Public Program Sangli 1986-01-06
6 जानेवारी 1986
Public Program
Sangli (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
Public Program Sangli, 6 th January 1986
सांगली तसच कोल्हापूर दोन्हीही ठिकाणच्या सर्व साधक मंडळींना आमचा प्रणिपात . मागच्या वर्षी आम्ही इथे आलो होतो, आणखीन सहजयोगाबद्दल लोकांना माहिती दिली होती . आता आपण असा विचार केला पाहिजे , की ह्या जगामधे आपण आलो ते कशासाठी ? त्याबदद्ल आपल्या मनामधे पुष्कळ भ्रम आहे . तो विचार आपण करू नये असे पुष्काळांचे मत आहे. कारण असा विचार करून फायदा काय होणार ? आपल्याला पुढचं काय ते काय माहीत नाही . पण जर आपण लक्षात घेतल तर अनेक हजारो वर्षांपासनं आपल्या देशामधे विशेषत: ह्या महाराष्ट्रात , ह्या संतभुमिमधे संतानी अस संगितलेल आहे की, अवघाची संसार सुखाचा करीन ! इतकच नव्हे तर पसायदान म्हणून जे काही ज्ञानेश्वरांनी लिहलय ते सुद्धा वर्णन आपल्याला खर वाटत नाही की , जे जो वांछील ते तो लाहो ! हे कस होणार?, ह्याला मार्ग काय ? जी जी वर्णन अशा परमेश्वरी साम्राज्याची आपल्या शास्त्रात करून ठेवलीय . त्यासाठी मनुष्य नेहमी धडपडत असतो की, अस साम्राज्य आलं पाहिजे .पण ते येणार कस ? आता कम्युनिस्ट लोकांच अस म्हणन आहे की , मार्क्सनी, मार्क्सवादी लोकांच अस म्हणन आहे की मार्क्सनी अशी रचना केली होती की,असे विशेष लोक तयार होणार आहेत , की ज्यांना ग्व्हर्नमेंटची गरज नाही , ज्यांना पोलिसांची गरज नाही ,ज्यांना कशाचीही गरज नाही .पण ते कसे होणार ? त्याचा कुठे कोणी उल्लेख केलेला नाही. ते कसं घडून येणार आहे ?अस होणार तरी कसं ? म्हणून त्यांनी जबरदस्ती केली ,कसतरी करून कम्युनिझम आणला.पण त्याचा काही फायदा झाला नाही. मनुष्य होता तसाच आहे . तेव्हा त्याला काहीतरी कारण असलं पाहीजे , ते कारण अस आहे आपलं अज्ञान . आणि हे अज्ञान एवढ्यासाठी आहे की ,कुंडलिनीबद्दल उघड करून बोलणं झालं ते आपल्या महाराष्ट्रात ज्ञानेश्वरांनी केलं . त्यांनी सहाव्या अध्यायात सांगितलेलं आहे की , कुंडलिनी ही चक्रवर्तीची शोभा आहे . आणि ती एकदा जागृत झाली म्हणजे मनुष्याला परमार्थ मिळतो .परमअर्थ ,त्याला अर्थ लागतो तो समर्थ होतो . पण ही कुंडलिनी जी सहाव्या अध्यायात वर्णिलेली आहे ती आपण का जाणत नाही कारण सहावा अध्याय वाचायचा नाही असं सगळ्यांनी सांगून ठेवलयं ,का वाचायचं नाही असा प्रश्न आपण विचारत नाही . आपल्याला कोणी सांगितलं वाचायचा नाही म्हणजे वाचायचा नाही. कारण त्यांना कुंडलिनी म्हणजे कशाशी खातात ते माहिती नाही . तेव्हा जे लोक देवाच्या नावावरती पैशे कमावतात देवाच्या नावावरती प्रवचनं करतात आणि तुम्हाला सांगतात की , देव असा आहे , देव तसा आहे . (श्री माताजी साऊंड प्रॉब्लेम बद्दल बोलत आहे ) तर अशी जी लोकं आहेत त्यांनी विशेषकरून कुंडलिनी म्हणून काही वस्तू नाही असं सांगितलं . परत काही लोक जे जगात अशेही लोक आहेत की , ते अतिशहाणे स्व:ताला समजतात . त्यांनी याची काही विशेष माहिती न मिळवताना ,अनुभव न घेतांना असं सांगितलं की , कुंडलिनी जागृत झाली म्हणजे माणूस बेडकासारखा ऊडु लागतो . किंवा त्याच्यामध्ये अशे अशे काहीतरी विचित्र प्रकार येऊ लागतो , तो विक्षिप्त होतो. तसं काहीही झालं नाही पाहिजे कारण कुंडलिनी ही जर जगाची आई आहे आणि तुमची आई आहे तेव्हा , आई जेव्हा मुलाला पुनर्जन्म देते त्याच्यामुळे काहीही कोणाला त्रास होत नाही आई सगळा त्रास उचलून घेते . तेव्हा जर ही शक्ती आमच्यामधे आहे . आजपर्यंत आम्ही किती देवासाठी काय काय केलं ,केवढी मेहनत केली पारायण केली , त्याच्यासाठी देवाचं नाव घेतलं . इथपर्यंत झालंय आहे की ,आपली मुलं म्हणतात की तुमचा देव-बिव काही दिसत नाही ऊगीचच तुम्ही बेकार ह्याच्यात पडलेले आहेत . तेव्हा त्यांनाही उत्तर द्यायला पाहिजे , ही सर्व धडपड आपण का करतो .आणि हे जे मोठ-मोठे संतसाधु झाले ,ज्यांनी आपल्याला इतकं परमेश्वराबद्दल सांगितलं आहे ते काही खोटं बोलले का ?आज आपण त्यांची भजनं म्हणत बसतो ते काही खोट सांगत होते का ,की असं आहे . आपल्यामधे आत्मसाक्षात्कार हा घडला पाहीजे .