Public Program

Public Program 1984-02-18

Helyszín
Beszéd időtartama
65'
Kategória
Nyilvános program
Beszélt nyelvek
Angol, Maráthi
Hang
Videó

Jelenlegi nyelv: Maráthi. Beszédek elérhetőek: Maráthi

A beszéd a következő nyelveken is elérhető: Angol

18 फेब्रुवारी 1984

Public Program

Vaitarna (India)

Talk Language: English, Marathi | Transcript (Marathi) - Draft

Music, dance, Public Address at Vaitarna Temple (Marathi/English). Vaitarna (India) , 18 February 1984.

आज मला फार आनंद झाला तुम्ही सगळे आलात परत आणि आज तुमच्यात चेतना आलेली दिसते .फार फरक झालेला आहे .मागच्या वेळे पासून ह्या वेळेला सगळ्या मुलांच्या हातात थंड थंड व्हायब्रेएशन दिसतात .त्यांच्यात फार जागृती झालेली दिसते आहे .चेहरे बदलेले दिसले .आणि बायकां न च्या चेहऱ्यात सुद्धा तेजस्विता दिसली .पुरुष पुष्कळ सुधारलेले दिसले .सगळ्या न मध्ये एकूण आशा जशी चमकावी तस डोळ्यामध्ये आशेच तेज चमकू राहील आहे .हे पाहून फार आनंद झाला .आपल्या देशाचे दुर्दिन होते ते बदलण्याचे दिवस आलेले आहेत .सगळं काही भलं झालेलं आहे .सगळं दारिद्र्य ,दुःख सगळं काही बदलणार आहे .हे बदलच पाहिजे .त्याच्या साठी आपल्याला योग मिळवला पाहिजे .तो तुम्ही मिळवला ,आणि हळू हळू तुमच्या लक्षात येईल कि तुमच्यात केव्हडा बदल झाला .तुमच्या वातावरणात केव्हडा बदल आला .तुमच्या परिस्थितीत किती बदल झाला .आणि संबंध जी काही आपली जी मनस्थिती होती जी अत्यंत दुःखात राहत असे त्याच्यात किती समाधान आलं .ते समाधान तुमच्या हृदयात बसलेल्या आत्माराम च आहे .ते समाधान तुम्ही अनुभवावं त्याचा आनंद घ्यावा ,आणि त्या आनंदात तुम्ही डुंबत राहावं हीच माझी इच्छा आहे .आज सगळ्यांना फार आनंद झाला सगळे फार खुश झाले आणि त्यांनी तुम्हाला पाहिलं कि तुम्ही लोक सुद्धा इतक्या एकजुटीने तिथे आलात ,सगळे जण नाचला त ,सगळ्यांनी आनंदानी जयजयकार केला .आता हे लोक पूर्वी आपल्या देशावर राज्य करत होते .तेव्हा त्यांना आपली काही कदर नव्हती .तेच आज तुमच्या चरणावर आलेत इथे ,तुम्हाला भेटायला आलेत .तुमच्यावर प्रेम करायला आलेत ,तुम्हाला सुख द्यायला आलेत ,तुम्हाला ओळखायला आलेत .आणि त्यांना वाटत कि तुम्ही किती मोठ्या अशा भारतभूमी तल्या महाराष्ट्रात संतांच्या भूमीत या योग भूमीत तुम्ही जन्माला आलात .तेव्हा तुमचा मान करायला सगळे आलेले आहेत .केव्हडी मोठी गोष्ट आहे .जो त्यांनी मान केला , जी तुम्हाला प्रतिष्ठा दिली ,जे तुम्हाला मानतात प्रतिष्टेला आपण योग्य झालं पाहिजे .