Public Program Day 1 1991-12-19
19 डिसेंबर 1991
Public Program
Kolhapur (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft
पब्लिक प्रोग्रॅम कोल्हापूर .
सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना आमचा नमस्कार . आम्ही जेव्हा सत्याला शोधतो असं म्हणतो तेव्हा एक गोष्ट जाणली पाहिजे कि सत्य आहे तिथे आहे ते तुम्ही बदलू शकत नाही . त्याची तुम्ही नुसती कल्पना करू शकत नाही . त्याची तुम्ही रूपरेषा बनवू शकत नाही . सर्वात मुख्य म्हणजे या मानवी जीवनात या मानवी चेतनेत तुम्ही त्याला जाणू शकत नाही . म्हणूनच सर्व शास्त्रां न मध्ये ,मग ते आपल्या भारतीय लोकांनी लिहिलेले असोत ,चायनीज नि लिहिलेले असोत ,कुराणात असोत किंवा कोणत्याही धर्मातले असोत सर्वानी एकमेव गोष्ट सांगितली कि तुमचा पुनर्जन्म झाला पाहिजे . तुमचा आत्म साक्षात्कार झाला पाहिजे . तुम्हाला आत्म बोध झाला पाहिजे . पण आत्मबोध म्हणजे नुसतं काहीतरी बुद्धीने जाणान्या सारखं नसत . पण ते बुद्धीच्या पलीकडचं असं आहे . आणि त्या साठी फक्त एक तऱ्हेची नम्रता मनुष्यात पाहिजे . कि अजून आम्ही ते जाणलेलं नाही . जर सत्य एकमेव आहे आणि जर आपण सत्याला जाणतो तर इतके वादविवाद ,इतकी भांडण ,इतका त्रास ह्या कलियुगाचा हा जो काही ,कलह ब्रम्ह आहे . तो कसा उत्पन्न झाला असता ,झाला असता ?. हि गोष्ट खरी कि पंचावन्न देशातील हि मंडळी आहेत ,पण हि आत्म साक्षात्कारी आहेत . त्यामुळे यांच्यात कलह नाही ,भांडण नाही ,चुरस नाही नुसतं प्रेम . एकमेकांचा आनंद कसा घ्यायचा ते याना माहित आहे .
महाराष्ट्राची महती माहित आहे ,मी काय सांगणार . याच नाव महाराष्ट्र आहे म्हणजे काहीतरी विशेष असलंच पाहिजे असा निदान आपण विचार केला पाहिजे . आणि या महाराष्ट्रात आपण जन्माला आलो तेव्हा आपणही काहीतरी विशेष असलं पाहिजे ,त्यातून कोल्हापुरात महालक्षीमीच्या परिसरात आपला जन्म झाला म्हणजे आणखीन काहीतरी विशेष असलं पाहिजे असा थोडासा आपण विचार केला पाहिजे . पण ते विशेष म्हणजे काय ,ते विशेष म्हणजे अध्यात्माची पुण्याई आपण कमवलेली आहे . पूर्व जन्मी आम्ही बहू पुण्य केले ती मंडळी इकडे जन्माला येतात . पण सगळं काही मागच विसरलेले आहेत ,जी पुण्याई केली ते विसरलेले आहेत . आणि फक्त आजकालचे जे काही चकमक करणाऱ्या चकचकाट करणाऱ्या ज्या गोष्टी आहेत तिकडे आपलं लक्ष जातंय . आता हे सत्य जाणायच असेल तर ते कस जाणायच ?. आपण एक आमीबा स्तितीतून मनुष्य झालो ते कस झालो . कितीतरी गोष्टी आपल्या मध्ये आणि पशु पक्षानं मध्ये वेगळ्या असतात . पशु हे पाशात आहेत म्हणून त्यांना पशु म्हणतात . एखादा वाघ असला तर तो वाघा सारखा रहातो ,साप असला तर तो सापा सारखा राहतो वाघ सापा सारखा वागत नाही . पण माणसात ह्या सगळ्या योनी असल्या मुळे तो कसा वागेल हे सांगता येत नाही . आणि दुसरी गोष्ट त्याला स्वतंत्रता आहे . तेव्हा वाट्टेल त्या योनीत तो जाऊ शकतो वाट्टेल तसा तो वागू शकतो . स्वतःची च प्रतारणा तो करू शकतो ,इतरांची तर करू शकतोच पण स्वतःलाही सारखा ठगत असतो . तेव्हा या बुद्धीने आपण स्वतःला किती ठगत असतो याची सुद्धा आपल्याला कल्पना नाही . पण त्यातून मिळत काय ,काही असत्य गोष्टींना आपण चिकटलेलो असतो आणि सत्य काय ते आपल्याला माहीतच नसत .