असं इथून तिथून सर्वांनी सांगितलंय . चायनामध्ये लाऊस्ते , नंतर तिथे सॉक्रेटिस झाले नंतर त्याच्यानंतर इकडे आपले इब्राहम वगैरे झाले किंवा त्याच्यानंतर ख्रिस्त वगैरे बुद्ध ,महावीर असा कोणीही नाही झाडून सर्वांनी एकाच गोष्ट सांगितली की ,तुम्हाला पुनर्जन्म तुमचा झाला पाहीजे , तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडला पाहीजे . जोपर्यंत आत्मसाक्षात्कार घडत नाही तोपर्यंत सर्व थोतांड आहे . पण आपण ते पडताळून पाहिलं नाही तिकडे काही आपण लक्ष दिलं नाही , आपल्याला ते काही जमत नाही .आता सहाव्या अध्यायाच सोडूनच टाका ,जे जमत तेवढं करायचं पण हे सगळं चांगलं जमण्यासारखं आहे कारण ही जी शक्ती तुमच्यामधे कुंडलिनीची आहे ती तुमच्यामधे आहे ,ती स्थित आहे . म्हणजे अगदी साध्या शब्दामध्ये सांगायचं जस एखादया बी मध्ये त्याच अंकुर असतं ,स्थित असतं सुप्ता अवस्थेत ,तशी ही कुंडलिनी तुमच्यामधे आहेच . तिच्यासाठी काही करायला नको द्यायला नको त्याच्यासाठी पैशे नको ,उपास -तापास नको ,पारायणं नको , काही नाही , बाह्यातलं काही करायचं नाही फक्त ही कुंडलिनी जागृत करायची .आता दुसरं साध असं आहे की जर तुम्हाला एखाद्या रोपाला किंवा एखाद्या झाडाला जागृत करायचं असलं किंवा एखाद्या बी-तनं एखाद रोप काढायचं असलं तर काय करता तुम्ही त्या बी ला तुम्ही असं नुसतं असं जमिनीत घालता कि आपोआप सहजच ते घडतं .सहज म्हणजे तुमच्याबरोबर जन्मलेलं आहे . तुमच्याबरोबर जन्मलेली ही शक्ती आहे ही तुमच्याबरोबर तुमच्यात असलेली ही शक्ती आहे .त्याच्यासाठीच म्हणतात तुज आहे तुजपाशी . ही संपदा तुमच्याजवळ आहे हि सगळी गोष्ट तुमच्याजवळ असतांना तुम्ही स्वतःच हित का मागत नाही. जे तुम्हाला हितकारी आहे . असं तुमच्यात आहे . त्यासाठी पैशे द्यायला नको , काहीही मेहनत नको ,ती फक्त आधी जागृत करून घायची . तर जशी तुम्ही एखाद्या शेतीमधे नुसती बीं च रोपंण करता आणि त्या बियांमधून रोपं निघतात ,त्यातनं तुम्हाला दिसतं की सुंदर सुंदर अशे अंकुर निघतात .त्या अंकुराना तुम्ही वाढवुन मोठाले वृक्ष करता तशी अगदी ही सहज -सुलभ गती आहे ,अगदी सहज -सुलभ गती . सहज तुमच्याबरोबर जन्मलेली ही एक योगाची तुमच्यामधे शक्ती आहे आणि ती शक्ती प्राप्त करून घेणं हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे मग तुम्ही तो करू का नाही ,तो तुम्ही का मिळवून घेऊ नये . असा एक साधा विचार आपल्या मनात ठेवला पाहिजे . दुसरी गोष्ट अशी आहे की आजकालच्या वर्तमान काळात घोर कलियुग आहे . तुम्ही इकडं बघितलं किंवा तिकडे बघितलं तर कुठेही बघितलं तरीही तोच प्रकार आहे , घोर कलियुग आहे॰ आणि काही लोकांना समजत नाही , आहे तरी काय प्रकार ?एवढा कलियुग झालेला आहे की मनुष्य अगदी भ्रमात पडलेला आहे . तसही जेव्हा साधुसंत आले त्यावेळेला सगळ्यांनी त्यांचा छळच केला कोणीही त्यांच ऐकून नाही घेतलं .सगळे बघ्यासारखे त्यांना बघत राहिले . त्यांना लोकांनी एवढं छळलं पण कुणाच्या मनात सुध्दा विचार आला नाही की ,बुआ ह्यांना ह्या साधुसंताना लोक छळतायत तर आम्ही काही भलं करावं . यांना कमीतकमी काही नाही तर थोडसं तरी संरक्षण द्यावं .पण तसा विचार कुणाच्या डोक्यात आला नाही . साधुसंताना ज्यांनी छळायचं ते छळलं आणि त्यांनी जे काही करायचं ,ते करून गेल्यावर मात्र त्याची देऊळ बांधली ,त्यांची मंदिरं बांधली आणि त्यांची भजनं लोकं गातात . त्याने काय फायदा होणार आहे ?, तर का असं झालं ?,त्याला कारण असं ,तुम्ही आत्मसाक्षात्कारी नव्हता जर तुम्ही आत्मसाक्षात्कार असता तर संतांना ओळखलं असतं तुम्ही. पण तुम्ही नव्हता म्हणून ते झालं म्हणून ते अज्ञानात झालं आणि हे मूळ कारण आहे . आणि ते अज्ञान कसं दूर होणार . आपल्यामधे प्रकाश यायला पाहीजे . आणि प्रकाश कसा येणार ? परमेश्वराचं जे प्रतिबिंब स्वरूप आपल्यामधे आत्मा आहे असं म्हणतात ते आहे किंवा नाही , ह्याची प्रचिती यायला पाहिजे . ह्याची जाणीव झाली पाहिजे ही जाणीव झाल्याशिवाय ह्या सर्व गोष्टी अशाच बोलण्यासारख्या आहेत .एक सायन्स बाहेरचं आहे . ज्या सायन्समध्ये समजा तुम्ही एखाद्या झाडाची उपमा देऊ शकता की ,जसं झाड बाहेर वाढतंय तसं हे सायन्स वाढतंय . आणि एक सायन्स मुळातलं आहे , ते मुळातलं सायन्स आपल्या देशामध्ये आहे . ते जे सायन्स एवढं वाढत गेलं त्याचा असा दुष्परिणाम झाला की मुळं हरवली त्याची आणि त्यामुळे आता उध्वस्त झालेली आहेत.
