Sarvajanik Karyakram

Sarvajanik Karyakram 1990-12-11

Location
Talk duration
87'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

11 डिसेंबर 1990

Public Program

Shrirampur (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - VERIFIED

1990 -12-11Public Program, Shrirampur

सत्याला शोधणाऱ्या आपण सर्व साधकांना माझा नमस्कार .सत्याबद्दल एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की सत्य हे आहे तिथे आहे. आपण ते बदलु शकत नाही. ते आपल्या काबूत घेऊ शकत नाही. आणि काहीतरी त्याच्यातनं सांगून ते सत्य आहे असं पटवून देऊ शकत नाही. आणि जे लोक असं करतात ते वास्तविकतेपासनं फार दूर आहेत. आणि स्वतःचं नुकसान करून घेणं , समाजाचं नुकसान करून घेणं आणि उलट्या गतीनी ते आपल्या नाशाला प्राप्त होतात . याला कारण असं आहे की सत्य एक आहे ते म्हणजे तुम्ही हे शरीर , मन , बुद्धी , अहंकार या उपाधी नसून शुद्ध स्वरूप आत्मा आहात . दुसरं सत्य असं आहे की सर्व चराचरामध्ये परमेश्वराची प्रेम शक्ती जिला आपण ब्रह्मचैतन्य म्हणतो ती कार्यान्वित आहे . तेव्हा ह्या ब्रह्मशक्तीला प्राप्त होणं हा योग आहे. आणि सहज म्हणजे सह म्हणजे तुमच्या बरोबर जन्मलेला असा ह्या योगाचा जन्मसिद्ध अधिकार तुमच्यामध्ये आहे. पण हे सगळं , मी सांगत असताना आपण माझ्यावर अंधश्रद्धा ठेऊ नये. उलट एखाद्या वैज्ञानिकासारखं, सायंटिस्टसारखं आपलं मन उघडं ठेवलं पाहिजे . डोकं उघडं ठेवलं पाहिजे. जर आपलं डोकं उघडं नसलं तर आपण वैज्ञानिक होऊच शकत नाही आणि मी जे सांगते ते जर अनुभवास आलं तर इमानदारी मध्ये ते मानलं पाहिजे आणि त्यात उतरलं पाहिजे. कारण हा एक कल्याणाचा मार्ग आहे. तो तुमच्याच कल्याणाचाच नव्हे तुमचा मुलाबाळांचा , तुमच्या सर्व समाजाचा, भारताचा आणि सर्व जगाचा हा कल्याणाचा मार्ग आहे. उत्क्रातींमध्ये आपण आता मानव स्तिथीला आलो . या स्थितीतच आपण मान्यता केली की फार उत्तम स्थिती आहे तर हे कायिक बरोबर होणार नाही. या स्थिती मध्येच अनेक भांडणं होतात . या स्थितीमध्ये अनेक विचार , या स्थितीमध्ये आपण पाहिलेलं आहे की धर्मावरून काय काय प्रकार झालेले आहेत. या स्थितीत धर्म अधर्म कळत नाही. नसत्या जातपातीच्या अंधश्रद्धेच्या ह्याच्यात आपण बळी जाऊ शकतो. त्या साठी केवळ सत्य हे जाणलं पाहिजे . आणि ते जाणण्या साठी आपल्याला आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे. कारण आत्मा हा सर्वांमध्ये एक सारखा प्रतिबिंबित आहे आणि तो सामूहिक चेतनेला आपल्यामध्ये जागृत करतो . ही सामूहिक चेतना , जेव्हा आपल्यामध्ये जागृत होते तेव्हा आपण जाणू शकतो की आपल्यामध्ये कोणते दोष आहेत आणि दुसऱ्यामध्ये कोणते दोष आहेत. जर आपण हे शिकलो की हे दोष आपण कसे काढून टाकायचे तर लगेच या सर्व दोषांपासनं आपली मुक्ती होऊ शकते. महाराष्ट ही सन्तांची भूमि . इथे मोठमोठाले द्रष्टे आणि संत झाले आणि त्यांनी सुद्धा आत्मसाक्षात्काराबद्दल सांगितलेलं आहे. बाराव्या शतकामध्ये श्री ज्ञानेश्वर आपल्या ह्या महाराष्ट्रात जन्माला आले आणि त्यांनी एक फार मोठी गोष्ट केली. म्हणजे हे जे एक गुप्त ज्ञान, कुंडलिनीचं सगळ्यांना ज्ञात होतं ते फक्त सीमित होतं या नाथपंथीयांच्यामध्ये . आणि त्यात एक गुरुनी एकाच शिष्याला दीक्षा दिली पाहिजे असा प्रतिबंध होता. ही परंपरा होती. ज्ञानेश्वरांनी आपले गुरु निवृत्तीनाथ यांना विनंती केली की कृपा करून हे गुप्त ज्ञान मला सांगण्याची आपण व्यवस्था करावी . निदान एव्हढीतरी तुम्ही परवानगी द्यावी की मी नुसतं हे लिहून लोकांना सांगू शकेन . ह्या गोष्टीवर निवृत्तीनाथ राजी झाले. आणि ती आपली प्रथम अशी एक सामुहिक अഽअഽ (pause ) सामुहिक तऱ्हेनी ह्या गुप्त गोष्टींना जाणण्याची एक प्रथा नवीन प्रथा सुरू झाली. सहाव्या शतकात अ सहाव्या अध्यायात ज्ञानेश्वरीच्या , कुंडलिनी बद्दल त्यांनी वर्णन केलेलं आहे. पण धर्म मार्तंडानी मात्र सांगितलं की हा अध्याय निषिद्ध आहे कारण त्यांना त्यातलं काहीच गम्य नव्हतं. निषिद्ध म्हटल्या त्याच्या वरती पडदा पडला आणि कुंडलिनी बद्दल कोणी बोलायचंच नाही असं ठरलं. अशा रितीनी कुंडलिनीचं ज्ञान काही आहे किंवा नाही ह्या बद्दल सुद्धा लोकांना काही माहित नव्हतं . त्यानंतर कबीर, नानक आदी अनेक लोकांनी कुंडलिनीचं फार सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि असं हळू हळू ते वर्णन होत गेलं . म्हणजे शब्दामधेच सगळं वर्णन झालं . पण लोकांना ह्याला अनुभूती नाही आली. संतांचं जे महान कार्य झालंय ते हे की त्यांनी नेहमी अंधश्रद्धा, जात पात हे जे काही आपल्यामध्ये दोष आहेत सामाजिक , त्याच्यावरती फार मोठं अस्त्र उभारलंय. विशेषतः आपण म्हणु नुस्य सर्व सरस्वती ह्यांनी अंधश्रद्धेवरती इतकी भाष्य केलेलीं आहेत की आश्चर्य वाटतं की अजूनसुद्धा लोक त्या अंधश्रद्धेत का वाहत आहेत. त्यानंतर इतर कितीतरी दासगणु किंवा रामदासस्वामी ,तुकाराम ,नामदेव सर्वानीच ह्या ज्या आपल्यामध्ये कु कुरिती आहेत , ज्या आपल्यामध्ये अशा अഽअഽ गोष्टी आहेत ज्याने मनुष्य परमेश्वर सोडून भलत्या मार्गाला जातो त्याचावर फार टीकास्त्र सोडलं. विशेषतः रामदास स्वामींनी तर भामट्या गुरूंबद्दल फार टीका आणि फारच त्यांच्यावरती अഽअഽ लिखाण लिहिलेलं आहे. त्यांना काही शिव्या बिव्या येत नव्हत्या , तर काही आपल्या मनानी शिव्या मा करून त्यांनी अश्या लोकांना शिव्या दिल्या की हे लोकांना खोटं बोलून फसवतात , काहीतरी सांगतात आणि भोंदुगिरी करतात . पण त्यामुळे जो काही फरक झाला तो झालाच . पण विशेष करून आपल्यासाठी एक फार मोठं कार्य ते करून गेले. एकनाथ हे महारांच्या घरी जेवायला जात असतं म्हणून परत धर्म मार्तंडानी त्यांना त्रास दिला. ह्या लोकांना अंधश्रद्ध नीर निर्मूलन करण्याचा अधिकार होता कारण त्यांची डोळस श्रद्धा होती. त्यांना नीर क्षीर विवेक होता . पण जो तो भामटा उठतो आणि म्हणतो मी अमुक करतो , तो म्हणतो मी अमीक करतो असं होऊ शकत नाही. आता आपल्या इथे टुम निघाली आहे की देव नाहिच आहे. अशी काहीतरी टुम काढून तुम्ही काहीही कार्य केलं तर ते तुमच्यावर उलटणार आहे. कारण टुम हे वास्तविक खरं नसतं . त्यातली ही टुम काढली कीं देवाचं नाही. त्याला कारण मी असं पाहिलं की जे लोक दारू पितात ,घाण्यारडे व्यवहार करतात,बायका ठेवतात, हे करतात, ते करतात आणि पैशे खातात, पैश्याच्या मागे आहेत. त्यांना असं म्हणावाचं लागतं की देव नाहीये . नाहीतर खरतर देवाच खरतर घरात जर देव ठेवला तर लोकं म्हणतील अहो तुम्ही तुमच्या घरात हे देव आहे तुम्ही असे कसे वागता ? म्हणुन देव नाहीये असं सांगायचं. पण हे अशास्त्रीय आहे. तुम्ही आधी शोधून पहा देव आहे किंवा नाही. देव नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही. फार तर फार असं म्हणू शकता की देव आहे किंवा नाही हे आम्हाला माहित नाही . पण अशा रीतीच्या न नवीन नवीन पद्धतीच्या टुम आपल्या ह्या महाराष्ट्रात संतांच्या या भुमीत निघत आहेत. आणखीन कुठे नाही . आणखी कुठं असला प्रकार नाही. हे शहाणपण इथंच आहे. आणि बहुतेक हे लोक रिकामटेकडे आणि बुद्धीने फार नष्ट भ्रष्ट लोक आहेत. कारण माझा एका माणसाशी संबंध आला . तो माझ्याकडे आव्हाहन म्हणून आला होता आणि त्याला डोकंच नव्हतं मुळी . त्याला आध्यात्म माहित नव्हता , शास्त्र माहित नव्हतं . त्याला काही अഽअഽशास्त्रीय ज्ञान नव्हतं , मेडिकलच त्याला ज्ञान नव्हतं. मी मेडिकल स्वतः केलेलं आहे. एक अक्षर त्याला माहित नव्हतं की मेडिसिन तरी काय आहे . ह्याच्याशी बोलायचं तरी काय? आणि बाकीची जी मंडळी होती ती सुद्धा इतकी निम्न अभ्यास केलेली आणि इतक्या निम्नस्तराची की वैचारिक त्यांची पातळीच इतकी कमी होती . त्यात तो गृहस्थ मेस्मेरिझम करत होता आणि मेस्मरिझम करणं किती घातक आहे हे तुम्ही परदेशातील कोणत्याही अഽ मेडिकल ह्याला जर्नलला वाचलं तर होईल. पण हे कूपमंडूक . हे कधी बाहेर गेलेलेच नाहीत . यांना काही माहितीच नाही . त्याच्यामध्ये