Public Program

Public Program 1973-09-16

Locatie
Duur van de lezing
71'
Categorie
Openbaar Programma
Gesproken Talen
Marathi
Audio
Video

Huidige taal: Marathi. Lezingen beschikbaar in: Marathi

De lezing is ook beschikbaar in: Engels

16 सप्टेंबर 1973

Public Program

Pune (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED

जगातल्या पाठीवर कुठंही चर्चिला गेलेला नाही जितका आपल्या भारत वर्षात झालेला आहे कारण हिंदुस्थान ज्याला आपण पूर्वी भारतवर्ष म्हणत होतो, हि एक योग भूमि आहे. बाकी सगळ्या भोग भूमि आहेत. हिच एक योग भुमि आहे आणि म्हणून इथे फार मोठमोठ्या प्रवृत्तींनी म्हटलं पाहिजे किंवा देवांनी अवतार घेतलेले आहेत आणि ह्या भूमीतच ह्या विषयावर हजारो वर्षांपासून म्हणजे कृष्णाला जर ६ हजार वर्षे झाली असतील तर रामाला जवळ जवळ ११ हजार तरी वर्षे झाली असतील आणि त्याच्या आधी कितीतरी आधीपासन वेदात वगैरे, इतिहासकार कदाचित त्यांना पटायचे नाही माझे म्हणणं पण हजारो वर्षांपासून ह्या भारतवर्षामध्ये तपस्वी मुनींनी जे द्रष्टा होते त्यांनी आत्मसाक्षात्कारावर पुष्कळ काम केलेले आहे.

पण आजकाल त्यांच्याबद्दल वाचतंय कोण? त्यांच्या बदल जाणतंय कोण? आपण हिंदू हिंदू म्हणून लोक फार गर्वाने फिरतात आणि मी बघते कि प्रत्येक गोष्टीमध्ये उठलं कि आम्ही हिंदू आहोत, म्हणजे आम्ही काहीतरी विशेष आहोत अससुद्धा पुष्कळ लोकं स्वतःला समजतात, पण ज्या आदिशंकराचार्यांनी ज्यांनी हिंदू धर्माची स्थापना वगैरे ज्यांनी केलेली आहे, त्यांनी जे तत्त्व या संसारात मांडलेले आहे, त्यांनी जी चैतन्यावरती कामं करून त्याचं निरूपण केलेले आहे त्याबद्दलच छातीठोकपणे साऱ्या संसारासमोर इतकी मोठ्यापणे सत्य मांडलेली आहेत, ते कोण जाणतंय? त्याच्याबद्दल कोणाला माहिती नाही. फक्त ब्राह्मण हा पूजेला पाहिजे अश्यारीतीने आपल्याबद्दल एक कल्पना डोक्यावर चालवली आहे. पण ब्राह्मण म्हणजे कोण? हे सुध्दा जे त्यांनी सांगितलेले आहे, कि ब्राम्हण तो, ज्याचा दुसऱ्यांदा जन्म झालेला आहे. आणि तेच कृष्णांनी सांगितलेले आहे, तेच सगळ्या मोठ्या लोकांनी सांगितलेले आहे. म्हणजे महंमद साहेबांनी सुद्धा तेच सांगितलेले आहे, आपले साईबाबा आहेत शिर्डीचे त्यांनी सुध्दा तेच सांगितलेले आहे, नानक होते त्यांनी तेच सांगितलेले आहे, जनकांनी तेच सांगितलेले आहे, झोरास्त्ररांनी तेच सांगितलेले आहे.

प्रत्येक देशात कुठेही सत्य जन्माला आले तर ते सत्य काय आहे हेच सांगितले आहे.आज तुम्ही इथे उभे आहात आणि मी जर पांढरी साडी नेसलेली आहे, आणि तुम्हाला जर डोळे असतील तर तुम्ही सगळ्यांना जाऊन काय सांगाल की माताजी पांढरी साडी नेसलेल्या आहेत. तुम्हाला काही दुसरं तेव्हा दिसेल जेव्हा तुमच्या डोळ्यावरती काहीतरी गुंगी तरी असेल किंवा डोळाच नसेल. ज्यांना डोळे होते त्यांनी सत्य एकच सांगितलेले आहे. आणि सत्य हे एकच आहे आणि त्याचा मार्ग सुध्दा एकच आहे आणि सगळ्यांनी एकच मार्ग सांगितलेला आहे. फक्त आपण वेड्या सारखे इकडे भांडत बसलोय. एकातनं अनेक झालो तरी आपण एकच मुळावर आहोत हे समग्रतेत उतरल्याशिवाय समजणार नाही. आणि ते उतरण्यासाठी माणसाला आत्मसाक्षात्कार झाल्याशिवाय ते जमणार नाही. आता थोडंसं दुसरं काही सांगितल्याबरोबर पुष्कळ गीता भाष्यकार वैगरे जर इथे बसले असतील तर ते सुध्दा माझ्यावर बिघडू शकतात. ह्या जन्मामध्ये कोणी क्रॉस ब्रीसवर चढवत नाहीत किंवा रामाला वनवास झाला तसा मला तुम्ही वनवासात वगैरे पाठविणार नाहीत अशी मला अजून खात्री वाटते, अजून.

गीतेतसुध्दा कृष्णानें पहिल्यांदा फार छातीठोकपणे, म्हणजे त्यांना भ्यायच काही कारणच नव्हतं, छातीठोकपणे सांगितले आहे कि त्याला तू आतमध्ये जाणुन घे. अर्जुनाला स्पष्ट सांगितले की त्याला (आत्म्याला ) जाणलंच पाहिजे. तो जाणल्याशिवाय तो झाल्याशिवाय बाकी सगळं काही व्यर्थ आहे. हेच उत्तम आणि तेच मिळविले पाहिजे. मग बाकीचे जे सांगितले असेल ते का? असा प्रश्न लोकांना पडतो. कृष्णात आणि माझ्यात तोच फरक आहे, आणि तो राहणार. कृष्ण हा राजकारणी पुरुष होता आणि त्याला माहित होते की महामूर्खांच्या डोक्यामध्ये राजकारण खेळल्याशिवाय अक्कल येत नाही. जर त्यांना सरळ तोंडाने सांगितले कि हे करा तर ते कधीही करणार नाहीत. उलट मार्गानं जातील, म्हणून त्यांना सांगायचं बर तेही करा, तेही करा, तेही करा. आणि शेवटी मग धडपडत इकडे या. ते म्हणजे असं आहे की उदाहरणार्थ आपण असं बघूया, की एक मुलगा गाडीवर बसलेला आहे आणि त्याचं घोडं बाहेर मागे बांधलेलं आहे आणि तो गाडी हाकतो आहे. त्याचे वडील आतमध्ये आले आणि त्याला सांगितलं, "तु हे काय करतोय? तू घोडं पुढे करून घे म्हणजे तुझी गाडी पुढे जाईल." तर तो मुलगा म्हणतो, "नाही, मी असंच घोडं हाकणार, आणि माझी गाडी पुढे जाईल." तर ते म्हणतात, "बरं हाक हं, थोडंसं हाकून बघ." पण त्याच्यामध्ये राजकारण आहे तरी म्हणजे ते राजकारण सर्व चैतन्यमय डिव्हाइन [ईश्वरीय] आहे. त्या राजकारणामध्ये फार मोठा खेळ आहे. त्याची लीला आहे फार मोठी. मग वडील म्हणतात, "हो हो, तू अगदी असच कर. खूप मार आणि गाडी चालव." म्हणजे कसं की त्यांनी सांगितलं की तू त्या चैतन्याला आपल्या आतमध्ये जाण, त्या चैतन्यामध्ये जागा हो आणि त्याला अनुभव. हेच सत्य आहे, हेच पुरुषार्थाचं कार्य आहे . पण अर्जुनाला ते पटलं नाही. त्यांनी विचारलं " हे काय? तू मला सांगतो कि त्याला तू आतमध्ये जाण आणि इकडे सांगतोस कि युद्धावर जा. म्हणजे हे कसं काय?"

अर्जुनाचा अर्थ त्याला तरी कळला कि नाही माहीत नाही. पण कृष्णाला एवढं मात्र कळलं कि ह्यांना हे जमायचं नाही. अजूनहि स्थिती नाही. कृष्णांनी सांगितलं होत कि तू त्याला जाण आणि साक्षी हो. मग तू रणांगणात असलास, स्मशानात असलास, घरात असलास, वनात असलास, जनात असलास तरी तिथंच आहे. पण जेव्हा त्यांनी म्हटलं कि "असं कसं शक्य आहे?" तेव्हा तो म्हणाला "बरं दुसरा मार्ग आहे." तो काय? आता ह्याच्यात राजकारण आहे पण त्यातही डिप्लोमसी बघा त्याची किती. त्याला सांगितलं कि, "तू कर्म कर आणि कर्माचं फळ तू देवावर ठेव." आता हे बघा हं, कृष्णाची माखन चोरी कशी असते. तुम्ही जर कर्म करता आणि तुमच्यात कर्ता जर तुमच्यात जागृत आहे, हे मी करतो आहे असं कळलं, आणि असं वाटत असतं रात्रं दिवस, कि मी हे करतो आहे तेव्हा त्याचं फळ तुम्ही देवावर कसं घालणार? अशक्यातली गोष्ट आहे. जेव्हा तुम्ही जे कार्य करता, तेव्हा त्याचं फळ तुम्ही देवावर घालू शकत नाही. आणि असं जे लोक म्हणतात. पुष्कळ लोक असेही मी ऐकलेले आहे कि अहो आम्ही जे जे करतो त्याचं सुध्दा आम्ही सगळं फळ देवावर टाकतो. म्हणजे अगदी नाटक आहे हं खोटं, कधी सत्य नाही.

जोपर्यंत तुम्ही काही करता, तोपर्यंत त्याचं फळ तुम्ही देवावर टाकूच शकत नाही. फक्त काही जर तुमच्या हातुन घडलं, म्हणजे सुर्याचा प्रकाश आहे. अकर्मात तो उभा आहे. वाहतोय प्रकाश. तो काही म्हणत नाही, मी काही करतो. म्हणून कोणी काही सूर्याला दहा शिव्या दिल्यात काय किंवा त्याचं वंदन केलं काय, हे सगळं एक सारखं. नदी वाहतेय, नदीला काही वाटत नाही कि मी वाहतेय की माझ्यातून पाणी वाहतंय, त्याच्यातून जीवन वाहतंय, कि लोकांना पाहिजे. ती आपली वाहतेय. सुकली तर लोक शिव्या देतील. दिल्या तर बरं नाही दिल्या तर बरं. ती काही करतच नाही. ती नुसतीच वाहतेय. जो काही करत नाही फक्त त्याच्या हातून घडत आहे, त्याचं आपोआपच ऑटोमॅटीकली त्याचं कार्य जे आहे ते परमेश्वरावर आहे. त्याचं फळ आणि कार्य सगळंच परमेश्वरावर असतं. तो जे काही करतो ते सगळंच परमेश्वराचं असतं. तो नुसता साक्षी बघत असतो. तेव्हा जे आपल्याइथे कर्मयोग वगैरे लोक घेऊन बसलेले आहेत त्यांना मला स्पष्ट असं सांगावंसं वाटतं कि ह्याच्यात कृष्णाची माखनचोरी ओळखून घ्यावी. इतकं भयंकर विचार आहे विद्वान मनुष्य आहे. त्याला मी जितकं ओळखते फार कमी लोक ओळखत असतील. इतकंच नव्हे तर माणसाची चातुरी तो ओळखत होता आणि मनुष्याचा अहंकार जरा जरा गोष्टीला दुखावतो.

