Public Program

Public Program 1983-01-20

Location
Talk duration
69'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

20 जानेवारी 1983

Public Program

Shahapur (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED

Public Programme in Shahapur, Maharashtra.

माहित नव्हतं.आणि इतक्या लांबून यायचं, म्हणजे एकदम मला असं वाटलं की सहाच्या नंतर प्रोग्राम आहे वगैरे त्यामुळे थोडा उशीर झाला. तरी हरकत नाही जेव्हा वेळ यायची असते तेव्हाच ती येते, असं आम्ही आत्तापर्यंत सहजयोगात पाहिलेलं आहे. आता सहजयोग म्हणजे काय आणि सहजयोगाचा उपयोग काय वगैरे वगैरे अनेक विषयांवर आपण आधीच ऐकलेलं असेल, आणखी पुस्तकही आहेत त्याची ती वाचलीही असतील. सांगायचं म्हणजे असं, की आजकालच्या या धकाधकीच्या काळामध्ये मनुष्य नुसता म्हणजे घाबरून गेलेला आहे. त्याला आतली काही शांती म्हणून नाहीये. आणि आतली शांतता नसल्यामुळे बाहेरही तो शांत राहू शकत नाही. बाहेरही तो बंडखोरासारखा वागतो किंवा अगदीच वाह्यात पणाने काहीतरी बोलत राहतो किंवा भांडणं करतो किंवा त्याच्या वर गेला जुलमी जर झाला तर खून पाडतो, सगळ्या तर्‍हेचे जुलूम करायला मनुष्य शिकलेला आहे, ह्या अशा धकाधकीच्या काळामुळे. जर त्याच्या मनामध्ये शांतता असली, त्याच्या हृदयामध्ये जर शांती असली, तर तो बाहेर सुद्धा शांती राखू शकतो. पण जरआतच शांतता नाहीये तर बाहेर कशी शांतता राखायची ? तेव्हा कुणी जर सांगितलं की बुवा तुम्ही आता शांत राहा आणि समाधानी राहा, तर लोकांना असा प्रश्न पडतो की ह्या अशा काळामध्ये, मनुष्याने शांत तरी कसे राहायचं ? सगळीकडनं जसा काही वणवा पेटावा असं वाटायला लागतं. इकडे बघितलं तर राजकारणात सुद्धा मनुष्याला असं दिसतं की काहीही ह्याला भविष्य नाही. ह्या राजकारणाला काही भविष्य दिसत नाही. मारामारी, दंगल ,नाही तर एक इलेक्शनला हरले मग दुसरे जिंकले, म्हणजे होणार तरी काय या भारताचं असं लोकांना वाटू लागतं. तिसरं म्हणजे घरांमध्ये सुद्धा भांडण, तंटे, आपापसांमध्ये मोठमोठाले झगडे ह्या सर्व गोष्टींमुळे मनुष्य खरोखर म्हणजे आज वैतागून गेलेला आहे, पण ह्या वैतागलेल्या स्थितीमध्ये आता करायचं काय, तर लोकांना असं वाटतं की काहीतरी याच्यातनं पळवाट काढली पाहिजे.आणि पळवाटीचे अनेक अनेक प्रकार आपल्या शहरातून तर आहेतच पण खेडेगावात सुद्धा खूप पसरलेले आहेत. म्हणजे काही लोक दारू पिऊन त्यांना वाटतं आपलं जे दुःख आहे ते हलके होईल किंवा ह्या समाजापासून आपल्याला थोडा वेळ सुट्टी मिळेल म्हणून तो जाऊन दारू पितो. ते नाही जमलं तर मग इतर गोष्टीच्या पळवाटी जशा आहेत की आपलं देवळात जायचं, जाऊन टाळ कुटत बसायचं. नाहीतर देवळात चार पैसे द्यायचे कुणाला आणि तिथे जाऊन आपल्या गप्पा मारत बसायचं. ते नाही जमलं तर एखाद्याच्या अंगात वारं-बिरं आलं की त्याच्या नादी लागायचं. कुणाच्यातरी नादी लागायचं, स्वतः च्या नादी लागायचं नाही, कारण स्वतःच्या नादी लागता येत नाही. कारण ज्याच्या नादी लागायचं त्याला शांती नाहीये. स्वतःच्या आत मध्ये जोपर्यंत शांती असणार नाही तोपर्यंत मनुष्य शांती बाहेरच शोधणार. त्याची सगळी सुखाची साधनंही बाहेरच असणार. सगळी प्रेमाची साधनं सुद्धा बाहेरच असणार. त्याला आपल्या आतमध्ये ते प्रेम जाणवत नाही स्वतःबद्दल आणि एक तर्‍हेची उपरती आतून आल्यामुळे तो बाह्यात अडकलेला आहे आणि या लौकिकात अडकलेला आहे. अशाच परिस्थितीमध्ये मनुष्याला असं वाटतं काहीतरी विरंगुळा म्हणून काहीतरी करत राहिलं पाहिजे. पण जे काही तो करतो, त्याचा जर संपूर्ण आपण हिशोब जर काढला तर काही विशेष सुख मिळालेलं नाही. आता एखाद्या माणसाने खूप पैसा एकत्र केला, तरी त्या माणसाला काही विशेष सुख दिसत नाही. एखाद्या माणसाने मोठं राजकारणामध्ये मोठं मिळवलं जरी असलं, परमेश्वराने तरी त्याला जर पाहिलं तरी त्याला काही सुख वाटत नाही आणि त्याच्यात शांतता तर मुळीच नसते. तिसरं म्हणजे पुष्कळांना वाटतं की आपल्या कौटुंबिक जीवनामध्येच काहीतरी आपण मिळवावं, तर तिथेही तसं काही दिसत नाही. रात्रंदिवस मला लोक भेटत असतात आणि सांगत असतात माताजी आमच्या कुटुंबियांना हा त्रास आहे. आमच्या कुटुंबात ही भांडणं आहेत. असं चाललंय, तसं चाललंय. म्हणजे कुठेतरी आपलं चुकलेलं आहे, कुठेतरी आपल्यामध्ये कमीपणा आहे, काहीतरी गोष्ट राहिलेली आहे आपल्यामध्ये. जर असं नसतं तर मानवासारखे हे जे परमेश्वराने एक सुंदर साधन तयार केलेलं आहे ते असं विकोपाला गेलं नसतं. ही स्थिती आली त्याला काहीतरी कारण असायला पाहिजे. आणि ते काय कारण ते आपण बघू या.

आपल्याला आज मानव केलं त्याचाच आपण विचार करत नाही की हे परमेश्वराने का केलं? तो विचार आपल्या डोक्यात कधीही डोकावत नाही की त्यांनी आपल्याला मानव का केलं? बाकी आपण मानव आहोत हे आपल्याला माहिती आहे. माणसाचे जे अधिकार आहेत ते आपल्याला मिळायला पाहिजेत, आपण काय जानवरासारखे राहायला तयार नाही. मग हा मानव देह आपण का धारण केला? याच्यात परमेश्वराची काय इच्छा होती, तिकडे थोडंसं लक्ष दिले पाहिजे. परमेश्वराने हा मानव देह अनंत कोटीतून काढून मग तयार केलेला आहे हे तर आपल्याला माहिती आहे. सायन्सने सुद्धा हे सिद्ध करून दिलेलं आहे. आणि हा देह इतका हळुवारपणे, इतका सुंदरतेने तयार केलेला आहे, त्याला कारण म्हणजे परमेश्वराची एक फार मोठी इच्छा आहे. आणि ती इच्छा अशी आहे जशी कोणत्याही बापाची असते. पण हा सगळ्या बापांचा बाप, प्रेमाचा सागर असा परमेश्वर त्याची ही इच्छा आहे, जो सर्वसमर्थ आहे. की ह्या माझ्या मुलांना मी माझ्या साम्राज्यात राज्य दिलं पाहिजे. त्यांनी माझ्या साम्राज्यात आलं पाहिजे. त्यांना मी आनंद दिला पाहिजे. त्यांना मी संतोष दिला पाहिजे. त्यांचं सगळं दुःख गेलं पाहिजे. सगळा त्यांचा ताप गेला पाहिजे. ही परमेश्वराची परम इच्छा होती म्हणून त्याने मानव घडवला. हा मानव जोपर्यंत मनुष्य स्थितीत असतो तेव्हा त्याच्या डोक्यात सुद्धा हा विचार येत नाही की तो मानव का झाला? किंवा त्याला याची जाणीव सुद्धा होत नाही की परमेश्वर किती मोठा आहे. काही काही लोकांचा परमेश्वरावर विश्वास असतो, पण तो आंधळा विश्वास असतो. कारण आईवडिलांनी सांगितलं म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवायचा, किंवा काहीतरी थोडंबहुत आपलं भलं झालं म्हणून परमेश्वरावर विश्वास ठेवायचा ,किंवा कुठे दोन चार देवळं पाहिली की त्याच्यावर विश्वास ठेवायचा, हे जरी असलं तरी उद्या तुमची मुलं काही परमेश्वरावर विश्वास ठेवणार नाहीत, उलट टवाळक्या करत परमेश्वराची सुद्धा नालस्ती करत फिरतील. त्याला इलाज काहीतरी असायला पाहिजे पण इलाजापेक्षा जर हा इलाज झालाच नाही तर मात्र सगळ्या गोष्टींचा नाईलाज होणार आहे. सर्वप्रथम हे लक्षात घेतलं पाहिजे की परमेश्वराने आपल्याला त्याच्या साम्राज्यात येण्यासाठी तयार केलं, तेव्हा काहीतरी कमी आहे आपण त्याच्या साम्राज्यात नाही. जर असतो तर अशी आपली केविलवाणी स्थिती झाली नसती. जर तो सर्वसमर्थ आहे तर आपलं जे आज दारुण दुःख आहे ते आपल्याला दिसलं नसतं. म्हणजे एक तर तो सर्वसमर्थ तरी नाही आणि जर तो सर्वसमर्थ आहे तर त्याने असं कोणचंतरी अजून कार्य केलेलं नाही किंवा आमच्यात काहीतरी कमी आहे की जे आम्हाला त्याचं सुख लाभलेलं नाही.

तर, ही मानवस्थिती जी आहे, ही अजुन संपूर्णाला गेलेली नाही, संपूर्णत्व ह्याला आलेलं नाही . हे आपल्या लक्षात येत नाही. हे कसं संपूर्णत्व येणार, मनुष्याने हा विचार केला पाहिजे की हे सम्पुर्णत्व आपल्याला कशाने येणार आहे. त्याबद्दल अनेक थोर जेवढे आपल्या देशात झाले संत साधु, इतर देशात झाले, तसेच अवतरणं झाली सर्वांनी सांगितलंय की तुमच्या आत्म्याला तुम्ही मिळवलं पाहिजे, तुमचा आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे, तुमची जागृती व्हायला पाहिजे. तूमची जागृती झाल्यावर मगच ह्या आत्म्याची तुमची भेट होईल आणि आत्म्याला जाणल्याशिवाय तुम्ही परमेश्वराला जाणू शकत नाही. कारण आत्मा हे परमेश्वराचं प्रतिबिंब आहे. पण आता हा आत्मा आहे तरी कुठे आणि तो शोधून जरी काढायचा, तर कसा काढायचा? आता जे काही आपण शाळेत वगैरे शिकतो किंवा शाळेच्या पुढे जे काही कॉलेजमध्ये शिकतो किंवा त्याच्याही पुढे काही शिकतो वगैरे, हे सगळं बाह्यातलंच आहे, त्याने काय परमेश्वर जाणता येत नाही. कारण जसं वृक्षाला आपण बघू शकतो तसंच आपण हे सगळं बाहेरचं बघू शकतो. पण जो वृक्ष आपण बघतो त्याच्या खाली मुळात काहीतरी असल्याशिवाय तो वृक्ष उभा राहिल का? म्हणजे प्लास्टिकचं झाड उभं राहिल, पण खऱ्याखुऱ्या झाडाला जर बघितलं तर त्याला हे मूळ हे पाहिजे. तेव्हा आपलं मूळ काय आहे हे शोधून काढलं पाहिजे, आणि हे मुळाचं जे ज्ञान आहे, ते सहज योगाचं ज्ञान आहे.

