Public Program

Public Program 1987-12-23

Location
Talk duration
36'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

23 डिसेंबर 1987

Public Program

Akole (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Reviewed

1987-12-23_Sarvajanik Karyakram- Atmyache Darshan_Akole-MARATHI

अकोल्या गावामध्ये जी आत्मानुभावाची प्रगती झालेली आहे त्याला अगस्त्य मुनिंचे आर्शीवाद तसेच लव आणि कुश यांचे गेलेले बालपण आणि श्री सितेची शुभेच्छा सर्वच कारणीभुत आहेत. ह्या महाराष्ट्रात संत साधुंनी फार मेहनत घेतली आहे. ते जिवंत असतांना लोकांनी त्यांना मान्यता दिली नाही. जे धर्ममार्तंड होते त्यांनी त्यांचा छळ केला. आणि जनसाधारणा मध्ये एव्हढी शक्ती नव्ह्ती की त्यांना या छ्ळवाद्यां पासन संरक्षण द्यावे. ती गोष्ट कधी-कधी जिवाला लागुन राहते. ऋषिमुनींच्या वेळेला असला प्रकार नव्हता. पण ह्या कलीयुगामध्ये मोठ-मोठ्या संत साधुंनी फार छळ सहन केला. कारण मानवाला त्यांच्या शक्तीची जाणीव नव्हती , त्यांच्या व्याक्तीत्वाची कल्पना नव्हती. ते केव्हढ मोठ कार्य करत होते त्या बद्धल जाणीव नव्हती , आज त्यांच्याच कार्यावर आम्ही हा सामुहिक सहाजयोग उभारलेला आहे , त्यांच्याच मदतीनी , त्यानींच पेरलेली बिये आज फुलली आहेत आणि त्यावरच आमच काम चालु आहे , तेव्हा त्यांना अनेकदा नमस्कार करुन , माझी आपल्याला अशी विनंती आहे की जे झाल

