Public Program

Public Program 1990-12-18

Location
Talk duration
62'
Category
Public Program
Spoken Language
Marathi

Current language: Marathi, list all talks in: Marathi

The post is also available in: English.

18 डिसेंबर 1990

Public Program

Satara (India)

Talk Language: Marathi | Transcript (Marathi) - Draft

पब्लिक प्रोग्रॅम सातारा .

मानवी कल्पनेनी ते आपण आकलन करू शकत नाही . ते मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे आहे . मानव चेतनेत ते आपण जाणू शकत नाही . जर हि गोष्ट आपण लक्षात घेतली तर अध्यात्म म्हणजे काय ते आपल्या लक्षात येईल . अध्यात्म म्हणजे आत्म्याचं ज्ञान . ते झाल्या शिवाय कोणतीही अंधश्रद्धा ठेऊन ,कोणतीही धारणा धरून हे कार्य होत नाही . त्याला कुंडलिनीच जागरण हेच एक विधान सांगितलं आहे . ज्ञानेश्वर हे नाथ पंथीय आहेत . नाथ पंथियां मधली परंपरा अशी कि एका गुरूला एकच शिष्य असे . आणि त्या गुरुनी एकाच शिष्याला जागृती द्यायची आणि हे सगळं ज्ञान सांगायचं , पण ज्ञानेश्वरांनी बाराव्या शतकात एक मोठी कामगिरी केली त्यांचे गुरु होते त्याचे जेष्ठ बंधू निवृत्तीनाथ त्यांना परवानगी मागितली ,कृपा करून एव्हडी परवानगी द्या कि मी जे काही कुंडलिनी बद्दल जाणतो ते मी स्पष्ट रूपाने लोकांना सांगू शकतो . नुसतं सांगायची मला परवानगी द्या . मी कुणालाही शिष्य करणार नाही पण मला फक्त सांगायची तुम्ही परवानगी दिलीत तर मला सार्थक वाटेल . त्यांनी हि परवानगी ज्ञानेश्वरांना दिली . आणि त्यामुळे बाराव्या शतकात च ज्ञानेश्वरी लिहिताना सहाव्या अध्यायात त्यांनी कुंडलिनीच वर्णन करून ठेवलं आहे . पण धर्म मार्तंडाना यातलं काही गम्य नव्हतं म्हणून त्यांनी सहावा अध्याय निषिध्द आहे म्हणून सांगितलं . त्यामुळे लोकांना कुंडलिनी बद्दल ज्ञान झालं नाही . पण त्या नंतर रामदास स्वामींनी कुंडलिनी बद्दल बरच सांगितलं आहे . हि रामदासांची कृपा ,केव्हडी पवित्र असली पाहिजे . त्यांनी स्पष्ट पणे सांगितलं कुंडलिनीच जागरण हे आवश्यक आहे . त्या शिवाय आत्म्याचं ज्ञान मिळत नाही . अध्यात्म बनत नाही . त्यांना कुणी विचारलं किती वेळ लागतो कुंडलिनीच जागरण व्हायला ,त्यांनी सांगितलं तत्क्षण ,पण देणारा तसा पाहिजे आणि घेणाराही तसा पाहिजे . त्यात आपण असं समजल पाहिजे कि जर तुम्ही कोणतेही कार्य अंध श्रद्धेने केलं तर त्यात विश्वास ठेऊन ,ती श्रध्दा चुकीची आहे .

पण शास्त्रीय द्रिष्टया असा विचार केला पाहिजे कि आम्ही जे म्हणतोय ते खर आहे कि नाही ते पडताळून पहिले पाहिजे . कोणी म्हणतात देवच नाही हे फार अशास्त्रीय आहे . देव नाही असं म्हणणं हे चुकीचं आहे . कारण तुम्ही त्याचा पत्ता लावला का . तुम्हाला कळलं का देव आहे किंवा नाही ते . जो पर्यंत तुम्ही त्याचा पत्ता लावला नाही तेव्हा सरळ सांगायचं कि देवच नाही हे एक प्रकारे माझ्या मते मोठं असत्य आहे . फार तर असं म्हणता येईल कि आम्हाला देव आहे कि नाही हे माहित नाही . आइन्स्टाइन सारख्या एव्हड्या प्रवीण आणि गाजलेल्या साईन्टिस्ट नि सुध्दा देवाला कधी असं म्हंटल नाही ,न्यूटन न सुध्दा कधी म्हंटल नाही . कोणत्याच शास्रज्ञानानी म्हण्टलेलं नाही कि देव नाही आहे . कारण ते खरे साईन्टिस्ट होते . पण जे अर्धवट आहेत ते तोंडाला येईल ते बोलत असतात . आता दुसरं सांगायचं म्हणजे असं कि ,