‘सहज’ – ‘सह’ म्हणजे तुमच्या बरोबर आणि ‘ज’ म्हणजे जन्मलेला. तुमच्याबरोबरच जन्मलेला हा योग आहे म्हणजे हा तुमचा अधिकार आहे. तुझं आहे तुजपाशी, असं सांगितलेलं आहे. ते जे तुमच्यापाशी आहे ते फक्त जागृत करायचंय आणि ते जागृत झालं म्हणजे हा योग घडतो म्हणजे तुमचा संबंध त्या परमेश्वराच्या सर्वव्यापी ब्रह्म शक्तीने होतो. आता ही ब्रह्म शक्ती काय आहे? सर्व म्हणतात की सगळीकडे प्रत्येक अणु रेणू मध्ये ही ब्रह्म शक्ती व्यापलेली आहे, पण आम्हाला काही दिसत नाही. आता वारा तरी आपल्याला दिसतो का, पण वाहायला म्हणजे कळतो. तर ही शक्ती कार्यान्वित आहे आणि ती कशी कार्यान्वित आहे, ती जर आपण एखाद्या झाडांकडे बघितलं, जे जिवंत कार्य करत आहेत तर आपल्या लक्षात येईल की एक फुल येतं आणि मग त्याचं फळ होतं. अनेक फुले येतात आणि त्यांची फळं होतात आपण काही त्याबद्दल करत नाही, सहजच ते घडून येतं. अशी अनेक हजारो, करोडो अशी कार्य, जिवंत कार्य आपल्यात होत असतात. आपल्या सुद्धा या हृदयामध्ये जी धकधक होत असते, ज्यानी आपण जिवंत आहोत हे त्याचं लक्षण होतं, हे सुद्धा कार्य त्याच ब्रह्मशक्तीने होतं. सर्व जेवढं जिवंत कार्य आहे ते परमेश्वर करत असतो. आता इथं झाडं लागलेली आहेत, आपल्याला वाटतं आहेत तर आहेत, त्याचं काय विशेष ? एक लहानसं बी तुम्ही जर जमिनीत घातलंत तर ते रोप होऊन येतं. पण ते कसं येतं ? त्याला कोणची शक्ती कार्य करत असते ? तर ती ब्रह्मशक्ती, परमेश्वराची शक्ती आहे. तिला आमच्या सहजयोग भाषेमध्ये महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती अशी तिन्हींची मिळून जी आदिशक्तींची शक्ती आहे, ते म्हणतात. त्या ब्रह्मशक्तीमुळेच ही सर्व कार्ये होत असतात आणि त्याच शक्तीमुळे आज आपण एका लहानश्या अमीबाच्या पेशी पासनं मानव झालेलो आहोत. आणि ती शक्ती हे कार्य पुढे सुद्धा करते कारण ते कार्य झाल्याशिवाय माणसाच्या हाताला ती शक्ती लागू शकत नाही. तर जेव्हा आपला योग घडतो, तेव्हा हा आत्मा आपल्या चित्तात येतो. आतापर्यंत आपला आत्मा आपल्या चित्तात नाही. आतापर्यंत आपल्याला तो आत्मा बघत असतो. ‘क्षेत्रज्ञ’ असं म्हटलेलं आहे त्याला कृष्णानी. पण त्याला ह्या क्षेत्रात प्रवेश नाहीये. आपल्याला तो कळत नाही कुठे आहे, कसा वाहावतोय किंवा काय ? पण जेव्हा ही योग क्रिया घडते, तेव्हा आपल्या चित्तामध्ये, आपल्या चित्तामध्ये तो आत्मा येऊन चैतन्याच्या लहरी हातातनं वाहू लागतात. हे त्याचं लक्षण आदिशंकराचार्यापासनं सर्वांनी सांगितलंय. बायबलमध्ये सुद्धा कूल ब्रिझ ऑफ द होली घोस्ट म्हटलेलं आहे. होली घोस्ट म्हणजे आदिशक्ती. आणखीन कुराणात सुद्धा त्याला रुह असं म्हटलेलं आहे. कुराणात तर इथपर्यंत म्हटलंय की जेव्हा उत्थानाचे दिवस येतील तेव्हा तुमचे हात बोलतील. तर ज्यावेळी तुमच्या आत्म्याला कसंही करून जर चित्तात आणलं तर हे घडलं पाहिजे. पण त्याची व्यवस्था आपल्यामध्ये काय करून ठेवली आहे परमेश्वराने.

तर त्रिकोणाकार अस्थिमध्ये कुंडलिनी म्हणून एक शक्ती साडेतीन वेटोळे घालून बसलेली आहे. आता आपल्याला आश्चर्य वाटेल की सर्व विश्वाची कुंडलिनी या महाराष्ट्र भूमीत आहे. आता तुम्ही म्हणाल कशावरून ? आपण ऐकलंच असेल की महाराष्ट्रात साडेतीन पीठं आहेत. कुणाला खरं वाटणार नाही, की हे कशावरून ही पीठं आहेत . कारण अजून तुमचं आत्म्याचं दर्शन झालेलं नाही. ज्या दिवशी तुम्ही योगीजन व्हाल, तेव्हा तुम्ही जाऊन जिथे ही पीठं आहेत, म्हणजे आता सप्तशृंगीला अर्ध मात्राचं पीठ आहे म्हणतात. आता आमच्या बरोबर पुष्कळ फॉरेनचे योगी लोक आलेत. ते सगळे बघायला गेले होते. तर खालूनच म्हणजे वर जायच्या आधीच, खालूनच इतक्या चैतन्याच्या लहरी येत होत्या की त्यांना ते पटलं. पण तुम्हाला कसं कळणार ? जर कोणी म्हटलं की हा विनायक आहे, अष्टविनायक आहे, हा खरा की खोटा ? कशावरून हे विनायक पृथ्वीच्या आतून आले आहेत ? आणि हे आपण म्हणतो स्वयंभू आहेत, स्वयंभू कशावरनं ? कोणच्या दगडाला आपण म्हणू शकतो ? ओळखायचं कसं ? तर जो मनुष्य योगीजन होतो, ही कुंडलिनीच्या उत्थापनानंतर जेव्हा त्याचा आत्मा त्याच्या चित्तात येतो तेव्हा त्याच्या हातातून अशा ज्या लहरी वाहू लागतात, तेव्हा त्याने जाऊन जर बघितलं तर त्याच्या हातात लगेच लक्षात येईल की हे स्वयंभू आहे किंवा नाहीत .

तर अजून आपली जी चेतना आहे ज्यानी आपण डोळ्यांनी बघतो, कानांनी ऐकतो, नाकानी वास घेतो, ह्या ज्या चेतना आहेत ह्या अजून संपूर्णाला आलेल्या नाहीत. ह्या अजून अधुऱ्या आहेत. म्हणून आपल्याला कळत नाही. आता कुणाला जर म्हटलं की बाबा तू हे पाप करू नकोस, तर ऐकलं तर ऐकलं, नाहीतर नाही, बुद्धीचा खेळ आहे. त्याच्या बुद्धीला पटलं,करेल, नाहीतर नाही करणार. कारण बुद्धीचा काही ठिकाणा नसतो. काहीही करेल तरी बुद्धि म्हणेल, हे केलं, मी ठीकच केलं. गांधीजींचा खून करून सुद्धा त्यांचा खुनी म्हणाला, मी चांगलंच केलं गांधीजींना मारून. तेव्हा ह्या बुद्धीला काही अर्थ राहिलेला नाही. ह्या बुद्धी पलीकडे असं काहीतरी असायला पाहिजे. की ज्याचं उत्तर ‘प्रमाण’ असायला पाहिजे. त्याच्यावर उत्तर नसलं पाहिजे आणि तो म्हणजे तुमचा आत्मा. जेव्हा तो आत्मा तुमच्यातनं वाहू लागतो, जेव्हा ही क्रिया तुमच्यात घटते, तेव्हा हातातून अशा चैतन्याच्या लहरी वाहू लागल्या आणि ह्या चैतन्याच्या लहरी वाहू लागल्यावरती आपण समजायचं की आमचा योग सिद्ध झाला. पण तरीसुद्धा ही सिद्धता जरी झाली तरी ते वापरून पाहिलं पाहिजे. जसं म्हणजे आता आपल्याला जर आम्ही एखादी मोटर गाडी दिली आणि मोटर गाडी दिल्यावर सुद्धा ती चालू झाली. पण आपल्याला कशी वापरायची ते जर कळलं नाही तर ते वाया गेलं की नाही सगळं?

म्हणजे आपण ज्याला योग म्हणतो त्याला दोन अर्थ असतात. योग म्हणजे योग जिथे तुमचा संबंध परमेश्वराशी येतो तो, आणखीन त्याला एक गृहित अर्थ आहे की योग म्हणजे युक्ती, म्हणजे त्याची कुशलता. ज्या योग्याला त्याची कुशलता माहित नाही, म्हणजे असंच आहे की जर प्रकाशाला हेच माहित नाही की माझ्यातन प्रकाश निघतो आहे तर त्याचा काय फायदा, तो कुठे जाऊन पडायचा तिकडे. ज्या माणसाला हेच माहीत नाही की माझ्यातून तो प्रकाश वाहतो आहे आणि तो कसा वाहतो आहे ? आणि त्याचा मी उपयोग कसा करून घ्यायचा ? ते कसं वापरून पाहायचं ? ह्याचं तंत्र कसं वापरायचं? हे जोपर्यंत तो समजून घेत नाही तोपर्यंत योग पूर्णत्वाला आला नाही.

शिवबानं सांगितलं होतं की, ‘स्व’ चं तंत्र ओळखलं पाहिजे. स्वतंत्र - स्वातंत्र्य नव्हतं म्हटलं त्यांनी. ‘स्व’ चं तंत्र म्हटलं होतं. ‘स्व’ म्हणजे आत्मा. ह्याला ज्याला ऑटो म्हणतात तो ‘स्व’. ह्या ‘स्व’ चं तंत्र आपण ओळखलं पाहिजे. पण ओळखण्यापूर्वी त्याची भेट तर व्हायला पाहिजे. तो मिळाला तर पाहिजे. म्हणून पहिल्यांदा सहज योग हा घडतो आणि सहजयोगा नंतर जेव्हा आपण ते शिकून घेतो, त्याची कला आपण जेव्हा शिकून घेतो, तेव्हा आपण म्हणू शकतो की खरा आपल्याला, त्या कुशलतेचा वगैरे सबंध अंदाज आल्यावर आपल्याला पूर्णपणे पटतं की हा जो आत्मा आहे, हा आपल्या मध्ये आहे. त्याची जाणीव होते. ते आपण जाणून घेतो.

आता पुष्कळसे लोक आहेत, आत्मसंमोहन करून घेतात. म्हणजे आम्ही म्हणजे मोठे योगी आहोत म्हणून फिरत असतात. काही लोक येऊन मला म्हणाले की माताजी माझी कुंडलिनी जागृत झाली, असं का म्हटलं ? मग तुम्ही करता काय ? आम्ही म्हणे बेडकासारखे उडतो. अहो म्हटलं, आता तुम्ही काय बेडूक होणार आहात का ? डोकं वापरा म्हटलं, डोकं नाही काय तुम्हाला ? आता तुम्ही बेडूक होणार आहात का ? आणि जे काय व्हायचं तो अंतर्योग असतो. तो बाहेर तुम्ही उडायला, कुणीही उडू शकतं. कुणाला सांगितलं, बेडकासारखं उडायला तर येतं, पण कुंडलिनीचं जागरण पुष्कळ लोकांच्यामध्ये तुम्ही डोळ्याने बघू शकता की त्रिकोणीकार अस्थीमध्ये स्पंदन होतं म्हणजे जिवंतपणा येतो. आणि ते स्पंदन जर तुम्ही कानाला स्टेथोस्कोप घातला तर अगदी बघू, ऐकायला येतं. इतकंच नव्हे तर पुष्कळांना डोळ्यांनी सुद्धा दिसू शकतं जर ते हळूहळू चाललं असलं तर. पण बहुतेक लोकांची कुंडलिनी सटकन वर येते.

आता ज्ञानेश्वरीला असं म्हणतात की गीतेला सर्वसामान्यात आणण्याचं कार्य ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे. तसंच योगाला सुद्धा सर्वसामान्य माणसाला जर आणलं नाही तर त्या योगालाही काही अर्थ राहत नाही. एखादा जर योगीजन आला तर त्यांना छळण्या पलीकडे सामान्य जनांनी काहीच केलं नाही आज पर्यंत. कोणीही साधु संत आले तर त्यांचा कसा छळ करायचा यापलीकडे सामान्य जनांनी त्यांची मदत फारच कमी केली. एखाद्याच माणसाने त्यांची मदत केली आहे आणि ज्याने मदत केली आहे त्यालाही मारलेले आहे. तेव्हा सगळ्यांनाच संत करून टाकायचं, तेच बरं आहे आणि ह्या दृष्टीने हा आज सहजयोग महायोग झालेला आहे.

