Public Program in Shri Ram Temple

Public Program in Shri Ram Temple 1984-03-07

Location
Talk duration
50'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

7 मार्च 1984

Public Program

Sri Ram Mandir, Phaltan (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

Public Program in the Shri Ram Temple (Marathi), Phaltan near Satara, Maharashtra (India). 7 March 1984.

फलटणच्या सर्व सात्विक भाविक साधकांना आमचा नमस्कार! आज हृदयापासून तुमची क्षमा मागते, पण माझा काही दोष नाही हे लक्षात ठेवलं पाहिजे. तुमच्याही पेक्षा जास्त उत्कंठतेने तुम्हाला भेटण्यासाठी धावत येत होते, पण रस्ते महाराष्ट्रातले कसे आहेत त्याचा अनुभव येतो. त्यात रस्त्यात इतके अपघात झालेले की जीव नुसता अगदी घाबरून जातो. मग कुठे जर गाडी तुमची फेल झाली तर रस्त्यात एक दुकान नाही की एक जागा नाही की कोणी मनुष्य नाही की ज्याला म्हणता येईल की 'बाबा, आमच्या गाडीला एक वस्तू पाहिजे ती दे.' ही आपल्या देशाची खरोखरच हलाखीची स्थिती आहे. आणि त्यामुळे कुठे टेलिफोन नाही की तुम्हाला कळवायला की कसं पोहोचायचं? कसं झालंय. म्हणजे फार परिस्थिती अजून सुद्धा अशी आपली झालेली नाही की जिथे आपण कधी म्हणू की आम्ही यावेळेला पोहोचू, त्यावेळेला पोहोचू, पाहोचले तर नशीब! आदळत, आपटत. एका शरीरात जर पोहोचले (काहीही इजा न होता) तर स्वत:ला मानायचं की बाबा पोहोचलो! पण अशा परिस्थितीत सुद्धा भारतीय जीवन पुष्कळ सुखी आहे. आणि लोकांमध्ये एकतऱ्हेचे समाधान, शहाणपण आहे. कारण अजून आपण आपल्या धर्माला जागून आहोत. जर अशी स्थिती परदेशात कुठेही असती, तर लोकांनी सगळ्यांना उडवून दिलं असतं. एकही रस्ता असा असता तर सगळ्यांनी उडवून दिलं असतं. पण आपल्या देशात लोक समाधानी आहेत आणि जसं असू दे बाबा, परमेश्वराचं नाव घेत असतात. आज इतके एकानंतर एक प्रश्न आले की त्या प्रश्नांना ठीक करता करता शेवटी मी फलटणला जाते की नाही अशी सुद्धा मला शंका आली होती. आजचा विषय 'सहजयोग आणि कुंडलिनीची जागृती' असा आहे. तुम्ही कुंडलिनी हा शब्द ऐकलेला आहे. जे लोक सुशिक्षित आहेत, ज्यांना आपल्या भारतीय संस्कृतीचा अभिमान आहे, ज्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यास केलेला आहे. संत-साधूंना जाणलं आहे, अशा लोकांना कुंडलिनी काय आहे हे माहिती आहे. पण जे अगदीच आजकालच शाळेत गेलेले, कॉलेजला गेलेले नवयुवक आहेत, कदाचित त्यांना कुंडलिनी काय आहे ते माहिती नसणार. पण कुंडलिनी म्हणून एक शक्ती आहे असं हजारो वर्षापूर्वी लोकांनी सांगितलं आहे. हजारो वर्षापूर्वी ! म्हणजे चौदा हजार वर्षापूर्वी आपल्या देशामध्ये भृगू संहिता म्हणून फार मोठं ज्योतिषावर लिखाण केलं गेलं होतं. त्याच्याही आधी नाडी ग्रंथ म्हणून आपल्या देशामध्ये एक ग्रंथ लिहिला होता. आता आपण इतके साहेब झालो आहेत की आपण आपल्यातलं काही वाचत नाही किंवा आपल्यामध्ये काही आहे विशेष तिकडे दृष्टी करीत नाही. पण हे सगळे ग्रंथ उपलब्ध आहेत. त्यातल्या त्यात नाडी ग्रंथ हा विषय जो आहे तो एक स्वामी सोडला भगंदर म्हणून एक गृहस्थ होते त्यांनी बाराव्या शतकात परत उजळणी करून आजच्या वेळेला आणून आणि असं भाकित केलं होतं की १९७० साली सहजयोग होणार आहे आणि सहजयोग सुरू झाल्यानंतर सुरू ন

