि म्हणायचं कि माताजी आमच्या गुरूंच्या विरुध्द बोलत होत्या . अहो तुमचे जर सदगुरु असते तर आम्ही तंगड्या तोडत तिथे आम्ही गेलो असतो त्यांना भेटायला . त्या कानिफनाथांच्या समाधीवर आम्ही गेलो लगेच मी म्हंटल हे ठिकाण ठीक करा काय पैसे असतील ते सांगा .जर खरे असतील तर आमचंच आहे ते सगळं . खरे असतील तर आम्हाला हवे नाहीतर काय . पण जे खोटे आहेत ते नको . ह्या खोट्याचा तुम्हाला त्रास होतो ते तुम्हाला सांगायलाच पाहिजे . आई बोलते ते कधी कधी कडू लागत पण हितकारी असत ते . तेच मग शेवटी प्रिय होत . जे आत्म्याला हितकारी ते सांगितलं पाहिजे . आत्म्याचाच आपण आराम पहिला पाहिजे . आत्म्याला ज्यांनी आराम होईल ते केलं पाहिजे . आणि ते झालं म्हणजे शेवटी तुम्हीच म्हणाल आई बर केलं तुम्ही आम्हाला सांगितलं आम्ही सुटलो त्या जंजाळातून . तेव्हा याला पैसे लागत नाहीत ,याला काहीही लागत नाही ,हे सगळं तुमच्या मध्ये आहे ,एक पेटवलेला दिवा दुसऱ्याला पेटवतो तस हे सहज घडत . आता प्रश्न असला तर विचारा . पण मी हे वाचलं आणि ते वाचल असं सांगत नका बसू .

माझं कुल म्हणजे शालिवाहन ,शालिवाहनांचे वंशज आम्ही . आणि शालिवाहनांचं राज्य तुमच्या अहमदनगर जिल्ह्यात होत . तिथेच आत्ता आम्ही आलोय . कळलं का ?कुळ म्हणजे काय ?ज्यांचे आईवडील धार्मिक तो कुळ . ज्याचे आईवडील धार्मिक नाही त्याला काय कुळ असणार ?. त्याची काय थोरवी गायची ?इतके राजेमहाराजे झाले ,शालिवाहनानी देवीच्या शाली वाहिल्या . मंदिर बांधली ,त्यांच्या घरात कोणी दारू पीत नसे ,माझ्या वडलांनी सांगितलं होत कि आमच्या घराण्यावर शाप आहे जर कोणी दारू प्याला तर तो चाळीस वर्षाच्या आत मरेल . आणि हीगोष्ट खरी आहे . कोणचंच व्यसन करायचं नाही . धार्मिक पणाने राहा . त्याला म्हणायचं कुळ . बाकी असं कुळ काय कामाचं कि ज्या कुळात काही दंडक नाही . वाट्टेल तसे वागतात लोक . म्हणून आपण एक कुळ धरून बसायचं हे आमचं कुळ आहे . ज्याला दंडक नाही ते कुळ काय कामाचं . तुम्हीच सांगा . ज्याला दंडक आहे तीच कुलंथोरवी . शिवाजींना म्हणे कि तुम्ही कुणबी तुमचं कुळ नाही . ते बरोबर आहे का . ?अहो काय त्याचं कुळ होत ,शिवाजी म्हणजे कोण होते पूर्वजन्मात ?. जन्मजन्मांतराचं कुळ होत त्यांचं . राजेच ते . सगळ्यात मोठं कुळ जे आहे ते आत्म्याचं कुळ आहे .