गेल ते विसरुन जावं आज वर्तमान काळात हया वेळेला ह्या कलीयुगामध्ये जेव्हा सगळी कडे आपल्याला अंधकार दिसतो आहे. राक्षसांचे जसे काही थैमान चालले आहे. कुठे जाव - काय कराव काही कळत नाही , कश्या रितीने या संकटातुन मुक्त व्हाव , सर्व देश त्राही-त्राही करत असतांना , हा सहजयोग आपल्या समोर उभा राहीलेला आहे , एकदा नळाला(नल राजा) कली सपडला , कली सापड्ल्या वर नळानी त्याला असा जाब विचारला कि तु महाद्रुष्ट आहेस , तुझ्यामुळे जगामध्ये परमेश्वरी तत्व नष्ट होतेय , तुझ्यामुळे लोकांची द्रुष्टी भलत्या गोष्टींकडे जाते , त्यांच्या चित्तामध्ये अनेक तऱ्हेचे विकल्प येतात तसेच अनाचार आणि अत्याचार याचा सुळसुळाट होतो. तेव्हा अश्या तुला मी नष्ट का करु नये ?, तु सुध्दा माझा आणि माझ्या पत्निचा विरह घडवुन आणलास आणि नेहमीसाठी आता मी पत्नी शिवाय राहत आहे , तेव्हा मी तुला नष्ट करुन टाकतो , त्या वेळी कलिनी हात जोडुन सांगीतल “ अरे बा नळा तु म्हणतोस ते ठिक आहे , पण आधि माझं महात्म्य ऐकुन घे , जर तुला ते पटल तर मग तु मला सोडुन दे आणि नाहीतर तु खुशाल माझा नाश करु शकतो ” नळाने विचारल तुझ काय महत्व आहे ?, कलिनी सांगीतल “तु म्हणतोस ते खर” , कलीयुगा मध्ये असे प्रकार होतात आणि आता घोर कलियुगात आपण बघत आहोतं , जे काही शास्रां मध्ये वर्णन केलेल आहे ते आज आपल्याला दिसत आहे , इथपर्यंत की लोग उद्दाम पणे अस म्हणतात की “परमेश्वरच नाही” , ज्यांनी परमेश्वराला शोधल नाही त्यांनी अस म्हणण म्हणजे अवैज्ञानीक आहे , मोघम अस म्हणण की परमेश्वरच नाही , हि फार उद्दाम पणाची भाषा आहे आणि त्याला काही अर्थ मला लागत नाही , ज्या संतसाधुंनी परमेश्वराचे इतके गुण गायीले , ते काय सगळ खोटं बोलत होते , त्यानी काय सगळ आपल्याला खोटं सांगितल आहे आणि जे लोग हे सांगतात ते या संतांच्या पायाच्या धुळी बरोबर चरित्राचे नाहीत , या संतांनी जसं आपलं आयुष्य कंठल , जे शुध्द सोन्या सरखे चमकत राहीले त्यांच्या पुढे त्या मिण मीणणाऱ्या लोकांनी अश्या गोष्टी बोलायाच्या , म्हणजे याला निव्वळ मी मुर्खपणा असे म्हणते. तेव्हा कळिने त्याला सांगितल कि “माझं एक महात्म्य आहे कि आज रानावनातून जे लोग परमेश्वराला शोधत फिरत आहेत त्यांना संसारात राहुन , घरात राहुन त्यांच्याच जागी राहुन , परमेश्वर मिळणार आहे , आत्मानुभाव त्यांना होणार आहे ,” अस त्यांनी सांगीतल. भृगुमुनींनी एक फार सुंदर नाडीग्रंथ म्हणुन लिहलेला आहे. हजारो वर्षापूर्वी भ्रुगु संहीता लिहल्या नंतर नाडीग्रंथ हा त्यांनी विशेष करुन लिहिला आणि त्यात वर्णन आहे की कलीयुगा मध्ये सहजयोग येईल आणि परमचैतन्य अवतरीत होवुन सर्वांना परमचैतन्याची जणीव होईल , ति आज वेळ आलेली आहे , ति वेळ आल्यामुळेच हे कार्य साधत आहे , ते पुर्वी का झाल नाही ? आणि आज का होतं आहे ?, प्रत्येक गोष्टिची वेळ यावी लागते , जसं झाडाला दोन-चारच फुल आली तरी आज बहार आलेलि आहे. आज तुम्ही पुर्व पुण्यायीने इथे आलात , जसं नामदेवानी म्हटलं आहे की “ बहुपुण्य केले , पुर्व जन्मी आम्ही बहुपुण्य केले”. तसे तुम्ही पुण्यवान आत्मे आहात , आणि म्हणुनच आत्मानुभावाला आज तुम्ही प्राप्त व्हाल. त्यासाठी मला कहीहि मेहनत करायला नको , दिवे सगळे तयार आहेत फक्त ज्योत पाजळायची , एका दिव्याने अनेक दिवे लागतात. पदेशातल्या लोकांच वैशीष्ठ अस आहे , त्यांना परमेश्वर कश्याशी खातात ते माहीत नाही. त्यांच्या इथे संतसाधु झाले नाहीत. त्यांच्या इथे आदर्श आपल्या साराखे राम आणि कृष्णा साराखे नव्हते , त्यांनी कोणतेही आदर्श पाहिले नाहीत , तरी सुध्दा लक्ष्मी ची पुर्ति झाल्यामुळे त्यांच्या मध्ये महालक्ष्मी तत्व जागृत होऊन. आता याच्या पलिकडे काहीतरी असल पाहीजे , कारण आम्हाला पैश्यामध्ये सर्व वस्तु मिळाल्यावर सुध्दा काहीही आनंद झालेला नाही , त याच्या पलिकडे काहीतरी असल पाहीजे असा एक विचार करुन ते बसले होते , त्यावेळी इथुन बरेच भामटे , कुणी जेल मधन सुटलेले , कुणी चोर , कुणी असे तसे तिथे भगवे वस्त्र घलुन गेले आणि त्यांनी सांगीतले आम्ही फार मोठे गुरु आहोतं , त्यांच्या नादी लागले , ज्या लोकांनी पुष्कळ पैसा यांच्याकडन उपटला , यांना फार त्रास दिला , त्यांच्या आतमध्ये अत्यंत दुःखाची गोष्ट म्हणजे अशी की त्यांच्या कुंडलिनीवर सुध्दा त्यांनी आघात केले , आणि त्यांच्या मध्य मार्गावर सुध्दा त्यांनी आघात केले , त्यांना व्यसने लावली , आणि त्यांची दिशाभुल केली , ही आपल्या साठी फार शरमेची गोष्ट आहे. हे जाणल पाहिजे की कोणिही