किती प्रगल्भता आलेली आहे. आता सहजयोगाबद्दल पेपर इंटरनॅशन मॅगझीन मध्ये आला . इतकचं नव्हे पण आता कुंडलिनीच्या वरती तीन डॉक्टरांना दिल्लीला M.D. ची पदवी मिळाली . म्हणजे त्यांना M.D. ची पदवी देणारे किती उच्च लोक असतील. सांगा मग . पण ह्या लोकांना एवढी अक्कल नाही समजायला की ज्यांना M.D. च्या पदव्या मिळालेल्या आहेत त्या काही अश्याच मिळाल्या असतील का? काहीतरी त्याच्यात असलं पाहिजे ना? त्या शिवाय सात/साठ डॉक्टर दिल्लीला अ ∫अ लंडनला याच्या वर प्रयोग करत आहेत. म्हणजे काय सुरवातीपासनाच मी म्हणत असे की याची जास्त प्रसिद्धी करू नका . कारण आपल्याला काय लोकांचे रोग बरे करायचे नाहीत. कुंडलिनी जागरणाने जर ते रोग बरे झाले तर झाले. पण काहीतरी अशी टुम काढायची की हे काहीतरी अ ∫अ कुंडलनी म्हणजे काही नाहीच आहे. अहो पण करून तर बघा . आज आम्ही छपन्न देशांमध्ये फिरतोय. त्या रशियाचे लोक जे लोक पराकोटीला सायन्सच्या गेलेले आहेत विज्ञानाच्या , ते सहजयोगात. दोनशे तिथले शास्त्रीय लोक . म्हणजे ज्यांना आपणं म्हणू फार मोठे पोहोचलेले ज्यांनी स्फुटिक बनवला तो सुद्धा . हे सर्व लोक सहजयोगाला शरण आले. चारशे डॉक्टर रशियामध्ये आज सहजयोग करत आहेत. ते सगळे महामुर्ख आहेत आणि हे दोन चार आपली डोकीं जी चाललेली आहेत आणि मुलांची इतकी दिशाभूल करत आहेत. त्या मुलांना मेस्मेरिझम करून त्यांची वाट लावणार . अशे अनेक तऱ्हेचे प्रकार इथे सुरु आहेत आणि शेवटी आम्हाला दगड मारले या लोकांनी, म्हणजे यांना म्हणायचं तरी काय? अहो वादविवाद करण्यात ठीक आहे . काय पण यांच्याशी वाद तरी कशात घालायचा . ज्यांना त्यात ज्ञान सुद्धा नाही. बोलायचं तरी कशाचं. मुलांची नुसती दिशाभूल करायची. त्यांना मेस्मिरिझम शिकवायचं आणि अश्या घाणेरड्या रस्त्यावर घालायचं की ते तिथून परत येऊ शकत नाहीत. आता कितीतरी अशे रोगी आपल्याकडे येतात , ज्यांना आम्ही मेस्मेरिझम मधुन काढलेलं आहे. एक आमचे डॉक्टर आहेत ते सात अ ∫अ सात हॉस्पिटल्सचे मुख्य आहेत. आणि त्यांनी लंडनमध्ये कितीतरी लोकांना मेस्मेरिझम मधून काढलंय . त्यांचे कितीतरी पेपर्स छापलेयत . पण इथे कूपमंडूक बसलेत . त्यांना काय समजणार ? बाहेर काय चाललंय ? कुठल्या कुठे मेडिकल सायन्स पोहोचलंल आहे ? आणि उद्या व्यवस्थतीत कुंडलिनी सुद्धा त्याच्यात येणारच. कारण जेव्हा सगळी कडे M.D. होतील तर कुंडलिनीबद्दल जरूर छापलं जाईल . कारण प्रत्येक वेळेला नवीन नवीन शोध लागत आहेत. नवीन नवीन गोष्टी शोधण्यात येतायत . आता हा नवीन शोध आहे कुंडलिनीचा . आणि तो सुद्धा मेडिकलला आला. पण मेडिकल मध्ये नाही म्हणून तो खोटा आहे असं कशावरून. आपण सगळं काही परदेशातूनच घेतलं पाहिजे का ? आपलं काही नसलं पाहिजे का? हा आपला वारसा आहे . हा महाराष्ट्राचा वारसा आहे . संतांनी घालून दिलेला वारसा आहे. तर हे काही तरी लहानशे ज्ञान घेऊन आणि त्याच्या वरन अशा गोष्टी करणं म्हणजे फार चुकीची गोष्ट आहे. लोकांची दिशाभूल करणं आणि त्यांना नश्वरतेत पोहोचवणं हे महापाप आहे. सहजयोगानी हजारो लोकांचं कल्याण झालेलं आहे. ते कशाने झालं. त्यांची स्वतःची शक्ती त्यांच्यात आहे कुंडलिनीची . ती शक्ती जागृत होते. जागृत झाल्यावर ती वर येऊन इथून ब्रह्मरंध्र छेदते. आणि ब्रह्मरंध्र छेदल्यावर तुम्हाला स्वतःला कळतं की तुमच्या डोक्यातून अशी थंड थंड वाऱ्याची अशी झुळूक येते. त्याच्या वरती आदिशंकराचार्यांनी लिहिलंय सलीलम सलीलम . बायबल मध्ये त्याला "cool breeze of the holy ghost" म्हणतात . प्रत्येक धर्मात सांगितलेलं आहे की तुम्ही आत्मसाक्षात्कार घेतला पाहिजे. आणि तुम्ही जर विचार केला की आज जर आम्हाला ही शक्ती जी चारीकडे विचारणं करत आहे जी सगळे जिवंत कार्य करते ती जर हाताला लागली तर आम्ही किती कार्य करू शकतो. आज आपण बघतो इतकी सुंदर फुलं इथे आहेत. ही फुलं एका बिजानी निर्माण झाली आहेत. एक लहानश्या बिजानी हे फुलं निर्माण झालेलं आहे. आणि कितीतरी फुलं एका बीजांनी निघतात. ती कशी ? ते कोण करतं ? कोणच्या ही माणसाची ठेवण कशी आहे ? त्याच्यामध्ये ऑटोनॉमस नर्व्हस सिस्टिम म्हणून एक संस्था आहे. ऑटो म्हणजे स्वयंचलित . हे स्वयंमः कोण आहे. ? स्वयंमः कोण चालवतंय ते ? हे जाणायला नको? गहनातून उतरून हे बघण्यासाठी आपल्याला आतून प्रवास करायला पाहिजे. बाह्यतनं आपण कुठवर जाऊ शकतो. मी जर म्हटलं की आपण आत मध्ये लक्ष घेऊन जाऊ . आपण आतमध्ये लक्ष घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून ही घटना होते. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा आपलं लक्ष आत मध्ये खेचलं जातं. आणि त्यानंतर आपण आपली चक्र कुठे खराब आहेत काय आहेत ते बघतो दुसऱ्यांची चक्र बघतो आणि दुसऱ्यांना फायदा होतो आणि आपल्यालाही फायदा होतो. ह्यासाठी तुम्ही पैसे देऊ शकत नाही . कारण ही जिवंत क्रिया आहे. ही पृथ्वी आहे. तिच्यामध्ये तुम्ही जर बी लावलं आणि त्याच्या जर सहजच बी उगवलं तर ह्या पृथ्वीतनं जे काही कार्य होत आहे त्याच्यासाठी तिला आपण पैसे देतो , तिला काही पैसे समजतात का? देवाला काही पैसे समजत नाही. हा तुमचा आपला व्यवहार आहे. परमेश्वराला पैशाशी काहीही संबंध ठेवायचा नाही.आता दुसरी गोष्ट जी आपल्या डोक्यात येते की आम्ही लोक इतके गरीब आहोत आणि आमच्या देशामध्ये अनेक तऱ्हेचे हाल आहेत. पण असं म्हणायचं की अमेरिकेत गरिबी नाही. तर जे अमेरिकेला गेलेले नाहीत त्यांनी अश्या काही गोष्टी पसरवलेल्या आहेत. तिथे ही गरिबी आहे आणि भयंकर गरीबी आहे. पण जे दुसरे त्यांचे हाल आहेत. त्या विज्ञानाच्या मागे लागून कारण विज्ञान हे एकांगी आहे. त्याच्यामध्ये प्रेम नाही. त्याच्यामध्ये कला नाही. त्याच्यामध्ये संगीत नाही. त्याच्यामध्ये फक्त काहीतरी जे समोर आहे ते त्याचा त्याचं विश्लेषण करून ते काय आहे ते काढण आहे . त्यांनी पाहिजे तर वस्तू तुम्हाला मिळू शकतात. पण मानवाची जी दशा झालेली आहे त्या देशांमध्ये, ते इथे बसून आपल्याला कळणार नाही. त्या लोकांना 65 टक्के लोकांना अमेरिकेमध्ये घाण्यारडा रोग झालेला आहे. तरतर्हेचे घाण्यारडे रोग झालेले आहेत. आणि त्यात त्याचं निदान लागत नाही .ते ठीकही होऊ शकत नाहीत. त्यात भर घालायला/काढायला आपल्या हिंदुस्तानांतन इतके भामटे गेलेले आणि त्यांनी खूप पैसे बनवलेत . आता हा रजनीश. ह्याने इतके पैशे बनवले. पण त्याच्यावरच उलटलं सगळं नशीब. त्याने इतके इतके रोल्सरॉयस विकत घेतले. रोल्सरॉयचा आणि देवाचा काय <> हाया . आधी म्हणे मी भगवान. मग म्हणे मी हा मग तो मग तो आणि . आणि त्याच्या नादी लोक लागले आहेत काही. मला समजत नाही आपलं डोकं आहे की खोकं आहे . अहो जो मनुष्य स्वतःसाठी एवढ्या रोल्सरॉयस विकत घेतो लोकांच्या कडनं पैसे लुटून , त्या माणसाची काय अक्कल असायला पाहिजे. त्याच्या मागे लागायला. तुम्हाला फक्त पैशे हवे आहेत का? म्हणून तुम्ही त्याच्या मागे लागले आहेत का? पण पैशापायी लागलेले लोक आज कोणत्या रसातळाला गेलेले आहेत ते जरा बाहेर जाऊन बघितलं पाहिजे. त्यांची समाजव्यवस्था काय आहे ?मुलांना कुणाचाही आदर नाही. शिक्षकांचा आदर नाही. तुमच्या आई वडिलांचा आदर नाही. कितीतरी आई वडील लंडनमध्येच म्हणतात की एका आठवड्यामध्ये (pause) एका आठवड्यात दोन मुलं आई वडील मारून टाकतात. हे स्टॅटिस्टिकस आहे तिथलं . ऐकलं नसेल तुम्ही. कधी कानावर सुद्धा आमच्या आलं नाही ह्या गोष्टी . अशा गोष्टी तिथे पहायला मिळतात आणि इतका घाणेरडा प्रकार आहे. नैतिकता इतकी खालच्या दर्जाची आहे की मी आपल्याला ते सांगु शकत नाही. इतके ते हलकटपणाच्या गोष्टी आहेत की मी आपल्याला सांगू शकत नाही. इतका भयंकर प्रकार आहे. नैतिकतेच्या नावाने काहीही तिथे नाही. आणि आपल्या देशामध्ये नैतिकता, सामाजिकता फार जबरदस्त आहे. अजूनही आपली कुटुंब व्यवस्था चांगली आहे. अजूनही इतकी वाईट स्थिती झालेली नाही. कारण आपल्याजवळ अध्यात्माचा पाया आहे. अध्यात्माचा पाया जो पर्यंत माणसात येणार नाही तो पर्यत कोणतीही प्रगती सद्गतीला जाणारच नाही.