अंधश्रद्धे बद्दल सुद्धा आपल्याला पूर्ण माहिती असली पाहिजे . ती म्हणजे अशी कि अंधश्रद्धा चार प्रकारची असते . म्हणता येईल कि श्रद्धा हि चार प्रकारची असते . एक म्हणजे ती तामसिक असते . तामसिक हि अंधश्रद्धा आहे . कुणी मनुष्य रस्त्यावर बसला ,तो जेल मधून सुटून आलेला असला आणि त्यांनी जर भगवी वस्त्र घातली तर लागले आपण त्याला पुजायला . हे कार्य संतांनी केलय .कारण संतांच्या जवळ डोळस श्रद्धा होती . हे कार्य "येऱ्या गबाळ्याचे काम नोव्हे , त्याला पाहिजेत जातीचे ". संतांच्या शिवाय कुणाला कळणारच नाही कि कोणती श्रद्धा खरी आहे आणि कोणती खोटी आहे . हा नीरक्षीर विवेक फक्त संतांना मिळाला आहे . दुसरी म्हणजे राजसिक श्रद्धा . म्हणजे समजा एखादा पोलीस ऑफिसर येऊन उभा राहिला नाहीतर एखादा मिनिस्टर आला तर त्याच्यावर श्रद्धा ठेवायची . मग तो कसाही असेना का ,तो प्रतिष्टीत असो किंवा नसो ,भ्रष्टाचारी असो किंवा नसो पण अशी आपली श्रद्धा ठेवायची . राजाराम सारखे एव्हडे महान पुरुष तुम्हाला लाभले असे असताना तुम्ही जर त्यांच्यावर श्रद्धा ठेवली तर ती सात्विक श्रद्धा आहे . रामदासांवर जी केलेली श्रद्धा आहे ती सात्विक श्रध्दा आहे . कारण त्यांचं आयुष्य तस होत ,त्यांचं चरित्र तस होत . जे संत होऊन गेले तुकाराम न सारखे त्यांना शिवाजींनी नजराणा आणला ,आणखीन इतके दागिने आणले . ते सगळे त्यांनी परत करून टाकले . अशी आहेत का माणस आज ,अशी संतान सारखी माणस आज जगात दाखवा ,विशेषतः आपल्या महाराष्ट्रात शोधून सापडणार नाहीत . अशा संतांनी जे कार्य केलं तेच खरं कार्य आहे आणि त्यांच्यावर श्रध्दा असणं हि खरी सात्विक श्रध्दा आहे . ज्या माणसांनी अस विशेष कार्य केलं असेल त्यांनी जगाच कल्याण केलं असेल त्यांच्या बद्दल श्रध्दा असण हि सात्विक श्रध्दा आहे . आणि जेव्हा आपण अशी सात्विक श्रध्दा आपल्या मध्ये आपण बाळगतो तेव्हा त्याच्या वरची पायरी म्हणजे डोळस श्रध्दा आपल्या मध्ये येते . संताना जी डोळस श्रध्दा होती त्या श्रध्दे मध्ये ते जाणत होते ,त्यांना माहित होत खर आणि खोट काय ते . आपल्याला अजून केवळ सत्य काय हे माहीतच नाही . जर माहित असत तर इतकी भांडण कशाला झाली असती . इतका उपदव्याप कशाला झाला असता . अनेक तऱ्हेच्या धारणा अनेक तऱ्हेच्या टुम अशा काढायच्या . कुणाला जे सुचल ते काढणार . आता हे अंधश्रध्दा निर्मूलनावर तर मला बोललेच पाहिजे कारण त्यांनी आम्हाला भयंकर त्रास दिलेला आहे . खास करून तुमच्या या सातारा जिल्ह्यात . या रामदासांच्या भूमीत . त्यांनी खूप आरडा ओरडा केला . तुमच्या लक्षात आल पाहिजे कि तुम्ही महाराष्ट्राच्या भूमीत जन्मलेली मूल आहात . इकडे तिकडे नाही ,हा महाराष्ट्र म्हणजे काय फार मोठी गोष्ट आहे ,हे लोक तुम्हाला संत समजतात . ते समजतात कि तुम्ही पूर्व जन्मी काहीतरी पुण्य केलं होत म्हणून ह्या महाराष्ट्रात जन्माला आलात . आणि म्हणून येतात इथे तुम्हाला भेटायला . तुम्ही काय ह्या लायकीचे आहात कि इकड तिकडं जाऊन ओरडत फिरायचं . दगड मारायचे लोकांना ह्या लायकीचे तुम्ही लोक आहेत का ?. तुमची लायकीच त्यांनी कमी करून ठेवली आहे . कारण स्वतः नालायक लोक आहेत ते . त्यांच्या मध्ये काही लायकी असती तर त्यांच्याशी बोलणं तर केल असत . पण थोडं बहोत शिकलेले लोक आहेत काही त्यांना ज्ञान आहि काही नाही . एक गृहस्था न बद्दल लिहून आलं ते रिकामटेकडे आहेत त्यांची बायको खूप पैसे उकळती तिने हॉस्पिटल घातलंय , पैसे उकळती आणि रिकामटेकडा मनुष्य ,निर्गुण नानाच कार्य करतात ,हे काय कार्य करणार निर्गुण नानाच ?. असे अनेक तऱ्हेचे विचित्र लोक हया निर्गुंण नानाच्या कार्यात गेलेत पण मुलांना मात्र जपून ठेवा . अशीच एक टुम इंगलंड मध्ये अगदी सुरवातीला काढली ,त्याच नाव अँटी कल्चर म्हणजे संस्कृतीच्या बाहेर जायचं . होत म्हणजे संस्कृतीचे त्रास होते ,प्रत्येकाने सूट घातला पाहिजे ,प्रत्येकाने प्लेन कोट घातला पाहिजे वैगेरे वैगेरे अनेक प्रकार होते . पण ती टुम काढल्या बरोबर सगळ्या मुलांनी शाळा बिळा सोडल्या आणि आणि त्याच्यात भरती झाले . ओरडा आरडा ,एकमेकांवर जबरदस्ती करणं हे सर्व मुलांनी शिकून घेतलं . आणि अभ्यास सोडला . आणि त्याच्या नंतर मग काहीच हाती लागलं नाही ,एव्हडं सगळं केलं ,माऱ्या माऱ्या केल्या ,खुनशी पणा केला काहीच हाती लागलं नाही मग ड्रग घेऊ लागले ,त्यानीही काही हाती नाही लागलं मग अल्कोहोल मग खून ,अनेक प्रकारचे ,अमानुषकीचे . कारण जो पर्यंत मनुष्याला अध्यात्माचा पाया राहणार नाही तो पर्यंत तो असंतुलनात राहील . कोणत्याही माणसाला जर तुम्ही शंभर रुपये दिले तर तो त्याच काहीतरी वाईटच करणार . दारू तरी पिल किंवा काहीतरी घाणेरडा प्रकार करणार . पण जर एखाद्या संताला दिले तर तो सत्कारणी लावणार ते पैसे . काहीतरी सत्कारणी कार्य करणार तो . म्हणून अध्यात्माचा पाया फार जरुरी आहे . आणि तो आल्या शिवाय कोणीही म्हंटल कि आम्ही पुण्य करतो तर करू शकत नाही . आणि तसही करू शकत नाही ,उदाहरण अर्थ तुम्हाला सांगते एक गोष्ट आमच्या साहेबांच्या ऑफिस मध्ये एक गृहस्थ होते निंबाळकर म्हणून आणि त्यांचा एक मुलगा होता . तो फारच व्रात्य होता . तर त्यांनी त्याला जहाजावर पाठवलं . त्याला जहाजावर पाठवल्यावर त्याने तिथे स्मगलिंग सुरु केलं तेव्हा त्यालोकांनी त्याला काढून टाकलं आणि सांगितलं कि आम्ही काही करू शकत नाही . जहाजा वरून काढून टाकल्या मुळे त्याच्या वडिलांना खूप वाईट वाटलं . थोडे दिवसांनी वारले ते . मी लंडन हुन आल्यावर त्यांच्या बायकोने सांगितलं माझे दागिने ,आपल्या सासूचे दागिने ,आपल्या बायकोचे दागिने हे सगळे घेऊन गेला आणि गहाण टाकले आणि घर सुध्दा गहाण ठेवलं आणि म्हणाला मी काहीतरी बिजनेस करतो . आम्हाला समजलंच नाही कि हा बिजनेस कसला करतोय . पण म्हंटल बर करतोय तर करुदे . आणि गेला सगळं घेऊन आणि त्याचा पत्ता नाही . वर्ष झालं अजून त्याचा पत्ता नाही . पुढल्या वर्षी मी गेले तर म्हणाल्या वर्ष झालं गेलाय आम्ही काय करायचं ,घर पण गहाण टाकलय ,कुठं राहायचं आम्ही . तर मी म्हंटल पत्ता काढा पत्ता लागला . तिसऱ्या वर्षी गृहस्थ परत आले त्यांनी सगळ्यांचे पैसे परत देऊन टाकले ,सगळ्यांना मालामाल करून टाकलं . ती बाई फार सोज्वळ होती तिला शंका वाटली हा गृहस्थ इतके पैसे कुठून घेऊन आला ,तिने मग इकडे तिकडे विचारपूस केली तपास केला आणि मी जेव्हा चोथ्या वर्षी आले तर मला सांगितलं कि त्यांनी आपल्याला गुलाम बाबा करून ठेवल . मी त्याला एक सडकून पत्र लिहिलं खबरदार जर असले धंदे केलेस तर ,सगळं काही लिहिलं . आणि जेव्हा मी नागपूरला गेले तो तिथे पण आला . पण मी त्याला चांगलंच ओळखलं . आणि त्याने नागपूरला एक गोष्ट केली म्हणजे सांगितलं कि मी इथे आता तलवार मारतो आणि मारल्यावर पाणी निघेल . आणि मारल्यावर खरच पाणी निघालं . लोकांनी त्याच्यावर नुसता पैशाचा वर्षाव करून टाकला . हे जे पाणी निघालं ते कस लोकांनी नंतर जाऊन पाहिलं तर तिथे एक नळ होता आणि त्या नळाला आधीच तोडून बिडून व्यवस्था केली होती . कि नुसत्या एका धक्याने ते उघडल पाहिजे . हे लक्षात आल्या बरोबर गुलाम बाबा तिथून उठला ,पण दुसरीकडे पसरतोच आहे तो . एक दुसरे गृहस्थ होते ,त्यानी सत्यसाई बाबानं वर निंदा केली ,मी म्हणते तो मनुष्य खोटा आहे पण त्याचा काही परिणाम झालाय का . काही होत नाही . फक्त जनजागृती होते . त्यांचे मार खाल्लेले लोक इकडे माझ्याकडे आले ,ते ठीक झाले ,मग त्यांना कळलं कि हे खोटे लोक आहेत . तेव्हा जनजागृती शिवाय अशी कार्य होऊ शकत नाहीत .आज कितीही आपण म्हंटल कि अशा हेच्यात आपण पडू आणि हे ठीक करू तर होऊ शकत नाही . आणि इतकं अज्ञान आहे या लोकां न मध्ये. भूत नाही आहेत असं म्हणणं ठीक आहे ,भूत म्हणजे काय असे शरीराने भूत नसतात पण त्यांचे सूक्ष्म देह आहेत . हि गोष्ट खरी आहे . आणि त्या वर आता