श्रीकृष्णाने सांगितलं की, हे जे झाड आहे चेतनेच हे उलटं वाढतं म्हणजे ह्याच डोक्यामध्ये ह्याची मुळ आहेत. आणि खालच्या अधोगतीला ह्याची पानं वाढतात म्हणून हे अधोगतीला चाललेत . कारण पूर्णवेळ ह्याचा असाच विचार असतो की कोणच्या जड वस्तूला आपण काबिज केलं तर बरं . पूर्वी ते देश जिंकत असत मग हे ,मग ते असं करत करत आता नुसतं पैशांशिवाय त्यांना काही सुचत नाही . पण त्या पैशांनीं सुख झालं नाही त्यानीही आनंद झाला नाही. त्यानीही काही आम्हाला जे वाटत होत कि आमचं ध्येय मिळेल ते मिळालेलं नाही . तर हे काहीतरी व्यर्थ आहे असं लक्षात येऊन ,आता जिथे जिथे फार श्रीमंत देश आहेत तिथे -तिथे लोक नुसते आत्महत्येचा विचार करत बसलेत . सगळं असून सुद्धा आम्हाला सुख मिळालं नाही ,आनंद मिळाला नाही . तेव्हा आपण ज्या मार्गाला आता चोखाळलंय कि , आपण आपली प्रगती करून घ्यायची . तेव्हा एक लक्षात ठेवलं पाहिजे कि प्रगती करत असतांना पहिल्यांदा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे ,नाहीतर काहीही तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही त्या प्रगतीचा. जे ह्या लोकांनी सहन केलं तेच तुम्हाला करावं लागेल . तुमची मुलं ते गांजा घेतील , हे घेतील ,ते घेतील , वाम मार्गाला जातील दारू प्याल ,अमक होईल ,तमक होईल ,सर्वनाश होईल . त्याच्यानंतर काही लोक मग सहजयोगात येणार . मग कशाला इतकं लांबलचक जायचं ,जवळचा रस्ता घ्यावा आणि जवळचा रस्ता म्हणजे असा आहे की ,तुम्ही या भारत भूमीत , या योग भूमीत जन्माला आलात आणि इथेच हा लाभ होणार आहे . पण लोकांचं असं म्हणणं आहे कि ,जर ही एवढी मोठी भूमी आहे , योग भूमी आहे इथे एवढे संत साधू झाले तर इथे इतकी दरिद्रता का ? त्याला कारण असं आहे ,श्रीकृष्णाने सांगितलंय की योग क्षेम वाहम्यहम् ! आधी तुम्ही योग् घ्या आणि मग तुमचं क्षेम होईल . क्षेम योग् नाही म्हटलंय . पण आपण विठ्ठल विठ्ठल करत फिरतो ,त्याला खिशात बाळगल्यासारखं . अरे माझं हे करून दे , अरे माझं ते करून दे असं आपण परमेश्वराला नेहमी साकडं घालत असतो . पण परमेश्वराला साकडं घालण्याची काही गरजच नाही मुळी , फक्त हे लक्षात ठेवलं पाहिजे की परमेश्वर सर्व समर्थ आहे . फक्त आपण त्याच्या साम्राज्यात गेलेलो नाही . तुम्ही जर इथे इंग्लंडचे रहिवाशी असता . (श्री माताजी साऊंड प्रॉब्लेम बद्दल बोलत आहे ) जर तुम्ही लोक इंग्लंडचे रहवाशी असता तर तुमचा इंग्लंडच्या राणीवर अधिकार आहे पण तुम्ही जर हिंदुस्तानचे रहिवाशी आहे तर तुम्ही तिच्यावर अधिकार गाजवू शकत नाही तसंच परमेश्वराचं आहे . जेव्हा तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात जाऊन बसाल ,तिथले रहिवाशी व्हाल आणि तिथे स्थिरस्थावर व्हाल तेव्हाच परमेश्वर तुम्हाला मानणार आहे . त्याच्याआधी तुम्ही कितीही टाहो फोडा काहीही करा सर्व व्यर्थ आहे , हे तुम्ही पहिलेलच आहे . आणि म्हणून आजची तरुण पिढी असं म्हणते की हे परमेश्वर वगैरे सर्व थोतांड आहे . जर असता तर असं कसं झालं असतं . तेव्हा ही जी एक गोष्ट आपल्या हातून चुकलेली आहे किंवा आपल्याला दिसलेली नाही ,किंवा आपल्या नजरेतच ती आली नाही . ती गोष्ट म्हणजे अशी आहे की आम्हाला अजून आत्मसाक्षात्कार झालेला नाही .ज्या मंडळींना आत्मसाक्षात्कार झाला अशी जी साधू संत मंडळी होती त्यांचं वागणं कसं होत .