आता एखाद्या माणसाला तुम्ही शंभर रुपये देऊन बघा. तो लगेच गुत्यावर जाईल. पण तो तर आध्यात्मात बसलेला मनुष्य असला, ते करणार नाही. समजा तुकारामाला शंभर रुपये दिले तर तो ते घेणार नाही. ते सगळ्यांना वाटून टाकतील . ते संत साधू. त्यांचं आयुष्य बघा. कशे पवित्र . किती निर्मळ. त्यांनी किती समाजासाठी कष्ट घेतले आणि लोकांनी किती त्यांना त्रास दिला. ज्ञानेश्वरांच्याबद्दल सुध्दा लोकं टीका करतात मला आश्चर्य वाटत की तेवीस वर्षांमध्ये जे काही लिहून गेले त्याच्यातल्या दोन ओळी तरी आज घेऊन दाखवा कोणीतरी. त्या सूक्ष्म अनुभवाच्या. आम्ही अनुभव आहोत. हे सहजयोगी अनुभवत आहेत.पण ते कुठे आहे. तेवीस वर्षांमध्ये अमृतानुभव सारखा ग्रंथ ज्या ज्ञानेश्वरांनी लिहीला, त्यांची महती सांगावी तेवढी थोडी आहे. तर अश्या संत साधूच्या ह्या महाराष्ट्रामध्ये आपण समजलं पाहिजे की आपला हा वारसा आहे. आणि तो आध्यात्म मिळावल्या शिवाय, त्याचा पाया घातल्या शिवाय कोणतीही प्रगती हानिकारक आहे हे तुम्ही कोणत्याही देशात जाऊन बघा. आता रशियालाच बघा. रशियाने सांगितलं देव नाही, काही नाही, काही नाही. आज काय परिस्थितीला आले. शेवटी सहजयोग तिथे धर्मासारखा पसरलेला आहे. त्याला मी म्हणत नाही की तुम्ही देवाला मानलं नाही तर हे नुकसान होतं. पण जीवन कसं शुष्क होऊन जातं. जस काही तुम्ही चिपाडासारखं आपल्याला करून घेतलंय. सबंध त्यातला रसच निघून गेला. तश्या शुष्क जीवनाला कंटाळूनच त्यांनी सहजयोगाला कवटाळून घेतलेलं आहे आणि मला आश्चर्य वाटतं की त्या लोकांना इतकी आध्यात्मिक ओळख कुठून आली. नुसता माझा फोटो बघून ते येतात. नुसत्या माझ्या फोटोवर ते लोक येतात आणि एकेका प्रोग्रॅमला सोळा हजार, चौदा हजारच्या कमी लोक नाहीत. कारण त्या लोकांना हे कळलेलं आहे की एकांगी वृत्तीने जे आम्ही पुढे गेलो, त्याच्या परिणामामुळे आम्हाला इतका त्रास झालाय. कारण त्यांच्या जीवनात आनंदच नाही मुळी. कोणचाच आंनद नाही. आता आपल्यामध्ये ही कुंडलिनीची जी शक्ती आहे,ती जर काय एकदा जागृत झाली, तर ती या सहा चक्रातनं जाते. आता त्याला मेडिकलच सुद्धा अनुसंधान आहे. ह्या सहा चक्रांमधनं जाताना ती आपल्या सहा चक्रांना प्लावित करते. ही चक्र जेव्हा अत्यन्त आपण वापरतो त्यामुळे रोग तयार होतात. आता म्हणतात की भुतं नाहीत. भुतं म्हणजे अशी काय माणसं स्वरूप नसतात. पण सूक्ष्मात जे काही झालेलं आहे. जे काही आपल्या अഽअ सामुहिक सब अഽअ सामुहिक अഽअ चेतनेमध्ये झालेलं आहे ते सगळं आपल्या भूत काळामध्ये आहे. आणि हे डॉक्टर सुद्धा मानतात इथे की जेव्हा आपल्याला कॅन्सरचा रोग होतो तेव्हा protein 58 आणि protein 53 अशा दोन जिवंत काहीतरी आ proteins आहेत की ज्या trigger करतात. ज्यांनी कॅन्सर सुरुवात होतो. असं म्हणतात. म्हणजे या कुठ्न आल्या. असं विचारलं तर ते स्पष्टच सांगतात, इंग्लीश मध्ये सांगते की they are, they are existing in the area which was built in from our(pause) creation. म्हणजे आमच्या आमचं जेव्हा पासन सरजन (सृर्जन) झालं तेव्हा पासनं ही आमच्यामध्ये व्यवस्था आहे. आणि जेव्हा त्यांचा अटॅक येतो तेव्हा कॅन्सर trigger होतो. असं डॉक्टर्स म्हणतात. पण इथले डॉक्टर्स अजून इतके मागासलेले आहेत. एक दोनच आहेत म्हणा त्याच्यात. ते इतके मागासलेले आहेत की त्यांना काही अक्कलच नाही.त्यांच्याशी बोलायचं तरी काय? त्यांना जर विचारलं protein 53 तर ते काही माहीत नाही. कुठल्याकुठे science चाललेलं आहे आणि तुम्ही कुठे बसून science ची महती गातात . आणि जे तिथे पोहोचलेयत ते मानतात की आता आध्यात्म्या शिवाय आम्हाला मार्ग नाही. तर आम्हाला आध्यात्म द्या. आध्यात्माची आणि जोपर्यंत science ची तुम्ही कांग सांगड घालत नाही ,सर्वंगीण उन्नती होणार नाही. फक्त एकांगी होईल. म्हणूनच सहजयोगात लोकांची सर्वांगीण उन्नती होते.आता आमच्या कडे अशे दोन तीन scientists आहेत की ज्यांना doctorate मिळाली. अर्थात त्यांनी साय सहजयोगावरती प्रयोग नाही केले, पण त्यांनी जे प्रयोग केले त्याच्यामध्ये जी त्यांना अंतरदृष्टि मिळाली त्यामुळे त्यांना doctorate मिळाली. आणि ते म्हणतात ही स्पष्ट की अश्या मुळेच झालंय म्हणून. त्या शिवाय पुष्कळ सहजयोगामध्ये वैज्ञानिक दृष्टीने कार्य होतंय. पण मुख्य म्हणजे काय की आध्यात्म असायला पाहिजे. जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये प्रकाश पडतो. थोഽडासाच तो मेंदू आपण वापरत असतो. आणि जेव्हा प्रगल्भता येते त्या मेंदूला, तेव्हा मनुष्याला इतकी सरजन शक्ती येते. आपल्याला आश्चर्य वाटेल की.. आता हे मोठमोठाले जे आर्टिस्ट लोकं आहेत विशाक्षु सेन खां म्हणा,अमजद अली खां म्हणा, हे सगळे मुसलमान लोकं आहेत. पण ते सर्व म्हणतात की माताजी तुम्ही जेव्हा पासन आम्हाला सहजयोग दिला तेव्हा पासन आमचं इतकं कार्य वाढलंय. सगळे म्हणतात. उघड उघड , उघड सांगतात. सफाक हुसेन खां आहेत ते सांगतात सगळे सांगतात हे माताजी सहजयोगानीच आम्ही वाढलो. नाहीतर आम्ही इतके वाढलोच नसतो. ते मुसलमान लोकं आहेत.तरी सुद्धा ते असं म्हणतात. तेव्हा तुम्हाला जर आपली स्वतःची प्रगती करून घ्यायची असली, जर तुम्हाला सर्वांगिण प्रगती करून घ्यायची असली तर आधी आपला आध्यात्म जमवून घ्या. आणि त्या साठी कुंडलिनीच जागरण आवश्यक आहे. त्या शिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. पण एखादा जर हिटलर येऊन म्हणेल की आम्ही आव्हाहन देतो दोन लाखांचं तुम्ही आमचं कुंडलिनी जागृत होऊ द्या. होऊच शकणार नाही. अश्या माणसांचं कसं होणार? दारु पितात, वाईट कामं करतात. अश्या माणसाच जागरण होणं शक्य नाही. उगीचच त्याच्यात हात घालण्यात काय अर्थ आहे. की दडपशाहीने हिटलरशाहीने जर कोणी म्हणेल एखाद्या डॉक्टरला जाऊन की तू जर मला ठीक केलेस तर मी दोन लाख देईल, तू चालता हो बरं इथनं.(pasue) त्याला पाहिजेत जातीचें. येड्या गबाळ्याचे काम नव्हे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि त्या साठी हे भक्तिभावाने, सरळ मनाने . मग ते किती विद्वान असोत किंवा अशिक्षित असोत, शेतकरी असोत किंवा एखादे officer असोत सगळ्यांनाच परमेश्वरानी आशीर्वाद दिलेला आहे आणि ती आपल्यामधली शक्ती आहे ती आपली स्वतःची शक्ती आहे. ती आपली आई आहे. ती हा पुनर्जन्म आपल्याला देते तोत आपण का घेऊ नये. जर मी म्हटलं उद्या की इथे एक हिरा ठेवलेला आहे फुकट. तर सगळ्या जगातनं लोक ते घ्यायला येतील. पण काही शहाणे असे ही असतील होय हे काहीतरी(pause). पण हिऱ्याच्या बाबतीत कदाचित नाही सापडणार तसे लोक. पण स्वतःची शक्ती, स्वतःच शरीर स्वतःचाच मन बुद्धी आणि स्वतःचाच कार्य सगळं असताना मग अशा रीतीचं वेड घेऊन पेडगावला जायची काय गरज आहे. आपल्या बुद्धीला थोडातरी विचार करून पाहायला पाहिजे की आम्ही अंधश्रद्धेमध्ये कसे बुडत होतो. आता सहजयोगमध्ये जेवढे लोक आलेले आहेत ते मग रशियाचे असेनात का, इंग्लंडचे असेनात का.सगळीकडे अंधश्रद्धा आहे.कुठलेही असेनात का. हिंदुस्तनातले असेनात का. सगळ्याची अंधश्रद्धा धुवून निघाली. कारण सत्यामध्ये उभे झाले ना?(pause). जस तुमच्या हातात एक साप आहे आणि आम्ही म्हटलं हा तुमच्या हातात साप आहे , तुम्ही सोडा. पण अंधार आहे. तुम्हाला दिसत नाही.डोळे बंद आहेत. तुम्ही म्हणाल नाही हा दोरखंडच आहे. पण जसेच तुमचे डोळे उघडतील तसाच तो साप दिसेल आणि तुम्ही आपोआपच सोडून द्याल. मी काही कुणाला सांगत नाही हे करून नका ते करू नका.तसंच आहे. जेव्हा एकदम हातामध्ये केवळ सत्य आलं म्हणून (Not Audiable) आपले जे आले आहेत आज परदेशी पाहुणे यातले काही लोक व्यसनात इतक्या आधीन होते. तर्हतर्हेचे आज कालचे जे नवीन ड्रग वगैरे मिळाले त्याच्यामध्ये इतके आधीन होते, सगळं सोडून एका दिवसात उभे झाले कमळा सारखे. हे फ़ार सुशिक्षित , फार मोठे विद्यान लोकं आहेत. पण यांची नम्रता बघा. ह्यांची गहनता बघा. की एकदा सत्य सापडलं त्याच्या मागे लागायचं. कारण आम्हाला काय करायचं. आम्हाला आमचं भलं करून घ्यायचंय. आमचं कल्याण करून घ्यायचं आहे. ह्याच्या मागे मागे. ते आता गाव गाव माझ्या बरोबर फिरतात. आपल्याला माहिती आहे की हे लोक सगळे फार ऐशोआरामात राहणारे लोकं आहेत. पण इथे वाट्टेल त्या परिस्थितीत.. कधीही मला म्हणत नाहीत की आम्हाला त्रास झाला. कधीही म्हणत नाहीत. हे खरे संत झाले. तसंच तुम्ही सुद्धा सहजयोगामध्ये हे प्राप्त करा. ही शक्ती स्वतःची तुमची आहे ती प्राप्त करा. पण।जर तुम्ही इथे अश्या इच्छेने आला असाल, की अഽഽഽ हे काहीतरी खोटंच आहे . म्हणजे असं ठाम विचार करून जे लोकं आले असतील, त्यांची कुंडलिनी कधीही जागृत होणार नाही. कारण कुंडलिनी ही तुमची आई आहे आणि अश्या लोकांना ती कधी मदत ही करणार नाही.