Public Program

Public Program 1984-01-22

Location
Talk duration
71'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

22 जानेवारी 1984

Public Program

Ahmednagar (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED

Public Program, Ahmadnagar, India 22 nd January 1984

राहुरी कारखान्याचे सन्माननीय अध्यक्ष श्री सर्जेराव पाटील तसेच मित्र संघ संस्थेचे संचालक लोक, आपण येथे जमलेले सर्व राहुरीकर आणि मागासलेले लोक, म्हणजे तसं म्हणायचं मला बरं नाही वाटत कारण सगळी माझीच मुलं आहेत . सगळ्यांना माझा नमस्कार . दादा साहेबांची एकदा अचानक भेट झाली आणि मी तेव्हाच ओळखून पाहिलं की , ह्या मनुष्याला खरोखर लोकांच्यासाठी कळवळा आहे . ज्याच्या हृदयामध्ये कळवळा नाही त्यांनी समाज नेते होऊ नये. ज्यांनी समाजकार्य केलं नाही त्यांनी राजकारणात येऊ नये .ज्यांनी समाजकार्य केलयं ते जर राजकारणात आले तर त्यांना कळवळा राहील लोकांसाठी पण बहुतेक लोक समाजकार्यासाठी एवढ्यासाठी करतात की आपण राजकारणात येऊन पैशे कमवू . ते मला सगळं माहित आहे . मी लहानपानापासनं आपल्या देशाची स्थिती पाहिलेली आहे. तुम्हा सगळ्या मध्ये कदाचित माझे सगळ्यात वय जास्त असेल. माझे वडील सुद्धा फार धर्मनिष्ठ , अत्यंत उच्चप्रतीचे समाजकर्ते , देशकर्ते, राष्ट्रकर्ते आणि परत डॉक्टर आंबेडकरांच्या बरोबर अत्यंत मैत्री ,अत्यंत मैत्री होती. जिव्हाळ्याची मैत्री होती. आमच्या घरी येणं-जाणं सगळकाही.. मी यांना लहानपणापासून पाहिलं होतं . मी त्यांना काका म्हणत असे. तेव्हा अत्यंत जवळचे नात त्यांच्याबरोबर राहिले ल आहे .आणि अत्यंत तेजस्वी, उदार अशे ते होते. माझे वडील गांधीवादी होते . आणि हे थोडसं गांधीजींच्या विरोधात होते. तेव्हा त्यांचा वादही चालत असे, संघर्षाची जी गोष्ट म्हटली ती . पण आपापसात अत्यंत मैत्री होती ,फार मैत्री . माझे वडील जेलमध्ये गेले की यायचे आमच्या घरी विचारायला की कसं काय चाललंय ठीक आहे की नाही . अशा सर्व मोठ्या मोठ्या लोकांच्या बरोबर माझं लहानपण गेलेल आहे . मी गांधी आश्रमातही वाढली आणि त्यांच्या संघर्षातूनच मी एक निष्कर्ष काढला. ज्योतिबा फुले झाले किंवा इतर जे काही समाजकर्ते झाले, आगरकर झाले, टिळक झाले, ह्या सर्वांच्या संघर्षांमध्ये जी चीड होती ती गोष्ट खरी आहे . जातीयता ही आपल्या देशातली सर्वात भयंकर कीड आहे . म्हणजे कॅन्सरचा रोग आहे . आपण म्हणू ह्याला की याच्यापेक्षा कोड आलेलं बरं पण ती हि जातीयतेची कीड आपण काढली पाहिजे . आणि ही जातीयता यायला सुद्धा कारण पोटभरु लोकांच आहे . आता आपण विचार करा की , जातीयता आली की तुम्ही जन्मापासनचं काय महार झाले नीं जन्मापासनचं तुम्ही हे झाले, हे कसं शक्य आहे जर तुम्ही असा विचार करा की ज्यांनी गीता लिहिली ..कुणी लिहिली व्यासांनी लिहिली गीता? माझ विचारण हे आहे , ज्यांनी जात बनवली त्यांना मी विचारते, व्यास कोण होते ? एका कोळीणीचा पुत्र त्याला बाप नाही, अनाथ ते व्यास. त्यांनी गीता लिहिली, ती वाचून तुम्ही जातीयवाद कसा वाढवता? काय हो ,जाती हा शब्द जो निघाला हा नंतर लोकांनी स्वतःचं वर्चस्व स्थापन करण्यासाठी केला. आपल्या देशांमध्ये अशा तर्हेची जात नव्हती. कर्मानुसार जात होती. चार जाती मानल्या जात असत. पहिली जात जो ब्रम्हाला शोधतो तो ब्राह्मण. वाल्मिकी कोण होता..परत एक कोळी . आज त्याच रामायण डोक्यावर घेऊन बसतात आणि जातीयता करता म्हणजे मला समजत नाही. ह्याचा मेळ कसा बसवायचा ते सांगा तुम्ही . तर हे काहीतरी स्वतःच वर्चस्व करण्यासाठी लोकांनी जन्मापासून जात काढली पण कर्माप्रमाणे जात होती . पहिल्यांदा जात परमेश्वराने ज्या जाती घातल्या त्या आतल्या होत्या बाहेरच्या नाही. आता समजा एक झाडाची जात आहे. आंब्याची जात आहे त्याला आंबा आला पाहिजे . जो मनुष्य ब्रह्म तत्वाला जाणून घेतो, ब्रह्म तत्वात विलीन होतो, तोच ब्राह्मण आहे. अशे किती ब्राह्मण असतील ते माझ्यासमोर या. परवा मी असाच प्रश्न केला ,येऊन माझ्यासमोर अशे अशे