पण आईचं तसं नाहीये. आई जर बाहेर आली आणि तिने पाहीले कि हा मुलगा आपला बडवीत सुटलाय त्या ह्याला [गाडीला], जी गाडी तिचं घोडं मागं आहे तर ती त्याला सांगेल, "काय वेड्यासारखं करतो? चल ते घोडे पुढे कर आणि चालू कर." आई म्हणेल, आई सरळ सांगेल, "हे चुकलेलं आहे. हे काहीतरी कशाला बरळत बसतो?" वडील तिकडे हसत उभे राहतील, बघूया कसं काय चाललंय? हा फरक आई आणि वडिलांचा आहे. कर्मफळ देवावर टाकता येणारच नाही जोपर्यंत तुम्ही अकर्मी होत नाही. तुमच्या हातून काही कर्मच होत नाही. नुसतं घडतंय असं जोपर्यंत तुमचं होणार नाही तोपर्यंत कर्मफळ आपण देवावर टाकू शकत नाही.

आता आपले डाॅक्टर आहेत. आजच आम्ही एका पेशंटला बघायला गेलो. भयंकर आजारी आहेत ते. अनकाॅन्शियस [बेशुध्द] आहेत, साडेतीन वर्षांपासून होतंय. झालं, प्रेम द्यावं, दिलं! मग? बरे होतील कि नाही होतील, "काही सांगता येत नाही." आम्हाला काय वाटलं? बरं वाटलं कि वाईट? "काही झालं नाही, आम्ही नुसते गेलो होतो द्यायला. जागृती झाली" एवढं म्हटलं. झाली! आम्ही केली असं कोणी काही म्हंटलं नाही. ते म्हणाले, "जागृती झाली काहीतरी, काही नाही." पण ते जर नुसते डाॅक्टर असते आणि रिअलाईज्ड [साक्षात्कारी] नसते तर म्हणाले असते कि, "अहो असं आहे कि मी इतकं केलं, हे तुमच्यासाठी मी केलं. ह्यांना मी बरं केलं किंवा मी ह्यांचं वाईट केलं." हा मोठा भारी फरक आहे दोन्ही गोष्टीत.

तेव्हा आपलं कर्म फळ आम्ही देवावर टाकतो असा जे लोक विश्वास घेऊन चालतात ते स्वतःच्या भ्रांतीतच नाही तर आपल्यासाठी ती मोठी भारी एक विजयभ्रांतीची फळे मिळाली आहेत, अश्या खोट्या भ्रामकल्पनेत राहून आजपर्यत कधी परमात्मा त्यांना मिळाला नाही. आणि ज्यांना मिळवायचा नाही ते अश्याच कल्पनेत फिरून फिरून अनंत जन्माला पावतात आणि अनंत जन्म घेऊन सुध्दा त्यांना काहीही मिळत नाही. आणि असा ज्यांना विचार करायचा त्यांनी खुशाल करावा कृष्णाच्या भाषेत. पण मी असे म्हणेन, थोडासा इकडेही विचार करा बरं! एवढंच म्हणेन कि मुलांना ऐकायला नाही आलं लवकर, समजलं नसतील, अजुन जरा समजावून सांगावं. बघायचं, पटतं कि नाही.

पुढे त्यांनी भक्तीचं सांगितलं, भक्ती आहे. पण बघा त्याच्यात काय डिप्लोमसी [मुत्सद्देगिरी, चातुर्य] शब्द आहे बघा. अनन्य भक्ती कर. पुष्पम फुलम तोयम. काही असलं तर ते मी स्वीकार करीन, स्वीकार करतो पण देतोस काय? देतो काय तेव्हा त्याने बरोबर सांगितलेले आहे कि तुम्ही अनन्य भक्ती करा. अनन्य हा शब्द संस्कृतात जाणणारे इथे पुष्कळ पुण्याला आहेत. अनन्य म्हणजे दुसरा कोणी नाही. आणि दुसरा जेव्हा कोणी नसतो, तुम्हीच तो होऊन जाता तेव्हा कोणाची भक्ती करायची बुवा? बघा आता, अनन्य भक्त आम्ही! अहो म्हणजे अनन्य भक्त! अहो अनन्य भक्त कसे होणार तुम्ही? अनन्य झाले म्हणजे तुम्ही साक्षात्कारी आहात. ज्यावेळेला तुम्ही अनन्य झाले तरी साक्षात्कार होतात. मग तुम्ही भक्तीच्या रसात उतरता. भक्ती करायची काय? उठले तर भक्ती, बसले तर भक्ती, चालले तर भक्ती, मग भक्ती तर भक्ती म्हणजे काय?

परमेश्वराच्या हातात जर मुळी खेळणं झालात तर तोच भक्त. मग त्याने उचललं काय, बसवलं काय, चुलीत घातलं काय, किंवा क्रुसावर टांगलं काय, काहीही केलं तरी ती भक्तीच! जे काही तो मनुष्य करेल ते सगळं परमेश्वराच्याच हातातलं खेळणं असल्यामुळे तो काही करतच नाही. भले ही इकडे बघ. आता ह्याच्यावरती पुष्कळ लोक अगदी कृष्णाचे कैवारी म्हणजे वकील बरेच आहेत इथं बरं का? पुष्कळ लोकं आहेत, कैवारी आहेत, कृष्णाबद्दल जेवढा मला आदर आहे, मला काय किंवा कोणाला इकडे असला पाहिजे, असणं शक्य नाही. कारण त्याच्याबद्दल जाणायला पाहिजे. त्याचं नाव नुसतं घेऊन किंवा त्याचं कैवारी बनून, त्याच्यासाठी भांडणारे लोक मी पुष्कळ पहिले पण कृष्णाला जाणणारे मला कुणी एवढे दिसले नाही. कृष्णाला जाणलं पाहिजे, हे मुख्य संबंध गीतेचं सार हेच आहे कि तू मला जाण. सर्वधर्माणांम् परित्यजे. सगळं काही बाहेरचं सोड आणि फक्त तू मला शरण हो, म्हणजे मी जी चैतन्यस्वरूप शक्ती आहे त्याच्यात तू एकाकार हो. हे त्यांनी इतक्या स्पष्ट शब्दांत सांगितलं तरी लोकांच्या लक्षात आलं नाही. लोकांच्या लक्षात ते यायचंही नाही, त्याला कारण आहे. आत्मसाक्षात्कार करा म्हंटलं कि लोक अर्धे पळतात घरी. ते नको आपल्याला, बसायला जमायचं. पण मी तुम्हाला जर हातातून एक अंगठी काढून देते, किंवा इकडून मी काहीतरी करून काहीतरी जादूमंतर करून दाखवते कि झालं हा हा हा... हजारो माणसं जमतील. काय अहो काय? काय मिळालं त्याच्यात तुम्हाला? असा जर कोणी प्रश्न विचारावा कि तुम्हाला ह्याच्यात काय मिळतं ह्या चमत्कारामध्ये? म्हणजे तुमचं लक्षच मुळी जड आहे. सगळ्या जड गोष्टींवरती तुमचं इतकं लक्ष उतरलं आहे.

इतक्या आता एक प्रश्न कोणीतरी विचारला कि गायत्री मंत्र जर शंभर माणसांनी, ब्राह्मणांनी म्हटला, आहेत कुठे ब्राह्मण? आहेत कुठे ते द्विज? ते ब्राम्हण कुठे आहेत, ज्यांचा खोचरातून जन्म झालेला आहे? तेच तर मी करायला आले. पण असे मला म्हणतात कि त्या अश्या ब्राह्मणांनी जर गायत्री मंत्र म्हटला, काही उपयोगाचं नाही. हे कनेक्शन [जोडणी] आहे इथे हे आपल्याला माहिती आहे. हे कनेक्शन जर आम्ही मेन्सला [विजेचा स्रोत] लावलं नाही तर ह्याच्यावर मी १०० काय पण १००० माणसांनी मंत्र म्हटला तर त्याचा काही उपयोग होणार आहे का? त्यालाच मी ब्राह्मण म्हणते जो आत्मसाक्षात्कारी, ज्याचा जन्म पुन्हा झालेला आहे, ज्यांनी ब्रह्माला जाणलेलंय तोच ब्राह्मण आहे! हे इथून तिथून सगळ्यांनी सांगितल्यावरती तुम्ही उगीचच कुणाला ब्राह्मण म्हणून [अस्पष्ट..].

अश्या सगळ्या ब्राह्मणांना माझा नमस्कार वारंवार आहे. ब्राह्मणत्वाचे नाटक करता येत नाही. हे असलीयत आहे, खरी गोष्ट आहे. असायला पाहिजे, एक अस्तित्व आहे. ते व्हायला पाहिजे आणि म्हणून ज्यांना खोट्याचा अगदी तिटकारा आहे त्यांनी असला खोटा वेश आपल्यामधून काढून टाकला पाहिजे. एकदा ते साधल्या बरोबर आपल्याला कळेल कि ब्राह्मण हा आतमध्ये आहे. जसा पक्षी दोनदा जन्माला पावतो तसाच मनुष्य सुध्दा दोनदा जन्माला पावतो. हे सर्व धर्माच्या लोकांनी सांगितलेलं आहे. आणि ज्यांनी सांगितलं नाही ते आत्मसाक्षात्कार झालेले नव्हते. म्हणजे असे पुष्कळ आहेत इकडे कोपऱ्यात म्हणे आमचे गुरुजी आहेत त्यांनी सांगितलं कि हे सर्वकाही करायचं नाही. बरं! बरोबर आहे, पण ते कोण आहेत? काय आहेत ते देवाला ठाऊक. गुरु तोच जो तुमच्यापेक्षा वर जाऊन आणि ज्याला आत्मसाक्षात्कार कमीत कमी एवढं तरी झालं पाहिजे. धर्माच्या बाबतीत आपल्याला काहीही कल्पना नाही. जे काही पुस्तकात वाचलंय ते मान्य केलंय. हि पुस्तकं तरी कोणी लिहीली आहेत? आता समजा आपण जर मुद्रणालयात गेलो आणि तिथे जाऊन मुद्रणालयाला काही पुस्तकं दिली. ती छापलीही जातील. कोणीही छापलं ते रामायण होत नाही, कोणीही म्हटलं कि गीता होत नाही, जे मेले ते सगळे संत होत नाहीत, हे लक्षात ठेवलं पाहिजे आपण. त्यांची पुष्कळ लक्षणं आहेत.