मग आजारी झाले म्हणजे लोकं म्हणतात माताजी आता काहीतरी सांगा. भोंदू लोकांच्या कडे गेले मग म्हणतात काहीतरी सांगा. मी म्हणते आधीच का नाही आपण ठीक करून घ्यायचं. आधीच आपल्या मुलांना चांगल्या वळणावर आणा. आणि त्यांच्यामध्ये नैतिकता आत्ता पासन भरायला पाहिजे. आपल्या देशामध्ये फार मोठे, फार मोठा एक त्रास आहे, म्हणजे भ्रष्टाचार आहे. असा भ्रष्टाचार मी कधी ऐकला नव्हता. आम्ही आमचे साहेब कलेक्टर होते, त्या वेळेला कोणी असा विचारही करू शकत नव्हता की कलेक्टर नि कमिशनर नि हे लोक भ्रष्टाचार,.. म्हणजे अशक्य गोष्ट. कानावर सुद्धा येत नसे.पण आम्ही पुण्याला आल्यावर सगळे सांगायला लागले, माताजी हा पैसा खातो, तो पैसा खातो. तो पैसा खातो. म्हटलं अरे, हे काय? आणि तुम्हाला भितात म्हणून पैसा ही खात नाहीत आणि काम ही करत नाहीत. अरे म्हटलं आहे पैशे खातात की काय? जेवतात बिवतात की पैसेच खात बसतात. हा प्रकार आपल्या देशात एवढा वाढलेला आहे. त्या भ्रष्टाचाराच्या मागे लागायच्या ऐवजी काहीतरी मूर्खपणाचे धंदे केलेले आहेत. तो भ्रष्टाचाराचा आज जर संत असते तर त्यांनी हाणून काढलं असतं सगळं. आम्ही सगळीकडेच सांगत असतो, की कशाला हे करतात. ह्यानी आपल्या देशाची उन्नती होणार नाही. आपल्या मुलाबाळांचं काय होईल. पुढे त्यांचं शिक्षणाचं काय होईल?आज सगळीकडे इतका भ्रष्टाचार चाललेला आहे. तो तर पाहिला पाहिजे. तिकडे कुणाचं ही लक्ष नाही. तिकडे कुणाचं लक्ष नाही. तो म्हणेल डोळे मिटून वा. कोणी बोलायला तयार नाही. मला तर वाटतंय या देशामध्ये विशेषतः महाराष्ट्रात अत्यंत भ्रष्टाचार आहे. आणि लोक म्हणजे नुसते भयभीत आहेत. कोणी बोलायलाच तयार नाहीत. त्यांना माहिती आहे की हा मनुष्य भामटा आहे. पण बोलणार नाहीत हा भामटा आहे. काय दशा झाली आपली. आपण इतके मिंध्ये झालोत. तुम्ही एकदा सहजयोगात सगळे या. म्हणजे तुम्हाला हिम्मत येईल. सांगायची की हा भामटा आहे. हा मला लुटून खातो. सहजयोगामध्ये आम्ही पाहिलेलं आहे की एकदा मनुष्य आला की त्याच्यात केवढं परिवर्तन होतं. इतका निर्भय होऊन जातो. ख्रिस्ताचच उदाहरण घ्या. ख्रिस्ता पुढे एक वेश्या येऊन तिने आश्रय मागितला. सगळे तिला दगड मारत होते. ती धावत धावत आली ख्रिस्तासमोर. म्हणे मला तू आश्रय दे. आता ख्रिस्ताचा आणि वैशेचा काही संबंध नाही. पण तो एकदम उभा झाला सगळ्या समोर. म्हणाला तुमच्यातल्या ज्या माणसानी कोणताही पाप केलं नसेल त्यानी दगड मारावा. पण मला मारावा. सगळे आपले दगड खाली पडले. (pause) तर ह्या देशाची आपली जी मूलतः इतकी मौल्यवान अशी संपदा आहे तिला आपण जाणून घेतलं पाहिजे. सारं जग आपल्याकडे बघत आहे. मी कुठेही गेले तरी म्हणतात की आम्हाला इंडियाला जायचं आहे. इथे इतकं अ$अ$ सुंदर आहे वातावरण. इथले लोक म्हणजे किती धार्मिक आहेत. आणि इथले लोकं म्हणजे किती पोहोचलेले आहेत. आता हे सगळे समजतात महाराष्ट्राचे सगळे लोक तुकारामच आहेत. आणि तुमच्याबद्दल फ़ार त्यांना आदर वाटतो. कारण हे महाराष्ट्रात जन्माला आले कसे. काहीतरी पूर्वजन्मी आम्ही काही बहुपुण्य केल्याशिवाय हे लोक आले कसे महाराष्ट्रात ? नाहीतर आम्ही त्या रद्दी देशात आलो जन्माला आणि हे चांगले इथे जन्माला आले.त्यांना असं वाटतं वां वां. महाराष्ट्रीयन लोक म्हणजे काय? वां वां. आता काय सांगायचं त्यांना?. आपलीच मुलं. त्यांना काय सांगायचं तिथला प्रकार काय भयंकर आहे तो ? आणि कश्या परिस्थितीत आपण राहतो.पण यांना असं वाटतं. कारण महाराष्ट्र देश. ह्याच्या मध्ये किती चैतन्य आहे ते तुम्हाला दिसत नाही. त्यांना दिसतयं. त्याला बघून ते म्हणतात की ही हा देश म्हणजे काय? प्रत्येक वर्षी हे लोक येतात. आणि निवडक लोकं आम्ही बोलावतो. जास्त लोकं नकोत. कारण फ़ार लोकांना घेतलं तर व्यवस्था होणार नाही. प्रत्येक वेळेला. त्यात त्यांचं आहे की ह्या वेळेला तुम्ही मला जाऊ द्या. तुम्ही मागच्या वेळेला गेले होते. अशी आपापसामध्ये सामोपचसर करून. आलंच पाहिजे. आणि म्हणतात की आम्हाला गेलचं पाहिजे माताजी महाराष्ट्रात. म्हटलं त्यांच्या मते तुम्ही सगळे पस्तीस कोटी देव इथे बसलेले आहात. आणि तुम्हाला वंदन केल्या शिवाय ,मिठ्या मारल्या शिवाय त्यांचं काही भलं होणार नाही. अशी त्यांची कल्पना आहे. अर्थात मी काही त्या बद्दल जास्त बोलत नाही.एक काळ असा येईल तुम्ही व्हाल तसे. का नाही होणार? पण आधी स्वतःची(pause) पूर्ण परीक्षा करून घेतली पाहिजे. आणि स्वतः बद्दल पूर्ण अभिमान वाटला पाहिजे.इतकाच नव्हे पण आपण मानव जातीला आलो आहेत.आता आपल्याला अति मानवजातीला गेलं पाहिजे. आणि त्याची जर व्यवस्था झालेली आहे. जी गोष्ट श्री ज्ञानेश्वरांनी आपल्या गुरुंकडनं मागून घेतली, जे त्यांनी लिहिलंय ते पसायदान आज आम्ही इथे उभं केलेलं आहे . ते इथे उभं करून ठेवलेलं आहे. त्याचा साक्षात करायला कोणीतरी पाहिजे होता. ते आम्ही केलंल आहे. त्याला कारण असं की आम्ही जन्मलोच अशे.आणि पुष्कळ विचार करून सगळ्यांच्या मध्ये काय दोष आहे? कोणत्या गोष्टीमुळे जागृती होते ते आम्ही शोधून काढलं. त्यामुळे आज सामूहिक जागृती झाली. आणि सामूहिक म्हणजे हजारो लोकांची जागृती झाली आहे. आणि जागृती झाल्यावर त्याच्यात तुम्ही किती रमता किती मुरता आणि तुमच्यात जी गहनता आहे तिला तुम्ही कधी पकडता? ह्याच्या वरती सहजयोगाची प्रगती अवलंबून आहे.(pause). या धकाधुकीच्या काळामध्ये हे कार्य फार जलद व्हायला पाहिजे होतं. कारण जर तुम्ही हिमालयावर गेलात, आणि तिथे जाऊन तपश्चर्या केली, सगळं काही केलं, आणि गुरू कडून दंडके खाल्ले, त्याच्या नंतर कसतरी तो म्हणेन बरं मी एका चक्रापर्यत चढवतो. मग दुसऱ्या चक्रावर चढवेलं. किंवा कोणचीतरी अशी व्यवस्था शोधली पाहिजे की ज्यानी कुंडलिनी सटकन वर आली पाहिजे आणि ती सामूहिकतेत आली पाहिजे.तो शोध फक्त तेवढा आम्ही लावला. बाकी सर्व कार्य संतांचं आहे. त्यांचा सगळा आशीर्वाद आहे. आणि मला पूर्ण आशा आहे की महाराष्ट्रातले लोक जागृत होतील. आपल्यातल्या ज्या अंधश्रद्धा आहेत, आता मी पुष्कळ लोकांना बघते की त्यांना कोणतातरी एक गुरू धरला. गुरूच्या मागे लागले. मग ते गुरू जशे नाचावतील तसे.पण पहिल्यांदा हे लक्षात ठेवलं , कोणीही मनुष्य तुमच्याकडनं पैसे जर देवाच्या नावाने पैसे घेतो तर तो मनुष्य भोंदू आहे. त्याचा काहीही देवाशी संबंध असू शकत नाही. आणि जेव्हा आपल्या लक्षात येईल, की हे भोंदूगिरीचे काम करणारे लोक आम्हाला कसे लुटत आहेत, तेव्हाच तुमचा अ अंधकार जाणार आहे. पण ते फक्त सहजयोगानंतर पघडते . आता आपल्याला एक उदारणार्थ सांगते, की आमच्याकडे ब्राह्मण होते, सहजयोगी. आणि त्यांनी पुष्कळ कार्य केलं. त्यांच्या वडिलांनी . तर त्यांच्या वडिलांचं श्र श्राद्ध होतं. तर त्यांनी ब्राह्मणांना श्राद्धाला बोलावलं. तर त्यांनी सांगितलं की बुवा मला काही फुरसत नाही. पण तसं काही नाही. पण अ अ$ बरं होईल की तुम्ही शुक्रवारी श्राद्ध करा. आता ते ब्राह्मणचं होते. त्यांनी पंचाग उघडून बघितलं. तर तो दिवस ठीक नव्हता. आणि ह्यांनी सांगितलं होतं की तुम्ही मंगळवारी या. ते म्हणाले नाही मंगळवार ठीक नाहीय, बरं नाहीय. त्या दिवशी प्रदोष आहे. अमुक तमुक. काढून टाकलं. त्यांनी पंचाग काढलं. त्या दिवशी प्रदोष बिदोष नव्हता. शुक्रवारी होता सगळा प्रदोष वैगैरे . तर यानी आपलं स्वतःच मंगळवारी उरकून टाकलं श्राद्ध. तर ते शुक्रवारी पोहोचले तिथे. तर त्यांनी सांगितलं मी करून टाकलं माझं श्राद्ध माझ्या वडिलांचं. तर म्हणे असं कसं?मग काय? तुम्ही त्या दिवशी प्रदोष होता म्हणे कोणाचं पंचाग आहे तुमचं. टिळक. बरं बघा. टिळकांच्या पंचांगात दाखवलयं बघा. काय लिहिलंय? चालते व्हा म्हणे इथून.त्यांना घरातनं काढून टाकलं. आई म्हणे अरे असं काय करतोस? किती जुने आपले पुरोहित आहेत. काही नाही म्हणे. ह्यांनी आज पर्यंत आपल्याला असं खोटं बोलून बोलून नेहमी प्रदोषमध्येच केलं असेल. जाऊ देत. जा तू. आणि असं करून त्यांना काढून टाकलं. अशा रीतीने सहजयोगमध्ये आता पुष्कळ लोकांनी आपल्या मुलींची लग्न मुलांची लग्न दुसऱ्या जातीत केली. बहुतेक करतात. किती लोकांची त्यांनी आपल्याला ही माहिती आहे की श्रीरामपूर, संगमनेर इथून कितीतरी मुलींची लग्न बाहेर देशात झाली. एक ही पैशाचा हुंडा नाही, काही नाही. काही नाही. काही खर्च नाही. आणि व्यवस्थित आज आरामात सौख्यात आहेत. हे सगळ्यांना माहिती आहे. हे सगळं कार्य तसं जर मला म्हणायचं असतं की सहजयोगाशिवाय करू शकले असते तर शक्यच नाही. कारण जागृतीमुळे मनुष्याला हे मिळत. जेव्हा त्याच्या मध्ये प्रकाश येतो तेव्हा त्याला कळतं हे चूक आहे.जात पात ही चूक गोष्ट आहे . ह्याला काही अर्थ नाही.हा नुसता असाच काहीतरी खोटा मिथ्या वाद आहे हे त्याच्या लक्षात येतं. आणि त्याच्या स्वतःच्या डोक्यात हे लक्षात येतं. ते काही जबरदस्तीनी, दडपशाही करून, कुणाला आव्हाहन देऊन होणार नाही.