लोकांमध्ये असलेली ही कुंडलिनी शक्ती आपोआप जागृत होऊन लोकांना आत्मसाक्षात्कार घडेल. आणि सुप्त त्यात हे ही सांगितलं आहे की इस्पितळ नावाची संस्था वगैरे जी आहे संपुष्टात येईल. अर्थात ते डॉक्टरांनी वाचू नये. नाही तर माझ्यावरती धावत येतील मारायला. पण एक असा सारासार विचार केला पाहिजे की आपण जे काही बाहेरचे आहे ते इतक्या लवकर घेतो आणि आपल्या देशातलं इतकं मोठं आहे, तिकडे आपली नजर का जात नाही? जी गोष्ट ज्ञानाची आहे तशीच आपली इतर बाबतीतही आहे. आपलं लक्ष बाहेर लवकर जातं. पण जर म्हटलं की तुमचं लक्ष आतमध्ये घेऊन जा, तर तुम्ही म्हणाल, 'माताजी, हे कसं करायचं?' हे लक्ष आतमध्ये कसं करायचं? हे लक्ष आतमध्ये नेण्याचं कार्य तुम्ही करू शकत नाही ही गोष्ट खरी आहे. तर ती घडविण्याची किमया कोण करणार? त्यासाठी आपल्यामध्ये ही कुंडलिनी नावाची शक्ती आहे. आता जर एखाद्या विदेशी माणसाने येऊन सांगितलं की अशी वीज म्हणून वस्तू आहे, तर लगेच आपण तिकडे धावतो किंवा ती वीज काय वस्तू आहे ती शोधून काढली पाहिजे ? ती वीज आपल्या शहरात आली पाहिजे. तिने हे फायदे होतात. असे चालू होईल. पण जर कोणी येऊन सांगितलं की तुमच्या आतमध्ये अशी शक्ती आहे तर तिकडे आपली दृष्टी सहसा जात नाही. तिकडे आपण बघत नाही की हे काय आहे. आणि बघितलं पाहिजे. जर मी तुम्हाला समजा काही गुप्त गोष्टी सांगत असले तर तिकडे लक्षपूर्वक बघितलं पाहिजे की यात काहीतरी आहे का? हे जे काही माताजी सांगत आहेत यात खरं किती आहे ? त्याची उदाहरण अनेक आहेत. म्हणजे संत-साधू लोक हे साक्षात्कारी होते हे आपल्याला माहिती आहे. त्यांना धर्म होता, त्यांना सांगावं लागायचं नाही, तुम्ही असं करू नका, तसं करू नका. हे करू नका. ते करू नका. हे कसं झालं? त्यांच्यात आपल्यात एवढा फरक का होता ? हे एक उदाहरण घेतलं आपण. काहीतरी त्यांच्यात विशेष होतं आणि काहीतरी आपल्यात कमी आहे. त्यांच्याजवळ पैसे कमी असतील. असेल. त्यांच्याजवळ दोन कपडे कमी असतील. पण त्यांच्यामध्ये जे गुण होते ते आपल्यामध्ये नाही आहेत. ही गोष्ट आपण मान्य केली पाहिजे. जे संतांमध्ये होतं ते आपल्यामध्ये नाही आहे. म्हणजे आपल्यात आणि त्यांच्यात काहीतरी तफावत होती आणि ती तफावत का होती हे आपण जाणून घेतलं पाहिजे. ती एवढ्यासाठी की त्यांचा आत्मसाक्षात्कार झालेला होता. संतांनी त्यावेळेला जशी सोय होती त्याप्रमाणे सांगितलं की तुम्ही देवाला विसरू नका. आज विज्ञानाच्या नावाखाली देवाचे धिंडवडे काढले आहेत. तसे देवाच्या नावाखाली ही काढलेले आहेत. भोंद लोक ही जगात पुष्कळ आहेत, जे पैसे बनवतात, लोकांना फसवितात. पण विज्ञानाच्या नावावर सुद्धा त्यांनी सांगितलं की देव म्हणून काही वस्तूच नाही. त्याला बंद करून ठेवायचे. म्हणजे माझ्या मते दोन्ही एकच झाले. जे तुम्ही बघितलं नाही, जे तुम्ही पाहिलं नाही, जे तुम्ही जाणलं नाही, ते नाही असं म्हणणं म्हणजे वैज्ञानिक दृष्टी नाही झाली. जर शुद्ध वैज्ञानिक दृष्टी असली तर मनुष्य सरळ म्हणेल की, 'मी नाही पाहिलेलं, पण मी बघतो.' पण हे लोक शुद्ध वैज्ञानिक आहेत, कारण ह्यांचं जे विज्ञान आहे ते पराकोटीला पोहोचले आहे. आपलं अजून अर्धवट, लोंबकळत आहे त्याच्यामुळे इथले वैज्ञानिक तेवढे पोहोचलेले नाहीत. तर जेव्हा शुद्ध वैज्ञानिक तुम्ही व्हाल तेव्हा तुमच्याही दृष्टीला हे येईल, की ह्या विज्ञानाने आम्ही काय मिळवलं?