परवा मी असंच बोलताना म्हंटलं कि झोरास्टर हाच महंमद, झोरास्टर हाच जनकाचा अवतार, आणि तेच साईबाबा आहेत. तर काही लोकांना जरासं हे कि खटकलं कि माताजी अशी कशी गोष्ट म्हणजे आमचे हे साईबाबा कुठे? तुमचे कुठनं आले? ते स्वतःला मुसलमानसुद्धा म्हणत असत पुष्कळदा. त्यांच्या भाषेत मुसलमानपणा आहे. पण त्याची प्रचिती अशी आली त्या लोकांना कि एका घरी झोरस्टरचा फोटो आणि साईबाबांचा फोटो होता. तर मग मी त्यांना म्हटलं तुम्ही रिअलाईज्ड आहात ना? मग जरा बघा तर हात मग, दोन्हीकडे एकसारखेच व्हायब्रेशन्स [चैतन्य लहरी]! हे कसं येतंय? मग म्हटलं सांगा कोण आहे? ओळखा कोण कोण आहे? जेव्हा एकसारखी दोन्हीतनं व्हायब्रेशन्स आणि तरंग येतायेत मग हि दोन्हीही माणसं एकच आहेत आणि त्यांना एवढं वेगळं ठेवून ठेवून तुम्ही गाठलंय काय? एवढं मोठं जे सत्यकर्म लोक करत आहेत, कि हा धर्म वेगळा, आणि हा धर्म वेगळा, आणि तो धर्म वेगळा, एवढं करुन कोणचं ध्येय गाठलंय? म्हणजे एकाने हे डोकं फोडायचं, दुसऱ्याचा खून करायचा, त्याला मारायचं, आपापसात द्वेष हेच तर आम्हाला मिळालेलं आहे. एका पेक्षा दुसरा धर्म उच्च आहे असं मानून तुम्ही कोणची कुठली उच्चता गाठलेली मला तरी काही दिसत नाही बुवा. मी सर्व धर्मातल्या फार मोठमोठ्या लोकांना भेटले, पण यांना अगदी उच्चस्थानी बसवलेलं आहे पण एक सुध्दा अजुनपर्यंत मला रिअलाईज्ड मनुष्य भेटला नाही, ही सत्य गोष्ट आहे आणि तुमच्यातले जे रिअलाईज्ड आहेत त्यांनी जाऊन बघावं, तुम्हाला मला सांगायला नको. मी जे सांगते त्याच्यातले एक अक्षर जरी खोटं असलं तर आपण जाऊन स्वतः त्याचा साक्षात्कार घ्यावा आणि ह्या मंडळींना येऊन सांगावं, त्याची साक्षच आहे. अजूनतरीपर्यंत मला एक सुध्दा त्याच्यातला मनुष्य रिअलाईज्डसुद्धा नाही भेटला. रिअलाईज्डसुध्दा. काही काही लोक आहेत रिअलाईज्ड पण ते कोणच्याही धर्माच्या पिठा बीठावर बसलेले नाहीत. कुणी जंगलात आहेत. ह्या अश्या वेड्या समाजापासनं दूर पळालेले. पुष्कळसे आहेत. मला आता काश्मीरला भेटले होते, तिथे भेटले होते, हिमालयाच्या किनाऱ्यावर आहेत काही. मी त्यांना म्हटलं “इथे काय करताय? या ना! मी एकटी कुणाकुणाशी तिथं वाद घालू, कोणाकोणाला सांगू? सगळ्या भ्रांतीमध्ये राहणाऱ्या लोकांच्याबरोबर, बोलायला तुम्ही आला पाहिजे, तुम्हाला मानतील ते.” अहो [ते] म्हणे, "जर तुम्हाला मानत नाही तर आम्हाला काय मानतील? तुम्हाला निदान इंग्लिश भाषा तरी येते, मराठी तरी येते, आम्हाला तर काही भाषा येत नाही.” तेव्हा ते आपले पळून बसले जंगलामध्ये. बघूया आपण, काही उतरले. जरा तुम्ही लोक जरा ठिकठाक झाला आणि त्यांना जर हे कळलंय कि आमची डोकी फुटणार नाहीत तर येतील. पण हा आत्मसाक्षात्काराचा अनुभव आपल्याला झाला पाहिजे.

एका गृहस्थांनी फार ठासून मला सांगितलंय कि, हा आनंदाचा क्षण आम्हाला का मिळू नये? आम्हाला सर्वांना मिळालाच पाहिजे. म्हंटलं वा! भले शाब्बास, असंच पाहिजे, मिळायलाच पाहीजे! का नाही मिळाला? मिळायलाच पाहिजे! ”आम्ही अशी पापं केली, आम्ही हि कर्म केली, आमची हि कर्म कशी जाणार? आमचं हे कसं जाणार?” अशी जी माणसं रडत बसतील त्यांचं काही होणार नाही. पण जर मिळण्यासारखे आहे तर आम्हाला मिळायलाच पाहजे असं म्हणणाऱ्या लोकांना मिळालाच पाहिजे. आज ह्या गृहस्थांनी असं लिहून पाठवलेलं आहे, त्यांना सांगायचं आज नाही तर उद्या तुम्हाला मिळेलच. त्याबद्दल मला शंका नाही. एवढंच आहे कि आपल्या हिंदुस्थानात जरा काम कठीण आहे कारण अजून आपलं डोकं जड वस्तूंवर फार आहे. जेवायला नाही मिळालं, खायला नाही मिळालं, अमुक नाही, तमुक नाही. हे सगळं चालू आहे. जरा ह्याच्यातनं तुम्ही उठला, जरा तुमचं इथून चित्त गेलं तर कार्य होण्यासारखं आहे. अमेरिकेत त्यामानाने लोक जास्त तय्यार आहेत. आत्मसाक्षात्कार लवकर घडतो पण स्थिरता तिथे लोकांना येत नाही. कारण त्यांना मुर्त्या समजत नाहीत, त्यांना आपले देव देव समजत नाहीत. पण हिंदुस्थानात रडतफडत का होईना जर कोणी आत्मसाक्षात्कार घेतला कि तो खूप गहरात होतो, कारण त्यांच्यामागे संपदा हजारो वर्षांची आहे. हजारो वर्षांची संपदा ज्या माणसाच्या डोक्याच्या मागे आहे तो खटकन आतमध्ये जातो आणि आपल्या संबंध आपल्या आतल्या अंतरंगाच्या सागरात बुडून जातो. तसं अमेरिकनचं होत नाही. अमेरिकन लवकर पार होतात पण तिथल्या तिथे, जास्त आतमध्ये उतरत नाही. कळलं का? कठिण जे आहे काय, हिंदुस्थानीचं आहे. पार करणं काही सोपं काम नाही. पाच वर्षांपासून माझे मिस्टर हात असे ठेवून [आहेत]. डॉक्टरसाहेबानीं आता सांगितलंच आहे कि ७० साली मला कळलं, मला आत्मसाक्षात्कार झाला. माझ्या आत्मसाक्षात्कारात आणि आपल्या आत्मसाक्षात्कारात फारच अंतर आहे. मला जे कळलं ते तुमच्याबद्दल आणि तुम्हाला जे कळणार आहे ते माझ्याबद्दल. मी जन्मले तेव्हापासूनच मला माहिती होते सगळं काही. पण हे आपल्या आत कसं द्यायचं? आपल्या आत कसं घडवायचं? हा मोठा प्रश्न होता मला. आणि तो प्रश्न कसातरी करून आपण जाणला पाहिजे म्हणून हजारो लोकांच्याकडे मी गेले आणि लोकांकडून पत्ते घेतले. पण माझ्या लक्षात हे आलं कि नाहीच कोणी तिकडे.

तेव्हा एकदा अकस्मातच मला असं कळलं कि माणसांमध्ये एक छोटीशी पोकळी आहे सुषुम्ना नाडीमध्ये, ती मी आपल्या जर प्रेमाने भरली तर कुंडलिनी सहज वर इथून जाईल आणि सहस्राराला सहजच छेदून त्या माणसाला ती [अस्पष्ट..] हे तुमच्यासाठी आम्ही शोधून काढलं तर त्यासाठी लोक काय मला मारायला धावणार आहेत? तुमचं मंगल करण्यासाठी म्हणून हे माझ्या हातून शोधलं गेलं म्हणून मला मारणार आहेत? आणि कृष्णाच्या हातून शोधलं नाही गेलं म्हणूनही मलाच मारणार आहेत? अहो त्याला आम्ही शोधून दिलं तेव्हाही आम्ही होतो. तेव्हा प्रयत्न सर्वांच्याबरोबर केलेलेच आहेत आम्हीही. आम्हीच जर पूर्वी नाही करू शकलो आणि आम्ही आता करत आहोत आणि जर काही आम्हाला मिळालेलं आहे त्यासाठी तुम्ही काय माझ्यावरती आता बहिष्कार घालणार आहात का? तुम्हाला का मिळालं आणि कसं मिळालं? तुम्ही कोण होता घेणारे? मला असं विचारायचंय, तुम्ही विचारणारे तरी कोण? तुमच्याजवळ जर धर्माची अशी कोणची मोठी सत्ता आहे कि ज्याच्या दमावर तुम्ही मला विचाराल? जर तुम्ही धर्मावर उभे आहात तर माझ्यासमोर या. आणि मग मी त्याचं उत्तर द्यायला तयार आहे. पण आधी धर्म काय आहे ते तर जाणलं पाहिजे. साक्षात्कार तरी झालेला आहे का? तुमच्यामध्ये तो धर्म तरी आलेला आहे का? हा काही धर्म नाही कि देवळात गेले, तिकडे रामाला नमस्कार केला आणि इकडे येऊन महंमदाला १०० शिव्या दिल्या. हा काही धर्म नाही. धर्म म्हणजे सगळयांमध्ये वाहणारे चैतन्य. त्याच्या धारेमध्ये उतरणं हा धर्म आहे. त्याची जी धारा आहे तिला आपल्यामध्ये धारण करणं हाच धर्म आहे. हे आपल्या हिंदु शास्त्रांत तरी सगळ्यांना सांगितलेलंच आहे. इतकं स्पष्टपणे आणखीन कोणत्याही शास्त्रांत नाही [अस्पष्ट]. आपण म्हणजे अगदीच विपरीत लोक झालेलो आहोत. म्हणजे किती कमालीची गोष्ट आहे कि फक्त हिंदू शास्त्रांमध्ये कुंडलिनीबद्दल इतकं सुंदर वर्णन ह्याच्यातल्या दृष्ट्यांनी दिलेलं आहे. म्हणजे हिंदू शास्त्र म्हणण्यापेक्षा, भारतीयातल्या लोकांना त्याचं जेवढं ज्ञान झालेलं आहे ते कुणालाही सबंध पृथ्वी लोकांत नाही झालं. आणि इतकं सांगोपांग आणि व्यवस्थित त्याचं सगळं काही त्यांनी वर्णन केल्यावर, आणि त्याचा जर शोधच जर हिंदुस्थानात लागला आहे तर त्याबद्दल तुम्ही मलाच मारायला उठल्यावर लोक तुम्हाला तरी काय म्हणतील इतिहासात? कि काय हे वेडे लोकं आहेत? थोडा विचार करा, आईचं समजावणं आहे. थोडा विचार करा. तेव्हा जरा डोकं थोडं उतरवा तिकडनं. म्हणजे पुढची गोष्ट सांगता येईल कि आत्मसाक्षात्कार म्हणजे काय?