संतांचं कार्य एवढ्या साठीच . सगळे मान्य करतात. कारण त्यांची डोळस श्रद्धा होती आणि त्यांचं चरित्र होतं. चरित्र होतं. त्या चरित्राच्या दबावावरती ते हे सगळं म्हणत असतं आणि लोकांनी ती मान्यता केली. आणि त्याचा कित्ता बरेच लोकांनी गुंडवला. तसंच गांधीजींच्या बद्दल मी म्हणू शकेन की त्यांनी सुद्धा फार कार्य केलेलं आहे या बाबतीत. आणि त्यांनाही लोकं एवढ्यासाठी मानत असतं कारण चरित्रावन मनुष्य होते. चरित्र होतं त्यांचं. मी सुद्धा गांधीजीच्या बरोबर एक दिवस राहिलेली आहे. फार चरित्रवान होते. तसंच शास्त्रीजी एक दुसरे. फार चरित्रावन होते. आणि त्यांच्या बरोबर माझे यजमान होते. त्यांचे मुख्य सचिव होते. आणि इतका तो मनुष्य बाणेदार तितकाच तो मनुष्य जाणता म्हणतात तसं. आणि त्यांनी इतकं इमानदारीने आपला देश चालवला होता. त्याला कारण ते आत्मसाक्षात्कारी होते. जसे शिवाजी महाराज सुध्दा आत्मसाक्षात्कारी होते. अशे अनेक लोक. अकबर हा सुद्धा आत्मसाक्षात्कारी होता. कारण त्यांच्या चरित्रावरून, त्यांच्या वागण्यावरून, त्यांच्या विचारावरून त्यांच्या प्रगल्भतेमुळे आपण समजू शकतो हा मनुष्य कोणत्या लायकीचा आहे. त्या स्तिथीला आपण ही जाऊ शकतो. सहजयोगाने तुम्ही कुठल्या कुठे पोहोचू शकता. त्याचं काही सांगताच येत नाही. कुठे पोहोचाल, काय होइल तुमचं. मला कधी कधी आश्चर्य वाटतं. एक गृहस्थ माझ्या समोर आधी तबला वाजवत होते तर त्यांना विशेष येत नव्हतं म्हणा. त्याच्यानंतर आम्ही एका मोठ्या प्रोग्रॅम ला गेलो होतो . तर मला वाटलं की हा तोच गृहस्थ आहे की काय तबला वाजवतोय म्हणून. तर ते दुसरे बसलेले होते, म्हणे हा कसा असेल. म्हटलं तोच आहे. तबला तर त्याचा खडखड चाललाय त्याचा. तर म्हटलं बरं. आमची मी नेहमी फुलं पाठवत असते. त्यांना फुलं पाठवली . तर धावत आला तो माझ्या पायावर. माताजी म्हणे तुम्ही फुलं कशाला पाठवलीत. मीच आहे म्हणे तो.मीच आहे तो. म्हटलं असं . मला तर कळलं नाही. असं कसं. तर या सर्व ज्या किमया झाल्या आहेत, ही जी विशेष शक्ती जी माणसाला आलेली आहे ही कुठून आली. ही तुमच्यातलीच आहे. ही तुमच्या मध्ये आहे .तुझं आहे तुझंपाशी. ते मिळवलं पाहिजे. आणि त्यासाठी फक्त इच्छा असायला पाहिजे. शुद्ध इच्छा असायला पाहिजे की आम्हाला की आम्हाला आत्मसाक्षात्कार पाहिजे. ती जबरदस्ती नाही कुणी करू शकत. ते तुम्ही मागायला पाहजे की माताजी आम्हाला आत्मसाक्षात्कार हवा आहे. तेव्हाच हे घटित होईलं . कारण आत्मसाक्षात्कारानंतर तुम्ही एकदम स्वतंत्र होता. एकदम. पुर्णतः. कोणचीही तुमच्यावर सत्ता चालू शकत नाही. कोणचेही तुम्ही व्यसन घेऊ शकत नाही. व्यसनाच्या आधीन होऊ शकत नाही. कोणच्याही ही गोष्टीला तुम्ही बळी पडत नाही. आणि त्या स्वतंत्रतेला मिळवण्यासाठी ही जी आज तुमची स्वतंत्रता आहे ती मान्य केली पाहिजे. ती झाल्या नंतर. हे आहे. चमत्कारपूर्ण आहे. पण मनुष्य हा सुद्धा चमत्कारपूर्ण आहे. त्याची आपल्याला आज कल्पना येणार नाही. जसं की मी पुष्कळदा सांगते की जर तुम्ही टेलिव्हीजन चा सेट एखादया रानावनातल्या लोकांना नेऊन दाखवला आणि सांगितलं की ह्याच्यामध्ये अ$अ$ ही फार सुंदर अअ अशी व्यवस्था आहे. की तुम्ही त्याच्यामध्ये तरतर्हेचे फिल्म्स बघू शकतात. नंतर तुम्हाला गाणी ऐकायला येतील. ते म्हणतील हे काय आहे डबडं. याच्यात कसं शक्य आहे. तसं आपण आपल्याला डबडंच समजतो. पण जेव्हा त्याचा संबंध त्या विश्वव्यापी शक्तीशी होतो, तेव्हा ते डबडं नसुन एक फार मोठी अलौकिक वस्तू आहे हे आपल्या लक्षात येतं. आणि तेव्हा आपण आपल्या गौरवला गाठतो . तेव्हा आपल्याला सांगायचं म्हणजे असं आहे, सहजयोगामध्ये आल्यानंतर जागृती फार सोप्पी आहे. विशेषतः महाराष्ट्रात तर इतकी सोप्पी आहे. आज मी उशीर होण्याचं कारण असं की त्यांनी माझी मिरवणूक काढली. आणि चार पाच हजार माणसं . म्हणजे वाटलंच नव्हतं मला की इतके लोक येतील ते. आणि म्हणे आत्मसाक्षात्कार दिला. बसले . पाच मिनिटांत सगळे पार.ही महाराष्ट्राची किमया आहे..या भूमीची विशेषता. आणि तुमची पुण्याई. आश्चर्याची गोष्ट आहे. अहो असं फॉरेन मध्ये नाही हा.माझे हात दुखतात त्या लोकांच्या . अगदी. कारण हे बुद्धिवादी पहिल्यांदा. आणि यांनी गणपतीचा ग ह्यांना माहिती नाही. त्यामुळे फार त्रास आहे..पण तरी सुद्धा , एकदा जमले म्हणजे जमले . मग त्यांचं असं तसं चालत नाही. अगदी जमले म्हणजे काय? पक्के लोकं आहेत. त्यांना जेवढं माहिती आहे तुमच्या गणपतीबद्दल तितकं तुम्हालाही माहीत नाही. आणि काय त्यांचं महात्म्य आहे. आता एखाद्या इंग्लिश माणसाला एक शब्द काय शिकवायचा मराठीतला तर अशक्य. जर काही म्हणायचं असलं तर त्यांना काहीतरी इंग्लिशमध्ये सांगावं लागायचं.पण आता हे संस्कृत. आदिशांकाराचार्यांचं संस्कृत जे आपण नाही म्हणू शकणार ते इतकं स्वच्छ, स्पष्ट आणि इतक्या घाईने अ$ गतीने म्हणतात. आश्चर्य वाटतं की कसं सगळ्यांना आलं. त्याला कारण. कारण एकच आहे, की संस्कृत ही देवाची भाषा आहे. आणि ह्यांच्यात ते देव जागृत झालेत आहेत असं वाटतं मला. कारण संस्कृत तसंही आपल्या मुलांना कोणाला शिकवायला गेलं तर जमणार नाही त्यांना . तितकंच नाही पण आता हे मराठी भाषा शिकतायेत. आणि आपण पाहिलेलंच आहे की मराठी भाषेमध्ये किती शुद्ध हे उच्चारण करून बोलतात. आपण त्यांची गाणी म्हणू शकत नाहीत. पण ते आपली गाणी किती सुंदर बोलतात . त्याला फक्त हेच एकच म्हटलं पाहिजे की ह्यांच्या ज्या गुप्त शक्ती होत्या त्या जागृत झाल्या. त्यामुळे हे इतकं कार्य करतात . अशारितीने अनेक प्रागणांमध्ये सहजयोगाचा प्रकाश दिसतो. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात मध्ये शेतकी मध्ये पुष्कळ प्रयोग झालेले आहेत.आणि शेतकी मध्ये त्यांनी पाहिलंय की कधी कधी ह्या चैतन्याने दहापट जास्त पिक येतं. आणि त्याबद्दल बराच (रोहापोह?? Inaudiable ) झाला. सगळी कडे कळवलं. पेपरात दिलं. गव्हर्नमेंट ला सांगितलं. पण कोणाला त्याच्याबद्दल काही तदात नाही..असु देत. पण जे लोकं सहजयोगात येतात, त्यांच्या शेती जाऊन बघा. एकदम फ़रक आपल्याला कळेल. तरी हा सर्वांगीण दृष्टींनी इतकंच नव्हे पशुपालनात, प्रत्येक गोष्टीत इतका सहजयोगाचा आपल्याला लाभ झालेला आहे. तसेच आमच्या आता शाळा सुरू झालेल्या आहेत. शाळांमध्ये मुलांना घेऊन त्यांच्या मध्ये एक अद्वितीय तेज आलेलं आहे. अशारितीने अनेक कार्य आपल्या महाराष्ट्रात होत आहेत.आणि इथे कार्य एकदा संपन्न झालं म्हणजे आपल्याला कळेल की सहजयोगानी किती आपल्या महाराष्ट्राची उन्नती झालेली आहे. लोकांची किती उन्नती झालेली आहे. आता परवाच मला एक गृहस्थ भेटले,लहान मुलगाच होता म्हणा. तर म्हणे माताजी, मला सांगत होते म्हणे मला काही नोकरी नाही हे नाही. म्हटलं तुम्ही सहजयोगात या. सहजयोगात आले आणि लगेचच त्यानी एक वॉशिंग प्रोजेक्ट काढला. आणि कितीतरी त्याच्यात कमवून राहिला. म्हणे असंच माझ्या डोक्यात आलं माताजी वॉशिंग प्रोजेक्ट काढायचा. तर वॉशिंग प्रोजेक्ट काढून बसले त्याच्यात पुढे. म्हणजे अशी अनेक उदाहरणं आहेत. इंडस्ट्रियलिस्ट आहेत, त्यांच्या कडे नेहमी स्टाइक्स होत असतं. ते सहजयोगात आले. आल्यापासून त्यांची अशी भरमसाठ वाढ झालेली आहे, त्यांना समजत नाही त्याच .काही सांगितलं तरी ते डोक्यात उतरत नाही. पण जर का आपण सहजागाव सहजयोगमध्ये तो तल्लखपणा घेतला .तर आता हे कसं . इतकं गुप्त ज्ञान , इतकं सूक्ष्म ज्ञान कसं या लोकांना कळलं?. कसं ह्यानी आपल्यामध्ये आत्मसात करून घेतलं?. त्यातल्यात्यात सगळी उन्नती होतेच. पण सगळ्यात मुख्य उन्नती होते आध्यात्मिक पण मुख्य उन्नती होते आध्यात्मिक. म्हणजे तुम्हाला शक्ती मिळते. तुम्ही लोकांना जागृती देऊ शकता. मी कोणाही गुरू कडे गेलेल्या माणसालाअसंच विचारते बाबा, तुला गुरूनी काय दिलं. मी तुझी आई आहे. तुझा आजारही बरा करू शकत नाही आणि तुला काय शक्ती दिली. तर ती शक्ती आपल्यामध्ये असताना आपण तिचा स्वीकार ही नाही करायचा आणि त्यात त्याची वाढ ही करून नाही घ्यायची हे शहाणपणाचं लक्षण नाही. आणि असं जे लोक सांगतात ते फार मोठी चूक करतात. त्यांनी अश्या गोष्टी सांगण्यापेक्षा स्वतः येऊन बघावं. नम्रपणे. आणि स्वतः जागृती करून स्वतःचं भलं करून घ्यावं. पण आता त्यांना असं जर कळलं की जागृती घेतल्यानंतर तुम्ही दारूपिऊच नाही तर येतील कशाला ते? कारण दारू ही त्यांची खरी आई आणि धर्म. मग ते कशाला येणार? पण तरी सुद्धा आपण काही सांगितलं नाही त्यांना आणि म्हटलं नाही तरी जर ते आले सहजच तर कदाचित . हा त्यांच्या वरती परिणाम होईल की ते लगेचच सोडून दुसऱ्या दिवशी मुक्त होतील. अशे ही काही लोक इथे आहेत. तेव्हा ही एवढी मोठी गोष्ट. मला स्वतःला आश्चर्य वाटतं. मला नव्हतं वाटलं की माझ्या हयातीत एवढं कार्य होइल. आणि मी सुरवातीपासनाचं प्रसिद्धीला फार भीत असे. म्हणजे अ$अ$ इतपर्यंत की मी कधी माझा फोटो कोणाला द्यायचे नाही. किंवा कोणाला छापायला द्यायचे नाही. हे ते . रोजचा वादविवाद चालायचा त्यांचा माझ्या वरनं. करता करता आता माझ्या लक्षात आलं की फोटोला बघून लोकांना वाटतं की काहीतरी आहे.