सायन्स नि पत्ता लावला आहे त्याच नाव त्यांनी प्रोटीन ५८ ,प्रोटीन ५३ ठेवलं आहे आणि भूतकाळात आपल्यावर बसलेलं आहे ते आता अगदी स्पष्ट सांगतात . पण इथल्या डॉक्टरांनी कुठे शिकले ते मी जेव्हा मेडिकल केलं त्याच्या नंतर मी पाहिलं पुष्कळ मेडिकल सायन्स पुढे गेलेलं आहे . आणि बाहेर जाऊन कळत पुस्तक वाचून जनरल्स वाचून कि कुठल्या कुठे लोक गेलेले आहेत . आज कुंडलिनीच नाव सुध्दा आमच्या मुळे त्यांनी जनरल्स मध्ये घेतलं आहे . पण काही वाचन नाही काही नाही कुपमंडूका सारखं फक्त बसून राहायचं आणि असले धंदे करायचे ,मंच तयार करायचा ,करा पण लहान मुलांना घेऊ नका शाळेतल्या ,कॉलेज च्या मुलांना हात लावायचा नाही . त्यांना आता अभ्यास करू द्या त्यांचं आयुष्य त्यांना बनवायचं आहे . तेव्हा अशा हेच्यात नुसता आरडा ओरडा करायला तुम्हाला घेऊन जातात त्यात तुम्ही पडू नका .आता बघा त्यांनी अंगापूर ला पाच पाच सहा सहा वर्षाच्या मुलांच्या हातात दगड दिले आणि दगड मारले ,मला तर हेच वाटल कि त्या मुलांना कुठे पकडायला नको . पाचशे दगड फेकले त्यांनी ,त्यातले अठरा दगडाने परदेशी लोक जखमी झाले . हे फार मोठमोठाले विद्वान लोक आहेत . तर दिल्लीऊन सीबीआय नि लोक पाठवली हे लोक काय करतात ते बघायला . संबंध महाराष्ट्रात काय काय चाललय ,काय काय होतंय ते जर तुम्ही पाहिलत तर तुम्हाला आश्चर्य वाटेल कि आज जर तुम्हाला काही थांबवायचं असेल तर भ्रष्टाचार थांबवा .

मुलांना घेऊ नका . जे स्वतःला फार समजतात शहाणे तर भ्रष्टाचार थांबवा . भ्रष्टाचारा मुळे केव्हडा त्रास होतोय ते बघायला पाहिजे तर त्याच्या ऐवजी भलत्या गोष्टीन कडे लोकांचं लक्ष लावायचं . कुठंही अशी टूम नाही संबंध भारतात हे इथेच फक्त . हे अति शहाणपण इथे पिकलेलं आहे तेही रामदास स्वामींच्या भूमीत . ज्यांनी अशा लोकांना काही काही शिव्या दिल्या , त्यांना शिव्या येत नव्हत्या पण त्यांनी आपल्या मनाने बनवून बनवून काही काही शिव्या दिल्या या लोकांना . मुर्खात काढलं आहे त्यांना . तेव्हा समजलं पाहिजे कि आपण अशा बेकार लोकांच्या नादी नाही लागल पाहिजे .

माझे यजमान शास्त्रीजींचे मुख्य सचिव ,आणि एक दिवस शास्त्रीजी फार हसायला लागले तर विचारलं झालं काय तुम्हाला ,अहो म्हणे आज कमालच झाली ,इथे म्हणे अशा संस्था आहेत कि जिथे लोकांना नुसतं नारेबाजी करायची आहे ,नारे लगाने वाले ,असं का तर म्हणे त्यांच्याजवळ सर्व तऱ्हेच्या टोप्या सर्व तऱ्हेचे पुठ्यान वर लिहिलेल्या घोषणा ,मग त्याना तेव्हडे पैसे द्यायचे . मग ते आपल्या टोप्या बदलतात . तर मी आता गेलो म्हणे तिथे तर ते जे नारे लावत होते ते तर बरोबर होते पण त्यांच्या पुठ्यांवर दुसरच लिहिलं होत दुसऱ्याच कंपनीचे होते ते आणि त्यांच्या टोप्या वेगळ्या अरे म्हंटल तुम्ही टोप्या त्याच घालून आला का सकाळी घातल्या होत्या ते ,म्हणे आम्हाला वेळच नाही मिळाला बदलायला , अरे पण तुम्ही वाचल का त्यात काय लिहिलं आहे ते . म्हणजे अशी परिस्तिथी आहे . इतका खोटे पणा जगामध्ये आहे . या लोकांनी आमच्यावर दगड फेकले या बदल शंकाच नाही आम्ही कुणावर दगडफेक केली नाही काही नाही . हे कुठलं शहाणपण आहे कुणावर दगडफेक करण ,हे कोणच निर्मुलनाचे कार्य आहे हे खुनशी पणाचा कार्य आणि त्याच्यामध्ये त्यांनी मुलांना गोवून घेतलं . त्याच्यात दुसर असं आहे कि कुंडलिनीच कार्य हे फार महान कार्य आहे . रशिया मध्ये चारशे डॉक्टर कुंडलिनीच कार्य करतात . दिल्ली मध्ये तीन डॉक्टरांना एम डी च्या पदव्या मिळाल्या . ते काय एमडी ची पदवी देणारे एमबीबीएस डॉक्टर नसले पाहिजेत त्याच्या वरचे असले पाहिजेत ना . तर पुणे विद्यापीठाने असा विचार केला कि जर दिल्लीला मिळालय तर आपल्याला का मिळू नये . आपण इथे पी एच डी करायचं आहे . म्हणून त्यांनी या लोकांना बोलावलं आणि एक कॉन्फरन्स केली त्यासाठी इंग्लंड वरून लोक आले ,रशिया वरून लोक आले आणि त्यांनी सिध्द करून दिल कि वैद्यकीय पध्दतीने ,शास्त्रीय पध्दतीने कि सहजयोग म्हणजे पॅरासिम्फटेटिक नर्वस सिस्टम चा कंट्रोल आहे . पण ते सगळं एकीकडे झाल ,खोट नाट न्यूजपेपर नि छापलं कि याला काहीच वैद्यकीय पुरावा नाही . म्हणजे काय म्हणायचं ,संबंध कॉन्फरन्स झाली ,त्याचे जे डॉक्टर्स होते ते माझ्याकडे आले म्हणाले इतकं खोट कस लिहू शकतात . हा काय खोटे पणा पण का करायचा . यानी समाजाच भल होणार आहे ,का कल्याण होणार आहे ?. जी मूल वर्गात पास होत होती ती आज फर्स्ट येत आहेत त्यांना आज स्कॉलरशिप मिळत आहेत . किती ह्यांनी अगाध कार्य केलय ,अनेक लोक पार झालेत त्या बद्दल शंकाच नाही . पण आम्ही त्याच प्रचार करत नाही . कारण रोग बर करण्याचा आमचा धंदा नाही . फक्त कुंडलिनी आम्ही जागृत करू आणि जर कुंडलिनी तुमची जागृत झाली तर त्या मुळे तुमचं भल व्हायचं ते होईल . आपली सहा चक्र यांनी जागृत होतात ,आणि या सहा चक्राच्या मुळे आपल्याला शक्ती मिळते . शक्ती एक प्रकारची नसते अनेक प्रकारची असते . आता आपल्याला आश्चर्य वाटेल कि पुष्कळशा आर्टिस्ट ते मुसलमान आहेत ,अमजद अली खा ,इशाद अली खा हे सगळे सहजयोगी आहेत . ते म्हणतात सहजयोगात यायच्या आधी आमचे हातच चालत नव्हते आता इतका हलका पण आलाय . आज हे एव्हडे मोठं मोठाले आर्टिस्ट आहेत ,आपली माणिक वर्मा ती केव्हडी आजारी होती साहजयोगा नंतर ती बरी होऊन आता परत गायला लागली . किशोरी आमोणकर च पण तसच . कितीतरी लोक सहजयोगाने कुठल्या कुठे पोहोचले . हि आर्टिस्ट लोकांची गोष्ट मी सांगते . तसच कलाकार पुष्कळशे कलाकार सुध्दा फार मोठे कलाकार झाले . आमच्या इथेच एक आता आलेले आहेत तो एक कोळ्याचा पोरगा होता पण सहजयोगात आल्या नंतर इतका त्याच्यामध्ये बदल झाला कि त्याला स्कॉलरशिप मिळाल्या आणि त्याच्यावर आज तो मुलगा ग्रॅज्युएट झाला आहे . विद्यार्थ्यांना साठी कुंडलिनीच जागरण हे फार आवश्यक आहे . आजकालचा अभ्यासक्रमच इतका जबरदस्त असतो कि त्यासाठी जो पर्यंत कुंडलिनीच जागरण होत नाही तो पर्यंत ते सहन करण सुध्दा मुलांना कठीण जात .