त्यांना काही म्हणावं नव्हतं लागत कि, तुम्ही हे खाऊ नका, ते पिऊ नका, ह्याच घेऊ नका, त्याच घाऊ नका, ह्याच लुबाडू नका. राजे होते तर राजा सारखे राहिले, गरीब होते तर गरिबा सारखे राहिले. दुसऱ्याच्या गोष्टीची त्यांनी कधी हाव नाही धरली. तर हे जे , ह्या लोकांचं विशेष होत , ह्यांचं जे असं जे चरित्र होत, अशे जे विशेष तर्हेचे लोक झालेत, हे कशाने झालेत. शिवबा सुध्दा आत्मसाक्षात्कारी होते आणि त्यामुळे नेहमी त्यांचा एक मंत्र " ही श्रींची इच्छा !" . आता कुणी विचारलं नाही , श्री म्हणजे काय, श्री म्हणजे आदिशक्ती. ही आदिशक्तीची इच्छा म्हणून आम्ही करतो. आमचं काही मध्ये देणं घेणं लागत नाही, अशे ते होते , म्हणूनच त्यांचं एवढं चरित्र होत. म्हणून त्यांनी एवढी कर्तबगारी करून दाखवली. पण ज्या माणसामध्ये आत्म्याचा साक्षात्कार होत नाही तो एकाच तर्फेने वाढेल . त्याला कदाचित पैसे मिळतील, तो यशस्वी होईल, तो अमक होईल, तमक होईल, पण त्याला समाधान मिळणार नाही आणि त्याच्या नावाला सुध्दा थोड्या दिवसात लोक विसरून जाणार, पण जे आत्मसाक्षात्कारी झाली, जरी त्यांनी सर्व साधारण लोक होते, तरी सुध्दा त्यांच्या नावानं लोक दिवे लावतात आणि त्यांची पूजा करतात. म्हणजे हा आत्मा आहे तरी काय , हे आपण जाणलं पाहिजे. हा आत्मा आपल्या हृदयामध्ये जे परमेश्वराचे प्रतिबिंब पडलेलं आहे ते संपूर्ण सत्- चित्- आनंद अशा स्वरूपाचा आहे. सत्- म्हणजे जो आत्मा आपल्या एकदा चित्तात आला, आपल्या चित्ता मध्ये आल्या बरोबर आपल्याला सत्य काय आणि असत्य काय हे कळत. ते कसं कळणार तो आपल्या चित्तात येणार कसा ?कुंडलिनीच्या जागृतीने तो आपल्या चित्तात येतो . कुंडलिनी जागृत झाली आणि ती ब्रम्हरंध्राला छेदली कि , इथे सदाशिवाच स्थान आहे . ते आपल्या हृदयात प्रतिबिंबित असल्यामुळे आपल्या हातामध्ये चैत्यन्याच्या लहरी वाहू लागतात . ह्या चैतन्याच्या लहरींमुळे आपली ही बोटं ही जागृत होतात. ही पाच बोटं . ही सहा आणि सात .अशी सात चक्र उजवीकडे आणि अशी सात चक्र डावीकडे असतात .ती अशी मिळून मिळवली म्हणजे अशी दोन्हीकडून येऊन अशी जी मधोमध जी पोकळी अशी होते . तिथे अशी सात चक्र मधोमध होतात . ह्या सात चक्रांवरती देवता बसलेले आहेत आणि ह्या देवता कोणच्या आहेत त्या जर आपण जागृत करून घेतल्या तर आपले जेवढे प्रश्न आहेत मग ते सामाजिक असोत ,मानसिक असो ,शारीरिक असोत तुमच्या सांपत्तिक असो. कोणाचाही तऱ्हेचे प्रश्न हे सात चक्रांवरती सगळे ठीक होतात . कारण आपले संबंध जो शरीर आहे , किंवा बुध्दी आहे मन आहे अहंकार किंवा आपलं जेवढं काही मानवी व्यक्तित्व आहे ते संबंध व्यक्तित्व या सात चक्रातंन चालू असतं . तेव्हा ही सात चक्र आपल्यात जागृत झाली ह्या कुंडलिनीच्या जागरणाने तर सर्व तऱ्हेचे आपल्याला फायदे होतात . आता सहजयोगामध्ये अनेक रोग ठीक झालेत . कॅन्सरचा रोग ,अमका रोग ,तमका रोग सगळं ठीक झालेलं आहे .आणि मी त्यांना भेटतही नाही नुसतं फोटोवरती लोक ठीक झालेत कसं होत की, तुमच्यामध्ये समजा पोटात रोग असला म्हणजे पोटामध्ये लक्ष्मी नारायणाचं स्थान आहे . आता हे डॉक्टर मानायला तयार नाही कारण हे इंग्लिश भाषा शिकलेले आहेत . म्हणजे इंग्लिश डॉक्टर आता इथे आले तर ते मानतात . पण आपले डॉक्टर अजून तिथून आल्यावर मानतील कदाचित तर तुम्ही नुसतं लक्ष्मी नारायणाला जागृत केलं तर तुमच्या पोटाचा त्रास जाणार .