तेव्हा पासनं मी माझा फोटो छापायला देऊ लागले. आणि आता त्या नंतर मी बघते आहे लोकांमध्ये एक तर्हेची नवीन जागृती झाली आहे. आणि लोक धर्माकडे जो खरा धर्म आहे तिकडे वळत चालले आहेत. पोटामध्ये आपल्या तो धर्म असतो. तो एकदा जागृत झाला म्हणून कधी अधर्म करत नाहीत. तुम्ही हिंदू असा, मुसलमान असा, ख्रिश्चन असा वाट्टेल ते पापकर्म करू शकता. पण सहजयोगी करणार नाही. सहजयोगी कोणताही बेकायदेशीर काम करत नाही. कोणतंही पाप करून करत नाही. उलट तो अत्यंत कार्यक्षम असताना अत्यंत प्रचंड शक्तींनी व्याप्त असताना सुद्धा अत्यंत नम्र असतो. आणि अत्यंत प्रेमळ असतो. ही अशी अभिनव शक्ती आपल्या मध्ये आहे . ती जागृत करून घ्यावी आणि आपल्या व्यक्तित्वाचा पूर्ण प्रकाश वाढवून घ्यावा. उगीचच कुणाच्या नादी लागून, कुणा गुरूच्या नादी लागून कोणा समितीच्या नादी लागून कुणा कशाच्या नादी लागून आपलं आयुष्य वाया घालवू नका .हे आयुष्य परमेश्वरानी फ़ार मोठ्या मेहेनातीने बनवलेलं आहे. ते आपल्याला कळेल सहजयोग नंतर किती सुंदर व्यवस्था केलेली आहे. आणि त्या सुंदर व्यवस्थेला आपण प्राप्त झालं पाहिजे. आता शेवटलं जे एक आहे की साडेतीन फूट किंवा चार फुटाची जी प्रगती झाली तेवढी फक्त झाली म्हणजे तुम्ही त्या दशेला पोहोचता जिथे आपण म्हणतो की आनंदाच्या डोही. आता माझंच वय अडुसष्ठ वयाचं आहे आपल्याला माहीत असेल. आणि बहुतेक दोन तीन माझा प्रवास होतो. तो इथून अ$अ$ इंडिया मधे तरी कमी असतो. मी फॉरेन कंट्री मध्ये पाहिलं तर एक दिवस मॅक्सिकोला , तर एक।दिवस जपानला अशी परिस्थिती असते. पण मला काही त्याचं वाटतच नाही. मला कधी काही वाटतच नाही की असं काही आहे किंवा काय. कारण जिथे आहोत तिथे आहोत. मग कशाला विचार करायचा प्रवास करतो वगैरे. काही विचारच करत नाही मी त्याचा. आणि चालूच आहे. रोजचं हे चालू आहे. सगळ्यांनी पाहिलेलं आहे. तेव्हा मी असं म्हणींन की ही सगळी जी शक्ती जेव्हा आपल्यात वाहते आहे तेव्हा आपल्याला काही करायचंच नाही. सगळं करणारा कर्ता सवर्ता तो असल्यावर आपल्याला काय करायचं आहे. आपण नुसतं आपलं मधे फिरायचं आहे.आता हे आहे. ह्याला जर माहीत असतं की मी काहीतरी करतोय आहे. तर कदाचित वाया गेला असता. पण याला माहितीच नाही मी काही करतोय. चाललंय व्यवस्थित. तसंच माणसांनी आपल्याबद्दल विचार केला पाहिजे. आणि हे महत कार्य आहे. सगळ्या जगाचं लक्ष हिंदुस्थानाकडे आहे. हे लक्षात ठेवलं पाहिजे. विशेषतः महाराष्ट्राकडे. आणि आपण त्यांना काय देणार. सायन्स तुम्ही काय देणार. सायन्स तुम्हाला येतंय कुठवर. मोठं मोठाले इथले सायंटिस्ट पाहिले. काय त्यांना येतंय. आपल्या कडे चांगले सायंटिस्ट होते ते गेले अमेरिकेला. इथे असेच बाजार भुंडगे आहेत बहुतेक. काय तुम्ही सायन्स मधलं तुम्ही देणार. एक तरी शोध लावला का तुम्ही? त्यांच्या पुढे तुम्ही काय बोलता? ते जे एवढे मोठं मोठाले सायंटिस्ट आहेत ते जेव्हा आध्यात्माच्या मागे लागले, तेव्हा आपण नको का लागायला? आणि जो आपलं आहे ते सोडून दुसऱ्याचं धरायचंय. हे कुठलं शहाणपण आहे. तेव्हा आध्यात्मामध्ये प्राविण्य मिळवलं पाहिजे. आध्यात्मामध्ये उतरलं पाहिजे आणि त्यात आपली सर्वांगीण उन्नती करून घेतली पाहिजे. आध्यात्म हा विज्ञानापेक्षा फार उच्च आहे. इतकचं नाही पण सर्वांगीण आहे. प्रत्येक प्रागणांमध्ये त्याचा प्रकाश आहे. विज्ञान असो किंवा सामाजिक कार्य असो, नंतर राजकरणी कार्य असो. कोणचं ही असो. सर्व कार्यांमध्ये त्याचा प्रकाश आहे. हे आपल्याला सांगितलंच की गांधीजी हे आत्मसाक्षात्कारी होते. शास्त्रीजी हे आत्मसाक्षात्कारी होते. सर्वांनी विचारलं की सगळ्यात चांगला कोण झालेला आहे इथे प्रायमिनिस्टर? तर शास्त्रीजींना सगळ्यात जास्त मार्क मिळाले. बाकीच्यांना त्यांच्या अर्धे सुद्धा नाही.तेव्हा हा फरक तुम्ही बघा. तसंच गोर्बचेव्ह हा सुद्धा आत्मसाक्षात्कारी आहे. आणि आम्हाला मानतो सुद्धा. तो आत्मसाक्षात्कारी आहे. म्हणून त्याने जग बदलून टाकलंय. तो आम्हाला फार मानतो. त्याला मला मानायला काय झालं होतं. मी एक स्त्री आहे.मी हिंदुस्तनातली आहे. तो मला इतकं का मानतो? कारण तो आत्मसाक्षात्कारी आहे. नुसते आत्मसाक्षात्कारी मनुष्यच आत्मसाक्षात्काराला ओळखु शकतात. म्हणजे त्याचं उदाहरण असं की नामदेव एकदा गोरा कुंभाराला पाहायला गेले.आणि गोराकुंभाराला पाहताच नामदेव काय म्हणाले? हे शिंपी तो कुंभार. निर्गुणाच्या भेटी आलो सगुणशी. काय बोलणं आहे. आपण कोणाविषयी असं बोलू शकू का? निर्गुणाच्या भेटी आलो सगुणशी. काय ते प्रेम आणि काय ते उद्गार आहेत. हे प्रेम आणि ही समज, हा आदर हा आत्मसाक्षात्कारानंतर येतो. आता गणपतीपुळ्याला जवळ जवळ तीन चार हजार माणसं येतात. पण मी कधी कोणाला भांडताना कोणाचा अनादर करताना किंवा काहीही तसं पाहिलेलं नाही. मग आता हे सुद्धा मंडळी बघा.आजच मी ह्याच्यात चालले होते तर ते म्हणाले माताजी हे परदेशी लोक अहो ह्यांना काही राहिलेलं नाही स्वताःचं राहिलेले नाही असं दिसतंय . नाहीतर हे लोक कोणाशी बोलायचे का पुर्वी . आता गळ्यात गळा घालून ,डोक्यावर टोप्या घालून आमच्या बरोबर कसे उडताहेत बघा. हे कधी झालं होतं का पूर्वी? हे रजनिशचे शिष्य आले घाणेरडे आणि इथे घाण सोडून गेले. ह्या सगळ्यांचे तो कोण आहे ही गुरू बाई आली आणि किती प्रकार करून गेलेली आहे. हे सगळे आपले शिष्य आणतात आणि करतात काय?यांनी आपली संस्कृती घेतली. समजलं पाहिजे. एवढी नम्रता आणि एवढी समज ही आली कुठनं? त्यांच्यात कुंडलीनीच्या जागरणाने झालेली आहे.तेव्हा आपलं ते वाईट आणि दुसऱ्यांचं चांगलं असं धरून चालू नये. आपलं जे चांगलं आहे ते शोधून काढलं पाहिजे. कारण दुसऱ्याचं जे चांगलं आहे ते बघण्यात काहीच अर्थ नाही.कारण आपलं जे आहे तेच पाहिलं पाहिजे. आपलंच आपण वाढवलं पाहिजे.आणि आपलं काय आहे तर हा आध्यात्म. हा संतांचा आशीर्वाद, त्यांची महानता, त्यांचे एवढा आदर्श आमच्या समोर आहे. हे लोक सर्व एवढं म्हणतात माताजी जर आमच्या इथे एवढे संत झाले असते तर आम्हीही झालो असतो महाराष्ट्रीयन लोकांसारखे. पण आमच्याकडे असे संत झाले नाहीत. आता हे कसं सांगायचं इथे संतांना छळून काढलंय आणि आता मागे मागे लागयेत हात धुवून. कसं सांगायचं तरी लोकांना की काय काय मुर्खपणा केला आम्ही. आता येताना पालखी. जेवायला बसा. म्हटलं काय? पालखी घेऊन आलो. असं का? ज्ञानेश्वरांच्या पादुकांची पालखी. अहो ज्या ज्ञानेश्वरांच्या पायात वहाणा नव्हत्या ,त्यांच्या पादुका ठेवून तुम्ही हे आपलं जेवणाची व्यवस्था करत फिरता?. काहीतरी विचार करा. काही त्याला अर्थ आहे का? नुसता विचार केला तरी नुसतं गहिवरून येतं. अश्या त्या यातना त्यांनी सहन केल्या आणि आता त्यांच्या वहाणा घेऊन तुम्ही घरोघर जेवायला जाता. काय हे. कसं तुम्हांला जेवण तरी जातं. पालखीत घेऊन चाललेत. कोणीही उचलायची पालखी. चालले. काय हा प्रकार. असे अनेक प्रकार आपल्या देशात आहेत. ते मुसलमानांत नाही असं नाही. ख्रिश्चन मध्ये नाही असं नाही. मी सगळ्यांना ओळखते. आणि हिंदूंमध्ये नाही हे ही नाही. सगळ्यांमध्ये हा प्रकार आहे. तेव्हा या सर्वांचा एकच गुरुमंत्र म्हणजे आत्मसाक्षात्कार घेणे. त्या नंतर कोण हिंदू नि कोण मुसलमान. सगळे विश्वधर्मी होतात. सगळे विश्वधर्मी होतात. आता पुष्कळ आमचे मुसलमान ही शिष्य आहेत. आणखीन पुष्कळ आमचे जु लोक सुध्दा आहेत. सर्व तर्हेचे लोक आहेत. पण सगळे विश्वधर्मीय आहेत. आणि ह्यांच प्रेम बघण्यासारखं आहे. आता इथे जे लोक बसलेले आहेत हे सुद्धा काही ह्याच्यात सुद्धा काही मुसलमान लोकं आहेत. तुम्हांला ओळखु सुद्धा पडणार नाही त्यांची. कोणत्या कोणत्या जातीचे आहेत. तुमच्यासारखे सगळे झालेले आहेत तेव्हा तुम्ही कृपाकरून स्वतःची किंमत करून घ्या. आज मी इतकं लांब मी एव्हढ्या साठी बोलले कारण मला असं वाटतं की महाराष्ट्रात जागृती होते आहे. आज मी पाहूनच थक्क झाले दहा मिनिटांमध्ये इतके लोकं पार झाले कशे.?पण मग जमत नाहीत. जसं एखादं बीज रोपव आणि त्यातून अंकुर फुटल्यावर नष्ट ते व्हावं तसं आपल्याकडे होतंय. ते होऊ नये म्हणून एवढं मी आपल्याला सांगितलेलं आहे की आपली पूर्ण वाढ करून घ्या. त्यांतच आनंद आहे. त्यांतच सगळं काही आहे. आणि हे तुमच्या हातात आहे .फार सहज आहे. जे काही सत्य नाही त्या बद्दल जर कुणी सांगितलं की हे ठीक नाही तर ते सोडलं पाहिजे. जे चुकीचं आहे ते सोडलं पाहिजे आणि तुम्ही चैतन्यावर जाणू शकता. तुम्हाला कळू शकतं कोणच चुकीचं आहे आणि कोणच नाही. एखाद्याला कॅन्सर असता ते तुम्ही जाणू शकता. तुमचं काय चुकीचं आहे ते तुम्ही जाणू शकता. सत्य काय ते तुम्ही जाणू शकता. तसंच स सत्य काय ते तुम्ही जाणू शकता. तेव्हा सत्य फक्त धरायचं आणि असत्य नको. ह्यालाच आम्ही म्हणू की सत्याचे खरे तुम्ही शोधक आहात. उगीच काहीतरी टूम काढून इकडे तिकडे आपलं आयुष्य घालवणारे लोक नाहीत. सत्याला शोधणारे त्याची गाठ धरणारे तुम्ही लोक आहात असे आम्ही मानू. सगळ्यांना अनंत आशीर्वाद.