करायला लागले . म्हटल हे काय होतंय तुम्हाला मोठे ब्राह्मण बनता हे असं असं कशाला? तुम्ही ब्रह्माला जाणलं आहे ना? माताजी तुम्ही शक्ती म्हणून आम्ही हालतोय हे शेजारचे हलतात म्हटलं जाऊन विचारा कोण आहेत ते . त्यांनी जाऊन विचारपूस केली कळलं की , ते ठाण्याहून पागलखान्यातनं ठीक व्हायला आले . म्हटलं तुम्ही नि ते एकच . काही तुमच्यामध्ये जास्त नाही म्हणून स्वतःला काहीतरी शिष्ट समजून जर कुणी म्हणेल की ,मी ब्रह्म तत्त्वाला प्राप्त झालो आणि मी ब्राह्मण आहे. तर हे अशा सर्टिफिकेट ने ... सेल्फसर्टिफिकेट ने काही होणार नाही . अशे सर्व धर्मामध्ये झाले. आणि आता सांगायचं म्हणजे कि इव्हन शेड्युल कास्ट मध्ये आमच्या ओळखीचे एक गृहस्थ होते. ते चांगले हे होते...जातीचे... काय म्हणतात त्याला, म्हणजे मराठा समजा त्यांना, राजपूत. पण ते स्वतःला शेड्युल कास्ट म्हणून आले, तर मी म्हटलं असं कसं तुम्ही असे कसे शेड्युल कास्ट झाले ? म्हणे आता आय. ए.एस. मध्ये यायचं तर शेड्युल कास्ट झालं पाहिजे म्हणजे आता दुसरी जात काढली आणखी . तर हे अशे संघर्ष चालू ह्या गोष्टी काही ठीक होणार नाही. दुसरी गोष्ट म्हणजे जात ही आपल्या देशात नव्हती . ज्यांनी ब्रह्मकर्म स्वीकार्य केलं ते ब्राह्मण . ज्यांनी युद्धामध्ये परमेश्वराला शोधण्याचा प्रयत्न केला ते क्षत्रिय . आणि ज्यांनी पैशांमध्ये,म्हणजे आपले जेवढे मारवाडी आहेत, ते वैश्य कारण त्यांनी पैशांमध्ये परमेश्वर शोधला. आणि ज्यांनी असा विचार केला की , काही काम पडलं तरी हरकत नाही पैशे कमवायचे त्यांना क्षुद्र म्हटलं . आणि अशा लोकांना उगीचच ज्या लोकांना आपल्याला जबरदस्ती करून काहीतरी वाईट म्हणायचं म्हणून त्यांचं नाव महार करून टाकलं,तसं करून टाकलं . जे शेती करतात ते सगळ्यात मोठं कार्य आहे .शेती उपार्जन करणं , शेतीचे कार्य करण सर्वात उच्च आहे . पण जो आय ए एस चा मनुष्य असला कलेक्टर तो उच्च मानला जातो आपल्या देशात तो तर सरकारी नौकर आहे त्याला तरी माहिती आहे का ? ती नोकराची जात आहे त्याला आपण कलेक्टर म्हणून नमस्कार करतो . आणि जो शेतीचा मनुष्य जो जमिनीत आपलं उपजत कार्य करतो , तो उच्च कार्याला लागलेला आहे . तेव्हा ही सर्व सगळी डोक्याचीच करामत आहे . काहीतरी डोकं चालवून कसं लोकांच्या डोक्यामध्ये धोंडा घालायचा . हे आपल्या देशातल्या लोकांना फार चांगलं येतं . आणि ते अजून चालू आहे कुठेतरी चालूच असणार . आंबेडकरांच्या बद्दल मला अत्यंत आदर आहे . माझे वडील सुद्धा कॉन्स्टिट्यूट असेंब्लीमध्ये मेंबर होते. त्यांनी कॉन्स्टिट्यूशन केलं. अलादीन कृष्ण स्वामी अय्यर ते आमच्या घरी येऊन बसत असत आणि वाद विवाद व्हायचा. तेव्हा माझे वडील म्हणाले की ,असं करूया की , जे लोक आपल्याला फार उच्च स्थितीचे म्हणतात. कारण माझे वडील साधू मनुष्य होते. त्यांना आपण साधू करू. म्हणजे त्यांच्यामध्ये लक्ष्मी तत्व जागृत होऊन ते सगळ्यांची मदत करतील . जसं आता सर्जेराव पाटीलांचा झालं त्यांनी दिलं तेव्हा होईल . आंबेडकरांचं म्हणणं असं होतं तुम्ही काही यांच्या गोष्टी येऊ नका. हे लोक फार दृष्ट आहेत ,लबाड आहेत . जे मोठे मोठे ब्राह्मण वगैरे बनतात ते काही आपल्याला देणार नाही , यांचा आता लढाच केला पाहिजे असं त्यांचं म्हणणं . नंतर अल्लादिन कृष्ण स्वामी अय्यर हे जे त्याचे चेअरमन होते .आपल्याला माहिती आहे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन बनवलं गेलं त्याच्यात सर्वात,सगळ्यात विद्वान मनुष्य म्हणजे अल्लादिन अगदी पक्का संन्याशी तुम्हाला सांगते , दोन धोतरावर राहणारा मनुष्य. त्याचं मी सगळं पाहिलेलं म्हणून सांगते अशी माणसं आम्ही पाहिलीत . तुमचं नशीब नाही चांगलं म्हणून आता हे दुसरच बघतात. पण आमचं नशीब चांगलं आम्ही अत्यंत त्यागी माणसं पाहिलेले आहेत .