इथे आपल्याला असं वाटतं की चला, किती त्रास होतो प्रवासाचा, लोक मिळत नाही, हे नाही, ते नाही. पण तसं पाहिलं तर त्या देशात असं मला वाटतं की मी नरकात राहते की काय. अगदी नरक वाटतो.. म्हणजे सगळं असतं, रस्ते ठीक आहेत, लखलखाट आहे, सगळं काही आहे, पण नरक वाटतो तिथे. माणूसकी नाही तिथे. उदंडपणा, उद्धटपणा, रागीटपणा, हिंसा, इतकी जास्त हिंसा आहे की तुम्हाला आश्चर्य वाटेल की त्या इंग्लंड शहरामध्ये, ज्या इंग्लिंश लोकांनी आपल्यावर राज्य केलं त्याठिकाणी दोन मुलांना प्रत्येक आठवड्यात आई- वडील मारून टाकतात. जर आपली मुलं त्यांच्या रस्त्यावर गेली तर हे ही तसंच करतील. दारू पितील त्यांच्यासारखे, उदंड होतील, उनाड होतील, तसेच वागू लागतील. आता ते रस्त्यावर असे आले आहेत, की इतकं लांब चालून जेव्हा ते पोहोचले ( इतक्या काळानंतर), तेव्हा खड्डा दिसला आणि आता या खड्ड्यातच पडायचंय आपल्याला कळलं तेव्हा मग मागे वळून आले. पण आपण का नाही आधीच या गोष्टी समजून घ्याव्या की आपल्या देशात या केवढ्या मोठ्या गोष्टी आहेत. या केवढ्या व्यवस्था आपल्या देशात संत-साधूंनी केलेल्या आहेत. त्याचा फायदा का करून घेतला नाही आणि का करून घेत नाही? कारण कोणाचेच लक्ष परमेश्वराकडे नाही आहे. फक्त जे भोंदू लोक आहेत, पोटभरू लोक आहेत किंवा असे लोक आहेत ते तुम्हाला येऊन देवाबद्दल काहीतरी सांगतात किंवा जे थोडे फार संत-साधू असतात त्यांचे तुम्ही हात-पाय मोडून ठेवले आहेत. दोन्ही पैकी एक. ही अशी स्थिती आहे. आता परमेश्वराने जे आपल्याला मनुष्य केलं ते कशासाठी केले आहे. या स्थितीला आणले ते एवढ्यासाठी नाही की आपण मनुष्य व्हावं, आपल्याजवळ पैसे हवे. थोडीशी रक्कम शिल्लक झाली की आपण गुत्त्यात मरावं. त्याच्यासाठी केले आहे का परमेश्वराने आपल्याला? कोणतीही वस्तू आपण बनवतो. आता हे यंत्र जर आपण बनवलेले आहे तर हे कोणत्या तरी कारणामुळेच बनवलेले आहे की नाही. एवढी मेहनत करून आज तुम्हाला मनुष्य बनवलं, तर परमेश्वराने काहीतरी तुमची इज्जत केलेली आहे. इतक्या मेहनतीने, प्रेमाने का तुम्हाला बनवलं? आपण असा विचार केला पाहिजे की परमेश्वराने आम्हाला का बनवलं ? त्याला कारण आपण तसा विचारच करीत नाही. जे आपल्याला मिळालं ते मिळालेले आहे. नाक, डोळे, तोंड सगळं काही मिळालेले आहे. आता ह्याच्यापुढचा कशाला आपण विचार करायचा ? पण परमेश्वराने मनुष्य आपल्याला एवढ्यासाठी बनवलेले आहे की आता मनुष्य झाल्यावरच मनुष्याला त्याचा आत्मा मिळू शकतो आणि आत्मा मिळाल्यावर त्याचा संबंध परमात्म्याशी होऊ शकतो. मग सरळ प्रश्न असा होतो की परमात्म्याशी संबंध कशाला करायचा? आता प्रश्न असाच आहे की या वस्तूचा संबंध, कनेक्शन मेनशी कशाला लावायचं? ही वस्तुू जी बनविलेली आहे ती अर्धवट आहे. जोपर्यंत तिचा संबंध आम्ही मेनशी लावत नाही, हिचा काही उपयोग नाही आणि ही भ्रांत आहे. ह्याच्यावर आम्ही कितीही ओरडलो तरी हिचा काही उपयोग होणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमचा संबंध परमेश्वराशी लागणार नाही तोपर्यंत तुम्हालाही काही अर्थ लागणार नाही. म्हणूनच आज लोक असे सभ्रांत फिरत आहेत. त्यांना समजत नाही, चांगलं काय, वाईट काय ? कशाला म्हणायचं परमेश्वर, कशाला म्हणायचं दुष्टपणा, कशाला म्हणायचं चांगुलपणा ? पुष्कळांना असं वाटतं की परदेशातले लोक फार सुखी आहेत, ही अगदी चुकीची कल्पना आहे. अत्यंत चुकीची कल्पना आहे. कारण तिथे आजकाल, तुम्ही जर तरुण लोकांना