(Shri Mataji doing Namaskar)

ज्यांना जागृती नको असेल अश्या लोकांवर जबरदस्ती करता येत नाही. अशा लोकांनी कृपाकरून बाहेर जावं. ते बरं. पण ज्यांना खरोखर जागृती हवी असेल त्यांनी इथे बसावं आणि बघ्याची भूमिका घेऊ नये.कारण हे संभावितपणाचं लक्षण नाही. जे लोक जागृतीला आले आहेत त्यांच्या मध्ये वातावरण शुध्द असलं पाहिजे. जर तुमच्या मनामध्ये शुद्धता नसली तर तुम्ही कृपाकरून बाहेर गेलेलं बरं. म्हणजे दुसऱ्यांना त्रास होणार नाही. इतका तरी संभावीतपणा असला पाहिजे आणि जर तुमची जागृती झाली नाही समजा तर सहजयोगाला दोष देऊ नये किंवा स्वतःलाही दोष देऊ नये पण असं समजावं की काहीतरी दोष आपल्या चक्रामध्ये राहिला असेल त्यामुळे जागृती झाली नाही. आम्ही आमची चक्र जी आहेत ती स्वछ करू.

आता जागृतीसाठी आपल्याला तीन अटी. पहिली अट अशी की जे काही झालं गेलं गत आहे भूत आहे ते सोडून टाकायचं. भूतकाळातलं सगळं सोडून टाकायचं. विसरून जायचं. त्याच्या बद्दल मी दोषी आहे मी पापी आहे अश्या ज्या कल्पना आहेत त्या निम्नत्वाला घालायच्या. त्या सगळ्या सोडून टाकायच्या. असं जे तुम्हाला सांगतात सुद्धा ते सुद्धा पापी लोकं आहेत. तेच आहेत मुळी.तुम्हाला जर कोणी सांगितलं की तुम्ही इतके पैसे घाला म्हणजे आम्ही तुमचं हे बरं करून देतो, तर हे जाणलं पाहिजे की हा मनुष्य स्वतः दुष्ट आहे. तेव्हा स्वतःला क्षमा केली पाहिजे.जसं तुमचं काही चुकलेलंच नाही मुळी. कारण मानावाचचं चुकतं. परमेश्वरचं थोडी काही चुकतंय. तुम्ही काही परमेश्वर नाही. तेव्हा मानवचं चुकतंय. तेव्हा स्वतःबद्दल तुम्ही इतका विचार ठेवला पाहिजे की आम्हाला परमेश्वराच्या साम्राज्यात जायचं आहे , तेव्हा आम्ही दोषी भाव घेऊन जाणार नाही. आमच्यात काही दोष नाही. तुम्ही आत्मा स्वरूप आहात. आत्म्याला काहीही दोष नसतात. म्हणून कृपा करून मी काहीही दोष केलेला नाही. मी दोषी नाही. असं मनात पूर्णपणे सांगितलं पाहिजे. त्याच्यामुळे हे left च जे विशुद्धी चक्र आहे ते धरलं जातं. left च विशुद्धी चक्र धरलं म्हणजे angina सारखा रोग. इतकचं नव्हे तर बरेचशे spondilysis चे जे म्हणजे हाडाचं म्हणजे तुमच्या मणक्याच्या जो कधी कधी वाक वैगरे येउन जातो किंवा त्यांनी जे इकडे तिकडे सरकतात, त्यांनी जो त्रास होतो अशाच spondilysis चा सुद्धा त्रास होऊ शकतो.म्हणून मी दोषी आहे असं मनामध्ये नाही ठेवलं पाहिजे. माझ्या lecture मध्ये जर मी काय म्हटलं असेल ज्याने तुम्हाला असं काय वाटतं की मी हा दोष केला तर ते सुद्धा तुम्ही कृपा करून विसरून जा. मी आपलं सहजच म्हणून गेले पण तिकडे लक्ष नाही द्यायचं. मी जे सांगते ते मी दोषी नाही, हे मानलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सगळ्यांना एक साथ एक साथ क्षमा करायची. म्हणजे आपण क्षमा करू अथवा न करू आपण काहीही करत नाही. हे लक्षात ठेवलं पाहिजे. पण आपण जर क्षमा नाही केली तर जे लोक आपल्याला त्रास देतात त्यांच्या हातात आपण खेळतो आणि आपल्याला त्रास होतो. आपला छळ होतो.म्हणून एक सारं म्हणजे असं की प्रत्येक माणसाचा विचार नाही करायचा. फक्त मी सगळ्यांना एक साथ क्षमा करून टाकली, असं मनात म्हणायचं. सगळ्यांना करून बघा, किती हलकं वाटेल तुम्हांला. तिसरी अट अशी आहे की जर तुम्हाला आतासाक्षात्काराची पूर्ण इच्छा असेल तर आपल्याला हमखास आत्मसाक्षात्कार प्राप्त होईलच. असा आत्मविश्वास बाळगायचा. तुम्ही काही केलं असेल, कुठेही गेला असाल कोणती धारणा असेल तुमची, काही हरकत नाही. पण आता या वेळेला जर तुम्ही अशी धारणा केली की मला आता आत्मसाक्षात्कार झाला पाहिजे आणि होणारच आहे तर फार मोठं काम होणार आहे. आत्मविश्वासाने फार मोठं कार्य होणार आहे. यात तीन अटी आहेत.म्हणजे स्वतःकडे दृष्टी जी आहे ती एक प्रेमळ दृष्टी असायला पाहिजे.स्वतःला धिक्कारायाचं नाही. स्वतःला असं समजायचं नाही की मी काहीतरी फार चुका केलेल्या आहेत.आणि ह्यांनी कुंडलिनी फार सहज जागृत होईल.आणि आपल्या भावी पिढीसाठी विशेषकरून हे फार मोठं कार्य होणार आहे. तेव्हा सगळ्यांनी दोन्ही हात माझ्या कडे अशे करायचे आहेत. कारण हे पाच सहा आणि सात चक्र आहेत. ही पाच सहा आणि सात ही चक्र आहेत. एवढं डॉक्टर मानतात की हे sympathetic nervous system चे ending आहेत असं मानतात. सात. दोन्ही हात माझ्याकडे असे करायचे. सरळ. थोडस वर. आणि सरळ बसायचं आरामात. जे लोक खुर्चीवर बसलेले आहेत त्या लोकांनी पायातल्या वहाणा काढून जमिनीवर अशे पाय वेगळे ठेवायचे आहेत. कारण ही पृथ्वी हे आपले पुष्कळसे ताप हरण करते म्हणून दोन्ही पाय असे वेगळे ठेवायचे आणि टोपी काढलेली बरी.कारण आईसमोर टोपी बीपी घालायला नको. . मी काही गुरू बिरु नाही किंवा मिनिस्टर पण नाही. कृपा करून टोपी काढून घ्या. आणि हे ब्रह्मरंद्र उघडायला पाहिजे म्हणून टोपी काढून घ्या. Please take out caps please . सगळ्यांनी तुमच्यासाठी टोप्या घातल्या. Please take out your caps. हा. आता ह्या नंतर डोळे मिटायचे आणि चित्त इकडे ठेवायचं टाळू कडे. पण डोळे बिळे वर फिरवायचे नाहीत. नुसतंच चित्त टाळू कडे ठेवायचं.Please close your eyes. Put your attention to your Sahasrara. Please close your eyes. यांना आपली भाषा समजत नाही. पण हे म्हणतात माताजी तेच बरं कारण आम्ही तुमच्या भाषणामध्ये मंत्र वाटतात आम्हाला आणि आम्हाला फार शांती मिळते. तुम्ही भाषण दिलं आणि ते आम्हाला समजलं तर आम्ही विचार करत राहू. त्या पेक्षा हे बरं आहे. ही स्तिथी आहे त्यांची. उच्च स्थिती आहे. हं!.