संतसाधु पैसे घेत नसतात. संतसाधुंना आपण काहीही देउ शकत नाही. तुकारामाला शिवाजीनी भेट म्हणुन दाग-दागीने वस्त्रालंकार पाठवीले , ते सगळे त्यांनी परत केले , की आम्हाला काय आम्ही जसे आहोतं तसेच ठिक आहोतं. तेव्हा दुसऱ्यांचे पैसे घेऊन , दुसऱ्यांच्या वरती उड्या मारणारे संत नाहीत. आता राजा जनक , हा राजा होता , तेव्हा व्यवस्थीत त्या प्रमाणे राहत होता. आम्ही गृहस्थ आहोतं , आम्ही आमच्य गृहस्थाला साजेल अश्या वेशात राहतो. उगीचच काहीतरी ढोंग्यासारखा अवतार घेऊन , आणि लोकांना ठगवण हे परमेश्वराच कार्य नव्हे , अनेक वर्षा पासुन अस कार्य आपल्या कडे होतं आलय. प्रत्येक देशात झालय , प्रत्येक धर्मात झालय , प्रत्येक जातीत झालय , पण अंधश्रध्दे मुळे आपण आश्या गोष्टींना मान देत आलो , काही हरकत नाही , पण आता डोळे उघडे करुन बघा , ज्या दिवशी तुम्हाला आत्मानुभव येऊन त्यात निर्विकल्पता येईल तुम्हाला आश्च्रर्य वाटेल की आपण किती चुकीच्या गोष्टींना मानत होतो , आणि त्या गोष्टीं किती चुकिच्या होत्या. म्हणजे अस की अंधारात बसलेल्या लोकांना रंगा बद्धल काही सांगायच तर व्यर्थ आहे , पण ज्या वेळेला त्यांचे डोळे उघडतात किंवा प्रकाश येतो तेव्हाच त्यांना समजत कि हा रंग कोणचा नी तो रंग कोणता. आत्मानुभावा शिवाय मनुष्याला पुर्णता येत नाही. धर्मांनी फार तर सदाचरण घटित होईल , फार तर पण तरी सुध्दा कोणच्याही धर्मातला मनुष्य मग तो हिंदु , मुस्लमान , ख्रिश्चन कुणिही असे ना का , कोणतही पाप करायला कमी करणार नाही , त्याला मुभा आहे , कोणतही पाप तो करायला तयार बसलेला आहे. तेव्हा कोणच्याहि धर्माची बंधन माणसाला नाहीत , वाट्टेल ते पाप तो करु शकतो , वाट्टेल त्या गोष्टि तो करु शकतो त्याचा अर्थ असा आहे कि त्याच जे नियंत्रण आहे ते बिघडलेलं आहे , आणि ते नियंत्रण त्याच्या मध्ये त्याच्या आत्म्यात आहे , त्याच्या आत्म्याच नियंत्रण त्याच्या मध्ये आहे , आणि ते आत्म्याच जे दर्शन आहे ते प्रत्येकाला झाल पाहिजे. हे झाल पाहिजे म्हणुनच आपण मानव झालात. मानवाला या अतीमनवा मध्ये उतरल पाहिजे. जो पर्यंन्त तो आत्मानुभावाला प्राप्त होतं नाही तो पर्यंन्त कितीही देवाच्या नावाने त्यानी टाहो फोडला , तरी देवाचा त्याचा संबंध नाही , जसा त्या तुमच्या मायक्रोफोन चा संबंध विजेशी होतं नाही तो पर्यंन्त हे व्यर्थ आहे , किंवा तुमच्या टेलीफोन चा संबंध जर झालेला नसला तर त्या टेलीफोन मध्ये काही अर्थ नाही , तसच परमेश्वराचा नुसता धावा करुन परमेश्वर मिळत नाही. फक्त परमेश्वराचा धावा केला म्हणजे मनुष्याचा(चूक सुधारून), मनुष्याला एक प्रकारे आनंद होतो आणि त्या आनंदाने त्याच मन निर्मळ होतं. पण ती पहिली पायरी झाली , ऐवढा सर्व टाहो फोडुन जर परमेश्वर तुमच्या समोर उभा राहिला तर तो परमेश्वर तुम्ही मिळवला पाहिजे. आपल्या समाजा मध्ये जो बेशिस्त पणा आहे , आता हि मंडळी बघा कुठुन आलेलि , कशी व्यवस्थीत बसली आहे , पण तुम्ही सरळ उठुन निघता , तुम्हाला असही कळत नाही कि तुमच्या याच्या मध्ये फिल्लिंग येऊन रहिली आहे आणि अशी उठुन निघुन जाणारे हे लोक किती विचित्र दिसतील याचाही तुम्हाला विचार येत नाही. आपल्या देशाची तशीच फार महती आहे कि बेशिस्त पणा , कोणचीच शिस्त नाही , कुणाचाच आदर नाही , सगळ्यांचा अनादर करणे म्हणजे स्वतःचाच आपल्याला आदर नाही आहे. असता तर आपण प्रतीष्ठित पणे बसलो असतो , हि सगळी मंडळी कशी चुपचाप बसलेली आहे आणि तुम्ही मघापासन मी बघते आहे कि ज्याला वाट्ल तेव्हा उठाव , वाट्ल तेव्हा जाव , त्यांच्या शिस्तीनी त्यांनी सहजयोग मिळवलेला आहे. ज्या लोकांना शिस्त नाही “येडे गबाळ्याचे काम नोव्हे , त्याला पाहिजेत जातीचे” आत्मानुभव नुसता घेतला म्हणुन होतं नाही , कळल का ? आत्मानुभव मिळेल , पण तो टिकवण्याच कार्य फक्त शुरत्वाच आणि विरांच आहे , ते ज्यांना जमणार नाही ते उगीचच आम्हाला आत्मानुभव झाला , आम्ही सहजयोगी झाले अस म्हणुन जर उभे झले तर लोक म्हणतील हेच का ते सहजयोगी , त्यांच्या चेहऱ्यावर तर माशी सुध्दा उडत नाही , हे कसंले सहजयोगी , आत्मानुभव जरी आम्ही आमच्या संकल्पानी आपल्याला दिला तरी सुध्दा त्याची पुढे वाढ करणे , त्याला एका वृक्षा मध्ये रुपांतर करणे , त्या वृक्षा खाली अनेक हजरो भक्तगण तुमच्या खाली येऊन आणि तुम्हाला एक फार आदर्श , एक फार महान आत्मा समजुन ओळखतील , आज तुमच्यातुनच महात्मागांधी , तुमच्यातुनच अब्राहम लिंकन आणि तुमच्यातुनच लेनिन निघणार आहेत. हे आपल्याला जे सामान्य लोक दिसतात त्या