सहज योग म्हणजे अनादि आहे. इंद्राला सुद्धा सहजयोगाने आत्मसाक्षात्कार झाला होता, असं म्हटलेलं आहे आणि त्याची एक जागा सुद्धा आपल्या कन्याकुमारीच्या जवळ आहे. तेव्हा आत्मसाक्षात्कार हा मिळवलाच पाहिजे की ज्याच्यासाठी लोक वाट्टेल ते धडपडतात. वाट्टेल ते करतात. पण हे लक्षात ठेवलं पाहिजे की आत्मसाक्षात्कारासाठी जर तुमच्याकडनं कुणी पैसे घेत असला तर तो मनुष्य आत्मसाक्षात्कारी नाही. तो खोटा मनुष्य आहे. कारण परमेश्वराला पैसे कसे खातात ते माहीत नाही. पण आपल्याकडे इतके धर्मभोळे लोक आहेत, की आता मी गावां-खेडयांत गेले की मला आणून काहीतरी दहा पैसे - पाच पैसे घालतात आणि मी म्हटलं की आम्ही पैसे घेत नाही तर बरं आम्ही तुम्हाला वीस पैसे देऊ का असं म्हणतात. त्यांना कितीही समजावून सांगितलं की बुवा परमेश्वराला पैसे नकोत. काही तुम्हाला पैसे द्यायला नकोत. पैशाने परमेश्वराला विकत घेता येत नाही, पण माणसाच्या डोक्यातच हे जात नाही, की असं कसं आहे की जगात परमेश्वराशिवाय बाकी सर्व गोष्टींना आपण पैसे देतो. मग या परमेश्वराला पैसे का नाही लागत ? पण तसं पाहिलं तर पुष्कळ गोष्टींसाठी आपण देतच नाही एकही पैसा. आता तुमचा जन्म झाला तेव्हा तुम्ही किती पैसे परमेश्वराला दिलेत ? पहिल्यांदा हे विचारलं पाहिजे. बरं तुम्ही रोजच हे बघता की फळं झाडावर होतात, फुलं होतात, त्याच्यासाठी तुम्ही किती पैसे देता ? अहो आता इथे बसून तुम्ही ही जी हवा आहे ती आपल्या आत मध्ये जाते, बाहेर जाते, तुम्ही आता जिवंत आहात सगळेजणं यांच्यासाठी किती पैसे आपण परमेश्वराला देतो ? कोणत्याही महत्त्वपूर्ण गोष्टीसाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. फालतू गोष्टींसाठी आपण देत असतो. जी खरी गोष्ट परमेश्वराची आहे त्याच्यासाठी तुम्हाला पैसे द्यायला नकोत. आणि जर कोणी भामटा तसं करत असेल तर त्याला स्पष्ट सांगायचं की तू महाभामटा आहे. आणि त्यामुळे आपली देवळं खराब झालेली आहेत, आपले धर्म खराब झालेले आहेत आणि धर्मगुरू त्याहूनही दुष्ट झालेले आहेत. तेव्हा अशा लोकांना सांभाळून ठेवले पाहिजे. मी मुद्दामहून आज सांगायला आलेले आहे की खेडेगावातून विशेषे करून हे प्रकार फार वाढलेले आहेत.

दुसरं असं म्हणजे अशा भामट्या लोकांकडे गेलं तर अनेक रोग होतात. पैकी दुसरा प्रकार जो खेडेगावात फार होतो आणि फार तो वाईट प्रकार आहे म्हणजे अंगात वारे येणे. हे म्हणजे नुसती भूतविद्या. एखाद्या माणसाच्या अंगात जर भूत आलं तर त्याला आपण म्हणतो ह्याच्या अंगात देवी आली आहे किंवा त्या बाईच्या अंगात देवी आली आहे. किंवा एखाद्या माणसाला आला, तर खंडोबा आला. पण खंडोबाला अंगावर घ्यायला हा माणूस कसा आहे ते तर पाहिलं पाहिजे. तो वाट्टेल ते धंदे करतो. वाट्टेल तसा वागतो. त्याला काही अक्कल नाही. पण त्याच्यात खंडोबा यायला तोच एक मोठा विशेष कुठून मिळाला ? किंवा ती बाई जी भांडी घासते आणखी रात्रंदिवस शिव्या देत असते, ती भांडकुदळ. तिच्यामध्ये देवी यायला असं काय झालंय देवीला तिच्याबद्दल प्रेम, हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण त्याच्या पुढचंही लक्षात ठेवलं पाहिजे की अशा लोकांच्याकडे जर तुम्ही जाऊन आणि त्यांना त्यांच्या पायावर आपलं डोकं वगैरे ठेवलं तर मी खबरदार तुम्हाला सांगते की याचे इतके दुष्परिणाम होतात की लोकांचे डोळे जातात. मी पाहिलंय आता, कितीतरी केसेस पाहिल्यात की अशा लोकांच्या पायावर ज्यांनी डोकं ठेवलंय, त्यांचे डोळे उघडे आहेत आणखी एकदम आंधळे झालेले आहेत. कितीतरी मी लोक असे मी पाहिलेले आहेत. तेव्हा कृपा करून आता कुणीही असे वारे आलेल्या बायकांच्याकडे किंवा पुरुषांच्याकडे जायचं नाही. त्यांना घरात असले तर पागलखान्यात भरती करावं किंवा त्यांचा इलाज करावा. पण ती माणसं काही नॉर्मल नसतात. त्यांच्यामध्ये भूतं असतात आणि ही भूतं जर तुम्हाला धरली तर सगळ्यात पहिल्यांदा आंधळेपणा येतो. दुसरा कॅन्सरचा रोग सुद्धा अशा भुतांनीच होतो. आता डॉक्टरांनी मान्य केलेलं आहे की भुतं तर ते म्हणत नाहीत. प्रोटीन फिफ्टी एट (58) आणि फिफ्टी टू (52)असं म्हणतात. नाव काय दिलं तरी असतात ती भूतं. भुताला काही नाव दिलं तरी बदलणार कसं ? इंग्लिश नाव द्या किंवा इंडियन नाव द्या. आहे तर ते भूतच. आणि ही सगळी भूतं ह्यांच्या अंगावर आल्यावर तुम्हाला त्याच्यात एवढं काय वैशिष्ट्य वाटतं हेच मला समजत नाही. तेव्हा ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं पाहिजे की आपण जरी सहजयोगात आल्यावर पुष्कळ लोक मला असं कळलं की तरी वारं आलं की लोक त्यांच्याकडे जातात म्हणजे लोकांना डोकं आहे की नाही ? अहो तुम्ही संत झाले, साधू झाले. आणि या वारे वाल्यांच्याकडे कशाला जाता तुम्ही ? आणि ते तरी तुम्हाला काय सांगणार ? जगातल्याच गोष्टी की तुझा बाप कधी मरेल आणि तुझी आई कधी मरेल ? परमेश्वराला काही या गोष्टींचा काही संबंध आहे का ? परमेश्वर तुम्हाला जे द्यायचं ते परमच् देणार. जे मुख्य आहे तेच देणार आहे. जे तत्त्व आहे तेच देणार आहे. फालतूच्या गोष्टी तुम्हाला देण्यासाठी परमेश्वर बसलेला नाही. तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे की वारेवाल्या लोकांच्याकडे जायचं नाही.

दुसरी गोष्ट म्हणजे, की हे संन्याशी बाबा लोक सगळीकडे फिरत असतात. आता आपल्या ह्या एरियामध्ये एक स्वामी नित्यानंद झाले, ते खरे होते. पण ते कुणाला भेटत नव्हते, कुणाकडंनं काही पैशे घेत नव्हते किंवा काही नाही, आपले बिचारे, त्यांना सगळे लोक मारायला जायचे, म्हणून ते सगळ्यांना मारायचे आणि म्हणायचे, मला कोणाला भेटायचं नाही. बाकी मात्र, इतके भामटे इथे बसलेले आहेत की त्यांचा आता मला हेच कळलं की एका भामट्याने इथे पुष्कळ हिरे-बिरे लपवून ठेवलेले आहेत. त्याच्यावरनं दोघांची, त्यांच्या शिष्यांची भांडणं चाललेली आहेत. आणि अशा लोकांच्या आहारी जाऊन मनुष्य आपली सगळी मालमत्ता त्यांना देऊ देतो. आपली बायका-पोरं त्यांना देऊ देतो. म्हणजे आहे तरी काय ? हा विचार केला पाहिजे की ह्या माणसाने आम्हाला काहीतरी आतमधून असं केलं तर नाही, की ज्याच्यामुळे आम्ही याच्याकडे वहावत चाललो आहे ? मुख्य म्हणजे असं लक्षात ठेवलं पाहिजे की जो मनुष्य खरोखर म्हणजे संन्याशी आहे त्याचा आपल्या गृहस्थाशी काय संबंध ? आम्ही गृहस्थाचे लोक म्हणजे यज्ञात आहोत. आम्ही आपली मुलं-बाळं सांभाळतो. आम्हाला नातू, पणतू सगळे काही आहेत. चार नातलगांना धरून आम्ही आपला संसार व्यवस्थित संतुलनात चालवतो आहोत. आणि हे कुठून बाहेरून आता संन्याशी आले, त्यांनी संन्यास घेऊन जंगलात राहावं. हे आमच्या दमावरती सव्वा तोळे सोनं घाला वगैरे, ह्यांना सोन्याचं काय करायचं आहे ? ह्यांना पैशाचं काय करायचं ? हा पण असा विचार केला पाहिजे.

एक गृहस्थ होते. तर ते माझ्याकडे त्यांच्या बायकोला घेऊन आले. श्रीमंत फार होते. तर मला म्हणायला लागले, बाबांनी मला हिऱ्याची अंगठी दिली. असं का म्हटलं, तुम्हाला कशाला दिली ? तुमच्याकडे किती हिरे आहेत ? पुष्कळ आहेत. मग म्हटलं, तुम्हाला कशाला दिली, तुमच्या ड्रायव्हरला दिली असती तरी बरं झालं असतं. तुम्हाला कशाला दिली हिऱ्याची अंगठी ? नाही म्हणे आता त्यांनी मला दिली. म्हटलं असं का ? तुमच्यात जास्त श्रद्धा आहे, म्हणून तुम्हाला दिली ती. तर म्हटलं तुम्ही माझ्याकडे कशाला आलात, मी काही हिरे-बिरे देत नाही. तुम्ही माझ्याकडे उगीचच आलात. तर ते म्हणाले, आमच्याकडे दुसरा प्रश्न सुरू झाला आहे. म्हटलं, काय झालं ? आमच्या घरातले हिरे जात आहेत. असं का ? मग त्याच्या बायकोला मी बघितलं. तर ती नुसती भ्रमित. तिच्यावर काहीतरी त्याने संमोहन विद्या केलेली होती त्या माणसाने. तर ती लागली बोलायला. की ते बा असं आहे की माझ्यामध्ये एक मनुष्य आहे, तो मला असं सांगतो की सगळे हिरे तू बाबाजीला देऊन टाक. कारण हे बाबाजीला दिलेले बरे, हे दगड धोंडे कशाला तू ठेवतेस ? जरा उतरवलं तिचं ते भूत आणि म्हटलं,बाई तू एवढी डॉक्टर आहेस, तू असा विचार कर की तू समाजात राहणारी बाई आहेस, लग्न झालेली. तुझ्या नवऱ्याच्या कमाईचे दोन दागिने, तू लग्न झालेली बाई आहेस, तू अशी बोडकी तर फिरू शकत नाहीस ? तुला चार दागिने घालावे लागणार. म्हणून त्याने तुला दागिने दिले. पण हा संन्याशी, जो की भगवे वस्त्र घालून फिरतोय, त्याला कशाला दगड-धोंडे पाहिजेत. आणि जर ते तुला दगड धोंडे आहेत तर त्याला राख वाटायला पाहिजे की नाही ? तर तू त्याला कशाला देतेस मग ? तेव्हा तिच्या डोक्यात थोडासा प्रकाश पडला. पण अशा लोकांकडे गेल्यामुळे अनंत तऱ्हेचे रोग होतात. घाणेरडे रोग, वाट्टेल ते होऊन राहिलंय. आणि ह्याच्याचमुळे आपली गरिबी जात नाही. अशा माणसांकडे एकदा कुणी गेलं की त्याला हार्ट अटॅक येणार किंवा काहीतरी घाणेरडा रोग होणार किंवा त्याच्या घरातली सारी श्रीमंती निघून जाणार. तर मी आधी सांगून ठेवते की हे सगळे भूतांचे प्रकार आहेत, त्याला भानामतीचे प्रकार म्हणतात. तेव्हा ते जपून असावेत. देवाच्या नावाखाली हे प्रकार चालणार नाहीत. आणि जरी त्यांनी किती दिवस चालवले तरी शेवटी तो मनुष्य उघडकीला येतो. किंवा लोकांना कळतं की हे धतींग आहे. लोकांच्या लक्षात येतं. पण तेवढ्यात किती लोक बुडून तयार. अहो आम्ही बुडालेले, आम्ही बुडालेले. रस्त्यावर फिरतात लोक.