आमच्या सहजयोगा मध्ये पुष्कळशी अशी मूल आहेत . एका मुलानी चार्टर्डअकौंटन्सी एकवीस वर्षात केली . तीन मुल इंजिनिअर झाली पहिल्या झटक्यात . डॉक्टर्स झाले कितीतरी डॉक्टर्स झाले त्यांना एकदा सुध्दा फेल्युअर आलेलं नाही . हे काय मी खोट बोलत नाही ,मला खोट बोलून करायच काय . त्यांचं म्हणणं असं कि मला प्रसिध्दी पाहिजे . प्रसिध्दी ची मला गरज नाही . देव कृपेने मी खूप मोठ्या घराण्यातील आहे . आणि जर प्रसिध्दी मिळवायची असती तर राजकारणात गेले असते . हे अस गावात फिरून सगळ्या साठी अशी मेहनत केली नसती . माझे यजमानच फार मोठ्या पदवीवर होते तुम्हाला माहित असेलच . आणि त्यांना इंग्लंड च्या राणीने सर्वोच्च असं जे तिने एका माणसाला फक्त रेगन ला फक्त दिलाय ,असं नाईट हूड पदवी दिली आहे . ते सुध्दा आता परवा सगळ्या साधकांना सांगत होते कि सगळ श्रेय माझ्या बायकोला तिचंच साहाय्य आणि तिचीच शक्ती .मलाच का मिळाले , त्यांना बत्तीस देशा पासन मिळाले ,मीच कोण आहे मलाच का मिळाले ,हे सगळ माझ्या पत्नी मुळे झाल ,त्यांनी उघड पणे अगदी सगळ्यांना सांगितलं . पण तरीही लोकांच्या डोक्यात योग्य प्रकाश पडत नाही . कि हे आपल्या कल्याणा साठी आहे आपल्या भल्या साठी आहे . कारण आम्ही एकही पैसा घेत नाही . हे मुख्य झालं . आम्ही म्हंटल रोग बरे होतात पण आम्ही पैसा घेत नाही म्हणजेही जे उपटसुंम्भ डॉक्टर आहेत त्याच्या पोटावर पाय येईल . अशी त्यांना भीती वाटते . पण तस होणार नाही कारण सहजयोगात येणारेच लोक कमी आहेत . आता इथे एखादा जर भामटा येऊन उभा राहिला तर हजारो येतिल पण कोणी सत्यार्थी बोलणारा असला तर फार कमी येणार . त्याच्या साठीच म्हंटलय ,"त्याला पाहिजेत जातीचे ". ज्यांच्या मध्ये ती खुमकच नाही ती लायकीच नाही ते लोक इथे येणारच नाही . आम्ही किती लोकांना बर करणार आहोत ,तुमच्या साठी आम्ही सगळे श्रीमंत लोक सोडून टाकले . काही काही श्रीमंत हि झाले सहजयोगा मुळे . पण त्यांनी उघडपणे सांगितलं राहुल बजाज च नाव ऐकल असेल त्यानी उघड पणे सांगितलं कि माझा हात माताजींनी ठीक केला नाहीतर मी ह्यूस्टन ला जाणार होतो . एक आहेत इथे मल्होत्रा म्हणून फार मोठे उद्योगपती आहेत त्यांनी सांगितलं कि माझा तर पाच मिनिटात माताजींनी हात ठीक केला . त्याच्या नंतर आणखी एकजण आहेत इथे मी नाव विसरून गेले त्यांनी सांगितलं माझी बायको चौदा वर्ष आजारी होती ती बारी झाली . मी विसरले होते सगळं . किती कुणा कुणाच आठवणीत ठेवणार . ते सगळे एका नंतर एक येऊन सांगायला लागले कि मला हे बर केल ते बर केलं . मी काय त्यांना पैसे दिलेले आहेत . त्यांना असं वाटत कि हे कमीतकमी आम्ही सांगायला पाहिजे कारण माताजी आमच्या कडून काही पैसे घेत नाहीत काही नाही ,तेव्हा एव्हडं तरी माताजींच्या बद्दल आम्ही त्यांना सांगायला पाहिजे . पाचशे डॉक्टरांच्या समोर येऊन त्यांनी सांगितलं ,हे काय खोट बोलता आहेत का लोक . तेव्हा या लोकांनी माझ्या विरुद्ध का एव्हड रान उठवलं आहे असा मी विचार केला ,मी काही पैसे घेत नाही हे मुख्य कारण . देवाच्या कार्याला ज्या माणसाने पैसे घेतले ठरतो माणूस खरा नाही हे जाणून ठेवलं पाहिजे . कारण देवाला पैसे समजत नाहीत . जशी पृथ्वी तिच्यात एखाद बी पेरल किंवा जी आपल्याला सर्व तऱ्हेचे अनेक फळ ,फुल देते ,तिला आपण किती पैसे देतो तिला पैसे समजतात का . हे लक्षात घेतलं पाहिजे ,हि एक जिवंत क्रिया आहे . आणि आपल्या उत्क्रांतीत आपण मनुष्य स्तिथीत आलो याच्या पुढच्या उत्क्रांतीला आपण उतरलं पाहिजे . जे काय केवळ सत्य जाणलं पाहिजे ज्याला आपण कैवल्य म्हणतो .