जाऊन विचारलं, फार जे श्रीमंत देश आहेत, तर ते सांगतील की 'आम्ही तर फक्त आत्महत्येच्याच विवंचनेत बसलेलो आहोत. आम्ही असा विचार करतो आहोत की आत्महत्या कशी करायची ?' अशा परिस्थितीत त्या लोकांनी जे मिळविलेले आहे त्यापेक्षा अधिक आपण मिळवू शकतो. जर आपण दुसरा मार्ग अवलंबिला. जर तुम्हाला एखादं झाड दिसलं, जे खूप मोठं झालेलं आहे, तर लक्षात घेतलं पाहिजे की त्या झाडाला मूळे असली पाहिजे. जर त्याला, मुळाला पाणी नसलं तर ते झाड सुकून जाणार. तेच आज विश्वाचं झालेलं आहे, पाश्चिमात्य देशांनी आपली भरमसाठ, अगदी खूप प्रगती करून घेतलेली आहे आणि ते कोलमडायला बसले की आहेत. कारण त्यांनी आपली मूळे शोधून नाही काढली. कारण त्यांची मूळे या देशात आहेत आणि ह्या देशातले लोक त्यांच्यामागे धावत आहेत सैरावैरा. तेव्हा ज्यांचं जे काम आहे ते सोडून ते त्यांच्यामागे लागले तर झाड आधीच लवकरच कोलमडणार. तेव्हा इथल्या देशातल्या लोकांनी आपली पाळेमुळे काय आहेत ते शोधून काढले पाहिजे आणि ती पाळेमुळे आपल्यामध्ये आपल्या संतांनी सांगितलेली आहेत की 'तुज आहे तुजपाशी' म्हणजे काही खोटं बोलले नाहीत ते. जर असं म्हटलं की तुज आहे तुजपाशी आणि ते तू शोधून काढलं पाहिजेस, तर त्यात मनुष्याने फारसा विचार करू नये. दुसरं असं की कुंडलिनी ही जी शक्ती आहे ही शुद्ध इच्छा आहे. मनुष्याच्या बाकीच्या सर्व इच्छा अशुद्ध आहेत. कारण कोणतीही इच्छा तुम्ही केलीत आणि ती पूर्ण झाली तरी दुसरी इच्छा होतेच. आज वाटलं आम्हाला की एक कपडा विकत घ्यावा, बरं मग त्याच्या नंतर वाटतं की एक घर बनवावं, मग वाटतं मोटर असावी. म्हणजे इच्छेवर इच्छा होत जातात पण मन काही तृप्त होत नाही. प्रत्येक ऋतुमध्ये, वेगळ्यावेगळ्या ऋतुमध्ये अनेक तऱ्हेची फळं आणि फुलं येतात, याला योगशास्त्रामध्ये ऋतंभरा प्रज्ञा म्हणतात. ती शक्ती, जी परमेश्वराची जिवंत ब्रह्मशक्ती, ती अजून आपल्या हाताला लागलेली नाही. ती कार्य करते. शक्ती आहे, करते, दिसतं आपल्याला. फुलं आली, ही आली कुठून ? ही जिवंत शक्तीने आली. पण ही जी कार्य करणारी शक्ती आहे, ही शक्ती आम्हाला, अजून आमच्या हाताला लागलेली नाही. तिच्यावर आमचं काही प्रभृत्व आलेलं नाही किंवा आम्ही तिला जाणलंसुद्धा नाही. पण मनुष्याचं तिकडे लक्ष नाही. कारण मनुष्यामध्ये उथळपणा आहे. गहनता नाही, उथळपणा आहे. म्हणजे एक की असलं, चला काही हरकत नाही. एवढं कोण बघायला जातं. असेल, आपल्याला काय, माळ्याने फुलं दिलं की झालं! आता त्याच्यापुढे कोण बघायला जातं की ही फुलं कोणी बनविली. पण जर गहन विचार केला तर हे झालेलं आहे. तेव्हा ही सर्वव्यापी ब्रह्मशक्ती आपल्या हाताला लागावी अशी जर तुम्ही इच्छा केली तर त्यात काही वैगुण्य नाही. पण ती लागायची कशी? कसं होणार? त्याला काय करायला पाहिजे ? आपल्याला जर एखाद्या बी ला अंकुर फोडायचं असलं तर आपण काही त्याच्यासमोर विज्ञान लावत नाही, वाद करीत नाही, विवाद करीत नाही, भजन म्हणत नाही, गाणं म्हणत नाही. काय करतो ? त्या बी ला या आईच्या पोटात देतो आणि त्याच्यात अंकुर फुटतात. ते अंकुर आपोआप, सहज फुटतात. त्याला काही करावं लागतं का? काही करावं लागत नाही. तसंच आहे की तुम्हाला सुद्धा जे अती व्हायचं आहे, याच्यापुढचं व्हायचं आहे, त्यालासुद्धा काही करावं लागणार नाही आणि आता तरी तुम्ही मनुष्य झालात, तुम्ही काय केलं? तुम्ही काही