तेव्हा जे मुळात आहे ते जाणण्यासाठी तुम्हाला आत्म्याला शोधवलं पाहिजे आणि आत्म्याशिवाय जे जीवन सुरू होतं, ते जाऊन कोसळून पडतं. आता बघा मी सुद्धा परदेशात असते. माझ्याबरोबर बारा देशातले लोक आले आहेत. त्यांना आज आणलं नाही आम्ही. थकले फार होते म्हणून. त्यांची स्थिती बघा. त्यांच्या देशांमध्ये इतकी उन्नती झाली आहे, त्यांना सगळ्यांना मोटारी आहेत. चार-चार बंगले आहेत. खूप आरामात राहतात. सगळं काही आहे. पण एकाची बायको एका जवळ नाही. एकाचं मूल एकाजवळ नाही. मारामारी. तिथे लंडनला, लंडन शहरांमध्ये, तुम्हाला आश्चर्य वाटेल जे आपल्याहून मोठे राज्य करत होते एकेकाळी. त्या शहरी ही दशा आहे की लंडन शहरामध्ये, एका आठवड्यामध्ये दोन मुलांना आई-वडील मारून टाकतात. प्रत्येक आठवड्याला दोन मुलं मारली जातात. आणि चांगली मुलं. हे बघा, हे प्रगतीशील देश आहेत की आपल्या मुलांना मारतात. अहो जानवर सुद्धा असे करत नाहीत. म्हणजे अगदी पशु, त्याहूनही घाणेरडे लोक झालेले आहेत. म्हणजे काय म्हणावं यांना ? इतकेच जुलमी आणि खुनशी आहेत. हे असं जर तुम्हाला व्हायचं असलं तर असल्या प्रगतीला जायचं. प्रगती व्हायला हरकत नाही, पण आत्म्याशिवाय प्रगती करायची नाही. जोपर्यंत आपल्या हातामध्ये प्रकाश नसेल तोपर्यंत आपण जर कोणचीही प्रगती केली तर आपण कुठेतरी अंधारात जाऊन पडणार. म्हणून आधी प्रकाश मिळवला पाहिजे. आधी आपल्या आत्म्याला मिळवलं पाहिजे. आपल्यामध्येच आपला आत्मा आहे, आपल्याचमध्ये आपली कुंडलिनी आहे. फक्त चुकतं कुठे? मला असं कळलं की इथे सुद्धा पुष्कळ लोक पार झाले होते आणि मग हळू करत करत करत सगळे घसरले. त्याला कारण असं आहे, की आधी जे रोप, लहानसं अंकुर असं फुटलेलं असतं, तेव्हा त्याला जपावं लागतं, त्याची जपणूक जर नीट झाली आणि त्याची व्यवस्था नीटपणे करून जर तुम्ही त्याचा वृक्ष तयार केलात, तर अशा वृक्षाखाली हजारो लोक येऊ शकतात. एका दीपापासनं तुम्ही दुसरा दीप पाजळू शकता. ही गोष्ट जरी खरी असली तरी जो पाजळलेला दीप आहे, त्याला मात्र स्वतःला जपावं लागतं, की उद्या वाऱ्याने तो विझून जाणार नाही. एकदा तो जमला म्हणजे तो हजारो लोकांना सुद्धा मार्गदर्शन करू शकतो. ह्या देशाचं भवितव्य किंवा सार्‍या विश्वाचं भवितव्य आज ह्या गोष्टीवर अवलंबून आहे. आणि म्हणून तुम्हाला माझी अशी विनंती आहे की जरी तुम्ही शहापूरला राहत असला, जरी ही जागा लहान असली, तुम्हाला वाटेल माताजी इतक्याने सांगतात कळकळीने, पण तरी मोक्याची आहे, मोक्याची जागा आहे. इथे अनेक तर्‍हेचे लोक येतात. इथले, म्हणजे मुंबईकडचे लोक आहेत सुशिक्षित, आणखी परत मग इथले खेडे गावातले लोक आहेत अशिक्षित, अशा रीतीने सर्व तर्‍हेचे लोकं इथे आहेत आणि ह्यांच्यामध्ये जर तुम्ही हे कार्य सुरू केलं, तर तुम्ही फार मोठं कार्य कराल. आज ह्या भारतामध्ये, महाराष्ट्र सगळ्यात मोठा देश आहे. आणि संतांची जरी ही भूमी म्हटली तरी सुद्धा त्याहून मी म्हणेन की इतकी पवित्र भूमी आहे इथे की श्रीरामांनी आणि सीतेने सुद्धा पायातल्या वहाणा काढल्या होत्या दंडकारण्यात यायला. तर ह्या दंडकारण्यात बसून, एवढ्या मोठ्या पवित्र स्थितीत असून आणि जर तुम्ही या संपदेचा फायदा करून नाही घेतला तर लोक काय म्हणतील ? किमान आपण काय आहोत? आपण कुठे आलेलो आहोत ? आपली काय प्रतिष्ठा आहे ? आपल्यापासून जगाला काय अपेक्षा आहेत? उद्या तो दिवस येईल. आज बारा देशातले लोक इथे आलेत. महाराष्ट्राला बघायला आणि आजही इथे येण्यासाठी फार हे होते, पण मी म्हटलं तुम्ही थकले तर राहू द्या. आज काय त्यांना मी आणलं नाही. पण हे लोक आलेत, आज हजारो देशातले लोक इथे येतील, तुमच्या दर्शनासाठी. पण आधी तुम्ही कोण आहात हे लक्षात घेतलं पाहिजे. समजा तुम्हाला सिंहासनही दिलं आणि सिंहासनावर बसून तुम्ही जर भीकच मागत बसलात, तर लोक म्हणतील हा कसला राजा बसवलाय सिंहासनावर? तशी स्थिती आहे म्हणून आपण कोण आहोत? आपण कुठे राहतो ? आपली काय स्थिती आहे आणि जगाला आपल्यापासून काय अपेक्षा आहेत ते समजून घेतलं पाहिजे. तेव्हा अशा बेकारच्या वस्तूंमध्ये आपण लक्ष नाही दिलं पाहिजे.

सहजयोगामुळे तुमचे सर्व आजार जातील. डॉक्टरांची बिलं तुम्हाला भरावी लागणार नाही. तुमची सगळी दुःखं दूर होतील. तुमचे जे काही पैशाचे प्रश्न आहेत ते सोडवले जातील. हे सगळे लौकिक प्रश्न तर सहजच सोडवले जातील. पण समजा जर एखाद्या झाडाला, एखादं पान जर खराब असलं तर त्याला वरून तुम्ही काहीजरी दिलं तरी तात्पुरतं होणार आहे. पण जर तुम्ही मुळातच त्याला पोषक असं काही दिलं, तर ते सबंध झाडात पसरतं, तसंच सहजयोग आहे. अनेक लोकांची दुःखं ठीक होतात. मोठंमोठे दारू पिणारे लोकांनी आपोआप दारू सोडली. मी कोणाला म्हणत नाही, दारू सोडा कारण तसं म्हटलं तर अर्धे लोक चालू, निघून जायचे. मी तसं कोणाला काही सांगत नाही. पण हे आपोआप सगळं घडतं. सर्व व्यसनं सुटून तुम्ही अगदी मुक्त होता. कुणाची तुम्हाला गुलामी करायला नको. पण असा मुक्त मनुष्य दुसऱ्यांच्यावरती आक्रमण करत नाही किंवा कोणाचं आक्रमण घेत नाही, त्याला समर्थ करून परमेश्वर उभा करतो. तेव्हा जे रामदास स्वामींनी आपल्याला सांगून ठेवलेलं आहे की समर्थाचिया वक्र पाहे असा ह्या त्रिभुवनात कोणी नाहीये, असे तुम्ही लोकं आहात.

तेव्हा या योगाला प्राप्त करावं. त्याच्यामध्ये स्वतःला स्थापन करावं आणि एक मोठा असा समाज उभा केला पाहिजे. जोपर्यंत असा समाज उभा करणार नाही, तुमचं राजकारण वगैरे अगदी बेकार आहे. त्याला काही अर्थ नाही. कारण नुसता बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी आहे. परवा एक समाजवादी आले माझ्याशी भांडायला. म्हणे माताजी तुम्ही गरिबांची सेवा नाही करत का ? तर म्हटलं मला गरीब-श्रीमंत वगैरे काही माहित नाही कारण मला कोणाकडनं जर पैशेच घ्यायचे नाही तर गरीब श्रीमंत कोण मोजत बसणार आहे ? कोणी माझ्या समोर आला तर माझा स्वभाव पाण्यासारखा आहे. जिथे गड्डा असेल तिथे भरून काढणारा आहे आणि पुढे जाणार. तेव्हा आम्हाला हे तुम्ही काही सांगू तुमचा समाजवाद. पण एवढं मला माहित आहे की तुम्ही नुसतं डोक्याने समाजवाद आहे आणि तोंडाने बोलता, माझा समाजवाद कार्यान्वित आहे, तो कार्य करतो, तो वाहतोय. त्याचा फायदा होतो लोकांना. तुम्ही नुसतं तोंडाच्या गप्पा मारून मारून समाजवादी झालेले आहात. मग त्यांचं तोंड बंद झालं आणि चूप झाले. सर्व हे जे काही म्हणणं आहे. आता कम्युनिझम पाहिजे. पुष्कळ म्हणतात की कम्युनिझम आलं म्हणजे फार चांगलं होईल. सगळ्यांना रशियाला पाठवा म्हणजे कळेल काय असतं कम्युनिझम म्हणजे काय ? आम्ही जाऊन आलेलो आहे. आणि कॅपिटॅलिझम म्हणजे काय हे इंग्लंडला जाऊन बघा. पण सहजयोगात आम्ही म्हणतो आम्ही मोठे भारी कॅपिटॅलिस्ट आहोत. आम्ही पाठ्यपुंजीवादी आहोत कारण सगळी शक्ती जर आमच्या जवळ आहे तर आम्ही सगळ्यात आहोतच पूंजीवादी. पण सगळ्यांना वाटल्याशिवाय चैन येत नाही म्हणून घर-दार सोडून तुमच्या मागे, आम्ही तुमची आर्जवं करत बसलेलो आहोत. तेव्हा सगळ्यांनी शहाणपण धरावं.

सहजयोगाचा विषय इतका मोठा आहे की या थोड्या वेळामध्ये आणखी त्याला सांगता येणार नाही विस्तारपूर्वक. तरी अनेक आमच्या टेप्स वगैरे आहेत. जर तुमचं इथे सेंटर व्यवस्थित सुरू झालं, तर तुम्ही ते टेप्स ऐकू शकता. आम्ही तुम्हाला टेपरेकॉर्डर पण सेंटरला पाठवू. तसेच आमचे फोटो वगैरे पाठवू. आणखी व्यवस्थित इथे कार्य सुरू होऊ शकतं . पण पहिल्यांदा हा निश्चय केला पाहिजे की एकदा आम्हाला जागृती झाल्यावर आम्ही त्याचं तंत्र शिकून घेऊ. नाहीतर जागृतीला काही अर्थ नाही आणि आमच्या मेहनतीलाही काही अर्थ राहणार नाही.

आता मला परत जायचं आहे. आणि म्हणून मी सर्वांची इथे आभारी आहे. ज्या सहजयोगी मंडळींनी ही व्यवस्था केली त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांचे आभारी आहोत. तसंच आपल्या शहापूरचे जे लोक आहेत, जे इतका वेळ बसले, ताटकळून गेले आणि परत आले त्यां सगळ्यांची मी आभारी आहे. पण पुढच्या वेळेला मात्र आपण व्यवस्थित प्रोग्राम करू. इथे चांगला प्रोग्राम करूयात. आणि मंडळींना पूर्णपणे समाधान वाटेल अशा रीतीने मी इथे राहीन. आज इतका वेळ नाहीये. तरी आपण मला क्षमा करावी. बाकी एखादा प्रश्न असला तर विचारा आणि मग आपण जागृतीचं कार्य सुरू करू........ पाणी ....आणि मुलांनी सुद्धा नुसत्या टवाळक्या करून आपलं आयुष्य घालवायचं नसतं. कळलं का ? नुसत्या टवाळक्या करायच्या नाहीत. नीटपणे प्रश्न विचारा. प्रश्न फार गंभीर आहे. ( भारतमाता की जय ) हा.. आता प्रश्न विचारा ? हा...(सगळे दगड मारतात मागून..)...कोण? (मागून आला दगड....) आता तुम्ही दगड-बिगड मारायला तेवढंच एक राहिलंय का ? आता दगडे व्हा तुम्ही? आणखीन काही येत नाही.....वा..वा... अगदी महामूर्ख लोकं आहेत. कारण काय आहे की अक्कल तर काही नाही आणि परत म्हणतात ना की उथळ पाण्याला खळखळाट फार. ते आहे. उथळ पाण्याला खळखळाट असणारच. त्याशिवाय त्याच्या पलीकडे आहे काय त्यांच्यात ? आता दगड मारा आणि धोंडे घेऊन या डोक्यात. त्या पलीकडे आणखी काही करताच येत नाही. तेच मी म्हणते की खुनशीपणा येऊन राहिलाय लोकांमध्ये. (भारतमाता की जय !) काय तुमचं भारतमाता, बघू बरं इकडे या. भारतमाता. नुसता जयजयकार करून काय मिळवलंत तुम्ही ? बोला ना ? अशे भ्याडासारखे कशाला करता ? दगड कशाला फेकता ? इकडे या समोर. असेल हिंमत तर समोर या. तिकडे भ्याडासारखे बसून काय दगड फेकून राहिलाय बायकांवर? त्यापेक्षा जाऊन साड्या नेसा. मूर्ख कुठले ? खबरदार जर कोणी दगड-बिगड फेकला तर ? प्रश्न असेल तर विचारा काही? तुम्हाला प्रश्न असेल तर? मोठे आले भारतमाताची जय गाणारे? आहे का काही प्रश्न? नसेल तर आता पण थोडंसं ध्यानात जाऊ या. बरं का . हां. या, इकडे या.

त्रयस्थ : तुम्ही आतापर्यंत जे तत्वज्ञान सांगितलं सगळं ते सगळं या

भूमीतलंच आहे?

श्री माताजी : कुठल्या?

