Public Program - Rahuri School 1984-02-23
23 फेब्रुवारी 1984
Public Program
Rahuri (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
फत्तेबादच्या या एज्युकेशन सोसायटी चे फार उपकार आमच्यावर आहेत असं वाटत मला .कारण पूर्वी हि मी फत्तेबदला आले होते आणि या ठिकाणी परत एकदा प्रोग्रॅम झाला तर बरा अशी माझी फार इच्छा होती .आणि त्या इच्छे प्रमाणे आज हे घडून आलं .त्या बद्दल या शाळेचे जे मुख्य अध्यापक आहेत त्यानं चे मी फार आभार मानते .तसेच इथले शिक्षक वर्ग ,विद्यार्थिनी आणि विध्यर्थी आणि फत्तेबाद शहरातील भाविक ,सात्विक अशी मंडळी या सर्वाना आमचा नमस्कार .आपल्या समोर सहजयोग म्हणजे काय आता व्यवस्तीत रूपाने चव्हाण साहेबानी मांडलेलं आहे . रस्त्याने चालताना कुणाशी बोलत नाही जस काही कुणी घरात मेल आहे ,सुतक पाळतात असेच ते वागत होते .तर त्यांना विचारलं तुम्हाला असं का वाटतंय ,तुम्ही दुःखी का .तर ते म्हणतात आम्ही एव्हडी धावपल केली सगळं काही मिळवलं पण आमची चूक झाली नसेल ना काही .तुकाराम बुवांनी कोणती चूक केली नाह ज्ञेनेश्वरांनी कोणती चूक केली नाही आणि ते आनंदात होते म्हणजे त्यांच्या त काहीतरी आपल्या पेक्षा विशेष होत .हे लक्षात आणलं पाहिजे .आता आपली मी प्रतिज्ञा ऐकली फार आनंद झाला आणि मला अगदी आनंदाश्रू आले .संत साधू ज्या भूमीवर जन्माला आले आणि रामाला सुद्धा आपल्या पायातल्या वहाणा काढून अनवाणी चालावं लागलं अशी पुण्यभूमी बघण्या साठी म्हणून हे लोक आले पण आपल्याला मात्र त्याची कदर नाही .आपल्याला त्याची माहिती नाही .त्याला कारण असे आहे कि हि जी मंडळी येत आहेत त्यांना काहीतरी मिळालेलं आहे ;आणि जे मिळालाय त्यामुळे त्यांना समजत कि हि भूमी काय विशेष आहे .तुम्हाला तेव्हा जाणवेल जेव्हा तुम्हाला आत्मसाक्षात्कार भेटेल .नामदेवांनी सांगितलं आहे फार सुंदर कि आकाशात पतंग उडते आणि मुलगा हातात पतंग उडवत आहे पण जरी तो सगळ्यांशी बोलतो आहे पण त्याच लक्ष पतंगा कडे आहे .तस तुमचं लक्ष जर एकाग्र झालं तर इतकी सोपी गोष्ट आहे कि तुम्ही चटकन आत्म्याला प्राप्त होता .म्हणजे त्याला प्राप्त झाल्यावर काय होत ,माणसाला काय होत ,म्हणजे तो माणूस समर्थ होतो .समर्थ म्हणजे तुम्ही जे आहात त्याचा तुम्हाला अर्थ लागतो .आता समजा असे एक मशीन आणून ठेवलं आहे इथे तुमच्या समोर याचा संबंध जर आम्ही विजेशी लावला नाही तर याला काही अर्थ नाही .तसच तुमचं झालं आहे तुमचा संबंध जर परमेश्वराशी लागला नाही तर तुम्हाला काही अर्थ नाही .तेव्हा तुम्ही समर्थ होता म्हणजे तुम्हाला तुमचा अर्थ लागतो .तुम्हाला कळत कि तुम्ही संसारात आले का ,तुमचं माहात्म्य काय .तुमची शक्ती काय आहे .आणि एकदा ती शक्ती चालू झाली म्हणजे तुमचं शिक्षण ,तुमचं हे सगळं काही आहे त्याला बहर येतो .त्याला सौन्दर्य येत ,त्याला रूप येत .आणि त्या शक्ती तुन तुम्ही इतरांचं भलं करू शकता .त्या शक्तीतून तुम्ही सगळ्यांचं ठीक करू शकता .पण बहुते होत काय कि आपण या गोष्टींचं माहात्म्य ठेवत नाही .आपल्याला बाह्यतलं माहात्म्य दिसत .आपण झाडाकडे बघतो कि झाड हे फार छान आहे .असं झाड सारखं झालं पाहिजे .पण हे झाड सुद्धा त्याची मूळ ठीक नसली तर हे झाड सुद्धा मारून जाणार .तसच आहे आपलं शिक्षण हे ठीक असलं पाहिजे ..पण त्याच्या मुळात आपल्याला जायला पाहिजे .