सामान्यातुनच असामान्य निघणार आहे आणि ती किमया तुमच्या मध्ये परमेश्वराने आधिच बसवलेली आहे. ती किमया म्हणजे तुमच्या मध्ये परमेश्वराने कुंड्लीनी हि शक्ति ठेवलेली आहे. आता कुंड्लीनी शक्ति आपल्या मध्ये आहे हे ज्ञानेश्वरांनी सहाव्या अध्याया मध्ये उघड करुन सांगितल. गिते मध्ये कृष्णाने सांगितल नाही ते सहा हजार वर्षा पूर्वी , पण ज्ञानेश्वरांनी हे सहाव्या अध्याया मध्ये व्यवस्थीत सांगितलेल असतांना सुध्दा , सहाव्या अध्याय निशिध्द आहे तो वाचायचा नाही अस सांगुन त्यांच्यावरती लोकांनि अंधार टाकला , कारण त्यांना ह्याच्यातल काही गम्य नव्हत. स्वतः ज्ञानेश्वरांना तु एक संन्यासाचा मुलगा आहे आणि बाकी सुध्दा ही सन्याश्याची मुल आहेत म्हणजे ह्यांना काही नैतीक जीवन नाही , अश्या रितीनि सगळ्या लोकंनी फार त्रास दिला. पण जर अस होतं , तर ज्यांनी गीता लिहली तो तर एका कोळीनीचा झालेला मुलगा आहे , आणि त्याच्या बापाचा सुध्दा पत्ता नव्हता , त्यानी गीता कशी लिहली , जे लोक आज गीता वाचुन अशी गोष्ट बोलतात त्याना असा प्रश्न रोख-ठोक केला पाहिजे कि श्री कृष्णाची गीता ज्यांनी लिहली ते व्यास हे सुध्दा सन्याश्याच्या मुलापेक्षा हि बत्तर म्हणजे एका कोळीनीचाच मुलगा होता अस असतांना सुध्दा तुम्ही त्यांना डोक्यावर घेतलेल आहे , तेव्हा त्याच श्री कृष्णानी हे दाखवल कि स्वतः मुलाचा जन्म कसाही असला तरी जो उत्त्मोत्तम आहे , जो उच्च प्रतीचा आहे तोच खरा मानलेला उच्च असा ब्रम्हतत्वाला प्राप्त झालेला ब्रम्हज्ञानी आहे आणि बाकिचे जे लोक स्वतःला धर्ममार्तंड म्हणुन जगा मध्ये पैसे उकळत फिरतात , आणि लोकांना भलत्या मर्गावर घलतात , अश्या लोकांवर कृष्णानी फार मोठी एक टिका केलेली आहे. श्री रामाचे सुध्दा लेखक वाल्मीकी होते , वाल्मीकी आहे का , आपल्याला माहित आहे वाल्मीकी एक कोळी होता , इतकच नव्हे पण तो चोर - दरोडेखोर होता , त्याच्या वरती नारदाची कृपा झाली , त्याचा आत्मसाक्षात्कार होऊन तो मोठा संत झाला आणि त्यानी श्री रामाच चरित्र लिहिलं , ते श्री रामाच चरित्र लिहिलं तो एक कोळी त्याला आपल्या जातीमध्ये आपण म्हणु को तो काही इतका उच्च कोटितला नाही , हे आपल्या डोक्यातल खुळ काढुन टाकल पाहीजे. जो जन्मानी उच्च आहे तो उच्च मुळीच नव्हे. असता तर आजकाल तुम्हाला आश्चर्य वाटेल लंड्नला आमच्या एअरपोर्ट वरती पुष्कळश्या ब्राम्हणाच्या बायका हतात सोन्याच्या बांगड्या घालुन आणि संडास साफ करतात , व्वाटेल ती काम हे करायला तयार आहेत , तेव्हा जातीवरुन जो आपण अर्थ काढतो त्याचा असा अर्थ आहे “जाती म्हणजे आपल्या मध्ये जी एक आवड आहे , आपलं लक्ष ज्या गोष्टि कडे आहे , आपण ज्याच्या मध्ये आनंद मानतो किंवा लहाणपणा पासुन उपजतच आपल्या मध्ये जी आवड आहे त्याला जाती असे म्हणतात” आणि ती जात हि खरी जात आहे , तेव्हा नंतर आपल्या देशामध्ये हे करण्यात आल तर सुरवातीला मनुष्याच्या कर्माप्रमाणे त्याचा जन्म मानल्या जात असे , आता हि किड इतकी जास्त आपल्या देशात आहे कि वारंवार मला आपल्या देशात हे म्हणाव लागत हे मला परदेशात म्हणाव लागत नाही. त्यांच्याकडे आश्या मुर्खपणाच्या गोष्टींला कोणी मान्यता देणार नाहीत , कारण त्यांची बुद्धी तल्लख असते , इथुन जे राक्षस गेले , आणि त्यांनी जे पैसे कमवण्या साठी त्यांना दिशाभुल केली ती दुसरी गोष्ट , पण असल्या तऱ्हेच्या मुर्खपणाच्या गोष्टी जर त्यांना कोणी सांगीतल्या तर ते मुळीच ऐकुन घेणार नाहीत कारण हि इतकी स्पष्ट रुपाने दिसणारी मिथ्यावादी गोष्ट आहे कि त्याच्यावरती आपण विश्वास ठेवायचा कि आपण एका आईच्या पोटी जन्माला आलो तर आपण फार मोठ्या तत्वाला पोहचलो हि फार मोठी गोष्ट-खोटी गोष्ट आहे , हे तत्व मिळवाव लागत , हि एक स्थिती आहे जसं एक मानव देह धारण करणे हि एक स्थिती अहे , मानव देहामध्ये जो आला , त्याला जर म्हटलं कि तु कुत्रा आहेस तर तो कुत्रा होईल का ? तो मानव देही आहे , किंवा त्याला म्हटलं कि तु घोडा आहेस तर तो घोडा होईल का ? हा मिथ्यावाद आहे , तसच कोणत्याही माणसाला जर म्हटलं कि तु ब्रम्हज्ञानी आहे तर तो ब्रम्हज्ञानी होईल का ? ब्रम्हज्ञान हे मिळायला पाहिजे आणि ब्रम्हाच ज्ञान हे आत्मानुभवान मिळत हे आपल्या सर्व संतसाधुनी सांगितल आहे आणि इतकच नव्हे पण प्रत्येक धर्मात हे सांगितलेल आहे कि आत्मानुभव मिळवला पाहिजे , मोहम्मद साहेबांनि सुध्दा हेच सांगितलेल आहे , तुम्हाला आश्चर्य वाटेल कि जगातले जेव्हढे संतसाधु आहेत तेव्हढे तुम्ही झाडुन बघा जे खरे आहेत , ते खोट्यांच्या