विश्वधर्मात आम्ही फक्त आत्म्याचं कुळ मानतो . आणि सगळ्यांचं कुळ म्हणजे आईच कुळ आहे . आईच्या प्रेमात सगळे माझे अशे उत्तम जीव झालेले आहेत . इतके सुंदर त्यापलीकडे आणि कुळ कशाला पाहिजे आम्हाला . जे देवीचं कुळ तेच आमचं कुळ असं मानलं पाहिजे . शिवाजींचे कुळ हे देवीचं कुळ होत हे आपल्याला माहित आहे ना . पण आजकाल आपल्या देवी सुध्दा आपण कुठे पुजतो ?प्रत्येक घरामध्ये देवी आहे ,कुलस्वामिनी आपण तिला म्हणतो तिला आपण म्हणतो हि माझी कुलस्वामिनी आहे . ते खर ते थोरवीच . पण देवी घरात आहेत ,पण तुम्ही तिची इज्जत ठेवलीय का ?त्या प्रमाणे तुम्ही वागता का ?ह्याला कुळ म्हंटल पाहिजे . कोणच्या देवीचे भक्त तुम्ही ?परवा मी रेणुका देवीचे एक भक्त पहिले ,पण म्हंटल आहे काय ,एवढ्या कडक ह्या देवी त्यांचे तुम्ही कुळ आणि हे तुम्ही धंदे कसे करता ?म्हणे माताजी आमचं फार वाईट होत ,म्हंटल होणारच . एकतरी तुम्ही म्हणा कि त्या कुळाचे आम्ही नाही . हेच कूळकलंकी असतात . जे देवीचं कुळ मानत नाहीत . हि कुळ थोरवी ,आणखीन बाकीचं काही लिहिलेलं असलं तर ते ऐकू नका. जी तुमची कुलस्वामिनी तीच तुमची थोरवी . आणि आज पर्यंत मी तर असं ऐकलं नाही कि कुणी देवीने असं सांगितलं कि तुम्ही वाईट काम करा . वाईट मार्गाने जाणारे लोक सुद्धा पत्रिका लिहिताना लिहित ,कुलस्वामिनी जगदंबा . असं का . म्हणून जातपात पेक्षा कुळ बर आहे . पण कुळ म्हणजे कोण तर देवी . आहे कि नाही आपल्या कडे कुलस्वामिनी म्हणजे देवी कि नाही . हि थोरवी तुमची देवीची . आईची . म्हणजे धर्मात तुम्ही कुठे आहात ,कोणच्या देवीवर तुमची भक्ती ?हे तुमचं कुळ आहे . जातीपाती वर कुळ नसत .कुलस्वामिनी एखाद्या साध्या ब्राम्हणाची ,एखाद्या माणसाची ,किंवा एखाद्या दुसऱ्या जातीच्या माणसाची पण एकच असू शकते . कुणी मराठा असो नाहीतर चांभार असेनाका त्यांची आणि ब्राम्हणाची कुलस्वामिनी एकच असते . मग कुलथोरवी काय राहिली हो ?. आता त्यातलं गम्य पाहिलं पाहिजे ,बारीक सूक्ष्म पाहिलं पाहिजे . म्हणजे लक्षात येईल मी काय म्हणते ते . कोणी कुळात जन्म होऊन मोठं झालेलं मी पाहिलेलं नाही . हा पण देवीची सेवा करून झालेलं आहे. त्यांच्या कुळात जी देवी तिची मान्यता करून ज्यांनी सेवा केली ते मोठे झालेले आहेत . शालिवाहनाची देवी म्हणजे आदिशक्ती . तीच शालिवाहन करायचं ,ते जे तुम्ही कुंभ बघता तेच कुंडलिनी हि कुंभ राशी आहे हिची . कुंडलिनीची कुंभ राशी . ते जे तुम्ही कुंभ बघता ते जे शाल आणि त्याच्या वरती त्यांनी कुंभ घातलं आहे . हे शालिवाहनांचं वंशज आहे . ताजे हे काम करत नाहीत ते स्वतःला शालिवाहन म्हणालेट्री आम्ही त्यांना मानायला तयार नाही . कुळाला जे शोभेशे वागतील तेच कुळ . नाहीतर कूळकलंकी . कलंक आहेत ते कुळाचे . अशाना कुळात स्थान नसलं पाहिजे . पण तस काही करत नाही आपण . एखादा माणूस दारू पितो म्हणून तुम्ही त्याला कुळातून काढून टाकत नाही . इतकं गहन आहे ते . अहो साधुसंतांनी सगळं बांधून दिलेलं आहे ,प्रत्येक गोष्टीत बघा शब्द स्वार्थ सुध्दा बघा . स्वार्थ म्हणजे आपल्याला वाटत अप्पलपोटेपणा पण नाही . स्वार्थ स्व चा अर्थ ,स्व म्हणजे आत्मा . साधुसंत म्हणजे इतकं त्यांनी व्यवस्तीत सगळं करून ठेवलं आहे कि आपण गहन झालं पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येईल . आलं का लक्षात कुलथोरवी म्हणजे काय ते . बाकी कुणी काय लिहिलेलं असेल तर विसरून जा तुम्ही . तुमची जी कुलस्वामिनी आहे ,तिला जे मान्य आहे ते करा . पण कुणाला तर माहितीही नसतात त्यांची कुलस्वामिनी कोण आहे ते, माहिती असली तरी तीच काय माहात्म्य ते माहित नसत . तिच्या राज्यात आपण कस वागलं पाहिजे तेही माहित नसत . हि देवी कोण कशाशी खातात तेही माहित नाही . तुम्हाला माहित आहे का शिवाजीचं कुळ काय होत ?कोणची देवी त्यांची ? त्यांच्या कुळामध्ये कात्यायनी देवी ,त्यांच्या तिथेच तिने वध केला होता कात्यायनी राक्षसाचा . कात्यायनी देवी त्यांची . तेव्हा कुणाचं काय कुळ तेही बघितलं पाहिजे . भवानीला ते मानत असत कारण त्यांच्या आईच्या कुळातली ती देवी आहे . आईच्या कुळातली जाधवांची ती भवानी . पण त्यांनी ते गाजवलं नाही . करून दाखवलं . "जो नर करणी करे नरका नारायण होत "लिहिलेलं आहे . करणी कशी तस तुमचं कुळ आहे. नुसतं कुळ घेऊन बसलं कि सगळं होईल का ?म्हणजे कुळ एक आणि वागणं दुसरं . कळलं का कुलथोरवी . आता बोला पुढे . आणि हे कुळ नुसते महाराष्ट्रातच आहेत ,तुम्हाला आश्चर्य वाटेल . महाराष्ट्रातच देवीचं सगळीकडे आहे . साडेतीन वलय सुद्धा या महाराष्ट्रातच आहेत कुंडलिनीचे . नाशकाला आहे आदिशक्तीचे अर्धमात्रा ,माहूर ,नंतर तुळजापूर ,आणि कोल्हापूरची महालक्षीमी . माहिती आहे का तुम्हाला ?इथेच आहे पण ती आहे कि नाही ,त्याचा साक्षात काय ,कस ओळखणार ?हाता मध्ये चैतन्य आल्या शिवाय तुम्ही कस ओळखणार कि हे खर कि खोट . साडेतीन वेटोळे घालून संपूर्ण विश्वाची कुंडलिनी तुमच्या महाराष्ट्रात बसलेली आहे आणि अष्टविनायक चारी कडे तिची रक्षा करत आहेत . आठ दिशेला . पण आपल्याला समजत का हे आहे काय ?अष्टविनायक हे खरे आहेत कि खोटे आहेत . कशावरून खरे ?तुमच्या हातात चैतन्य आल्या शिवाय तुमि कसे ओळखणार . ?गहन आहे हो हे . फार गहन आहे . आपल्या देशातली जी संस्कृती आहे ती फार गहन आहे . आणि अत्यंत जुनी आहे . परंपरागत इतकी सुंदर येता येता मधेच काय ढासळल माहित नाही . मधेच आपण कोलमडलो आणि कोणच्या दिशेला गेलो आणि वरपांगी झालो . आता सगळे जण बसा आता आपण ध्यानात जाऊ . सगळ्यांना आतुरता लागली आहे ,ज्यांना भूक असते त्यांनाच पाहिजे . ज्यांना नसते त्यांना हे सगळं सुचत . तर सगळ्यांना आतुरता आहे कि आमच्या आत्म्याचा प्रकाश आम्हाला मिळाला पाहिजे . ज्यांना अनुभव झाला नाही त्यांनी परत यावं आणि करून घ्यावं आणि ज्यांना आला आहे त्यांनी इथे बसून घ्यावं .