आताच आपण सरस्वती ची वंदना केली ,पण आता सरस्वती पर्यंत पोहोचलं पाहिजे .तिची शक्ती आपल्या पर्यंत वाहत अली तरच आपण सरस्वतीचे पुत्र होऊ .नाहीतर नुसते शिकलेले उडाणटप्पू लोक होऊ शकतात ,वाटेल तसे लोक होऊ शकतात ..जगामध्ये शिकलेले सर्व लोक काही फार चांगले नाही आहेत .पण ह्या मुळात उतरायला पाहिजे .आणि ते उतरण्या साठी आत्मसाक्षात्कार व्हायला पाहिजे .आता हि जी आत्मसाक्षात्काराची जी योजना आहे ती परमेश्वराची केलेली आहे त्याच्या साठी तुमच्या मध्ये कुंडलिनी म्हणून शक्ती आहे ती शुद्ध इच्छा आहे .ती शुद्ध इच्छा जर जागृत झाली तर मात्र तुम्हाला आत्मसाक्षात्कार होणार कारण ती एकाच शुद्ध इच्छा तुमच्या मध्ये आहे .कि तुमचा संबंध परमेश्वराशी झाला .आणि परमेश्वराशी संबंध होणं हीच खरी एकच तुमच्यात आहे .बाकीच्या सर्व इच्छा आज तुम्हाला वाटेल मॅट्रिक पास झालो .तरी तुम्ही सुखी होणार नाही आहे .उद्या वाटेल मोटर घ्यावी तरी तम्ही सुखी होणार नाही ,परवा वाटेल घर बनवावं तरी तुम्ही सुखी होणार नाही .सुखी कधी व्हाल जेव्हा तुमचा संबंध परमेश्वराशी होईल .तेव्हा हि शुद्ध इच्छा जागृत झाली पाहिजे ,हि कुंडलिनी आपल्या मध्ये जागृत झाली पाहिजे हि सर्वानी इच्छा धरावी .म्हणजे आपण शक्तिमान होऊ ,आपल्यातून शक्ती वाहायला लागेल .हि जी सर्व शक्ती झाडांना हिरवं करते ,नंतर जेव्हडी जिवंत कार्य संसारात करत आहे ती शक्ती सगळीकडे अणुरेणू त पसरलेली आहे .ती शक्ती आपल्या हातातून वाहू लागली म्हणजे आपण समर्थ होणार आणि आपण शक्तिमान होणार .हे आमच्यात घडावं ,शहानी लोक आहेत असं मला वाटलं आणि त्यामुळे मी म्हणत होते कि मला फत्तेबदला परत एकदा अवश्य प्रोग्रॅम घ्यावा .म्हणजे तिथल्या लोकांची भेट परत होईल आणि मग त्यांना परत समजावून सांगण्यात येईल कि सातत्याने सहज योग केला पाहिजे .जरी तुम्ही पार झाले ,समजा याच कनेक्शन आम्ही लावलं पण ते सातत्याने राहील पाहिजे .कृष्णाने असं सांगितलं आहे कि तुमचा योग् झाल्यावर आम्ही तुमचे क्षेम बघू .म्हणजे सगळं तुमचं भलं बघू म्हणजे तुमचं ,राहणं ,खान पिणं जे काय लक्ष्मीतत्व आहे ते सगळं काही आम्ही तुमचं बघू पण पहिल्यांदा योग घ्या असं सांगितलं .पण त्याच्या आधी सांगितलं कि नित्यभियुक्तानं ,म्हणजे तुम्ही सातत्याने परमेश्वराशी संबंधित राहील पाहिजे .सगळं लक्ष तुमचं परमेश्वराकडे असलं पाहिजे .पण नुसतं म्हणून होणार नाही ,आता तुमचं लक्ष माझ्याकडे आहे ,मी जर म्हंटल तुमचं लक्ष तुम्ही आत मध्ये घेऊन जा तर तुम्ही नेऊ शकत नाही .ते कस घडणार ,त्याच्यासाठी जेव्हा कुंडलिनी जागृत होते जेव्हा हि घटना घडते तेव्हा तुमचं लक्ष आपोआप आतमध्ये जात आणि तुम्ही जागृत होता .तुमच्या हाता मध्ये थंड थंड अशा लहरी येतात ,डोक्यातून तुमच्या अशा थंड थंड अशा लहरी कुंडलिनीच्या येतात .पण नंतर हळू हळू ते विरून जात कारण तुम्ही सातत्याने ते करत नाही .म्हणून आज जरी मी आले असले तरी माझी अशी कळकळीची विनंती आहे कि सर्वानी सहजयोग हा सातत्याने केला पाहिजे .एकतर चिश्तीला ते मुसलमान साईनाथान सारखे होते .चिस्ती चे फार मोठे अवलिया होऊन गेले .त्यांना अवलिया म्हणतात ,जस आपल्याकडे आपण म्हणतो ना साधू तसे ते तिकडे अवलिया तर त्यांचे एक पुतणे होते त्याना मी विचारलं तुमची जात काय ,ते म्हणे अवलिया कि क्या जात होती है मा .खरी गोष्ट आहे ,योग्याला काय जात असते काय ,संन्याशाला जात नसते तस योग्याला जात नसते .