त्यांचे विशेष सांगितले तर ,तुम्हाला असं वाटेल माताजी कुठल्या गोष्टी करतात आणि त्यात हे जे अल्लादिन होते . ते तर ब्राह्मणांच्या मागे हात धुऊन लागले होते. स्वतः ब्राह्मण असून यांच्या म्हणे सगळ्यांच्या शेंड्या कापा. तेव्हा त्यांच्यामध्ये जी जागृती होती . आणि त्यांना जे वाटायची चीड म्हणजे चीड सगळ्यांनाच वाटली काय आगरकरांना वाटली नाही , का टिळकांना वाटली नाही , काय गांधींना वाटली नाही ,पण प्रत्येकाने आपापल्या तऱ्हेने सर्व गोष्टी मांडल्या .आता जे बुद्धांच आहे ते बरोबर आहे . बुद्धांनी पहिल्यांदा सांगितलं की, बुद्धम् शरणम् गच्छामि ! म्हणजे नुसतं बोलायचं नसतं ते. आधी तुम्ही बुद्ध झाले का? बुद्ध म्हणजे काय पाट्या लावून बुद्ध नाही होत काय हो? नुसते आम्ही ख्रिश्चन म्हणून पाटी लावली आणि बुद्ध म्हणून पाटी लावली म्हणून आम्ही आपण काही बुद्ध होत नाही. बुद्ध झालं पाहिजे.हे बुद्ध बसले तुमच्यासमोर.. ज्यांनी ब्रह्माला जाणलं तो बुद्ध. ज्याला बोध झाला, ज्याला जाणीव झाली तो बुद्ध . ते कार्य आम्ही करतोय ना आता सहजयोगाच आधी बुद्ध होऊन घ्या. दुसरं त्यांनी सांगितलं धम्मम शरणम गच्छामि. म्हणजे धर्म जागृत झाला पाहिजे. सांगितलं की दारू पिऊ नका की हमखास पिणार हे मी बघतेय . लहानपणी सुद्धा आजीबाई होते मी तेव्हापासनं बघते . जे म्हटलं नाही करायचं तेच करायचं ही मनुष्याची प्रवृत्ती आहे बंडखोर . तेव्हा त्याच्यात जर धर्म जागृत केला तर आपोआप सगळं सुटत म्हणून धर्म जागृत करायचा. धम्म शरणम गच्छामि! पण सगळ्यात शेवटलं संघम शरणम गच्छामि ! जे सांगितलेलं आहे बुद्धाचं ते सर्व समजून घेतलं पाहिजे. बुद्ध झाल्याशिवाय होत नाही तुम्ही संघात उतरु शकत नाही . संघ म्हणजे काय ? याला आपण सामूहिक चेतना म्हणतो. त्या सबंध शरीराच्या अंग प्रत्यअंगामध्ये हे बोट किंवा हे बोट वेगळ आहे का . एकाच संघात बांधलेले आहे . तसंच या विराट पुरुषांमध्ये आपण सगळे एक अंगप्रत्यंग आहोत . त्याच्यात फक्त जागृत व्हावं लागतं . जर तुम्ही जागृत झाला तर तुम्ही संघात आले मग काय. मग कोणची जात नी कोणती पात तुमच्या हाताला बोटाला काय वेगळी जात आहे , नाकाला काय वेगळी जात आहे . आणि जर आम्ही ह्या बोटाची मदत केली तर आम्ही काय कोणाची सेवा केली. तर ते आतून झालं पाहिजे .आपण झाडावरतीच भांडत बसलोयत असं मला सगळे वाटायचं लहानपणापासनं . ही सगळी मंडळी झाडावर बसून आपापसात भांडत आहेत, बोलत आहेत , विचार करत आहेत . आता यांनी म्हटलं की काही विशेष होऊ शकलं नाही . त्याला कारण असं की मूळात जाणं . प्रत्येक गोष्टीचं तत्व धरलं पाहिजे . आणि त्या तत्वामधे मुख्य तत्व हे आहे की तुमचा आत्मा हा सर्व विश्वात व्यापिलेला आहे , ते विश्वव्यापी स्वरूप तुम्ही मिळून घ्या . हे आमचं सरळ सहयोग . मग म्हणते कोण ब्राह्मण आणि कोण क्षुद्र सगळे योगीजन झाल्यावरती परमेश्वराच्या साम्राज्यात उतरल्यावरती जातीयता कुठून राहणार . ही सगळे माणसांनी पसरलेली घाण आहे आहो माणूस जेथे असेल तेथे घाण होणारच . तुम्ही आता जाऊन बघा एखाद्या जंगलात एक सुद्धा घाण दिसणार नाही . ते जसचं गाव यायला लागलं बाहेरूनच सुगंध येतो ती माणसं आहेत . जानवर राहतात , साप राहतात सर्व तऱ्हेचे राहतात पण एवढी घाण दिसत नाही . ते गावात आलं की कळत की हो गाव लागलं ते माणसाला सवय आहे . त्याला फक्त डोकं असय जबरदस्त की , कसंतरी जे काही चांगल असेल त्याच काहीतरी अनिष्ट करून टाकायच . बुद्धांच तरी काय भलं केलेल आहे का. मी बघते बुद्ध मार्गी लोकांना तं मला आश्चर्य वाटते. अरे बापरे ! बुद्धाला काय करून ठेवलं . हे जैनांचे , जैनांचे महावीर त्यांचे काय हाल करून ठेवलेत . ते समकालीन एकच गोष्ट करत होते . त्यांचे हाल करून ठेवले . ख्रिस्तांचे हाल करून ठेवले . आपल्या सर्व साधुसंतांनी काय जे काही शिकवलं त्याचेही हाल करून ठेवले . आता जागृत तुम्हीच व्हा . सगळ्यांना बुद्ध करायचं कार्य मी काढलेल आहे . खरा बुद्ध धर्म हा सहज योग आहे ,कारण ह्याच्यात तुम्ही स्वतः बुद्ध होता , तुम्हाला बोध होतो . कारण तुमच्या बोटांमधनं बोध येतो . आणि तुम्ही जाणता तुमचं काय चुकलेलंय , दुसऱ्याचं चुकलेलंय , कसं स्वतःला नीट करून घ्यायचं . आणि एकदा हा जर तुम्ही बुद्ध धर्म तुम्ही घेतला जो आतला तुमचा सर्वांचा