पण नाही आला म्हणजे तुम्ही काय अति शहाणे नाही . स्वतःला फार शिष्ट समजायचं नाही . जर नाही आला तर काही तरी चुकलेलं आहे ,किंवा शरीरात काहीतरी दोष आहे किंवा मन चलबिचल आहे असं आहे . तेव्हा ते ठीक करून घेतलं पाहिजे . त्यात रागवायचं नाही . उलट लोकांना सांगायचं ,कुजबुज करायची नाही . मी गेल्यावरती मग लोक बेडका सारखे उठून बोलायला लागतात . आणि मग लोक जे अर्धवट असतात ते त्याच्यातच फसतात . तेव्हा तुम्ही आपलं भलं करून घ्या . आपला स्वार्थ साधा आणि मुर्खांच्या नादी लागू नका . बर आता सगळ्यांना जी ओढ आहे ती आपण करूयात . ज्यांना जायचं असेल त्यांनी जावं ,मधून उठून जायचं नाही . एक दहा मिनिट अजून बसावं लागेल तेव्हड्यात आत्मबोध होतो . आता गंभीर विषय आहे . अत्यंत गंभीर विषय आहे ,गहन विषय आहे . "येऱ्या गबाळ्याचे काम नोहे "आणि त्या साठी एक मनोवृत्ती पाहिजे . आणि सगळ्यात जी समजून घ्यायची गोष्ट अशी आहे कि प्रसन्न चित्त असलं पाहिजे . आम्हाला देवाच्या साम्राज्यात जायचं आहे आम्हाला प्रसन्न चित्त असायला पाहिजे . हा विचार हि धारणा आतमध्ये बाणली पाहिजे . तर मी हे पाप केलं ,माझं हे चुकलं ,मी असं करायला नको होत ,तस करायला नको होत असा काहीही विचार न करता देव हा प्रेमाचा ,आनंदाचा ,दयेचा सागर आहे ,तो क्षमेचा सागर आहे . तुम्ही अशी कोणती चूक करू शकता जो क्षमा करू शकत नाही . तो सर्व तुमच्या चुका क्षमा करायला तयार आहे . आतुर आहे . कारण तुम्ही सगळे भक्त आहात .