केलेलं आहे का? आपोआपच झाल. तेव्हा ह्याच्यापुढचं जे व्हायचंय तेसुद्धा आपोआपच होणार आहे, त्यासाठी तुम्हाला डोक्यावर उभं राहायला करतील. कारण आजकाल सगळ्यांना प्रश्न करण्याची सवय झालेली आहे. सगळीकडे राजकारणी मतं मागत नको. हे सर्व असतांना, हे असं आधी का नाही झालं ? असाही लोक प्रश्न फिरतात, तर लोक प्रश्नही करत फिरतात. मी काही राजकारणी नाही आहे. पण असा विचार केला पाहिजे की आत्तापर्यंत झालं नाही हे आपण अशा विचाराने म्हणतो, की आपल्याला जिवंत वस्तू कधीही एकदम हटात होत नाही, एकानंतर एक. आधी बी रूजतं, त्याला मुळे येतात, मग त्याचा बुंधा येतो, मग त्याच्या फांद्या येतात, मग फांद्यांना फुलं येतात, मग त्यांना फळे येतात. असं होत नाही की बी घातलं की त्याच्यात फळं निघतं. म्हणजे उत्तरोत्तर गोष्ट होत जाते. ह्याला उत्क्रांती असं म्हणतात आणि आज ही वेळ आलेली आहे म्हणून अनेक लोकांची कुंडलिनी जागृत होऊ शकते. आता कुंडलिनी कशी जागृत होते ? काय होतं ? वगैरे त्याच्याबद्दल आमच्याकडे बरीच पुस्तकं आहेत. ती तुम्ही वाचावी, गहनपणाने, शहाणपणाने. हा नवीन विषय आहे. ते तुम्ही जाणलेलं नाही. हे ज्ञान मुळातलं आहे. आणि हे जाणण्यासाठी सूक्ष्म व्हावं लागतं. म्हणून गहनतेने तो विषय घेतला पाहिजे. जर तुम्हाला ते शिकायचं असलं तर फार सोपं काम आहे, कुंडलिनीच जागरण करणं कठीण नाही. तेव्हा ती तुम्ही जागृत करून घ्यावी आणि त्याच्यानंतर तिचा पुढे वापर कसा करायचा, तिचा सांभाळ कसा करायचा, नंतर दुसऱ्यांना ह्याचा फायदा कसा करून द्यायचा हे सुद्धा शिकलं पाहिजे. याचे अनेक फायदे होतात. पण ते फायदे झाल्यावरच तुम्ही बघा. नाहीतर तुम्ही म्हणाल, की आत्ता सिद्ध करून दाखवा. काल