Public Program 1980-01-11
11 जानेवारी 1980
Public Program
Akurdi (India)
Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED
1980-01-11 Program at Akurdi, Pune
आता आपण परम पूज्य माताजींनी पुणे जवळी चिंचवड येथे आकुर्डी गावी केलेला उपदेश ऐका. हा उपदेश दिनांक ११ जानेवरी १९८० रोजी केला होता. मी आता काय बोलणार आहे हेच माझ्या लक्षात येत नव्हतं. कारण हे सारं प्रेमाचं कार्य आहे. परमेश्वराचं मानवावर अत्यंत प्रेम आहे. इतकं कोणत्याही वस्तूवर नाही. सृष्टी सबंध निर्माण केल्यावर , सर्व सृष्टीला आपल्या शक्तीच्या जोरावर पूर्णपणे सुसज्ज केल्यावर त्यांनी मनुष्याची निर्मिती केली. फार मेहनत घेऊन ही निर्मिती केलेली आहे, आणि ह्या मानवाच्या हातातून , काही तरी विशेष घडणार आहे, एक लहानसा अमीबा आज मानव स्थितीला पोहचला तो कशासाठी? ह्या दिव्याची तयारी हजारो वर्षांनी परमेश्वराने केली आहे. अनेक वेळेला अवतरणं ह्या संसारात आली. त्यांनी हे महान कार्य करून मानव निर्माण केला. त्या नंतर धर्माची सुद्धा स्थापना केली. मानवामध्ये धर्म स्थापन करून त्याला पूर्ण पणे स्वतंत्रता देण्यात आलेली आहे. वाटलं तर त्याने अधर्मात जावं, वाटलं तर त्याने धर्मात राहावं. माणसाला त्याची बुद्धी वापरण्याची पूर्ण मुभा आहे. हे एवढ्यासाठी, की जेव्हां त्याला परमेश्वराच्या साम्राज्यात प्रवेश मिळणार त्या वेळी तो स्वतंत्र असला पाहिजे. आपल्या स्वतंत्रेत त्याने धर्म स्वीकारला पाहिजे. जबरदस्तीने नाही. धर्म हा हितकारी आहे, मंगलमय आहे हे त्याने आपल्या स्वतंत्रेत जाणलं पाहिजे. चुका होतील, उलट मार्गाला सुद्धा जातील, पण शेवटी त्यांनी स्वतःच्या धर्मात बसलं पाहिजे. अशा स्थितीमध्ये आज हा सहज योग, महायोग्याच्या पूर्ण (अस्पष्ट) जन्माला आलेला आहे. महायोग म्हणजे, आता आम्ही मुंबईहून आलो पुण्याला. पुण्याहून, ह्यांनी सांगितलं आकुर्डीला जायचंय माताजी, तरी योग घडला नव्हता, थोडा आराम केला, अजून योग घडला नाही, माझी मुलं वाट बघत बसली आहेत, अजून आम्हाला त्यांचं दर्शन झालेलं नाही. तो पर्यंत योग घडलेला नाही. प्रयत्न चालू आहे. अनेक मार्ग अवलंबित करावे लागले. शेवटी काय योग घडला पाहिजे. मी तुम्हाला भेटलं पाहिजे, तुम्ही मला भेटलं पाहिजे. नंतर मोटारीने निघालो, इकडून तिकडून रस्ता चुकवित, रस्त्यामध्ये गर्दी फार. आतुरतेने, इथे आल्यावर सुद्धा थोडंसं पुढे निघून गेलो. तरी योग घडला नाही. शेवटी आता इथे आल्यावर आपण सगळ्यांना डोळे भरून पाहिलं, तेव्हां खरा योग घडला, हा महायोगाचा क्षण आहे म्हणून सहज योग जो अनेक वर्षापासून अनेक अवतरणानी केला, तो हा महायोगाच्या स्थितीला आलेला आहे. इथं आमची तुमची गाठ पडली ठका ठका. प्रेमाचा सगळा आनंद वीरावस्थेत वेगळाच आहे. आतुरता, उत्कंठता, मग भक्तीची गीतं, पंढरीला जाणं, सगळं काही. पण भेटी झाल्यावर मात्र आनंदाला पारावार उरत नाही. ही प्रेमाची महिमा आहे. हे सगळं प्रेम, ह्या धकाधकीच्या काळात सुद्धा आतून सगळं बसलेलं आहे, त्याला विशेष कारण म्हणजे सर्व विश्वामध्ये ही पृथ्वी विशेष, आणि, त्या पृथ्वीमध्ये