भक्त तो जो देवाशी मिळाला ,नाहीतर विभक्त . असं सर्वानी देवाला सांगायचं कि मी काही दोष केलेला नाही . माझं काही चुकलेले नाही . मी तुझ्या चरणी आहे ,मला स्वीकार . आता गळ्या मध्ये माळ वैगेरे असेल तर काढून टाका . मंगळसूत्र वैगेरे काढू नये ,पण माळ असेल तर काढून टाका . गळ्याला जर जोरात काही बांधलं असेल तर काढून टाका . दुसरं ब्रम्हरंध्र छेदाय च आहे तेव्हा टोपी वैगेरे असेल तर काढू न टाका . कारण आपल्या आई कडे आपण टोपी वैगेरे घालून जात नाही . मी काही गुरु बिरू नाही आहे . तेव्हा टोप्या काढलेल्या बऱ्या . मी सांगते तस ऐकून घ्या . सगळ्यांनी ऐकून करा नाहीतर म्हणाल आमचं झालं नाही . टोपीवर सुध्दा लोक अडकतात हो . टोपी काढा म्हंटल कि लोक म्हणतात आम्ही नाही काढणार . मग काय ती कुंडलिनी उठणार आहे का तुमची ?पर्वता सारखी उचलावी लागते मला मेहनत एव्हडी पडते तुम्हाला काय सांगू ?आणि तुम्ही लहान मुला सारखे हट्ट करून बसलात तर कस होणार आहे . हट्ट सोडला पाहिजे . मला हे झालच पाहिजे आई असं म्हणायला पाहिजे .