आता पुष्कळ लोक म्हणतील विशेषतः महाराष्ट्रात एक बुद्धिजीवी नावाचे एक नवीन लोक निघाले आहेत ,पण हि टुम आहे ,पण हि महाराष्ट्रातच आहे आणखी कुठेही मी ऐकलं नाही संबंध हिंदुस्तानात मी फिरते असल्या टुम मी ऐकल्या नाहीत .कि हे बुद्धिवादी आहेत आणि ते म्हणतात कि देव च नाही आहे . अजून तरी आपल्या देशात सगळीकडे मी पाहिलं आहे कि लोक देवाला भितात . चोऱ्या करतील ,सगळं करतील ,गडबड करतील पण देव आहे . आणि हि एक टुम निघाली आहे बुद्धी वाद्यांची कि देव नाही आहे ,परमेश्वर नाही आहे ,धर्म काय गोष्ट नाही . त्याला एक कारण हि आहे देवाच्या नावावर लोक पैसे कमावतात ,लोकांना फसवतात ,अंधश्रद्धा ठेवून पुष्कळ लोकांची दिशाभूल होते हि पण गोष्ट खरी आहे . पण याचा अर्थ असा नाही कि परमेश्वर नाही ,आणि हे अशास्त्रीय आहे ,कोणतीही गोष्ट आहे किंवा नाही त्याचा पत्ता लावल्या शिवाय म्हणणं हे चुकीचं आहे . त्याचा आधी पत्ता लावा परमेश्वर आहे किंवा नाही ,आणि जर त्याचा पत्ता लागला तर मग इमानदारीने हे तुम्ही मानायला पाहिजे कि परमेश्वर आहे . संतसाधुनी या महाराष्ट्रात आपलं रक्त ओतलं आहे . आणि ते रक्त ओतलं आहे ते आपल्या पुण्याईला फळ आणणार आहे . लहान पणा पासून आपण त्याच्या गोष्टी ऐकत होतो ,त्याचे अभंग ,श्लोक रात्रनदिवस आपण ऐकत होतो . पण मोठं झाल्यावर मात्र परमेश्वर नाही असं ठाम समजून लोक वागतात . पण बहुतेक जे लोक असे आहेत त्यांचं वर्तनच मुळी अधार्मिक आहे . त्यांना दारू प्यायची आहे ,बायकोला झोडपून काढायचे आहे असे धंदे करायचे आहेत . जर परमेश्वर आहे असं जर म्हंटल तर मग ते कस करू शकतील . कदाचीत म्हणूनच त्यांनी परमेश्वराला उचलून एका कोनाड्यात ठेऊन दिल ,परमेश्वरच नाही ,आम्हाला जस वाटेल तस आम्ही वागणार . कस वागायचं तस तुम्ही वागा त्याची तुम्हाला परवानगीच नाही तर पूर्ण पणे स्वतंत्रता आहे परमेश्वराने दिलेली आहे . पण त्या स्वतंत्रतेत तुम्ही कोणच्या खाईत जाऊन पडाल ते मात्र लक्षात ठेवलं पाहिजे . आणि हेच वारंवार मी बघते कि लोकांना लक्षात का येत नाही कि काहीतरी कुठंतरी आपलं चुकलंच असलं पाहिजे ,काहीतरी आपल्यात उणीव असली पाहिजे .आज जगाचे जेव्हडे काही तुम्ही प्रश्न बघाल इतके प्रश्न जगात आहेत ते सर्व मानवाच्या मुळे झालेले आहेत . मानवाच्या अपूर्णते मुळे हे प्रश्न उभे झालेले आहेत . तो पूर्णत्वाला आला असता तर कसलेही प्रश्न उदभवले नसते .
आजकाल फारमोठा प्रॉब्लेम म्हणजे वातावरण दूषित होत आहे . इकॉलॉजिकल प्रॉब्लेम आहे ,तुम्ही जर एखाद्या जंगलात गेलात तर तिथे पशु पक्षी राहतात पण तिथे तुम्हाला कुठलाही घाण असा वास येणार नाही . पण एक माणूस कुठे जंगलात जाऊन राहिला कि झालं . म्हणजे इतके जेव्हडे प्रश्न आपले उदभवले आहेत आज जगात त्याला कारणीभूत मानव आहे . आणि त्या मानवाला बदलल्या शिवाय ,त्याच्यात परिवर्तन आल्या शिवाय हे जगातले जे मूलभूत प्रश्न आहेत ते कधीही ठीक होऊ शकणार नाहीत . वरून तुम्ही जरी आभाळाला ठिगळ लावायचं ठरवलं तरी ते कार्य होणार नाही . तेव्हा काहीतरी गहनतेत जायला पाहिजे . समजा एखाद्या झाडाला कीड लागली आणि तुम्ही त्याच्या पानांना मलम लावलं त्याचा काही परिणाम होईल का ?. त्या मुळा न मध्ये उतरायला पाहिजे आणि साहहयोग म्हणजे या मुळाच शास्त्र आहे . ज्या मुळांच्या आधारावर आपण उभे आहोत त्याच हे शास्त्र आहे आणि ते फक्त जाणलं पाहिजे कि आपण कोण कसे आणि आपल्या मध्ये काय व्यवस्था परमेश्वराने करून ठेवली आहे . जरी परमेश्वरावर विश्वास नसला तरी निदान स्वतः वर विश्वास ठेवा . कि तुम्ही आज मानव स्तितीत आहात ,हि मानव स्तिती तुमची आली त्याच्यामध्ये सूक्ष्मतेत कोणच कार्य आपल्या मध्ये होत असत . हे जर व्यवस्तीत जाणायच असलं तर आधी सहजयोगामध्ये साक्षात्कार घेतला पाहिजे . तस मी तुम्हाला मेडिकली सगळं समजावून सांगू शकते . सिम्फथॅटिक नर्व्हस सिस्टम आणि पॅरा सिम्फथॅटिक नर्व्हस सिस्टम आणि त्यात चक्रांचा काय भाग आहे हे सगळं तुम्हाला समजावून सांगू शकते . पण हे सगळं सांगून उपयोगाचं काय ?. सर्व प्रथम आत्मा प्रकाशित झाला पाहिजे . म्हणजे आता समजा इथे इतके लाईट्स लागलेले आहेत आणि मी जर म्हंटल कि तुम्हाला सर्व लाईट बद्दल सांगते ,इलेक्ट्रिसिटी बद्दल सांगते ,त्याचा इतिहास सांगते तर डोकेदुखी व्हायची . त्या पेक्षा थोडा अंधूकच प्रकाश येऊ देई ना का . त्या नंतर तुमच्या लक्षात सहज येईल कि आपण किती गौरवशाली आहोत . परमेश्वराने हि जी मानव स्तिती आपल्याला जी दिली आहे हि केव्हडी मोठी आहे ,याच कार्य किती मोठं आहे आणि आपण चाललो त कुठे ,त्याची अजून जाणीव आपल्याला आलेली नाही . ते आपण अजून जाणलेलं नाही . जो पर्यंत आपण ते जाणणार नाही कि आपण कोण आहोत आणि आपल्या मध्ये किती शक्त्य आहेत तो पर्यंत असच आपण काहीतरी करत राहणार . आणि त्यामुळे विद्वंस होणार लोकांचा नाश होणार आणि आपली हि दुर्गती होणार . तेव्हा स्वतः या बद्दल जाणलं पाहिजे . तू कोण आहेस हे जाणलं पाहिजे . असं सगळ्या शास्त्रात सगळ्या संतांनी सगळ्यांनी सांगितलं आहे कि प्रथम मी कोण याचा पत्ता लावा . आणि तो पत्ता लावण्या साठी परमेश्वराने आपल्या मध्ये एक शक्ती कुंडलिनी म्हणून ठेवलेली आहे .