हा भरतखंड फार विशेष. भारतवर्ष, हा हिंदुस्थान, परमेश्वरानं, विशेष रूपाने सजवलेला आहे. ही योग भूमी आहे. दुसऱ्या देशामध्ये योग नाही, इथे योगावर विचार नाही. धर्मावर विचार नाही, फक्त उपभोगावर, भोग, इथे भोग हे मुख्य आहे. जो पर्यंत माणसाला परमेश्वर मिळत नाही तो पर्यंत, एक भारतीय, एक हिंदुस्थानी, त्याला वाटतं माझ्या आयुष्याला काही अर्थ लागला नाही, अजून परमेश्वर काही मिळालेला नाही. पण इतर सर्व देशामध्ये भोग मिळाला पाहिजे, माझ्या जवळ एक मोटार असली तर दहा मोटारी असल्या पाहिजेत, एक घर असलं तर दहा घरं असली पाहिजेत. नाना तऱ्हेचे भोग, घाणेरडे भोग, अत्यंत दृष्टतेला नेणारे, सर्व विध्वसंक भोग, त्याकडे माणसं झुकली. तर सर्व प्रथम म्हणजे आपल्या भारत भूमीला योगाचं केवढं मोठं साधन मिळालेलं आहे. त्यातल्या त्यात आपला महाराष्ट्र म्हणजे साधू संतांची नुसती ढेप. खैरात झालेली आहे. कितीतरी साधू संतांनी ह्या पूर्ण महाराष्ट्रावर जन्म घेतला. त्याला काही तरी कारण असायला पाहिजे. ज्ञानेश्वरांसारख्या महान, मी त्यांना अवतरणंच मानते तुम्ही त्यांना साधू संत म्हणा, पण ते अवतारच होते. आणि तो अवतार फार मोठा होता. माझ्यावर एक पुस्तक लिहिलेलं आहे, त्याच्यात जर तुम्ही वाचलंत, तर आपल्याला कळेल की तो परमेश्वराचा एक अवतारच होता. आणि ह्या दिव्याची तयारी ह्या महाराष्ट्रात फार सुंदर केलेली आहे. तुम्ही त्या महाराष्ट्रातले धार्मिक दिवे आहात. आणि त्याची अत्यंत सुंदर जोपासना करून तुम्हाला तयार केलेलं आहे. पण प्रत्येक साधू संत जिवंत असताना मात्र आपण त्यांना मानत नाही. स्वतः ज्ञानेश्वर जेव्हा जिवंत होते, त्यांनी इतक्या हाल अपेष्टा सहन केल्या की परवा सासवडला गेल्यावर, त्यांच्या ज्येष्ठ बंधूंचं तिथे समाधीचं स्थान बघितल्यावर, मला माझे अश्रू आवरता आवरेना. अशा महान साधू संतांचा सुद्धा आपण इतका छळ या योगभूमीत केलेला आहे. ह्या महाराष्ट्रात किती साधू संतांना आपण छळलेलं आहे. ते जिवंत असताना त्यांची आपण कधीच किंमत केली नाही त्याला कारण असं की ते सर्व साधारण लोकांसारखे राहत होते. त्यांना काय प्राप्त झालेलं आहे, ते कोणच्या स्थितीला आहेत, ते जाणण्याची आपल्यामध्ये पात्रता नाही, आपले डोळे आंधळे होते. त्यामुळे आपण त्यांना ओळखलं नाही, त्यांचे छळ झाले. पण त्यांनी वातावरण मात्र अत्यंत शुद्ध केलेलं आहे. ते वातावरण आजही मला सगळीकडे दृष्टीत आहे. जरी त्यांचा तुम्ही छळ केला, जरी तुम्ही त्यांना मान्य केलं नाही पण त्यांचं वातावरण अजून इथे आहे. त्यांच्या नंतर मात्र लोकांनी त्यांना उचलून धरलं. त्यांचे मक्तेदार निघाले. इथं आमच्या मुंबईला एक फार मोठं ज्ञानेश्वराचे मंदिर आहे. तिथे माझं भाषणं झालं, तर मी त्यांना म्हटलं की आता आम्ही इथे लोकांना ध्यान करायला लावतो. तर ते म्हणाले ध्यान-बिन इथं करायचं नाही तर मी म्हटलं हे काय बोवा, नाही म्हणे दिंड्या घाला तुम्ही, पण ध्यान करू शकत नाही. म्हटलं काय ज्ञानेश्वरांनी दिंड्या घातल्या होत्या का? त्यांचं वेगळं आहे, पण आम्ही दिंड्या घालणार, आणि तुम्ही दिंड्या घातल्या