आहे . सगळ्यांना कुंडलिनी आहे . कुंडलिनीला जात-पात काही नाही आहे का ? तुमच्या आत्म्याला काही जात-पात आहे का ? फक्त कुंडलिनी आत्म्याचा संबंध जोडून देणे हे एक कार्य आहे . ते झालं की , लक्ष्मीच तत्व सुद्धा जागृत होतं . आता मी म्हणेन मागासलेल्या लोकांना त्रास का आहे ? त्यांच्या त्रासाचं सुद्धा एक तत्व आहे . ते जाणून घ्या . मी सांगते आई आहे म्हणून सांगितलंच पाहिजे . म्हणजे भूत आणि हे सगळे प्रेत विद्या , स्मशान विद्या करून हे धंदे करून आपण आपला सर्वनाश करून घेतललेला आहे मागासलेल्या जातीने ते सगळं सोडल पाहिजे तुम्ही . चेटकं हे ते फार करतात. परवा मला एक भेटले होते मागासलेले . त्यांनी मला प्रश्न टाकला माताजी मग , जर परमेश्वर सगळीकडे एक सारखा आहे तं.. आम्ही अजून एवढे मागासलेले का आहो आधी परमेश्वराच्या साम्राज्यात या , तुम्ही तर इंदिराबाईंच्या साम्राज्यात बसले . हा प्रश्न त्यांना जाऊन विचारा . पण जर मला विचाराल तर तुम्ही आधी परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन मग पहा कशी दरिद्रता राहते . कारण हे एकदा संकट सुटलं , हे जे चेटकाचा प्रकार चालतो आणि हे जे धंदे चालतात आणि त्यात आणखीण ब्राह्मणांची भर आणि म्हणजे हे सगळे उपटसुंभ जाऊन तिथे तुमचे आम्ही भलं करतो चार अंगठ्या आम्हाला द्या आणि दोन रुपये आम्हाला द्या . हे अशेच तिकडे ते पण आहे . हे सगळं जर तुम्ही सगळं सोडलं तर गरिबी पळून जाणार . कारण हे जिथे असेल तेथे ये लक्ष्मी पळते बाहेर . बर परत सांगते पुढची गोष्ट कारण मी सर्व देशात फिरलेली पण आहे पुष्कळ . जातीयता निघून गेली तरी समता येणार नाही ,हे लक्षात ठेवा . समता शब्द वेगळा . आता काय आहे की ज्या ठिकाणी जातीयता नाही परदेशात तिथं काय लोक सुखी आहेत . तिथे काय दूरदशा आहे ते मला विचारा तुम्ही . इंग्लंडला तर नाही पण त्या नुसत्या लंडन शहरांमध्ये प्रत्येक आठवड्यात दोन मुले आई-वडील मारून टाकतात. आता बोला. जातीयता नाही तिथे . आहो जेव्हा दुसऱ्यानां नाही मारू शकत नाही महार बनून तर आता आपल्याच मुलांना मारायला सुरुवात केली म्हणजे काहीतरी बिघडलेलं आहे ना डोकं काहीतरी बिघडलेले आहे . कोणाला विश्वास नाही वाटायचा पण हे तेथे तिथलं म्हणजे स्टॅटिस्टिक्स मध्ये आहे की ,त्या लंडन शहरामध्ये दोन मुलं आई-वडील मारून टाकतात . मी आपल्या डोळ्यांनी बघितल . एवढी एवढी लहान लहान जन्मलेली मुलं दुसऱ्या खोलीत झोपायची आणि कुत्र, मांजर आपल्या खोलीत झोपायची . पाहिले का तुम्ही कुठे . ती मुलं तिकडे मरून गेली तरी चालतील . तुम्हाला विश्वास नाही वाटणार इतके दुष्ट स्वभावाचे लोक आहेत. उठल्यासुटल्या बंदुकानी याला गोळ्या झाड .अमेरिकेत हे सारखं चालतं , आणि चोऱ्यामाऱ्या तर इतक्या की तुम्हाला आश्चर्य वाटेल . आता आम्ही येथे रात्रीचे फिरतो कोणी अडवत नाही काही नाही. तिथे तर अशी रात्रीची फिरण्याची सोयच नाही कुठेच. दिवसाढवळ्या सुद्धा तुम्ही जर हातामध्ये पर्स घेऊन गेले तर ओढून घेतात ,लंडनला सुद्धा . अमेरिकेला तर काय विचारायलाचं नको मी गेले तर साहेबांनी येऊन सांगितलं सर्व दागिने काढून द्या . म्हटलं हे बघा , माझं ते जमायचं नाही कारण देवीचं काम आहे आणि हे सगळे दागिने म्हणजे त्या देवीचे आहेत ते मला काढता येत नाहीत. चोरी कोण करते ते मी बघते पण तुम्ही असं म्हणू नका .मी काही हे काढू शकत नाही की हे देवीचे आहेत . ते अलंकार मला घालवे लागणार जोपर्यंत हे काम आहे . तर अशी तिथे स्थिती आहे. तुम्हाला माहिती नाही. तिथे लोकांना काय काय त्रास आहे. रात्रभर झोपू शकत नाहीत वेडावलेत. पासस्ट पर्सेंट लोक वेडे आहेत . आता बोला तिथं काही जातीयता नाही आहे .