Public Program

Public Program 1989-12-19

Location
Talk duration
16'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

19 डिसेंबर 1989

Public Program

Aurangabad (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

1989-12-19 India Tour 1989/90: Public Program in Shrirampur

सार्वजनिक कार्यक्रम, (पब्लिक प्रोग्राम)

औरंगाबाद (भारत)

मंगळवार, डिसेंबर १९ , १९८९.

आजचा दिवस म्हणजे फार महत्वाचा आहे. आणखीन औरंगाबादला आलो म्हणजे आपल्या घरी आल्यासारखं वाटतं मला. जवळच येथून पैठण म्हणजे प्रतिष्ठान आहे. इथे आमचे पूर्वज राहिलेले आहेत, ते सगळं आपल्याला माहितीच आहे. पण आज सांगायचं म्हणजे असं, की सहजयोगाबद्दल फार गहन आस्था पाहिजे.

आता येथे ३६ (छत्तीस) देशातले लोक आलेले आहेत आणि त्यांना गणपती कशाशी खातात ते माहिती नाही तिथून सुरुवात. गणपतीचा ग ज्यांना माहीत नाही. ज्यांनी गणपती काय ते पाहिलेलं नाही. त्या लोकांनी इतकं ध्यान धारणा करुन इतकं मिळवलंय आणि इतके गहन उतरले तर आपण किती मिळवायला पाहिजे आणि आपण किती पुढे जायला पाहिजे. पण तस आपल होत नाही.

कारण त्याला रशियाला जाऊन माझ्या लक्षात आलं की रशिया मध्ये हजारो लोक सहजयोगात आले. हजारो लोक. दोन हजार बाहेर तर दोन हजार आत मध्ये हॉलमध्ये. परत दुसऱ्यदिवशी सकाळी या म्हटलं तर चार चे चार हजार परत इकडे आणि त्यांना पार केल्यानंतर ते जमतात. सकाळी उठून शिस्तशीर म्हटलं (अस्पष्ट....) चार ला अंघोळ करायचं. चार ला अंघोळ करून ध्यानाला बसतात पाच वाजता. पाच ते सहा पर्यंत ध्यानाला बसतात, सगळे यच्छेयावत. पण आपल्याकडे तस नाही.

आपल्याकडे सगळ्या कर्माला आपल्याला वेळ आहे. आता बहिणीच्या, मुलीच्या अमक्याच्या - तमक्याच्या लग्नाला जाऊ. अजून आपल्यामध्ये त्याचं हे खूप आहे. म्हणजे कुसंस्कार आहेत हे सगळे. ही माझी बहिण, ती सहजयोगिनी नाही तर ते आपलं काही नातं नाहीये त्याचं.

“हेचि सोयरे होती” म्हणून सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरांनी.

तुमचे सोयरिक ही, ती सोयरिक आता विसरायची. आता तुम्ही सहज धर्मात आलात, ती सोयरिक विसरून आता ही तुमची सोयरिक आहे. ह्या मंडळींना बघा सगळं सोडून तुमच्या सारखे वस्त्र घालून बसलेत इथे. तसचं आपणही आपलं हृदय उघडलं पाहिजे. माझी बहिण अशी. आता कुठे गेलं, की माझ्या भावाच्या आईला, भावाच्या बायकोच्या आईला, अमूक रोग म्हणून हजर पहिल्यांदा सगळा हाच विचार, की माताजींचा कसा उपयोग करून घ्यायचा. अरे, माझा काय फायदा करून घ्यायचा आहे? मला आत्म्याला मिळवायचं, मला आत्म्यामध्ये उतरायचं, माझं स्वतःच उत्थान मला करून घ्यायचं. ह्याच्यात राहिलं काय? बाकी सगळं तर आहेच, त्याला काही अंत नाही.

अमूक झालं, तमूक झालं. नुसते जगावरचे प्रश्न माझ्यासमोर ठेवायचे. मग मला असं वाटतं, की हे लोक देवाला शोधतायत, का काही जगाच्याच काही तरी गोष्टी शोधत फिरतायत आणि सहजयोग वाढायला पाहिजे जो आपला वारसा आहे.