तर आम्हाला चालेल, पण ध्यान चालणार नाही. आहो म्हटलं, आता तुम्ही ज्ञानेश्वरांना पुतळ्यामध्ये घातलंय, तेव्हा आता तुमच्याशी बोलण्यात काही अर्थ नाही. ते आज जर जिवंत असते तर बोलणी झाली असती. पण ते जिवंत होते तेव्हा त्यांनाही तुम्ही असंच सांगितलं असेल की दिंड्या घाला, आणि आज मी आले तर मला ही सांगता दिंड्या घाला म्हणून, तर ह्या वातावरणामध्ये, इतके सूक्ष्मतेत कार्य करून गेलेले हे लोक जरी असले तरी सुद्धा बाहेर, जडतेत जेव्हा पाहिलंत ज्याला इंग्लिश मध्ये ग्रोथ म्हणतात त्याच्यामध्ये ही आपल्याला जाणीव राहत नाही की आपण कोठे वाहवत चाललो आहे. त्यांना खायला नव्हतं , साई नाथांना जेवायला नव्हतं , ते कुठंही राहत असत , झोपायला त्यांना व्यवस्थित जागा नव्हती, साक्षात दत्तात्रयांचे अवतरण ते , त्यांची ही स्थिती आम्ही केलेली आहे. आम्ही आमच्या वडिलांनी नसून, त्यांच्या वडिलांनी केली असेल , तेव्हा हे लक्षात घेतलं पाहिजे की , काहीतरी आपलं कुठेतरी चुकत असतं काहीतरी. ही पुण्यभूमी आहे. साधूसंतांची भूमी आहे. सगळं असतानासुद्धा आपण त्यांना ओळखलं का नाही? आणि सगळं कळूनसुद्धा आपण अशा मार्गाला कशे लागलो? त्याला कारण असं की प्रत्येक अवतरण आल्यानंतर किंवा साधूसंत आल्यानंतर ते उपटसुंभ मागाहून येतात. त्यांनी लगेच तुकारामांची पाटी लावलेली ‘तुकाराम साधू मार्ग’. तुकाराम असताना त्यांना हाणायचं आणि तुकाराम गेल्यानंतर ‘तुकाराम साधू मार्ग’ लागलेले.(अस्पष्ट) आणि त्याच्यामध्ये अत्यंत सूक्ष्मता, सूक्ष्म काम करतात हे. पहिल्यांदा हे की त्याच्यासाठी इमारत बांधायची आहे बोवा, मग त्याला पैशे पाहिजेत असं का मग हे साधू बाबा तुकारामांचे खास शिष्य होते, होते की नाही देवाला ठाऊक. तर तेव्हा ते जे खरे तुकाराम होते, त्यांचा काही विचार होत नाही. जे त्यांचे शिष्य आहेत त्यांच्या पायावर यायला सुरुवात, मग त्यांना खायला-प्यायला पोटगी पाहिजे. शेवटी असं कळतं की ते शिष्य साहेबांनी बिल्डिंगा बनवल्या आणि लोकांना असं वाटतं की वा वा वा! किती लोक यांच्याकडे येतात बोवा, म्हणजे अति सूक्ष्मामध्ये तुमचा जो अहंकार आहे, त्याला ते चेतावनी देतात. मला असं वाटतं आम्ही या साधू संताना आता विकत घेतलंय, पण ते लक्षात येत नाही. आपल्या लक्षात येत नाही. तेच सगळं काही आपल्या समाजात झालेलं आहे. तिकडे जर लक्ष दिलं, आता देवळात. देवळात सुद्धा पैशे टाकायचे. परवा मी सासवडला गेले होते, तिथे एक बाई आल्या, त्यांनी मला दहा पैशे मला दिले. म्हटलं, मला हे नको, म्हटलं तुम्हांला जास्तीचे पाहिजेत का माताजी? म्हणजे आपल्या दृष्टीला हे समजतच नाही की, परमेश्वराला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. त्याला काबूत तुम्ही करू शकत नाही. त्याच्यावर तुमचा काहीही अधिकार नाहीय. तसा फक्त प्रेमाचा अधिकार आहे. जर तुमचं परमेश्वरावर नितांत प्रेम असलं तर तुमच्याकडे तो धावत येईल. तो प्रेमाचा भुकेला आहे. बाकी तुम्ही त्याला कशाने जिवंतपणी बघू शकत नाही. जर तुम्ही म्हटलं की तो येऊन आमच्यासमोर जिवंत उभा राहिल, तर शक्य नाही, पण जर तुम्ही प्रेमाचे भुकेले असलात तर तो कोणच्याही परिस्थितीत तुमच्याकडे येईल.