पण ते जागृत करण्यासाठी कुंडलिनी वर यायला पाहिजे कारण तिच्या शक्तीमुळेच ते जागृत होईल . तर ती वर कशी करायची ,तीनी येऊन हे जागृत करण्यापूर्वी तिला कसं आळवायचं वगैरे हे तुम्हाला सहजयोगात थोडंस शिकावं लागतं . पण सुरवातीला तुमची जागृती आम्ही करून देतो म्हणजे अगदी जी ब्रम्हनाडी जी आतमधे अगदी सूक्ष्म नाडी आहे त्याने कुंडलिनी येऊन आधी भेदन करून टाकते . मग त्याच्यानंतर मग तिचा जे काही प्रसार आहे किंवा तिचा जो विस्तार करायचा आहे त्यासाठी काय करायचं तेवढं शिकलं कि झालं ,तुम्ही स्वतःचे गुरु होऊन बसता . आता हे जे ह्यांनी म्हटलं ,"अवघाचि संसार सुखाचा करीन "! तेच आम्ही म्हणतोय पण आम्ही सिध्द करून देऊ आणि करतोय. फार मोठ कार्य आहे , हे विश्वाच कार्य आहे . आणि या विश्वाच्या कार्यामध्ये अनेक तऱ्हे -तऱ्हेच्यागोष्टी आम्ही केलेल्या आहेत. म्हणजे आता आपण ऐकलंच असेल की , आम्ही पुष्कळशी लग्न करवली तिकडे आणि त्या लग्नामध्ये काही हुंडा नाही, जातीभेद नाही, काही नाही. अगदी व्यवस्थित लग्न होऊन आणि ह्या मुलांच इतकं आयुष्य ठीक झालेलं आहे . यांच्यामध्ये काही भांडण नाही ,तंटा नाही आणि ह्यांच्या पोटी सर्व मोठा -मोठाले ऋषीमुनी जन्माला येतायत फार मोठ -मोठाले साक्षात्कारी पुरुष जन्माला येतायेत हे मी स्वतः पाहिलेलं आहे . त्यामुळे नवीनच जात काहीतरी तयार होत आहे अशा मानवाची , ज्यांच्यावर परमेश्वराचा अत्यन्त आशीर्वाद आहे . आणि त्या आशीर्वादात ते पल्लवीत होतात आणि फुलतात ,प्रत्येक प्रांगणामध्ये .
त्याला काही जरुरी नाही की तुमची सामाजिक स्थिती सुधारेल किंवा हेच , प्रत्येक प्रांगणामधे तो मनुष्य अत्यन्त प्रगतिशील होतो . आणि त्या प्रगतीमध्ये तो आनंद पावतो .सर्वीकडे त्याची उन्नती होते , एकीकडे होत नाही. एकीकडे झाली म्हणजे ती परत येते त्याच्याकडे आणि त्याचं नुकसान करते . समजा आता सायन्स तुम्ही वाढवलं तर सायन्सचे तुम्ही मग अटॉमबॉम्ब बनवले , अटॉमबॉम्ब आलेत तुम्हाला मारायला . तुमच्याजवळ खूप पैशे आले पैशे आले करत करत गेले की दारू , अमक-तमक , तुमचे मुलं खराब होणार . परत ते तुमच्याकडे येणार . सत्ता आली म्हणजे समजा झाले मिनिस्टर ,प्राइमिनिस्टर ,अमके -तमके मग ते परत तुमच्याकडे येणार . पण ही सर्वांगीण प्रगती जी आहे ज्याला समग्र प्रगती म्हणतात ,ती फक्त आत्म्याच्या द्वाराने होते आणि म्हणून हा सत्य स्वरूप आहे . कारण ह्याने सत्य जाणलं जातं , खरं काय . आता आपण म्हणतो महालक्ष्मी आहे . आता महालक्ष्मीचं देऊळ हे खरं की खोटं , ही महालक्ष्मी स्वयंभू आहे की नाही हे कसं ओळखायचं . आता म्हणतात महालक्ष्मी पण खरं कशावरून ते तुम्हाला नाही ओळखता येणार पण हे फॉरेनचे लोक आले हे ओळखू शकतात ,म्हणून ते देवळात गेलेत . प्रत्येक देवळात जात नाही . कारण तिथून चैतन्याच्या लहरी येतात अशे जे स्वयंभू खरं स्थान आहे तिथून चैतन्याच्या लहरी येतात , ती त्यांना जाणीव होते म्हणून ते तिथे गेले . म्हणून सत्य काय हा मनुष्य खरा की खोटा कसं ओळखायचं त्याला सुध्दा या चैतन्याच्या लहरींनी तुम्ही ओळखता . आणि थंड-थंड अशा हातामध्ये गार - गार अशा लहरी येतात आणि चारहीकडे तुम्ही त्यांना जाणू शकतात . ह्या ज्या आहेत ह्या सर्व परमेश्वराच्या प्रेमाच्या शक्तीच्या जाणिवेची ओळख आहे . परमेश्वर हा प्रेम स्वरूप आहे आणि त्यानी सगळीकडे ही ब्रह्मशक्ती जी आहे हे त्याचं प्रेम आहे . ही सगळीकडे ती वावरत असते. आणि ती सर्वप्रथम कुंडलिनी जागृती नंतर तुम्हाला तिची जाणीव होते नाहीतर होत नाही . त्याच्यानंतर जी दुसरी स्थिती सांगितली आहे की चित्त , चित्त आहे सत् - चित् आनंद . चित्त आहे म्हणजे तुमचं चित्त , जे चित्त आहे. आता समजा तुमचं चित्त ह्या गोष्टीवर गेलं कि लगेच त्याच्यातनं तुमच्याकडे विचार त्याच्याकडून येऊ लागतात . पण तुम्ही ह्याच्यावर काही परिणाम करू शकत नाही . किंवा एखाद्या माणसाकडे तुमचं चित्त गेलं त्याच्यावर तुम्ही काही परिणाम करू शकत नाही. तर