आता हि इतकी मंडळी इथे आली आहेत ,जवळ जवळ छप्पन देशातले लोक आहेत . निवडक लोक आहेत ,यांच्यात कधी भांडण नाही तंटा नाही काही नाही . नाहीतर ते रजनीश ,तुम्हाला आश्चर्य वाटेल ,तुम्हाला सांगितलंच पाहिजे ,गुजरात समाचार मध्ये मी माझ्या डोळ्यांनी पाहिलं . त्याच्यात अस लिहिलं होत कि रजनीश च्या एका शिष्याने कि आम्ही अंध श्रध्दा निर्मूलनाच्या समितीला सांगून माताजींना एक फटका दिला . म्हणजे इथे आम्हाला ते दगड मारले होते ते . आणि आता त्यांना आम्ही दुसरा फटका देणार आहोत तेव्हा तुम्हाला आश्चर्य नाही वाटल पाहिजे . त्याच्या आधीच ते रजनीश सटकले ,आणि गेले . आणि काय ते उपदव्याप त्यांनी केलाय ते हया लोकांना विचारा . ते सांगतील तुम्हाला . किती घाणेरडा तो मनुष्य आणि किती घाणेरडे प्रकार त्यांनी केलेत . आणि त्याच्या चरणावर हे जाऊन पडलेत आणि त्यांनीच याना मेसमरिझम ची विद्या शिकवली आहे .म्हणजे संमोहनाची . संमोहन हे फार फार जास्त डेंजरस आहे . फारच जास्त . जो कोणी संमोहनात गेला तो परत येऊच शकत नाही . जो माणूस संमोहन करतो त्याला फार वाईट त्रास होतो . आता डॉक्टर साहू तशेच होते ,तरुण पणीच मेले . संमोहनाचं कार्य करणं फार चुकीचं आहे . संमोहन म्हणजे भूत विद्या आहे ,काली विद्या आहे . आणि जे लोक संमोहनाचं कार्य करतात त्यांना मी जागृती देऊच शकत नाही . तुम्ही दहा दहा लाख दिले तरी करू शकत नाही . संमोहनानी आपण दुसऱ्याच्या चेतनेवर आघात करतो . आणि त्याची चेतना आपण ओढून घेतो . हे महान पापच कार्य आहे . आणि या नंतर त्या माणसाची काय दशा होते ,आपली काय दशा होते हे पहाण्या सारखं आहे . त्या बद्दल सुध्दा विदेशात ,परदेशात या ठिकाणी प्रगल्भता आलेली आहे . अनेक गोष्टी त्यांनी लिहिलेल्या आहेत कि संमोहनाने काय काय घाणेरडे प्रकार होतात . आमचे एक डॉक्टर होते त्यांच्यावर संमोहन विद्या केली ते शिकले होते संमोहन विद्या . त्याच्या नंतर त्यांना दारूचा हि नाद लागला . त्यानंतर ते सहजयोगात आले ,मोठ्या मुश्किलीने त्यांची कुंडलिनी जागृत झाली . झाल्या नंतर ते सगळ सोडून उभे राहिले . आता सात हॉस्पिटल्स मध्ये लंडन शहारा मध्ये ते मुख्य आहेत . या अशा संमोहन विद्येला तुम्ही बळी पडू नका . संमोहन करण्याची काय गरज आहे . कोणी साधू संतांनी संमोहन केलं होत का . ते तुम्ही संमोहन शिकत आहात त्यांच्या पासून . ते कशा साठी शिकायचं . दुसरी गोष्ट अशी कि भौतिक ता ,भौतिकता त्या देशां मध्ये फार वाढली . परत विज्ञानाचा एकांगी पणा ,विज्ञान हे एकांगी आहे . त्यांनी सर्वांगीण उन्नती कधी होऊच शकत नाही . विज्ञान फार एकांगी आहे ,त्याच्यात कविता नाही ,प्रेम नाही आणि त्याच्यात माणुसकी नाही काही नाही . विज्ञानाने जर मनुष्याने आपली वाढ करून घेतली तर आज हैड्रोजन बॉम्ब उभे आहेत , ऍटमबॉम्ब उभे आहेत . ते विज्ञाना नेच आले ना . कोणची माणुसकी आहे . ह्या एकांगी प्रगती मुळे आज त्या देशां मध्ये काय काय दशा झाली ते तुम्हाला कळणार नाही आम्ही सगळं फिरून आलेलो आहोत .

अमेरिके सारख्या देशामध्ये पासष्ट टक्के लोकांना घाणेरडे घाणेरडे रोग झाले आहेत .आणि आता पुण्याला सगळ्यात जास्त या रजनीश च्या लोकांमुळे सगळ्यात जास्त हिंदुस्तानात नाही पण पुण्याला होणार . एकानी मला प्रश्न विचारला त्यानं च्या बरोबर युनिव्हर्सिटीत जाऊ का ? म्हंटल मुळीच जाऊ नका . तुम्हाला घाणेरडे रोग घ्यायचे असतील तर त्यांच्या बरोबर जा . हि सगळी घाण त्यांनी तिथे एकत्र केलेली आहे . मग त्याशिवाय त्या देशां मध्ये इतर इतके प्रश्न आहेत ,ते तुम्हाला सांगितलं तर समजणारच नाहीत . सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल ,लंडन सारख्या शहरात प्रत्येक आठवड्याला दोन दोन मूल आईवडील मारून टाकतात . त्यांची सामाजिक व्यवस्था इतकी खराब आहे . एक एक बाई नऊ नऊ दा लग्न करते . हा प्रकार आहे ,इथला जो सामाजिक प्रकार झालेला आहे तो आपल्या देशात आणायचा आहे का आपल्याला ?. तशी स्तिती आणायची आहे का आपल्या पोरा बाळानं वर इथे . तेव्हा आध्यत्म हा आपला पाया आहे . हे लोक इथे का आले ? कारण ते तिथल्या वरपांगी पणाला ,एकांगी पणा च्या जीवनाला कंटाळले . आणि इतक्या तऱ्हेचे रोग येणार म्हणून मी सांगितलं होत ,एड्स येणार म्हणून मी त्यांना १९७० साली सांगितलं होत . नंतर आता जो दुसरा रोग आलेला आहे त्याच्या बद्दल त्यांना आठ दहा वर्षा पूर्वी सांगितलं होत . ते सगळे रोग त्यांना आले पण ते ऐकायच्या मनस्तीतीत नव्हते ,आणि त्याच्यात भर म्हणजे इकडचे भामटे रजनीश सारखे पुष्कळ तिकडे गेले . यांनी ५८ रोल्स राईस विकत घेतल्या ,त्या कुठून घेतल्या असतील ?. ५८ ,एक रोल्स राईस ला मला वाटत तरी सात करोड रुपये लागतात . आणि सगळेच्या सगळे तिथे कावडी मोल विकून हा जेल मध्ये गेला . आणि जेल मधून इथे आले .आणि त्यांना मानणारे हे लोक आहेत .

काही सहजयोगी एका बाईला भेटायला गेले . ती अंधश्रध्दा समिती तीत होती ,तर ती म्हणे राजनिश किती मोठे आहेत ,वा ,वा ,वा . कोण मोठे आणि कोण लहान हे ज्या लोकांना कळत नाही ते कसलं अंधश्रध्दा निर्मूलन करणार . तर आधी आपली जागृती करून घ्या .हि शक्ती तुमच्या मधेच आहे ,"तुझं आहे तुझं पाशी "जे संतांनी सांगितलं ते आम्ही सिध्द करू शकतो . ते तुम्ही सिद्ध करा आणि आपली शक्ती वाढवा . अशे ओरडत फिरू नका ,तुमची लायकी हि नाही ,तुमची लायकी आहे महान होण्याची ,मोठे होण्याची . हे असले मूर्ख पणाचे धंदे करू नका आणि याच्यात पडू नका . मी आज एका शाळेत आलेली आहे ,शाळा म्हणजे पवित्र जागा ,उद्या इथलीच मुल ड्रग घेऊन पडतील ,दारू पिऊन पडतील . आणि सर्वनाश स्वतः चा करून घेतील ,मला हे स्पष्ट दिसतंय . अशा लोकांना तुम्ही जर महत्व दिल तर काय होईल काय समजत नाही . दुसरं असं कि हि भूत विद्या ,काळी विद्या जी आहे म्हणजे हातातून हे काढणं वैगेरे हे सगळं आहे ,विद्या आहे हि ,पण श्रद्धेचं स्थान नाही काही ते . हि खोटी विद्या आहे . पण हे करतात ,आणि हे जेव्हा ते करतात तेव्हा अशा लोकांच्या कचाट्यात जाऊ नका तुमच्यावर परिणाम होईल . तुम्ही आजारी पडाल ,म्हणूनच तो तमुर असा मेला आणि फार वाईट परिस्तितीत मेला . आमच्या ओळखीचे एक आहेत दिल्ली युनिव्हर्सिटीचे व्हाईस चान्सलर होते त्यांनी सांगितलं कि तो तडफडून तडफडून मेला . अशांच्या मागे हे लोक लागलेले आहेत . तेव्हा हे पैसे कमवायचे धंदे असोत किंवा काही असो ,अशा वाम मार्गाने तुम्ही पैसे कमवू नका . आपली आत मध्ये शक्ती आहे . या सगळ्या संतांनी सांगून ठेवलं आहे ते का खोट असेल ,त्यांनी कस आपल आयुष्य कंठल ,कसे राहिले ते . आता असं म्हणणं अध्यात्माने गरिबी येते हे चुकीच आहे ,आपल्या भारतातलं आध्यत्म सगळं चुकीचंच आहे . कारण बहुतेक अंधश्रद्धेत गेलेले ,त्यानंतर भामटे इतके त्यानंतर भलते सलते गुरु ,आता तो चंद्रास्वामी एक आलेला तो प्रसिद्ध आहे, कितीतरी त्याच्या विरुद्ध लंडनला छापलं होत ,त्यांनी कितीतरी प्रकार केले . मग दुसरा हा मुक्ताजी काय घाणेरडे लोक आहेत हे ह्या सर्व लोकांच्या नादी लागून जर तुम्ही आध्यत्म मिळवायचं म्हंटल तरुणही ,कोणी असा म्हणत नाही कि मी तुम्हाला आत्मसाक्षात्कार देईन . कोणी म्हणत नाही ,का ?कारण त्यांना देताच येत नाही त्यांना . कशासाठी ,धर्म कशासाठी .धर्म तुम्ही हिंदू असा ,मुसलमान असा ,ख्रिश्चन असा सगळे पाप करू शकतात . धर्म आतमध्ये आहे तो जागृत झाला पाहिजे . जेव्हा आपल्या मध्ये धर्माची धारणा होते तेव्हा आपण कोणतेही वाईट काम करत नाही . कारण प्रकाश आत्म्याचा आपल्यात आला . समजा अंधार आहे अंधारात तुम्ही आंधळे बसले ,हाता मध्ये साप आहे ,कुणी म्हंटल तुझ्या हातामध्ये साप आहे पण तो चावेस तोवर तुम्ही म्हणता हे दोरखंडच आहे . पण प्रकाश आला कि तुम्ही तो टाकून देता तसच सहजयोगात आल्यावर किती कल्याण होत ,पहिली गोष्ट मनुष्य व्यसन मुक्त होतो ,त्याच कर्तृत्व वाढत ,एक गृहस्थ आजच आले होते ते म्हणाले मला कविता काही करता येत नाही आणि त्यांनी अस काव्य म्हणून दाखवलं मला . मी आश्चर्य चकित झाले ,ते म्हणाले माताजी हे सगळं तुमचच कारस्थान आहे तुम्हीच मला शिकवलं ,आणि उर्दू मध्ये .