आता याच्या बद्दल मी एक जर्मन पुस्तक पाहिलं एव्हडं मोठं पुस्तक होत ते आणि त्यात सगळं काहींच्या बाही लिहिलं होत कि कुंडलिनी तुमच्या पोटात असते . गणेशाच्या पोटात असते पण मानवाच्या पोटात नसते कुंडलिनी . तर ते त्यांनी लिहून दिल ते झालं . आता जर काही पांढऱ्या वरती काळ लिहिलं कि झालं ते सत्य . वर्तमान पत्रात काही खोट छापलं तरी ते सत्य . त्याप्रमाणे आपला विश्वासच बसायला लागला कि कुणी काही लिहून दिल कि ते म्हणजे अगदी रामायण होऊन जात . पण खरी गोष्ट अशी आहे कि वास्तविक आपल्या मध्ये हि संबंध संस्था आहे ,हि बनवलेली आहे हि आपल्या उत्क्रांतीत जसे जसे आपण वाढत गेलो तशी तशी संस्था आपल्यात बनली आणि आज आपण मनुष्य स्तिती ला आलो आहोत . तेव्हा थोडासाच मार्ग आक्रमण करायचा आहे ,थोडासाच मार्ग आहे . हि कुंडलिनी फक्त षटचक्र भेदून जेव्हा या टाळू तुन ,ज्याला आम्ही ब्रम्हरंध्र म्हणतो निघते तेव्हा जस याला एक कनेक्शन लागत किनई तसच आपलं सुद्धा कनेक्शन सारीकडे पसरलेल्या ह्या परमेश्वरी प्रेमाच्या शक्तीशी होऊन जात . त्याला कुणी रुह म्हणत ,कुणी परम चैतन्य म्हणत . काही नाव दिल तरी सुद्धा हि प्रेम शक्ती आहे . आपण कधी विचार सुद्धा करत नाही कि हि झाड आहेत त्यांना फुल येतात ,अहो एका लहान बी मधून हे झाड तरी कस आल . सहज ,आम्ही नुसतं बी पेरल आणि एव्हड मोठ झाड उगवलं . आणि त्या झाडातून अनेक बिया आल्या आणि त्यातून अनेक झाड आली . म्हणजे त्याच्यात सगळा त्याचा नकाशा होता . हे झाल कस . हि फुल इतकी सुंदर वेगवेगळी ,प्रत्येकाचं वेगळ स्वरूप आहे . आणि त्या वेगळ्या स्वरूपात सुद्धा वेगळा सुगंध आहे . प्रत्येकाची वाढ सुद्धा वेगवेगळी आहे . हे कस होत ,कोण करत हे सगळ . आपला डोळाच बघा ,बर्नाड शॉ नि म्हंटल आहे हा डोळा माझा बघितल्यावर मात्र मला परमेश्वरावर विश्वास करावासा वाटतो . हा केव्हडा मोठा कॅमेरा आहे म्हणे असा कॅमेरा मिळू शकतो का ,आपण बनवू शकतो का . आपण नाही बनवू शकत . तेव्हा आपण सुद्धा एक कॉप्युटर आहोत ,जस आता तुम्ही सगळे मला बघत आहात . तुम्हाला माहित आहे कि मी पांढरी साडी नेसली आहे ,त्यात काही शंका नाही . सगळ्यांना माहित आहे कि मी पांढरी साडी नेसली आहे . म्हणजे काय कि आपलं जे कॉम्पुटर आहे ते आधीच प्रोग्रॅम्ड आहेत . म्हणजे काय त्याला माहिती आहे काही पाहिल्यावर आपल्याला माहिती ,काही ऐकल्यावर माहिती आहे ते काय म्हणतात ,जे काय दिसत ते माहिती आहे ,जे काय खातो ते माहिती आहे . ही सगळी घ्राणेंद्रिय आपल्याला पूर्णपणे संवेदन शील झालेली दिसतात . पण त्याच्या पलीकडे काही आहे का ?. त्याच्या पलीकडे काही मिळवायचं आहे का ते पहायला पाहिजे . आणि ते मिळवणं अत्यंत सोपं आहे . अत्यंत सोपं आहे . आश्चर्याची गोष्ट आहे कि रशिया सारखा देश , जिथे गणपतीचा ग पण त्यांना माहित नाही ,तुम्हाला आश्चर्य वाटेल एकेका प्रोग्रॅम ला माझ्या सोळा सोळा हजार लोक येतात . आणि तरीयाती म्हणून एक गाव आहे तिथे बावीस हजार सहजयोगी आहेत . सगळे हजारानीच मोजायचे . त्यांनी कधी महालक्षीमीच नाव ऐकलेलं नाही ते महालक्षीमीची पूजा तिथे बसून करतात . आणि आपल्याला माहित च नाही कि हि महालक्षीमी म्हणजे कोण , गणपती म्हणजे कोण गणपतीचं रूप काय आहे . ते खर कि खोट आहे ,स्वयंभू गणपती कोणचे आणि कोणचे नाहीत आपल्याला काही माहित नाही . म्हणजे सागरात रहाणार एखादा पक्षी ताहना राहतो तसच आपल्या ज्ञानाची स्तिती आहे . सगळं काही भारतीय आहे ते खराब आणि जेव्हड काही बाहेरच आलं ते उत्तम असा जर आपण विचार ठेवला तर मात्र असं सांगावं लागेल कि आपण आंधळे पणा धरलेला आहे .आणि आंधळ्या लोकांना जे दिसत नाही त्या बद्दल सांगण्यात तरी काय अर्थ आहे . कबीरांनी म्हंटल आहे ,"कैसे समझाऊ सब जग अंधा ". आज ती स्तिती नाही . आज स्तिती फार बदललेली आहे आणि ती स्तिती आहे कि तुम्ही सगळे ,जेव्हडे इथं आज बसलेले आहेत तेव्हड्या सगळ्यांना आत्मसाक्षात्कार होऊ शकतो . कुंडलिनी हि शक्ती तुमच्यात आहे कि नाही याची सिध्दता याच प्रमाण आजच तुम्हाला मिळणार आहे . आणि चारीकडे पसरलेली हि शक्ती वर्तमान स्तिथीत या वेळेला इथे अस्तित्वात आहे कि नाही याची सुद्धा तुम्हाला पूर्ण कल्पना येणार आहे . सहजयोग हा सर्व अशा गोष्टींना प्रमाण देण्यासाठीच सिद्ध झालेला आहे . पण तुम्ही जर आधीच उलट डोक करून बसलात आणि आम्हाला काही मानायचच नाही ,आम्हाला काही मको ,तर अशा लोकांन वर जबरदस्ती करता येत नाही .