मी आपल्याला सांगितलं आहे कि आपल्यामध्ये चित्रासारखं चैतन्य भरलेलं आहे ते कुंडलिनीच्या द्वारे. ते आपल्यामध्ये असतं. स ह ज म्हणजे स्वताःबरोबर असलेले जन्मतः. हि तुमची आई जी तुम्हाला जन्म देणार आहे ती तुमच्यातच देणार आहे. आपल्याला तिची माहिती नसते पण तिला आपली माहिती असते. तिला आपली ह्या जन्माचीच नाही तर जन्मजन्मांतराची सगळी तिला माहिती आहे. इतकंच नाही तर आपल्या शरीरामध्ये असलेले जितकी काही दुःखे आहेत. जितके मानसिक ताप आहेत, जन्मजन्मांतरातले बुद्धीमध्ये जेवढे काही खोळंबे आहेत ते सगळं काही तिला माहीत आहे. ती फक्त वाट बघत असते कि माझा जर मार्ग मोकळा झाला आणि कोणी जर माझ्या मुलाला सांभाळून हा जन्म दिला तर मी त्या कार्याला तयार आहे. म्हणून त्या सुईणीच्या वाटेत ती बसलेली आहे. तिची वाट बघत ती बसलेली असते कि अशी कोणी शुध्द सुईण जर आली तर माझ्या मुलाला काही त्रास झाला नाही पाहिजे. तिचं सगळं समजणारी, तिच्या त्या मुलाच्या आतला सगळा भार कसा अगदी जपून सांभाळून त्या कुंडलिनीला वर उठवेल अशी ती कुंडलिनीसारखी तुमची आई वाट पाहते. हे मला माहित होतं. पण तिला वरती आणायला एकच प्रश्न होता कि मधे एक पोकळी आहे त्याच्यामध्ये काय करायचं? त्या पोकळीला आल्याबरोबर ती कुंडलिनी मागे येते. कुंडलिनी कधीही दुसऱ्या कोणत्याही मार्गांनी कधीही उठणार नाही. इडा आणि पिंगलाने कुंडलिनी उठत नाही. काहीही करून कुंडलिनी कधीही उठणार नाही. तुम्ही आईला प्रेम करायला काय करता? ती करतेच, तुम्ही काय मारलं तिला तरी ती तुमच्यावर प्रेम करते आणि त्याच्यावर पुढे गेलेले म्हणजे लोक असं म्हणतात कि तुम्ही जर सेक्सनी वाढले तर कुंडलिनी वाढेल. म्हणजे तुमच्या आईवर तुम्ही सेक्सचा आरोप करता म्हणजे आहे काय हे डोकं तुम्हाला? आणि त्यावर जर ती कुंडलिनी चिडली आणि संतापली, म्हणजे ह्याच गोष्टीवर आपली आई चिडेल, लक्षात येईल आपल्या. आईचा जर खून जरी केला, तिच्या नवऱ्याचा जरी तुम्ही खून केला तरी ती मानून घेईल पण तुम्ही जर तिच्यावर असा घाणेरडा आरोप केला तर तिच्या पावित्र्यावरच मुळी धक्का बसल्यामुळे ती चिडते. आणि ती चिडल्यामुळे आतून गरम त्या रागाच्या ज्या उठतात, त्या फक्त ईडा पिंगलावर जाऊन बसल्यावर त्रास होतो. म्हणुन कुंडलिनीविषयी जे लोकांना वाटतं कि कुंडलिनीमध्ये आलं की आपण जळून जाऊ. जळणारच कारण तुम्हाला माहीत कुठे आहे, त्याची अक्कल पाहिजे. खरोखर कुंडलिनी कधीही कुणाला जाळत नाही. ती प्रेममय तुमची आई आहे. चैतन्य स्वरूप तुमची आई तुमच्यात बसलेली तुमच्याबरोबर जन्मलेली आहे आणि तुम्हालाच पुन्हा जन्म देण्यासाठी [अस्पष्ट]. पण तिचं पवित्र तिचं गौरव, तिच्या गौरवाकडे लक्ष देण्याऐवजी आपण तिला इतक्या निम्न श्रेणीला उतरवलेली आहे कि ती तरी काय करणार? आता ह्या कुंडलिनी जागरणाने आत्मसाक्षात्कार घडतो असं पुष्कळांनीं म्हटलेलं आहे म्हणजे आपल्याकडे लेखकांची असे लेखक आहेत ज्यांनी कधीही कुंडलिनी कशाशी खातात ते जाणले नाही त्यांनी सुद्धा कुंडलिनीवर लिहलंय. कुणाची तरी पुस्तकं लायब्ररीत बसायचं आणि लिहून काढायचं. त्याच्याबद्दल पूर्णपणे जो पर्यंत तुम्हाला काही अनुभव नाही त्याबद्दल तुम्ही लिहीता कसं? असं म्हटलं कि धर्माच्याबाबतीत कोणीही बोलू शकतं, म्हणजे हिटलरनी उठून उद्या धर्माच्या बाबतीत बोलला तरी कोर्टात त्याला खेचणार कोण? कारण धर्माच्या बाबतीत कोणीही बोलू शकतो. कोणताही मनुष्य धर्माच्या बाबतीत बोलू शकतो. त्याला कोणी धरत नाही किंवा म्हणत नाही. तेव्हा वाट्टेल त्याने वाट्टेल ते बोलावं आणि ह्या आपण ते कोळून प्यावं एवढं आपल्यामध्ये ते बुद्धीचातुर्य आहे. आम्हाला जर काही अनुभव आला नाही आत्मसाक्षात्काराचा तर आम्ही कोणालाही मानणार नाही हि पहिली ह्याची पायरी, आत्मसाक्षात्कार म्हणजे पार झाले पाहिजे. आत्मसाक्षात्कार म्हणजे तुम्ही निर्विचारतेत उतरले पाहिजे.