तशा रीतीने आपण वागलं पाहिजे . आजच एकंदर सगळं काही फार सुंदर झालं . मुलांचं मुलींचं तसेच इतर जणांनी ,सगळ्यांनी फार छान आनंद उत्सव साजरा केला .ते बघून कुणीही असं म्हणेल कि इथे नंदनवन च उतरलेलं आहे कि काय .तशीच अगदी सगळ्यांना भावना येणार .परमेश्वर तुम्हा सगळ्यांना सुखी राखो .आणि मी आता पुढल्या वर्षी परत येणार आहे त्याच्या आधी बराच इथे सहजयोग पसरला असेल .आणि जे तुमच्या डोक्या मध्ये चुकीचे विचार असतील तर ते काढून टाका .हळू हळू इथून जे काय तुमच्या मधेमधे वाईट सवयी लागलेल्या आहेत दारूची ,तंबाकूची या सर्व सुटल्या पाहिजेत .आणि त्याच्या नंतर जे काय चांगलं आहे ते तुमच्यात आलं पाहिजे .ते आल्या नंतर च माणूस सर्व तऱ्हेने उन्नती करू शकतो .आज काल चे हे दिवस म्हणजे विशेष आहेत .या दिवसं मध्ये एक विशेष कार्य होणार आहे ते म्हणजे प्रत्येकाला परमेश्वराचा आशीर्वाद ,अनंत आशीर्वाद मिळणार आहे .आणि तो इतका मिळतो कि तुम्हाला आश्चर्य वाटेल तुम्ही जो आता साधारण माणूस आहात उद्या तुम्ही पुष्कळ काही मिळवणार आहात .आणि फार तुम्हाला आनंदाचे दिवस येणार आहेत .आता सगळ्यांना थंड थंड हातात येतंय ना ,आज तुम्ही माझ्या समोर सगळे जण नाचला आहात म्हणून सगळ्यांना एव्हडं थंड थंड येऊ राहील आहे .असेच आनंदात राहा आणि मी परत आल्यावरती पुढल्या वर्षी पाहिलं पाहिजे कि तुम्ही इतर मुलांना आणि इतर लोकांना सुद्धा जागृत केलं पाहिजे .लहान मुलांच्या हातून फार लवकर जागृती होते .तेव्हा तुमच्या कडे मागच्या वेळी काही काही लोक आले होते त्यांना त्रास वैगेरे होते तेव्हा आम्ही सांगितलं होत त्यांना कि असा इलाज करा म्हणून तस इथे एक सेंटर सुरु झालेलं आहे तुम्हाला आमचे फोटो वैगेरे दिलेले आहेत आणखीन जे काय लागेल ते मागून घ्यावं आणि सहजयोग करावा .सहजयोग म्हणजे आपल्या आत्म्याला मिळवायची गोष्ट आहे .सांगितलं आहे, तुझं आहे तुझं पाशी, ते तुम्ही मिळवलं पाहिजे .जे आहे ते मिळवल्यावर तुमच्या आनंदाला पारावार राहणार नाही कारण आत्मा आनंदाचा स्रोत आहे .त्या आनंदात तुम्ही स्वतः असून सुद्धा त्याच्यात राहू शकत नाही म्हणजे याला काय म्हणायचं .म्हणून ते जे आनंदच महेर घर आहे जी ,पांढरी आहे ती तुम्ही मिळवली पाहिजे आणि ती पांढरी म्हणजे तुमच्या हृदयात आहे .ती जर एकदा मिळाली म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल कि तुम्ही किती महान आहात ,प्रचंड आहात .त्याच्या बद्दल ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे कि तुम्ही कल्पतरूंचे ,चला कल्पतरूंचे आर्णव ,अर्णव म्हणजे मोठमोठाले जंगल चे जंगल .तसे आज चालले होते सगळे जंगल .अर्णव तुम्ही पहिले ना ,तुम्ही सर्व कल्पतरूंचे आर्णव आहात . एकेक मनुष्य कल्पतरू आहे .