मग काय माणसाचा स्वभाव असा आहे की जर त्याला एखाद्या ग्रुपला किंवा एखाद्या समाजाला दाबायची जर सोय ठेवली नाही तर तो घरातच दाबादाबी सुरू करतो. कुठेतरी करणारच तो स्वभाव आहे त्याला इलाज काय . त्याला इलाज असा आहे की , कुंडलीनीच जागरण केलं तर आज्ञा चक्रावरती तुमचा अहंकारच ओढून घेते कुंडलिनी सटाक . तर हे जे कार्य आहे. ते ह्या वस्तीगृहात तुम्ही लहान मुलांना द्या . त्या लहान मुलांना पार करा . जसं पाटील साहेबांनी आपल्या शाळेमध्ये मुलांना पार करून घेतलं तसं तुम्हीही पार करून घ्या. हा खरा आशीर्वाद आहे. आता आपण जे म्हटलं की , पैशाचं सोंग घेता येतं कबूल आहे . पण पैशाचा चीज आपण करू शकत नाही. ते चीज करायला शिकलं पाहिजे . तर एक साधारण आपल्याला गोष्ट सांगते की आमच्या सहज् योगा मध्ये खेड्यातला मनुष्य . आता त्याला मागासलेला कसं म्हणायचं माझा मुलगाच आहे तो . आता म्हणा तुम्ही त्याला मागासलेला . तुमच्या जाती बनलेल्या आहेत तर मी काय करू .अशा जातीचा एक मनुष्य आमच्याकडे येत असत पाटील आहेत ते. फार सभ्य मनुष्य आणि फार गरीब. बरं सहज योगात दान धर्माची प्रथा नाही. आम्ही प्रथा नाही ठेवलीय . पण एका अर्थी दान होतच आहे ते , ते दान होतं . तर तो मनुष्य आमच्याकडे आला तर मी म्हटलं काय करता पाटील . रोजची फुलांचा एक हार घेऊन येता, कसंतरी हो , मी कोणाला तरी म्हटलं बाळ ह्यांच्या कमीत कमी हाराचे तरी पैसे द्या तुम्ही . असं- तसं मला जरास ते कसंसंच वाटलं की हाराचं कशाला माझ्यासाठी आणखीन. इथे एवढे एवढे हार येतात. आणि हे कशाला आपले पैशे घालतात .त तो म्हणाला माताजी माझा प्रश्न सुटला....... कसा ? नाही म्हणजे आता पैशाचा मला काही प्रश्न नाही. असं का, काय झालं काय ?नाही आमची पडीक जमीन होतीनं बाहेर.. मी तिथं ध्यान करतो बसून सकाळचं आणि संध्याकाळी थोडीशी शतपावली करतो तिथे . त काय झालं काय ?अहो, त्या जमिनीत काय गुण आला माहित नाही. एक सिंधी माझ्याकडे आला असं म्हणाला की , ह्या जमिनीची थोडीशी माती घेऊन गेले. ती पुण्यवान जमीन झाली ना तर आमच्या विटा दगडासारखे निघाल्या तर तो तराजूनं तोलुन घेतो . हे लक्ष्मी तत्त्व जागृत झालं आता तुम्हाला तुम्हाला आश्चर्य वाटेल की ,त्या मुलाचा मुलगा ,त्या माणसाचा मुलगा जे जे स्कूल ऑफ आर्टमध्ये म्हणजे जिथे फार श्रीमंताची , माझी मुलगी तेथे शिकली . हजारो तिथे रुपये लागतात तिथे फर्स्ट क्लास फर्स्ट आल्यामुळे स्कॉलरशिप मिळूवन आता शिकत आहेत. हे लक्ष्मी तत्व आधी जागृत करून घेतलं . म्हणून मला कबूल आहे. तुम्ही शाळा घाला ,शिक्षण द्या .पण एक तर त्यांना पार केले पाहिजे. बुद्ध केलं पाहिजे. आणि दुसरं तुमच्या खेडेगावातंन हे जे एक तोटके आणि हे करत फिरतात यांना मात्र तुम्ही काढून टाका . हे परमेश्वराच्या विरोधात आहेत . पैशे बनवण्यासाठी हे जे लोक काम करत असतात. प्रेत विद्या, स्मशान विद्या, भानामती वगैरे ह्या सगळ्यांचा तुम्ही नायनाट करा. म्हणजे लक्ष्मी तत्व जागृत होईल. आणि त्याच्यातले काही आपल्या राजकारणी लोकांच्याही डोक्यात घुसलेले आहेत भूत . हे भुताटलेले लोक आहेत. हे भुताटलेले आहे म्हणून असं होतंय . ह्यांची भूत निघतील हे काही नॉर्मल लोक मला वाटतच नाही ह्यांच्या बोलण्यावरून ह्यांना आधी नॉर्मलाइज करायला ह्यांनाही सहज योगात आणूया . सगळेजण योगिजन होऊया म्हणजे बघा . आता सांगायचं म्हणजे असं की ,आपल्या समाजाच कल्याण ,देशाचं कल्याण ,सर्व विश्वाचा कल्याण करायचं असलं तर आपल्यामध्ये समग्रता यायला पाहिजे. समग्र म्हणजे सगळ्यांच्या अग्राला एकाच दोरीने बांधून घ्यायच आहे . आणि ती दोरी म्हणजे विश्वाची कुंडलिनी आहे. त्या एकदा दोरीत तुम्ही बांधले गेले म्हणजे कसली जात नि कसली पात .सर्व त्या प्रभू परमेश्वराच्या अंगातले अंग प्रत्यअंग झाल्यावरती कोणची जात आणि कोणचं काय . हे आमचं कार्य आहे , तेव्हा बाहेरच्या झाडावरच्या पानांना जोडण्यात काही अर्थ नाही. मुळाला घुसलं पाहिजे आणि म्हणून सर्वात मुख्य सांगायचं म्हणजे असं की , इथे आपण जे वसतिगृह कराल त्यात कुणी मागासलेला म्हणून म्हणायचं नाही . कोणी काही म्हणायचं नाही . कारण याला उगीचच कलंक कसला आला आणि . हे नसते जबरदस्तीचे धंदे आहेत . आणि हे आपल्या देशात ह्या प्रमाणात आहे तिथे दुसऱ्या प्रमाणात आहे. परत आपल्याला अस वाटतं की ,आपल्याजवळ पैशे आले असं झालं म्हणजे आपण फार बरे आहोत तसंही नाहीये हो . ह्या लोकांच्या जवळ एवढे पैशे आहेत. मी परवाच सांगितलं की ,स्विझरलँडला , नॉर्वे आणि स्वीडन तीन देशामधे सगळ्यात जास्त पैसा आहे . आणि तेथे सगळ्यात जास्त लोक आत्महत्या करतात. आता बोला त्यांनाही डोहाळे लागले आत्महत्यचे. काय म्हणाव. तिथले तरुण तरुण मुलं आले मुली आल्या , त्यांच्या हाता मध्ये मला अशी जाणीव झाली की जशी काही प्रेताची स्थिती आहे . मी म्हटलं तुम्ही करता काय तरुण लोक तोंड अशी सुकलेले मेल्यासारखी . मी म्हटलं झालं काय तुम्हाला ?