म्हणजे मनुष्य आहे काय? मनुष्याचं जे मन आहे ते सारखं इकडून तिकडे, तिकडून इकडे धावतंय. त्या मनाला चालना येते ती विचारांनी. जे विचार आपल्या मनातुन येत असतात त्याच्यावर सारखं हे मन तरंगत आहे. एक मिनिटसुद्धा ते विचार थांबायला तयार नाही. तुम्ही जबरदस्ती थांबवायला गेलात तर तुम्ही परत सिम्पथेटीकवर [डाव्या किंवा उजव्या नाडीवर] जाता आणि त्याचा परलोकाशी संबंध होऊन तुमचा त्या भूतप्रेतांशी संबंध होतो आणि तुम्ही सिध्दीला पावता. जबरदस्ती तुम्ही कशाही गोष्टींची केली कि असं होतं. तेव्हा विचार, त्यांच्या पलीकडे जायचं तरी कसं? हा प्रश्न आहे. कारण विचारांच्या पलीकडे फक्त चैतन्य आहे. आणि चैतन्याचं स्वरूप हे निराकार आहे. तेव्हा निराकारात जायचं कसं? आपलं लक्ष माझ्याकडे आहे कारण मी साकारात उभी आहे. पण समजा मी म्हटलं कि अर्धवट तुम्ही मध्ये बघा. तुम्ही नाही बघु शकत. आतमध्ये चित्त जाणं कठीण का? कारण निराकारात चैतन्य असल्यामुळे त्याला आम्ही कसं आतमध्ये बघणार? म्हणूनच लोकांनी आधी निराकाराची स्वरूपे बनवून सिम्बॉल, प्रतीके बनवून ती सांगितली आहेत, बनवून नाही, आहेत ती, त्यांची होतात. ती आपल्याला दिसतात वेगळ्या वेगळ्या चक्रांवरती, मी काल सांगितलं. पण ते सांगितल्याबरोबर लोक चिकटले त्या प्रतिकांना, त्याच्या मागच्या चैतन्याकडे जाऊन म्हणजे फुलातला मध घ्यायचा असला तर फुलांबद्दल सांगितले तर फुलांना चिकटले. मग म्हटले, नाही नाही हे काही जमलं नाही, म्हणजे त्याच लोकांनी मग दुसरा जन्म घेतला. मग त्यांनी असे धर्म स्थापन केले कि निराकाराबद्दल बोलू लागले. पण तेही का? मधाबद्दल बोललात काय किंवा फुलाबद्दल बोललात काय, बोलाचीच भात बोलाचीच कढी, त्यांना काही अनुभव नाही. तर जर मध तुम्हाला एकत्र करायचाय तर तुम्हाला मधुकर झालं पाहिजे हे साधं आहे. म्हणजेच तुमच्यात ती घटना घटली पाहिजे आणि तुम्ही त्या चैतन्याला जाणलं पाहिजे. जेवढं काही नुसत्या [अस्पष्ट..] तसंच गळून जाणार. जोपर्यंत प्रकाश येत नाही तोपर्यंत आपल्याला अंधारात पुष्कळ आकृती, प्रकृती दिसतात. प्रकाश आल्याबरोबर हे सगळं काहीतरीच आहे म्हणून आपल्याला आपल्यावरच हसायला येतं. चैतन्यस्वरूप हे स्वतःच ज्ञानमयस्वरूप आहे. चैतन्याचं स्वरूप स्वतः प्रेमाच आहे. परमेश्वराचं प्रेम म्हणजेच हे चैतन्य आहे. आणि तेच प्रेम म्हणजे ज्ञान आहे. आईला एखादया मुलाबद्दल किती माहिती असते? पण जन्मल्या बरोबर तिला इतकं प्रेम येतं कि तिला सगळं काही कळायला लागतं. लहान लहान मुली सुध्दा आया होतात, आणि आपल्या मुलांना कसं प्रेमानं ठेवतात? ते कसं काय ठेवतात? त्या प्रेमामुळेच. ज्या बाईने आपल्या नवऱ्याला कधी पाहिलं नाही लग्नानंतर ती त्याची इतकी एकनिष्ठ पत्नी होऊन राहते त्याला कारण प्रेम. तिला मग सगळ कळतं कि नवऱ्याला काय हवं, काय नको, काय आवडतं, काय दिलं पाहिजे, काय जेवायला पाहिजे, प्रेम असलं म्हणजे आपल्याला सगळं काही कळतं. चैतन्य हे प्रेमस्वरूप असतं, तरी ते ज्ञान आहे. प्रेमानं होणारं ज्ञान दोन्ही एकच असतं. जसा चंद्र आणि चांदणीचा संबंध आहे. किंवा अर्थ आणि शब्दाचा संबंध आहे. तसाच संबंध आहे प्रेम आणि ज्ञानात. ज्ञानयोग ज्याला म्हणतात तो खरोखर प्रेमानेच घडतो आणि तोच प्रेमयोग म्हणजेच ज्ञान आहे. तेव्हा आपल्या हातून जेव्हा परमेश्वराचं प्रेम झरझर झरझर वाहू लागतं साऱ्या संसारात तेव्हा आपल्या हातून जेव्हा त्या लहरी वाहू लागतात तेव्हा आपल्याला ज्ञान कसलं होतं ते दुसऱ्याच्या कुंडलिनीचं. आतापर्यंत आपलं लक्ष बाहेर होतं म्हणजे हे शरीर आहे तिकडे लक्ष होतं, म्हणजे मायेच्या आत मधनं वाहणारा जो चित्र आहे त्या चित्रावर होतं. तर आपण जोपर्यंत आतमध्ये जात नाही, जोपर्यंत आपण आपल्या आतमध्ये उतरत नाही तोपर्यंत त्या सूत्रावर आपले लक्ष कसे जाणार? जे सगळ्यांच्या आतून जात आहे. आपल्यापुरतं आपलं लक्ष आहे जेव्हा आपण त्या सूत्रावर येतो लगेच आपल्यामध्ये सामूहिक चेतना आपोआप घटीत होते म्हणजे आपण काही करत नाही. आता तुम्ही असं पाहिलं असेल कि लहान लहान मुलंसुध्दा म्हणतात, "माताजी पार झालो." म्हणजे काही लोक नाही झाले पार म्हणजे इतके चिडतात हो माझ्यावर. आता तर नाही झाले तर मी तरी काय करू? तुम्ही सांगा. मग काहीतरी लिहून मग काहीच्या काही लिहून पाठवतात माझ्याकडे. अहो नाही झालं, आज नाही झालं तर उद्या होईल, लहान लहान मुलंच म्हणतात, कि नाही झालं श्री माताजी. अहो नाही झालं म्हणजे नाही झालं एवढंच. त्या सूत्रावर चित्त आपलं जातं ते दोन विचारांच्या मधोमध्ये एक लहानशी जागा असते त्या विलंबातनं एक क्षणात. क्षणाच्या एका थोड्याशा भागात कणासारखं ते आतमध्येच आहे. आणि तिथे गेल्याबरोबर त्या चैतन्यस्वरूपी परमेश्वराशी एकाकार होतं. ती खरीच गोष्ट आहे, खोटं नाही. पण काहींचं नाही होत काहींचं होतं. पण सगळ्यांचंच झालं पाहिजे म्हणजे काय राशनचं दुकान नाही. जसं आपण राशनच्या दुकानाला, आम्हाला राशन का नाही देत? ते बरोबर आहे, तुम्हाला राशन का नाही दिलं? राशनच दुकान नाही. प्रत्येकाची आपली आपली उत्क्रांती असते. ज्या माणसाच्या लक्षातच कधी आलं नाही कि या दुनियेच्या पलीकडे काही दुनिया असली पाहिजे किंवा बोवा, ह्याच्यात काही राम वाटत नाही आता काहीतरी ह्याच्यापलीकडे दिसतंय. अशा माणसाचं चित्तच जिथे जडातच घुसलेलं आहे अशा माणसाला रियलाझेशन कसं होणार? असं पुष्कळशी लोकं मला सांगतात आमचं का नाही झालं मग ?तुम्ही आमचं का नाही केलं म्हणजे अगदी हातात बंदूक बिंदुक घेऊन खडेच आहेत. द्या आम्हाला, रियलाझेशन देतात कि नाही? हे जिवंत काम आहे. आता तुम्ही एका झाडासमोर बंदूक घेऊन उभे राहणार हे बघ तू फळ देतोस कि नाही देत. तर तो नुसती त्याची पानं हलवेल. या तुम्ही उद्या या. जेव्हा घडायचं तेव्हा घटीत होईल. जेव्हा व्हायचं तेव्हाच ते होणार. हे जिवंत काम आहे. मेलेलं कार्य आपण म्हणू शकतो कि बुवा हे आम्ही चार वाजता तयार करून ह्याचे आम्ही दहा तुमच्याकडे पाठवून देतो, बरोबर आहे. मशीननी होऊ शकतं. पण ते परमेश्वराची लहर आहे लागेल तर देईल नाही तर नाही देणार. हे जिवंत कार्य आहे. हे जिवंत जे घटायचं ते आपल्यामध्ये हेच होतं आणि तेच जिवंत कार्य मनुष्य करू शकतो बाकी कोणतंही जिवंत कार्य मनुष्य करू शकत नाही. एका बी मधून आपण एक झाड काढू शकत नाही. पण दुसऱ्याला आपण रियलाझेशन घडवून आणू शकतो. म्हणजे मधे उभे राहून ती जी शक्ती आहे ती आपल्यातुन त्याच्यात घालून त्याला रियलाझेशनचा अनुभव आपण देऊ शकतो. चैतन्य म्हणजे काय? चैतन्य म्हणजे इलेक्ट्रिसिटी आहे का? आहे, इलेक्ट्रिसिटीच आहे. त्याच्यामध्ये मॅग्नेटिझम आहे का? ते सुध्दा आहे. त्याच्यामध्ये लाईट आहे का? हो ते सुध्दा आहे. पण ह्या सर्व जडशक्तींच्या पलीकडे त्याच्यात जे आहे ते म्हणजे प्रेम. आता सायंटीस्ट [वैज्ञानिक] लोकांना प्रेम कसं समजवायचं ते मला काही सायन्सचे लोक म्हणजे इकडे तर हे इकडे भाविक लोकं डोकं फोड करतात आणि तिकडे सायन्सची लोकं माझं डोकं फोड करतात. सायन्सच्या लोकांना प्रेम कसं सांगता येईल ते मला समजत नाही. कितीही मोठा सायंटिस्ट असला तरी त्याला आपल्या आईचं प्रेम कळत असलं तर त्याने ते सायन्समध्ये सांगावं.

जे चैतन्य सगळं काही जाणतं ,ज्याला सबंध अंडरस्टॅण्डिंग असतं, सबंध समजतंय त्याला, जे सबंध प्लँनिंग करत आहे, हि सगळी व्यवस्था करतंय, इतकी व्यवस्था बारीक आहे त्याची. जर तुमची आर्तता खरी असली तर तुम्ही कसंना कसं करून माझ्याकडे पोहचाल. आता एक उदाहरणार्थ सांगते. म्हणजे दिसायला तुम्हाला वाटेल हे कसं काय माताजी म्हणताय, पण आहे असं खरंतर ज्ञानी. एक गृहस्थ आहेत, ते बेलापूरच्या तिथे राहत असत. त्यांनी माझ्याबद्दल ऐकलं आणि धावत मुंबईला आले. त्यांच्याजवळ पत्ता वगैरे हरवला, आम्ही तिथे राहत होतो. त्या सगळ्यांना विचारले कि माताजी कुठे आहेत वगैरे तर नाक मुरडले सगळे. तर म्हणे, इथे अमुक माताजी, नाही नाही हे नाही. इथली माताजी आहे, ते तिकडे गेले ती माताजी आहेत, पण आमच्या माताजी कुठे आहेत? तर ते म्हणे "तीन दिवस मी असा भटकत राहिलो, वेड्यासारखा. मला समजेना, आता कसं तुम्हाला भेटायचं माताजी? काय करायचं? मग मी असं म्हटलं, माताजी आता तुम्हीच करा बरं माझी व्यवस्था आणि मी बस मध्ये बसले असताना अचानक तितक्यात एक मनुष्य माझ्या शेजारी बसला त्याने तुमचा असा तो फोटो काढला. आणि त्यानं नमन केलं. पण काय हो ह्या माताजी कुठे राहतात?" म्हणे, "इथेच, हे जे आहेना हे इथेच उतरा तुम्ही, ह्याच्यासमोर असं गेला कि त्या गल्लीत माताजींचं घर आहे. तुम्ही जाऊन तिथे विचारा तुम्हाला." आणि मी जेवत होते. आणि ते धावत धावत आतमध्ये आले. "माताजी, मला तुम्ही सापडल्या." म्हटलं,"या" मी हात धुतला आणि तिथेच बसले आणि पटकन पार झाले. हे सगळं घडवलं कोणी? हे सगळे योगायोग, सगळे संबंध घडवले कोणी? पण ते त्यांचेच घडणार जे खरंच शोधतायेत पण त्यांचे नाही घडणार जे नुसते शब्दांच्या जाळ्यात मला पकडायला बघतायत. हे लोक आपल्यापासनंच स्वतःची चाकरी करून स्वतःलाच ठगवत बसलेले आहेत. काही असं विशेष शहाणपण नाही. स्वतःचंच शेपूट कापून माकडपणा करण्यात काही अर्थ नाही, असं एक आई म्हणून तुम्हाला मी समजावून सांगते. जर तुम्हाला हे नको असेल तर माझी काही तुम्हाला जबरदस्ती तर करताच येण्यासारखी नाही आणि नको असलं तर तुम्ही परत जावं. पण काही काही लोकांनी म्हणजे आजकाल असा बिझनेस घेतलेला आहे कि माताजींना हाणून हे पाडलंच पाहिजे कारण सकाळी इलेक्शनला उभ्या असतील का? कधी कधी तर मला हसायला येतं कि, उद्या तुम्ही आपल्या आईलासुध्दा हाणून पाडाल. तुमचा काही ठिकाणा? कारण सगळ्यांमध्ये संचारलंय ना राजकारण अख्खं!! अहो तुमच्या भल्यासाठीच, तुमच्या मंगलासाठीच, परमेश्वराने स्वतःची युक्ति शिकवलेली आहे मला. हि आपण वापरून बघायची आणि जमली आहे, पुष्कळांना जमलेली आहे. आपल्या पुणे शहरातच मला पक्का आकडा माहिती नाही पण पहिल्या दिवशी अडीचशे माणसं पार झाली म्हणजे हि काय पुण्यभूमी आहे. आमच्या मुंबईला असा देखावा कधी दिसत नाही. मुंबईकरांनी क्षमा करावं. आणि मग मी मुंबईकरांना म्हटलं कि आता मी पुण्यालाच येऊन राहते तर मग लगेच सपकपले सगळे, "हे काय माताजी, असं काय? आम्ही एवढी मेहनत घेतली." बरोबर आहे, पण हि पुण्यभूमी, मोठमोठाले भक्त इथे जन्माला आले आहेत. मोठमोठाले संत आहेत ते. आता बुश शर्ट घालून आणि सूट बूट घालून आलेत म्हणून काय ते संत नाहीत? पुष्कळदा लोक मला म्हणतात, "हे काय करता तुम्ही सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? कारण आमच्यातल्या ज्या बायका आहेत त्या नुसत्या क्लबात पाठ ठेवतात पत्ते." तर त्यांना समजत नाही मी कुकर्म कशाला करते. त्यांना मी सांगते कि "मी संतांची सेवा करते." ते म्हणे, "संत कुठेत?" म्हटलं "आजकाल बुश शर्ट बिश शर्ट घालून येतात, तुम्हाला माहीती नाही." तुम्ही संत आहात म्हणून आले. तुम्हाला महंत करायचंय. तुम्ही मोठे जीव आहात म्हणूनच तुम्हाला हे दर्शन होणार आहे आणि होत आलंय आणि होत राहील. आता मी इथं तुम्हाला पटवते काय आहे? कि तुम्हाला हे होणार आहे. घ्या हो, घ्या हो घ्या. पण त्यातले असे थोडेच आहेत बरं का ते? अधिक बहुतेक लोक असेच आहेत कि ज्याना हवंय आणि ते काय आहे? तेच ऐकण्यासाठी इथे आलेले आहेत. तेव्हा असे जे थोडेसे आहेत त्याला विघ्नसंतोषी म्हणतात असं मला वाटतं. अश्या लोकांनी थोडंसं आपलं डोकं शांत ठेवा आणि सगळ्यांच्या उद्धारासाठी एवढी धडपड करू नये!!! उत्तर सगळ्यांना मिळालं असेल. आता जे लोक खरंच आर्त आहेत आणि जे शोधत आहेत, त्या परमतत्वाबद्दल पूर्णपणे आपण जाणून घेतलं पाहिजे. परमतत्व हिच चेतना आहे. आणि हि चेतना सर्वव्यापी आहे, सर्वगामी आहे, सर्वतद्-रूप आहे. जडत् शक्ती काहीही करत नाही. तिला चालना चेतनशक्ती देते आणि संबंध पृथ्वीची रचना त्या चेतनशक्तीमुळे होते. तीला आपल्याकडे शिवाची शक्ती, हरीची माया आदी पुष्कळ गोष्टीने आपण संबोधीत करत असतो. अशी पुष्कळशी नावं ती त्याला दिलेली आहेत. हे चैतन्य प्रत्येक मानवामध्ये कुंडलिनीच्या स्वरूपात विराजमान आहे. आणि ते चैतन्य आपण रोज वापरत आहोत. आपल्या रोजच्या दैनंदिन कार्यक्रमात आपण ते वापरतो. पण त्याला परत भरण्याची किंवा त्याला परत आपल्यामध्ये घेण्याची काहीही शक्ती किंवा काहीही युक्ती आपल्याला माहीत आहे?