त्रयस्थ : या आपल्या भारतभूमीतलंच आहे काय? म्हणजे रामदासांचा तुम्ही उल्लेख केलात, ज्ञानेश्वरांचा उल्लेख केलात. ते सगळं या भूमीतलंच आहे. तर ह्याला आपण हिंदू तत्त्वज्ञान असे म्हणतो. म्हणजे अनादिकालापासून आहे.

श्री माताजी : हा. बरोबर आहे. मग?

त्रयस्थ : साधारणपणे पाच हजार वर्षापासून याला आपण हिंदू तत्वज्ञान असं म्हणतो.

श्री माताजी : बरं मग?

त्रयस्थ : मग तसा उल्लेख का नाही केला?

श्री माताजी : काय, म्हणजे काय उल्लेख केला पाहिजे ? अहो आदिशंकराचार्यांना तुम्ही वाचलंय का? हिंदू तत्त्वज्ञान तुम्ही सांगणारे मला ? आधी जाऊन तुम्ही. मी आदिशंकराचार्यांचं नाव घेतलंय ना. हे बघा, तुम्ही लोक जे, इकडे या. हे बघा. तुम्ही शहाणे आहात. इकडे या. इकडे या .मला कळलं तुम्ही काय आहे ते ? मी स्वतः हिंदू धर्माला वाचवून राहिलेय, तुम्ही लोक नाही.

त्रयस्थ : तसं नाही. पण हिंदू धर्माचं तत्त्वज्ञान आहे ते तुम्ही सांगा की ?

श्री माताजी : मग अर्थातच. मग काय ?

त्रयस्थ : तुम्ही सांगा ना असं.

श्री माताजी : मग असं काय तुम्ही हिंदू धर्माचे काय ठेकेदार आहात ?

त्रयस्थ : ठेकेदार आहात असं कसं म्हणता ?

श्री माताजी : नाही मग ?

त्रयस्थ : हे तत्त्वज्ञान या भूमीत रुजलेलं आहे की नाही ?

श्री माताजी : हो अर्थातच.

त्रयस्थ : हा मग

श्री माताजी : मग काय ?

त्रयस्थ : मग हिंदूंचं तत्वज्ञान असं तुम्ही म्हणा की.

श्री माताजी : हिंदूंचं म्हणजे तुम्ही हिंदू आहात असं तुम्हाला वाटतं का ?

त्रयस्थ : म्हणजे काय ?

श्री माताजी : मला नाही वाटत.

त्रयस्थ : त्याचं असं आहे. (श्री माताजी निर्मला देवी की जय )( गोंधळ....)

श्री माताजी : नाही नाही. तुम्ही नाही. जे हिंदू लोक असतात, जे हिंदू लोक असतात.

त्रयस्थ : हिंदूंची व्याख्या करा ना.

श्री माताजी : हिंदू लोक. ते बघा ऐका. हिंदू लोक ते. ऐका ऐका. हिंदू लोक ते. अहो, काय प्रतिष्ठा ?

( भारत माता की जय)

श्री माताजी : काही प्रतिष्ठा तरी आहे काय त्यांना हिंदू लोकांची ? ए, पागल. गुंडगिरी करणं हे हिंदू धर्माचं लक्षण नाहीये. तुम्हाला माहीत आहे शिवाजी राया.

आ.... त्यांनी बायकांना दगड मारले होते ? तुम्ही लोक हिंदू धर्म म्हणता ?

काय हो ?

त्रयस्थ स्त्री : २-४ दगडं आलेत या इकडे.

श्री माताजी : आता हिंदू धर्माचं मुख्य लक्षण काय आहे ? शक्तीचे उपासक आहेत. हिंदू लोक शक्तीचे उपासक आहेत आणि आत्मज्ञानाचे वेडे आहेत. आत्म्याचं ज्ञान मिळवलं पाहिजे. हे सर्व हिंदू धर्मात, हिंदू शास्त्रात सांगितलेलं आहे. दगड मारायला नाही शिकवलंय.

त्रयस्थ : ( अस्पष्ट...गोंधळ...)

श्री माताजी : पण तुम्ही काय त्यांना सांगितलेलं आहे? मी म्हणते. तुम्ही त्यांना म्हणावं,

येऊन बसा. मी तुम्हाला हिंदू धर्म शिकवते. बसा. तुम्ही जोपर्यंत

समर्थ होणार नाहीत हिंदू लोक, तोपर्यंत तुम्ही हिंदू नाही. समर्थ. ऐकून घ्या. ऐकून घ्या. इकडे या. इकडे या. तुम्ही इकडे या. तुमचंच कार्य मी करत आहे. हे बघा .तुम्ही इकडे या. तुम्ही समर्थ व्हा असे मी म्हणतेय. वाईट का बोलतेय मी? बरोबर बोलतेय मी.

त्रयस्थ : मी त्यांचं समर्थन करतोय असं नाही.

श्री माताजी : माझं काय म्हणणं आहे. मी म्हणतेय, तुम्ही समर्थ व्हा. म्हणजे तुम्हाला जो

अर्थ आहे, तुम्ही हिंदू आहात ते तुम्ही व्हा. पण तसं नाहीये. लोक तसं

नाहीये.त्याचं तुम्ही पोलिटिकल बनवून ठेवलंय. पोलिटिकल नाहीये. हिंदू

धर्म काय आहे ?

त्रयस्थ : हे पोलिटिकल नाहीये. हे पॉलिटिकल बेसवरती विचारत नाहीये.

श्री माताजी : हा मग. बोलायला लागा. मग तत्त्वावर या. तत्व जे आहे. तत्व काय आहे की आत्म्याचं आपल्याला दर्शन झालं पाहिजे. कळलं. शिवाजी रायांनी सांगितलं आहे की ‘स्व’ चं तंत्र जाणलं पाहिजे .कळलं. तुम्ही जाणलं का, नाही जाणलं ? म्हणून मी म्हटलं, जाणून घ्या. आधी तुम्ही जाणून घ्या. आधी बसून जाणून तर घ्या. मग कळेल तुम्हाला मी काय बोलते ते. मग हिंदू धर्म किती विश्वव्यापी आहे तो कळेल. तो कुठला इथलाच नाहीये. इथला दगड मारणार नाहीये.

त्रयस्थ : नाही नाही. यांच्यावर तुम्ही जाऊ नका.

श्री माताजी : मी सांगते तुम्हाला. हे स्वतःला हिंदू म्हणवतात ना, पण ह्यांना काही आहे का ? कळलं का ?

त्रयस्थ : हिंदू तत्वज्ञानात कुठे म्हटलंय की सगळ्याचं ऐकलच पाहिजे असं....

श्री माताजी : हिंदू तत्त्वज्ञान असं नाहीये. हिंदू तत्वज्ञान आहे आत्म्याला आपल्यात उतरवलं पाहिजे.

त्रयस्थ : पण इतक्या लहान मुलांना कसं काय समजावून सांगणार ?

श्री माताजी : अहो, एवढ्या एवढ्या मुलाला सुद्धा येतं. म्हणून तर म्हणते, तुम्ही ऐकून तर घ्या शांतपणे मी काय सांगते ते. नुसतं इथं आपण ओरडून- आरडून हिंदू धर्म वाचवू शकत नाही आपण. हिंदू धर्माला कोणी नष्ट करू शकत नाही. पण कोण नष्ट करेल, आपणच. कारण आपण अज्ञानात अजून आहोत. ज्ञान जाणलं पाहिजे. ज्ञान जाणल्याशिवाय होणार नाही ना?

त्रयस्थ : मला एवढंच म्हणायचं आहे की तुम्ही हा जो प्रचार करत आहात, हिंदू धर्माचाच आहे की नाही ? मग तुम्ही सांगा की हा या भूमीतलाच आहे.

श्री माताजी : आम्ही कोणत्याही धर्माचा करत नाही .कारण काय आहे धर्म ही जी संस्था आहे, जी हिंदू धर्म संस्था म्हणवता, त्याच्यामध्ये आज पुष्कळशा संकुचित प्रवृत्या आलेल्या आहेत.

त्रयस्थ : आता ते विसरा. (अस्पष्ट आहे)

श्री माताजी : म्हणूनच. म्हणूनच.आम्ही तो शब्द वापरलेला नाही.कारण आज त्या शब्दाला विकृती आली आहे. समजा आता सुरती म्हणजे कुंडलिनी. आणि ती जर तंबाखूला सुरती नाव देऊन ठेवलंय? तर आम्ही सुरती शब्द का नाही गाळणार ?

त्रयस्थ : आताची लोकं आहेत त्यांनी विकृत केलेला आहे. ( अस्पष्ट...) हिंदू धर्म हा शब्द विकृत झालेला नाही.

श्री माताजी : हिंदू धर्मच विकृत करून ठेवलेला आहे तुम्ही. तोच तर सांगते मी.

त्रयस्थ : हिंदू धर्मातल्या लोकांनी विकृत केलेला आहे . याचा अर्थ हिंदू धर्म विकृत कसा होतो?

श्री माताजी : नाही. हिंदू धर्म नाही झालेला. पण ती व्याख्या ? त्याची लोकांना समजत नाही. आणि हा जो मी तत्वज्ञान सांगते हे आपल्या देशात झालेलं, मी स्वतः सांगतेय तुम्हाला.

त्रयस्थ : पण हिंदू तत्वज्ञान म्हणतात ना या सगळ्याला. आता भारतामध्ये कोणी या तत्वज्ञानाचा अभ्यास केला तर कुणीही म्हणेल की हिंदू तत्त्वज्ञानाचा अभ्यास केलाय म्हणून.

श्री माताजी : मी हिंदू नाही म्हणणार .एवढ्याचसाठी मी म्हणेन भारतीय. भारतीय शब्द

बरा आहे. त्याच्यापेक्षा भारतीय तत्त्वज्ञान ठेवा. पण हिंदू नका ठेवू. हिंदू

म्हणजे हे की गांधीजीला मारलं ते हिंदू तत्त्वज्ञान आहे ना?

त्रयस्थ : नाही. असं कसं म्हणता येणार?

श्री माताजी : म्हणतात ना ते .म्हणतच होते.

त्रयस्थ : पण कोण म्हणताहेत याचा अर्थ ते वस्तुस्थिती नाही .

श्री माताजी : माझं काय म्हणणं. शब्दजालात फसायचं नसतं. तुम्ही स्वतः आत्म्याचं दर्शन घ्या. स्वतः समर्थ व्हा. म्हणजे तुम्हाला कळेल. जे सांगितलेलं आहे ते मी करून दाखवणार. कळलं का ? असं करून तुम्ही समाजवाद्यांना महत्त्व देणार आहात. मी तुमच्याच तर्फे आहे आणि मी तेच तुमचंच कार्य करतेय, पण अजून हिंदू धर्माची पूर्ण कल्पना करून घ्या. त्याचा सगळ प्रगाढ रूप तुम्ही समजून घ्या. वरचं वरचं नका समजून घेऊ नुसतं.

त्रयस्थ : हिंदू धर्माने वास्तविक असं सांगितलंय की म्हणजे हिंदू धर्म असं म्हणतो की हे जे बायबल, आपलं मोहम्मद किंवा येशू ख्रिस्त आहे.

श्री माताजी : असं काही म्हटलेलं नाही.

त्रयस्थ : एका परमेश्वराचे सगळे मंत्र आहेत.

श्री माताजी : आम्ही तेच म्हणतोय. सगळं तेच आहे बेटा.

त्रयस्थ : आपण अनादी काळापासून सांगितलेलं आहे की नाही ?

श्री माताजी : हो. अर्थात आहेत ना. तर तेच मी सांगतेय, पण तुम्ही एका भाषणांमध्ये

माझं जजमेंट कसं करायचं?

त्रयस्थ : मी जजमेंट करत नाहीये.

श्री माताजी : मी तेच करत आहे. उलट तुमच्या उलट मी शहाणे लोक सांगते कसे आहेत ते . आम्ही याला गेलो कोणच्या गावाला बरं ? इचलकरंजीला. तिथे आम्हाला तुमच्यासारखे काही मुलं भेटले याच्यामध्ये. तर म्हणाले, माताजी आम्ही तुमच्या प्रोग्रामला आलो होतो. आम्ही तुमचे लेक्चर्स ऐकलेले आहेत आणि आम्ही ही संघटना येथे करत आहोत कारण येथे विज्ञान परिषद झाली. त्यांनी सांगितलं की हा हिंदू धर्म खोटा आहे म्हणून. तर तुम्ही सिद्ध करून द्या. कारण तुम्ही सिद्ध करून द्या की हिंदू धर्म हा किती उच्च प्रतीचा आहे. म्हणून आम्ही तुमच्यासाठी आलो. पण हे ऐकायला सुद्धा तयार नाहीत. त्यांना काय सांगायचं. जे हिंदू धर्माचं तत्त्व आहे तेच आम्ही घेऊन आलेलो आहोत. पण त्याच्यात सर्व धर्म समावलेले आहेत. आज मी काही हिंदू धर्मावर बोलत नव्हते. हे मी तत्वज्ञान सांगितलं ते सांगितलेलं आहे. ते तुम्ही आता तत्त्वज्ञान घेऊन आता त्याच्यात वाद विवाद न करताना पहिल्यांदा समर्थ व्हा. आपला आत्म योग

त्रयस्थ : आम्ही समर्थ होण्यासाठीच संघटना करतो.