गोष्टि नाही मी सांगत म्हणजे खोटे म्हणजे तुम्हाला सांगितलं इथ रामाची मुर्ती आहे ते खोदा तर रामाची मुर्ती मिळेल , याला कश्याला संतसाधु पाहिजेत , अहो तुम्हीच गाढून ठेवल्या असतील रामाची मुर्ती किंवा वरुन काहीतरी अस काढुन दिल अं ... हिरा काढुन दिलात झाले , आहो हिरा काय तुम्हाला बाजारात मिळतो आणि हिऱ्यानी काय होतं , आजपर्यन्त कोणी संतसाधुनी हिरे-बिरे वाटले नाहीत , ह्या असल्या नसत्या सिध्यांवरती तुम्ही भाळून आपल्या धर्माला मुकू नका. कारण तुमची स्थीति अशी आहे कि आज नुसतं साडेतीन किंवा चार फुटाच्या प्रवासात तुम्ही आपल्या आत्माच्या अनुभवात येतात , आत्म्याचा अनुभाव म्हणजे फार मोठी गोष्ट आहे , प्रथम म्हणजे आई मुलाला काही द्यायच असल तर आधी त्याला काहीतरी गोड देते तस त्याचा गोडपणा पण सांगते , सर्व प्रथम आत्मानुभावानी तुमच्या तब्बेती ठिक होतात , तुमची प्रकृती ठिक होते , तुमचं वार्धक्य जात , तुमच्या कपाळावर असलेल्या आठ्या जातात , तुम्हाला अदम्य शक्ती येते आणि तुम्ही कितीही कार्य केल तरी तुम्हाला थकवा येत नाही , तुमच्या चेहऱ्यावर थकवा दिसत नाही , तोंडाची कांती तजेल्याची होते , आता मी हे साधु-संत जे आजकाल फिरता आहेत त्यांचे चेहरे म्हणजे बघून मला अस वाटतं कि अहो लोक निदान यांचे चेहरे तरी बघू देत . चेहरे बघून तरी ओळखल पाहीजे कि ह्या माणसावरती काही प्रकाश तरी आहे का ? कसं म्हणतो हा मग ब्रम्हज्ञानी आहे ? नुसतं चार पुस्तक वाचुन ज्यानी बड्बड केली तो ब्रम्हज्ञानी कसा असु शकतो ? पुढे हि एक छोटीशी गोष्ट आहे , पण फार सहज घटित होते , म्हणजे पुष्कळसे रोग , जे रोग सहसा डॉक्टरांच्या हातून ठिक होतं नाहीत ते बरे होतात , त्यासाठी आता दिल्ली युनिव्हर्सिटी मध्ये लोकांनी असा विचार केला कि हे चमत्कार काही समजले नाहीत कि श्री माताजी नुसतं हात लावुन लोकांना कसं ठिक करतात किंवा माताजिच्या फोटो वर लोक कसे ठिक होतात , म्हणजे आपल्या इथले एक प्रेसिडेंट होते , ते सुध्दा या सहजयोगाने ठिक झालेत , त्यांच नाव संजिव रेड्डि , आणि त्यामुळे त्या लोकांनी असा विचर केला कि याच्यात कहीतरी विशेष असल पाहिजे , आणि हा अपला वारसा आहे , तेव्हा कुंडलिनी जागृति कशी होते आणि त्याने काय कार्य होते यासाठी त्यांनी एक अनुसंधान रिर्सच म्हणुन एक मोठा उपक्रम काढलेला आहे , आणि आता एका डॉक्टराला त्यांनी पि एच डि ची पदवी दिलेली आहे , तसेच अनेक डॉक्टरांना याची पदवी मिळणार आहे , ह्या रोगांच्या दुर करण्या साठी तुम्हाला काहीही पैसे खर्च करावे लागणार नाही , कोणत्याही डॉक्टर कडे जाव लागणार नाही , घरी बसल्या तुम्ही ठिक होऊ शकता पण तुम्ही आधी समजुन घेतल पाहीजे कि तुम्हाला रोग कोणचा आहे , त्यासाठी जे लोक परमेश्वराला प्राप्त झाले आहेत , ज्यांना आत्मसाक्षात्कार झालेला आहे , त्या लोकांच्या हातातुन चैतन्य वाहत असत आणि हे पाच आणि सहा आणि सात चक्र उजवीकडे आणि पाच आणि सहा आणि सात डावीकडे असे चक्र जी आहेत त्या चक्रांमध्ये कोणचा त्रास आहे तो तुम्हाला लगेच लक्षात येतो तुमच्या बोटांवर , मग ते ठिक कसं करायच हे जाणल पाहिजे , ते ठिक करण्याची जर तुम्हाला क्रिया समजली तर तुम्ही स्वतःच ठिक होऊ शकता , आणि दुसऱ्यांची कुंडलीनी जागृत करुन त्यांनाही ठिक होण्याचा मार्ग सांगु शकता , तुम्हाला त्यात हात घालण्याची गरज नाही , आमच्या फोटोलाच वाटल तर तुम्ही वापरु शकता , आणि ते वापरुन तुमच्या तब्बेति एकदम ठिक होऊन जातात , तसच पुष्कळसे लोक ज्यांच्या मध्ये एक तऱ्हेची बाधा आलेली , ज्या मुळे त्यांच्या मध्ये वैमनस्य आलेल आहे किंवा त्यांच्या मध्ये कैवल्य आलेल आहे , इथे त्यांना अस वाटतं की जगात काही करु नये , आता आत्महत्या करावी , मरुन जाव , त्यापलीकडचे लोक जे म्हणजे वेड्या सारखे वागतात , त्यांची बुध्दी चालत नाही , अश्याही लोकांवर सहजयोगाचे प्रयोग करुन पाहिलेत , तर त्यांचाहि फार फायदा झालेला आहे , आणि असे पुष्कळसे लोक सन्मार्गाला लागले , हे लोक जे इथे आलेले आहेत ह्यांच्या देशामध्ये अनेक तऱ्हेचे रोग लोकंना होतं आहेत , इतकच नव्हे पण या लोकांमध्ये व्यसन पुष्कळ होती , ती व्यसन एका रात्रित सोडुन हे उभे झालेत , कारण ह्यांची इच्छा शक्ती फार जबरदस्त आहे , आपली इच्छा शक्ती इतकी जबरदस्त नाही अस मला वाटत , कारण अजुन एका रात्रित व्यसन सुटत नाही लोकांची , सुटतात , आता सहजयोगाची हि स्थीती आहे की जर कुणाला म्हटलं की माचिस द्या त कुणाजवळ माचिस नाही , कारण कोणी सिगरेट, विडीच पित नाही , कुणी