एकच चेतना आहे. त्या अनेक नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्याला अशी कल्पना असते कि चेतना अनेक आहेत. [अस्पष्ट] एकच आहे. एकच चेतनेतनं सगळं काही. मग हि चेतना आणि जड शक्ती, आदी जे काही संपूर्ण संसारात आहे ते सगळं एकत्र येऊन बीज रुपाने जेव्हा राहतं तेव्हा त्याला आपण ब्रह्मबीज म्हणतो. म्हणजे ब्रह्मामध्ये सगळं समावलेलं आहे. आणि त्या ब्रह्मातून निघाले चेतनाशक्ती, जड शक्ती आणी अवतारशक्ती अश्या तीन शक्त्या कार्य करीत आहेत. परत सगळी कार्य संपली कि परत बीज रूपाने जसं काही एखादं बीज त्याच्यामध्ये संबंध त्याच्यातनं येणाऱ्या झाडांचा नक्षा असतो ते परत बियांत जातात आणि एकच बिज, एकच बिज होऊन जातं. तसंच सगळं काही घडतं, घटीत होतं आणि परत एक बीजात होतं. परत परत सृष्टी तयार झाली आणि त्यात मानव हा उभा झालेला आहे. आता मानवाला माणसाने उभं करुन इतकं सुंदर रुप दिलेलं आहे. आतून आणि बाहेरुन दोन्हीही. इतकी सुंदर कलाकृती बनवलेली आहे. ती अगदी फारच तय्यार अगदी त्याला म्हंटलं पाहिजे मशीन. एखादा फारच सुंदर रेडिओ किंवा फारच सुंदर टेलिव्हिजन त्याच्यामध्ये फारच क्लिअर लाऊडस्पिकर असेल त्याच्याचमध्ये फारच सुंदर अश्या मशिन्स असतील त्या टेप रेकॉर्ड करु शकतील अशा तऱ्हेची संबंध मशीन ह्या शरीरामध्ये परमेश्वराने करवुन ठेवलेल्या आहेत. फक्त आता हे मेनला लावायचं प्रश्न आहे. तर ते कसं लावायचं? तेव्हा हे काही लावू शकणार नाही.परमेश्वर स्वतःच ते लावायला येत आहे. ते घडणार आहे घटीत होणार आहे आणि म्हणूनच ते सहज आहे. त्याच्यासाठी माणसानं काय करायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे? एका शब्दात काहीही करायला नको. पण असं मानवाला म्हटलं की त्याचा अहंकार जरासा दुखतो. काही करायचं नाही म्हणजे हे काय? तुम्ही काही करायचं नाही. ज्याला पोहता येत नाही तो जर बुडत असेल तर त्याने काही करायचं नाही. ज्याला पोहायला येतं त्यांनी फक्त काहीतरी मेहनत करुन त्याला वर आणलं पाहिजे. तेव्हा ज्याला पोहायला येत नाही त्यानं काहीही करायचं नाही. ज्याला पोहायला येतं त्यांनी मेहनत करायची आणि बुडणाऱ्याला वाचवून द्यायचं आणि त्यांनाही पोहायला शिकवायचं आणि मग त्यांना सांगायचं की आता तुम्हीसुध्दा ते जे बुडत आहेत त्यांना मदत करा. एक दिवा पेटवायचा त्यानं दुसरा दिवा पेटवायचा आणि एक एका दिव्यानं हजारो दिवे पेटवायचे. असं केल्याशिवाय हा संसारातला अंधकार नष्ट होणार नाही. आणि परमेश्वराचं जे कार्य, उद्दिष्टआहे, त्याला जे साधायचं आहे आपल्यातनं एवढंच की तुम्ही मला जाणा. त्याला जाणण्यासाठी म्हणुन त्यानं तुम्हाला असं तयार केलेलं आहे. आणि त्याला जाणल्यावर पुन्हा जन्म होतो की नाही? मग आम्हाला मोक्ष मिळेल का? वगैरे वगैरे हे सगळ वाचलेलं लोक मला प्रश्न विचारतील. आत्मसाक्षात्कारानंतर, आत्मसाक्षात्काराच्या वेळेला काय होतं हे आधी पाहिलं पाहिजे.

निर्विचरिता येते म्हणजे विचार येत नाहीत.आणि हातातनं व्हायब्रेशन्स थंड थंड जाऊ शकतात. थंड शब्द लक्षात ठेवा. गरम जर कुणाला व्हायब्रेशन्स आले, त्याचा अर्थ असा आहे कि माझे जे प्रेमाचे व्हायब्रेशन्स जातात त्याच्या विरोधात आहेत तुमचे व्हायब्रेशन्स. तुमचे नाही. ते कुण्या दुसऱ्याचे आहेत. तुम्ही नाही करणार. तेव्हा ते हळुहळु थंड होत जातात आणि एकदम थंड होऊन जातात. तेव्हा थंड थंड हातातनं व्हायब्रेशन्स जातात आणि दुसरा माणुस जो आपल्या समोर असतो, त्याच्यावर वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचे व्हायब्रेशन्स जाणवतात. हे एकदम होतं म्हणजे एखादा लहान मुलगा पार झाला कि त्याला लगेच उभं केलं आणि त्याला सांगितलं कि सांग तुझ्या हातात येतंय कि जातंय? तो सांगेल माझ्या हातात व्हायब्रेशन्स येतायेत. येताहेत म्हणजे मनुष्य पार झालेला आहे. [अस्पष्ट] सहस्त्रार सुटलं पाहिजे, हे बंद झालंय. कुंडलिनीचं जोपर्यंत सहस्त्रार चालत असतं म्हणजे आता कबीरदासनीच लिहिलंय, कबीर साहेबांनी म्हटलंय कि, शुन्य शिखर ते अनहद बोले म्हणजे अनहद बोलत असतात तेव्हा पार नाही. अनहद जेव्हा संपला तिथे, सुटला, सगळं बोलणं संपलं तिथे मनुष्य पार झाला. तेव्हा त्याला आत्मसाक्षात्कार झाला. आता माताजी ह्याच्यात आत्मसाक्षात्कार काय झाला? कारण आत्म्याबद्दलही आपल्याला काही कल्पना? आत्मा पाहायचा नसतो जाणायचा असतो. आपण आत्मा झालो आहे हे कसं कळलं? कारण आपण साक्षी होऊन जातो. आतुन आपण पोकळ होऊन जातो. ती आपल्या मनाची स्थिती होते. आपण साक्षी होऊन जातो. हे सगळं नाटक आहे. हा सारा संसारात उगीचच आपण [तोंड दुखतंंय-अस्पष्ट]. हे सगळं नाटक आहे. आपलं लहान मुलांना बघितलं कि तुम्हाला कळेल. लहान मुलांना साक्षीत्व असतं. आणि ते साक्षीत्वावर राहतात. त्यांना काही वाटत नाही. त्यांना इच्छा झाली कि सांगतील हे काही तुम्ही काही हा मेळावा केलेला आहे, हे काहीतरी नाटक चाललेलं आहे. त्याच्यात ते रमणार नाही. तेव्हा जसं एखादं नाटक बघता बघता आपल्याला वाटत आपणच शिवाजी, तलवार बिलवार सजून आपण असे खडे होत, उभे राहिलो. होतं कधी कधी काही काही लोकांचं. फार अगदी नाटकात रमले असे. मग काय तर, अहो हे नाटक आहे. आम्ही इकडे बसलो. आता नाटक संपलं, आता घरी जा. पुष्कळ बायका रडतात बिडतात. आपण पाहीलंय, नाटकात पुष्कळांना रडायला सुध्दा येतं. ते नाटक आहे पण आपण विसरतो कि हे नाटक आहे. ती माया आहे. ते नाटक चालतंय आणि कळतं कि आपण नाटक बघत होतो. हे आपोआप घडतं. तुम्हाला सांगाव नाही लागत कि हे ऍज इट इज [जसंच्या तसं] घडतंय कि आम्ही जेव्हा हे नाटक बघतो. नाही नाही तसं नाही. ते झालं पाहिजे. आपोआप होतं. साक्षित्व येतं. अंतरंगामध्ये साक्षित्व येतं.