श्री माताजी : पण संघटनाने मिळेना बेटा. मी तुला सांगते. मी तुला सांगते. माझा ऐकून घे.

त्रयस्थ : आता तुम्ही करता ही संघटनाच आहे ना ?

श्री माताजी : नाही नाही. ही जी संघटना

त्रयस्थ : तुमच्या शिष्य बाहेर जाऊन सगळ्यांना सांगणार की नाही म्हणजे संघटनाच करताय.

श्री माताजी : पण आमच्या संघटनेत आणि तुमच्या संघटनेत फरक आहे. काय फरक आहे तो समजून घ्या. तुम्ही आधी त्याच्यामध्ये आत्मसाक्षात्कार घ्या. जसे शिवाजी होते. योगी पुरुष. तुम्ही आधी योगीजन व्हा. योगिजन झाल्यावर तुम्ही संघटना करा म्हणजे जिवंत संघटना होईल. अशी मूर्खासारखी नाही होणार. त्याला काहीतरी अर्थ लागेल. कळलं का तुम्हाला ?

त्रयस्थ : तुमच्या म्हणण्याप्रमाणे या सर्वांना सुधारायचं असेल तर शेवटी काहीतरी संघटनाच केली पाहिजे की नाही ?

श्री माताजी : पण संघटना जर तुम्ही आधी केली आणि त्याला जर आत्म्याची साथ नसली तर ती पडून जाणार.

त्रयस्थ : हे पहिल्यांदा शिकवायला पाहिजे.

श्री माताजी : मी तेच सांगून राहिले. तुम्ही आधी आपल्या आत्म्याला प्राप्त व्हा. आत्म्याला प्राप्त झाल्यावर देव कुठेत? त्यांची स्थानं आपल्या मध्ये कुठे आहेत ? कृष्ण कुठे आहेत आपल्यामध्ये ? आता ह्या लोकांना गणपती काय आहे हे माहीत नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल. तुम्ही जरा आमच्या फॉरेनर्सशी बोलाल तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. त्यांना गणपती काय आहे ? कुठे आहे?

सगळं माहित आहे. तुम्हाला माहित आहे का गणपती तुमचा कुठे आहे किंवा कृष्ण कुठे आहे? नाय नाय. एक सांगायचं असं की आपल्यामध्ये

जे....

त्रयस्थ : परमेश्वराला कोणी कोणत्या दबावाखाली...

श्री माताजी : नाही. तसं नाहीये. हे अज्ञान आहे. हे अज्ञान आहे बेटा .नाही नाही. सर्वच आपल्यामध्ये आहे. ( गोंधळ....)पण ते कुठेतरी आहे आपल्या मध्ये. आता त्याच्यासाठी सगळ्या मध्ये कोणी हिंदू धर्म संस्थापनार्थ कोणी केलेला आहे नंतर? म्हणजे सगळ्यांमध्ये आहे ज्याला रिव्हायवल म्हणतात.आदि शंकराचार्यांनी केलंय. आता आदि शंकराचार्यांनी जे सांगितलंय ते कार्य आम्ही करत आहोत.तेव्हा आधी शिकून तर घ्या बेटा. तुम्ही लोक तरुण आहात. शहाणे आहात. जे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. किंवा तुम्ही बाह्यातलं सांगताय. मी लौकिकातलं नाही सांगत आहे. मी म्हणते तुम्ही आधी अलौकिक व्हा. शिवबामध्ये जे होतं तो तुमच्यात येऊ द्या आधी.

त्रयस्थ : बरोबर आहे. पण त्याचा मार्ग सांगितला नाही. कसं करायचं ?

श्री माताजी : ते सांगते. पण हे ऐकायला तयार नाही. नाही नाही. सांगते ना बेटा.

( गोंधळ....) आता तुम्ही लोक ऐकून घ्या. तुम्ही कोणी हिंदू. आतासमजलं का ? तुम्हाला बोलणं समजलं की नाही? तुम्ही नुसतं हुल्लडबाजी शिकलेत का हिंदु धर्मात? हां. आता ऐका. तुम्ही ऐकून घ्या. नाही नाही. काही नाही. तरुण मुलं आहेत ना ? त्यांना समजावून सांगितलं तर काही हरकत नाही. मला जरा पाणी द्या. आता ऐकून घ्या.

समजून घ्या. हे बघा समजून घेतलं पाहिजे. असं वेड्यासारखं करून काही होणार नाहीये. त्याने काही फायदा होणार नाही. नाही नाही. मी समजावून सांगते. मी समजावून सांगते. तुम्ही राहू द्या. तुम्ही लोक हिंदू धर्माला मानता ना ? मानता की नाही ? आता हिंदू धर्माला जे लोक मानतात - जे तुमचे प्रवर्तक होते आदी शंकराचार्य. त्यांचं तुम्ही पुस्तक वाचलंय का ? त्यांच्याबद्दल काही जाणलेलं आहे का ? काही नाही. तेव्हा जोपर्यंत तुम्हाला त्याचं ज्ञान येणार नाही बेटा, तोपर्यंत तुमच्या हिंदू धर्माला अर्थ नाही राहत, कारण त्याच्यातला प्रकाश तर बघा. अंधारामध्ये तुम्ही हिंदू हिंदू म्हणून काही उपयोगाचं नाही. तुम्ही माझं ऐका. ह्याला काही अर्थ नाहीये. अशा रीतीच्या अनेकदा लाटी आल्या आणि संपल्या. अशा संघटनेचा काही फायदा होणार नाही. कशाचा फायदा होणार आहे, जेव्हा त्याच्यातला प्रकाश, तत्व धरा. तुम्ही अजून तत्व धरलेलं नाही. जे तत्व सर्व विश्वव्यापी आहे, त्याला तुम्ही शहापूर परतं केलंय किंवा असं केलंय हे चुकतंय की नाही. म्हणजे तुम्ही हिंदू धर्मावरच अत्याचार करून राहिलात माझ्यामते.. कारण त्याच्यातलं तत्व जर समजून घ्यायचा नाही, त्याच्यातला प्रकाश समजून घ्यायचं नाही आणि काही तरी घेऊन आपलं निघाले तर लोक काय म्हणतील तुम्हाला? तुमच्याशी जर कोणी काही विचारलं तर तुम्हाला त्याच्यातलं तत्व कळलेलं आहे का बेटा? असं कसं? समजून तर घेतलं पाहिजे. आम्ही तुम्हाला आईसारख्या आहोत ना ? मग असं काय वेड्यासारखं वागायचं? हिंदू धर्मामध्ये आईचा मान ठेवला पाहिजे हे तर सांगितलं आहे ना ? हे सांगितलंय की नाही ? की आईला शिव्या दिल्या पाहिजेत आणि खडे मारले पाहिजेत असं सांगितलंय? मग काहीतरी तुम्ही वागून दाखवा ना हिंदू धर्मासारखं. शिवबा आपल्या आईला केवढं मानत असत आणि तुम्हाला जर शिवबासारखे व्हायचंय तर आधी ते योगीजन होते. तुम्ही योगी झालं पाहिजे की नाही? एक लक्ष, मी तुम्हाला समर्थ करायला आलेय आणि तुम्ही मला दगड घालताय म्हणजे काय म्हणावं? हे शहाणपण कुणी सांगितलेलं आहे? ज्याचा झेंडा लावायला निघालेत, त्याच्या मागचं तत्व तर समजून घेतलं पाहिजे आपण. सर्व जगामध्ये त्याचं तत्व मी शिकवते आणि आपल्या देशामध्ये असं करून कसं चालेल? तुम्हाला माहीतच नाही अजून तुम्ही काय सांगतात ते. तुमचाच मी, मी तुम्हाला समर्थ करायला आलेय. मी तुमचंच लीडरशिप करायला आलेय. मी काही फालतू लोकांसाठी नाही आलेले. तुमच्यासाठी आलेय. पण तुम्हाला अजून माहीतच नाही तुम्हाला काय पाहिजे ते. हे तर जाणून घेतलं पाहिजे की नाही. आता आरामात बसा. इथे बसा. मी सांगते कसं करायचं ते. या इकडे. ( या इकडे) अशे आरामात बसा. आता सगळे आपले समर्थ होऊन घ्या. बसा बरं. बसा. समजून घ्या बेटा. चला येऊन बसा. नुसती हुल्लडबाजी करून काही फायदा नाही. आपल्या प्रतिष्ठेने येऊन बसा. तुम्ही सगळे जण समर्थ होऊ शकता. (गोंधळ.....) तुम्ही बसा. तुम्ही बसा. तुम्हाला मी पार करते. ( गोंधळाचा आवाज......) आता हे काय आहे ? याला काय काही अर्थ आहे? स्वतःही करायचं नाही, दुसऱ्यांना करू द्यायचं नाही. तुम्ही सांगा, हे काय आहे ? आम्ही करतोय ते कार्य फार मोठं आहे. विश्वाचं कार्य आहे ते. बसा बसा सगळे. म्हणूनच आपला हिंदू धर्म दाबला गेला आहे, कारण आपण त्याला असं लहान करून टाकलेलं आहे, कोतं करून टाकलेलं आहे. एवढा विश्वव्यापी धर्म आपण सर्व नाश करून टाकलेला आहे अशा मूर्खपणाने आणि मूर्खाच्या हाती कोलीत दिल्यासारखं झालेलं आहे मी तुम्हाला सांगते खरी गोष्ट. आता तेच त्याचा प्रकाश, त्याचा दिवा सांभाळून घ्या. काही तरी उगीचच वेड्यासारखं करण्यात काही अर्थ नाही. आता बघा त्यांच्यातल्या किती लोकांना आत्मसाक्षात्कार होतो ? बघायचं. हा, आता शांत बसा बरं. तुम्ही जशे समर्थ व्हाल, तुम्हाला स्वतः लक्षात येईल की तुम्हा मध्ये किती शक्ती आहे ती. शक्तीला तर जाणलं पाहिजे. शक्तीचे पुजारी आहात ना तुम्ही ? देवीचे पुजारी आहात ना ? मग शक्‍तीला जाणले पाहिजे. हां. आणि असं करून संघटना होणारच नाही कारण ती बाह्यातली संघटना आहे. आता तुम्ही मला बोलू देणार आहात की नाही ? काय ? (अस्पष्ट आहे). मूर्खपणा करू नका. ( अरे जास्त बोलू नका) म्हणजे मूर्खपणाशिवाय आणखी मला काही दिसतच नाही तुमच्यात अक्कल. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल फक्त शहापूरला मी हा नमुना पाहिला. आणखीन कुठे मी असं पाहिलं नाही. मी कुठे कुठे गेले. आदिवासी जागेत गेले. कुठे कुठे गेले.अशे मूर्ख मी कुठे पाहिले नाहीत. हे सगळे शहापूरला कुठून आलेत ? इथे काय मुर्खांचं हॉस्पिटल वगैरे आहे की काय ? असं दिसतंय अगदी स्पष्ट. ( हसण्याचा आवाज) टवाळकी करणं नाही. कसं बोलू ? आता काय करणार आम्ही? अहो, तुम्ही जाऊन सांगा त्यांना ना. ह्यांना चूप रहायला सांगा. नाही तर होणार नाही. कारण ही ध्यानाची गोष्ट आहे ना. त्यांना नसेल राहायचं त्यांनी नाही राहावं. पण थट्टा करणं ह्यांनी होणार नाही. (आवडत नसेल त्यांनी निघून जावं). हां. दुसऱ्यांना कशाला त्रास देता ? म्हणजे आगाऊपणा कशाला ? काय आहे हे? हे तुम्ही जरा सांगा. (ऐकून घ्या. ऐकून घ्या त्यांचं. नंतर पाहू.) नंतर पाहू . जरा बसा तर खरी. हा, बसा बसा. आता शांतपणाने ऐकून घ्या. हे कुंडलिनीचं शास्त्र. आता थांबा थांबा, तुम्ही बोलू नका, राहू द्या. मी सांभाळून घेते. राहू द्या, राहू द्या. जाऊदे. आता हे बघा, हे कुंडलिनीचं शास्त्र हिंदू धर्मातच सांगितलेलं आहे पण तुम्हाला माहित आहे का कुणाला? तुम्ही वाचलं तरी आहे का ? हिंदू धर्माची संघटना करण्यासाठी पहिल्यांदा आपला आत्मा मिळवा. ज्यांनी आत्मा मिळवला नाही तो करू शकत नाही. पहिल्यांदा आपला आत्मा मिळवला पाहिजे. त्याला गांभीर्य पाहिजे. हुल्लडबाजीने होणार नाही. जेव्हा तुम्हाला ध्यान करायचं आहे, त्याला एक गांभीर्य पाहिजे. आपल्यासमोर शिवाजी महाराजांचं हे उदाहरण आहे ना. त्यातला कोण शिवाजी महाराजांसारखा आहे ते मला बघायचंय तुमच्यातला. नुसतं त्यांचे झंडे लावून होणार नाही. त्यांची प्रतिष्ठा, त्यांच्या पायाच्या धुळी बरोबर तरी कुणी आहे का इथे ? असेल तर समोर यावं. उदाहरण शिवाजींचं आणि वागणं कुणासारखं- औरंगजेबासारखं आहे. आता बसा शांत जरा दोन मिनिटं. त्यांच्या लायकीचे व्हा, मग त्यांचं नाव घ्या. अगदी आता शांतपणे हा विषय असा आहे की हे जिवंत आपल्यामध्ये आहे आणि हे आपल्या देशामध्येच ऋषीमुनींनी शोधून काढलेलं आहे. ऋषीमुनींनी हे आपल्या देशामध्ये सगळ्यांनी शोधून काढलंय. त्याचं तत्व समजल्याशिवाय आपल्याला काहीही लक्षात येणार नाही. तेव्हा हे ऋषीमुनींनी जे ज्ञान शोधून काढलेलं आहे ते आपण मिळवलं पाहिजे. हा आपला वारसा आहे. आपला वारसा आहे हा, भारताचा हा वारसा आहे. तो जोपर्यंत तुम्ही मिळवणार नाही तोपर्यंत बाह्यातून कोणीही तुम्हाला मानून घेणार नाही. परवा विज्ञान आणि परिषद झाली. त्याच्यामध्ये हिंदू धर्माला 100 त्यांनी शिव्या सांगितल्या आणि सांगितलं हा खोटा धर्म आहे, अमुक आहे, तमुक आहे. तुम्ही सिद्ध करू शकता का ? मी सिद्ध करु शकते. तुम्ही करू शकता का ? विज्ञानाच्या पुढे, इथं थापा मारण्यात काय अर्थ आहे? विज्ञानाच्या पुढे आपल्या देशामध्ये अशा गोष्टी झालेल्या आहेत. आधीच मी सांगितलेलं आहे, तिकडे लक्षच नाहीये. तुम्ही माझेच आहात. हे जे तुम्ही कार्य करता, ते माझंच आहे. पण बाह्यांगी माझं कार्य नाही. प्रतिष्ठेचं कार्य आहे. मोठेपणाचं कार्य आहे. मोठ्ठं व्हायचंय. काहीतरी थिल्लर आणि चिप टाईपचं नाही बनायचंय. आता अशे हात करून बसा सगळेजण.