जेव्हा मनुष्य आत्मसाक्षात्कारी होतो तेव्हा त्याच्या चित्ताला धार येते , चित्त प्रकाशित होत . समजा बसल्या- बसल्या आम्ही जर कोणाचा विचार केला त्यानी किंवा त्याने आमचा विचार केला तर आमच्या डोक्यात येईल की त्याने विचार केला आणि विचार आमच्या डोक्यात आल्याबरोबर त्याला त्याच फळ मिळणारं . आपलं नुसतं चित्त जरी तिकडे गेलं तरी तो मनुष्य फायदा , त्याला फायदा होतो. आणि इतकं हे अद्भुत आहे ,इतकं अद्भुत आहे की माणसाला विश्वास वाटत नाही की हे अद्भुत इतकं माताजी सांगतात हे कसं होऊ शकेल ,असं कसं शक्य आहे . अद्भुत असं कसं म्हणेल पण आहे . आता जर कुणाला सांगितलं की आपण चंद्रावर गेलो तर लोकं विश्वास ठेवणार नाही कारण त्यांना असं वाटेल चंद्रावर कशे गेले जे जुने लोकं आहेत ते विश्वास ठेवत नाही पण ही गोष्ट खरी आहे. जसं तुम्ही सायन्स मध्ये मिळवलं त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त तुम्हाला सहजयोगात मिळणार आहे पण सहजयोगाचं सायन्स जे परमेश्वरच सायन्स आहे त्याच तंत्र शिकून घेतलं पाहिजे . आणि ते शिकायला काही वेळ लागत नाही . लहान लहान मुलांना सुध्दा कळतं.हे बुद्धीच्या पलीकडचं आहे . परमेश्वरच सायन्स हे बुद्धीच्या पलीकडचं आहे . कारण बुद्धी ही सीमित आहे आणि असीमच हे ज्ञान आहे . म्हणून त्या असीम दशेला उतरण्यासाठी माणसाला कुंडलिनीची गरज आहे . जेव्हा कुंडलिनीची जागृती होते तेव्हाच मनुष्य त्या दशेला पोहचू शकतो . त्याबद्द्दल कोणचीही शंका-कुशंका ठेवू नये आणि तिसरी स्थिती आत्म्याची आनंद आहे . मनुष्य आनंदात उतरतो आणि आनंदाला सुखं आणि दुखं नसतं. सुख आणि दुखं नसतं. फक्त आनंदाला आनंद केवळ आनंद असतो . आनंदाला प्रत्येक वेळेला मनुष्य कोणत्याही गोष्टीकडे बघतो तर एक साक्षी स्वरूप होऊन बघतो .त्याच्यात त्याला कोणाचीही -कोणाचीही खंत वाटत नाही कारण तो निरपेक्ष असतो . कोणतीही गोष्ट नाटक चाललंय, हे नाटक आहे सगळं , नाटकाकडे बघतांना आपल्याला काही खंत वाटत नाही तसंच माणसाला काही वाटत नाही आणि तो आनंदात असतो . आणि हा आनंद त्यावेळेलाच मिळतो जेव्हा तुम्ही आत्मसाक्षात्कारी होता. तर कुंडलिनीची जरी जागृती झाली आणि तुम्ही जरी पार झाले , तरीसुध्दा पुढे त्याची प्रगती हि केलीच पाहिजे नाहीतर सर्व व्यर्थ आहे . असं म्हणतात की जर एखाद बी उगवलं गेलं आणि ते असच फेकून टाकलं तर ते वाया जातं . तशीच जी मंडळीं कुंडलिनीची जागृती घेऊन त्याच्याकडे लक्ष देत नाही ते अशे वाया जातात. तेव्हा आपल्या सर्वांना माझी हातजोडून विनंती आहे सांगलीच सगळ्यात सेन्टर सगळ्यात कमजोर आहे कारण इथे लोंकाना वेळच नाहीय .इथल्या लोकांना म्हणतात वेळच नाही सगळ्यात बिझी लोक इथेच दिसतात मला ,आणि त्यामुळे सांगलीला इतक्यादा येऊन सुध्दा काही विशेष झालं नाही . कोल्हापुरात सुध्दा तसाच प्रकार दिसतोय . म्हणून आम्ही विचार करतोय की सांगलीत कमीत - कमी हे जर सेन्टर सुरु झालं आणि इथल्या लोकांनी पुढाकार घेतला तर हे सेन्टर फार चांगल्या रितीने चालू शकतं आणि लोकांचं भलं होऊ शकतं ,कारण सगळं जग पुढे गेलं आणि जर तुमची सांगलीच मागे राहून गेली तर ते बरोबर होणार नाही . आणि ह्यानी किती किती फायदे होतात आणि हे किती आवश्यक आहे .