आता कालच एका मुलीने मला प्रश्न विचारला, कि मग आपल्या नीती आणि अनीतीचं काय होतं? अहो आपल्याला काय नीती आणि अनीतीचे जे धडे मिळालेत, ते मानवाने आपल्या डोक्यानं बनवलेलं आहे. कारण त्यांना राज्य चालवायचंय? ख्रिस्ताला तुम्ही क्रुसावर टागलं. ते कोणच्या नीतीत बसलं? सीतेला तुम्ही जंगलात पाठवली ते कोण ते आले तेव्हा सगळे तिथे बसले होते एवढे मोठे? मी आजही विचारते कि त्या धोब्याच्या सांगण्यावरुन त्या सीतेला तुम्ही वनात पाठवली तेव्हा कोणाला बोलायला झालं नाही? सांगायला झालं नाही? हि कुठली नीती? मोठेमोठे धर्मोपदेशक उभे आहेत. ह्यांची ही नीती कुठली आहे मला समजत नाही. नीती म्हणजे काय आणि अनीती म्हणजे काय हे देवाला माहिती, आपल्याला काय माहीत? आपण आपल्या मनाने कशाला नीती समजतो? एखाद्याला छळणं हि असणार. पण साक्षात्कारी मनुष्य कधीही कुणालाही कधी छळू शकत नाही. त्याला कारण असं आहे कि सर्व आपल्या शरीराचे अंग आणि प्रत्यंग आहेत असं वाटू लागतं. मी काय माझ्या बोटाला छळील का? जेव्हा तुम्ही माझी बोटंच झाला. माझे हातच झाला तर मी काय माझ्या हातालाच मारायचं कि काय? म्हणजे इतके मूर्ख कोणीही नाही. साक्षात्कारी मनुष्य प्रेमात पूर्णपणे विरघळतो. मग त्याला लोक असंही म्हणतात कि, आपल्याकडे सगळ्यांना फार समजतं जास्त. तर असंही सांगतात कि माताजी तुम्ही प्रत्येकाला काय हो एवढा साक्षात्कार देता? म्हणजे आता त्यांनी वापरलं काही वाईट गोष्टींसाठी तर? म्हटलं कशासाठी वापरणार? तुम्ही व्हायब्रेशन दिल्याबरोबर दुसरा मनुष्य त्याची तब्बेत बरी होते. त्याला बरं वाटतं. हलकं वाटतं. झोप नसेल येत तर झोप येते, किंवा जागृती येते, किंवा पार होते म्हणजे ह्यांच्यातलं कोणतं वाईट आणि चांगलंय ते मला सांगा. दुसरं तुम्ही काही करु शकत नाही. तुम्ही म्हटलं कि कोणाला शाप देऊया, तर ते जमायचंच नाही मुळी म्हणजे शाप देणार कुठुन?

आता गायत्रीमंत्राबद्दल कुणीतरी विचारलेलं आहे, गायत्रीमंत्र किंवा असे आणखीन पुष्कळ मंत्र आहेत. सावित्रीच सुद्धा फार, काल मी सांगितलेलं आहे त्याच्यावर. हे सुर्य नाडी वरचं काम आहे. सुर्यनाडीने गायत्रीमंत्रानी मनुष्यामध्ये सूर्यासारखी तेजस्विता येते. [अस्पष्ट..] आपल्याकडे पुष्कळश्या ऋषीमुनींनी लोकांना शाप दिलेला आपल्याला माहित आहे. हे शाप द्यायची शक्ती त्यांच्यात गायत्री मंत्रामुळे आलेली आहे. गायत्री मंत्रापेक्षा कलियुगामध्ये भगवती मंत्र घेतलेला बरा. ही सगळ्यांची आई आहे. गायत्री काय, नि सावित्री काय, नि डाकिनी काय, नि शंखिनी काय! सगळ्यांची आई फक्त भगवती आहे. तेव्हा दुसऱ्यांना अगदी होरपळून टाकण्याची शक्ती घ्यायचीच का आपण? तेव्हा गायत्रीमंत्र म्हणायचा का नाही? म्हणाना काही हरकत नाही आम्हाला. त्याचे मग जे उपदव्याप आहेत ते सहन करायलाच पाहिजेत. सूर्यनाडी किंवा चंद्रनाडी, जिला ईडा किंवा पिंगला म्हणतात त्याच्यावरती मला काम करायचं नाही. ज्यांना करायचंय ते करतच राहू देत, आणि करतीलच. कितीही सांगितलं तरी ते तिथेच बसणार आहेत. तेव्हा त्यांना करु दे. ज्यांना त्यांच्याकडे जायचं आहे त्यांनी खुशाल जाऊन आपल्या संबंध चक्रांना ठिकाणावर लावावं. आणि मग मात्र माझ्याकडे येऊ नये. कारण नंतर तुमची सगळी चक्र तुटल्यावर ह्या मंत्रांच्यामुळे मी काही त्याला निमित्त नाही. जर तुम्ही कुणाला जर कधीही शाप दिला तर तो शाप तशाचा तसाच तुमच्याजवळ परत येणार आहे. ती पॅरॅबोलिक मुव्हमेंट [परवलयिक/वक्राकार होणारी हालचाल/अंडाकृती] म्हणतात. त्याच्यावरती आणखीन आता नवीन पुष्कळ प्रकारच्या [अस्पष्ट..]. प्रत्येक गोष्ट ही सरळ जाते पण पॅरॅबोलिक जात नाही. म्हणजे ज्या स्थितीत निघते तिथेच येते. आता मी हे फार जुने तत्व [अस्पष्ट..]. तेव्हा शिव आणि शक्ती. शक्ती आपण जर पाहिली तर भिंगाच्याखाली शक्तीस्वरूप पॅराबोलिक आहे. ती एका बिंदुपासुन निघता निघता त्याच बिंदुत परत येते. जर तुम्ही कुणाला शाप दिला तर तो शाप परत तुमच्यावर [अस्पष्ट..] त्यावेळी तो गायत्रीमंत्र तुम्हाला सोडणार नाही. म्हणुन फक्त प्रेमाचा संदेश पाळावा. म्हणजे माझ ऐकायचं असेल तर. नंतर पार झाल्यावर मग कोणताही मंत्र म्हटला तर त्याचा अर्थच वेगळा येईल. म्हणजे कनेक्शन लागतं ना. पार व्हायच्या आधी फक्त आपल्या आसपासच्या लोकांवर आपण प्रेम केलं कि नाही ते बघावं. त्याबद्दल मी पहिल्या दिवशी सांगितलं होतं कि ज्या माणसाला प्रेम करता येत नाही त्याला आत्मसाक्षात्कार होणार नाही. घरातच विधवा बसवून रात्रंदिवस ज्याला ती बाई टोचत असेल किंवा एखादा पुरूष अशा माणसानी इथे येऊ नये. अशा छळणाऱ्या लोकांना परमेश्वर छळेल. का छळणार नाही? का छळू नये?? तो बसलेला आहे सगळ्यांना बघायला. जे लोक आत्म्याचे दीन आहेत त्यांना सगळीकडे बघतो आणि जे लोक दुसऱ्यांच्या आत्म्याला खातात त्यांनी साक्षात्काराची स्वप्नं ह्या जन्मात तरी बघु नये. आधी आपल्या घरी जाऊन आपल्या आसपासच्या लोकांना बघुन तेवढं तरी लक्षात घ्यावं कि आपण कुणाचा छळ तर करत नाही. [अस्पष्ट..] इतके छळवादी असतात. [अस्पष्ट..] जोपर्यंत आपल्या शिक्षांचा त्राण पूर्णपणे निघत नाही तोपर्यंत त्यांना प्रेमच करता येत नाही. त्यांच्यापासुन हि परंपरा सुरु झाल्यावर मग आपण तेच कार्य करतो. पण असल्या तऱ्हेचे लोकं असल्या गुरुकडे जावेत.

आमच्याकडे फक्त प्रेम करणे शिकवण्यात येतं. आणि त्यांना प्रेमच येतं आणि ते सुध्दा परमेश्वराचं प्रेम, अनंत चैतन्यस्वरुप प्रेम आहे. जे अनन्य आहे. ते अनंत आहे. अनलिमिटेड. आपण जेव्हा आपल्या आईला, बहिणींना, ह्यांना, त्यांना प्रेम करतो तेव्हा ते [अस्पष्ट.. ] अनंताला आपल्या अंतामध्ये घालुन आपण त्याचा अंत करतो. लिमिटेड लव्ह इज जस्ट ऑपोसिट ऑफ डिव्हाईन लव्ह [मर्यादित प्रेम हे परमेश्वरी प्रेमाच्या विरुद्ध आहे] अशा माणसाला हि माझी मुलगी आणि ती त्याची मुलगी असं दिसत नाही. पण हे एकदम त्या क्षणी होतं, ज्या क्षणी फक्त निर्विचरिता येते. त्या क्षणी फक्त निर्विचरिता येते आणि हातातनं व्हायब्रेशन्स येत असतात. आणि आत मध्ये शांत वाटतं. जो मनुष्य बरेच दिवसात झोपु शकला नसेल तो घरी जाऊन घोडं विकून, आपल्या मुलीच्या लग्नानंतर जसे लोकं झोपतात तसंच झोपतो. झालं, गंगेत घोडं न्हालं. अशी त्याला भावना येते. त्याला असं वाटतं कि डोक्यावर जे मी ओझं घेऊन चालत होतो ते थपकन खाली पडलं. हि भावना आल्यावर तो बेसुमार झोपतो. काही काही लोक तर मी पाहिलेले आहेत, जे अगदी चार वाजता उठून सगळं आन्हिक बिन्हीक करत बसतात ते लोकं आपले व्यवस्थित अगदी आतमध्ये असतात. [अस्पष्ट...] अश्या लोकांची तब्येत [अस्पष्ट..]. ते कुणाची तब्येत सांभाळत बसत नाही. आपल्या तब्येतीबद्दल ते कुणाला दुःख देत नाही. कुणी त्यांना दुःख देऊही शकत नाही, कारण ते काही घेऊही शकत नाही. तेव्हा अशा वेळेला फक्त निर्विचारता येते आणि त्यानंतर निर्विकल्प. निर्विचरितेनंतर निर्विकल्प आल्याशिवाय माणसाने आपल्याला सेल्फ रिअलाइज्ड मी झालो रे झालो असा [अस्पष्ट..]. निर्विकल्पतेचा अर्थ असा आहे कि आपल्या चैतन्याबद्दल आपल्याला काहीही शंका राहत नाही. ह्या हातातून वाहतं,लोकांना बरं करतं. हे देऊन देऊन मनुष्य विसरतो [कि] आपण फार श्रेष्ठ आहोत, अशी आपल्याबद्दल जेव्हा कल्पना होते तेव्हा त्याला मी निर्विकल्प म्हणते. मग अशी माणसं माझ्याकडे येऊन मला सांगतात, "माताजी बघा माझं सहस्त्रार बघा, इकडे बघा [अस्पष्ट..]" म्हटलं कि "मी आणि माझी कुंडलिनी [अस्पष्ट..] असते तर हे दिसायला लागलं रे लागलं कि निर्विकल्पता सुरु होते."