हे तुम्हांला माहितेय. ज्यांना (अस्पष्ट) नामदेवांचे उदाहरण आहे. आपल्याकडे म्हणजे किती साधुसंतांची दिवाळी लागली आहे मुळी त्या दिवाळीतसुद्धा हा अंधार मध्ये आणणारे लोक पुष्कळ आहेत. सगळीकडे बसलेले आहेत. आपल्या देवळात बसलेले आहेत, किंवा असे समाज बिमाज काढून चालवलेले आहेत. परमेश्वर आपल्या हृदयात, मंदिरात बसलेला आहे. तो आपण जाणला पाहिजे. आपल्यामध्ये जो प्रकाश आहे, तो जागृत झाला पाहिजे. आपल्याला हे कळलं पाहिजे की आतमध्ये काय आहे आपल्या आणि बाहेर काय आहे. प्रकाशाचं हेच एक लक्षण असतं. समजा जर हे दिवे गेले तर काहीही दिसणार नाही. जर आपल्यामध्ये दिवा लागला तर सगळं दिसलं पाहिजे, की आपल्यामध्ये कुठे काय काळं-बेरं आहे आणि कसं ते स्वच्छ होत आहे. तसंच हे दिसलं पाहिजे की दुसऱ्याशी आपले संबंध कसे आहेत. दुसऱ्यांच्या बरोबर संबंध ठेवताना आपल्याला त्यांच्यातलं काही कळतंय की उगीचंच आपण वर वर करतो की बाई साडी कशी नेसली किंवा ह्या पुरुषाने याच्याकडे मोटर आहे का? आपण हे बघतो आहे की त्या मनुष्याची आतली प्रामाणिक स्थिती काय आहे? ते बघतो. त्याला कळण्यासाठी सुद्धा प्रकाश हा पाहिजे आणि हा प्रकाश आपल्या आत्म्याचा आहे, असं सगळ्या साधूसंतांनी सांगून ठेवलेलं आहे. तर जशे आपण म्हणजे अत्यंत समृद्ध होतो आणि संपदाशाली असलो जरी आपल्यामध्ये अत्यंत शक्तीचा साठा असला आणि आपण अगदी तयारीत आहोत आता, आपल्या फुलांची फळं व्हायला काहीही वेळ लागणार आहे अशा जरी स्थितीत आपण असलो आणि परमेश्वराने तिथे आणून आपल्याला सोडलं असलं तरीसुद्धा हे लक्षात ठेवलं पाहिजे की आत्तापर्यंत आपलं लक्ष बाहेरच होतं आणि बाहेरच्याच गोष्टींशी आपण तादात्म्य घेतलेलं होतं तेव्हा आतमध्ये बसणं सोपं काम नाही. म्हणजे आजच मी सांगत होते यांना की एखादया पुरुषाला जर सवय असली की घराच्या बाहेर राहणं. गृहस्थपणाची सवय नसली तर लग्न झाल्यावर तो उठला की बाहेर पळ, काय झालं की बाहेर पळतो. हळूहळू त्याला आपल्या घरात पत्नी आल्याचं सौख्य जाणवतं, मग तो घरात बसू लागतो, तसंच आमच्या सहजयोगाचं होतं. पुष्कळांचं होतं. पुष्कळांचं होत नाही. आणि ज्याचं होतं ते लोकसुद्धा परत परत बाहेर धावत फिरतात. नसत्या त्यांना गोष्टीचं आकर्षण वाटतं. पण जेव्हा काही माधुर्य त्यांच्यामध्ये पाझरू लागतं तेव्हा प्रेमाचे आविष्कार आणि त्याचे चमत्कार दिसू लागतात, तेव्हा मग माणसाला काहीही दुसरं आवडत नाही. कारण अमृत प्यायल्यावर कोणी गटारातलं पाणी पितं का? ते अमृत तुमच्यामध्येच आहे. माझं काय काम आहे नुसतं साधं. तुमचे दिवे आहेत तेवढे फक्त पेटवायचे, त्याच्यावर माझं काही विशेष काम नाही. ते पेटवले पाहिजेत. कसे असले तरी पेटवले पाहिजेत. तेव्हा सहजयोग म्हणजे फार मोठी किमया आहे. प्रथम म्हणजे हजार खून माफ म्हणतात. तुम्ही काहीही पूर्वजन्मात ह्या जन्मात काहीही पापं केली असतील तरी आमच्या प्रेमापुढे ती तोडकीच आहेत. असं कोणचंही पाप तुम्ही करू शकत नाही, जे आमचं प्रेम धुऊन काढू शकत नाही. ही मात्र गोष्ट निर्विवाद