नाही म्हणे आम्ही बसल्या बसल्या हा विचार करतो की आत्महत्या कशी करायची. खायला-प्यायला सगळं ज्याला कशाची ददात नाही त्याची ददात म्हणजे आत्महत्या करणे . तर म्हटलं झालं काय असं काय करता तुम्हाला काय खायला नाही की प्यायला नाही, तुमच्या तुमच्याकडे काय मोटारी नाही कि गाड्या नाहीत ही शिक्षण नाही. सगळं झालं मग नाही म्हणे आम्हाला आनंद नाही मिळाला कारण आम्हाला आनंद मिळाला नाही कोणत्या गोष्टीत म्हणून आम्ही आता आनंदाकडे वळतो. बुद्धाचच उदाहरण आहे ना . सगळं असून सुद्धा तो कशाला गेला परमेश्वराच्या शोधात. तशे हे परमेश्वराच्या शोधात आता स्वतः आत्महत्या करून राहिले. तेव्हा तुम्ही कशाला तितक लांब जाऊन आत्महत्या करून मग परमेश्वर मिळता. आताच मिळून घ्या ना .इतक्या लांबचा रस्ता कशाला . आधी ते लोक ड्रग घ्यायचे, मग ते ते भुतासारखे केस काढून तशे फिरले ,आरडा ओरडा केला , सगळं केलं त्यांनी ,संपलं त्यांचं ते.आता आले सहज योगात आणि मी म्हटल की , एवढं लांबलचक फिरायची काय गरज आहे. इथचं हृदयात च बसलेले आहेत. तुमच्या आत्म्याचे स्थान तुमच्या हृदयात आहे. ते आपण घ्यावं आणि त्याच्या शक्ती पुढे बघा काय ही दरिद्रता आहे काहीच नाही तशीच नष्ट होऊन जाणार . कृष्णानी सांगितलेलं आहे ना कि योग क्षेमं वहाम्यहम्! म्हटलेले आहेनं.. . योग क्षेम वहाम्यहम् ! योग झाल्यावर तो तुमचा क्षेम बघणार पण आधी योग तर घ्या. जर तोपर्यंत त्याचं कनेक्शनच लावलेलं नाही तर त्याचा उपयोग काय. आधी योग घ्या असं मी सगळ्यांना सांगते. मग पुढे बोलू पण योग घेतला अंकुर फुटला की बसले एकीकडे जाऊन. थोडीशी मेहनत एक महिन्याची आणखी करा म्हणजे बघा तुमचं वस्तीगृह बघा काय बघा .या संबंध राहुरीला एक नवीन रूप येणार आहे. आमची हीच मेहनत आहे .आमच्या आईवडिलांच स्थान आहे. आणि त्यांना जरी ते श्रीमंत होते फार आणि सगळं काही घरात असून सुद्धा आणि सगळा त्याग करून सुद्धा एक समाधान त्यांना मिळाल नाही की ,आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. आम्ही एवढी मेहनत केली जेलमध्ये गेलो आम्ही आमच्या मुलांचा सगळ्यांचा त्याग केला सगळं काही केलंपण तरी सुद्धा आमच्या देशाचं काही भलं झालं नाही. पण आमचे पप्पा आमचे वडील जे होते फार साधू-संन्यासी मनुष्य होते . त्यांनी मला सांगितलं बाई तु ज्या कार्यासाठी आली आहेस, ते कार्य फार मोठे आहे. हा महायोग आहे तर तू ते शोधून काढ की, सर्व जनसमाजाला कशा रीतीने योग देता येईल. जर तू ते शोधून काढलसं तर माझ्या जीवनाचं सार्थक झालं. ते तू शोधून काढ त्यांच्या वेळेपर्यंत मी करू शकले नव्हते .पण पण आई जायच्या आधी तिने विचारले झालं का ते ? म्हटलं हो झालं शोधून काढलं ,तिनी आनंदाने प्राण सोडला . तेव्हा जे आम्ही मोठे मोठे लोक पूर्वी पाहून गेले होते पाहिले होते पुष्कळ मोठे लोक झाले , त्यांच्याही पेक्षा तुम्ही मोठे होऊ शकतात फक्त आपल्या आत्म्याला जागृत करून घ्या . ते अगदी सोपं काम आहे त्याला पैशे लागत नाहीत , बिल्डिंगा लागत नाही . जिथे असाल तिथे होईल . हे आधी घेऊन घ्या सरळ आहे ना गोष्ट हे एकदा मिळवून घ्या म्हणजे बघा तुमचं कार्य कसं सुरळीत आणि व्यवस्थित झालं . हाच एक दोष आपल्यात आपल्यामध्ये आहे की अजून परमेश्वराच्या परमेश्वराच्या साम्राज्यात पदार्पण झालेलं नाही .