माझे स्वतःचे धाकटे भाऊ उशिराने का होईना पण आले . आणि त्यांना मुळीच मराठीच ज्ञान नव्हतं विशेष ,शाळेत सुध्दा माझ्या हातून निबंध लिहून घ्यायचे . अशी त्यांची स्तिती असे . त्या नंतर आता काय कविता करतोय तो आणि त्या उर्दू मध्ये कविता ,हिंदी मध्ये कविता . म्हंटल हे काय आहे ,ते म्हणे तुमचंच सगळं आहे मला काही माहिती नाही . आणि कुसुमाग्रजांनी ह्यांना एव्हडा मान दिला .सांगितलं कि काय तुम्ही कविता करता या वयामध्ये ,अशी मानसिक स्तितीतले लोक अशा कविता करूच शकत नाहीत . इतक्या लहानपणी तुम्ही कशा ह्या कविता केल्या . त्याला कारण म्हणजे परमेश्वराची कृपा . अहो २३ वर्षात ज्ञानेश्वरांनी काय लिहून ठेवलं आहे . ते तुम्हाला कळायचं नाही ,जावे त्याच्या वंशा तेव्हा कळेल . तो आनंद काय आहे ते . त्यांनी नुसती ज्ञानेश्वरीचं लिहिली नाही तर त्या नंतर एक अमृतानुभव म्हणून एक अद्वितीय असा ग्रंथ लिहिला आहे . हे आमचे सगळे सहजयोगी परदेशात जाऊन वाचतात . ते वाचण्या सारखं म्हणजे इतका आनंद आहे त्यात कि दोन जरी ओळी कुणी लिहू शकले त्याचे तर मी म्हणेन कि काहीतरी आहे त्याच्याकडे . पण त्याच्यावरही घाला म्हणे त्यांची जाऊन समाधी उघडली त्यांनी समाधी घेतली कि नाही बगायला . जो स्वतः खोटारडा असतो तो सर्वानाच खोटारडा समजतो . हे त्यातलं तथ्य आहे . तेव्हा ह्या साताऱ्या मध्ये आम्ही इतक्यांदा आलो आणि इथे काहीतरी कूजतय हे माहित होत म्हणुन साताऱ्या मध्ये सर्वात कमी कार्य झालं आहे . आता तुम्हाला शिवबाची आठवण करून देते ,ते आत्मसाक्षात्कार होते .

आपल्या देशातले हे लाल बहाद्दूर शास्त्री आत्मसाक्षात्कारी होते . पण आपण त्यांना घालवलं का तर आपली लायकी नाही अशा लोकां साठी आपली लायकी नाही . गार्बोचेव हा सुध्दा साक्षात्कारी आहे म्हणूनच तो मला इतकं महत्व देतो . जे साक्षात्कारी लोक आहेत ते साक्षात्कारी लोकांना ओळखु शकतात . नामदेवांना ओळखलं कुणी तर नानकसाहेबानी . त्यांना सांगितलं कि तुम्ही इतकी सुंदर कविता करता देवाची तर आता कृपा करून तुम्ही पंजाबी शिका . एव्हड मोठ पुस्तक आहे त्यांचं पंजाबी मध्ये . त्यात जनाबाईचे पण अभंग आहेत . आणि मराठी पण अभंग आहेत ,मला आश्चर्य वाटलं हे लोक ग्रंथसाहेब मध्ये मराठीचे अभंग म्हणतात . पण त्याच काय पढत मूर्ख बसले उचलला तो ग्रंथ ,एक बोट इथे ठेवतात अखंड पाठ आणि दुसरा संपला पाहिजे . मग त्यांनी काहीतरी वाचायचं ,तिथे बोट ठेवायचं ,परत दुसऱ्यनी बोट ठेवायचं ,याला काही अर्थ आहे का ?हि पढत मूर्खांची लक्षण आहेत . त्यांनी म्हंटल आहे "काही रे बन खोज न जाए "कशाला जंगलात फिरतोस तुझ्यातच मी सामावलेला आहे . पण शेवटी त्यांनी म्हंटल आहे ,"कहे नानक बिन आपा चिनी " स्वतःला ओळाखल्या शिवाय ,"मिटे न भ्रम कि काई " हे त्यांनी नानक साहेबानी म्हंटल आहे .