आहे. तेव्हा त्याबद्दल मुळीच विचार करू नये, की आमच्या हातून हे पाप घडलं किंवा ते पाप घडलं. ही फार मोठी सहजयोगाची किमया पहिल्यांदा आहे की तुम्हांला तुमची कर्म भोगा वगैरे सहजयोग सांगत नाही. (अस्पष्ट) झालं संपलं आता. कर्म तरी तुमचा अहंकारच भोगतोय ना. ज्याला अहंकार नाही तो कसलं कर्म भोगतो हो. सगळं नाटक आहे. जोपर्यंत नाटकात तुम्ही आहात तेव्हा तुम्हांला वाटतं की आम्ही शिवाजी आहोत कुणाला वाटतं की आम्ही औरंगजेब आहोत. नाटक संपल्यावर कळतं की अरे हे तर नाटक होतं. आपण नाटक खेळत होतो. हे नाटकच फक्त संपवायचं आहे. ते संपल्यावर मस्त वाटतं की अहाहा काय मजा येऊन राहिलेय. हे काय मूर्खासारखे सगळे लोक करत आहेत कामं, मग सगळं लक्षात येतं, आणि प्रकाशाशिवाय नुसत्या लेक्चरबाजीने काहीही कार्य होण्यासारखं नाहीय. बोलून बोलून तरी काय बोलणार. शेवटी जोपर्यंत तुम्हांला त्याचा स्वाद मिळणार नाही, त्याचा तुम्ही आस्वाद घेणार नाही तोपर्यंत हे सगळं बोलणंसुद्धा व्यर्थ आहे. तेव्हा तुम्ही ते मिळवा. ते तुमच्यात आहे. तुझं आहे तुजपाशी सांगितलेलं आहे. ते काय आहे ते तुम्हांला कसं मिळेल ते झाल्यावर काय होतं, त्याच्यानंतर ते स्थिर कसं करायचं. आताच मी आले तर त्यांनी आरतीला दिवा आणला होता आणि तो दिवा विझलासुद्धा. थोडासा धूर आला परत पेटला असं सहजयोगाचं आहे. पुष्कळांचा सहजयोग आधी थोडा-बहुत जमतो न जमतो तो की परत थोडासा उतरतो, परत चढतो पण कुंडलिनी मात्र सोडत नाही कारण ती तुमची आई आहे. जन्म-जन्मान्तरापासून ही तुमच्यामध्ये आहे. साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे. जसा टेपरेकॉर्डर असतो ना तसं ते सगळं तुमचं नमूद करून घेते. आणि व्यवस्थित तिथे बसलेली आहे. ही तुमची आई आहे. ही तुमची प्रत्येकाची एक वेगळी वेगळी आई आहे, आणि ती आई सहजच वर येते. कारण मी त्यांची आई आहे. तेव्हा मला पाहिल्याबरोबर आनंदाने ती वर येते, आणि एकदम जोरात अनुभव येतो. पहिला अनुभव फार जोरात येतो, पूर आल्यासारखा मग ओसरतो. जरासा पूर काही काही लोकांचा तर फारच ओसरतो. दुसऱ्या वेळेला आलं तर वाटतं अहं काय कसं काय तुमचं ते समजलं आम्हाला (हास्य) गेले कोणत्या तरी खड्डयात. कारण आपल्या प्रांतामध्ये अनेक खड्डे खळगे आहेत. त्यातनं वाहताना गंगा जरी जोरात एकदा वाहून आली तरी ती जाते परत त्या खळग्याच्याकडे त्यांना भरायला. आता हा मध्यमार्ग आहे. नदी ही मध्यमार्गातनं वाहत असते. आणि जेव्हा ती प्रशस्त होते तेव्हा दोन्हीकडचे तिचे जे पाट आहेत, ते व्यवस्थित सुपीक होतात. तसंच आहे समाजाचंही जो मध्य मार्ग आहे, तुम्ही जर गंगेला वाहून घेणारं पाणी आहे, त्या गंगेमध्ये सुद्धा हे वायब्रेशंस आहेत. ह्या चैतन्यलहरी आहेत. तिला वाहून नेणारं जे पाणी आहे ते तुम्ही मध्यमवर्गातले लोक आहात. अति श्रीमंत कामातनं गेलेले आहेत. त्यातले किती येतील देवाला ठाऊक आहे. मी तिकडे लक्षच देत नाही मुळी. ते आलेत शहरात लुटायला. मला तर माहितीच आहे, भगवे कपडे घाल नाहीतर नागवं कर, नाहीतर काहीतर कर, पैशे काढायचे धंदे. त्याच्यासाठी वाट्टेल ते पाप करायला हे लोक