त्याचा आशीर्वाद द्यायचा तर कसा द्यायचा. ज्या झाडाला अजून पाणी लागलेलं नाही ते सुकूनच जाणार म्हणून कनेक्शन हे करून घेतलं पाहिजे संबंध हा जोडून घ्यावा हा आमच्या सहजयोगाचा सरळ धोपट मार्ग आहे. बाकी या मुलांना सुद्धा फार उदारता आहे . हे बाहेरून आलेल्या लोकांना फार उदारता आहे आणि आधीच आम्ही आता आम्ही आता गेलो होतो तिथे कुंडाच्या तिथे काहीतरी व्यवस्था झाली मुलांची शाळेची वगैरे तर मला म्हणतात माताजी आम्ही एक -एका मुलाला आमचं आमचा वारसा करू , ते करतील म्हणा पण त्यांनी काही मोठ धोरण नाहीय माझं ,होईल म्हणजे पैशे मिळतील, शिकले आहो शिकले ले कितीतरी गाढव मी पाहिलेत , शिकून काही शहाणपण येत नाही माणसाला. अगदी महा गाढव असतात आणि हे राजकारणी काही शिकलेले नाहीत का ?त्यांच्यात हृदयच नाहीय ,हृदयचं नाही आहे बघायला की आहो आपल्या शेजारचा हा मनुष्य मरतोय आणि तुम्ही काय गमजा करता आणि पैशे काय खाताय . ते हृदय जागृत व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी म्हणून आमचा सहजयोगाचा कार्यक्रम चाललेला आहे. आम्ही जे काही होईल ते संबंध सगळ्यांच्यासाठी करतोय, आणि ते करणार आहोत. जे काही आपल्याला त्रास असतील ,काय असतील ,नुसतं सांगायची उशीर आहे . पुष्कळाचे इलाज होतात . नुसत ऐकून सुद्धा होऊ शकतात. परमेश्वरच्या साम्राज्यात मात्र आपण या नाहीतर आमचा हात नाही चालत .आमचा हात परमेश्वराच्या साम्राज्यात आल्यावर चालेल. तो आशीर्वाद तुम्ही घ्या की ,परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन बसा आसनावर, आणि मिळवा स्वतःच .तुज आहे तुजपाशी ते घ्या . मग कोण रांजले आणि कोण गांजले . अहो दिवा लावल्यावरती दिव्याला प्रकाश देतो स्वतः.तून दिवा लावण्याची वेळ आहे आणि तो तोपर्यंत आपण मागतो की तेल घाला याला दिवा ठीक करा. . त्याची वात ठीक करा आणखीण करा.आता काही नका करा तुम्हाला तुमचा दिवा मी ठीक ही करते. आणि तेवून घेते. तो तुम्ही तेवत ठेवायचा बस. तुम्हीच देणारे होणार एवढं मात्र करून घ्या जे खरं आहे तत्व , ते एकदा मिळवा हे फार जरुरी आहे. बाकी सगळे मिळवलेले तुम्ही पाहिले नं . काय त्यानीं दिवे लावले ते तेही कळलेलं आहे . तेव्हा आता तुम्हाला खरोखर जर दिवे लावायचे आहेत . तर जे अस्सल आहे ते मिळवल पाहिजे नकला वरती राहू नका .अशी एक अत्यंत प्रांजळ विनंती मी तुम्हाला करते. मी आई आहे जर काही तुम्हाला बोलले असेन तर आईचं वाईट वाटून नाही घेतलं पाहिजे .ती तुमच्या हितासाठी झटते आहे . तुमच्या हितापलीकडे मला काहीही नको जे काही आहे माझ्याकडे ते सगळं तुम्हाला द्यायलाच मी आलेले आहे ते घेऊन टाका म्हणजे मी मोकळी होणार. सर्वांनी मला इथे बोलवलं, भूमिपूजन केलं. आम्हा सर्वांच्यातर्फे तुम्ही जे मागाल ते आम्ही द्यायला तयार आहोत . मला त्यातलं काही समजत नाही विशेष . तेव्हा ते आपण मला कळवावं म्हणजे आमचं काय आहे की जागतिक एक ऑर्गनायझेशन असल्यामुळे त्यांचं काय व्यवस्था आहेत. काय ते त्यांच्या मार्फत सगळं काही होतं ..मला पैशाचं एक अक्षर कळत नाही.. तेव्हा त्यांचं काय असेल ते तुम्ही लिहून कळवा . काय तुमच्या गरजा असतील ते आम्ही तिथनं मग पाठवायचं काय करायचं ते करू पण मला काही महत्व नाही . माझं महत्व आहे , तुमच्यातले किती लोक जागृत होतात नि किती सहयोगी होतात. तर आता मी जशी आलेली आहे. आशीर्वाद स्वरूप सर्वांनी असा हा हात करून बसायचं फक्त आरामात आणि विचार जरा बंद करा.आता तुम्ही असाल राजकारणी.तुम्ही असाल कुठले काही.पण सध्या तुम्ही ही आईची मुलं होऊन बसा . आणि हे घेऊन घ्या तुमचं तुमच्याजवळ जे आहे . तुमच्या आत्म्याच तुम्ही घेऊन घ्या अशे हात करून बसा. त्याला जात पात लागत नाही , काही लागत नाही ,तुमच्या मध्येच आत्म्याच स्थान आहे. ते तुम्ही मिळून घ्या. काय सुमंतराव , नाव तुमचं सुमंत आहे ना सुमंत कोण होते माहित आहे का तुम्हाला , माहित आहे का ? रामाचे सचिव होते. फार मोठं नाव घेतल तुम्ही , काय ? आईने काहीतरी विचार करूनच नाव ठेवलं असणारं . तेव्हा आता तसं काहीतरी करायलाही पाहिजे .