जात नाही पात नाही सगळे आपण एकसारखे ,सगळे एक झालोत .असं एकीकरण झालं पाहिजे .म्हणजेच प्रेम भाव वाढणार .परमेश्वराच्या सामराज्यात सगळे एकाच आहेत .आपणच हे वेगळं वेगळं काढलं आपल्या बुद्धीने .आणि अहंकार ने भांडण लावली आहेत .कोणीही माणूस वेगळा नाही सगळे परमेश्वरा चे अंगाचे अंग प्रत्यंग आहोत आपण फक्त जागृत नाही म्हणून असं वाटत वेगळं वेगळं .जागृत झाल्यावर कळत कि सामूहिक चेतनाच येते तुमची चक्र कुठे धरली ,यांची चक्र कुठे धरली ,त्यांची चक्र कुठे धरली .कळलं कि नाही .आणि बरोबर समजत काय होतंय म्हणजे तुमची चेतनाच विशेष साक्षात्कारी चेतना होते .तर तुम्हाला साक्षात्कारी होऊ नका असं तर कुणी संतांनी तुम्हाला सांगितलं नाही .सांगितलं का कुणी नाही ना .तेव्हा समजूतदार पणा पाहिजे म्हणून माळ नाही घालायची .कारण आम्हाला आता माळ कशाला काम झालं आमचं ,मोटर कशाला आता काम झालाय आमचं आता इथे बसायचं आहे .मग मोटर सोडली पाहिजे .त्याला तरी कशाला चिकटून राहील पाहिजे .म्हणून माळ नाही घालायची कुणी तुम्ही माळ घातली समजा ,उद्या दुसऱ्यांनी काय घातलं ,तिसऱ्यानी काय घातलं म्हणजे काय होणार त्याला काय अर्थ आहे .आता यांच्यात फक्त सगळ्यांनी परमेश्वराची माळ गळ्यात घालायची .ती दिसत नाही .पुष्कळ लोक टोपी उतरून परमेश्वराच्या आशीवादाला झुकलं पाहिजे आणि त्याचा आशीर्वाद आत्मसाक्षात्कारा शिवाय पूर्ण होत नाही .आणखीन काही प्रश्न आहेत का .छान प्रश्न विचारलात तुम्ही लहान प्रश्ना वरून फार मोठ्या गोष्टी सुचतात .कसलंच बंधन पाळायचं नाही फक्त आत्म्याचं बंधन आहे .मला सांगा कि बुक्का लावून कोणाचं भलं झालाय का .विचारायचं ना कि बाबा बुक्का लावून कोणाचं भलं झालंय का पण माताजी म्हणतात कि कोणाचं भलं नाही होत यानी .मग का नाही ऐकायचं माताजींचं .त्या काही आम्हाला वाईट सांगत नाहीत .त्यांना काही पैसे नको आहेत आमच्या कडून .म्हणू नका मनातच ठेवा, हसू नका .मुलांनी जरासं गंभीर राहील पाहिजे .तू आम्हाला आशीवाद दे असं तीनदा तिला नमस्कार करून म्हणायचं ती पुण्य भूमी आहे .तिच्याच पुण्ययाने एव्हडं मोठं कार्य होऊन राहील आहे .आता डोळे मिटून मुलांनी शांत राहील पाहिजे .आणि डोळे मिटून गणेशाला म्हणायचं कि श्री गणेशा तू माझं रक्षण कर हा माझा मोक्षाचा क्षण आहे .तू माझं या वेळेला रक्षण कर .थिल्लर पणा करायचा नाही आणि हसायचं नाही .सांगितलं ना येऱ्यागबाळ्याचे काम नोहे .आता शांत बसा .डोळे मिटून बघा येतंय का ,डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर .आता उजवा हात माझ्या कडे आणि डावा हात असा वर करायचा .आता बघा उजव्या हातात थंड येतंय का .मुलींना येतंय .आता परत उजवा हात जमिनीवर आणि दावा हात माझ्याकडे ,बघा गर येतंय का .पृथ्वी तत्वात तमोगुण चाललेलं आहे .जर अगदीच मांसाहार नाही केला ,प्रोटीन नाही खाल्लं तर तमोगुण वाढतात .आणि हे जास्त खाल्लं तर रजोगुण वाढतात .म्हणून संतुलन असायला पाहिजे .आता येतंय का ,आता दोन्ही हात माझ्या कडे करा .ज्या हातात थंड येत नाही तो हात माझ्या कडे करा .डावा हातात येत नसेल तर तो माझ्या कडे करा आणि उजवा हातात येत नसेल तर तो माझ्याकडे करा .डोळे मिटा .विचार करायचा नाही .आता तुम्ही शिस्तीत राहायचं तुम्ही योगिजन झाले आता .आता सगळ्यांना मी माझा फोटो देणार आहे .बर आम्ही येतो आता .