तंबाखु खात नाही , कुणी दारु पीत नाही , आपोआप सुटल मी काही सांगत नाही तुम्हाला अस करु नका तस करु नका , अस म्हटलं त आर्धि माणस उठुन जातील , पण ऐकदा तुमची कुंडलिनी जागृत झाली म्हणजे तुमच्या लक्षात येत अरे बाबा आमच्या हातात हा साप होता सोडा याला , ते दिसु लागत आणि ते दिसल्या बरोबर तुम्ही आपोआप ते सोडुन टाकतात तर हि दशा तुमच्यात यावी , ही स्थीती तुमची व्हावी आणि तुम्ही समर्थ व्हाव , समर्थ म्हणजे तुमच्या मध्ये जो अर्थ आहे जे तुमचं तत्व आहे त्याला तादात्म्य याव एकाकारीता यावी म्हणुन हि कुंडलिनी तुमची सारखी वाट बघत आहे , कि मी कधी माझ्या मुलाला , ही प्रत्येकाची व्यक्तिगत आई आहे , मी कधी तिला जागृती देते , याला जागृती देते आणि त्यामुळे त्याच कल्याण कसं होतं , आत्मानुभव म्हणजे जी एकेकाळी फार कठिण गोष्ट होती , त्यासाठी अनेक मेहनत करावी लागायची , ती आज अगदी सोपी झाली आहे , सहजयोगा मध्ये “आधि कळस मग पाया” आधि कुंडलिनी आम्ही उचलुन देतो , त्याच्या अंधुक प्रकाशातच का होइना तुम्ही स्वतःच वैगुण्य बघू शकता , उद्दा जर तुम्ही म्हटलं माताजी तुमच्या साडिला काही लगलेल आहे आणि मला दिसत नसल तर मी म्हणेन उगीचच अस कशाला म्हणतात तुम्ही , उद्या मला दिसु लागल्यावरती मी म्हणेन कि बरोबर आहे आणि मला नको ति घाण , अस म्हणुन मनुष्य ती सोडुन टकेल , म्हणजे जे आपण ज्याला पाप पाप म्हणतो त्याची आपल्याला घाण येऊ लागते , जसं एखद्या घोड्याला किंवा कुत्र्याला कोणच्याहि गल्लितन काढायच त सोप काम आहे कितिही घाण असे न का पण माणुस जाउ शकत नाही तिथे , तसच जेव्हा मनुष्य या उच्च स्थीतिला पोहचतो तेव्हा तो पापाच्या घाणितन जायला नको , त्याच्याकडे बघायला नको , तोंड फिरवुन निघुन जातो , आज (श्री माताजी एका सहजयोग्याला “मागे कोण बोलतंय,” ) अकोल्याच्या या पुण्यभुमी मध्ये आपला जन्म झाला आणि ह्या परिसरात काहीतरी विशेष असल्या शिवाय एकतर महाराष्ट्रच फार मोठा पुण्यवान कि जे श्री रामाला आणि सितेला सुध्दा आपल्या वाहना काधुन घ्याव्या लागल्या एव्हढा पुण्यवान हा महाराष्ट्र आहे त्याच नाव महाराष्ट्र कधी पडल हे लोकांना माहित नाही , हा महाराष्ट्र आहे , आणि या सबंध राष्ट्रा मध्ये हा महाराष्ट्र आहे , आणि या महाराष्ट्रा मध्ये आपला जन्म झाला तेहि अगस्त्य मुनिंच्या या परिसरा मध्ये या पुण्यभुमित आपला जन्म झाला त्याला कहितरी कारण असली पाहिजे तेव्हा हि प्रगती बघूनच हे सिध्द झालेल आहे , माझी फक्त हिच एक कळकळीची विनंती आहे कि आत्मानुभव हा घडेल या बद्धल शंका नाही मला कारण आपली आतुरता बघून मला कळलेल आहे कि हे घडणार आहे , आणि होणार आहे , आपली शांतता बघून विशेष रुपानी मला अस वाटतं कि हि गोष्ट होणार आहे , हे आपल्याला मिळणार आहे , याच दान आपल्याला मिळणार आहे , सर्विकडे व्यापलेली ही परमेश्वराची हि प्रेम शक्ती , हि त्याचि जी ब्रम्ह्शक्ती आहे ती तुमच्या हाती लागेल , ति सुक्ष्म रुपात आहे आणि ती सुक्ष्मता तुमच्यात आल्या बरोबर ती तुम्हाला जाणवेल , ह्या बद्धल मला शंका वाटतं नाही , पण विनंती अशी आहे कि आज मी आपल्या जवळ आहे आणि उद्द्या मला दुसऱ्या देशी जाणे आहे , जसं या लोकांनी एकदा बी रोवल्यावर , त्याच रोप आल्यावर मेहनत करुन स्वतःला एक-एका वृक्षा सारख उभं केलेल आहे , तसा आपल्यालाही अनुभव आल्यावर आपण सुध्दा आपल्या आत्मसाक्षात्कारात पुर्ण आदर करुन , स्वतःचा आदर करुन , आम्ही ह्या कलीयुगा मध्ये विशेष रुपाने आलेलो आहोतं , आम्हाला विशेष कार्य करायच आहे , असा विचार करुन ह्या नव्या क्रांतीमध्ये भाग घ्यावा , आणि ह्या आत्मस्वरुपाला प्राप्त व्हावे , हि गोष्ट सहज , सरळ , अत्यंत सरळ झालेली आहे , असेल कि आमची काहीतरी कीमया असेल , किंवा आम्ही कहितरी असु , जे असेल ते असेल , त्या बद्धल आपण काळजी करु नये , तुम्ही काय आहेत ते एकदा जाणुन घ्या , तुमच्या मध्ये किती शक्त्या आहेत , तुमच्या मध्ये किती संपत्ती आहे , तुम्ही किती गौरववान आहात , ते सगळ गौरव जाणुन घ्या , आणि त्याच्या नंतर मग आम्ही कोण ते समजेल , म्हणुन आधी स्वतःचा गैरव , स्वतःच मोठेपण , स्वतःच थोर हृद्य हे आपण जाणल पाहिजे , हे सगळ आपल्या मध्ये आहे , सबंध ज्ञानाच भंडार आपल्या मेंदुमध्ये आहे , पण तिथ अजुन तेवढा प्रकाश नाही , पुस्तक वाचायची गरज नाही , काही जाणायची गरज नाही , डॉक्टर व्हायची गरज नाही , आपोआप सगळ घटित होतं , आणि तुम्ही अत्यंत ज्ञानवान ब्रम्ह्ज्ञानी होवुन या जगा मध्ये एक विशेष स्वरुपाचे अत्यंत महान जीव होता ,