हजारो वर्षांनी जी इथे संत साधूंनी एवढी मेहनत केली नी, ह्या जमिनीत आपलं रक्त ओतलेल आहे, त्या ठिकाणी तर सहजयोग एकदम वाढायला पाहिजे. पण आता एखादा दुष्ट येऊ द्या, भामटा येऊ द्या, पैशे घेणारा येऊ द्या. तुम्ही हजारो येऊन उभे राहतील. ते सत्यसाईबाबाच भूत असलं किंवा कुणाचंही भूत असलं ते पहिल्यांदा त्यांच्या पायावर हजारो लोकं येणार. पण तो देतो काय ते बघा. म्हणे हिरे देतो. अहो, हिरे घ्यायला तुम्ही बाजारात जा. त्याला देवधर्म कशाला पाहिजेअसा. हा काही देवधर्म झाला?

आजपर्यंत कोणत्याही संतांनी किंवा कोणत्या अवतरणानी हिरे आणि हे वाटले होते का आणि तो तुम्हाला देणार नाही तो श्रीमंत लोकांना देतो आणि घेतो त्यांच्याकडंन. मग हा ह्या अशा गोष्टींमध्ये फसून आपण जे आता वाहून चाललोयत ते जरासं सुधारायला पाहिजे आणि तेच मला आश्चर्य वाटतं, की हिंदुस्थानामध्ये सहजयोग तेवढा पसरत नाही. एवढा पसरत नाही.

आता पुण्याला, मुंबईला किंवा म्हणावं तर दिल्लीला बरं चाललंय पण तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांना जाऊन सांगायला पाहिजे, की आता तुम्ही बसलात, कशासाठी, आत्मसाक्षात्कार घ्या. ह्याच्यासाठी सगळा धर्म केला. आजपर्यंत एवढी मेहनत केली. आता याच्यापुढे काय करायचं तुम्हाला, काय मिळवायचं बोलायला पाहिजे. पण आपण आपले लाजतो आणि ते आपल्या गुरूचे झेंडे लावून फिरतात आणि सगळे भामटे आहेत इथून तिथवर. मी सांगते तुम्हाला. सगळे भामटे आहेत. ह्या गुरुंमध्ये मला अस्सल एकही दिसत नाही. असला तर मी स्वतः सांगेन, की आहे म्हणून. पण सगळे इथून-तिथून भामटे आहेत. ते तुम्हाला लुटायला बसलेत. त्यांचा तुमच्या प्रॉपर्टीवर, पैशांवर, बायकांवर, मुलांवर, सगळ्यांकडे नजर. पण तुमच्या आत्म्यावर नजर नाहीये.

तेव्हा तुम्हाला स्वतःचं भलं करून घ्यायचायं ना. कोणत्यातरी गुरूच्या पाठी लागून आपण वाया जाऊ, ही कल्पना सुध्दा तुम्हाला येत नाही. बहुतेक लोकांना कॅन्सरचा रोग हा, रोग ह्या गुरुंच्यामुळे होतो. कारण हे काहीतरी अं प्रेतविद्या, स्माशनाविद्या, भूतविद्या करतात सरळ आणि लोकांना आपल्याकडे आकर्षूण घेतात आणि पैशे काढत असतात सारखे तुमचे. काय, गुरूला तुमच्या पैशाची काय गरज असायला पाहिजे.

आज आम्ही श्रीमंत घराण्यातले, साहेबांची मोठी पदवी म्हणून आम्ही सगळं घालतो. उद्या जर आम्ही गरिबाच्या घराण्यात जन्माला असतो गरिबीत राहिलो असतो. आम्हाला काही त्रास होत नाही कुठे झोपायला. काय, तुम्ही म्हणाल तर मी इथे झोपू शकते. पण ह्यांच लक्ष कुठे आहे ह्याच पाहिलं पाहिजे. अन् असे अनेक गुरू आहेत. तऱ्ह तऱ्हेचे त्याचं एवढं बोकाळलेलं ते, ते गजानन महाराज, केवढा त्रास झाला बाबा, मला त्या माणसाचा. भयंकर त्रास आहे, बुवा काहीही म्हणा. (अस्पष्ट....) फारच वाईट मनुष्य होता. ज्यांनी त्याची पोथी वाचली त्याला काहीना, काही तरी रोग होणार. पन्नास वर्षांपर्यंत तो मनुष्य टिकला तर नशीब समजायचं. आता मी स्पष्टच सांगते तुम्हाला. ह्या आता त्याच्या पोथ्या-बिथ्या आहेत त्या गोदावरीत नेऊन घाला. ज्यांनी त्यांच्या पोथ्या वाचल्या त्यांचे चेहरेच असे होऊन जातात, की विश्वासाचं वाटत नाही. सहजयायोगत येऊन सुध्दा चालू असतं त्याचं. तर, इकडे लक्ष घालायला पाहिजे.