काही इच्छा कोणी केली तर तुम्ही म्हणणार त्याला अच्छा होणार इच्छा पूर्ण ,तथास्तु म्हणून बघा तुम्ही त्याला करून बघा .कुणी तुम्हाला विचारलं होईल का काम आमचं तुम्ही म्हणा हो होईल .करून बघा .अजून तुम्हाला म्हणजे सिहासन मिळालं आणि सिहासन वर बसले तरी सुद्धा तुम्ही विसरूनच जाता कि तुम्ही सिहासनावर बसले आहात .तेव्हा सिहासनावर बसून तुम्हाला राजा सारखं वागलं पाहिजे ना .तस वागत नाही ना तुम्ही .तथास्तु म्हणावं आम्ही आता योगी जन झालो .योगिजनांची शक्ती असते आम्ही जे म्हणू ते होणार .असे तुम्ही आहात .आणखी त्यांनी जे पुढे सांगितलं आहे कि तुम्ही, बोलते पियुषाचे आर्णव ,बोलते म्हणजे बोलतात पियुषाचे म्हणजे अमृताचे ते हि साधक असे तुम्ही असे जगा मध्ये फिराल .तुम्ही नुसता अनुभव घेऊन बघा तुमि काय आहात ते .अजून तुम्ही स्वतःला ओळखलेलं नाही .जस हे इन्स्ट्रुमेंट लहानच आहे म्हणा पण जो पर्यंत तुम्ही त्याला कॅनेकशन लावणार नाही तो पर्यंत त्याला काही अर्थ लागणार नाही .तसच तुम्हालाही काही अर्थ लागलेला नव्हता .पण आता लागलेला आहे . आता तुम्हाला जे करायचं ते दमकून करायचं . आणि जे म्हणायचं ते अगदी दणकून म्हणा .तुम्ही जी इच्छा प्रगट कराल ती इच्छापूर्ण होईल .आणि जे तुम्हाला पाहिजे ते सर्वाना मिळणार आहे . आणि तुम्ही ज्याला जे म्हणाल ते मिळेल . आणि ते मिळालंच पाहिजे ,परमेश्वर तुमच्या साक्षीला उभा आहे .सारे चिरंजीव तुमच्या बरोबर आहेत .हनुमान ,भैरव तुमच्या साथीला आहेत .गणपती तुमच्या बरोबर आहेत .ब्रम्हा विष्णू महेश तुमच्या बरोबर फिरत आहेत ,सगळे देवदूत तुम्हाला ध्यान करत आहेत .याचा तुम्ही अनुभव घ्या .अनुभव घेतल्या शिवाय माताजी काय म्हणता आहेत हे तुमच्या लक्षात येणार नाही .खरोखरच तुम्ही योगी झालात कि नाही ते तुम्ही अनुभव घेतला पाहिजे .योगिजन म्हणजे जंगलात राहणारे लोक नको .तुकाराम काय जंगलात राहत नव्हते .पण त्यांना घ्यायला विमान आलं होत .तस ज्ञानेश्वर काही जंगलात राहत नव्हते .काही सोडून राहायला नको . या संसारात राहूनच तुम्ही योगिजन आहात .असे विशेष योगी आहात तुम्ही .आणि तुम्ही सहजयोगी आहात .कारण तुम्हाला सगळं काही माहित आहे .कस दुसऱ्याला जागृत करायचं ,कस कुणाला पार करायचं ते शिकून घ्यायचं .आता लहान पण पासून ते अंगवळणी बसलं तर तुम्ही अगदी एक्सपर्ट व्हाल .त्याच्यामध्ये म्हणजे मोठे मोठे योगीराज होणार .आणि आमच्या डोळ्या समोर ते दिसायला पाहिजे .तर आज सर्वाना माझा अनंत आशीर्वाद .मी अत्यंत सुखी आहे या वेळेला आणि असं वाटत कि या वैतरणा मध्ये फार मोठं कार्य होणार आहे .सर्वाना माझे अनंत आशीर्वाद

Vaitarna (India)

Loading map...