परमेश्वर आपण सर्वांना आशिर्वादीत करो

मी एक आई आहे आईला इतक काही हृद्या पासन वाटतं ते सांगता येत नाही , आई जिच्या हृद्यामध्ये कितीही असल तरी ते शब्दात ओतुन सांगता येत नाही , तिच्या प्रेमाला ति कश्यामध्ये ओतुन देइल , ते तिला समजत नाही , अश्या या परिस्थितीत मला जसं समजल , तुमच्या हृदयाच्या गोष्टि जश्या समजल्या , तश्या मी तुम्हाला प्रेमानी सांगीतलेल्या आहेत काही तुम्हाला अस वावग वाटल किंवा चुकिच वाटल तरी सध्द्या त्याचा विचार करु नये , आपलं चुकल आहे किंवा नही ते सुध्दा समजण्या साठी आत्मानुभव हा मिळवला पाहिजे , खरोखरच इथ अगस्त्य मुनी होते किंवा नाही हे सुध्दा सिध्द करण्यासाठी आत्मानुभव पाहिजे , स्वयंभु परमेश्वर कुठे आहे हे जाणण्या साठी सुध्दा आत्मानुभव पाहिजे , कारण आत्मानुभवा शिवाय तुम्हाला केवल सत्य कळणार नाही , आजकालच्या जगामध्ये हे सत्य कि हे नाही , हे खोटं कि खर , हि अशी परीस्थिती असतांना केवल काय सत्य आहे ते फक्त चैतन्य मिळाल्यावरच होतं , कारण चैतन्य तुमच्या हातातुन वाहुन तुम्हाला त्याच इंगीत येत इशारा येतो कि हे ठिक नाही आणि हे ठिक आहे , क्रुपा करुन आपली शक्ती आपण मिळवावी , हि मला आपल्याला विनंती करायची अहे , परमेश्वर आपल्याला पुर्णपणे या कार्यात घेण्यास तसेच आपल्या साम्राज्यात आमंत्रण देण्यास तत्पर आहे , त्याच्या साम्राज्यात आपण यावे आणि खुशाल रमावे हिच परमेश्वराची इच्छा आहे आणि ते झाल म्हणजे आम्ही आनंदाच्या डोहि जे काही वर्णन केलेल आहे , ती होण्याची वेळ आली , जि पसायदानाच वर्णन आहे ति होण्याची वेळ आलेली आहे , त्याच सगळ सार्थ होण्याची वेळ आलेली आहे , तेव्हा क्रुपा करुन या वेळेचा पुर्ण उपयोग घ्यावा , आणि त्याच्यानंतर त्याची वाढ , त्याचा अनुभव हा जाणला पाहिजे. पुष्कळदा पहिल्या प्रोग्राम ला पुष्कळ लोक येतात , आणि नुसते बाजार-गुणग्या सारखे राहुन त्यानंतर त्याचा काही उपयोग नाही , तब्बेती बऱ्या होतात कोणाला लक्ष्मी तत्व मिळत पैशे मिळतात हे मिळतात हि सगळी प्रलोभन आहेत , त्याच्या पलिकडे याच्यामध्ये तुमच्यामध्ये एक तऱ्हेची गुरुचीशक्ती यायला पाहिजे , तुम्ही सगळ्यांचे जसे काही स्वामी व्हायला पाहिजे , आपले हि स्वामी आणि सर्व शक्त्यांचे तुम्ही स्वामी झले पाहिजेत तरच म्हटलं पाहिजे कि तुम्हाला सहजयोगाचा लाभ झालेला आहे ,