धर्म म्हणजे काय? धर्म म्हणजे आपल्यामध्ये जी धारणा होते. “धरायाती सा धर्मा”, जी आपल्यामध्ये धारणा होते तोच धर्म आहे. आणि ती धारणा काय आहे, तर आपल्यामध्ये दहा धर्म आहेत, ते धर्म आपल्यामध्ये जागृत झाले पाहिजेत. ते कुंडलिनीशिवाय होऊ शकत नाही. उद्या मी म्हटलं तू खोटं बोलू नकोस, तसं जमणार नाही. म्हटलं चोरी करू नकोस, ते जमणार नाही. उद्या म्हटलं, की तू (अस्पष्ट....) करू नकोस, कुणाला दुखवू नकोस तसं जमणार नाही. पण हे धर्म आपोआप आतमध्ये जागृत झाले म्हणजे म् सांगायची गरज काय. आपोआपच घडतं सगळं काही. आपोआपच सुटतं. काही सांगाव लागत नाही. आपोआपच सगळं होतं. कारण तुमच्यात ते धर्म आहेत.

जश्या ह्या तुम्ही पणत्या लावल्यात किंवा ह्या समया लावलेल्या आहेत. तर हया समयाना फक्त जर दीप लावला तर त्यांचा प्रकाश येणारच, की नाही. तसाच तो प्रकाश, पण तो कार्यान्वित होतो. तो नुसता प्रकाश नाही आहे. त्याच कार्य घडतं आणि त्या कार्याने मनुष्याला सशक्तता येते. सशक्त झाला, त्याच्यात ती शक्ती आली, म्हणजे मग तो कोणच्या ह्याला जुमानत नाही आणि केवढा मोठा आपल्याजवळ दान आहे. साधुसंतांच आहे. शिवाजी महाराजांचं आहे. काय पुरुष होता तो. तो पण एक आत्मसाक्षात्कारी महापुरुष होता. तो ही आपल्या इथेच होऊन गेलेला आहे. तेव्हा आपलं तसं आयुष्य झालं पाहिजे, हे शिकलं पाहिजे.

ह्यांच्या पासन काही शिकण्यासारखं तसं विशेष नाही. मी, तुम्हाला सांगते. एकच शिकण्याचं आहे, की ज्यांनी कधी गणपतीला जाणलं नाही, (अस्पष्ट....) कोणाला माहिती नाही, ते एवढे गहन कसे उतरले? तेव्हा ह्यांच्यात काहीतरी गहनता आहे. बाकी जे आपण आपली फॉरेंच्या लोकांचं शिकायला म्हणतो त्यांच्यात काहीच शिकण्यासारखं नाही. त्यांच्या संस्कृतीत काहीही चांगल नाही. सगळा सर्वनाश होतोय तिकडे.

तुम्ही बघाल तर लंडन सारख्या, इंग्लंड सारख्या देशांमध्ये दोन मुलांना एका आठवड्यात आई-बाप मारत असतात. असं म्हणजे त्यांचं हे. आपल्याकडे कुणी मारत का मुलांना. लहान-लहान मुलांना कोंडून मारतात, चिडून आई-वडील. आणि पुष्कळसे मुलं आठ-नऊ वर्षांची मुलं आपल्या आजोबा-आज्जीला मारून टाकतात. कसले भयंकर प्रकार आहेत. रस्त्याने तुम्ही चालले तर तुमची पर्स ओढून घेतील. तुमच्या (अस्पष्ट....). सारखं मारामाऱ्या नुसत्या चाललेल्या आहेत सगळ्या. अमेरिकेत तर तुम्ही जाऊ शकत नाही दागिने घालून. सगळं ओढून घेतील, लुबाडून घेतील. ड्रग्स काय आले त्यांच्याकडे असे घाणेरडे रोग आलेले आहेत. सगळा प्रकार इतका भयंकर आहे. त्यासाठी हे, इथे आले शांतीसाठी.