आता स्वतः कडे आपण एक मंदिर आहोत आणि आपल्या मध्ये हा आत्मा आहे तो पेटवला गेला पाहिजे अशा वृत्तीने बघितलं गेलं पाहिजे . स्वतः वरचा राग सोडला पाहिजे , स्वतःला पहिल्यांदा क्षमा केली पाहिजे . आणि सर्व जे लोक आहेत त्यांनाही क्षमा करा . पुष्कळ लोक सांगतात कि माताजी तुम्ही आम्हाला क्षमा करायला सांगता पण आमच्याच्याने होत नाही . मग तुमचं होतंय काय ?तुम्ही जर कुणाला क्षमा करता तर त्यात तुम्ही काय केलेलं आहे ?काहीच नाही ,आणि नाही करून तरी काय केलंय फक्त एव्हढाच कि जेव्हा क्षमा नाही केली तेव्हा त्यांचा जो छळ आहे तो तुम्ही सहन करता ,त्यांच्या हातात तुम्ही खेळून राहिले . समजलं का ?म्हणून असं म्हणायचं माताजी मी सगळ्यांना पूर्ण मनाने क्षमा केली . प्रसन्न चित्त बसायचं ,मी सगळ्यांना क्षमा केली असं म्हणायचं . आणि देवा तुही मला माझ्या चुका बद्दल क्षमा कर असं म्हणायचं .

नंतर आता दोन्ही हात असे माझ्या कडे करून बसायचं . अगदी आरामात बसायचं . चष्मा असेल तर ते हि काढून ठेवा . डोळे पूर्ण मिटून ठेवा . आता ह्या पुण्यभूमीला नमस्कार करून आपला हात जमिनीवर ठेवायचा . लक्ष तुमचं डोक्यावर कडे असलं पाहिजे .

कबीरांनी म्हंटल "जब मस्त हुए फिर क्या बोले ". आता काय बोलायचं सगळं आनंदा मध्ये ,मौनात सगळं त्याचा आनंद उचलायचा हे मुख्य काम आहे . त्या आनंदात रहायचं . सगळं विसरून जा आता . नवीन जगात एक नवीन माणूस म्हणून तुम्ही आलेले आहात . ते कस पुढे चालवायचं तेव्हडे मात्र शिकून घ्यायचं . पण एव्हडं लक्षात ठेवलं पाहिजे कि आज सर्व जगाची एक सर्वात मोठी आपल्याला वस्तू मिळाली आहे जी सर्व लोकांना अतिमानव बनवणार आहे ती आहे . तेव्हा त्याच महत्व लक्षात ठेवून ,हे सगळ्यांना झालं पाहिजे असं लक्षात ठेवून सगळ्यांनी इकडे लक्ष दिल पाहिजे आणि थोडा तरी वेळ सहजयोगासाठी दिला पाहिजे . एकदा तुम्ही यांच्यात रममाण झालात कि सगळी कार्य व्यवस्तीत होतील ,तुम्हाला काही काळजी करायला नको ,सगळे आजार जाऊन तुम्ही आनंदाच्या राज्यात गेले म्हणजे आमची भेट होईल तिथे .

आत दुसरं मी पाहिलं आहे दर्शन करायचं नाही म्हटलं कि लोकांना राग येतो . कारण आपल्याला सवय आहे दर्शनाची ,आणि त्यात एक सवय आहे धक्के खाल्ल्या शिवाय दर्शन होत नाही ,धक्के हे दर्शनात चार खाल्लेच पाहिजेत नाहीतर दर्शनच घेतलं नाही असं वाटत . मी तयार आहे दर्शनाला पण आधी बायकांना येऊद्या ,नंतर पुरुष . अनंत आशीर्वाद .

Sangamner (India)

Loading map...