आता आपण सगळ्यांनी असे हात करुन बसाव , दोन मिनीट टोप्या उतरुन ठेवा कारण ब्रम्ह्ररंध्र छेदाव लागत , त्याच्या मुळे दोन मिनीट फक्त असे हात करुन बसायच

आता लक्ष ठेवा

शंकराचार्यांनी वर्णन केलेल आहे सलिलम-सलिलम थंड थंड अस चैतन्य लागत , ते तुम्हाला कुणी सांगितल नसेल , या सर्व गोष्टि कोणी तुम्हाला सांगितल्या नसतील , त्या सर्व मी तुम्हाला उघड करुन सांगणार आहे

आता डावा हात माझ्याकडे असा करायचा

आणि उजवा हात डोक्यावर ,

या ठिकाणी इथुन

मान थोडिशी खाली घालायची , आणि या ठीकाणी बघायच की डोक्यातुन काही गार गार येतांना वाटतय का , आतुन आपल्या आतुन या ब्रम्ह्रंध्रातुन म्हणजे जिथे तुमची टाळु होती , त्या तिथुन तुम्हाला काही गारगार येतांना वाटतं का ते बघा , डावा हात माझ्याकडे करा आणि उजवा हात कुणाला जवळुन येइल , कुणाला दुरुन येइल आता उजवा हात माझ्याकडे करा.

आणि डावा हात डोक्यावर व्यवस्थीत असा ठेवायचा , वरती बघा , कुणा-कुणाला वर , फार वर अधांतरी, अधांतरी ठेवायचा , आता परत डावा हात माझ्याकडे , सगळ्यांनी करुन बघायच , आज हि संधी फार मोठी आहे हे देणार कार्य जे आहे , ते तुमच्याच हातात आहे , मी किती देउन तरी तुम्ही मिळवल पाहिजे , मान खाली घाला , आणखीन बघा , इकडे बघा कि जर इथुन या टाळु मधुन गार-गार थंड वारा येतो आहे तर हा चैतन्याचा किंवा आपण अस म्हणु कि कुंडलिनी ही ब्रम्हरंद्र छेदुन बाहेर असा गार वार सोडत आहे

आता दोन्ही हाता आकाशाकडे करायचे मान मागे घालुन एक प्रश्न मला करायचा “ श्री माताजी हि ब्रम्ह्शक्ती आहे का ? ”

मनात म्हणा

“श्री माताजी हि ब्रम्ह्शक्ती आहे का ? ”

श्री माताजी हि चैतन्यशक्ती आहे का ? ”

श्री माताजी हि परमेश्वराची प्रेम शक्ती आहे का ? ”

सर्वव्यापी परमेश्वराची हि सर्वव्यापी प्रेम शक्ती आहे का ? ”

असा प्रश्न विचरायचा

तीनदा विचारा हा प्रश्न

आकश सुध्दा उजाडलं , बघा आकाशात सुध्दा प्रकाश आलेला आहे

Just see the sky, its lighted up, its light in the sky

आता बघा हातात गार येतय का ?

आता तुमच्या कडूनच मला गार यायला लागल

आता ज्या लोकांच्या हातामध्ये गार आल किंवा टाळुमधुन गार आल असेल अश्या सर्व लोकांनी दोन्ही हात वर करायचे , मला बघायच आहे

(जमलेले सर्व लोक टाळ्या वाजवतात)

सगळ्यांची सामुहिक जागृती झाली ,

जागृती झाली ,

आता हि जपुन ठेवायची

जपुन ठेवा

जसा दिवा आत्ताच पेट्लेला आहे.

तो जरा जपुन ठेवावा लागतो

व्यवस्थित बसला पाहिजे

संभाळून ठेवल पाहिजे

आणि त्यानंतर त्याची किमया बघत रहावी ,

परमेश्वर कसा हातो-हात तुम्हाला ठेवतो

तुमचं कसं संरक्षण करतो , ते बघितल पाहिजे

परदेशी पाहुण्यांनी आपल्या साठी फार सुंदर माझे फोटो आणलेले आहेत , आणि त्या शिवाय सगळ्यांना निमंत्रण आहे कि सात दिवसांचा आमचा फार सुंदर सेमिनार गणपतीपुळ्याला आहे त्या साठी आपण सर्वांनी यावे , तिथे जशी व्यवस्था होईल तशी करु , आणि फार जास्त काही खर्च सुध्दा नाही आहे , जा लोकांना येता येइल त्यांनी अवश्य यावे , आणि सगळ्यांना हृद्या पासुन आमंत्रण आहे

Akole (India)

Loading map...