तर आपल्याला वरदान आहे बरचसं. देवकृपेने आपल्या संस्कृतीमुळे आपल्याजवळ पुष्कळ वरदान आहे. आपल्या वागण्यात, आपल्या समजण्यात पुष्कळ फरक आहे. पण फक्त धर्माच्या बाबतीत आपण कोते आहोत. धर्म कुठे आहे? आतमध्ये तो धारण झाला पाहिजे. तो झाल्याशिवाय बाह्यातले धर्म माणसाने केलेले धर्म आहेत. अहो, देवळांमध्ये सुध्दा काय प्रकार चाललेत तुम्हाला माहिती आहे. मला सांगायला नको. नुसते पैशे उकळायचे आणि आमच्या आता महालक्ष्मीच्या देवळामध्ये मुंबईला तर ते गांजा-बिंजा विकतात. अगदी सर्रास. म्हणजे हे काय? देव झोपी गेलाय काय ह्या लोकांचे राक्षसीपणा एवढा वाढलाय, की तिथून उठूनच गेला. असे प्रत्येक देवळा मधले प्रकार तुम्हाला, खंडोबाच्या देवळाच म्हणाल तर काय आहे. तुमच्या, आपलं विठ्ठलाचं देऊळ आहे, कोल्हापूरला ते काय कमी लोकं आहेत. प्रसिद्ध आहेत. का अस होतंय? लोकं म्हणतील. अहो, तुम्ही देव-देव म्हणता मं असं कसं होतं माताजी. “देव हा आहे”. पण तुमच्या खिशात नाहीये.

तुम्ही जसं म्हणाल तसं देवाला वाकवू शकत नाही. त्याला वाटेल तसं करू शकत नाही, तुम्ही देवाला. “देव हा आहे”, तो जाणून घेतला पाहिजे कसा आहे. तो जाणल्याशिवाय आपण उगीचच प्रत्येक देवळात देव बघतो तसं नाहीये. आहेत आता स्वयंभू आहेत जेवढे तेवढं ठीक आहेत. पण ते खराब करुन टाकले.

माणसाला काही दिलं तरी तो खराब करुन टाकतो. जंगल तसं स्वच्छ असेल, चार माणसं जाऊन राहतील तर घाण होणार. तसचं धर्माचं करून ठेवलेलं आहे. सगळेच धर्म बिघडून ठेवले आहेत आणि त्यामुळे आपल्याला असं वाटतं अनास्था, की हा धर्म कसा म् अशा धर्मात काय करायच. माताजी हे असे लोक आहेत, हे असे दुष्ट आहेत तर कसं काय करता. आम्ही एवढं पारायण केलं. आम्हाला सांगितल आमच्या गुरूंनी तुम्ही पारायण करा, तर आम्ही आजारीच पडलो. असं कसं झालं? अहो, तुमचा अजून परमेश्वराशी काहीही लागाबंधा झालेला नाही. काहीही तुमचा संबंध झालेला नाही. जोपर्यंत ह्याचा संबंध मेनशी झाला नाही, इथे बडबडून उपयोगच काय होणार आहे माझं. तसचं आहे. जर तुमचा संबंध झाला, मग संबंध झालेला आहे म्हणजेच योग.

हाच योग प्राप्त झाला पाहिजे आणि तो योग झाला म्हणजे जे परमचैतन्य सगळीकडे पसरलेल आहे ते तुमच्यातान वाहू लागतं आणि तुम्ही शक्तिशाली होता. पण आधी हे समजलं पाहिजे, की आतापर्यंत आम्ही केलेलं आहे ते काही शहाणपण नव्हतं. तर, तुमचा टेलिफोनशी कनेक्शनचं नाही, तुम्ही टेलिफोन केला, तर त्याच्यात काय शहाणपणा आहे. तसचं आहे, जोपर्यंत कनेक्शन नाही, तेव्हा रामाचं नाव घेतलं तर राम रागवणाराच, की तुझा काय संबंध बाबा, माझा तू कोण होतोस. कळलं ना असा प्रकार आहे.

तेव्हा काही मंत्र-फंत्र काही म्हणत असाल ते सध्या सोडून आधी तुम्ही सहजयोग धारणा करा. मग तुम्हाला कळेल तुम्हाला कोणाचा त्रास आहे. कुठे तुम्हाला तकलीफ आहे. काय आहे ते बघू आणि तसं तुम्हाला व्यवस्थित आम्ही मंत्र सांगू, की हा मंत्र म्हणा. त्याच मोठं ज्ञान आहे. मोठं त्याच शास्त्र आहे. उठल्या-सुटल्या एक मला मंत्र दिला, काय अमका, काय तमका. अरे, काय बघून दिला, की काय असच देतोय आणि त्याला पैसे दिले. गाढव ही देईल ते त्याला कशाला गुरू पाहिजे, मंत्र द्यायला. असा अगदी सांगो-पांग विचार पाहिजे. जर तुम्हाला असे चाणाक्षपणा नसला तर. मूढांसाठी सहजयोग नाही. रामदासांनी सांगितलंय, मूढांसाठी नाही.