तयार आहेत. ते सगळे शहरात निघाले किंवा शहर त्या लोकांना ते बोलावतात. आपल्या खेडेगावामध्ये ह्या धर्मभूमीत जे समाधानी लोकं आहेत तेच खरे या सहजयोगाचे वाहक आहेत, आणि ही घटना फार उत्तम घटित होते. अशा लोकांना त्याचा अत्यंत लाभ होतो आणि सहजयोगाचं खरं वरदान याच लोकांसाठी आहे. जे लोक अगदी दरिद्री असून भिकाऱ्यासारखे रस्त्यात फिरतात, चोऱ्या-माऱ्या करतात. पैशाला सगळे महात्म्य आहे. काहीही समाधान नाहीय, अशा लोकांना मात्र थोडासा वेळ लागणार आहे. पण तुमच्यासाठी मात्र धावत आली आहे गंगा घरी, असं समजलं पाहिजे. म्हणजे हा अगदी मान आहे आपला. हा आपला मान आहे. आजपर्यंत समाजाने मध्यमवर्गाचा कधीही मान केला नाही. मध्यमवर्ग म्हणजे नेहमीच चिरडला गेला. एकीकडून भिकाऱ्यांनी चिरडून टाकलेला आहे, आणि मध्यमवर्गाने नेहमी आपला धर्म पाळलेला आहे, आणि राहिलेले आहेत आपल्या धर्माने. काहीही कुणी त्रास दिला तर तो त्या स्थितीला जागून राहिलेला आहे. तेव्हा हा आपला मान आहे. ह्या आकुर्डीच्या ह्या रस्त्यावरून मी पुष्कळदा गेले आहे. आणि मला पुष्कळदा असं वाटायचं की ह्या खेडेगावात कधी मी येणार आणि कधी या लोकांना भेटणार? कसं काय होणार आहे. कधी ही गंगा बांध फोडून आतमध्ये वाहणार आहे ते मला पुष्कळ वेळेला लक्षात यायचं आणि आज ते बघून इतका मला आनंद झालेला आहे. इतका मला आनंद झालेला आहे. की असंच एक एक गाव एक एक खेडं जागृत होऊ दे. जोपर्यंत तुम्ही जागृत होणार नाही तोपर्यत तुमचा जो काही व्यवहार आहे, त्याला काही अर्थ लागत नाही. तुमच्या आयुष्याला काही अर्थ नाही. तसं ह्या एका वस्तूला काहीही अर्थ नाही जर ह्याचा संबंध इथे मेन्सशी लावला नाही तसंच तुम्हांला सुद्धा मेन्सशी लावण्यासाठी कुंडलिनी म्हणून शक्ती तुमच्यामध्ये आहे आणि काहीही तुम्हांला त्रास होणार नाही ती तुमची साक्षात आई आहे. आई मुलाला जन्म देते सर्व त्रास स्वतःवर घेते. मुलाला आठवण तरी असते का? आपला जन्म कसा झाला? ती आई कोणाच्या त्रासातून निघून गेली ती. जर तुम्ही आई असाल तर तुम्हांला ही गोष्ट लवकर लक्षात येईल की किती त्रास आई उचलते, पण जसा मुलगा जन्मला किंवा मुलगी जन्मली की कसं काय ओ ठीक आहे ना! सगळं विसरते ती, तसंच आहे. अगदी तसंच साधं- सरळ प्रेमाचं आहे, ते तुम्ही घ्यावं, ते तुम्हांला मिळावं. अनंत कालातनं ही कुंडलिनी तुमच्यामध्ये वास्तव्य करून आहे. इतकंच नव्हे तर ही संबंध चक्र सुद्धा जशी इथे दाखवलेली आहे तुमच्यामध्ये स्थित आहे. हे सगळं असूनसुद्धा जर तुमची जागृती झाली नाही तर आम्हालाही काही अर्थ राहणार नाही. सगळे दिवे अगदी तयार आहेत हे माझ्या लक्षात आहे. आणि ते दिवे नुसते अशे सरळ पेटवायचे आहेत. एक दिवा पेटवल्यावर अनेक दिवे पेटवता येतात. आता आपले जे राहुरीचे धुमाळ साहेब आपल्यासमोर उभे होते त्यांनी हजारो लोकांना जागृती दिलेली आहे, तसेच आपणसुद्धा (अस्पष्ट) जे काही करत आहोत ते प्रेमाने करत आहोत का? असा प्रश्न विचारून हा संकल्प पूर्ण करायचा. (अस्पष्ट) आता एका वर्षानंतर मी येणार आहे (अस्पष्ट) तेव्हा विचारणार आहे (अस्पष्ट) दुसरा संकल्प असा