कारण तुमची स्वतंत्रता आम्ही मानतो . आणि त्या स्वतंत्रतेचा मान केलाच पाहिजे पण हि कुंडलिनी शक्ती तुमच्या मध्ये जी आहे ती तुमची स्वतःची वैयक्तिक आई आहे . तिला सगळं तुमच्या बद्दल माहिती आहे . ती जाणते तुमच्यात काय आहे ,कोणचे दोष आहेत ,तुम्ही कुठे चुकलात काय झालं ते ,पण ती तुमची आई आहे . जस तुम्हाला जन्म देताना तुमच्या आईने सर्व त्रास आपल्यावर ओढून घेतला आणि तुमचा जन्म झाल्यावर अगदी तिला इतका आनंद झाला कि सगळा त्रास ती विसरून गेली . तशीच हि कुंडलिनी आई आहे आणि ती आपल्या मध्ये व्यवस्तीत विराजमान आहे .
महाराष्ट्रात विशेष करून चैतन्य नुसतं खेळत असत ,तुम्हाला दिसत नाही म्हणून पण पार झाल्यावर आत्मसाक्षात्कार झाल्यावर तेही तुम्हाला दिसेल त्याचेही तुम्हाला दर्शन होईल आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आपण इतके दिवस या पासून अनभिज्ञ राहिलो .याला जाणलं नाही ,न जाणताच हे सर्व कार्य होत राहील . सगळ्या गोष्टींचा उलगडा होऊ शकतो जर आपल्या जवळ प्रकाश आला तर . आणि तो प्रकाश मिळवणं हे आपल परम कर्तव्य आहे कारण मनुष्याचं हे शरीर आपण धारण केलं आहे ते किती सुंदरतेने किती हळुवारपणे आज अमिबा पासून या स्तीतीला आले आहे . तेव्हा त्याला काहीतरी अर्थ असला पाहिजे ,आपण निरर्थकच या जगात आलेलो नाही असं समजून घेतलं पाहिजे . आजच मी प्रास्ताविक तुम्हाला सांगते आहे काय गोष्ट आहे आणि कशारितीने हे होत . कुंडलिनी बद्दल सांगायचं म्हंटल तर माझ्या मराठी भाषेत जवळ जवळ चार हजार तरी भाषण झाली असतील . तेव्हा इतकं या प्रकाशा बद्दल सांगण्या पेक्षा आपणच प्रकाशित का होऊ नये . आणि मग बघावं काय कुठे आहे आणि काय नाही ते . एकंदरीत तुमची शुद्ध इच्छा असायला पाहिजे . कुंडलिनी हि शुद्ध इच्छेची शक्ती आहे . बाकी आपल्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत . आज वाटलं कि एक सतरंजी घ्यावी ,ते घेतल्यावर असं वाटत कि एक कार्पेट घ्यावं ,ते झालं कि वाटत आता एक घर बनवावं . म्हणजे जे मिळवायचं आहे ते मिळवल्यावर सुध्दा आपल्याला आनंद होत नाही . आपण सुखात येत नाही . म्हणजे जी इच्छा केली होती ती शुध्द इच्छा नव्हती असती तर काही तरी आपल्याला समाधान वाटलं असत . एका इच्छे वरून दुसऱ्या इच्छेवर आपण सारखे उडत असतो . पण एकच शुध्द इच्छा आपल्यात आहे जिच्या बद्दल तुम्ही जागरूक असाल किंवा नसाल जी तुम्हाला माहिती नसेल पण ती एकच इच्छा आहे कि ह्या परमेश्वरी शक्तीशी आपली एकांकारिता साधता अली पाहिजे . विशेष करून सहजयोगाचं कार्य ह्या महाराष्ट्रातच झालेलं आहे . तुम्हाला आश्चर्य वाटेल अनादी काळापासून ,पूर्वी काळी आपल्याकडे तीन संस्था होत्या पैकी एकानी वेद वैगेरेच वाचन हे उत्तर हिंदुस्तानात खूप होत . वेदांचं वाचन करायचं त्यातून ह्या ज्या पाच ,पंचमहाभूत आहेत त्यांना जागृत करायचं . अशी प्रक्रिया होती . पण त्याच्या सुध्दा पहिल्याच श्लोकात लिहिलेलं आहे कि जर तुम्हाला हे सगळं वेद वाचून विद झालं नाही ,विद होणं म्हणजेच बोध ,बोध म्हणजे बुध्दी नाही ,बोध म्हणजे बुध्दिच्या पलीकडे आपल्या ह्या मज्जासंस्थेवर आपल्याला जे जाणता येत तो बोध ,बोध झाला पाहिजे . या पासूनच बुध्द हा शब्द निघाला . या पासूनच विद हा शब्द आहे ,विद म्हणजे आपल्या मज्जासंस्थेवर त्याला जाणणे . हे झालं पाहिजे आणि हे जेव्हा होईल तेव्हाच म्हणायचं कि मनुष्याला आत्मसाक्षात्कार झाला आहे . ह्या एका प्रक्रियेला अत्यंत महत्व होत पण पूर्वीच्या काळी ह्या महाराष्ट्रात नाथ पंथीयांनी हे कार्य केलं . एकीकडे भक्तीच बंगाल वैगेरे कडे भक्तीच फार होत कि भक्ती करा परमेश्वराची . इकडे वेद ,वेदाची व्यवस्था होती . पण ह्या महाराष्ट्रात नाथपंथीयांनी एका गुरूला एक शिष्य अशी परंपरा मानली . त्यामुळे जी काही भाषा प्रचलित होती त्या भाषेमध्ये काहीही लोकांना सांगता येत नव्हतं . कारण एका गुरूला एकाच शिष्याला सांगायचं असा निर्बंध होता . त्यामुळे जनसाधारण लोकांना याची