असंच झालं. ५ - ६ दारूडे आले. म्हणे, 'माताजी, आता आमचे चाळीस जण आहेत त्यांना तुम्ही ठीक करा.' म्हटलं, 'असं कसं. आता मला प्रोग्रॅमला जायचंय.' नाही म्हणे आत्ताच करा.' आता ते दारू प्यायले होते. त्यांना कोण काय म्हणणार! ते पोलिस वगैरे आले, त्या दारू प्यायलेल्या अवस्थेत काय म्हणतात. त्यांना काही समजतं का? म्हटलं, 'तुम्ही दारू पिऊन आलात, तुम्हाला काही म्हणू नाही शकत.' पोलिस आले. मग काय काय झालं, त्यांची प्रकरणं झाली, भानगडी. पण हे असं असतं, की ज्या ठिकाणी, तुम्ही कधी कॉलेजमध्ये दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का ? म्हणजे कॉलेजचंसुद्धा नाही समजायचं. शाळेत दारू पिऊन गेलात तर तुम्हाला काही समजेल का? डोकंच ठिकाणावर नसतं माणसाचं. मग कुंडलिनीसारखी गोष्ट तुम्हाला दारू पिऊन कशी समजणार? पण ते भांडायला लागले, ओरडायला लागले. म्हटलं हा आहे तरी काय प्रकार ! आम्ही तुम्हाला तुमचं द्यायला आलोय. एवढ्यात भांडायला काय झालंय तुम्हाला ? तर असा विक्षिप्तपणा, चमत्कारिकपणा येण्याची फार संभावना आहे. कारण आपल्याकडे जे एकदम, मी म्हटलं ना की झाड उलथून पडण्याची वेळ आलेली आहे. ती गोष्ट आपल्याकडेही होऊ घातली आहे. तेव्हा थोडसं काळजीपूर्वक राहिलं पाहिजे. जे तिथे झालं, ते इथे नाही झालं पाहिजे. त्यांची पुनरावृत्ती इथे झाली नाही पाहिजे. आपण धोपटमार्गाने, सरळ मार्गाने परमेश्वराच्या साम्राज्यात गेलं पाहिजे. हीच एक मला विवंचना आहे. कुठे असं नाही झालं पाहिजे, त्यांचे तर अर्धे देश बुडालेलेच आहेत. ६५% लोक अमेरिकेत वेडे आहेत. ६५% तरूण लोक वेडे आहेत. यावरून तुम्ही अंदाज लावू शकाल यांच्या प्रगतीला काय म्हणावं. स्वित्झर्लंडची जवळ