अशे हात करून बसा . आहो त्या रामानी भिल्लीणीचे उष्टे बोरं खाल्ले . मी म्हणते भिल्लीणीचे उष्टे बोरं काय तिच्या हातचं जेवण सुद्धा खाणार नाहीत ते गाढव , आहे ना गोष्ट खरी. मी आई आहे म्हणून म्हटले यांनां . त्यांनी भिल्ल्लीणीची बोर खाऊन दाखवली. तरी त्यांच्या डोक्यात प्रकाश नाही पडला तर कसा प्रकाश पडणार ,आत्म्याचच पाहिजे त्याच्याशिवाय इलाज नाही . काहीही करून दाखवलं हो , विदुराच्या घरी जाऊन कृष्णानीं अन्न खाल्लेले आहे. पण तरी सुद्धा लोकांच्या डोक्यात प्रकाश पडला नाही . वेद .... एवढा मोठा गीतेचा सबंध ग्रंथ सुद्धा त्यांनी कुणाच्या हातून लिहविला . तर त्यांना आणखीन कोणी मिळाले नव्हते तर शोधून त्यांनी व्यास काढला कोळीणीच्या .रामायण वाल्मिकी कडून लिहून काढलं परमेश्वरानी . परमेश्वराचा चुकलेलं नाही वारंवार धडे देतोय तुम्हाला . पण मनुष्याच्या जातीला अक्कल नाही येणार, किती धसके बसले तरी तसेच म्हणून आधी पार होऊन घ्या तुम्हीच होऊन घ्या आता बुद्ध म्हणजे झालं . मग मला काही बोलायला नको, कळलं का ? आता अशे हात ठेवा . साधे अशे हात करून बसायचं . आता डोक्यावरती बघा तुमच्या गार येते का ?. ह्या हातानी बघा डोक्यातनं गार निघालं पाहिजे. टोप्या काढून बसा. आईसमोर कोणी टोप्या घालून बसत नाही . काढा टोप्या सगळ्या . टोप्या कशाला आईला . हं ... आईकडे आपण कशे येतो बरं हं ... बघा वर येते का ? डोक्यावर गार गार ? गार आलो पाहिजे डोक्यातनं . ज्या भूमीवर बसला आहात ती भूमी केवढी पुण्यभूमी आहे ते कळेल तुम्हाला .हं ... येते का ? काय हो. आता उजवा हात करा. गर्मी फार आहे. सगळ्यांची गर्मी चढते आणि मग आजार होतात . गर्मी फार आहे डोक्यात. हात उजवा माझ्याकडे करून सगळ्यांना क्षमा करा आता . आधी सगळ्या राजकारण्यांना क्षमा करा . अज्ञानात करून राहिले ते काम हां... आणि ज्यांनी जातीयता पसरवली त्यांनाही क्षमा करा . मूर्ख आहेत ते , कोणी गाढव आहेत कोणी मूर्ख आहेत काय करायचं सगळ्यांना क्षमा करायची आपण समजदारीनी आता बघा येतयं डोक्यावर काय सुमंत राव ? बघा गार आलं पाहिजे हं ... क्षमा करा, क्षमा, डोळे मिटून क्षमा करायची. क्षमा करता येत नाही लोकांना आणि म्हणतात की माताजी क्षमा कशी करायची . अहो पण जर तुम्ही क्षमा नाही केली तर तुम्ही स्वतःला त्रास करून घेतात. दुसऱ्याला करत नाही . हां ... क्षमा करा ,मी क्षमा केली म्हणावं मनानी म्हणायचं पूर्ण मनानी . बघा येतोय का ? तुमच्याच डोक्यातून निघालं पाहिजे . बघा जरा बारीक सूक्ष्म आहे ते ,सूक्ष्म आहे . आपण जडात बसलोय , सूक्ष्म आहे , आलं का ?येतंय .. बघा सूक्ष्म आहे . तुमचं स्वतःचं आहे, हे स्वतःचच आहे बघा ,गार येते का ? आता चारीकडे सुद्धा गारवा वाटेल. हात असा पसरावा आता, आता हात अशे वर करून बघा. आणि विचारा हे ब्रह्म शक्ती आहे का ही परमेश्वराची शक्ती आहे का आई ? असं विचारायचं मला विचारा , ही परमेश्वरी शक्ती आहे का? मनापासून विचारा याचं उत्तर मी देते , ही आहे , ही शक्ती आहे. बघा.. हातात येऊन राहिली तुमच्या . हे चारीकडे जे जिवंत कार्य परमेश्वर करतो , ते आपण बघत नाही. लागलं आता हाताला गार ? झालं ... आता बघा शांत वाटेल आता ह्याच्या नंतर बघा प्रचीती हळू - हळू , काय ? झालं आता बुद्धम् शरणम् गच्छामि म्हणायचं नाहीतर मंत्राला काही अर्थ नाही. तो जागृत नाही. हं ... आता हे जितकयांची नावं घेतले सगळे साक्षात्कारी होते , सगळे साक्षात्कारी . पण त्यावेळेला ही गोष्ट करण्याची करण्याची सोय नव्हती . येतय का ? हातात गार येतय ,काय आलं ? . छान वाटतंय शांत .... तर आता मी सगळ्यांचा निरोप घेते आणि परमेश्वरी कृपेने सगळं तुमचं कार्य सुव्यवस्थित होईल . मुलांची मला पत्ते पाठवा, फोटो पाठवा .. ह्या लोकांची इच्छा आहे की ,इथल्या मुलांना ऍडॉप्ट करायचं मग ते त्यांची व्यवस्था बघतील , प्रेम देतील त्यांना . अशा रीतीने हे लोक करतील आणि आपण त्यांच्या मुलांचे पत्ते आणि त्यांचे फोटो वगैरे पाठवून द्यावे . त्यांनाही पार करावं त्यांची प्रकृती बरी राहील. सर्व रीतीने ठीक होणार. तर आपण बोलावलं त्याबद्दल अत्यंत आपली मी आभारी आणि सर्व सहजयोग्यांच्या तर्फे मी सगळ्यांचे आभार मानते .

Ahmednagar (India)

Loading map...