माहितीच होत नव्हती . तस म्हणायला सहाव्या शतका मध्ये आदिशंकराचार्यानी ,त्याच्या आधी तेरा चौदा हजार वर्षा पूर्वी मार्केडय यांनी कुंडलिनी बद्दल सगळं लिहून ठेवलं आहे . पण बाराव्या शतका मध्ये श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या भावाची म्हणजे त्यांचे जे गुरु होते निवृत्तीनाथ यांची परवानगी घेतली कि मला निदान याच्या बद्दल काही सांगूद्या . सांगायला काय हरकत आहे . आणि मग सहाव्या अध्ययात ज्ञानेश्वरीच्या त्यांनी कुंडलिनी बद्दल बरच काही सांगितलं आहे . पण त्यानंतर जे धर्ममार्तंड होते त्यांना अस वाटल कि आपल्याला काही कुंडलिनीच कार्य येतनाही आणि आपण काही समजावून सांगू शकत नाही ,तेव्हा काय करायचं ,त्यानी सांगितलं कि बर हा अध्याय वाचायचाच नाही . हा अध्याय काही दुसराच आहे असं म्हणून तो बांधूनच ठेवला . त्यामुळे कुणी तो सहावा अध्याय वाचतच नसे ,संबंध ज्ञानेश्वरी जरी पाठ असली तरी सहावा अध्याय वाचायचाच नाही असा निर्बंध घातल्या मुळे कुणी सहावा अध्याय वाचतच नसे . आणि तेच त्यातलं सार ,तेच त्यातलं मुख्य आहे . कारण फक्त ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतका मध्ये हे कार्य केलं आणि या महाराष्ट्राला सर्व प्रथम कुंडलिनी बद्दल अशा आपल्या मराठी भाषेतून सांगितलं .
त्या नंतर अनेक लोकांनी नानकसाहेब ,कबीर ,तुकाराम ,रामदास स्वामी कुणी असे नव्हते कि ज्यांनी याच्या बद्दल बोलणं नाही केलं . पण सुरवात केली ती ज्ञानेश्वरांनी . आणि त्या ज्ञानेश्वरांच्या तेवीस वर्षाच्या मुदतीत केव्ह्ड मोठ कार्य करून गेलेत ते . आज जर त्यांनी हे लिहिलं नसत तर महाराष्ट्रात सगळे उठले असते कि माताजी कोणत्या पुस्तकात लिहिलं आहे ते आधी सांगा . याला शास्त्राचा आधार कुठे आहे ते सांगा आधी . तेव्हा आता सांगायला आहे कि सहाव्या अध्यायात आहे . आणि त्यांनाही इतकं छळ ल ,छळून काढलं नुसत . कुणीही सत्य बोलायला लागलं कि त्याला छळून काढा . कारण खोटे पणाने जे लोक पैसे बनवतात आणि खोट्या गोष्टींना धरून जे सर्व जगावरती राज्य करतात अशा लोकांना सत्य कस आवडेल . म्हणून जो सत्य बोलेल त्याची गळचेपी करायची . आणि त्यांचा इतका छळ केला कि तेविसाव्या वर्षी त्यांनी नकोरे बाबा ,याच्या पुढे बोलणं नको ,आपली समाधी घेतली . ती आज परिस्तिथी नको आहे . आज तुमच्या हितासाठी ,तुमचं भल होईल ज्यांनी ,फक्त कोल्हापुरातच नाही किंवा फक्त महाराष्ट्रातच नाही ,हिंदुस्थानातच नाही तर सर्व जगाच हीत जर करायचं असल तर सहजयोगाला तुम्ही प्राप्त झालं पाहिजे .कारण याच्या मध्ये ज्या आपल्या मध्ये ज्या स्तिती येतात त्याच्या मध्ये सामूहिक चेतना अशी एक स्तिती येते त्याबद्दल मी उद्या आपल्याला सगळ समजावून सांगेन कि हि स्तिती काय आहे . पण आजच तुम्हाला त्याची अनुभूती येणार . हे उघड पणे मी सगळ सांगितलं आहे ,यांच्यात काही लपंडाव नाही ,किंवा पैसे वैगेरे मागण्याचा यांच्यात काही प्रश्नच येत नाही . म्हणजे किती पैसे देणार तुम्ही ? पहिल्यांदा हा प्रश्न विचारला पाहिजे . या महत कार्या साठी कसले पैसे देणार . अहो या पृथ्वी मध्ये आपण बी लावतो आपण किती पैसे त्या पृथ्वीला देतो ,तिला समजत तरी का बँक वैगेरे . तेव्हा कुणीही देवाच्या नावावर पैसे मागितले तर तो भामटा असणार हे ठरवून टाकायचं . नुसते पैसे कमवण्याचे धंदे करून ठेवले आहेत . तुम्हाला आश्चर्य वाटेल व्हेंटिगन सारखी संस्था आपण एवढ मानतो पोप बीप सगळे पण तिथं त्यांनी बँक काढली आहे आणि आपले जे पैसे हे लोक खातात न सगळे ,तिकडे सगळे पैसेच खातात जेवत बिवत नाहीत ,ते पैसे सगळे उचलून कुठं जातात तर त्या व्हेटिगन मध्ये . आणि तिथून मग कॅश पैसा जातो ते स्विसझरलँड मध्ये . अहो ते देवाच्या नावावर सगळं हे कार्य करत आहेत . देवाच्या नावावर . म्हणून लोकांचं म्हणणं अस कि देव कुठे आहे . कुणी देवाचं नाव घ्यावं यासाठी काही कायदा आहे का जगात . तेव्हा देवाच्या नावावर अस करायचं नाही . असा कुठेच कायदा नाही .