रामदासांना विचारलं केवढा वेळ लागतो, कुंडलिनी जागृत करायला केवढा वेळ लागेल. तत्क्षण हा शब्द वापरला आहे. तत्क्षण त्या क्षणीच कुंडलिनी जागृत होईल. पण अधिकारी पाहिजे. अधिकारी असला तर जागृती होणार. अधिकारी नसला तर कधीच होणार नाही. अधिकारी म्हणजे त्या माणसाचा आयुष्य, त्याच वागणं जरी कसही असलं किंवा काहीही असलं तरी पहिली गोष्ट पाहिली पाहिजे, कि हा कुंडलिनीचा जागरण करतो की नाही. जर तुमच्याकडनं तो पैशे उकळतोय, तो काय तुमची जागृती करणार. तो तर तुमचा मिंधा, तुमचा नोकर. तुम्ही (अस्पष्ट....) का कोणाच्या दमावर. तुम्हाला जर म्हटलं येऊन तुम्ही फुकटखोरी करा, तर तुम्ही कराल का? नाही करणार, तर त्याला तेवढा ही मान नाही. फुकटखोरी करून राहतोय. खोट बोलून राहतोय.

तर सत्यावर उतरायला पाहिजे. जर सत्य धरलंय, तर जे सत्य आहे तेच मिळालं पाहिजे, मला असा हट्ट धरायचा. तेव्हाच तुम्हाला सत्य मिळेल आणि वास्तविकता मिळेल. आणि नाहीतर असत्यावर उभे राहिले तर असत्य मिळेल आणि असत्याने तुमचा संतोष होणार नाही. समाधान मिळणार नाही. आणि ज्यासाठी एवढी धडपडाट आहे. ज्यासाठी तुम्ही उपवास करताय, ज्यासाठी ते तुम्ही त्रास उचलले, देवाला टाहो फोडला ते सगळं तुम्हाला दारातच आहे. म्हणून आपल्या हृदयातच आधी परमेश्वर ओळखला पाहिजे. आपल्या हृदयात जो परमेश्वर मिळेल त्यानेच आपण जाणू शकू. त्यानेच आपल्याला सत्य मिळेल. एकमेव सत्य कळेल. सत्य काय आणि खोटं काय. सध्या तरी आपली अशी स्थिती आहे अर्धांतरी.

सध्या आपल्याला जोपर्यंत, आपला परमेश्वराशी संबंध झालेला नाही तोपर्यंत परमेश्वराबद्दल काहीही धारणा करून परमेश्वर होत नाही. परमेश्वराची धारणा तुम्ही करूच शकत नाही. ती आपल्या मध्ये धारणा झाली पाहिजे. परमेश्वर हा असा, परमेश्वर हा तसा, मं त्याला शिव्याही द्यायच्या, साकडी घालायची, की तू, तुझ, मी एवढं केलं माझं का नाही करत. अरे, पण तुझा संबंधच नाही बाबा. परमेश्वराचा काय दोष याच्यात. परमेश्वरानी जर तुमचं काही केलं नाही, त्याच्यात त्याचा काय दोष आहे. तुमचा संबंध नको व्हायला का? तेव्हा आता सहजयोग तुमच्या दारी आलेला आहे. सगळ्यांनी सहजयोग स्वीकारावा आणि त्याचा वरण करावं. इतकचं नव्हे पण तो डोक्यावर धरून सगळ्यांना सांगितलं पाहिजे.

तर पुढच्या वेळेला मला आशा आहे, की तुमच्या अं औरंगाबादला आणखी बरीच मंडळी येते. आता बाहेरून इतके आले. तर इथले गावातले जास्तच पाहिजे ह्यांच्यापेक्षा. आज बघूया संध्याकाळी कसं काय होतंय ते. वाईट वाटून घ्यायचं नाही. कारण आपल्याला कशाचा विश्र्वास असला, की त्याच्याबद्दल कोणी म्हटलं तर फार वाईट वाटतं.