कारण मनुष्याच्या जीवनाला अर्थच नाहीय . जोपर्यंत तो आत्म्याला प्राप्त होत नाही तोपर्यंत त्याला अर्थ नाहीय . तो समर्थच होऊ शकत नाही ,त्याला दृष्टीच येत नाही म्हणून हे झालाच पाहिजे आणि आपल्या उत्क्रांतीच हे चरम, जे चरम, जी चरमलक्ष आहे ते आपण गाठलं पाहिजे . आणि ते गाठण्यासाठी काहीही करायचं नाही ,विशेष काही करायचं नाही, पैशे द्यायचे नाही . काहीही तुमच्याकडनं घ्यायचं नाही आम्हाला, उलटं द्यायचचं आहे तेव्हा ते घ्यावं , आणि समजून घ्यावं की, ज्या गोष्टीला पैसा लागतो , असं लागतं ते जागतिक आहे . परमेश्वराच्या कार्याला कधीही पैशे लागत नाही आणि त्याला काहीही मेहनत करावी लागत नाही फक्त एकदा हे मिळाल्यावर ही तुमच्यात जेव्हा जी शक्ती आल्यावर त्या शक्तीला कसं वापरायचं तेवढ़ तुम्ही शिकून घ्यायचं शहाणपणानं . आता ही बाहेरून इतकी मंडळी आली आहे, तेव्हा आपण समजलं पाहीजे की हजारो मैलावरनं ही मंडळी आली आहे. पण इथल्या तुमच्या लोकांना सांगलीकरांना वेळ नाही आहे इथे यायला . म्हणजे हे काही चांगलं लक्षण नाही, म्हणजे सुज्ञता कमी आहे .सुज्ञता कमी आहे . उद्या जर एखादी सिनेमा नटी आली तर सगळे येतील , म्हणजे हळू हळू अधोगतीला आपण चाललोय . आपलं लक्ष कुठे आहे अधोगतीला म्हणजे खालच्या थरावर आपण चाललोय ,वरच्या थरावर आपण राहत नाही . आणि मग असं कसं केलं परमेश्वराने हे कसं केलं ,तुम्ही परमेश्वराला धरूनच नाही . जर तुम्ही परमेश्वराला धरून असता तर हे काहीही झालं नसतं . तो सर्वांचा करता करविताच नाहीय पण अत्यंत प्रेमळ बाप आहे . आणि तुमची सारखी वाट बघतोय की तुम्ही त्याच्या साम्राज्यात कधी याल.(....long pause.....) आता आपण सामूहिक जागृतीचा कार्यक्रम करूया . कोणाला एखादा प्रश्न असला तर विचारा पण जास्त वेळ घेऊ नये . कारण मी गेल्यानंतर मग इकडे तिकडे कुजबुज करणे वगैरे-वगैरे आपलं जी विशेष महाराष्ट्रीयन पद्धत आहे ती करून आपण काही आपली प्रगती करून घेतलेली नाही . जे काही विचारायचं असेल ते आता तोंडासमोर माझ्याजवळ विचारून घ्या . मी ते उत्तर द्यायला तयार आहे. पण त्याच्यानंतर गेल्यावरती काहीतरी खुसपट काढत बासयाची , जी आपली वाईट सवय आहे त्यानी आपल्याला काही मदत झालेली नाही आजपर्यंत हा स्वभाव काही चांगला नाही . तेव्हा जे काय असेल ते माझ्या तोंडावर विचारून घ्यायचं .(Shri Mataji asks for water.........).असले तर विचारा प्रश्न का इकडे आहे मंडळींना प्रश्न ? काहो, फार चांगलं आहे .पण आता अशे समोर येऊन बसा तिथे जागा आहे मध्ये इकडे येवून बसा आज जरा एकीकडे झालेत चला इकडे येवून बसा अशे . आता डावा हात माझ्याकडे आहे .आता आधी आपण संतुलन साधावा लागतं . संतुलन आलं पाहिजे माणसाला तर डावा हात माझ्याकडे आणि उजवा हात जमिनीवर असा ठेवायचा . (....) श्री गणेशाच ध्यान करून या पुथ्वीला नमस्कार करून मनातून . असा हात ठेवायचा उजवा हात ,डावा हात माझ्याकडे .(...................) आता उजवा हात माझ्याकडे करायचा आणि डावा हात असा . म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये आपण जे जडतत्व होतं ते पृथ्वीतत्वात घातलं. आणि आता हे जे आपण विचारांनी वगैरे जे आपल्यामध्ये काहूर माजलेलं आहे त्याला आपण अहंकार आदि वगैरे त्रास असतात ते काढण्यासाठी म्हणून आकाशतत्वाकडे हा हात केलेला आहे . आणि असा उजवा हात माझ्याकडे, डावा हात माझ्याकडे नाही उजवा हात, उजवा हात हा उजवा हात माझ्याकडे डावा हात असा वर.(..............) आता परत डावा हात माझ्याकडे करायचा आणि उजवा हात डोक्यावर इथे टाळूच्या वर असा धरून बघा काही गार येतंय का डोक्यातनं . वरती धरायचं, (....) वरती इथे डोक्यावर ,टाळूवर जरा वर धरा ,वाटतंय गार ? काही काही लोकांना वाटेल काही -काहींना नाही. बरं हा उजवा हात माझ्याकडे करा ,परत डावा हात. (.............) आता दोन्ही हात आकाशाकडे करायचे आणि असं डोकं वर करून एक प्रश्न करायचा , की ही ब्रम्हशक्ती आहे का ? ही परमेश्वराची ब्रम्हशक्ती आहे का ? ही परमेश्वराची प्रेम शक्ती आहे का ? (..............) आता हात खाली करा आता हात खाली करून बघा हातात काही गार येतंय का ,येतंय ? हातात, आता डोक्यात बघा येतंय का ? आज यायला पाहिजे आजचा दिवस चांगला आहे . डावा,(..........) लक्ष इथे टाळूकड़े असलं पाहिजे ,वाटतंय ? आता हा हात करून बघा .