तर हे सगळे पैसे कमवण्याचे ,नाव कमवण्याचे धंदे आहेत . परमेश्वराचा याच्याशी काहीही संबंध नाही . आणि आपण हि हे जाणलं पाहिजे कि ह्या गोष्टी वरून परमेश्वराचा पडताळा घ्यायचा नाही . आणि त्याच्या बद्दल बोलायचं नाही . जो तो आहे तो आधी जाणून घ्यावा कसा शुध्द स्वरूपात परमेश्वर आहे आणि तो किती परम कृपाळू आपल्या वर आहे ,वडलांच्या ,वडलांच्या ,वडलांच्या पेक्षाही किती कृपाळू असा आपला बाप आहे हे जाणलं पाहिजे . ते जाणल्या शिवाय कुणाला आहे किंवा नाही म्हणन हे फार चुकीचं आहे आणि अस म्हणु नये .
मला असं वाटतंय तुम्हाला पुष्कळांना मला प्रश्न विचारावेसे वाटतात पण आज आपण आत्मसाक्षात्कार घेऊया ,ज्यांना प्रश्न विचारायचे असतील त्यांनी आत्मसाक्षात्कारा नंतर घरी जाऊन प्रश्न लिहावेत आणि नंतर माझ्याकडे द्या . अनेक गोष्टीन बद्दल मला आपल्याला सूचना द्यायची होती . आजकाल आत्मसंमोहनाचे प्रकार फार सुरु झाले आहेत . माणसाला संमोहनात घालायचं अगदी उघड पणे . उघडपणे लोक संमोहनात घालतात अहो हि केव्हडी मोठी कठीण गोष्ट आहे . आणि हे काय कुठून होत याचा सुध्दा लोकांना माहिती नाही कि मनुष्य संमोहित कसा होतो . ?सहजयोगाची संबंध प्रक्रिया कशी घडते ते आपल्याला कळेल . म्हणजे डोळ्यांनी सुध्दा तुम्ही कुंडलिनीच जागरण वैगेरे सर्व तुम्ही बघू शकता . त्याचे परिणाम बघू शकता . त्यानी रोग वैगेरे कसे बरे होतात ते सगळ आपण जणू शकता . संबंध शक्ती आपल्याला येते . पण हि संमोहन विद्या हीच कार्य कस होत ते कुणी काही सांगू शकत नाही . आम्ही सांगू शकतो कि हि सगळी भूतविद्या ,स्मशानविद्या आणि प्रेतविद्या आहे हि . जो माणूस हे कार्य करेल तो छिन्न छिन्न होऊन मरतो . आणि दुसऱ्याला नष्ट करण्यासाठी म्हणून हि विद्या केलेली आहे . हि संबंध प्रेतविद्या आहे आणि कुणीही संमोहनाच्या मार्गावर जाऊ नये . याच्या बद्दल गुरुनानकांनी फार मोठा संबंध ग्रंथच लिहिला म्हंटल तरी चालेल . जे बंगालात होत ते इथं महाराष्ट्रात नको आहे . त्याची तिथे बंगाल्यांची काय स्तिती झाली ते तुम्ही पाहिलंच आहे . आणि आपल्याला ते दारिद्रय इथे आणायचं नाही . तेव्हा कृपा करून या संमोहनाच्या मार्गात कुणी जाऊ नये . अशी माझी खरोखर आर्जवून विनंती आहे . मला माहित नव्हतं पण काही लोकांनी येऊन मला सांगितलं कि माताजी इथे संमोहन करण्याच्या विद्या उघडपणे शिकवल्या जातात . आणि पेपरात देतात . पूर्वी विदेशा मध्ये सुध्दा त्यांना माहित नव्हत संमोहन काय आहे म्हणून त्यांनी संमोहनाचे प्रकार थोडे फार शिकले आणि अस एकाग्र करून लोकांना बेशुध्द करून त्यांचे ऑपरेशन्स वैगेरे केले . पण त्या नंतर त्याच्या लक्षात आल ,पुष्कळ रिसर्च झालेला आहे यावर ,कि लोकांना त्यानंतर त्यांची मती भ्रमिष्ट झाली . अनेक तऱ्हेचे रोग जडले . आणि मग लोकांची वाट लागली . तेव्हा पासून हा प्रकार परदेशात बंद झालेला आहे ,पण अजून आपण इतके मागासलेले आहोत कि अजून त्या प्रकारात आपण जात आहोत . तेव्हा हया अशा गोष्टीन मध्ये आपण आपल्याला अडकवून नाही घेतलं पाहिजे . अनेक गोष्टी सांगायच्या आहेत यातलं मुख्य सांगायचं म्हणजे अस कि उद्याची आपली प्रजा त्यांचा मला विचार येतो ,हे लोक इथे बसलेले आहेत त्यातले पुष्कळशे लोक आणि जे आहेत आपापल्या देशानं मध्ये त्यातले पुष्कळशे लोक हे व्यसनाधीन झाले होते ,व्यसनाच्या आहारी गेले होते ते सगळे उठून उभे राहिले .