करायचा की सहजयोगाबद्दल शंका (अस्पष्ट) सहजयोग आपल्यामध्ये वाढवायचा कसा? म्हणजे आता(अस्पष्ट) सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत फोटो (अस्पष्ट) मग म्हणायचं माताजी मी सहजयोग (अस्पष्ट) त्याला काहीही अर्थ नाही. आपलं वाद्य दुरुस्त केलं पाहिजे. आपण (अस्पष्ट) कष्टानं उभं राहिलं पाहिजे काही (अस्पष्ट) दोन दिवस पाहा तुम्ही तिसऱ्या दिवशी (अस्पष्ट) अनंत काळात (अस्पष्ट) कोणचीही गोष्ट त्याच्यामध्ये आपण कुठपत काय करतोय ते बघायला पाहिजे. दुसरा काय करतोय ते बघितलं की गेलो. सहजयोग म्हणजे आपण काय करतोय. आम्ही (अस्पष्ट) हा करतो तो करतो अमुक झालं तमुक झालं ते करण्यापेक्षा मी काय करतो हे जर बघत चालले तर स्वच्छता जास्त होईल (अस्पष्ट) सारखं इतरांच्या बाबतीत (अस्पष्ट) पण त्याचा अर्थ असा नाही की तुम्ही आता माताजींचा (अस्पष्ट) फार काही पापी वगैरे असं नाटक ओळखून स्वतःला स्वच्छ करत निघून जायचं (अस्पष्ट) मी किती पापी (अस्पष्ट). आम्ही अगदी जवळ आलो. तुम्ही आमच्या हृदयात आहात तेव्हा तसा काही विचार करायचा नाही. (अस्पष्ट) म्हणजे आता रस्त्याने चालताना कुणीतरी रस्त्याने भांडतात (अस्पष्ट) तुम्ही कोण आम्ही माताजींचे सहजयोगी. झालं मग डोक्याला हात लावून घेतला. अहो, ते माताजींचे सहजयोगी रस्त्यात डोकी फोडत होते असे म्हणतील, म्हणजे माताजीना असं वाटतं कधी कधी की आता काय लागेल आणि कुठे जाऊ, पण असं करायचं की माताजींचे सहजयोगी अत्यंत शांत आहेत. शांत (अस्पष्ट) भांडण झालं की तीच तऱ्हा आपली खुर्ची दुसऱ्याला देणार, आपली जागा दुसऱ्याला दया अशी माणसं संत साधू आहेत. असं ऐकायला मिळालं म्हणजे मला खरं आनंद होतो. जोपर्यंत (अस्पष्ट) असं मला ऐकायला मिळालं पाहिजे. तुम्ही नाही सांगत पण दुसऱ्यांनी सांगितलं पाहिजे. हा सहजयोग आहे. आणि तिसरा संकल्प फार सोपा आणि कठीण आहे. तो म्हणजे ज्या दिवशी सामूहिकतेत ध्यान आहे त्यादिवशी हजार राहिलं पाहिजे. त्याच्याबद्दल माझा अट्टाहास एवढयासाठी आहे की तुम्हांला माहित नाही की त्यामुळे तुम्हांला काय मिळते. अजून तुम्ही अज्ञानी आहात. अजून लहान मुलं आहात. तसं मी तुम्हांला सांगते प्रत्येक प्रोग्रामला जो काही सामूहिक प्रोग्राम असेल, अकुर्डीला असला तरी जावं. दुसरं काय करायचं आपल्याला. आता सिनेमाबिनेमा तुम्हांला काही आवडणार नाही. (अस्पष्ट) तर बघायचीच नाही, मग आता हे सहजयोगाचे प्रोग्राम, आनंदाचा मेळावा तिथे जावं तिथे भेटतात आपले लोक (अस्पष्ट) असं विचार करून कुठेही प्रोग्राम असोत. जितके प्रोग्राम होतील तिथे जावं. सामूहिक (अस्पष्ट) अर्थात तुमची पण तयारी झाली पाहिजे. तुम्ही पण सामूहिक चेतनेमध्ये कुठेही प्रोग्राम असला, (अस्पष्ट) आता बघा मुंबईहून आले (अस्पष्ट) आता मुंबईला या तुम्ही काय लागतं (अस्पष्ट) अकुर्डीची मंडळी आली मला किती आनंद होईल बरं. कुठेही मेळावा असला जमलं की तिथे जायचं काय चार पैशे खर्च लागतं नाही आणि मग तुम्हांला तिथे राहायचंच आहे. सगळं काही जे आहे, नवीन क्षेत्र म्हणा किंवा काय ते मिळवायचं आहे. तेव्हा पूर्ण (अस्पष्ट) मिळवण्यासाठी