(श्री माताजी मांडीवर हात घेऊन बसायला सांगत आहेत) बघा. कसं होतं ते. सरळ आहे. अगदी सगळे नम्रपणाने. नम्रता हे पहिले असायला पाहिजे. डोळे मिटा सगळे. आरामात. आता आम्ही इथे ध्यानाला बसलोय. ऋषीमुनींच्या तिथे राक्षस लोक जाऊन आणि त्रास देत असत. त्यातले तुम्ही दिसता. (वळून.....) अशे हात करा. डोळे मिटा. डोळे मिटून घ्या. हात अशे करा. त्यांना बोलू द्या, काही हरकत नाही. (गोंधळ...) तुम्ही ठीक होऊन पहा. म्हणजे काय त्यांना तुम्ही ठीक कराल. कारण काय आहे एक जरी लीडर ठीक झाला तरी सगळे ठीक होतील. तुम्ही अशे डोळे मिटा. आरामात. नम्रपणे बसा. फक्त अशे हात ठेवा. काही नाही. आता प्रथम जमिनीला नमस्कार करायचा, ही आपली भारत भूमी जी आहे, पवित्र भूमी आहे, तिला नमस्कार आधी करायचा. जमिनीला पूर्ण नम्रपणे नमस्कार करून आणि गणेशाचं नाव घेऊन अशे दोन्ही हात अशे करा माझ्याकडे. पहिल्यांदा जमिनीला नमस्कार करा आणि मग हात माझ्याकडे करून आणि श्रीगणेशाला नमस्कार करून आणि बसा. डोळे मिटा, डोळे मिटून घ्या. नुसते डोळे मिटायचे, काही करायचं नाही. डोळे मिटा. ( गोंधळ....) हे सगळे तुमचे फोटो जाणार आहेत अमेरिकेत. जाऊ देत. बघू देत त्यांना किती शहाणे लोक आहेत ते. तुमची फिल्म बनून राहिली आहे लक्षात ठेवले पाहिजे. हिंदू धर्माचे लोक किती शहाणे आहेत ते जरा बाहेर जाऊ देत आणि बघू देत त्यांना सुद्धा. त्यांना फार तुमच्याबद्दल मान आहे ना. सगळ्यांना बघू देत किती शहाणे लोक इथे राहतात ते. आता सर्वप्रथम जाणीव, आपल्या टाळूवर तुम्ही उजवा हात ठेवा. टाळूवर, उजवा हात... वरती ठेवायचा , अधांतरी ..वर .. तुम्ही बघा .. तुम्हीसुद्धा बघा. असा हात ठेवायचा. सगळ्यांनी बघायचं, आता तुमच्या आतूनच बघा, अशी थंड थंड चैतन्य लहरी येतायत की नाही, बघा. डोक्यात. बोलू नका महाराज. कृपा करा. फारच दयावंत आहात तुम्ही लोकं. आम्ही इथे परमेश्वरी कार्य करतोय आणि तुम्ही फार चांगलं राक्षसी कार्य करून राहिलात, चूप रहा जरा दोन मिनिटं. बघा येतंय का ? टाळूवर बघा. बघा निपूर्ते त्यांना. ते झाले का पार? येतंय का बेटा तुमच्या ? येतंय का बघा तुमच्या ? येतंय का बघा. येतंय का ? बोलू नका. आता सगळ्यांना डिस्टर्ब नाही करायचं . तुम्हाला पार करून देतो आम्ही. आम्ही करणार तुम्हाला पार. प्रॉमिस. हां, बघा. आलं का ? आलं ? डोक्याच्या वर बघा आम्ही तुम्हाला पार करूनच जाणार. मग तुम्ही बघा काय ते. हां, आलं का ? येतंय ? आता डावा हात वर करून बघा. आता डाव्या हाताने बघा, येतंय का ? पूर्ण परीक्षा स्वतःची घ्या. गरम येत असलं तर थोड्या वेळाने थंड थंड येईल. आपल्यातूनच ही शक्ती येतेय. वाहतेय. वाहतेय का बघा. आधी शक्तिशाली व्हा. मग संघटना करा. येतंय का ? गार गार वाटतंय ? असो. आता दोन्ही हातात बघा गार येतंय का ? बघा. आता येतंय का हातात गार बघा. हां. बसा. बसा बेटा बसा. शहाण्यासारखं. डोळे मिटा. डोळे मिटून बसा..... बसा. दोन्ही हात असे करा. बघा गार येतंय का हातात? वाटतंय? वाटतंय ना. आता विचारा, माताजी ही ब्रह्म शक्ती आहे का ? विचारा, मनात विचारा. माताजी ही ब्रह्म शक्ती आहे का विचारा. म्हणजे हातात गार गार गार गार आणखी वाटेल बघा. वाटतंय ? थोडं शांत व्हा. शांत झाल्याशिवाय काही कळणार नाही. अहो कशाला हसता मूर्खासारखे, सगळे लोक ध्यान करतायत. थोडं तरी सुट्टी करा. परमेश्वराचं कार्य चाललंय, थोडं तरी अक्कल ठेवा. कशाची काही प्रतिष्ठा, कोणाचा मान-पान काही आहे का नाही ? ज्यांना स्वतःचाच मान नाही ते दुसऱ्याचा काय मान करणार ? जरा बघा बरं येतंय ? वरून बघा त्यांच्या डोक्यावर येतंय का? झाले, झाले , पार झाले. वरून.. हात नका लावू . वरूनच बघा. हं, बहुतेक सगळ्याचं झालंय. झालं का? गार येतंय हातात. हातात बघा. आत्ता दोन्ही वर करून बघा येतंय का? असं वर करून बघा. ( गोंधळ....) येतंय का बघा बरं, येतंय का हातात? येतंय नं. आत्ता असे हात ठेवा आणि शांत राहा, शांत राहून बघा, काही विचार येत नाही मनात बघा आत्ता. निर्विचारीता स्थापीत झाली का बघा. ज्यांना मिळायचंय त्यांना मिळणारच आहे. काही जरी केलं तरी सुद्धा. संतांना सगळ्यांनीच छळलेलंच आहे आजपर्यंत. पण आता खबरदार. फार दिवस हे चालणार नाहीये. हा. बघा बरं झालं, पार झाले. येतंय तुम्हाला, आलं ? हातात येतंय ? आता हे शिकून घ्या. सगळं शास्त्र शिकून घ्या. मग तुम्हाला दाखवते मी काय ते समर्थता. हे काय आलं हातातून, हे बघा. ही कोणची ब्रह्मशक्ती आली आ ? तुम्ही या माझ्याबरोबर. मी तुम्हाला सांगते. हं. आलं का ? आता ज्या लोकांना आलेलं आहे आणि ज्या लोकांना हातामध्ये अशी शक्ती आलेली आहे ही शक्ती काय आहे ती जाणली पाहिजे. ती कशी वापरायची ती जाणली पाहिजे. हा आत्मबोध झालेला आहे. हे सगळं शिकलं पाहिजे. हे नुसतं तोंडाचं बोलणं नाहीये. हे कार्यान्वित होतं. त्यांनी कॅन्सर सारखे रोग ठीक करू शकतात, तुम्ही पुष्कळसं करू शकता. ते कसं ते शिकून घ्यायचं आणि जे लोक तुमच्या विरोधात राहतील त्यांना त्रास होणार आहे. तुम्ही मुळीच काळजी करायची नाही. त्यांना नक्कीच त्रास होईल. कारण परमेश्वर जो आहे तो सुद्धा स्वतःचं बघत असतो. तेव्हा तुम्ही अशा लोकांच्याकडे मुळीच लक्ष द्यायचं नाही. ज्यांना जे करायचंय ते करू द्या. जे बोलायचंय ते बोलू द्या. तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा. कारण तुम्हाला मिळालेलं आहे. तुम्हाला जाणीव झालेली आहे. तेव्हा त्याची तुम्ही मान्यता ठेवा. इतर लोकांकडे लक्ष द्यायचं नाही. आपल्याला जे मिळवायचं ते आम्ही मिळवलेलं आहे आणि त्याच्या वरती सावध झालं पाहिजे. तेव्हा ज्या लोकांना हे मिळालेलं आहे त्या लोकांनी, (कुठे आहे सेंटर तुमचं?) भिलवडीला सेंटर आहे. तुम्ही सांगा. ते सांगतील तुम्हाला पत्ता, तिथे जायचं सगळ्यांनी आणि जाऊन पुढे काय करायचं, काय नाही करायचं ते शिकलं पाहिजे आणि त्याच्यासाठी मेहनत पाहिजे, मेहनत पाहिजे, ते शिकलं पाहिजे. हे सत्र काय आहे? कसं वापरायचं, कसं नाही वापरायचं ते शिकलं पाहीजे. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही, तोपर्यंत तुम्हाला कळणार नाही की झालं ते काय झालेलं आहे. आणि अत्यंत याच्यानंतर छान निद्रा येईल, योगनिद्रा तुम्हाला. आणि उद्यापासनं अगदी शांत वाटेल. पण, तरीसुद्धा जोपर्यंत तुम्ही हे शिकून घेणार नाही, ह्याच्यात अगदी प्रवीण व्हायला पाहिजे. सगळं शिकून घेतलं पाहिजे. हे सगळं आपल्या गुरु-मुनींनी सांगून ठेवलेलं आहे आणि अनादी काळापासनं याचा सगळा अभ्यास झालेला आहे. तेव्हा हे शिकून घ्या आणि मिळवून घ्या.

बसा तुम्ही, बसा. बसून घ्या. अशे हात करा. बसा, दोन्ही हात अशे करून बसा. डोळे मिटा. मिटून घ्या. शहाण्यासारखं वागलं पाहिजे ना ? कुठेतरी शहाणपण ठेवा. कुठेतरी दिसलं पाहिजे ना शहाणपण. डोळे मिटा. आता स्वतःचा आधी मान ठेवा. तुम्ही सांगा कुठे आहे ते. कुठे सेंटर आहे ते समजून घ्या. आणि तिथे ते सगळं तुम्हाला सांगतील, की ही जी तुमच्यात शक्ती आलेली आहे ती कशी वापरायची. आता या मुली असून त्यांना जास्त शहाणपण आहे. पुण्याला येऊन जागृती घेतली तेव्हापासनं सगळं शिकून घेतलेलं आहे आणि जर तुम्ही लोक शिकायलाच तयार नसलात तर तुम्हाला कोण सांगणार आहे? उलट आम्ही तुम्हाला समर्थ करायला आलोय हे नशीब समजायचं. (आमचं सेंटर भारती विठ्ठल खाडे, मुक्काम पोस्ट भिलवाडी, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे आणि ध्यानाची वेळ - पाच ते सात, वार रविवार. ज्यांना योगाचा फायदा घ्यायचा असेल त्यांनी जरूर या आम्ही तुमच्यासाठी वेळ काढून तुम्हाला याची सुवर्णसंधी देऊ.) ( हसण्याचा आवाज) काय म्हणता ? (जरा जास्त वाढेल. वाढत राहील. त्यांच्याकडे आपण जास्त लक्ष दिलं तर वाढत राहील) नाही नाही. म्हणजे काय आहे. त्यांचं चुकत नाहीये. त्यांचं चुकलेलं नाही. काय आहे, अज्ञानी आहेत अजून काही अज्ञान आहे ना. अपुरं ज्ञान असल्यामुळे असं. त्यांचं चुकलेलं नाही. ते येतील रस्त्यावर, त्यांना काही, मला काही राग येत नाहीये त्यांचा जरासा. कितीही म्हटलं तरी ते तरी काय करणार ? काय आहे, आतनं जी फिलिंग येतेय त्याच्यामुळे करतायेत. त्यांना काय अजून काही समजत नाहीये की काय करायचं. समजतील. बरं, आपलं काय नाव हो महाराज? काय नाव आपलं ? आपलं काय नाव आहे ?