कबीरांनी तर संबंध कुंडलिनीचंच वर्णन केलं आहे ." इडा पिंगला सुखमन नाडी " "शून्य शिखर पर अनहद बाजे ". पण शेवटी कंटाळून त्यांनी असं म्हंटल "कैसे समझाऊ सब जग अंधा "म्हणजे कमाल हि कि कुंडलिनीला सुरती म्हंटल त्यांनी आणि मी पटण्याला गेले तर तंबाकूला ते लोक सुरती म्हणतात . माणसाची तर कमाल आहे . कशाचं कस खोबर करायचं ते मानवाला विचारा . आणि त्याला ते सुरती म्हणतात हि कुंडलिनी तुमची स्वतःची शक्ती तुमच्या मध्ये आहे . आणि जेव्हा ती ह्या सहा चक्रामधून जाते ,आता तुम्हाला मेडिकल माहित नाही नाहीतर मी तुम्हाला मेडिकली समजावून सांगितलं असत . तेव्हा ब्रम्हरंध्राला छेदल्या वरच तुमच्या हाताला थंड थंड कुणाला गरम पण येत टाळू भागातून वाऱ्या सारखं अस लहरी सारखं येत . आणि हातात जे परम चैतन्य चारी कडे पसरलेलं आहे ते थंड थंड लहरी यायला लागतात . हि परमेश्वराची प्रेमशक्ती आहे . हि तुम्हाला हाताला यायला लागते ,तेव्हा तुम्ही एक दैवी कॉम्पुटर होऊन जाता . कोणाचाही प्रश्न विचारायचा परमेश्वर आहे किंवा नाही ?असा जर प्रश्न विचारला तर लगेच हातात थंड लहरी सुरु होतात . पण एखादा जर भामटा येऊन उभा राहिला त्यांनी जर भगवी वस्त्र घातली असतील तर लगेच तुमच्या हातात गरम गरम यायला लागेल आणि लगेच कळेल कि भामटा आहे किंवा हा चोर आहे . याच हातांच्या बोटावर तुम्हाला त्याची चक्र कोणती धरलेली आहेत ते कळेल तुम्ही चक्रांचीच भाषा बोलता ,दुसर काही बोलत नाही . आणि याच चक्र कस ठीक करायचं . हे शिकण्या सारख आहे आणि ते अगदी सहज काही पैसे न देता तुम्ही आत्मसात करू शकता . आणि त्याच्यावर तुम्ही प्राविण्य मिळवू शकता . तेव्हा तुमची युवाशक्ती जागृत होईल . नाहीतर इथे एक गृहस्थ आले माझ्याकडे म्हणाले माताजी हि आमच्या इथली युवाशक्ती आहे . कसली युवाशक्ती आहे ?अमुक अमुक एका पोलिटिकल पार्टीची . मुळीच पोलिटिकल पार्टीला जॉईन करू नका . मी त्यांना म्हंटल तुमचं धोरण काय ?धोरण काही नाही ,आम्हाला हे जे सांगतात तेच . असं का ,म्हणजे तुम्हाला काही व्यक्तित्व नाही काही सांगितलं तरी कराल तुम्ही . हे काय करतात ते पाहिलं का ,त्यांचं आयुष्य कस आहे ते पाहिलं का . त्यांच्या जवळ पैसे कुठून येतात ते पाहिलं का तुम्ही ,लागले आपले मागे ,झालय काय तुम्हाला . मग त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला , म्हंटल हे सगळ सोडा आत्मसाक्षात्कार घ्या आणि त्याच्या नंतर तुम्हाला कळेल कि तुम्ही कोण आहेत . आता हे तुम्ही बघताय कि माईक आहे पण याचा संबंध जर मेनशी जोडला नाही तर याला काही अर्थ नाही . तसच मानवाचं आहे जो पर्यंत आपला संबंध त्या शक्तीशी होत नाही तो पर्यंत आपल्याला हे कळणारच नाही कि आपण कोण आहोत ,आपलं कोणच धोरण ,आपली काय लायकी ,मग तुम्ही नाही जाणार तिथे ओरडायला . हि काम करायला तुम्ही जाणार नाही . तुम्ही बघाल कि हे दारुडे आहेत ,यांचे हे धंदे आहेत आम्ही कशाला मग यांच्या पाठीमागे जायचं . आम्ही सत्कर्माला लागणारे सत्कारणी लोक आहोत असा जेव्हा मनामध्ये विचार येईल तेव्हाच म्हणायचं कि कुंडलिनीच जागरण झालं .

पण ज्या लोकांना हिंसा करणं ,लोकांना दुःख देणं ,त्रास देणं असे हिटलरशाहीचे उपद्रव सुचतात त्या लोकांसाठी कुंडलिनी नाही . त्यांची जागृती ह्या जन्मात काय हजार जन्मात सुध्दा होणार नाही . अशा उपद्रवी लोकांना आम्ही कधीही जागृती देऊ शकणार नाही . तेव्हा आपल्या मनामध्ये आपल्या बद्दल आदर असला पाहिजे . ज्यांना आपल्या बद्दल आदर नाही तेच अशे उपद्रव करतात . आपण कोण ,आपली महानता काय ,आपली प्रतिष्ठा काय हे समजल पाहिजे . डिग्निटी त्याला म्हणतात . हे समजल पाहिजे . आमची काय प्रतिष्ठा आहे आम्ही काय रस्त्यावर जाऊन ओरडणार आहोत ,दगड मारणार आहोत ,मुळीच नाही ,आम्ही प्रतिष्टीत आहोत . आपल्या आईवडिलांची प्रतिष्ठा वाढवायची आहे ,महाराष्ट्राची प्रतिष्ठा वाढवायची आहे ,हे लोक तुम्हाला इतकं उच्च समजतात कि तुम्ही महाराष्ट्रात आहे म्हणजे त्यानं च म्हणणं कि इथं एव्हडं चैतन्य आहे माताजी तेव्हा इथले लोक किती मोठे असायला पाहिजेत . पण जस संबंध समुद्रा मध्ये पक्षी धावतो आहे आणि पाणी मिळत नाही तसाच प्रकार आहे हा . जिथे पिकत तिथे विकत नाही . हे लोक इतक्या लांबून आले असं जाणून कि इथे एव्हडं चैतन्य आहे ,मी किती म्हंटल दुसरीकडे जाऊया पण नाही आम्हाला महाराष्ट्रातच पाहिजे . महाराष्ट्रातलं चैतन्य कुठे ,काय सुंदर आहे महाराष्ट्रात . त्याच सौन्दर्य बघणं म्हणजे बाह्य नाही आतलं ,आतलं जे काही कार्य आपल्या संतसाधुनी केलं त्याचा फार मोठा फायदा आम्हाला आहे . त्यामुळे हे लोक इकडे येतात . एकदा मी त्यांना तुकारामाच्या समाधीवर पाठवलं तर तिथे ते ध्यान करत असत तिथे ते गेले तर लोकांनी मला सांगितलं माताजी हे गडबडा लोळत होते . म्हंटल तुम्ही कशाला लोळलात . म्हणाले माताजी जमिनीतून चैतन्य वहात होत . ते पाहिलं आम्ही म्हणून आम्ही लोळत होतो . आता ज्यांना चैतन्याची माहिती आहे तोच ते जाणू शकेल . तस आपलं नामदेवांचं सांगायचं म्हणजे ते एकदा गोरा कुंभारना भेटायला गेले . गोरा कुंभार हे पायाने माती तुडवत होते . त्यांच्या समोर उभे राहिले स्तंभित होऊन ,आणि काय म्हणतात "निर्गुणाच्या भेटी आलो सगुणाशी " हे बोलावं एका आत्मसाक्षात्कारी संतांनी आणि ऐकावं ते सुध्दा एका आत्मसाक्षात्कारी संतांनी . ज्यांना याचा प्रकाशच मिळालेला नाही त्यांच्या समोर नुसती बडबड आहे .

पण तरी सुध्दा हा तुमचा जन्मसिध्द अधिकार आहे. ह्या योगाला प्राप्त होणं हा सर्वांचा जन्मसिध्द अधिकार आहे . विशेषतः महाराष्ट्रातल्या लोकांचा , आणि महाराष्ट्रात जो पर्यंत हे कार्य होणार नाही तो पर्यंत मी मेहनत करणार आहे . जरी तुम्ही मला दगड मारले किंवा काही केलं तरी सुध्दा मी मेहनत करणार आहे . कारण महाराष्ट्रात माझा जन्म झालेला आहे . आणि त्या संतसाधुना कळस चढवायचं काम माझ आहे ,आणि मी हे कार्य करणार तुम्ही कितीही मला त्रास दिला तरी .