समजा हातात तुमच्या साप आहे. मी म्हटलं बाबा, तुमच्या हातात साप आहे. सोडा, पण अंधार आहे दिसत नाही तर, तुम्ही म्हणाल नाही, साप नाही. दोरच आहे. पण जर प्रकाश आला तरच त्या प्रकाशात कळेल ना, की हा साप आहे. म्हणून, आधी प्रकाश घेतला पाहिजे. तेव्हा सगळ्यांनी पूर्णपणे लक्षात घेतलं पाहिजे, सहजयोग्यांनी सुध्दा, की अजून ज्यांना प्रकाश मिळाला नाही, त्यांना प्रेमाने समजावून वळवून घ्यायचं. त्यांना म्हणायचं बघा आमचा आयुष्य कसं बदलत चाललय. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल सगळ्या गोष्टी पुढ्यात येतील आधी ते मागायच नाही. आधी मागायच आम्हाला प्रकाश दे. आधी आम्हाला परमचैतनन्य दे आणि त्याच्यानंतर सगळं पुढे आहे. जिथे जाल, तिथे अगदी समोर दत्त. काहीही कोणतेही प्रश्न राहणार नाही. सगळं अगदी व्यवस्थित होईल.

तेव्हा तुम्ही कृपा करून सहजयोगामध्ये गहनता प्राप्त करा बाकी सगळं व्यवस्थित होणार आहे. त्या गोष्टींकडे लक्ष देऊ नका. फक्त सहजयोगाकडे लक्ष दया आणि आपल्यातला आत्मा जो आहे तो जागृत झाला, की नाही, त्याची पूर्णपणे प्रचिती आली, की नाही, आपण गहनात उतरलो, की, नाही आणखीन निर्विचारीतेच्या पलीकडे निर्विकल्पतेत आपण उतरलो, की नाही इकडे लक्ष दिले पाहिजे. उगीचच सहजयोग म्हणजे काहीतरी जसं बाजारात जायचं तसं एक सहजयोग असा ज्यांनी केला त्यांना सहजयोगाचा कोणचाच लाभ होणार नाही. गहनात उतरला पाहिजे. वेळ दिला पाहिजे. आजकाल वेळ कमी आहे. पण सहजयोगाला दहा मिनिटं सकाळी, संध्याकाळी दहा मिनिटं, पूर्ण आदराने केलं, की झालं सगळं व्यवस्थित होतं. त्याला काही जास्त करावं लागत नाही. ( जमिनीवर नको बसायला. त्यांना वरती बसायला सांगा, वर बसा, तिकडे बसा, थोडी जागा).

तर एकंदरीत चांगला सांगोपांग विचार करायचा. आपल्याला आयुष्यात काय मिळालंय, आपण काय मिळवलंय. लोकांशी असं बोलायचं का हो, काय मिळालं तुम्हाला एवढं जप-तप केलं, हे केलं. लावून घ्या. चला आईसमोर असं कपाळ घेऊन यायचं नाही. आम्ही काही मानत नाही ते. मानतच नाही. कसलं काय आणि कसलं काय. पुरुषांना वैधव्य येत नाही, फक्त बायकांनाच येत, काही मी मानत नाही. बेकारच्या गोष्टी, सगळी अंधश्रद्धा आहे. आपल्याला ती अंधश्रध्दा ठेवायची नाही. पहिल्यांदा डोळे उघडायचे, प्रकाशात यायचं आणि जे व्यवस्थित ते बघायचं. रूढीगत फार रूढीगत आहे सगळं. त्या रूढींना तोडून टाकलं पाहिजे आणि समजलं पाहिजे, की आपणच त्या ह्याचे, त्या मोठ्या मंदिराचे आपणच खांब आहोत आणि आपल्यावरच तर सगळा आधार होणार आहे.

तर तुम्ही सुरुवातीचे सहजयोगी आहात. म्हणून मी तुम्हाला फारच समजावून सांगितलं पण तुम्ही काही सगळ्यांना सांगत सुटू नका. हळू-हळू त्यांची सुटका करा. नाहीतर जाऊन सांगितल्यावर, की अरे बाबा तू, तुझा गुरू आहे त्याला सोड तर ते तुम्हाला मारायलाच धावतील.

तर शहाणपण (अस्पष्ट....) व्यवस्थित, आरामात समजवून त्यांना सांगायचं, की हे सोडा ह्याने काय मिळालं तुम्हाला? इतक्या दिवस तुम्ही केल तर काय मिळालं? तुमच्या आई-वडिलांना काय मिळालं? आता हे कशाला करता फालतूचं. जे खरं आहे ते (अस्पष्ट....). तुम्ही स्वतःचे गुरू होऊ शकता, मग का नाही करावं. आता आम्ही एवढं कार्य काढलेलं आहे, तर तुम्ही ते करावं आणि स्वीकारावं.

Aurangabad (India)

Loading map...