तसच आपल्या देशात सुध्दा व्यसनाच फार स्तोम माजलेलं आहे . याच्यातून सगळ्यांची मुक्ती फक्त सहजयोगानेच होऊ शकते . शरीराचे अनेक रोग आहेत ते फक्त सहजयोगानेच ठीक होऊ शकतात . मानसिक त्रास ,मानसिक ग्लानी हि सुध्दा सहजयोगाने ठीक होऊ शकते . पुष्कळशी मूल हि शिक्षणात मागे होती त्यांची फार शैक्षणिक प्रगती झालेली आहे . ते फार उच्च पदाला गेलेले आहेत . पुष्कळशे संगीतकार ,कलाकार सहजयोगात आले तर आज त्यांचं जगामध्ये फार मोठ नाव आहे . सगळं काही होत ते माझ्या आशीर्वादाने नव्हे तर तुमच्या कुंडलिनीच्या जागरणाने . पुष्कळशे मुसलमान परदेशामध्ये पार झालेले आहेत ,इतकाच नव्हे तर आपल्या देशात सुध्दा पुष्कळशे मुसलमान कलाकार पार झालेले आहेत . तेव्हा सांगायचं म्हणजे असं कि हे अत्यावश्यक आहे . जस ह्या एका यंत्राला तुम्ही कनेक्शन देत नाही तो पर्यंत त्याला काही अर्थ नाही तसच कुंडलिनीच जागरण जो पर्यंत तुम्ही करून घेत नाही तो पर्यंत तुमच्या स्वतःच्या जीवनाला पण काही अर्थ नाही . तेव्हा हा योग घटीत झालाच पाहिजे आणि स्वतःच महत्व आपण जाणलंच पाहिजे . उद्या मी तुम्हाला आत्मा म्हणजे काय आणि सहजयोगात काय काय प्राप्ती होते ते सांगेन . आणि ती हमखास होणारच त्या बद्दल शंका नाही . आणि विशेतः हिंदुस्तानात विशेष करून या महाराष्ट्रात एका क्षणात हे कार्य होऊ शकत . रामदास स्वामींना एकदा कुणीतरी विचारलं कि कुंडलिनी जागरणाला किती वेळ लागतो तर त्यांनी सांगितलं कि तत्क्षण पण देणारा हि तसा पाहिजे आणि घेणारा हि तसा पाहिजे . तेव्हा आपण सगळे घेणारे आहात मग का जागृती होणार नाही . पण शंका कुशंका करू नये . सध्या शंका कुशंका न काढता एकदा हे मिळवून घ्या . त्या नंतर सांगायचं असं कि आपली स्वतंत्रता मी मान्य करते . त्याच्या मध्ये कोणत्याही प्रकारची जबरदस्ती करता येत नाही ,एखाद बी लावायचं झालं तर त्या बीवर जबरदस्ती करता येईल का ते आपोआपच वाढत ना तेव्हा जर तुम्हाला कुणाला नको असेल आत्मसाक्षात्कार तर तुम्ही कृपा करून बाहेर जावा . आम्ही तुमच्यावर जबरदस्ती करू शकत नाही . करूच शकत नाही त्यांनी जागृती होणारच नाही तेव्हा उगीचच इथे बसण्यात काही अर्थ नाही . ज्यांना आत्मसाक्षात्कार हवा आहे त्यांनी इथे बसावं ,एव्हडं मात्र मी सांगते कि काही त्रास होत नाही ,कधीही कसलाच त्रास झालेला आज पर्यंत कुणाला माहित नाही ,जर भूतबाधा असेल तर मनुष्य हालू लागतो पण ती भूतबाधा निघून जाते . तेव्हा ज्यांना मान्यता असेल त्यांनी अवश्य बसावं आणि ज्यांना नसेल त्यांनी कृपा करून बाहेर जावं ते बर होईल .
आता त्या बाबतीत तीन अटी आहेत आणि त्या मी तुम्हाला आता सांगते . पहिली अट अशी आहे कि पूर्ण आत्मविश्वास स्वतः बद्दल हवा . कि मला आत्मसाक्षात्कार होईल . आता पुष्कळ लोक सांगतात कि तुम्ही पापी आहात म्हणजे आपल्या कडचं हे विशेषच आहे पैसे कमवण्याचे धंदे . एकतर सांगतील तुम्ही पापी आहात ,तुम्ही काही कामाचे नाहीत ,तुम्ही नरकात जाणार वैगेरे वैगेरे . असे प्रकार करून तुम्ही मला इतके पैसे द्या . म्हणजे तुम्ही नरकात जाणार नाही . तिकडे पोप पूर्वी करत असे न ,तो सर्टिफिकेट द्यायचा लोकांना आणि सांगायचा कि तुम्ही परमेश्वराकडे गेलात कि हे सर्टिफिकेट वापरा . तसच आजकाल आपल्या लोकांचं झालं आहे कि तुम्ही मला जर एक गाय दिली तर तुमचं तिकीट तिकडे ,स्वर्गात रिजर्व करून ठेवतो . आणि आपण इतके शहाणे असून सुध्दा यावर विश्वास ठेवतो . दुसरी गोष्ट अशी कि दुसऱ्या तऱ्हेचे जे भोंदू लोक असतात ते सांगतात तुम्ही काहीही काम करा ,वाईट काम करा ,हे करा ,ते करा त्यानीच तुमची स्वच्छता होईल . त्या रजनीश सारखे लोक घाण करा ,काही करा . आणि मग तुम्ही परमेश्वराकडे जाणार . म्हणजे ते लोकांना कस पटत हो ,मला समजत नाही ,असं कोणच्या शास्त्रात लिहिलं आहे सांगा . कोणत्याही शास्त्रात असं लिहिलेलं नाही ,मी अस पहिलेलं नाही कि तुम्ही वाट्टेल तसे वागलात तरी तुम्ही जरूर वागा ,चांगलं आहे ते आणि ते झालं कि तुम्ही परमेश्वराकडे जाणार . असे दोन तऱ्हेचे लोक आहेत . सांगायचं म्हणजे माझ्या समोर तुम्ही कोणीही पापी नाही ,कुणीही वाईट नाही ,कुणीही दुष्ट नाही . सगळं अज्ञान आहे पण कधी कधी भटकतो माणूस ,अंधारात भटकणारच . तेव्हा स्वतः बद्दल दोष लावून घ्यायचा नाही कि माझ्यात हे वाईट आहे ,ते वाईट आहे ,मला हे येत नाही ,मला ते येत नाही असं म्हणायचं नाही . उलट मी मानव आहे मग मी आत्मसाक्षात्कारी का होऊ शकत नाही ,जनावराला काही आम्ही देऊ शकत नाही आत्मसाक्षात्कार ,फक्त माणसालाच देऊ शकतो ना तर का मिळवू नये हि जर शक्ती माझ्यात आहे तर का मिळवू नये . आणि ह्या सगळ्यांनी तुम्हाला शिकवलेलं आहे त्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही ,त्याचा विचार करायचा नाही . हि पहिली आमची अट आहे . मी आधीच सांगितलं कि तुम्ही आपल्या गौरवाला प्राप्त व्हा . तो संबंध गौरव ,ती सगळी शक्ती आपल्या मध्ये आहे फक्त ती आपण प्राप्त केलेली नाही .