सगळ्या सहजयोग्यांना भेटलं पाहिजे. कसा काय त्रास आहे, सगळ्यांनी (अस्पष्ट) ही जर आपली संघशक्ती वाढली प्रेमाची तर मग परमेश्वराच्या साम्राज्यात यायला वेळ लागणार नाही. (अस्पष्ट) मात्र आज वचन घेणार आहे. (अस्पष्ट) जिथेही सामूहिक प्रोग्राम होतील तिथे प्रयत्न केला पाहिजे जाण्याचा. (अस्पष्ट) जसे आपण सकाळी रोज अंघोळ केल्याशिवाय बाहेर जायला मागत नाही. लंडनला आपले महाराष्ट्रीयन असतात ना जरी त्यांना डॉक्टरनी सांगितलं की सकाळी उठून अंघोळ नका करू तरी करतात, कॅन्सर होतो त्यांना.(अस्पष्ट) तशी सवय लावू नका. एकदा याची गोडी लागली की मजा येणार मग याच्याशिवाय चैन येणार नाही. दुसरं काही (अस्पष्ट) निरानंद त्याच्यात समाधान यायला पाहिजे सगळं प्रेमाने वागलं पाहिजे आपापसांत अं सगळं कळलं पाहिजे गोड (अस्पष्ट) मग त्याच्यामध्ये न जात आहे ना पात आहे. (अस्पष्ट) हे कोण आहेत. आम्ही हे सगळं काही आपल्या सहजयोगात नाही. आपण सगळी एका आईची मुलं आहोत. एकच धर्मातून निघालेली सगळी मुलं तेव्हा आपल्यामध्ये (अस्पष्ट) वगैरे असं काही (अस्पष्ट) फक्त प्रेमाचं साम्राज्य आहे, असं लक्ष्यात घेऊन प्रत्येकाने जेव्हा जेव्हा प्रोग्राम होईल मग तुम्हांला त्याचे लाभ काळतील. त्यानंतर तुमचे जे काही अनुभव असतील ते अशा ठिकाणी सांगावेत आणि नवीन काहीतरी (अस्पष्ट) अशारितीने ध्यान केले पाहिजे. आणि भजन वगैरे सुद्धा म्हटली पाहिजेत. अशा रीतीने आपण तयारी जर केली आपला सहजयोग वाढेल तेव्हा सगळ्यांना एक शक्ती (अस्पष्ट) फार जबरदस्त आहे अगम्य आहे (अस्पष्ट) सगळे चिरंजीव आणि सगळे महान आत्मे आहेत. तुमच्यावर आशीर्वाद (अस्पष्ट) कुठे वाहवत गेलं तर त्याची काय पर्वा असणार? ते आम्हांला चिकटलंय तोपर्यंत त्याची पर्वा आहे काढून टाकल्यावर नखाला काय किंमत आहे. निघालेली नखं होऊ नका चिकटलेली हवीत. त्या लोकांना अनुभव येतात पुष्कळ (अस्पष्ट) तुमच्यासाठी माताजींनी केलं, आमच्यासाठी काही केलं नाही. तुमच्यात पात्रता नाही त्याची लायकी पाहिजे आणि लायकी (अस्पष्ट) सगळ्यांनी आपापसांत मिळायचं. एक दुसऱ्याबद्दल मुळीच वाईट बोलायचं नाही. कारण आज जो तुम्हांला असा भेटतो, तो उद्या बदलेल, परवा बदलेल आणि उत्तम होणार आहे. अतिउत्तम होणार आहे. फक्त एवढंच आहे, एखाद्याचे वायब्रेशन जर खराब असेल त्याचा त्रास होत असणार जास्त बोलणारा असला, आगाऊ असला तर त्याला पाच-सहा लोकांनी मिळून सांगायचं की बाबा! तुझे वायब्रेशंस ठीक नाहीत तेव्हा तू कृपा करून आपले वायब्रेशन ठीक करून घे आम्ही तुला मदत करायला तयार आहोत आणि अशा माणसांनी मुळीच वाईट वाटून घेऊ नये. एखादा मनुष्य म्हणेल की त्याच्याशी बोलू नका अशा माणसाने (अस्पष्ट) प्रसन्नचित्त आनंदी तेच खरे सहजयोगी आहेत, तर आता वर्षभराने आम्ही येणार. (अस्पष्ट) प्रोग्रामला सगळ्यांनी आलं पाहिजे. सहजयोगाने (अस्पष्ट) पूजेला येणार पण प्रोग्रामला येणार नाही (अस्पष्ट). परत या प्रोग्राममध्ये सहजयोग्यांनी प्रश्न विचारायचे नाहीत. पुष्कळसे सहजयोगी अर्धवट जे असतात ते त्या प्रोग्राममध्ये शिष्टपणा दाखवायला प्रश्न विचारतात. (अस्पष्ट)