पण त्याच्या आधी [57:46..अस्पष्ट..58:03] जे आहे ते असंच आहे. ते असंच आहे, वास्तविक असंच आहे. असंच ते दुसरं काही होत नाही. लोकांना वाटतं, अहो आमचा आत्मसाक्षात्कार झाला [58:16..अस्पष्ट..58:38] मी त्यांना असं स्पष्ट शब्दात सांगते, अहो आत्मसाक्षात्कार म्हणजे [58:42..अस्पष्ट..59:04] निर्विचारता येते आणि मग निर्विकल्प येतो. आणि त्याच्यानंतर मनुष्य सोहम स्थितीला येतो म्हणजे त्याबद्दल सबंध [अस्पष्ट..] त्याला काही धरत नाही त्याला काही पकडत नाही तो कशाला धरत नाही [59:23..अस्पष्ट..रिक्त जागा..अस्पष्ट..1:01:06] तरी त्याच्यात पुष्कळ नावं आहेत. [अस्पष्ट..] चैतन्यचं अंधाराचं सारखं भांडणच चालू आहे मुळी. [अस्पष्ट..] भांडण चालू आहे. [अस्पष्ट..]म्हणजे ह्या संबंध संसारांतलं जेवढ एलिमेंट्स [मूळ तत्वे] आहे, पाणी आहे, हे आहे, त्याच्यात [अस्पष्ट..] लोक असं म्हणतात अहो ऐवढा मोठा तो, आणि कृष्णा कसा [अस्पष्ट..], ते सगळं नाटक आहे. ते नाटक चालू आहे. ज्यांनी [अस्पष्ट..], श्री कृष्ण एवढे मोठे [अस्पष्ट..] त्यांच्याबद्दल काय सांगायचं? [अस्पष्ट..] ते नाटक होतं, आणि नाटक करण्यासाठी [अस्पष्ट..]. महाभारत झालं नसतं तर आपण कोणाला जाणलं असता का? म्हणून हे सगळं नाटक [अस्पष्ट..]. [अस्पष्ट..] नाटकामध्ये बसून [अस्पष्ट..]. त्या गोष्टीला [अस्पष्ट..] आपली तयारी फक्त [अस्पष्ट..] मी आज आहे, फक्त मी आज आहे, मला पुढे काही जाणायचं नाही. कर्म [अस्पष्ट..] तुम्हाला जर टेलिव्हिजन पाहायचं, मी बक्षिस दिला तुम्ही उगाच काय मला इंजिनीरिंग विचारणार आहात का? [अस्पष्ट..] इंजिनीरिंग आहे त्याच्या मागे फार मोठं टेक्निक [अस्पष्ट..] पुष्कळ लोक म्हणून ते करताहेत. आणि पुष्कळ [अस्पष्ट..] तरीसुद्धा एक गोष्ट निर्विवाद आहे, [अस्पष्ट..] काही गरज नाही. आधीची जी [अस्पष्ट..] ऐकून घ्या, टेलिव्हिजन बघून घ्या. [अस्पष्ट..] मग तुम्ही जर त्याचे इंजिनीअर बिंजिनीअर झाले तर चांगली गोष्ट आहे, त्याच्यात डोकं दुखी कशाला? जर हवं असला तर घ्या. भूक लागली असेल तर लगेच जेवायला बसा. [अस्पष्ट..] तेव्हा आत्मसाक्षात्कार त्याच्यासाठी काहीही करायचं नाही, एखाद्या लहान मुलासारखं अबोध [अस्पष्ट..] ती गणेशाला [अस्पष्ट..] कारण काय लहान मुलासारखा आहे. आपल्याला लहान मुलासारखं होता येत नाही. आपण म्हणजे आपलं डोकं फार आहे नं हे. आपण आपल्या बुध्दीने आपल्याला ठकवत असतो हे त्यातलं आणखीन विशेष. आपणच आपल्या मागे लागुन आपल्या डोक्याला अश्या कल्पना वगैरे देत असतो आणि अश्या गोष्टी सांगत असतो कि त्यानी आपण जे ठकतोय [अस्पष्ट..]

तेव्हा ज्यांनी ज्यांनी आज जे प्रश्न विचारलेत त्यांना एवढाच मला एक प्रश्न विचारायचा आहे, कि ह्याचा लभ्यांक काय? [अस्पष्ट..] तुम्हाला हवंय काय? स्वतःकडे लक्ष द्या. ह्याच्यात तुम्हाला मिळवायच काय आहे? निदान आपला स्वार्थ तरी घ्या आता. स्वार्थ म्हणजे स्व चा अर्थ जर तुम्हाला मिळाला तरी साक्षात्कार झाला. जसा होतो तसाच आहे. त्याबद्दल कुणीही काहीही लिहलेलं असलं तरी ते नाही ते नाही. पुष्कळ लोकांना गप्पा मारण्याची पण सवय आहे. असे लोक पुस्तकंसुध्दा फार लिहतात. त्याला आपण भारूड म्हणतो. ती पुस्तकं नाही. [अस्पष्ट..] वेद वाचतो काय? चांगली भाषा एखाद्या माणसाला येते म्हणुन तो जाणता नाही. ओळख आहे. [अस्पष्ट..] आपल्याला आपली ओळख पटवायची असली [अस्पष्ट..] तर अश्या माणसाची सुध्दा ओळख आहे. आणि माझ्याजवळ इतकी सरळ सहज ओळख असणार, अश्या तऱ्हेचा मनुष्य जेव्हा माझ्या पुढे येतो किंवा माझ्या दृष्टीपथात येतो तेव्हा किंवा कुठेतरी [अस्पष्ट..] मी डॉक्टर साहेबांना दाखवलंय माझ्या [अस्पष्ट..]जोरात गरगर फिरतं [अस्पष्ट..] आणि त्याला [अस्पष्ट..] तेव्हा हे प्रश्न थोड्या वेळाने [अस्पष्ट..].

आता सगळ्यांनी माझ्याकडे असा थोडासा हात [अस्पष्ट..] तर त्याची प्रचिती घेऊ. नंतर इथे आता इतकी मंडळी [अस्पष्ट..] त्यामुळे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे कि ते काही [अस्पष्ट..] करणार नाही. पण प्रचिती होऊ शकते सगळ्यांना. सगळ्यांनी आता माझ्याकडे हात करा. ते पांच दहा मिनिटाचे काम आहे. ती कुंडलिनी [अस्पष्ट..] तर आपलं रिअलायझेशन झालं तर आपल्या हातातुन थंड थंड वारं येतं थंड थंड आणि डोक्यामध्ये ती निर्विचरिता. बाहेर [अस्पष्ट..] आणि डोक्यावर जर हात ठेवला तर इथे काहीही [अस्पष्ट..] ते बघुन घ्यायचं जर [अस्पष्ट..]. तर आपण डॉक्टर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे राजवाडे [अस्पष्ट..]

राजवाडे साहेब हे सुध्दा एक फार मोठे परम भक्त [अस्पष्ट..] परम साधु [अस्पष्ट..] आणि डॉक्टरसाहेब सुध्दा फार मोठे आहेत. त्यांचा मोठेपणा त्यांना अजुन [अस्पष्ट..] माहीती नाही. आता ते कदाचित आपल्याला कधीच मोठं म्हणु शकणार नाही कारण त्यांचा अहंकारच सुटलेला आहे तेव्हा किती त्यांची डोकी खराब केली तरी डोकी खराब होणार नाहीयेत. कारण ती फार मोठी मंडळी आहेत. फार मोठी संतमंडळी आहेत. आणि परमेश्वरावर फार मोठा दावा आहे त्यांचा. तेव्हा ते जे हे कार्य करत आहेत त्याच्यावर सगळ्या देशांचा अमृताचा वर्षाव होतो आहे. [अस्पष्ट..] त्यांच्याशी जेलसी वगैरे करायची म्हणजे मुर्खपणा आहे. तेव्हा [अस्पष्ट..] त्यांच्याकडून मदत घ्या. ते तुम्हाला सांगतील तुम्ही पार झाले आहात कि नाही. त्यांना माहिती आहे. [अस्पष्ट..] तीन वर्षाचा मुलगा सुध्दा नाही होत पार. हे होतं . पुष्कळदा असंही असतं कि एखादा फार आपण भक्त समजतो तो मनुष्य पार [अस्पष्ट..] आणि एखादया माणसाला फार वाईट समजतो [अस्पष्ट..] काही नाही आतलं अंतरंग कुणी पाहिलंय [अस्पष्ट..] स्वतःला वाईट समजायचं नाही [अस्पष्ट..] तुम्ही सगळ्यात सुंदर कलाकृती आहात. हजारो फुलं जरी मानवाच्या पायावर घातली तरी एका माणसाची सर त्याला येनार नाही. संबंध नंदनवन जरी त्यांच्या [फुलांच्या] पायावर घातलं तरी एक माणूस तयार होऊ शकनार नाही. इतकं सौंदर्य माणसामध्ये आहे. इतकं ते गौरवपूर्ण आहे. त्याला फक्त जाणलं म्हणजेच आपल्याला कळतं कि आपण कितीतरी चुका करत होतो जेव्हा आपण आपल्यापासुनच दूर पळत असतो. मग मनुष्य कधी बोर होत नाही आपल्या आनंदात असतो. आणि ते सर्व धर्मानी. कुठल्याही धर्मानी असं सांगितलं नाही आम्ही [अस्पष्ट..] तुम्हाला राख काढून देऊ किंवा आम्ही तुम्हाला बांगड्या काढून देऊ, कि तुम्हाला अंगठ्या काढून देऊ, तुम्हाला आम्ही नारळ घालु असं कोणत्याही धर्मात लिहलेलं नाही. त्या सर्व धर्मात सांगितलेलं आहे ....

[अपूर्ण]

Pune (India)

Loading map...