जवळ ८०% तरुण मुलं आत्महत्या कशी करावी याची खलबतं करतात. म्हणजे 'अती शहाणे त्याचे बैल रिकामे' असं मराठीत म्हणतात ते तिथे दिसतं. आणि एवढं सगळे करून काय मिळवलं हेच मला समजत नाही. इतके दु:खी जीव आहेत. कोणी आई-वडिलांजवळ रहात नाही, बापाला विचारत नाही, बाप मेला तर एक-एक महिना त्याचं शव सोडून गेलं तरी कोणी बघायला येत नाही. म्हणजे माणुसकीतून उठलेले आहेत. असं आपल्या देशात होऊ नये. आधीच तुम्ही परमेश्वराच्या साम्राज्यात येऊन त्याच्या प्रेमाचा आस्वाद घ्यावा. अशी माझी सदिच्छा आहे. आणि या भारताचे एवढे पुण्य आहे, त्यातल्या त्यात महाराष्ट्र भूमीचं एवढं पुण्य आहे की महाराष्ट्रातला मनुष्य म्हणजे एक विशेष आहे. त्याला धर्माची चाड आहे, देवाची चाड आहे. मोठ्यांचा मान आहे. फसतोही कधी कधी, कबूल. फसत नाही असं नाही. पण त्याच्यामध्ये धर्मभावना, चांगुलपणाने वागण्याची एक इच्छा नेहमी असते. जरी तो वाईट मार्गाने वागला तरी हे माझं चुकलं असं सांगतो. नाशिकला मी गेले होते. एक गृहस्थ आले आणि माझ्याजवळ येऊन म्हणाले, 'माताजी, मी तुम्हाला कबूल करतो, मी दारू पिऊन आलो. मी चोवीस तास दारू पिऊन आलो. तुम्ही माझी आई आहात. मी तुम्हाला कबूल करतो. तुम्ही माझी दारू सोडवून द्या. हे वाईट आहे मला माहिती आहे पण मला सुटत नाही.' आता सुटली त्यांची दारू. पण ही गोष्ट वाईट आहे हे त्याला माहिती आहे. कारण तो भारतातला, या महाराष्ट्रातला मनुष्य आहे, पण या लोकांना हे ही माहीत नाही हे वाईट आहे. आता यांना काय म्हणावं! इतकी बेछूट स्थिती तिथे झालेली आहे. ती तुमच्या मुला-बाळांची होऊ नये. तुम्ही ज्यासाठी या देशामध्ये एवढा जन्म घेतला, ज्या पूर्वपुण्याईने जे मिळविलेले आहे, ते तुम्हाला मिळावं. या सदिच्छेनेच मी आज फलटणला आलेली आहे. तेव्हा तुम्ही ते घ्यावं. उशीर फार झालेला आहे म्हणून मी काही जास्त लेक्चर देणार नाही. आता आपण कुंडलिनी जागृतीचाच कार्यक्रम घेऊयात. आता सगळ्यांनी ज्याला सहजासन असं म्हणतात, असे पाय मोकळे करून बसा. पाय मोकळे करून. फार जास्त एकावर एक चढवायचे नाहीत. आणि दोन्ही हात असे आरामात आपल्या मांडीवर ठेवायचे. काहीही विशेष करायचे नाही. दोन्हीही हात असे मांडीवर ठेवायचे. फक्त श्रद्धेने बसलं पाहिजे. दूसरं म्हणजे असं, की हे ब्रह्मरंध्र आहे, इथे, ते छेदावं लागतं. आणि आईसमोर आपल्याला काही टोपी घालायला नको. आई म्हणजे आपली आई आहे. काही अंमलदार नाहीये, गुरू नाही आहे. तेव्हा टोपी काढलेली बरी. कारण हे ब्रह्मरंध्र छेदावं लागतं. बायकांनी पदर राह देत कारण तो पातळ असतो. पण टोपी जरा काढलेली बरी. थोडसं आवळतं कधी- कधी. चष्माही काढला तरी हरकत नाही. कारण डोळे तुम्हाला मिटूनच ठेवावे लागणार आहेत, आणि त्याने डोळे ठीक होतात. म्हणून चष्मा काढलेला बरा. पायात चपला नसतीलच, मला माहीत आहे. आता असे हात करून बसायचे आहे. जास्त मानेला ताण द्यायचा नाही किंवा वाकायचं नाही. सरळ आपण जसे बसतो, तसं बसायचं. आता सर्वप्रथम डोळे मिटून या आपल्या मायभूमीला नमस्कार करूयात. तीनदा. कारण तिने आपल्याला जन्म दिला आणि ती पूण्यभूमी आहे. तिला खरोखर मनापासून तुम्ही नमस्कार करा. तुम्हाला माहीत नाही की ती किती मोठी आई आहे तुमची! नमस्कार करावा, तीनदा. आता मी शेवटलं सांगते ते लक्षपूर्वक ऐका. फार सोपं काम आहे. म्हणजे तुम्ही स्वत:ला कसं कवच घालायचं. जे आईचं कवच असतं ना, आईचा पदर कसा