[Shri Mataji blowing the Pranava from the Mike]. Please increase the volume.

[Shri Mataji blowing the Pranava from the Mike].

आता हळू हळू डोळे उघडा. उजवा हात माझ्याकडे करा. आणि मान खाली वाकून, आणि डाव्या हातांनी या टाळू कडे, मान खाली वाकवून , डाव्या हातानी बघा की डोक्यातून काही गरम किंवा थंड असं निघातय का. हे तुम्हालाच सांगायचं आहे. तुम्हीच स्वतःच सर्टिफिकेट द्यायचं आहे. मी तुम्हाला काही सांगणार नाही. तुम्ही बघा. लक्षपुर्वक. हात’ अधांतरी ठेवायचा. वरती नाही. कोणा कोणाच्यातनं गरम येईल कोणाच्यातनं थंड येईल. पण थंड आलं पाहिजे. गरमाच नंतर थंड होऊन जातं. म्हणून गरम आलं तरी चालेल. जर तुम्ही क्षमा नसेल केली तर गरम येणार. किंवा तुमचे जर गुरू वगैरे ठीक नसले तरी गरम येईल . हं!!.आता डावा हात माझ्याकडे करायचा. Please put your left hand towards me. आणि मान खाली वाकून बघायचं. उजव्या हातानी परत बघायचं गार येतं की गरम येतं काहीतरी (inaudible) कोणा कोणाला फार वर पर्यंत येतं. प्रत्येकाची एक स्थिती असते. तेव्हा असं करायचं. (Pause ) .हा आता उजवा हात. मान वाकवून परत डाव्या हाताने बघा. हम्म. आता दोन्हीं हात. आकाशाकडे असे उचलून मान वर करायची आणि एक प्रश्न विचारायचा. Please ask one question. श्री माताजी हे ब्रह्मचैतन्य आहे का? किंवा श्रीमाताजी ही परमवश्वराची प्रेमशक्ती आहे का? असा प्रश्न ,कोणाचाही एक प्रश्न असा विचारा. Please ask a question, is this the cool breeze of the holy ghost. 3 times please. आता हात खालती आणा. दोन्ही हात माझ्याकडे करा. दोन्ही हात माझ्याकडे करा आणि आता बघा. माझ्याकडे बघताना विचार थांबले आहेत की नाहीत. विचार थांबवता येतात. निर्विचरिता. ही पहिली स्तिथी आहे. निर्विचार समाधी.lease look at me without thinking. आता ज्या लोकांच्या हातातून किंवा टाळूतुन थंड किंवा गरम अश्या लहरी आल्या असतील, अश्या सर्व लोकांनी दोन्ही हात वर करा.आता काय म्हणावं श्रीरामपूर खरचं श्रीरामपूर झालेलं दिसतंय.wow. तुमच्याच कडून मला चैतन्य मिळून राहिलंय. वा.

(Everyone clapping. Shri Mataji doing Namaskar to all Sahaja Yogis with delight).

सर्व साधकांना नमस्कार की त्यांनी हे साधून घेतलं. आपणच आता साधू संत आहात. सगळ्यांना आमचा नमस्कार आणि अनंत आशिर्वाद. ह्याच्यात सामूहिकतेत उतरलं पाहिजे. सामूहिकतेत उतरल्या शिवाय आपण वृद्धिंगत होणार नाही. म्हणजे असं आहे, जर एखाद पान झाडापासून वेगळं झालं तर ते वाढू शकत नाही.तसंच जर तुम्ही म्हणालात माताजी आम्ही घरी करतो, वगैरे. त्यांनी होत नाही. तुम्ही सामूहिकतेत आलं पाहिले. तिथेच विशेषतः महाराष्ट्रातले सहजयोगी कमी पडतात. ते सामूहिकतेत मेहनत घेत नाहीत. म्हणून त्यांची प्रगती जशी व्हायला पाहिले तशी होत नाही.पण दिल्लीचे लोक त्या मानाने पुष्कळ बरे आहेत. आश्चर्याची गोष्ट आहे. दिल्ली. जिथे राजकारण नुसतं नेहमी पिकत आणि नासतं. त्या ठिकाणी. आणि दिल्लीच्या पलीकडे सुद्धा नोएडा वगैरे. तिकडे गाझियाबाद, लखनऊ, कानपुर इतके <inaudiable > लोक तयार झालेत. कलकत्ता. तर आपण का होऊ नये?फक्त सामूहिकतेत आलं पाहिजे थोडा वेळ. आपल्या आत्मसाक्षात्कारासाठी आपण खर्ची घातला पाहिजे.फक्त वेळ. दुसरं काही आपल्याला पैशे नाही द्यायचे. सगळं ज्ञान आपल्याला फुकट मिळणार आहे.हे सगळं मिळवून घ्यावं आणि सगळ्यांनी याच्यात प्राविण्य मिळवावं पुढच्या वेळेला मी येईन तेव्हा इथेमोठमोठाले वृक्ष उभे झालेले मला दिसले पाहिजेत. त्याला वयाचं काही बंधन नाही. लहान मुलांपासून तर अगदी वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना हे साध्य आहे. त्यामुळे सगळ्यांनी हे साध्य करून घ्यावं आणि शक्ती मिळुवून घ्यावी आणि एका ज्योतिपासून अनेक ज्योती पेटवतात तश्या आपण सर्वांनी ज्योती पेटवाव्यात. नम्रपणे हे सारं कार्य झालं पाहिजे ही विनंती आहे.

(1.09.18 onwards Bhajan , Sahaja Yogi dancing with Joy )

Shrirampur (India)

Loading map...