त्रयस्थ : माझं नाव ?

श्री माताजी : या इकडे या. काही नाही. काय नाव आपलं?

त्रयस्थ : आनंद रानडे.

श्री माताजी : आनंद रानडे. तुम्ही कुणाचे रानड्यांचे कुणी आहात का काय ? मग या

आता. जसं नाव आहे तसं काहीतरी केलं पाहिजे. फार मोठी माणसं

झाली रानडे यांच्यात. तर या आपण. मी तिथे आहे वैतरणाला.

त्रयस्थ : मला एकच शेवटचा प्रश्न विचारायचा आहे.

श्री माताजी : हां.

त्रयस्थ : तुम्ही आज सहजयोग सांगितलात. हा वास्तविक अष्टांगयोग

सांगितलेला आहे पतंजली योगामध्ये.

श्री माताजी : अष्टांगयोग सांगितला होता त्यावेळची गोष्ट वेगळी होती. आता त्यावेळी

आपल्याकडे ब्रह्मचर्यात २५ वर्षापर्यंत लोक रहात असत आणि व्हिलेजेस

मध्ये जाऊन राहायची आणि सगोत्र विवाह होत. सगोत्र विवाह म्हणजे

काय? आपल्याला युनिव्हर्सिटीत (अस्पष्ट आहे). त्यावेळेला अष्टांगयोग

वगैरे करत असत. त्याला आता हजारो वर्ष झाली. १४ हजार वर्षांपूर्वीची

गोष्ट आहे. आता आजच्या धकाधकीच्या काळामध्ये अष्टांगयोग करायला

तुम्हाला तरी वेळ आहे काय? नाय आता. म्हणून त्याच्यातला जो पहिला

अंग आहे. अष्टांगातलं पहिलं काय? काय माहिती सांगा बरं तुम्ही? मग मी

सांगते. तुम्हाला माहित नाही ना ? आता मी सांगते तुम्हाला.

त्रयस्थ : तिसरं अंग मला माहित आहे.

श्री माताजी : हा. तिसरं अंग नाही. पहिलं अंग जे आहे. पहिलं अंग ते घेतलं मी. आणि

परमेश्वराची प्रतिष्ठा करणे. प्राणप्रतिष्ठा करणे. हे पहिलं अंग. ते झाल्याशिवाय, म्हणजे असं आहे बघा म्हणजे अगदी लॉजिकल आहे की जर तुमची कुंडलिनी चालली नाही तर तुम्हाला कळणार कसं कोणचं चक्र धरलंय ? मग कोणचं आसन करायचं ते ? सगळं ते व्यवस्थित आहे.

अगदी सांगोपांग सायन्स आहे. तुम्ही शिकून घ्या. नाहीतर फॉरेनचे लोक येऊन तुम्हाला शिकवतील.

त्रयस्थ : अष्टांगात त्यांनी सांगितलंय की सुरुवातीला तुम्ही तुमच्या मनावरती

कंट्रोल ठेवला पाहिजे.

श्री माताजी : नाही. कंट्रोल वगैरे जे सांगितलेलं आहे ते नंतर. आधी परमेश्वराची

प्राणप्रतिष्ठा आहे. ईश्वर प्रतिष्ठा ही पहिली गोष्ट आहे. ती झाली आता.

आता त्याच्या नंतर पुढे काय करायचं ते संबंध सहजयोगच आहे. पुढे सुद्धा...

त्रयस्थ : तुमच्या इथे योगासनांचा काही संबंध नाही का ?

श्री माताजी : योगासन आम्ही करवतो ना. नाही नाही. पण योगासनात आता समजा तुमचं जर एखादं चक्र खराब असलं, समजा तुमचं पोटात दुखणं आहे तर तुम्हाला आम्ही त्याचंच आसन सांगू ना. तुम्हाला डोळ्याचं आसन सांगू काय ? त्याला एक सायन्स आहे की नाही प्रत्येक गोष्टीला. तसेच मंत्रांना सायन्स आहे. तुम्ही काय करता की ज्याला म्हणतात ना की काहीतरी अपुरं ज्ञान आणि उलट काय होतं, बदनामी होते. आपल्या धर्माची बदनामी झाली, सगळीकडे. पण आपल्याला ज्ञान नाही. तेव्हा मी इथे फुकट तुम्हाला द्यायला बसलेय, ते घ्या म्हणजे सगळं तुम्हाला कळेल किती विशाल आहे ते. त्याची विशालता तुम्ही अशी लहान करू नका. समजलं बेटा. तुम्हाला समजलं पाहिजे ना. कोणचं चक्र खराब झालंय ? कशाने खराब झालेलंय. ते कसं ठीक करायचं ? तिथे कोणची देवता आहे ? ते जागृत कसं करायचं हे शिकले पाहिजे की नाही. हे सायन्स असायला पाहिजे. लॉजिकली तुम्ही बघा.

त्रयस्थ : त्याच्यामध्ये शेवटचं त्यांनी म्हटलंय योगासनं ध्यानधारणा समाधी. समाधी

तत्त्व आहे ना.

श्री माताजी : समाधी तत्त्व आहे.

त्रयस्थ : हा सहज योग तुम्ही सांगितला हे समाधीच आहे शेवटची. अष्टांगयोग

वगैरे ते.

श्री माताजी : पण आधी त्याच्यामध्ये...

त्रयस्थ : पण पायऱ्यांनी जायला लागेल ना.

श्री माताजी : पायऱ्या होतात ना. पण पहिल्या पायरीला तर उतरा. पहिल्यांदा त्यांच्या

ईश्वर प्रतिष्ठा असा आहे. ईश्वर प्रणिधान असा शब्द आहे त्याला. ईश्वर

प्रणिधान.

त्रयस्थ : हे आता रागावले हे सगळे लोक तुम्ही जास्त बोलल्यामुळे रागावले.

म्हणजे तुम्ही मूर्ख म्हटले त्यांना.

श्री माताजी: नाही नाही. मूर्ख म्हणजे आधी त्यांनी दगड मारले म्हणून. इथे मुलांना

दगड मारले. मग हे काय शहाणपण आहे तुम्ही सांगा. मी याच्यावर सुद्धा.

किती चुकलं? आधी जर ह्यांनी दगड जर मारले नसते. मी दगड

मारल्यावर म्हटलं. दगड नाही मारायचे. फार वाईट गोष्ट आहे. दगड

मारायचे म्हणजे काय? आम्ही इथे ईश्वराचं कार्य करत आहोत ना. तुम्ही

दगड मारायचं म्हणजे काय लक्षण चांगलं आहे का ? किती वाईट लक्षण

आहे तुम्ही सांगा आणि तुम्ही बोलता हिंदू धर्माच्या गोष्टी आणि वागता

कशे ? म्हणून मी म्हटलं. नाहीतर मी बोलले नसते. त्यांनी दगड मारले नसते तर मला काय म्हणायचंय, मी तुमच्यासाठीच इथे आले आहे इतका त्रास करून. आले आहे ना ? कळलं का ? आता शहाणपण धरा आणि तुमच्या सगळ्यांना मी बोलावते. या तुम्ही, मुंबईला या. या आमच्या मुंबईला. कितीतरी हजारोंनी लोक पार झाले आहेत. हजारोंनी लोक झाले आहेत. आणि इथपर्यंत अजून काही आलो नाही आम्ही शहापूरला. तर आलोय तर

मुंबई काही दूर नाहीये. मुंबईला या तुम्ही. प्रोग्रामला वगैरे. कितीतरी दहा-बारा सेंटर निघालेत. पण त्यांचं शिक्षण जरा जास्त आहे इथल्या पेक्षा कारण आणि इथं तुम्हा लोकांना अजून संस्कृतचं एवढं ज्ञान नाहीये. तुम्हाला माहिती नाहीये की आपल्या शास्त्रात किती सांगितलेलं आहे ते त्याच्यावर जे गहन सांगितलंय. ज्यांचा अभ्यास आहे त्यांना लवकर पटतं कारण अर्ध ज्ञान.. ....

त्रयस्थ : नाही. आमचा सुद्धा अभ्यास झालाय. अभ्यास केलेला आहे. त्यामुळे

तुम्ही सांगता ते पटतंय. पण मी मघाशी म्हटल्याप्रमाणे हे या धर्मातलं,

या भूमितलं तत्वज्ञान आहे असं तुम्ही सांगा ना.

श्री माताजी : असं. पण ते माझ्यावर जबरदस्ती करण्यापेक्षा तुम्ही स्वतःवर जबरदस्ती

करून घ्या.

त्रयस्थ : आम्ही करतोच ना. मी संघाचं काम करतो ना.

श्री माताजी : संघ. राष्ट्रीय संघ. आम्ही जेवढा संघ जो निर्माण केलाय तो संघ

शक्तिशाली आहे. संघ जो आहे. संघ म्हणजे काय ? संघ म्हणजे त्याला

म्हणतात ज्याच्यामध्ये सामूहिक चेतना जागृत होते. चेतना जागृत व्हायला पाहिजे. नुसतं बोलायचंच नाही. जागृत. सामूहिक चेतना आता तुमच्या जागृतीत. इथपर्यंत तुम्हाला आश्चर्य वाटेल की तुम्ही आता दुसऱ्याचं सांगू

शकता चक्र काय धरले ते. तुमचं सांगू शकता. म्हणजे नीट व्यवस्थित बसले तर. इतकच नाही. इथे बसल्या बसल्या तुम्ही सांगू शकता. परमेश्वराचं जे साम्राज्य आहे, जी ब्रह्म शक्ती आहे, त्याच्या मध्ये सगळं आहे. त्याच्या संघटनेत उतरलं पाहिजे. सामूहिक चेतनेत उतरलं पाहिजे. चेतनेत, परत उतरलं पाहिजे. नुसतं बोलायचं नाही.

त्रयस्थ : तुम्ही कसा या पद्धतीने प्रयत्न करता. तसा आम्ही सुद्धा करतो ना प्रयत्न.

श्री माताजी : ती पद्धत बाहेरची आहे बेटा. त्याने नाही होणार. तुम्हाला आतून ते

मिळवलं पाहिजे. मुळात तुम्ही आधी मिळवून घ्या.

त्रयस्थ : पण काय आहे, सामान्य माणसांना एकदम आपण सांगू शकत नाही असं एकदम की तुम्ही असं बसा.

श्री माताजी : आजच असं झालं मला. आजच असं झालं. सगळे व्हिलेजेस मध्ये गेले.

हजारोंनी लोक महाराष्ट्रात पार झाले. आज शहापूरलाच मी हे पाहिलं.

आणखी कुठेच पाहिलं नाही तुम्हाला स्पष्टच सांगते.

त्रयस्थ : हे नसेल तर वेगळ्या मार्गावर....

श्री माताजी : नाही नाही. कुठे नाही. लोक पार झाले बघा. तुम्हाला राहुरीला. तुम्ही

बघा. जवळ जवळ वीस हजार लोक आहेत आणि त्यांनी सगळ्यांनी दारू

सोडली, व्यसनं सोडली. त्यांना सगळं काही ज्ञान झालेलं आहे आणि

अगदी सर्वसाधारण व्हिलेजेसचे लोक. एक मनुष्य मला बैलगाडीत घेऊन

गेला. त्या बैलगाडीतला मनुष्य, मला आश्चर्य वाटलं. कबीरा सारखा

बोलत होता. मी अगदी आश्चर्याने बघत राहिले. म्हणे माताजी, ज्ञान

सगळं आतमधेच आहे. एकदा तिथे गेलं पाहिजे. हे जे सांगितलंय..

त्रयस्थ : यांना पण समजायला पाहिजे ना आपल्याला. आता वेगळा मार्ग करावा

लागेल. मग असे शांत बसत नसेल तर वेगळा मार्ग.....

श्री माताजी : असं आहे. मी आई आहे नां. तुम्हाला क्षमा करायची आहे सगळ्यांना

आणि तुम्हाला समजावून सांगायचं आहे. कधी कधीच हातात छडी घ्यावी

लागते एखाद वेळेला. काही हरकत नाही.

त्रयस्थ : पण समजा ती अशी बसत नसतील तर वेगळा मार्ग.....

श्री माताजी : बेटा, सगळ्यात मुख्य मार्ग हाच आहे आणि जे बसत नाही ते जरा कठीणच

Shahapur (India)

Loading map...