घालायचा म्हटलं तर चालेल. आपल्याला सात चक्रं आहेत. तेव्हा आपलं संरक्षण झालं पाहिजे, वाईट प्रवृत्तीपासून. म्हणजे आपल्याला जे मिळालंय ते हरवलं नाही पाहिजे. त्यासाठी रोज सकाळ-संध्याकाळ, एकदा उठल्यावर किंवा बाहेर जातांना आणि एकदा झोपतांना दोनदा हे बंधन घालायचं असतं. अगदी सोपं आहे. हे फोटो देतील तुम्हाला आणि तुम्ही फोटोचे पैसे नाही घ्यायचे. सगळ्यांनी आदराने फोटो घ्यायचा. आता हा जो हात आहे हा इथून उचलून असा वर आणि असा नेला म्हणजे एक कवच तयार होतं आणि असाच परत आणायचा. एक असा उचलून, एक म्हणजे पहिलंच चक्र मूलाधार. त्याला झालं. नंतर दूसरं चक्र स्वाधिष्ठान. त्याला तुम्ही दिलं, तिसरं चक्र नाभी, त्याला तुम्ही बंधनात घातलं. चौथं चक्र हृदय त्याला तुम्ही बंधनात घातलं. पाचवं चक्र विशुद्धी म्हणजे कंठाचं. त्याला तुम्ही बंधनात घातलं. सहावं चक्र आज्ञेचं, ते तुमच्या मेंदूत असतं. आणि हे सातवं चक्र ब्रह्मरंध्र म्हणजे ज्याला सहस्त्रार असं म्हणतात. अशा रीतीने तुमची जी सात चक्र आहेत, त्यांना बंधन घातलंत. आता स्वत:ची कुंडलिनी कशी उचलायची ते बघा. थोडं शांतपणाने घ्या. आता हा हात असा ठेवायचा. थोडा गंभीर आहे हा विषय. हा हात असा, डावा, समोर ठेवायचा. म्हणजे आनंद आतून, इतक्या उकळ्या फुटून वाहणार आहे. की तुम्ही हसतच रहाल जगाकडे बघून. पण आता थोडावेळ थांबून घ्यायचं. हा डावा हात असा पुढे ठेवायचा, कुंडलिनी वर, मी बसले आहे. तुम्ही बसला आहात. आता ह्याच्यावरती फिरवायचा हा उजवा हात. हा असा उभा घ्यायचा आणि हा असा. ही इच्छा शक्ती आहे आणि ही क्रियाशक्ती आहे. हा हात वर, समोर, खाली, मागे असा फिरवायचा. वर, समोर, खाली, मागे असा तीनदा वर न्यायचा. आता चला. आता खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून ह्याला असे वेटोळे आणि एक गाठ घालून मारायची जोरात स्वत:ला. आता एकदा कुंडलिनी चढवली. आता ही तीन, त्रिगुणात्मिका आहे. म्हणून तीनदा चढवायला लागते. आता परत चढवायची. आता परत खांदे मोकळे सोडून, डोकं वर करून विचार नाही करायचा. परत एक वेटोळे घाला अशी दूसरी गाठ मारायची, तिसर्यांदा तीन गाठी बांधायच्या. म्हणजे नीर गाठ होते. पार झाले तुम्ही. सर्व संत-साधूंना आमचा नमस्कार! ০

Sri Ram Mandir, Phaltan (India)

Loading map...