पूर्वी संतांना फार त्रास दिला होता लोकांनी तो त्यांनी सहन केला . कारण ते एकटे होते . शक्ती मिळाली ती एका दुसऱ्यालाच मिळाली होती . असेल . त्यांना कोणी लोकांनी मारून सुध्दा टाकलं असेल . असं म्हणतात कि सालामाल म्हणून एक गृहस्थ होता पुण्याला ,तो लागला मागे तुकारामांच्या आणि तुकारामांना मारून टाकलं इथपर्यंत लोक पोहोचले होते . किती छळल त्यांनी ,ज्ञानेश्वरांना किती छळल ,त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या तशेच उन्हातान्हात ते जात असत आणि त्यांच्याच पालख्या काढत आहेत ,अरे त्यांच्या पायात वहाणा नव्हत्या त्यांच्या कसल्या पादुका घेऊन जेवणा साठी म्हणून इकडं तिकडं फिरता . म्हणजे सगळ काही किती खाली आलेलं आहे बघा . आता मीच आपल्याला सांगते आमचे यजमान कलेक्टर होते मेरठ ला ,खूप वर्षा पूर्वीची गोष्ट आहे ,तेव्हा आम्ही सुध्दा लहान होतो . तर आम्ही कधी ऐकलं नव्हतं कधी विचार सुध्दा आला नाही मनात ,कधी कानावर अशी बातमी अली नाही कि एखाद्या कलेक्टरने किंवा कमिशनरने पैसे घेतलेत . शक्यच नाही ,काय लोक होते ते . शक्यच नव्हतं . आज हे सगळं का घडत आहे कारण आपल्यातलं अध्यात्म गेलं आहे . कारण अध्यात्मात सगळी नीतीची मूल्य आहेत . नीतीची सर्व मूल्य त्याच्यात आहेत आणि ते जर आपण केलं नाही तर कुठे जाणार ,भरकटून जाणार . आपलं होणार काय आपण कुठे पोहोचणार आहोत ,आपलं ध्येय काय आहे हे लक्षात आणलं पाहिजे . आणि आत्मसाक्षात कारा नंतर हि शक्ती तुमच्यात येते आणि ती तुम्ही दुसऱ्याला देऊ शकता .

ह्याच्यात कृषीवर इथे फार मोठे डॉक्टर आलेले आहेत , इराणी आहेत ते त्यांनी फार अनुसंधान केलं आहे त्या बद्दल पेपरात आम्ही दिल तर कुणी छापायलाच तयार नाही .सगळ्या घाणेरड्या गोष्टी छापायला तयार आहेत आम्ही त्यांना सांगितलं कि एव्हडं मोठं सूर्यफूल निघालं आमच्या इथे ,आणि सात किलो तांदूळ पेरले आणि त्याचे दोनशे चाळीस किलो तांदूळ निघाले . पण कुणी छापायला तयार नाही ,फक्त राहुरीचे लोक आले त्यांनी पाहिलं आणि ते स्तंभित झाले . त्यांना आश्चर्य वाटलं म्हणाले कि आम्ही एव्हडं मोठं सूर्यफूल पाहिलंच नाही कधी . केव्ह्ड वजनदार हे ,अहो म्हंटल सहजयोगाने सर्व काही होऊ शकत . सगळ्यांवर पशुपालना वर,प्रत्येक गोष्टी वरती याचा प्रयोग परदेशात झालेला आहे . आणि तो इथे आपण वापरू शकतो . त्यांनी सगळ्यांची स्तिती ठीक होऊ शकते . पण कोणी ऐकायलाच तयार नाही . कुणाला फुरसतच नाही आज काल दगड मारण्या पलीकडे . हे जे धंदे चाललेले आहेत ते बंद करावेत ,रिकामे पणाचे धंदे कोणी करू नयेत . आणि आपली प्रतिष्ठा हि जाणून घ्यावी . त्या प्रतिष्ठित स्तीतीला आपण उतरलं पाहिजे . आपण काही रस्त्यावर पडलेले नाही आहोत . वाट्टेल त्यांनी वाट्टेल ते सांगितलं आणि आपण तस वागलं आपली आपण प्रतिष्ठा घालवायची नाही . मला आश्चर्य वाटत कधी कधी कि पुण्याला सुध्दा अशी आठ दहा मूल घेऊन आले होते ,त्यांना विचारलं कारे बाबांनो तुम्ही कशाला आलात इथे ?नाही आम्हाला थोडे पैसे दिले म्हणून आम्ही आलो इथे . हि का तुमची प्रतिष्ठा झाली . त्याच जे मूळ तत्व जे आहे ते कि मानवाचे परिवर्तन , मानवाचे परिवर्तन झाल्या शिवाय ह्या सर्व गोष्टी जाणारच नाहीत . तुम्हाला काय वाटल परदेशात अंधश्रद्धा नाही ,भयंकर अंधश्रद्धा आहे . इतकच नव्हे तर अमेरिकेत तर विचक्राफ्ट हे ते याच्या शाळा आहेत . तिथे जाऊन वाट्टेल ते करा . ते लोक समजले आणि सहजयोगात उतरले आणि आज एव्हडं कार्य करत आहेत जगभर ते सगळे महामूर्ख ,आणि इथे दोन चार अतिशहाणे ,दीडशहाने जे दिसतात त्यांचे बैल रिकामे आहेत . त्यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या आयुष्याची नासाडी करून घेऊ नका . जर तुम्हाला सहजयोगात यायचं नसेल तर येऊ नका कारण याच्यात जबरदस्ती करता येत नाही . तुमची इच्छा असायला पाहिजे कि आमची जागृती झाली पाहिजे . जर तुम्ही आपली कुंडलिनी जागृत करायची इच्छा केली तरच होऊ शकेल नाहीतर होणार नाही . हे काही आव्हानाचं काम नाही आहे कि आमची जागृती करून द्या . कशी करणार ?उद्या हिटलर येऊन उभा राहिला माझी जागृती करून द्या म्हणून तर मी म्हणेन हात जोडून बाबा तुमची जागृती झालेलीच आहे ,तु तसाच राहा . कधीच होणार नाही .

तेव्हा माणसाचा एकंदर विचार ,कि आम्हाला सुध्दा हि परमेश्वरी शक्ती मिळाली पाहिजे हे फार गरजेचं आहे . कुणावरही जबरदस्ती करता येत नाही ,कुणावर दडपशाही करता येत नाही ,कुणावर दगड मारता येत नाहीत काही नाही . हे मिळवायला पाहिजे ,आपली शक्ती आपल्या जवळ असताना आपण जर नाही मिळवली तर तुम्हाला शहाणं म्हणायचं कि काय म्हणायचं . जे त्या वेळेला ज्ञानेश्वरांनी सांगितलं सामूहिकतेत ते आज साक्षात करत असताना ह्या महाराष्ट्रातच हे शहाणपण कशाला ,असं दिल्लीला नाही असं दिल्लीच्या पलीकडे हि नाही ,यू पी ला नाही ,कर्नाल ,हरियाना तिथे नाही ,कुठेही नाही आसाम ला नाही . आश्चर्याची गोष्ट आहे हे आपल्या महाराष्ट्रातच का आहे जिथे संतांनी सगळं कार्य केलेलं आहे . असं का का . आपल्याला असं वाटत कि धर्माच्या नावावर पुष्कळ वाईट गोष्टी होत आहेत हे मी मानते . पण मी त्याबद्दल १९७० साला पासून बोलते आहे इत पर्यंत लोकांनी माझ्या यजमानांना सांगितलं कि तुमच्या बायकोला लोक मारतील . म्हंटल मला मारणारा अजून आलेला नाही . तेच उलटेल त्यांच्या वर . जे मारायचा प्रयत्न करतील तेच त्यांच्यावर उलटेल . तेव्हा हे लक्षात ठेवलं पाहिजे कि सत्कारणी आपलं आयुष्य घालवल पाहिजे . आपलं काहीतरी विशेष नाव झालं पाहिजे . हि शक्ती मिळवा आणि सगळ्यांचं नाव झालं पाहिजे मोठं . आज मी या शाळेच्या आवारात आले हे मी माझं भाग्य समजते ,आणि शाळां बद्दल मला फार उत्कट प्रेम आहे इतकच नव्हे तर तरुण पिढी बद्दल आम्ही फार दुर्लक्ष केलं असं मी नेहमी सांगत असते . तेव्हा आता हि वेळ अशी आलेली आहे कि तुम्ही आपली शक्ती मिळवा आणि स्वतः आपण कोण आहोत आपला गौरव काय आहे ते जाणून घ्या . माझा तुम्हा सर्वाना अनंत आशीर्वाद .

Satara (India)

Loading map...