दुसरी अट अशी आहे कि एकसाथ सगळ्यांना क्षमा करून टाकायची . तुम्ही क्षमा करा किंवा नका करू तुम्ही काय करता ? विचार करा . थोडं लॉजिक असायला पाहिजे ,काय करतो आपण ,मी क्षमा करूच शकत नाही असे पुष्कळ लोक म्हणतात ,अरे पण करता काय तुम्ही क्षमा नाही करत म्हणजे काय करता तुम्ही . तर त्याला उत्तर नाही . मग जर काही करत नाही तर क्षमाच करून टाका ना . क्षमा नाही केली तर तुमच्या डोक्यात जे विचार चाललेले असतात ते तरी संपतील . आणि हलकं वाटेल तुम्हाला . कसही करून तुम्ही सगळ्यांना क्षमा करा . नुसतं म्हणायचं ,नुसतं म्हणा कि मी सगळ्यांना एकसाथ क्षमा केली . कुणाची ओळख आहे असं सुध्दा दाखवायचे नाही ,कुणाची आठवण देखील काढायची नाही ,काही नाही ,कारण त्यांची आठवण काढणं हे देखील दुःखदायी आहे . म्हणून सगळ्यांना एकसाथ क्षमा केली असं म्हणा आणि आपलं मन उदार करून टाका . मला कुणालाही आठवायचंच नाही या बाबतीत . हे मी वारंवार का सांगते कारण लोकांन मध्ये हे फार ठाम बसलेलं आहे कि क्षमा कशी करायची माताजी आम्ही ,क्षमा करूच शकत नाही आम्ही . अगदी करू शकता . तर कृपा करून सगळ्यांना एकसाथ क्षमा करायची . हि आहे दुसरी अट .
आणि तिसरी अट अशी आहे कि आता आपण आपल्या आत्मदर्शना च स्वतःच आपण दर्शन घ्यायचं आहे .तर दुसरा काय करतो ,दुसरा काय बोलतो तिकडे आपण लक्ष द्यायचं नाही . फक्त आपल्याच कुंडलिनी जागरणाकडे लक्ष असायला पाहिजे . काही विचार करायला नको ,मंत्र म्हणायला नको ,कुंडलिनी स्वतः जे आहे ते सगळं कार्य करते . तुम्ही काहीही विचार करायचा नाही त्याच्या बद्दल कि मी आता तिथे मंत्र बोलते कि मी त्याला प्रयत्न करते ,काहीही प्रयत्न करायचा नाही . ती कुंडलिनी स्वतः च तुमची जागृत होऊन तुम्हाला तुमचं आत्मदर्शन देईल . ती समर्थ आहे . माझ्यावर तेव्हडा मात्र विश्वास ठेवा कि ती समर्थ आहे आणि स्वतः वर पण विश्वास ठेवा मुख्य म्हणजे कि ती करू शकते तुमच्यातही ते होऊ शकत . जर ह्या लोकं मध्ये होऊ शकत तर तुमच्यात का होणार नाही . अजून आपल्याला हेच माहित नाही कि कसेही आपण असलो तरी भारतीय आहोत . भारतीय माणसांमध्ये काय विशेष गुण असतो हे अजून आपल्याला माहित नाही . विशेतः महाराष्ट्र ,ते बाहेर गेल्यावर कळत . तेव्हा या अशा तीन अटी आहेत . काही विशेष कठीण नाहीत ,उगीचच मनाचेच काहीतरी मांडे आहेत ते मी याला क्षमा करत नाही त्याला क्षमा करत नाही ,ते विसरून जायचं . अगदी सरळ म्हणायचं कि मी सगळ्यांना क्षमा केली . आता आत्मबोध झाला पाहिजे . आणि तो होणार आहे . त्या साठी काहीही करायचं नाही सहज होतो . तरी सुध्दा आपली चक्र कुठे आहेत आणि त्या चकराना कस प्लावीत करायचं ,कस नरिश करायचं ते मी सांगीन तुम्हाला आणि ते झाल्यावर आपल्याला आश्चर्य वाटेल हि चारीकडे पसरलेली शक्ती आपल्या हातामध्ये अशी थंड थंड वाऱ्या सारखी झुळुके सारखी ,आपल्याच डोक्यातून ,स्वतः च्याच डोक्यातून इथून ,कुणा कुणाच्या गरम येईल ,आणि कुणा कुणाच्या थंड असं यायला लागेल . आदी शंकरा चार्यानी वर्णन केलय याच
"सलिलम सलिलम ". थंड थंड अशा त्यांनी चैतन्य लहरींना सौन्दर्य लहरी असं म्हंटल आहे . आता ते कवी होते ,आणि आहे हि तशीच गोष्ट . तेव्हा सगळ्यांना विनंती कि सगळ्यांनी बसून घ्यावे . कमाल म्हणजे हि आहे कि तुम्ही जरी खुर्चीवर बसलात किंवा माझ्या उंचीवर जरी बसलात तरी पार होऊन जाता . काय सांगावं मला स्वतःचच आश्चर्य वाटत कि होतंय कस घडतंय कस पण होतंय . परमेश्वराची इच्छा झालेली आहे कि सर्वाना आत्मदर्शन द्यायचं आणि कलियुगात व्हायचंच होत म्हणून घडत आहे .
आता फक्त जर उद्या आपण सगळे आलात आणि इतर मंडळींना पण कळवा ,मित्र मैत्रिणी ,सहकुटुंब सहपरिवार त्यांना बोलावण पाठवा . इतकच नव्हे पण ह्या पेक्षा दुसरं काही द्यायचं नसत . उद्या परत मी आत्म्याचं स्वरूप काय ते तुम्हाला सांगेन . आता याच्यावर वादविवाद घालता येत नाही ,ज्याला नसेल आल हातावर तो वाद घालेलच मला काही आलं नाही म्हणजे तुमचंच काही तरी चुकलं आहे मग नाही आलं तर ,सहजयोगाचा दोष नाही त्यात . तेव्हा कुणाशी वाद घालायचा नाही त्या बद्दल ,भांडण करायचं नाही फक्त त्याचा आनंद उचलायचा .निर्वीचारीटेट राहायचं . उद्या परत आपण इथे यावं आणि आत्म्या बद्दल मी सगळं काही सांगेन .