गरम गरम येतंय , पुष्कळ लोकांच्या . (..........) आता डोळे मिटायचे आणि मिटण्याच्या आधी जी चक्र आपली डावीकडे आहेत ती कशी जागृत करून घ्यायची तुम्ही ते मी सांगते . आणि हे तुम्ही आपल्या कुंडलिनीला सुध्दा जागृत करू शकता . हृदयामध्ये मी सांगितलं आत्मा आहे त्याच्याखाली पोटावर डावीकडे वरच्या बाजूला गुरुतत्व आहे आणि खाली शुध्द विद्या आहे त्याच्यानंतर परत वर आल्यावर ह्या ठिकाणी जे आपण आपल्याला दोषी वगैरे समजतो त्यानी हे विशुद्धीच चक्र इकडे धरलं जातं . मी पतित आहे मी फार वाईट आहे असं न्यूनत्व धरलं की ते इकडे असं खांद्याला , समोरून असा हात घ्यायचा खांद्याला . नंतर इथे हात, नंतर मागे. नंतर तळहात असा पूर्णपणे उघडून घ्यायचा , आणि आपल्या ब्रम्हरंध्र म्हणतात त्याला म्हणजे टाळूवर ठेवायचा आणखीन असा दाबून सातदा असा फिरवायचा फक्त . पण त्या वेळेला डोळे उघडायचे नाही कधीही . आता मी सगळ्यांना समजवून सांगितलं कशे डावीकडे आपल्याला जायचे आहे ते . डावा हात घेऊन चला वर अशी, असं उलटं नाही फिरवायचं सरळ , आणि असं डोक्यावर नेऊन अशी वेष्टनं घालून अशी बांधून टाकायची डोक्यावर . परत, ही तुमची कुंडलिनी, परत, हे बघा तीनदा करायचं असतं असं . आता डोक्यावर न्यायची परत वेष्टनं घ्यायची भरपूर आणि बांधून टाकायची म्हणजे पडणार नाही . परत (......) आता बघा हाताला गार वाटतंय का ? हाताला वाटतंय गार ? गार- गार आल्यासारखं वाटतंय ? (.........) आता ही जागृती झाली, तुम्हाला जागृती करून दिलेली आहे मी . पण परत कुंडलिनी ज्या ठिकाणी तुम्हाला त्रास असेल तिथे वळणार , तिथे मदत करणार , आणि तिची प्रगती हळू होणार आहे, म्हणून तिची प्रगती कशी सात्यत्याने ठीक ठेवायची त्यासाठी इथे आमचं फार सुंदर एक ...... केंद्र आहे त्या केंद्रात यायचं आणी तिथे मंडळी आहेत ती तुम्हाला बघतील त्या केंद्राचा पत्ता आता तुम्हाला देतील तो पत्ता घ्या . तिथे तुम्हाला फोटो मिळतील , पुस्तकं मिळतील त्याच्यात प्रगती केली पाहिजे . आणि प्रगती करून शिकून घेतलं पाहिजे, आणि शिकून घेतल्यावरती तुम्ही स्वतः तुमचे गुरु होणार आणि त्याचे किती लाभ होतात , ते तुम्ही पुढे बघितलं पाहिजे . आता, मुख्य सांगायचं म्हणजे असं की बाहेर जाण्याच्या आधी तुम्ही आपल्याला बंधनं घेतली पाहीजे , म्हणजे कवच असतं , आईच कवच असतं . ते कवच कसं घ्यायचं तर आपल्या इथे सात प्रकाशाची झोत आहेत , आणि त्याला कवच दिलं पाहिजे . तं ते कस द्यायचं तर डावीकड्न असा हात घ्या , डावीकड्न आणि असं डोक्यावरनं असा घेऊन असं खाली घालायचं , असं सातदा करायचं . परत चला एक , परत दोन, व्यवस्थित घ्या, परत तीन मी हळूहळू घेतेय हा तीन, परत चार, म्हणजे काही तुमच्यावरती परिणाम येणार नाही बाहेरचा . पाच, परत सहा , परत सात. घराच्या बाहेर निघतांना एकदा घेतलं की काहीही होणार नाही तुम्हाला काही त्रास होणार नाही . एखादा मनुष्य त्रास-बित देत असला त्याचं नुसतं नाव हातावर लिहायचं आणि अशी त्याला बंधन देऊन असं टाकून द्यायचं तीनदा माताजी म्हणून की बघा. अनेक ह्याचे प्रकार आहेत ते बघायचे . तुम्ही ही प्रेमाची शक्ती आहे ती आपण अजून वापरलेली नाही , द्वेषाचीच वापरले ली आहे, ही प्रेमाची शक्ती कशी वापरायची ती नुसती बोटावर नाचते . आणि ते एकदा तुम्हाला समजलं कसं नाचवून घ्यायचं की अगदी तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही किती शक्तिशाली होताय, आणि किती तुमच्यामधे शक्त्या आहे ,किती अद्भुत आहेत तूम्ही , हे तुमच्या लक्षात येईल .